Skip to main content

लग्न म्हणजे काय असतं ?

लेखक अभिषेक पांचाळ यांनी रविवार, 17/04/2016 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न म्हणजे काय असतं हो बघायचं ठरतं , ओळख कुठून निघते . फोटो जातात घरी , देवाण घेवाण होते . फोटोवरून मग , बैठक होते घरी . मुलगा येतो बघायला , मुलीच्या दारी . पत्रिकेतले दोष गुण मान पान , देणं घेणं जुळून आले कि हे सारे , जळून येतात मनं बैठकी होतात , बस्ताही बसतो . लगीनघाईत व्यस्त , हरएक दिसतो शेरवानी , साडी सारंकाही ठरतं बघता बघता घर , माणसांनी भरतं . तारीख एक ठरते मंडपही सजतो . नवरीला पाहून मंडपी , मग नवराही लाजतो . एक मुलगा , एक मुलगी एक नवरा , एक नवरी अक्षदा अन आशीर्वाद घेऊन बारात जमली हावरी अक्षदा पडतात , आशीर्वादही मिळतो . नवरीचा भाऊ हक्काने , नवऱ्याचा कान पिळतो . निरोप घेता नवरी , रडती मग सारे . आशीर्वाद देती , नांदा सौख्यभरे . आशीर्वाद घेऊन सगळ्यांचे , नवं पर्व सुरु होतं . माझं मन तुझं मन , एक होऊन जातं . जबाबदारीचं भान , अचानक कळतं . संसार असं त्याला , गोंडस नाव मिळतं . नवरा बायको जणू , दोन चाकं होतात . संसाराचा गाडा , खांद्यावर वाहतात . दोन वेगळी मने , एक होऊन नांदतात . दोन कुटुंबांना , एका धाग्यात बांधतात . जोडायची रीत आहे , जोडलेच जातात . वेगळी कुटुंब , एक परिवार होतात . तारेवरची कसरत , होते थोडी कधी . याचीचतर मजा आहे , खऱ्या संसारामधी . रुसवे फुगवे कधी , भांडनेही होतात . सुखं गेली तशी , दुःखही जातात . कुणी म्हणतं लग्न , झाली एक सजा आहे . तडजोडीचं तंत्र कळलं , तर यातच खरी मजा आहे . समजुतीने दोर संसाराची , हातामध्ये घ्यावी . कधी तू , तर कधी मी माघार घेऊन बघावी . काय होईल जर , गमक कळले खरे . संसारातून दोघा , तर सुख मिळे पुरे  . डोंबारीच्या खेळातल्या , दोरीवर चालणे . कसरत करत सारी , दुःखही झेलणे . भातुकलीचा खेळ , खरा होईल मग . डोळ्यांमध्ये एकमेकांच्या , दिसेल त्यांना जग . लपंडावाचा खेळ , सुख दुःखे खेळतील . राज्ये परत देण्यासाठी , धप्पे खूप मिळतील . राज्य घेत राहावं , दुनिया बोले काही , राज्य किती आली , तरी खेळ संपत नाही . लग्न म्हणजे असा , काही अजबच खेळ असतो . दोन मनांचा जमलेला , अप्रतिम मेळ असतो . - अभिषेक पांचाळ
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19254
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

अजून येऊ दे. अवांतर : मलाही वाटलं लग्न या विषयावर काथ्या कुटायचा आहे. अन रैवारचा पोहे खात खात काथ्या कुटायचा माझाही चांगला मुड होता :( -दिलीप बिरुटे

अपेक्षाभंग. मला वाटले जान्हवी न मुक्ता बर्वे टाईप मुली न मिळणाऱ्याना एक लेक्चर देता येईल. कसचं काय!

In reply to by पैसा

जान्हवीसारखी मुलगी मिळावी अशी अपेक्षा असणारे लोकं डोक्यावर पडलेले असतात असं माफक निरिक्षण. सतत गोग्गोड गोग्गोड गोग्गोड बोलुन डोकं किटवणारी, हापिसात बसुन काम कमी अन टैमपास करणारी, सुमारे ९० वर्षातुन एकदा वंशाचा दिवा किंवा वंशाची पणती जन्माला घालणारी बायको ज्याला हवी असेल तो माणुस लग्नासाठी मॅचुअरचं नाही असं म्हणेन. अरे बायको कशी पायजे, फट्टाकडी. सतत उपदेशांचे डोस पाजण्यापेक्षा कैतरी रोमँटिक बोलणारी इ.इ. हॅशटॅग रेवाक्का =))

In reply to by टवाळ कार्टा

है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे। कहते है के गालिब का है अंदाजे बयां और। या अड्ड्यावर कधीतरी. नीटच समजावून सांगेन! बाकी तुमच्या धाग्याचा उपसंहार सांगितला नाहीत. सल्ले देणाऱ्याना धन्यवाद म्हणून दी एन्ड सांगायची पद्धत असते!

In reply to by टवाळ कार्टा

=))) गोयंचं मीठ जास्तच झोंबरं असतंय ;)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अरे ए,मैने तुम्हाला क्या घोडा मार्‍या हय? माझ्या विवाह मंडळात नावनोंदणी केलीस की जादू बघशीलच!

In reply to by अभ्या..

वेगळा धागा काढा. सगळेजण विनोदी उखाणे घेतील. तुलाही नाव घ्यायला लावणार मग! तेंव्हा लाजलास तरी नाव घ्यावच लागेल.

In reply to by अभ्या..

यमकांसाठी भेटा किंवा लिहा... हमखास यमके शिका फाडफाड ! विरोधी प़क्षाची करा पाडापाड ! यमके गुरुजी संचालीत खटकेबाज यमक शिकवणी वर्ग. ता.क.मे सुट्टीत सोलापुरात्/मिरजेत/कोल्हापुरात उन्हाळी वर्ग चालविले जातील

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मग मला कसं समजलं नाही? की तिथेही ड्यू आयडी आहे? ;) असो. आता तुला एक इंजिनियर, एक डॉक्टर, एक मॉडेल, एक शिरेलीत काम करणारी हिरवीन यांची स्थळे पाठवून देते. नर्सची स्थळे आजकाल नोंदणी करून घेत नाही हे सूडच्या अनुभवावरून माहितच असेल. तो भेटण्याच्या कार्यक्रमात तिला सिस्टर म्हणाल्याने घोळ झालावता.

In reply to by रेवती

तिकडे ड्युआयडी चालत नाहीत म्हणे.
तो भेटण्याच्या कार्यक्रमात तिला सिस्टर म्हणाल्याने घोळ झालावता.
ठ्ठो!!!

अभिषेक पांचाळ चांगली कविता. तुम्ही मिपावर नवीन दिसता. त्यामुळे तुम्ही खालील धाग्याचा एका बैठकीत अभ्यास करा. ह्याहुन उत्तम आणि रिअलिस्टिक कविता लिहु शकाल. शंकानिरसनासाठी टवाळ कार्टा ह्या आयडीला व्यनि अथवा खरड करु शकता. वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

=))) त्यांचा या विषयावर अनेक वर्षांचा दांडगा अभ्यास आहे.त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत....

In reply to by एस

त्या स्थीतीला कोण घोडा (की गाढव) आहे ते कळत नाही हे नक्की आणि कळाल्यावर फार उशीर झालेला असतो. दैनीक खुलासा मधून याचकांची पत्रेवाला नाखुस.

in which woman gets Master's degree and Man loses his Bachelor's degree.