✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लग्न म्हणजे काय असतं ?

अ
अभिषेक पांचाळ यांनी
Sun, 04/17/2016 - 00:07  ·  लेख
लेख
लग्न म्हणजे काय असतं हो बघायचं ठरतं , ओळख कुठून निघते . फोटो जातात घरी , देवाण घेवाण होते . फोटोवरून मग , बैठक होते घरी . मुलगा येतो बघायला , मुलीच्या दारी . पत्रिकेतले दोष गुण मान पान , देणं घेणं जुळून आले कि हे सारे , जळून येतात मनं बैठकी होतात , बस्ताही बसतो . लगीनघाईत व्यस्त , हरएक दिसतो शेरवानी , साडी सारंकाही ठरतं बघता बघता घर , माणसांनी भरतं . तारीख एक ठरते मंडपही सजतो . नवरीला पाहून मंडपी , मग नवराही लाजतो . एक मुलगा , एक मुलगी एक नवरा , एक नवरी अक्षदा अन आशीर्वाद घेऊन बारात जमली हावरी अक्षदा पडतात , आशीर्वादही मिळतो . नवरीचा भाऊ हक्काने , नवऱ्याचा कान पिळतो . निरोप घेता नवरी , रडती मग सारे . आशीर्वाद देती , नांदा सौख्यभरे . आशीर्वाद घेऊन सगळ्यांचे , नवं पर्व सुरु होतं . माझं मन तुझं मन , एक होऊन जातं . जबाबदारीचं भान , अचानक कळतं . संसार असं त्याला , गोंडस नाव मिळतं . नवरा बायको जणू , दोन चाकं होतात . संसाराचा गाडा , खांद्यावर वाहतात . दोन वेगळी मने , एक होऊन नांदतात . दोन कुटुंबांना , एका धाग्यात बांधतात . जोडायची रीत आहे , जोडलेच जातात . वेगळी कुटुंब , एक परिवार होतात . तारेवरची कसरत , होते थोडी कधी . याचीचतर मजा आहे , खऱ्या संसारामधी . रुसवे फुगवे कधी , भांडनेही होतात . सुखं गेली तशी , दुःखही जातात . कुणी म्हणतं लग्न , झाली एक सजा आहे . तडजोडीचं तंत्र कळलं , तर यातच खरी मजा आहे . समजुतीने दोर संसाराची , हातामध्ये घ्यावी . कधी तू , तर कधी मी माघार घेऊन बघावी . काय होईल जर , गमक कळले खरे . संसारातून दोघा , तर सुख मिळे पुरे  . डोंबारीच्या खेळातल्या , दोरीवर चालणे . कसरत करत सारी , दुःखही झेलणे . भातुकलीचा खेळ , खरा होईल मग . डोळ्यांमध्ये एकमेकांच्या , दिसेल त्यांना जग . लपंडावाचा खेळ , सुख दुःखे खेळतील . राज्ये परत देण्यासाठी , धप्पे खूप मिळतील . राज्य घेत राहावं , दुनिया बोले काही , राज्य किती आली , तरी खेळ संपत नाही . लग्न म्हणजे असा , काही अजबच खेळ असतो . दोन मनांचा जमलेला , अप्रतिम मेळ असतो . - अभिषेक पांचाळ
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कविता
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
19231 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

छान कविता. (लेख असला असता तर

उगा काहितरीच
Sun, 04/17/2016 - 01:02 नवीन
छान कविता. (लेख असला असता तर २-३०० कसेही आलेच असते. ;-) )
  • Log in or register to post comments

रतीब. मला वाटलं लेख असेल.

एस
Sun, 04/17/2016 - 03:57 नवीन
रतीब. मला वाटलं लेख असेल.
  • Log in or register to post comments

लई मोठी कविता झाली राव

दत्ताभाऊ गोंदीकर
Sun, 04/17/2016 - 10:03 नवीन
आवडली.लिहीत रहा...आम्ही वाचत जाऊ.
  • Log in or register to post comments

आवडली.

रातराणी
Sun, 04/17/2016 - 10:07 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

आवडलं लग्न.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/17/2016 - 11:05 नवीन
अजून येऊ दे. अवांतर : मलाही वाटलं लग्न या विषयावर काथ्या कुटायचा आहे. अन रैवारचा पोहे खात खात काथ्या कुटायचा माझाही चांगला मुड होता :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हम्म

पैसा
Sun, 04/17/2016 - 11:31 नवीन
अपेक्षाभंग. मला वाटले जान्हवी न मुक्ता बर्वे टाईप मुली न मिळणाऱ्याना एक लेक्चर देता येईल. कसचं काय!
  • Log in or register to post comments

जान्हवीसारखी मुलगी मिळावी अशी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/17/2016 - 12:04 नवीन
जान्हवीसारखी मुलगी मिळावी अशी अपेक्षा असणारे लोकं डोक्यावर पडलेले असतात असं माफक निरिक्षण. सतत गोग्गोड गोग्गोड गोग्गोड बोलुन डोकं किटवणारी, हापिसात बसुन काम कमी अन टैमपास करणारी, सुमारे ९० वर्षातुन एकदा वंशाचा दिवा किंवा वंशाची पणती जन्माला घालणारी बायको ज्याला हवी असेल तो माणुस लग्नासाठी मॅचुअरचं नाही असं म्हणेन. अरे बायको कशी पायजे, फट्टाकडी. सतत उपदेशांचे डोस पाजण्यापेक्षा कैतरी रोमँटिक बोलणारी इ.इ. हॅशटॅग रेवाक्का =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जौ दे रे...तो पण एक अंदाज

टवाळ कार्टा
Sun, 04/17/2016 - 12:09 नवीन
जौ दे रे...तो पण एक अंदाज असेल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

है और भी

पैसा
Sun, 04/17/2016 - 12:32 नवीन
है और भी दुनिया में सुखनवर बहुत अच्छे। कहते है के गालिब का है अंदाजे बयां और। या अड्ड्यावर कधीतरी. नीटच समजावून सांगेन! बाकी तुमच्या धाग्याचा उपसंहार सांगितला नाहीत. सल्ले देणाऱ्याना धन्यवाद म्हणून दी एन्ड सांगायची पद्धत असते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

तुमचं मीठागार आहे का हो

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/17/2016 - 12:36 नवीन
तुमचं मीठागार आहे का हो गोयंमधे? मीठ चोळणं ह्या वाक्प्रचाराला साजेसा प्रतिसाद.. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खिखिखि!

पैसा
Sun, 04/17/2016 - 12:39 नवीन
आहेत ना मिठागरे. किती गोण्या पाठवू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

णको. खुप मीठ ब्लडप्रेशरला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/17/2016 - 12:41 नवीन
णको. खुप मीठ ब्लडप्रेशरला वाईट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हा, बरोबरे

पैसा
Sun, 04/17/2016 - 12:44 नवीन
मग णको तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्वॉर्र्

टवाळ कार्टा
Sun, 04/17/2016 - 12:44 नवीन
ब्वॉर्र्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=)))

अजया
Sun, 04/17/2016 - 12:48 नवीन
=))) गोयंचं मीठ जास्तच झोंबरं असतंय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अरे ए,मैने तुम्हाला क्या घोडा

रेवती
Sun, 04/17/2016 - 17:17 नवीन
अरे ए,मैने तुम्हाला क्या घोडा मार्‍या हय? माझ्या विवाह मंडळात नावनोंदणी केलीस की जादू बघशीलच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

रेवाक्का काल ते निरोप दिलास

अभ्या..
Sun, 04/17/2016 - 17:27 नवीन
रेवाक्का काल ते निरोप दिलास पण नाव घ्यायचं राह्यलं. ;) होऊन जाऊ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वेगळा धागा काढा. सगळेजण

रेवती
Sun, 04/17/2016 - 18:22 नवीन
वेगळा धागा काढा. सगळेजण विनोदी उखाणे घेतील. तुलाही नाव घ्यायला लावणार मग! तेंव्हा लाजलास तरी नाव घ्यावच लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सध्या शिकतोय निर्लज्जपणा. न

अभ्या..
Sun, 04/17/2016 - 22:57 नवीन
सध्या शिकतोय निर्लज्जपणा. न लाजता घेईन मी नाव. अगदी यमक वगैरे टाकून घीईन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

खमक्या

नाखु
Mon, 04/18/2016 - 09:48 नवीन
यमकांसाठी भेटा किंवा लिहा... हमखास यमके शिका फाडफाड ! विरोधी प़क्षाची करा पाडापाड ! यमके गुरुजी संचालीत खटकेबाज यमक शिकवणी वर्ग. ता.क.मे सुट्टीत सोलापुरात्/मिरजेत/कोल्हापुरात उन्हाळी वर्ग चालविले जातील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

णावणोंदणी कियेला है भोत पैले.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/17/2016 - 18:43 नवीन
णावणोंदणी कियेला है भोत पैले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मग मला कसं समजलं नाही? की

रेवती
Sun, 04/17/2016 - 19:22 नवीन
मग मला कसं समजलं नाही? की तिथेही ड्यू आयडी आहे? ;) असो. आता तुला एक इंजिनियर, एक डॉक्टर, एक मॉडेल, एक शिरेलीत काम करणारी हिरवीन यांची स्थळे पाठवून देते. नर्सची स्थळे आजकाल नोंदणी करून घेत नाही हे सूडच्या अनुभवावरून माहितच असेल. तो भेटण्याच्या कार्यक्रमात तिला सिस्टर म्हणाल्याने घोळ झालावता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

तिकडे ड्युआयडी चालत नाहीत

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/17/2016 - 22:49 नवीन
तिकडे ड्युआयडी चालत नाहीत म्हणे.
तो भेटण्याच्या कार्यक्रमात तिला सिस्टर म्हणाल्याने घोळ झालावता.
ठ्ठो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

लग्नातली रडारड पाहून जमाना

असंका
Sun, 04/17/2016 - 11:49 नवीन
लग्नातली रडारड पाहून जमाना झाला....
  • Log in or register to post comments

=))

विजय पुरोहित
Sun, 04/17/2016 - 11:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

अभिषेक पांचाळ चांगली कविता.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 04/17/2016 - 12:07 नवीन
अभिषेक पांचाळ चांगली कविता. तुम्ही मिपावर नवीन दिसता. त्यामुळे तुम्ही खालील धाग्याचा एका बैठकीत अभ्यास करा. ह्याहुन उत्तम आणि रिअलिस्टिक कविता लिहु शकाल. शंकानिरसनासाठी टवाळ कार्टा ह्या आयडीला व्यनि अथवा खरड करु शकता. वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?
  • Log in or register to post comments

नोट्स काढायला विसरू नका

आदूबाळ
Sun, 04/17/2016 - 14:33 नवीन
नोट्स काढायला विसरू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

+१

तर्राट जोकर
Sun, 04/17/2016 - 16:39 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

+१

अजया
Sun, 04/17/2016 - 12:46 नवीन
=))) त्यांचा या विषयावर अनेक वर्षांचा दांडगा अभ्यास आहे.त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाच्या प्रतीक्षेत....
  • Log in or register to post comments

लग्न म्हंजे लग्न म्हंजं लग्न अस्तं...

एस
Sun, 04/17/2016 - 23:04 नवीन
लग्न म्हणजे घोड्यावर चढवण्याचा उद्योग असतो. फक्त त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवला असे कोणी उघड म्हणत नाही. ;-)
  • Log in or register to post comments

सांप्रत

नाखु
Mon, 04/18/2016 - 09:51 नवीन
त्या स्थीतीला कोण घोडा (की गाढव) आहे ते कळत नाही हे नक्की आणि कळाल्यावर फार उशीर झालेला असतो. दैनीक खुलासा मधून याचकांची पत्रेवाला नाखुस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

Marriage is an exam

बोका-ए-आझम
Sun, 04/17/2016 - 23:19 नवीन
in which woman gets Master's degree and Man loses his Bachelor's degree.
  • Log in or register to post comments

या वर्षी लग्नाला ३० वर्षे

विवेकपटाईत
Mon, 04/18/2016 - 21:17 नवीन
या वर्षी लग्नाला ३० वर्षे पूर्ण होतील. अजूनही कळले नाही लग्न म्हणजे काय असते.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा