वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
15 Jan 2015 - 3:24 am
गाभा: 

मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.

माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.

भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.

शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?

एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.

मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.

ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.

माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.

शिक्षण : जेमतेम डिप्लोमा

पगार : २२००/-

नौकरी : खाजगी.

जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.

इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)

वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल.

आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.

लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.

शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.

अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.

दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.

थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?

संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.

डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jan 2015 - 3:44 am | निनाद मुक्काम प...

हा लेख येण्यापूर्वी स्पा च्या धाग्यावर हेच मत मांडले आहे.
मुलींच्या अपेक्षांनी बेजार माझे काही मित्र व भविष्यातील विवाह उत्सुक माझा धाकटा भाऊ मेटाकुटीस आले आहे ,
माझ्या धाकट्या भावाच्या लग्नाची काळजी दरवेळी आई फोन केला की सांगते , मग मुलींच्या अपेक्षा कश्या अव्वा च्या सव्वा आहेत. वर हा कार्टा तुझ्या सारखे स्वतःचे स्वतः लग्नाचे जुळवत सुद्धा नाही हे सुद्धा ऐकवले आहे. मग पंचक्रोशीतील व नातेवाईकांच्या संदर्भातील एकेक किस्से उदाहरणे सांगायला लागते , मुलांच्या आई वडिलांना भारी टेन्शन
मारवाडी समाजात पूर्वी मुलीकडून भरमसाठ हुंडा यायचा , आता त्यांच्यात मुली कमी असल्याने मुले हुंडा देऊन लग्न करतात ,
हरयाणा मध्ये परिस्थिती भीषण आहे ,
बोनी कपूर चा ट्युलिप जोशी नायिका असलेला हा सिनेमा
वास्तवदर्शी असून पाहतांना मस्तक सुन्न झाले.
लग्नाची बोलणी वैगरे सगळा गमतीचा

मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत हे खरेच आहे. पण यालापापणच जबाबदार नाही का? आपण जर आठवड्यातुन एकदा मुलीला पिझा देत असू, एकदा बाहेर जेवायला नेत असू तर तहीपण हीच अपेक्ष नवर्याकडुन करणार नाही का? म्हणजे तसा पैसा कमावणारा नवरा तिला हवा असेल. आपण कधी तिला अडचणीतअरहायची सवय केली का ? जर आपण मुलीला सर्व सुखे देत असू तर तिला त्यापेक्षा जास्तत सासूरवाडी कडुन हवे असणार.

असो. मी एका मुलगी पहाण्याच्या समारंभाला गेले होतो. नंतर मुलगा मुलगी मिळुन फिरायला गेले होते एखाद तासा साठी. त्यांना एक मेकांच्या अपेक्षा नीट कळाव्यात म्हणुन आम्हीच ही सूचना केली होती. तेथे मुलीने विचारलेल्या प्रश्नांत आणी घातलेल्या अटीत एक होती ' तुमच्या घरात डस्ट्बीन्स किती आहेत ( हा तिचाच शब्द- डस्ट्बीन्स म्हणजे म्हातारी माणसं !) तिला घरात आजी आजोबा वगैरे नको होते म्हणजे त्यांच काहे करायला नको !

हा डस्टबिनवाला अनुभव लोकांनी कायम सेकंडहँड सांगितलाय. फर्स्टहँड सांगणारे तुम्हीच पहिले. या निमित्ताने असे बोलणार्‍या व्यक्ती खरेच अस्तित्वात आहेत हे कळाले.

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 5:01 pm | टवाळ कार्टा

यालापापणच => =))

बाकी

' तुमच्या घरात डस्ट्बीन्स किती आहेत ( हा तिचाच शब्द- डस्ट्बीन्स म्हणजे म्हातारी माणसं !) तिला घरात आजी आजोबा वगैरे नको होते म्हणजे त्यांच काहे करायला नको

याबाबत तिचा "पुणेरी आजोबा स्टाईल जाहिर सत्कार" करायला पाहीजे :)

ही डस्टबिनची गोष्ट आणि त्या अनुशंगाने चर्चापण झालीये राव. आशे नाय कराचे. आदीच इथे अडीचशे पर्तिसाद सांडलेत, त्यात तुम्ही आधीच दळलेलं आणून ओतू नका ना हो.

टवाळ कार्टा's picture

19 Jan 2015 - 8:09 pm | टवाळ कार्टा

;)

अनन्त अवधुत's picture

20 Jan 2015 - 3:39 am | अनन्त अवधुत

जर आपण मुलीला सर्व सुखे देत असू तर तिला त्यापेक्षा जास्तत सासूरवाडी कडुन हवे असणार.

काहीच्या काहीच लॉजिक.
अहो , म्हणजे सासरी काहीच मिळणार नाही असे सांगून पोरीला छळायचे का?
मुलांना काय हवे नको ते बघणे , त्यांचे लाड करणे आणि त्यांना जबाबदारी शिकवणे ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

मराठी कथालेखक's picture

13 Jun 2016 - 1:32 pm | मराठी कथालेखक

माझ्या पाहण्यातली काही उदाहरणे :
१) स्वतःच्या लग्नानंतरही कित्येक वर्षे माहेरी भाड्याचे दोन खोल्यांचे घर (अजूनही तेच घर, फक्त आता ते विकत घेतले आहे), मात्र लग्नानंतर लवकरात लवकर स्वतःचे घर व्हावे यासाठी आग्रही मग आधी तीन खोल्या , नंतर सहा खोल्या पण त्या फारशा नीट सजवलेल्या नाहीत ही तक्रार आहेच (लग्न : १९७५ च्या आसपास)
२) श्रीमंत कुटुंबातली, मोठ्या बंगल्यात राहणारी मुलगी, लग्न करुन मध्यमवर्गीय घरात पण घराच्या साधेपणाबद्दल तक्रार नाही (लग्न : २००० च्या आसपास)
३) क्र १ मधील महिलेच्या भावाची पत्नी : लग्नाआधी चाळितल्या घरात , लग्न होवून वर उल्लेखलेल्या दोन खोल्याच्या घरात, सोबत सासू-सासरे (सासरे पुढे वारलेत , सासू अद्याप आहे) , पाहूण्यांची नियमित वर्दळ, दोन मुले. माहेरी मात्र मधल्या काळात चाळ पडून बिल्डरनकडुन १ बीएचके फ्लॅट मिळाला. सासरी अद्याप तेच छोटेखानी घर. महिलेची तक्रार नाही (लग्न : १९९५ च्या आसपास)

स्वतःच्या लग्नानंतरही कित्येक वर्षे माहेरी भाड्याचे दोन खोल्यांचे घर (अजूनही तेच घर, फक्त आता ते विकत घेतले आहे), मात्र लग्नानंतर लवकरात लवकर स्वतःचे घर व्हावे यासाठी आग्रही मग आधी तीन खोल्या , नंतर सहा खोल्या पण त्या फारशा नीट सजवलेल्या नाहीत ही तक्रार आहेच

ही तक्रार बायकोची आहे असे वाटते. खोल्या नीट सजवलेल्या म्हणजे नेमके काय?

मराठी कथालेखक's picture

15 Jun 2016 - 12:09 pm | मराठी कथालेखक

ही तक्रार बायकोची आहे असे वाटते

नाही हो.. मी इतका वयस्कर नाही :)

खोल्या नीट सजवलेल्या म्हणजे नेमके काय?

म्हणजे घर 'पॉश' , अद्ययावत नसणे. रंग उडालेल्या भिंती , जुन्या पद्धतीचे फर्निचर ई बद्दलची तक्रार..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jan 2015 - 3:51 am | निनाद मुक्काम प...

सिनेमाचे नाव देण्यास विसरलो
मातृभूमी

पुर्वी एका धाग्यावर दीलेलं मत इथेही देतो.
जसे सुस्थापीत मुले (नोकरी आणि फ्लॅट असलेले)नोकरी नसलेल्या मुलीशी लग्न करतात. त्याप्रमाणे नोकरी असलेली मुलगी एखाद्या नोकरी नसलेल्या मुलाशी लग्न का करत नाही. स्त्रीमुक्तीवाल्या अगदी ओरडून सांगत असतात की मुली कुठेच कमी नाहीत मुलांपेक्षा. मग इथेच कमी पणा का घेतात. मुलाचा पगार मुलीपेक्षा जास्तच पाहीजे.असे का?
दुसरे असे की एकाच घरात दोन गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या गेल्यामुळे एखाद्या बेकाराचे घर सुस्थापीत होण्यापासून मुकते. जर एखाद्या मुलीला १ लाख पगाराची नोकरी असेल तर तीला परत दीड लाख पगारवालाच नवरा का हवा असतो? एखाद्या सुशीक्षीत, नीर्व्यसनी मुलाशी लग्न का करु शकत नाही?

स्पंदना's picture

15 Jan 2015 - 4:22 am | स्पंदना

सहमत!! दोन दोन नोकर्‍यांनी एकच घर समृद्ध होण्याऐवजी, आणखी एक घर जगू शकतं.

hitesh's picture

15 Jan 2015 - 7:57 am | hitesh

अजिबात सहमत नाही.. मिळवणारे चोर्‍या करुन मिळवत नसतील तर त्यानी दोन का चार पगार घरात आणावेत

नगरीनिरंजन's picture

15 Jan 2015 - 8:47 am | नगरीनिरंजन

तुमच्या सारख्या लिब्बरल लोकांशी वाद घालायची इच्छा नाही पण जमल्यास एलिझाबेथ वॉरन यांचे "टू इनकम ट्रॅप" हे पुस्तक वाचून बघावे हे सुचवतो.

http://www.amazon.com/gp/aw/d/0465090907/ref=redir_mdp_mobile/191-8068222-3664543

hitesh's picture

15 Jan 2015 - 9:25 am | hitesh

कुणीतरी पुस्तक लिहिले म्हणजे ते खरेच आहे असे होत नाही.

वन इन्कम ट्रॅप .. असे पुस्तक मीही लिहू शकेन

नगरीनिरंजन's picture

15 Jan 2015 - 9:53 am | नगरीनिरंजन

म्हणूनच म्हटले मला (निओ) लिब्बरलांशी वाद घालायची इच्छा नाही.

असंका's picture

15 Jan 2015 - 12:24 pm | असंका

दोन मुद्दे वेगळे आहेत हो नगरीनिरंजन साहेब. इथे वर म्हणत आहेत की दोघांनी नोकरी केली म्हणून तिसर्‍या एकाला ती नोकरी मिळत नाहीत. आपला याला पाठिंबा आहे का? दुसरे घर चालावे म्हणून कुणी आपल्या नोकरीचा त्याग करावा का?

आपले स्वतःचे घर नीट चालावे म्ह्णून एकाने घर सांभाळणे योग्य असा या पुस्तकातला मुद्दा असावा असं मला सकृद्दर्शनी दिसतंय..

ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या असून, वेगळया भावना/हिशेब त्यांच्यामागे कार्यरत आहेत.

नगरीनिरंजन's picture

15 Jan 2015 - 12:36 pm | नगरीनिरंजन

पुस्तकातला मुद्दा असा आहे:
१. दोघांनी नोकरी केल्यास भविष्य सुरक्षित होईल असे लोकांना वाटते.
२. दोघे कमवायला लागल्यावर उत्पन्न वाढले म्हणून मोठे घर, मुलांसाठी सर्वोत्तम शाळा, मोठी गाडी (किंवा दोन गाड्या) वगैरे मिळवण्याचा कल असतो.
३. त्यासाठीचा जो खर्च असतो त्याचे प्रमाण पाहिल्यास शेवटी दुहेरी उत्पन्न असूनही बेसिक गोष्टींवर जास्त प्रमाणात खर्च झाल्याने भविष्य सुरक्षित तर होत नाहीच शिवाय लोक कर्जबाजारीही होऊ लागतात.
४. महत्त्वाचे म्हणजे बेसिक गोष्टींवर खर्च वाढल्याने या गोष्टी महाग होतात (जे एकल उत्पन्न गटाला हानिकारक असते) व लेबर सप्लाय वाढल्याने वेतन व जॉब्जची उपलब्धता कमी होते.
आता तुम्ही ठरवा हे लॉजिकल आहे की बकवास.

पुस्तक हा मुद्दाच नव्हता. मुद्दा हा आहे की दुसरे एखाद घर चालावे म्हणून एका घरातील दोघांपैकी एकानेच नोकरी करावी का...

वर आपण मांडलेल्या मुद्द्यांपैकी चौथा मुद्दा याला जवळ जाणारा असला तरी पटण्यासारखा नाही.
१. लेबर सप्लाय या पद्धतीने कमी करणे हे अजिबातच सोल्युशन होऊ शकत नाही.
२. खर्च वाढला म्हणून गोष्टी महाग होतात हे आपण काय म्हणत आहात हे कळत नाही. मागणी वाढली म्हणून गोष्टी महाग होतात हे मी समजू शकतो.
थोडक्यात पुस्तकात सामाजिक क्रांतीची आवश्यकता सांगितलेली दिसतीये की - 'एक कुटुंब एक उत्पन्न!'

अजिबातच पटत नाही.

आपल्याला जर इतरांपेक्षा जास्त हवे तर इतरांपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतात. माझी जर इतरांपेक्षा जास्त कष्ट घ्यायची तयारी असेल, तर मी इतरांपेक्षा जास्त मागणी करणार. ज्यांना कष्ट घ्यायचे नसतील, त्यांनी आम्हाला कष्ट कमी करा असं सांगण्यात काय अर्थ आहे?

कदाचित पुढे एखादी दुर्घटना घडेल जिला तोंड देण्याची एकल उत्पन्न गटाची क्षमता लेखिका-द्वयीला जास्त चांगली वाटते आहे, म्हणून उत्पन्नाचा त्याग करणे कसं योग्य आहे? त्यापेक्षा दुसर्‍या काही मार्गांनी दुर्घटनेला तोंड देण्याची क्षमता वाढवणेही शक्य होइल...

पण हे सगळं पुस्तकावरचं झालं. मुद्दा तो नव्हताच.
मुद्दा हा आहे, दुसर्‍या एकाचे घर चालावे म्हणून आपल्या घरातील एकाने असलेल्या नोकरीचा त्याग करावा का... हा कार्यकारणभाव वर स्पष्ट मांडलेला होता. ह्या पद्धतीच्या त्यागाला आक्षेप आहे.

सुबोध खरे's picture

15 Jan 2015 - 1:16 pm | सुबोध खरे

+१००
याचा पुढचा भाग म्हणजे मुलीना शिकवूच नका
कारण मुलीला शिकवले कि तिला सुद्धा काही तरी करावेसे वाटेल. आता काहीतरी करायचे म्हणजे नोकरी किंवा धंदा. नोकरी केली तर दुसर्या (पुरुषाच्या) पोटावर पाय येतो . धंदा केला तर त्या धंद्यात स्पर्धा निर्माण होते . मग काय करायचे चूल आणि मूल.
किंवा मग धर्मादाय काम करायचे. माझ्या बायकोने ( एम बी बी एस च्या यादीत महाराष्ट्रात क्रमांक १३ बारावीला गुण ९७ %) नौदलाच्या दवाखान्यात रुपये २५००/- महिना या मानधनावर ४ वर्षे काम केले रोज ७० ते ८० रुग्ण पाहण्यासाठी.
म्हणजे एका रुग्ण साठी १ रुपया. तिला हे मानधन द्यायला येणाऱ्या कारकुनाला तिप्पट पगार होता.(सरकारी नोकर असल्यामुळे). या कारणास्तव मी नौदलाच्या नोकरीवर लाथ मारली १८. ५ वर्षाला. (नौदल प्रमुखांच्या मुलाखतीत त्यांनी तुमच्या बायकोची करियर हा तुमचा प्रश्न आहे असे सांगितले)
असे आयुष्यभर करणे किती मुलींना जमेल? आणि त्यांनी का करावे ?
डॉक्टरची गोष्ट वेगळी असे बर्याच लोकांनी मला सांगितले.

नगरीनिरंजन's picture

15 Jan 2015 - 1:35 pm | नगरीनिरंजन

पटत नसेल तर सोडून द्या. वाद घालण्याची इच्छा नाही.

चिमणराव यांचा प्रतिसाद पटला आणि आवडला !

पिलीयन रायडर's picture

15 Jan 2015 - 10:16 am | पिलीयन रायडर

मुलींच्या अपेक्षांच समर्थन करायचं नाहीये.. कारण आई वडीलांची जबाबदारी नको.. भरभक्कम पगार हवा, माहेर जवळ हवं.. किंवा मग डायरेक्ट परदेश हवा, घर हवंच..ते ही २ बीएच्के च.. गाडी नसली तरी एखादी कुल बाईक हवीच वगैरे अपेक्षा असणार्‍या मुली पाहिल्या आहेत. (गोरीच हवी, पाय सपाट नको, जाड नको, चष्मा नको, एकुलती एक किंवा भाऊ नसलेली नको, सुशिक्षित हवी पण नोकरी सोड म्हणलं तर ऐकणारी हवी, वगैरे ह्याही पेक्षा फालतु अपेक्षा असणारी पोरं पण पाहिली आहेत..)

पण मुली नोकरी करुन , नोकरी नसणार्‍या नवर्‍याशी लग्न का करत नाहीत ह्याच एक कारण माझ्यामते असं असु शकतं की संपुर्णपणे घराची जबाबदारी (स्वयंपाक ते पोरांची शी-शु ते अभ्यास ते वाळवणं इ करणे...) घेण्याची भारतीय पुरुषांची मानसिकता असते का? अनेक भारतीय स्त्रिया हे वर लिहीलेलं सगळं करुन नोकरी करतात (अनेकींचे नवरे त्यात प्रचंड मदतही करतात.. काहींचे काडीही उचलत नाहीत..).. असे किती पुरुष असतील जे बायको नोकरीवरुन आली की तिला ग्लासभर पाणी आणुन देतील आणि लगेच ताट वाढुन तिला गरम पोळ्या करुन देतील (बायका आहेत हे करणार्‍या..).. घरात तिचाच शब्द असेल.. तिला कुटुंबप्रमुखाचा मान असेल (कमावतो म्हणून मेजोरिटी घरात पुरुषालाच हा मान असतो..)

मला अनेक अशा धुणी-भांडेवाल्या माहित आहेत ज्या काम करुन पैसे कमावतात आणि त्यांचे नवरे दारुत ते उडवतात.. म्हणजे समाजात अशा स्त्रिया आहेत ज्या नवर्‍याला पोसतात. त्यांना नवर्‍याकडुन घर सांभाळण्यात मदत सुद्धा अपेक्षित नसते.. एक तर अगदी आपल्यासारखी मध्यमवर्गीय मुलगी माहित आहे जी नोकर करुन पैसा घरात आणतेय, घरही बघतेय आणि नवरा सगळं सोडुन घरात बसलाय...

शक्यतो स्त्रिया ही रिस्क घेत नाहित कारण मग घर आणि नोकरी ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याच मानगुटीवर बसतील.. नवरा जर १००% घर सांभाळणार असेल तर माझ्यामते अनेक स्त्रिया १००% पैसा कमावण्याची जबाबदारी घेतील.. पण आपल्या समाजाची रचना त्याला पोषक आहे का?

ह्यात अजुन मुलांचा जन्म, त्यासाठी आईची गरज जिथे बाईला किमान काही महिने घरी थांबावं लागतं (बाळाकडे वडीलही बघतील हो.. अगदी आईच्या दुधालाही पर्याय तयार झालेत (ह्यावर खुप काथ्याकुटही झालाय) आईची माया.. आई-मुलाला एकमेकांची गरज वगैरे मुद्दे सुद्धा सोडुन देऊ....) पण स्त्रिला स्वतःला विश्रांती म्हणुन का होईना घरी रहावं लागेल.. तेव्हा घर कसं चालणार? (चालणारच नाही असं नाही.. पण कमावते दोघंही घरात असले तर ओढाताण तर नक्की होईल..)

त्यामुळे अगदी सरसकट मुलींना जबाबदार धरता येईल असं वाटत नाही..

एकाच घरात दोन गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या गेल्यामुळे एखाद्या बेकाराचे घर सुस्थापीत होण्यापासून मुकते.

ह्याबद्दलही किंचित असहमती आहे.. पण तो ह्या धाग्याचा विषयच नाही.. त्यामुळे पुन्हा केव्हातरी...

नगरीनिरंजन's picture

15 Jan 2015 - 12:16 pm | नगरीनिरंजन

पण मुली नोकरी करुन , नोकरी नसणार्‍या नवर्‍याशी लग्न का करत नाहीत ह्याच एक कारण माझ्यामते असं असु शकतं की संपुर्णपणे घराची जबाबदारी (स्वयंपाक ते पोरांची शी-शु ते अभ्यास ते वाळवणं इ करणे...) घेण्याची भारतीय पुरुषांची मानसिकता असते का? अनेक भारतीय स्त्रिया हे वर लिहीलेलं सगळं करुन नोकरी करतात (अनेकींचे नवरे त्यात प्रचंड मदतही करतात.. काहींचे काडीही उचलत नाहीत..).. असे किती पुरुष असतील जे बायको नोकरीवरुन आली की तिला ग्लासभर पाणी आणुन देतील आणि लगेच ताट वाढुन तिला गरम पोळ्या करुन देतील (बायका आहेत हे करणार्‍या..).. घरात तिचाच शब्द असेल.. तिला कुटुंबप्रमुखाचा मान असेल (कमावतो म्हणून मेजोरिटी घरात पुरुषालाच हा मान असतो..)

लग्नाआधीच बेकार असलेल्या पुरुषांशी लग्न करायची तयारी दाखवली आणि अशी इच्छा बोलून दाखवली तर काही प्रमाणात तरी पुरुष यासाठी तयार होऊ लागतील असे वाटते. अर्थात बाकीचे लोक टोचायला असतातच; त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आले पाहिजे.

पिलीयन रायडर's picture

15 Jan 2015 - 1:25 pm | पिलीयन रायडर

तेच तर मी म्हणतेय.. समाज तयार आहे का? बेकार असलेल्या मुलाशी लग्न लावुन देणे.. त्याची घरकाम करायची तयारी असणे.. ह्याला त्याच्या आईचा सपोर्ट असणे..किंवा किमान हरकत नसणे... सगळच अवघड आहे.. याक्षणी तरी.. मग हे सगळं बदलण्याची जबाब्दारी फक्त कमावत्या मुलींची आहे का?

त्यात्वर दोघांनी नोकरी करु नये असा प्रवाद चालु आहे.. नवर्‍याला म्हणावं तू सोड तर वर सांगितलेले सगळे मुद्दे येतील.. आणि मग शिकलेल्या, कमावत्या बाईलाही तोच इगो असतो जो कमावत्या पुरुषाला असतो.. तिने का म्हणुन नोकरी सोडावी? हा एक मुद्दा येईल...

नगरीनिरंजन's picture

15 Jan 2015 - 2:01 pm | नगरीनिरंजन

पुरुषांनी घरकाम करण्यात काहीही चुकीचे नाही. असेच मत असलेल्या लोकांनी ते हळूहळू अंमलात आणल्यास बदल होईल. मुद्दे येतील म्हणून काहीच केलं नाही तर कधीच बदल होणार नाहीत.

अशावेळेस, घटस्फोटाच्या वेळी अशा पुरुषांना पोटगी मिळू शकेल काय हो ? नाई म्हंजे एक शंका उगीच.

स्मिता चौगुले's picture

15 Jan 2015 - 12:45 pm | स्मिता चौगुले

सहमत..:)

मधुरा देशपांडे's picture

15 Jan 2015 - 1:39 pm | मधुरा देशपांडे

पिराला अनुमोदन.
खटपट्या म्हणतात तसे मुलाचा पगार जास्तच पाहिजे, शिवाय त्याने घरातील कामेही करावीत, त्याचा फ्लॅट पाहिजेच पाहिजे अशा अपेक्षा असणार्‍या मुलींची कीव येते. मी जेव्हा दोन मैत्रिणिंशी असे बोलताना 'माझी हरकत नाही मुलाचा फ्लॅट नसेल तरिही. आम्ही दोघे मिळुन घेऊ की' तेव्हा त्या दोघींनिही मला वेड्यात काढलं होतं.

पण अरेंज मॅरेज मध्ये अजुन नसेल, तरिही लव्ह मॅरेज मध्ये अनेक केसेस अशा डोळ्यांसमोर आहेत ज्यात लग्न झाले तेव्हा, त्यानंतरही काही वर्षे मुलाला नोकरी नाही. त्याचे शिक्षण सुरु आहे. आणि हे मुलींनी आणि त्यांच्या पालकांनीही सहज स्विकारले आहे. यातलीच मी देखील एक. लग्न ठरले तेव्हाच नवर्‍याने पहिली नोकरी वर्षभर करुन सोडली होती आणि उच्च शिक्षणासाठी तयारी करत होता. नंतर अडीच वर्षे शिक्षण आणि मग त्याची नोकरी सुरु झाली. दरम्यान लग्न झाले आणि माझी नोकरी सुरुच होती. जेव्हा माझ्या मैत्रिणी नवर्‍याची गिफ्ट्स मिरवायच्या तेव्हा मी माझ्या नवर्‍याचे शिक्षण (शैक्षणिक कर्ज असले तरिही) आणि घरातील इतर जबाबदार्‍यांमध्ये होते. हां पण त्याच वेळी जेव्हा तो भारतात असायचा तेव्हा याच सगळ्यांसमोर मी नवर्‍याने रेडी करुन दिलेला डबा मिरवु शकत होते. जेव्हा मला माझ्या कंपनीकडुन परदेशातली उत्तम संधी चालुन आली होती, तेव्हा त्याने मला हे समजावण्याचा खूप प्रयत्न केला की तु हे स्वीकार आणि मी तिथे नोकरी शोधतो. तु इथे येऊन शोधलीस काय आणि मी केले काय ते सारखेच. पण शेवटी मी इकडे आले. सगळी जवळजवळ शुन्यातुन सुरुवात होती. शिवाय एजुकेशन लोन डोक्यावर होते. पण आता दोन अडीच वर्षात परिस्थिती बदलते आहे. अपर्णाताई म्हणाली तसे जे आहे ते आमचे दोघांचे आहे आणि यासारखे समाधान नाही.

पण एक महत्वाचे, या मधल्या काळात आजुबाजुच्यांनी मात्र काय बायकोच्या जीवावर खातोस, कधी नोकरी सुरु होणार, नाही मिळाली तर काय, हिचा नवरा अजुनही शिकतोय आणि हिला चालतं अशा नि अजुन कित्येक प्रश्नांनी डोके उठवले होते. कितिही दुर्लक्ष करायचे म्हटले तरिही वीट यायचा. आता आम्ही बधत नाही पण ते अनुभवातुन आले. पण आई बाबा खंबीर उभे होते ही सगळ्यात मोठी बाब होती. त्यांची मुलगी नोकरी करतेय आणि जावई शिक्षण घेतोय यात ना त्यांना कमीपणा वाटला ना माज. म्हणजेच जर असे करणारे कुणी असतील, निदान सुरुवातीला तर किती जण ते हाणुन पाडायचा प्रयत्न करतात. त्या लोकांचे प्रश्न अजुन वाढवण्यात फक्त मदत करतात बाकी काहीच नाही.
माझ्या इतर काही मित्र मैत्रिणिंची पण अशी उदाहरणे आहेत ज्यात सेटल होण्यात इतर लोकांपेक्षा त्यांना वेळ लागला पण त्यांची त्याला हरकत नाही. अमुकचा फ्लॅट झाला, त्याला मुलं झाली, त्याने युरोप टुर केली या कुठ्ल्याही तुलनेत न अडकता जर आपले आपण काय करायचे ते ठरवले तर आपोआप काही बदल घडतात.

एकुण मुलिंनी जशा या अवास्तव मागण्या करणे चुकीचे आहे हे मान्य. पण तेवढेच मुलांनिही इतर जबाबदार्‍या घेण्यात बायकोच्या सोबत आहोत अशी उदाहरणे दिसु लागली तर कदाचित काही प्रमाणात (खूपच कमी असेल) तरी हे घडु शकतं.

सविता००१'s picture

15 Jan 2015 - 1:48 pm | सविता००१

मधुरा,मी पण तुझ्यातलीच गं!
आमचीही सेम केस

मधुरा देशपांडे's picture

15 Jan 2015 - 2:13 pm | मधुरा देशपांडे

एक लिहायचे राहिले. नेहमीसाठी मी नोकरी करावी आणि त्याने घरी बसावे असे नाही. आता आम्ही दोघेही नोकरी करतो. हा मुळ धाग्याचा विषय नाही तरिही, केवळ कुणा बेकाराचे घर सावरले जावे म्हणून एकाने घरी बसावे हे काही पटत नाही. हा त्या दोन व्यक्तींचा प्रश्न आहे, त्यांची आवड आणि गरज काय आहे त्याप्रमाणे. मुद्दा हा की सुरुवातीला सगळे असेलच असे नाही, पण म्हणुन भविष्यात मिळवता येते यावर विश्वास हवा.

पिलीयन रायडर's picture

15 Jan 2015 - 2:15 pm | पिलीयन रायडर

अगदी..

लव्ह मॅरेज मध्ये हे अनेकदा घडताना दिसतं..
मी स्वतः माझ्या नवर्‍याच्या प्रेमात पडले तेव्हा दोघंही शिकत होतो.. नवर्‍यावर संपुर्ण कुटूंबाची, भावाच्या शिक्षणाची, स्वतःच्या लग्नाची, आईच्या ऑपरेशनची जबाब्दारी होती.. लग्न केलं तेव्हा मला जॉब नव्हता, ६ महिन्यानी मिळाला.. घरसुद्धा दोघांनी पैसे जमवुन घेतलं.. ह्यात माझं शिक्षण नवर्‍यापेक्षा थोडं जास्त आहे..
ना मी कधी अवास्तव अपेक्षा ठेवल्या... ना नवर्‍यानी कधी कामात मदत करताना कमीपणा मानला, ना आमच्या आई वडीलांनी कधी हस्तक्षेप केला..

माझा मुद्दा हाच आहे की जबाबदारी सगळ्यांचीच आहे, फक्त मुलींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं का करावं?
शिवाय, अरेंज मॅरेज हा जर "बाजार"च असेल तर बाजारातुन मनुष्य सर्वात "किफायतशीर" गोष्ट्च पसंत करतो.. तिथे फक्त व्यवहारच होत असतात.. स्वभाव २ भेटीत ओळखता येत नाही, पगार लगेच विचारता येतो, मग जर घरकाम परंपरेनी आपल्यावर पडणार असेल तर किमान जास्त पगाराचा मुलगा का पाहु नये मुलींनी?

काळा पहाड's picture

16 Jan 2015 - 12:11 am | काळा पहाड

मी स्वतः माझ्या नवर्‍याच्या प्रेमात पडले तेव्हा दोघंही शिकत होतो

बघा ना, बाकीच्यांच्या कडे नोकर असतात ही कामं करायला.. (ह.घ्या.)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jan 2015 - 5:24 am | निनाद मुक्काम प...

आमचे तर लिव्हिंग रिलेशन शिप अडीच वर्ष मग लग्न केले
भिन्न संस्कृती मात्र सारखी विचारसरणी
कोणीतरी कोणापेक्षा जास्त कमावणार
आता ते मिअसो कि बायको ह्यात विचार करण्याचा मुद्दा नव्हता मात्र माझे आई वडील देश कुटुंब ह्यांची काहीही माहिती नसतांना
व तिच्या माणसांची व देशाची जुजबी माहिती असतांना आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवून लग्न केले ,
लग्नाच्या दिवशी आपल्या सासू सासऱ्यांना भेटणारी माझी बायको
आणि मुलाच्या लग्नाच्या दिवशी आपली सून पाहणारे माझे आई वडील ह्यामुळे माझे लग्न हा एक मजेदार किस्सा झाला होता , त्याबद्दल परत कधीतरी

खटपट्या's picture

15 Jan 2015 - 11:34 pm | खटपट्या

तुमचा प्रतीसाद खूप आवडला. स्वानुभव असल्यामुळे जास्तच भावला.
माझं जेव्हा लग्न ठरत होते तेव्हा बायकोकडचे लोक्स माझा पगार एकून (आकडा इथे देण्यासारखा नाहीये ईतका कमी) माझी टर उडवत होते. पण बायकोच्या हट्टापुढे त्यांचे काहीएक चालले नाही. तीला माझ्याशीच लग्न करायचे होते. लग्न झाले. परीस्थीती बदलत गेली. थोड्यादीवसांनी परदेशी जाण्याची संधी आली. सगळे सुरळीत सुरु झाले. याला माझ्या बायकोने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि घरातील लोकांनी दीलेली साथ कारणीभूत होते.
तेव्हा टर उडवणारे लोक्स आता कधी कधी माझ्याकडे पैश्यांची मदत मागतात बरे वाटते.

पिवळा डांबिस's picture

16 Jan 2015 - 12:30 am | पिवळा डांबिस

तात्पर्य काय की अरेंज्ड मॅरेजच्या वाटेसही जाऊ नये.
सरळ लव्हमॅरेज करावे!
-लव्हस्ट्रक पिडांकाका

मुवि, निकालो और एक धागा!!! :)

मधुरा देशपांडे's picture

16 Jan 2015 - 2:58 am | मधुरा देशपांडे

हाहा. परफेक्ट. :)

सुबोध खरे's picture

16 Jan 2015 - 11:00 am | सुबोध खरे

पि डां साहेब
सर्व जण तुमच्या सारखे नशीबवान नसतात. आमची ( माझी आणि बायको ) फार इच्छा होती कि प्रेम विवाह व्हावा. पण म्हणून कोणाशीही करावा असेही नव्हे. आमच्या आई बापानी "फुल परमिशन" दिलेली होती हो पण कोणी मनासारखी मिळालीच नाही.
आमच्या मुलानाही(मुलगी आणि मुलगा) तशीच परमिशन आहे. फक्त कोणत्याही टिनपाट मुला/मुलीशी "करायचा" म्हणून प्रेम विवाह करू नका एवढेच त्यांना सांगणे आहे.
तीच एक इच्छा आयुष्यात राहून गेली. बाकी सर्व गोष्टी आयुष्यात मनासारख्या झाल्या.

पिवळा डांबिस's picture

18 Jan 2015 - 10:52 am | पिवळा डांबिस

सर्व जण तुमच्या सारखे नशीबवान नसतात.

हां, "मज फूल ही रुतावे, हा दैवयोग आहे!!!" :)
गंमत अशी आहे डॉक्टर साहेब की प्रेम करतांना कुणावर प्रेम होईल आणि कुणावर नाही हे सांगता येत नाही. तस्मात "

कोणाशीही करावा असेही नव्हे

" हे आधी ठरवता येत नाही.
आपल्याला हवं ते माणूस भेटलं की पुरुषाच्या हृदयात काहितरी वाजतं (स्त्रियांच्या हृदयात कदाचित ढोल वाजत असेल, कल्पना नाही, हिंदी सिनेमात ढोऽऽल बाजे म्हणून सांगतोय!). त्या क्षणी जर धाडस करून अ‍ॅप्रोच झालं तर पेम जुळतं...
मी कोणाशी प्रेम करीन आणि कोणाशी नाही असा विचार करत राहिलं तर मग "प्रेम होईना तुझ्याने, प्रेम माझे राहिले" असं होण्याचीच शक्यता अधिक.
प्रेम हे जात, धर्म, वय, शिक्षण, घराणं, सांपत्तिक स्थिती वा इतर कोणतेही फॅक्टर पाहून होत नाही हो!
ते फक्त दोन हृदयांचं मीलन असतं.
मग बाकी आईबाप, भाऊबहीण, मित्रमंडळी इत्यादि दुनियादारी नगण्य ठरते. म्हणजे त्यांना मान्य असेल तर उत्तम पण जर मान्य नसेल तर गेले झक मारत...
अहो सतीचं वाण आहे हे!!!
:)

यशोधरा's picture

18 Jan 2015 - 1:11 pm | यशोधरा

क्या बात :)

खटपट्या's picture

18 Jan 2015 - 1:16 pm | खटपट्या

प्रेम हे जात, धर्म, वय, शिक्षण, घराणं, सांपत्तिक स्थिती वा इतर कोणतेही फॅक्टर पाहून होत नाही हो!

१००% सहमत !!

सुबोध खरे's picture

18 Jan 2015 - 9:02 pm | सुबोध खरे

पि डां साहेब
अहो अशी मुलगी कुठे भेटली नाही कि जिच्यामुळे हृदयात कुठेतरी घंटी वाजली पाहिजे. नाही तर आमच्या घरून कोणतीही आडकाठी नव्हती.
तशा दोन तीन मुलीनी रस ही दाखविला होता पण पुढे जावे असे फारसे वाटले नाही. दोन तर सुंदरही होत्या( बरेच लोक त्यांच्यावर डोळा ठेवून होते) पण "वो बात जमी नही". उगाचच स्टाईल मारायला गर्लफ्रेंड असावी या मताचा मी नाही.( खरं तर मुलींच्या भावनांशी खेळावे हा माझा पिंड नाही). त्यामुळे पुढे काही झाले नाही. इतकेच.
पण अशी कोणी तरी भेटायला हवी होती हे मात्र वाटत राहिले.

पिवळा डांबिस's picture

19 Jan 2015 - 3:53 am | पिवळा डांबिस

उगाचच स्टाईल मारायला गर्लफ्रेंड असावी या मताचा मी नाही.

मीही नाही. त्यात काही अर्थ नाही...

( खरं तर मुलींच्या भावनांशी खेळावे हा माझा पिंड नाही)

सहमत. त्याबद्दल हॅटस ऑफ टू यू डॉक्टरसाहेब! फार मोलाचं बोललांत!! हल्लीच्या नव्या मुलांनी या धाग्यातून बाकी काही घेतलं नाही तरी हे वाक्य लक्षात घेण्यासारखं आहे!!! +१००

आता थोडं गंमतीत माडगूळकरांच्या शब्दांत फेरफार करून म्हणतो, कृपया ह. घ्या...
"नको खंत पाळू आता, पूस लोचनांस,
तुझा आणि माझा घडला वेगळा प्रवास...
स्वलक्ष्मीचा तू राजा, मी दास प्रेयसीचा,
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा.....
:)

विजुभाऊ's picture

20 Jan 2015 - 5:18 pm | विजुभाऊ

पिडा काका सहमत.
माझे अ‍ॅरेन्ज मॅरेज. मात्र आम्ही दोघेही भिन्न संस्कृतीत वाढलेलो. मी पूर्ण मराठी वातावरणात वाढलेलो आणि नास्तीक.आणि पत्नी कट्टर वैष्णव कुटुंबातील. लग्न ठरण्यापूर्वी झालेल्य भेटीत जे काही थोडेफार बोललो तीच आमची ओळख. मात्र एका खूप समन्जस मॅच्यूअर व्यक्तीशी आपले लग्न ठरत आहे याची कुठेतरी जाणीव त्या बोलण्यात झाली होती.
कोणी घेतलेले निर्णय कधी चूक असले तरी मुद्दाम त्यावरून एकमेकाना हिणवणे टोमणे मारणे वगैरे गोष्टी कधी घडल्या नाहीत. चुका होतात त्या मुद्दाम होऊन कोणी करत नाही यावर दोघांचाही ठाम विश्वास आहे.
आपण दोघेही भिन्न व्यक्ती आहोत याची दोघानाही जाणीव आहे. केवळ लग्न झाले म्हणून दुसर्‍या व्यक्तीला (जोडीदाराला) गृहीत धरून चालले तर अनर्थच होतात याची जाणीव ठेवून सुदैवाने हा मॅच्युअर पण दोघानीही नेहमीच दाखवला आहे.
काय पिडांकाका सहमत आहात ना?

टवाळ कार्टा's picture

20 Jan 2015 - 5:22 pm | टवाळ कार्टा

पण सगळ्यांचे "नशीब" सारखे नस्ते ना...त्यासाठीच तर धागा आहे हा

पिवळा डांबिस's picture

20 Jan 2015 - 11:00 pm | पिवळा डांबिस

सहमत आहे.

रायनची आई's picture

15 Jan 2015 - 4:59 pm | रायनची आई

हा प्रतिसाद सगळ्यात जास्त आवडलाय..+१११११..
विचारान्ची खूप clarity आहे पि.रा.तुझ्यात..

रायनची आई's picture

15 Jan 2015 - 5:09 pm | रायनची आई

हा माझा रिप्लाय पि.रा.च्या सगळ्यात पहिल्या प्रतिसादसाठी होता..चुकून येथे पोस्ट झाला :-)

स्पंदना's picture

15 Jan 2015 - 4:02 am | स्पंदना

आता मला एक मुलगा अन एक मुलगी आहे. मग मी काय करावं?
मुवि माझं लग्न सुद्धा ९२चच!! लग्नात नवर्‍याचा पगार २१००. त्यात ८०० घरभाडे (हो हो तुमच्या मध्यवर्ती डोंबोवलीतच). सगळे नातेवाईक नावं ठेवायचे २००० पगारात काय होणार म्हणुन. त्याच प्रेशर खाली मग १ रुम किचन घेतलं, तर त्याचे हप्ते भरताना अक्षरशः रक्त ओकायची पाळी आली. त्यातही हळु हळु पगार वाढतच होता. ते घर पण अश्याठिकाणी की तेथे एक बस कशीबशी रडत खडत यायची.
मग एक सायकल घेतली. बसंती नावं तीचं. तोपर्यंत आम्ही अतिशय गरीब असल्याने आमच्याकडे पहाताना नजरेत कळवळा दिसायचा नातेवाई़कांच्या. दोन्ही घरुन काहीही आधार नव्हता. (ठरवुन केलेलं लग्न) मग एक बाईक आली, मग एक कार आली. मग आणखी मोठठ घर आलं. मग परदेश आला. अस सगळ जवळ जवळ १५ वर्षात आलं म्हणा.
आता माझ्या आधी ज्या माझ्याच घरातल्या आणखी एका मुलीच्या पालकांनी याला नकार दिला होता ते आता,"आम्ही नाही नव्हतो म्हणालो, गैर्समज झाला" वगैरे वगैरे बोलत असतात. " आमच्याच मुलीच्या नशिबात होतं ते," वगैरेपण मी कान झाकून ऐकत असते.
पण एक आहे, जे काही कमावलं आहे ते आमच आहे. बापजाद्याच नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2015 - 9:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पण एक आहे, जे काही कमावलं आहे ते आमच आहे. बापजाद्याच नाही.

हे वाक्य प्रचंड आवडलयं. अश्या कष्टानी मिळवलेल्या गोष्टींचा आनंद काही औरचं असतो हे नक्की.

मी ह्या आजच्या पिढीचा असुनही सांगतो, हल्ली इन्स्टंटच्या जमान्यात फ्लॅट गाडी आणि सेटल पार्टनर अश्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत. पण सगाळ्यांनाच वयाच्या २५ शी मधे एवढी प्रगती करता येत नाही हे कोणी गृहीत धरतचं नाही. एखाद्याच्या घरची आधीची पिढी संपन्न असेल तर ठिक की काहीतरी सुरुवात असते.

ह्या वर्षाअखेर माझ्यासाठीही कार्यक्रम सुरु होणार आहेत त्यावेळी मुलींच्या अपेक्षा काय असतील ह्या विचारानी मला आत्तापासुन टेन्शन आलय. त्याआधी मी कोणाच्या प्रेमात पडलो आणि नशिबानी ती मुलगी पण प्रेमात पडली तर ठिक =))...नैतर अवघड आहे.

बोका-ए-आझम's picture

15 Jan 2015 - 12:13 pm | बोका-ए-आझम

प्रेम आणि पैसा या दोन्ही गोष्टी एकाच अक्षराने सुरु होतात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2015 - 1:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

पर्स्पेक्टिव्ह पण :)

सगळ्याचं मुली अश्या विचार करत नसतील असा आशावाद बाळगायला काय हरकत आहे? आज नाही म्हणजे कधीचं नाही असं थोडचं आहे. उलट आज असावं अश्या त्यांच्या अपेक्षेपेक्षा किती तरी पटीनी जास्त देउ शकीन तेही २ ते ४ वर्षात...बस्सं माझ्या मनगटावर आणि डोकयावर विश्वास ठेवणारी आणि साथ देणारी मुलगी मिळायला पाहिजे :)

चौकटराजा's picture

15 Jan 2015 - 5:19 am | चौकटराजा

आमचे मिपावरचे स्थानिक टोळके चेष्टामस्करी करंण्यात तरबेज असले तरी " लग्न" या अत्यावश्यक विषयावर मी हिरवट
चाबरट म्हातारा असलो तरी गंभीरपणे चर्चा करत असतो. माझा एक नातेवाईक आहे तो आता ३५ वर्षाचा असून दीड लाख रूपये पगार, पुण्यात २ बहक फ्लॅट असूनही लग्न जमत नाहीय. त्याला कारण मुवि व त्यांच्या पत्नी यानी दाखविलेला सुज्ञपणा आजच्या मुलींमधे नाही. आईवडीलच त्यांचे कपडे, वाढदिवस, सणवार ई नी त्यांना लाडावून ठेवतात मग " पैसा" हेच सर्वस्व बनते. माझी कथा तर मुवि पेक्षा भारी आहे. मी ४९ चा झाल्यापासून नोकरीच सोडलेली आहे. पण आज माझे दोन फ्लॅट्स आहेत तेही महापालिका क्षेत्रात.गाठी पुरेसा पैसा आहे. तरीही माझी रहाणी साधीच ठेवलीय. माझ्या मुलीना सहजी कोणतीही गोष्ट मी मिळवून देत नाही. शिवाय आयुष्य हे सम्यकपणे भोगायचे असते. पैसा ,सन्मान उपभीग हे त्याचे काही भाग आहेत इतकेच. हे त्याना सारखे पटवून देत असतो. आपल्या पाल्याशी योग्य असा
संवाद आजचे पालक ठेवतच नाहीत. हेच मोठे दुखणे आहे.

चौकटराजा's picture

15 Jan 2015 - 5:29 am | चौकटराजा

त्याला कारण मुवि व त्यांच्या पत्नी यानी या वाक्यातील त्यांच्या हा शब्द सन्मान पूरक असून मुवि
यांच्या अनेक पत्नी आखातात असल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत असे समजू नये. हो उगीच मिपाकरानी मुविवर जळू नये
म्हणून हा खुलासा. नाहीतर वाचकांची नस्ती पत्रापत्री व्हायची.

देशपांडे विनायक's picture

15 Jan 2015 - 6:21 am | देशपांडे विनायक

अस कस अस कस ?
आम्हाला काय मुविंची भानगड चघळताना मजा वाटणार नाही ?
तुम्ही आपले सगळे सांगून मोकळे व्हा .
खुलाशात गंमत नाही हो . आणी INTEREST पण नसतो कुणाला

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2015 - 10:55 am | पिवळा डांबिस

मुवींच्या आखाती पत्नींचे पुरावे नसतील तुमच्याकडे, पण संशय तर आहे की नाही? (उगीच काय तसे शब्द लिहिले जातात काय तुमच्यासारख्या जाणत्यांकडून?) :)
आणि मग जळायचं नाही म्हणजे हा अन्याय झाला!!!
ते काही नाही. आम्ही ह्या संशोधनाचं कॉन्ट्रॅक्ट डायरेक्ट सीआयए ला देत आहोत. ते काढतील शोधून मुविंच्या नकाबी हुस्नपर्‍या!!!!
होऊ देत खर्च!!!!!!
:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता हा ढिस्क्लेम्र देऊन इतक्या मनःपूर्वक चवीने वाचलेल्या स्वतःच्याच प्रतिसादातली हवा काढून घ्याची जर्रूर व्हती का, म्हंतो मी ??? (तीन प्रश्नचिन्हे लक्षपूर्वक पाहावी आसे विणंती आहे) +D

हाडक्या's picture

15 Jan 2015 - 9:54 pm | हाडक्या

"तीन" का !! मुवि ह्म्म्म्म..

माझ्या लग्नाला उशीर होऊ लागला तेव्हा मला मिळालेले काही एकोळी सल्ले इथे देत आहे:
१)आंब्याला सुरकत्या पडत नाहीत तोपर्यँतच गिऱ्हाइक भाव करायला येतं.
२)घरचे प्रश्न घरातच सुटतात चौकात नाही.
३)आर्मित पस्तीशीला म्हातारा म्हणतात{जवानी संपते मानसिक आणि शारिरिक. शॉर्ट कमिशन पस्तिशीला देतात}.
४)पोपट होण्याअगोदर मैनेला पिंजऱ्यात घ्या.
५)"गरिबीचं कारण असेल तर भारतात ९८टक्के लोक अविवाहित राहतील "-गांधिजी.
६)माघारी कोणीतरी हवंच. {तुम्ही मेल्यावर तुमच्या मागे(=माघारी) रडणार कोण?
७)कोणालातरी आपलं म्हणा अन सुखी व्हा.

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2015 - 11:11 am | पिवळा डांबिस

बाहेरचे लोक असे सल्ले देत असतील तर ठीक आहे, त्यांना (लोकांना) फाट्यावर मारता येतं...
पण घरातलेच लोक असं बोलत असतील तर कठीण आहे हो!!!

नोकरीच्या ठिकाणी मिळालेले वात्रट ,सोज्वळ सहकाऱ्यांचे सल्ले आहेत.

चाफुन चाफुन चिन्ग्ळ्या ....हा डायलॉग राहीला का ?
असो मुलीच्या अपेक्षा वाड्ल्यात हे जितक खर तित्केच मुल ही कमी नाहीत

(लोकाचे टो म ने ऐकुण हैराण झालेली पियु )

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 11:53 am | बॅटमॅन

क्र. ४ कहर अश्लील आहे =))

तदुपरि असले सल्ले देणार्‍यांच्या **** **! असो.

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2015 - 11:58 am | पिवळा डांबिस

सगळ्या १ ते ७ सल्ल्यांवरून दादा कोंडकेंच्या एकेका सिनेमाचं टायटल बनण्यासारखं आहे!!!!
खरं तर माझ्या मनात बनून तयारही आहे पण संपादकांचा ओव्हरटाईम वाचावा म्हणून गप्प आहे!!!
पियुशाच्या म्हणीवरून मात्र फारतर एखादा मल्याळम सिनेमा निघू शकेल!!!! :)

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 12:04 pm | बॅटमॅन

अगदी अगदी =)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 12:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

संपादकांचा ओव्हरटाईम वाचावा म्हणून गप्प आहे!!! इतका हृदयद्रावक प्रतिसाद वाचून ह्रुदयाचे पाणी पाणी होऊन ते डोळ्यात उतरल्याने ड्वाले पानाव्ले ! :) ;)

लिवा हो तुमी. मिपा हाय घर्चं, होऊद्या खर्चं +D

पियुशाच्या म्हणीवरून मात्र फारतर एखादा मल्याळम सिनेमा निघू शकेल!!!! मला तर त्या नावाचा एक चिनी सिनेमा असल्याचं एका तैवानी दोस्ताने सांगितलं ;)

ह्रुदयाचे पाणी पाणी होऊन ते डोळ्यात उतरल्याने ड्वाले पानाव्ले !

पन ह्रुदय डोळ्यांच्या खाली असतंय ना? मग त्याचं पाणी झालं तर ते डोळ्यात उतरणार कसं (अनलेस यू डू शीर्षासन) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 2:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्ये हृदयाचं पानी भौतिक नियम पाळत नाय, हे भौतेक तुमाला म्हाय्त हाय, नाय्का !? ;) :)

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 4:17 pm | बॅटमॅन

आता मात्र....डॉळॅ पाणावले खरंच. :( ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 4:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

आयशप्पत, हृदय पिळवटलं की त्यातलं पाणी पटकन वर ड्वाल्यात जातं :)

नगरीनिरंजन's picture

15 Jan 2015 - 2:12 pm | नगरीनिरंजन

भौतेक पाणी होऊन नंतर वाफ झाली असंल.

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 4:15 pm | बॅटमॅन

शक्यता नाकारता येत नाही.

पुष्कर जोशी's picture

12 Jun 2016 - 1:17 am | पुष्कर जोशी

हहपुवा

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2015 - 9:21 am | टवाळ कार्टा

भा.पो.

- १ इच्छूक :(

बोका-ए-आझम's picture

15 Jan 2015 - 9:34 am | बोका-ए-आझम

आपल्या समाजात दुर्दैवाने ' लग्नाचा बाजार ' हाच शब्दप्रयोग वपरला जातो आणि एकदा बाजार म्हणलं की घासाघीस ही आलीच. माझं ठरलेलं लग्न त्या मुलीने मोडलं होतं कारण त्या वेळी अचानक माझी नोकरी गेली. कंपनीच बंद झाली. ही साधारण २००१ ची गोष्ट आहे. त्यानंतर तब्बल ७ वर्षांनी मी लग्न केलं. प्रेमाने पोट भरत नाही आणि कोणीही तुम्हाला गरज असते तेव्हा विचारायला येत नाही हे अत्यंत मोलाचे धडे यातून शिकलो. अजून एक. नातेवाईक फक्त लग्नात जेवायला - फुकटात मिळतं म्हणून येतात. तुम्ही कोणाशी का लग्न करा, त्यांचा उद्देश हा फक्त फुकट जेवण मिळणार आहे हा असतो. त्यामुळे त्यांना काय वाटेल असले विचार करणं हा मूर्खपणा आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2015 - 9:40 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नातेवाईक फक्त लग्नात जेवायला - फुकटात मिळतं म्हणून येतात. तुम्ही कोणाशी का लग्न करा, त्यांचा उद्देश हा फक्त फुकट जेवण मिळणार आहे हा असतो.

अतिअसहमत.
दुसर्‍याच्या लग्नात मिरवणं. एकमेकांच्या उखाळ्यापा़खाळ्या काढणं, गॉसिप करणं ई.ई. गोष्टी करणं हे ही सेकंडरी उद्देशही असतातचं की.

बाकी ऐकुन वाईट वाटलं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 12:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

नातेवाईक फक्त लग्नात जेवायला - फुकटात मिळतं म्हणून येतात. तुम्ही कोणाशी का लग्न करा, त्यांचा उद्देश हा फक्त फुकट जेवण मिळणार आहे हा असतो. हे तर पूर्वपूरींनी प्राचीन काळातच लिहून ठेवलं आहे... बा बॅटमना, पोतडीतून काढून ते काव्य टाकू शकणार का इथे ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 12:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरेच्च्या, खालीच डॉ खरेंनी ते दिलं आहे !!

पुष्कर जोशी's picture

12 Jun 2016 - 1:20 am | पुष्कर जोशी

"नातेवाईक फक्त लग्नात जेवायला - फुकटात मिळतं म्हणून येतात. "
ह्या मुद्याशी १००% असहमत !

कन्या वरेयते रूपं माता वित्तं पिता गुणं
बांधवः कुलं इच्छन्ति मिष्टान्ने इतरेजनः
लग्नाच्या बाजारात कोण काय पाहतो ?
मुलगी मुलाचे रूप पाहते
आई पैसा किती मिळवतो ते
वडील मुलाचे "गुण"
बांधव मुलाचे कुळ ( आजकी तारीख मे खानदान ( खानदान कि इज्जत वालं)
आणि बाकी सर्व जण मिष्टान्न
यावरून काय तो बोध घ्यावा (लोकांना फाट्यावर मारावे)

नाखु's picture

15 Jan 2015 - 9:48 am | नाखु

बाहरचे..
दोन्ही बाजू आहेत पण माझ्या तुटपुंजी अनुभव्-शिदोरी येनप्रकारे:
वडीलांचे छत्र वयाच्या ९ व्या वर्षीच हरपले त्यामुळे मीच माझा पालक.

  • माझे स्वतःचे लग्नसमयी वधूसंशोधनात मी निर्व्यसनी आणि वयाच्या पंचवीशीत स्वतःचा फ्लॅट (चिंचवडमध्ये) असणे याची भावी वधू पित्यांचे लेखी काडीमात्र किंमत नाही हेही समजले (उलट लहान बहिणीची व भावाची अर्थात आईचीही जबाबदारी आहे याकडेच ज्यास्त लक्ष होते)त्यामुळे शेवटी बहिणीचे लग्नानंतर ५ वर्षांनी वयाच्या ३३ व्या वर्षी लग्न झाले.
  • लहान बहिणीचे लग्नाकरीता खटपट करावी लागली दुर्दैवाने ज्या हातांनी कन्यादान केले त्याच हातावर तिचे कलेवर ( तिच्या सासरच्या छळामुळे)घेऊन अंतीम विधी करण्याचे दु:ख सहन केले.
  • लहान भावाचे लग्नसमयी वधूसंशोधनात वधू पित्यांचे अपेक्षांचे इमले पाहून हसू येण्यापलिकडे पोहोचलो होतोच.
  • त्याचेही लग्न त्यामुळे ३० नंतरच झाले.
  • परिस्थीतीने शिकवलेले शहाणपण आणि स्वावलंबन यामुळे चिंचवडमध्ये २ बी एच के फ्लॅट आणि स्वतंत्र ६ खोल्यांचा बंगला बनवू शकलो. हे करताना शिक्षणासाठी शाळेतील शिक्षकांची* अज्ञात हातांची,नातेवाइकांपेक्षा फक्त मित्रांची भावनीक मदत आणि सदिच्छा-प्रोत्साहन मिळाल्यामुळेच हे शक्य झाले.
  • नाहीतर सन १९७८ ला पुण्यात शिक्षणासाठी अनवानी दाखल होण्यार्या मुलाला काय भविष्य होते??
  • *शाळेतील वर्गशि़क्षक आणि मुख्याध्यापक मीच माझा पालक आहे हे नेहेमी बजावत असत,आणि व्यक्तीशः लक्ष देत असत, त्यामुळेच आज जो काही मी आहे, त्याचे श्रेय निर्विवाद शाळेला/हितचिंतकाना आहे.

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2015 - 10:57 am | पिवळा डांबिस

तुमचे मनापासून अभिनंदन!!

स्पा's picture

15 Jan 2015 - 11:59 am | स्पा

:(

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2015 - 12:03 pm | पिवळा डांबिस

त्यांनी इतक्या अडचणींना तोंड देऊन आणि अवघड परीस्थितीवर मात करून यश मिळवलंय म्हणून त्यांचं अभिनंदन केल.
माझं काही चुकलं का?

स्पा's picture

15 Jan 2015 - 12:03 pm | स्पा

तुम्हाला प्लस वन द्यायचं होतं काकुस

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2015 - 12:05 pm | पिवळा डांबिस

ओके

स्मिता चौगुले's picture

15 Jan 2015 - 12:59 pm | स्मिता चौगुले

+१

स्पंदना's picture

15 Jan 2015 - 11:51 am | स्पंदना

:(

इरसाल's picture

15 Jan 2015 - 11:56 am | इरसाल

तुम्ही खरचं धीराचे आहात.

बोका-ए-आझम's picture

15 Jan 2015 - 12:17 pm | बोका-ए-आझम

सहीच!असले अनुभव येऊनही तुम्ही कडवट झाला नाहीत हे जास्त अभिनंदनीय आहे. ज्यांनी त्या वेळी तुम्हाला नाकारलं त्यांना पश्चात्ताप झाला असेल!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

नक्कीच स्पृहणिय आहे हे !

सुबोध खरे's picture

15 Jan 2015 - 12:48 pm | सुबोध खरे

नाद खुळा -चिंचवडला ६ खोल्यांचा बंगला
(स्वगत:-- मिपा कट्टा करायला चांगले स्थळ आहे)

सुबोध खरे's picture

15 Jan 2015 - 12:49 pm | सुबोध खरे

@ नाद खुळा
आपल्याला हाट्स ऑफ __/\__

नाखु's picture

15 Jan 2015 - 2:03 pm | नाखु

घर आपलच असा..
काही मिपाकरांनी घरी भेट दिली आहेच.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2015 - 1:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु _/\_ तुमच्या जिद्दीला.

शैलेन्द्र's picture

15 Jan 2015 - 3:03 pm | शैलेन्द्र

सुंदर...

पैसा's picture

15 Jan 2015 - 4:39 pm | पैसा

प्रतिसाद आवडला. तुमच्या बहिणीबद्दल वाचून मात्र वाईट वाटलं. अजूनही हे असे प्रकार चालू आहेत, याला काय म्हणावं! :(

अजया's picture

15 Jan 2015 - 5:33 pm | अजया

नाखुकाका _/\_

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा

मी नाखुकाकां कडून सदर हकिगत प्रथम ऐकली,तेंव्हा तिथेच मनातून नमस्कार केलेला होता. आज आदरपूर्वक पुन्हा करतो. :) __/\__ :)

रेवती's picture

15 Jan 2015 - 6:50 pm | रेवती

नाखु, तुम्ही ग्रेट आहात.

तुमचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक.
बहिणीबद्दल वाचून अतिशय वाईट वाटले.

पदम's picture

22 Jan 2015 - 6:24 pm | पदम

+१

प्रसाद गोडबोले's picture

15 Jan 2015 - 9:50 am | प्रसाद गोडबोले

राग मानणार नसाल तर एक बोलु का मुवीकाका ?

एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.

एकदा मुलाला शिक्षण दिल्यानंतर परत पुढे नोकरी मिळवुन देण्यासाठी फ्लॅट मिळवुन देण्यासाठे जर तुम्हालाच प्रयत्न करावे लागत असतील तर तर तो मुलगा नक्कीच लग्नाला लायक नाहीये .

बाकी माझ्या बॅचमधील कित्येक जण २८-२९ वय स्वत्चा स्वकर्त्रुत्वावर घेतलेला फ्लॅट तोही पुणे / पिंपरीचिंचवड भागात , आय १० स्विफ्ट वॅगनार सारखी गाडी शिवाय घरची काहीही जबाबदारी नाही , इन्फोसिस टीसीएस महिन्द्रा सारख्या मोठ्ठ्या कंपनीत नोकरी असे सारे असुनही पोरी नकार देतात हा खरा मोठ्ठा प्रॉब्लेम आहे .

माझे वैयक्तिक मत असे की मुळातच लग्न संस्था रीडंडंट आहे पण तरीही , लग्न करायचे ठरल्यास लव्हमॅरेजच करावे मस्त स्वत्च्या कर्तुत्वावर पोरगी पटवावी आणि आलात तर तुमच्यासह , नाहीआलात तर तुमच्याशिवाय आणि विरोध कराल तर विरोध मोडुन मी ह्याच पोरीशी लग्न करणार असे पोरीच्या घरचांना सांगावे ठणकावुन
अन मग जोरात लग्न करावे .....

माझ्या एका जवळच्या मित्राने काय फुल्ल्टु फिल्मी पोरीला पळवुन लग्न केलेय नुकतेच ... त्याची आठवण झाली =)

( अर्थात हे सारे करण्यासाठी पोरगी २००% आपल्या बाजुला असावी लागते ह्यासाठी )

अवांतर - मुली कशा पटवाव्यात ह्या वर लेख लिहा ना कोनी तरी

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 10:43 am | अत्रुप्त आत्मा

प्र.गो. >>> आंम्ही टुमच्याशी,भरपूर शहमत हाय! :D

@अवांतर - मुली कशा पटवाव्यात ह्या वर लेख लिहा ना कोनी तरी. >>>सदर क्रीयमाणाचे संचित,आपल्यापाशी(च) आहे. =)) तेंव्हा हे काम आपल्यापेक्षा दुसरा कोन बरे क्रू शकेल.!? :D

यसवायजी's picture

15 Jan 2015 - 12:50 pm | यसवायजी

गिर्जाकाका, कवापास्न प्रतिकशेत हाय या धाग्याच्या. येउद्या लव-कर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jan 2015 - 2:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता बुवांच्या पुढच्या लेखमालेचा विषय... "गांधर्व विवाहाचा शास्त्रिय विधी आणि चालूरिती... आपलं... चालीरिती".

कर्तव्य असणार्‍यांनी तिकडे वाट पहाता पहाता इकडे या लेखाचीही वाट पहावी :) ;)

प्रगोसाहेब, होऊन जाउन्द्या. तुम्ही या प्रकल्पाचे प्राईम मुव्हर आहात ! :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jan 2015 - 5:27 am | निनाद मुक्काम प...

त्यापेक्षा पुढचा धागा मी काढतो
लिविंग रिलेशन शिप नंतर लग्न सगळ्यात सोयीस्कर उपाय
स्वानुभवाच्या जोरावर

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2015 - 2:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रगो...येउंद्या एक फर्मास लेख....त्यातले उपाय उपयोगी पडले तर तुम्हाला पार्टी जंगी...!!! =))

ब़जरबट्टू's picture

15 Jan 2015 - 4:13 pm | ब़जरबट्टू

एकदा मुलाला शिक्षण दिल्यानंतर परत पुढे नोकरी मिळवुन देण्यासाठी फ्लॅट मिळवुन देण्यासाठे जर तुम्हालाच प्रयत्न करावे लागत असतील तर तर तो मुलगा नक्कीच लग्नाला लायक नाहीये .
यातला नोकरी मुद्दा बरोबर आहे, म्हणजे ती स्वकर्तुत्वावर मिळवावी लागते, पण घर खरच जमेल का ? पुण्याचेच उदाहरण पहा, साधा २ बेडरुमचा फ्ल्याट ५० लाखाच्या पुढे जातोय, पगार ५ लाखापासुन २२ वर्षी सुरु झाला, तरी नुस्ते कर्ज भेटायची लायकी यायला अजून ७ एक वर्ष लागतील, तोपर्यंत तो फ्ल्याट कमीतकमी कोटीच्या वर गेला असेल. कसे गणित सुटणार ? :(

लईच मोठा आवाका आहे लेखाचा..त्यामुळे आपला पास.

(पंरपरे सोबत आधुनीक विचारांचा) जेपी

वेल्लाभट's picture

15 Jan 2015 - 10:36 am | वेल्लाभट

जाणवलेले काही विरोधाभास; काही अतिरेक.

१) अतिरेक. एका मुलीने अपेक्षांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं होतं. महिना एक लाख 'टेक होम' पगार हवा. आपलं शिक्षण? एम कॉम. कुठल्या तोंडाने??? असो.
२) अतिरेक. आणखी एक स्पष्ट अट. 'सेडान किंवा एसयूव्ही' गाडी हवी. म्हणजे मग नवरा बोकड असला तरी हरकत नसावी.
३) विरोधाभास. या एक लाख, एसयुव्ही किंवा टेरेस फ्लॅटच्या अटीवाल्या मुलींकडे (कुणाच्या रुपावर बोलू नये याची जाणीव आहे तरीही) रूप-रंग, संपत्ती, शिक्षण (गुण-दोषांची कल्पना येत नाही त्यामुळे तो उल्लेख टाळतो.) यापैकी काहीच नव्हतं. मग ते फक्त वराकडून मुलाकडूनच अपेक्षित कसं असू शकतं? त्यांनी पगाराची फिगर स्पेसिफाय केली, मुलाने त्यांची फिगर स्पेसिफाय केली तर चालेल का? (करत असतील तर माहीत नाही) म्हणजे क्लियरकट, ३६-२४-३६ हवी.
४) विरोधाभास. एकीकडे समानतेचे गोडवे गाणा-या आपल्या समाजाला, त्यातील मुलींना, मुलाचा पगार मुलीपेक्षा जास्त कसा लागतो? म्हणजे पुरुषाची सुपिरिऑरिटी मान्य आहे नाही का? 'मुलगी आयटीत आहे, बारा पंधरा लाखाचं पॅकेज आहे, आता मुलगा जी एम वगैरेच बघावा लागेल' अरे का? सोयीस्कर इक्वॅलिटी चं हे नमुनादाखल उदाहरण.

असो. अशाच बाजू वधूपक्षाच्याही असू शकतील. एकंदरित, हे आजकाल 'डील' झालंय डील. आणि 'फील' गेलाय त्यातला. चेकलिस्ट घेऊन जायचं, टिक टिक टिक. चला. जमलं !

पिलीयन रायडर's picture

15 Jan 2015 - 10:41 am | पिलीयन रायडर

एक प्रामाणिक प्रश्न...

असल्या काहीच्या काही अपेक्षा ठेवणार्‍या मुलींची (किंवा मुलांचीही) लग्न होतात का? म्हणजे त्यांच्या अपेक्षेमध्ये बसणारी मुलं त्यांना का निवडतील?

बाकी मुलाचा पगार मुलीपेक्षा जास्तच हवा ही मागणी मलाही भंपक वाटते.. (आणि बायकोचा पगार आपल्यापेक्षा जास्त आहे हे पचवु शकणारे पुरुष (किंवा सगळं सासरच..) कसे असतील ह्याचं कुतुहल...)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Jan 2015 - 1:47 pm | निनाद मुक्काम प...

दोन्ही बाजूने संसाराची गृहीतक तपासून घेण्याची गरज आहे . आधुनिक काळात वावरताना जुनाट मानसिकता जपण्याच्या अट्टाहास सुटला पाहिजे.
जास्त शिकलेली व भरपूर कमावणारी मुलगी लग्नाच्या बाजारात चिंतेचा विषय झाल्याची उदाहरणे देखील पहिली आहेत.
आता हिला साजेसा मुलगा आमच्या समाजात कुठून शोधायचा
असा प्रश्न पालकांना पडतो.
ह्या देशात इंदिरेचे कर्तृत्व असलेल्या महिलेच्या नवर्‍यावर फिरोज व्हायची पाळी न येवो असे मनापासून वाटते

बोका-ए-आझम's picture

16 Jan 2015 - 12:17 am | बोका-ए-आझम

मी नोकरी करतो आणि बायकोचा व्यवसाय आहे आणि तिची प्राप्ती माझ्यापेक्षा जास्त आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. आणि तिच्या यशात माझं काहीही contribution नाही. तिने स्वतःच्या जोरावर हे केलेलं आहे.

सुबोध खरे's picture

16 Jan 2015 - 11:03 am | सुबोध खरे

आयला लई नशीबवान आहात कि.
आमची बायको भरपूर पैसे मिळवायला लागली तर मी तर निवृत्त होऊन थंड घरी बसेन. म्हणजे आत्ता "मला" पुरतील तितके पैसे तिला मिळतात पण "तिला" पुरतील एवढे नाहीत. आणि नवरा मिळवतो आहे म्हणून ती जास्त कष्ट करीत नाही.

शेखर काळे's picture

18 Jan 2015 - 11:22 am | शेखर काळे

पुरुष पुरेसं कमावतात म्हणून बायका 'थंड' घरी बसतात का ?
तुम्ही बायका करतात ती कामे करालंच ही अपेक्षा आहे ...

- शेखर

सुबोध खरे's picture

19 Jan 2015 - 7:02 pm | सुबोध खरे

काळे साहेब
मी माझ्या मुलांना अन्न भरवण्यापासून, झोपवणे, त्यांचे पार्श्वभाग धुण्यापर्यंत सर्व कामे केली आहेत. मुलांना जन्म देणे आणि दुध पाजणे हे शक्य नाही त्याला माझा नाईलाज आहे.

असे अमुक एक रक्कम टेक-होम आणि रेडीमेड सुखसोयी असलेलाच मुलगा पाहिजे असे म्हणणे तितकं बरोबर नाही. पण अजूनही अरेंज म्यारेज पद्धती मध्ये मुलाचे गुण अवगुण, प्रगल्भता आणि मनगटातली ताकद कळायचं बऱ्यापैकी अवघड असतं. मग अशावेळी मुलीने आयुष्य जिथे घालवायचे आहे तिथे किमान आर्थिक स्थैर्य असावे अशी अपेक्षा ठेवली तर काय चूक आहे ? आणि जर ती मुलगी स्वत: कमावती नसेल तर हे स्थैर्य त्या मुलाच्या पगारावरच अवलंबून असतं. अशावेळी शिक्षण आणि सध्याचा पगार याचा अट म्हणून वापर केला जाणे स्वाभाविक आहे. प्रेम विवाह करताना, कुठल्याही अपेक्षा न ठेवता, फक्त त्या मुलाच्या पात्रतेवर विश्वास ठेवून डोळे झाकून लग्न केलेल्या कित्येक जणी मला आहेत.

विटेकर's picture

15 Jan 2015 - 10:58 am | विटेकर

अपेक्षा मुलांच्या नाही , त्यांच्या आई- बापांच्या वाढल्या आहेत !
२०- २२ वर्षाच्या मुला- मुलीला जोडीदार कसा असावा हे नीट सांगाता येईल , पुढच्या आयुष्यात नेमक्या काय अडचणी येऊ शकतील याचे विज्युयलायजेशन करता येईल इतकी म्याच्युरिटी खरेच असते का हो ? ( मी बुद्धी म्हणत नाही )
आई- बापच मुलांच्या अपेक्शांना नकळत खत-पाणी घालत असतात .... आपली अपुरी स्वप्ने मुलांनी पुरी करावीत , आपण ज्या खस्ता खाल्ल्या त्या मुलांनी खाऊ नयेत , त्यांना नकळत शक्य तर विना कष्टाचे च मिळावे ही अपेक्षा असते आई- बापाची !! त्यात "मुलीची आई" हा कहर आहे !
ल्ग्नाळू मुलांना माझा एक अनाहूत सल्ला आहे .. पुण्यात रहात असाल तर पुण्यातील मुलगी अजिबात करू नका. तुमची सासूच तुमचे घर चालवेल. रोज ऑफिस ला जाताना पाळणाघर/ तिचे माहेर>>> तिचे ऑफीस >>> तुमचे ऑफिस आणि परत येताना याच क्र्माने उलट यावे लागेल .... रोज ...होय रोज !
मुलीच्या संसारात आईची लूड्बूड हा इंडीयन पिनलकोड प्रमाणे दखलपात्र गुन्हा म्हणून जाहीर करावा अशी माझी जाहीर मागणी आहे , वाट लावतात बायका लेकीच्या संसाराची ! सॉरी, अपवाद असतील असे वाटत नाही !
मला आश्चर्य वाटते, साठी नंतर ही या बायकांची संसाराची हौस संपत नाही. मी ( आणि विटुकाकू सुद्धा ) आत्ताच कंटाळलो आहोत ..अजून १४ वर्षे नोकरीची आहेत (पण आम्ही गमतीने १४ वर्षाचा वनवास असेच म्हणतो !)
समर्थांनी म्ह्टले आहे .. संसार मुळीचा नासका .... त्यात सुख शोधणे हा मूर्खपणा आहे !

पिलीयन रायडर's picture

15 Jan 2015 - 11:08 am | पिलीयन रायडर

मुलीच्या संसारात आईची लूड्बूड हा इंडीयन पिनलकोड प्रमाणे दखलपात्र गुन्हा म्हणून जाहीर करावा अशी माझी जाहीर मागणी आहे , वाट लावतात बायका लेकीच्या संसाराची ! सॉरी, अपवाद असतील असे वाटत नाही !

काका जोक करताय असं धरुन चालते हं...

आदूबाळ's picture

15 Jan 2015 - 1:00 pm | आदूबाळ

काका जोक करत नसावेत. मी यासंबंधी ऐकलेल्या कथा भयावह आहेत.

चौकटराजा's picture

15 Jan 2015 - 2:10 pm | चौकटराजा

मुलीचे आईवडिल अलीकडे मुलीच्या संसारात जरा जास्तच लक्ष घालतात. माझ्या सासूनेही ते घातले. मलाही राग येत असे.
आज तीन दशकानी मला असे मात्र अनुभवास आलेय की आमच्या " आई" खरंच जबरा माया़ळू आहेत. त्यांचा तो स्वभावच आहे. पण इतर उदाहरणात असे होण्याचे कारण कदाचित असेही असेल की मुलगा लग्न झाले की भावाचा भाउ न रहाता कोणाचा तरी मेहुणा कोणाचा तरी साडू पयला होतो. तो सासरी जातो मनाने.

पिलीयन रायडर's picture

15 Jan 2015 - 2:23 pm | पिलीयन रायडर

अहो पण किती ते जनरलायजेशन??
आजवर सुना सासरी जाउन रहात होत्या, तेव्हा आयुष्या नवर्‍याच्या आई बरोबर घालवावं लागत होतं.. त्या छळाच्या कथाही भयावहच आहेत..
अशाही मुलींच्या आया आहेत ज्या लेक-जावयाच लेकरु दिवसभर सांभाळतात...

मला कळत नाही, एकाच शहरात मुलगा आई-वडीलांना सोडून दुसरं घर करुन राहिला तर न्युज होते.. तिथे मुलगी आई-बापाला सोडून रहातेच ना.. अशा वेळी तिच्या माहेरी भेट देणं ही एवढी चर्चेची गोष्ट कशाला?

आदूबाळ's picture

15 Jan 2015 - 3:18 pm | आदूबाळ

नाही नाही, जनरलायजेशन करण्याचा विचार नव्हता. आपण असल्या कथा ऐकतो तेव्हा त्यात सिलेक्शन बायस असणं स्वाभाविक आहे.

पिलीयन रायडर's picture

16 Jan 2015 - 9:11 am | पिलीयन रायडर

सिलेक्शन बायस बद्दल सहमत.. पण म्हणुनच बोलताना आपण "हेच आणि असंच असतं" असं नाही ना बोलत.. जगात सगळ्याच प्रकारची माणसं आहेत.. एकच एक गोष्ट खरी असु शकत नाही..

ब़जरबट्टू's picture

15 Jan 2015 - 4:27 pm | ब़जरबट्टू

मुलीच्या संसारात आईची लूड्बूड

या वाक्याचा अर्थ " मला हा असा फाटका औरंगजेब मिळाला हो, कध्धी पिक्चर नाही, का भेळ नाही. कधी शिंगणापूर साधी पण विचारले नाही ग तुझ्या बापाने, पण तू नक्की जावैबापूच्या मागे लागुन शिंगापूर तरी करुन घे हो" असा होतो. :)

आदूबाळ's picture

15 Jan 2015 - 4:38 pm | आदूबाळ

फाटका औरंगजेब

:)) जबरदस्त वाक्प्रचार!

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 4:48 pm | बॅटमॅन

अगदी अगदी =))

बोका-ए-आझम's picture

17 Jan 2015 - 12:00 am | बोका-ए-आझम

फाटका औरंगजेब हा लई म्हणजे लईच भारी प्रकार आहे!रोफललो!

मुलीच्या संसारात आईची लूड्बूड हा इंडीयन पिनलकोड प्रमाणे दखलपात्र गुन्हा म्हणून जाहीर करावा अशी माझी जाहीर मागणी आहे , वाट लावतात बायका लेकीच्या संसाराची !
+१११११११११११११११११११११११११११११११११
खुप जवळुन अनुभव घेतलाय याचा , अजुनही सहन करतोच आहोत अपवादाने का होइना अशा बावळट बायका आहेत जगात ज्याना फक्त मुलगी अन जावई आपल्या ताब्यात कसे राहतील याचीच पडलीये बाकीचे घरचे गेले उडत ! अन मुली पण दिवस्सात ५६ वेळा काय खाल्ल तिथुन तर ते कुणी काय नेसल इतपर्यन्त अपडेट देत राहतात आइला फोनवरुन
परत मुलीला सासरचे कुणी काही बोलले तरी ह्यान्च्या धमक्या अमक करु न तमक करु ? अवस्था अशी आहे की कायद्याने मुलीना इतक्या सवलती दिल्यात की हल्ली मुलाना जीव मुठीत धरुन वावराव लागतय :( ( हो मी एक मुलगी असुन हे लिहितेय कारण याचा गैर्वापर मी खुप जवळुन पाहीला आहे
आता मुलासाठी कायदे काढावे लागतील असे चित्र आहे असो.....
हे फक्त त्या क्याटेगरितल्या म्हैलाकरीता लिहीले आहे अन ते ही स्वानुभवावरुन :(
रोष नसावा :)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा

@

अशा बावळट बायका आहेत जगात ज्याना फक्त मुलगी अन जावई आपल्या ताब्यात कसे राहतील याचीच पडलीये बाकीचे घरचे गेले उडत ! अन मुली पण दिवस्सात ५६ वेळा काय खाल्ल तिथुन तर ते कुणी काय नेसल इतपर्यन्त अपडेट देत राहतात आइला फोनवरुन
परत मुलीला सासरचे कुणी काही बोलले तरी ह्यान्च्या धमक्या अमक करु न तमक करु ?

>>> या असल्याच सामाजिक प्रश्नांवर काम करणार्‍या अपर्णातै रामतीर्थंकर आहेत. त्यांच्याकडे अश्या भरपूर केसेस सोडविण्यासाठी येत असतात. ती बाईपण अत्यंत चिकाटीने ह्या केसेस सोडविते. मी त्यांच्या भाषणात हेच मुलिंच्या आयांचे सकाळी उठल्यापासून दर अर्ध्यातासाला चौकश्या करणारे फोन कॉल्सचे संभाषणाचे विवरण ऐकले आहे. ते अगदी वरीलप्रमाणेच होते.

पिलीयन रायडर's picture

16 Jan 2015 - 9:15 am | पिलीयन रायडर

अपर्णातै रामतीर्थंकर

नको नको.. ह्या बाईंच नाव ऐकलं तरी मला गरगरतं.. त्यांचे विचार पटणारे लोक आहेत हे पाहुन तर अजुनच...
आईची लुडबुड नको (म्हणजे आता दोन्ही साईडच्या आया नाही बरं का... फक्त मुलीचीच आई... मुलाच्या आईचा हक्क असतो लहानसहान गोष्टीत हस्तक्षेप करण्याचा..) इथवर ठिके.. पण "नवर्‍यासमोर डोकं चालवायचं नाही.. तुम्ही असाल शास्त्रज्ञ, पण घरी आल्यावर पती हाच परमेश्वर.. भाकरी करता येत नसेल तर काय अर्थ तुमच्या जिंदगीला..." असले "महान" विचारही ह्या बाई मांडतात... असो..

पिराबाई... दीर्घ श्वास घ्या...शांत व्हा.. आणि बाईंना विसरुन जा....

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jan 2015 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा

पि.रा. बाई... आपण म्हणताय, ते सगळं आहेच! :) मी त्याबाजुनी नव्हे, तर ..वरिल मुद्याची सत्यता अधोरेखित करण्याकरता आणि करण्यापुरताच त्यांच्या त्या मुद्द्याचा आधार घेतला आहे.

भिंगरी's picture

15 Jan 2015 - 7:53 pm | भिंगरी

पियुशा मी सुद्धा पाहिले आहे आईच्या लुडबुडीमुळे त्रस्त झालेले जावई.
त्यामुळे तुझ्या मताशी सहमत आहे.

पुष्कर जोशी's picture

12 Jun 2016 - 1:39 am | पुष्कर जोशी

मुलाला त्याच्या आई बाबा पासून तोडणार्या सासू पण आहेत ... मुलगा आणि मुलगी विदेशात राहतात तरी कारस्थाने करून मुलगा आणि आई बाबाचे संबंध तोडणारी सासू पाहिली आहे...

मित्रांमधे गप्पा मारता मारता एकाने (एक मुलगी असलेल्या) मजेत काढलेले उद्गार म्हणजे वास्तव आहे असे वाटते:
हल्ली एकच मुल जन्माला घालतात बरीच जोडपी, त्यात पण मुलगा झाला तर कसा शिकेल? चांगला शिकला तरी नोकरी चांगली मिळेल का? काही धंदा केला केला तर त्याला भांडवल उपलब्ध करुन द्यावे लागेल, परदेशी स्थाईक झाला तर म्हातारपणी आपल्याला विचारेल का? ईकडेच राहिला तर लग्नापर्यंत त्याला घर वगैरेसाठी आर्थिक मदत करावीच लागेल, सुन कशी मिळेल? आपल्याला कशी वागवेल? ईत्यादी नाना काळज्या आयुष्याच्या वेगवेगळ्या ट्प्प्यावर पोखरतील. त्यापेक्षा एक मुलगी बरी. फक्त एकच गोष्ट नीट करावी लग्न करताना जावई, सासुरवाडी चांगली बघुन द्यावी आणि आपण दोघे खुष व्हावे.
बाकी मी पण लग्नाआधी ३-४ मुली बघितल्या पण अवास्तव अपेक्षा असणर्‍या कोणी वाटल्या नाहीत.

आयला म्हणजे पुरुषभ्रूणहत्या सुरू होणार की काय आता? रोचक आहे.

पण सध्या मुलगी म्हणजे काळजी मिटली आणि मुलगा म्ह. काळजी असे आहे खरे.

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 12:48 pm | बॅटमॅन

अगा बाबौ =)) नको नको _/\_ =))

स्पा's picture

15 Jan 2015 - 11:08 am | स्पा

चर्चा वाचतोय

अन्या दातार's picture

15 Jan 2015 - 11:11 am | अन्या दातार

आता मेल्या तु कशाला वाचतोयस?

बॅटमॅन's picture

15 Jan 2015 - 11:13 am | बॅटमॅन

का रे बाबा बिचार्‍या स्पांडूला छळतोयस?

- एक बिचारा.

पैसा's picture

15 Jan 2015 - 2:13 pm | पैसा

मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. पण स्पांडूचं कोंबडं अजून मेलं नाही बहुतेक. म्हणून चर्चा वाचतोय तो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Jan 2015 - 2:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ल ग्न बं बा ळ!!!! =)) तु पण ठेव वाचुन ;)

मूवी काकांसाठी एवढे तर करूच शकतो न मी
कळकळ पहा त्यांची ;)

सस्नेह's picture

15 Jan 2015 - 11:28 am | सस्नेह

वाचत बसू नका हो, घरी 'ते' वाट पाहत असतील, पळा !
नैतर रेसमध्ये नंबर नाही लागायचा ! *wink*

स्पा's picture

15 Jan 2015 - 11:30 am | स्पा

=))

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2015 - 12:01 pm | अत्रुप्त आत्मा

@वाचत बसू नका हो, घरी 'ते' वाट पाहत असतील, पळा ! >> =))))))
पां डुब्बा!!! परत वोरिजनल तें.. , लिही ना!

सस्नेह's picture

15 Jan 2015 - 11:36 am | सस्नेह

अपेक्षा मुलींच्या आहेत की त्यांच्या आई-वडिलांच्या हे तुम्ही कन्फर्म केलाय का मुविकाका ?
अनुभव असा की या वयात मुलींची मानसिकता खूप लवचिक असते. जोडीदाराच्या बरोबरीनं साथ देण्यातून स्वत: काहीतरी अचिव्ह करण्याची उमेद असते. विशेषत: अलीकडच्या पिढीच्या मुली खूपच प्रगल्भ विचाराच्या आणि कोणत्याही तडजोडीस तयार असतात, असे आढळले आहे. नवऱ्याच्या पगाराबद्दल त्या फारशा आग्रही दिसत नाहीत. मात्र नवऱ्याने आपल्याला जॉब-स्वातंत्र्य द्यावे हा आग्रह जरूर दिसतो.
माझा सल्ला, मुलांनो, आई-वडील, मध्यस्थ या सर्वांना फाट्यावर मारून डायरेक्ट मुलीकडून या अपेक्षा जाणून घ्यायचा प्रयत्न करा . नक्की काम होईल ! *smile*