सायकलीशी जडले नाते २५: आठवे शतक

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
4 Apr 2016 - 2:54 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस

सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!

सायकलीशी जडले नाते २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .

सायकलीशी जडले नाते २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना

आठवे शतक

११ एप्रिलला १४८ किलोमीटर सायकल चालवली आणि नंतर लिफ्ट घेऊन औरंगाबादला पोहचलो. आधी विचार पुढेही सायकल चालवण्याचा होता, पण काल खूप थकल्यामुळे तो सोडून द्यावा लागला. लवकर उठून वेरुळ- दौलताबाद परिसरात जाण्याचीही इच्छा होती. पण सकाळी लवकर न उठल्यामुळे तेही जमलं नाही. एखाद्या मोठ्या मोहीमेची तयारी करताना- एखाद्या मोठ्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना अशा छोट्या चुकाही महागात पडतात. . सातत्याचं महत्त्व खूप जास्त आहे. जर "इथे" आळस केला, तर "तिथे" किंमत चुकवावी लागेल. . असो. औरंगाबादमध्ये एका सायकल मॉलमध्ये गेलो. इथे खूप एक्सेसरीज होत्या. पण तितक्याच महाग. सायकलिंगवर आज काही जण प्रचंड पैसेही खर्च करतात. पन्नास हजारांची सायकल आणि तीन- चार हजारांच्या एक्सेसरीज सामान्य बाब आहे. .

सायकलचे तांत्रिक घटक हळु हळु शिकतोय. हेही तितकंच आवश्यक आहे. कारण लदाख़मध्ये सोलो सायकल चालवणा-या ऑल राउंडर व्हावं लागतं- चालवणारा तोच, पंक्चर काढणारा तोच, मॅकेनिक तोच आणि डॉक्टरही तोच! त्यामुळे सर्व बाजूंनी तयारी करायची आहे. त्यामुळेच इतक्या ऊन्हातही सायकल चालवतो आहे. मध्ये मध्ये खराब रस्त्यांवरही सायकल चालवतो आहे. अशा वेळेस परत एका मोठ्या राईडला निघालो. परभणी- जिंतूर- सिद्धेश्वर धरण- औंढा कॉर्नर- झिरो फाटा- परभणी असा रूट घेतला. आधी तर गावांमधल्या रस्त्यांवरून जावसं वाटलं, पण तितकी हिंमत झाली नाही आणि तशा रस्त्यांची पक्की माहितीही मिळाली नाही.


एका पोत्यात बसलेली सायकल!

जिंतूरपर्यंत आधीही गेलोच आहे. सकाळी लवकर निघाल्यानंतर जिंतूरमध्ये नाश्ता केला. प्रचंड गरम होत असल्यामुळे सारखं ओआरएस- इलेक्ट्रॉल घेतो आहे. पण सारखं सारखं ते पाणी पिऊन कंटाळा येतो. म्हणून एका बाटलीमध्ये साधं पाणीही ठेवलं आहे. जिंतूरनंतर जुलाबाचा त्रास झाला. पेट्रोल पंप कामी आला! अजून जास्त इलेक्ट्रॉल घेतलं आनि पुढे निघालो. जिंतूर- औंढा ह्या रस्त्यावरून आधी एकदाच गेलो आहे. ह्या रस्त्यावर हलके चढ- उतार आहेत. ह्या रस्त्यापासून काही अंतरावर सिद्धेश्वर धरण आहे. त्याचा रस्ता विचारावा लागला. अनेक वेळेस बघितलं आहे की, स्थानिक लोकांना ऩेमकी माहिती देता येत नाही. तसंही आपल्या देशामध्ये कोणतं स्थान नेमकं कुठे आहे, हे वैज्ञानिक पद्धतीने सांगणं तसंही अवघडच आहे! असो!

पुढे जात राहिलो. दुपारच्या कडक ऊन्हामध्ये धरणाजवळ पोहचलो. इथे मुलं बरीच होती. एक- दोघांनी सायकलही चालवून बघितली. सायकलिंग करताना नेहमी मुलं समोर येतात. त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचे चेहरे बघण्यासारखे असतात! आता चांगला थकवा जाणवतोय. सायकल चालवणं कठिण होतं आहे. औंढा फाट्याजवळ एका ठिकाणी भरपूर खाऊन घेतलं. राईड सुरू करून सात तास झाले आहेत आणि ९० किलोमीटर पूर्ण झाले आहेत. उरलेला टप्पा कठिण जाणार. पण रस्त्यावर वाहतुक विरळ असल्यामुळे अगदी निवांत जाता येतं आहे.


मॅपमध्ये धरणापर्यंतचा रस्ता दिसत नाही.

थोड्या वेळाने अशी स्थिती आली की एका जागी चक्क थोडा वेळ झोपलो. शवासन केलं. सावलीचा आनंद घेतला. मग परत निघालो. हळु हळु घर जवळ येत आहे. झिरो फाट्यावर परत नाश्ता केला. आता फक्त वीस किलोमीटर राहिले आहेत. पण पुढे निघालो आणि पंक्चर झालं! हवा भरून पुढे गेलो तर परत हवा उतरली. म्हणजे पंक्चरच आहे. इतक्या ऊन्हामध्ये गळून गेलो असताना ते काढावं लागेल. पण हीच तर खरी तयारी आहे. पंक्चर काढलं. हातांमध्ये अजिबात सफाई नाही आहे. जणू तोडक्या- मोडक्या भाषेत बोलतोय! कसंबसं पंक्चर काढलं आणि निघालो. पण. . थोड्याच वेळात परत तेच. आता घर जेमतेम आठ किलोमीटर दूर आहे. पण इतकं थकलोय की काही सुचत नाहीय. पंक्चर काढण्याचा प्रयत्न केला. पण जमलं नाही. हवा उतरते आहे. खरं तर परत परत हवा भरून पुढे जाऊ शकलो असतो- दर तीन किलोमीटरने हवा भरावी लागली असती. पण इतका विचार करू शकलो नाही आणि सरळ लिफ्ट घेतली! इतकी मस्त राईड झाल्यानंतर शेवटच्या आठ किलोमीटरसाठी लिफ्ट घ्यावी लागली. एकूण १३५ किलोमीटर झाले- आठवं शतक झालं. पण वेळ फार लागला. सकाळी सहा वाजता निघालो होतो, आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत. पण मुख्य राईडमध्ये येणा-या अनुभवांची चुणूक मिळाली! ह्या राईडचे फोटो मिस झाल्यामुळे इथे देऊ शकलो नाही.

पुढील भाग २६: २०१५ च्या लदाख़ सायकल मोहिमेची तयारी

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

प्रवासक्रीडाविचारअनुभव

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

4 Apr 2016 - 4:13 pm | वेल्लाभट

क्लास..... वेटिंग

तुमच्या चिकाटीला आमचा दंडवत स्वीकारा

मार्गी's picture

5 Apr 2016 - 1:28 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! :) सर्वांना हॅपी सायकलिंग!