लग्न म्हणजे काय असतं हो
बघायचं ठरतं ,
ओळख कुठून निघते .
फोटो जातात घरी ,
देवाण घेवाण होते .
फोटोवरून मग ,
बैठक होते घरी .
मुलगा येतो बघायला ,
मुलीच्या दारी .
पत्रिकेतले दोष गुण
मान पान , देणं घेणं
जुळून आले कि हे सारे ,
जळून येतात मनं
बैठकी होतात ,
बस्ताही बसतो .
लगीनघाईत व्यस्त ,
हरएक दिसतो
शेरवानी , साडी
सारंकाही ठरतं
बघता बघता घर ,
माणसांनी भरतं .
तारीख एक ठरते
मंडपही सजतो .
नवरीला पाहून मंडपी ,
मग नवराही लाजतो .
एक मुलगा , एक मुलगी
एक नवरा , एक नवरी
अक्षदा अन आशीर्वाद घेऊन
बारात जमली हावरी
अक्षदा पडतात ,
आशीर्वादही मिळतो .
नवरीचा भाऊ हक्काने ,
नवऱ्याचा कान पिळतो .
निरोप घेता नवरी ,
रडती मग सारे .
आशीर्वाद देती ,
नांदा सौख्यभरे .
आशीर्वाद घेऊन सगळ्यांचे ,
नवं पर्व सुरु होतं .
माझं मन तुझं मन ,
एक होऊन जातं .
जबाबदारीचं भान ,
अचानक कळतं .
संसार असं त्याला ,
गोंडस नाव मिळतं .
नवरा बायको जणू ,
दोन चाकं होतात .
संसाराचा गाडा ,
खांद्यावर वाहतात .
दोन वेगळी मने ,
एक होऊन नांदतात .
दोन कुटुंबांना ,
एका धाग्यात बांधतात .
जोडायची रीत आहे ,
जोडलेच जातात .
वेगळी कुटुंब ,
एक परिवार होतात .
तारेवरची कसरत ,
होते थोडी कधी .
याचीचतर मजा आहे ,
खऱ्या संसारामधी .
रुसवे फुगवे कधी ,
भांडनेही होतात .
सुखं गेली तशी ,
दुःखही जातात .
कुणी म्हणतं लग्न ,
झाली एक सजा आहे .
तडजोडीचं तंत्र कळलं ,
तर यातच खरी मजा आहे .
समजुतीने दोर संसाराची ,
हातामध्ये घ्यावी .
कधी तू , तर कधी मी
माघार घेऊन बघावी .
काय होईल जर ,
गमक कळले खरे .
संसारातून दोघा ,
तर सुख मिळे पुरे .
डोंबारीच्या खेळातल्या ,
दोरीवर चालणे .
कसरत करत सारी ,
दुःखही झेलणे .
भातुकलीचा खेळ ,
खरा होईल मग .
डोळ्यांमध्ये एकमेकांच्या ,
दिसेल त्यांना जग .
लपंडावाचा खेळ ,
सुख दुःखे खेळतील .
राज्ये परत देण्यासाठी ,
धप्पे खूप मिळतील .
राज्य घेत राहावं ,
दुनिया बोले काही ,
राज्य किती आली ,
तरी खेळ संपत नाही .
लग्न म्हणजे असा ,
काही अजबच खेळ असतो .
दोन मनांचा जमलेला ,
अप्रतिम मेळ असतो .
- अभिषेक पांचाळ
प्रतिक्रिया
17 Apr 2016 - 1:02 am | उगा काहितरीच
छान कविता. (लेख असला असता तर २-३०० कसेही आलेच असते. ;-) )
17 Apr 2016 - 3:57 am | एस
रतीब. मला वाटलं लेख असेल.
17 Apr 2016 - 10:03 am | दत्ताभाऊ गोंदीकर
आवडली.लिहीत रहा...आम्ही वाचत जाऊ.
17 Apr 2016 - 10:07 am | रातराणी
आवडली.
17 Apr 2016 - 11:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ दे.
अवांतर : मलाही वाटलं लग्न या विषयावर काथ्या कुटायचा आहे.
अन रैवारचा पोहे खात खात काथ्या कुटायचा माझाही चांगला मुड होता :(
-दिलीप बिरुटे
17 Apr 2016 - 11:31 am | पैसा
अपेक्षाभंग. मला वाटले जान्हवी न मुक्ता बर्वे टाईप मुली न मिळणाऱ्याना एक लेक्चर देता येईल. कसचं काय!
17 Apr 2016 - 12:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जान्हवीसारखी मुलगी मिळावी अशी अपेक्षा असणारे लोकं डोक्यावर पडलेले असतात असं माफक निरिक्षण. सतत गोग्गोड गोग्गोड गोग्गोड बोलुन डोकं किटवणारी, हापिसात बसुन काम कमी अन टैमपास करणारी, सुमारे ९० वर्षातुन एकदा वंशाचा दिवा किंवा वंशाची पणती जन्माला घालणारी बायको ज्याला हवी असेल तो माणुस लग्नासाठी मॅचुअरचं नाही असं म्हणेन.
अरे बायको कशी पायजे, फट्टाकडी. सतत उपदेशांचे डोस पाजण्यापेक्षा कैतरी रोमँटिक बोलणारी इ.इ. हॅशटॅग रेवाक्का =))
17 Apr 2016 - 12:09 pm | टवाळ कार्टा
जौ दे रे...तो पण एक अंदाज असेल =))
17 Apr 2016 - 12:32 pm | पैसा
है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे।
कहते है के गालिब का है अंदाजे बयां और।
या अड्ड्यावर कधीतरी. नीटच समजावून सांगेन! बाकी तुमच्या धाग्याचा उपसंहार सांगितला नाहीत. सल्ले देणाऱ्याना धन्यवाद म्हणून दी एन्ड सांगायची पद्धत असते!
17 Apr 2016 - 12:36 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचं मीठागार आहे का हो गोयंमधे? मीठ चोळणं ह्या वाक्प्रचाराला साजेसा प्रतिसाद.. =)) =))
17 Apr 2016 - 12:39 pm | पैसा
आहेत ना मिठागरे. किती गोण्या पाठवू?
17 Apr 2016 - 12:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
णको. खुप मीठ ब्लडप्रेशरला वाईट.
17 Apr 2016 - 12:44 pm | पैसा
मग णको तर!
17 Apr 2016 - 12:44 pm | टवाळ कार्टा
ब्वॉर्र्
17 Apr 2016 - 12:48 pm | अजया
=)))
गोयंचं मीठ जास्तच झोंबरं असतंय ;)
17 Apr 2016 - 5:17 pm | रेवती
अरे ए,मैने तुम्हाला क्या घोडा मार्या हय?
माझ्या विवाह मंडळात नावनोंदणी केलीस की जादू बघशीलच!
17 Apr 2016 - 5:27 pm | अभ्या..
रेवाक्का काल ते निरोप दिलास पण नाव घ्यायचं राह्यलं. ;)
होऊन जाऊ दे.
17 Apr 2016 - 6:22 pm | रेवती
वेगळा धागा काढा. सगळेजण विनोदी उखाणे घेतील. तुलाही नाव घ्यायला लावणार मग! तेंव्हा लाजलास तरी नाव घ्यावच लागेल.
17 Apr 2016 - 10:57 pm | अभ्या..
सध्या शिकतोय निर्लज्जपणा. न लाजता घेईन मी नाव.
अगदी यमक वगैरे टाकून घीईन. ;)
18 Apr 2016 - 9:48 am | नाखु
यमकांसाठी भेटा किंवा लिहा...
हमखास यमके शिका फाडफाड !
विरोधी प़क्षाची करा पाडापाड !
यमके गुरुजी संचालीत खटकेबाज यमक शिकवणी वर्ग.
ता.क.मे सुट्टीत सोलापुरात्/मिरजेत/कोल्हापुरात उन्हाळी वर्ग चालविले जातील
17 Apr 2016 - 6:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
णावणोंदणी कियेला है भोत पैले.
17 Apr 2016 - 7:22 pm | रेवती
मग मला कसं समजलं नाही? की तिथेही ड्यू आयडी आहे? ;)
असो. आता तुला एक इंजिनियर, एक डॉक्टर, एक मॉडेल, एक शिरेलीत काम करणारी हिरवीन यांची स्थळे पाठवून देते. नर्सची स्थळे आजकाल नोंदणी करून घेत नाही हे सूडच्या अनुभवावरून माहितच असेल. तो भेटण्याच्या कार्यक्रमात तिला सिस्टर म्हणाल्याने घोळ झालावता.
17 Apr 2016 - 10:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तिकडे ड्युआयडी चालत नाहीत म्हणे.
ठ्ठो!!!
17 Apr 2016 - 11:49 am | असंका
लग्नातली रडारड पाहून जमाना झाला....
17 Apr 2016 - 11:51 am | विजय पुरोहित
=))
17 Apr 2016 - 12:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अभिषेक पांचाळ चांगली कविता. तुम्ही मिपावर नवीन दिसता. त्यामुळे तुम्ही खालील धाग्याचा एका बैठकीत अभ्यास करा. ह्याहुन उत्तम आणि रिअलिस्टिक कविता लिहु शकाल.
शंकानिरसनासाठी टवाळ कार्टा ह्या आयडीला व्यनि अथवा खरड करु शकता.
वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?
17 Apr 2016 - 2:33 pm | आदूबाळ
नोट्स काढायला विसरू नका
17 Apr 2016 - 4:39 pm | तर्राट जोकर
+१
17 Apr 2016 - 12:46 pm | अजया
=)))
त्यांचा या विषयावर अनेक वर्षांचा दांडगा अभ्यास आहे.त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत....
17 Apr 2016 - 11:04 pm | एस
लग्न म्हणजे घोड्यावर चढवण्याचा उद्योग असतो. फक्त त्याला हरभर्याच्या झाडावर चढवला असे कोणी उघड म्हणत नाही. ;-)
18 Apr 2016 - 9:51 am | नाखु
त्या स्थीतीला कोण घोडा (की गाढव) आहे ते कळत नाही हे नक्की आणि कळाल्यावर फार उशीर झालेला असतो.
दैनीक खुलासा मधून याचकांची पत्रेवाला नाखुस.
17 Apr 2016 - 11:19 pm | बोका-ए-आझम
in which woman gets Master's degree and Man loses his Bachelor's degree.
18 Apr 2016 - 9:17 pm | विवेकपटाईत
या वर्षी लग्नाला ३० वर्षे पूर्ण होतील. अजूनही कळले नाही लग्न म्हणजे काय असते.....