< मिसळपावात... >

नीलमोहर's picture
नीलमोहर in जे न देखे रवी...
29 Feb 2016 - 1:05 pm

नेटावर जे नामी मोट्ठं संस्थळ आहे ना
तिथे खूप वाचक असतात, जबर ट्यारपी मिळतो
डुप्लिकेट आयडी तिथे पडीक असतात
ते अगदीच पकाऊ असतात
मला अशा सायटी आवडत नाहीत

ऐसे खचाखच पाडलेले धागे बघितल्यावर मला भोवळ येते
तैसे ज्ञानामृत पाजू संस्थळावर जिलबीबरोबर पिठल्याचा आस्वाद घेतल्यावर मला अशीच भोवळ आली होती
तेव्हापासून पिठलं हा पदार्थ मी व्यर्ज केलाय

जिलब्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते
मग तीही मी कधी खात नाही
गुगलवर फिरता फिरता 'त्या' साईटीकडे मी ढुंकूनही कधी पाहत नाही
तिथले लेखन वाचतांना माझी मती कुंठीत झाली होती
मग तिकडे मी कधी गेलोच नाही

मा... वर जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही
१९७७ मध्ये एकदा तेथील लिखाण वाचल्यावर ताप भरल्याचं चांगलच आठवतयं
ते पान मात्र मी अजून जपून बुकमार्क करून ठेवलयं, मात्र ते कोणतं हे मी तुम्हाला सांगणार नाही

आताशा या आठवणी मला जास्त करुन येत नाहीत
कारण सध्या मी मिसळपाव वरच राहतो :)

प्रे र णा

प्रवासवर्णनसांत्वनाकरुणविडंबन

प्रतिक्रिया

ब्येश्टच बघा.
लौ यु मिपा!

नाखु's picture

29 Feb 2016 - 2:07 pm | नाखु

मला अशा सायटी आवडत नाहीत ! ठळक शब्द सलग लिहिल्याबद्दल "चुलत" भावंडांकडून धन्य्वाद.

किसमीस वाल्या सायपुर्ण कवीता देणार्या आणि अस्सल काव्य्लेणी लीलया पेलणार्या भाव विभोर विश्व गुरु चाहता संघ.

सतिश गावडे's picture

1 Mar 2016 - 12:03 am | सतिश गावडे

चुलत नै कै. मावस भावंडं.

नाखु's picture

1 Mar 2016 - 8:35 am | नाखु

मिष्टेक हुवा गुस्ताखी माफ .

प्रचेतस's picture

29 Feb 2016 - 2:08 pm | प्रचेतस

=))

करूण प्रवासाचं सांत्वनापर वर्णन सांगणारं विडंबन आवडलं!

पिलीयन रायडर's picture

29 Feb 2016 - 4:09 pm | पिलीयन रायडर

मुळ कवितेपेक्षा विडंबनच जास्त चांगलं जमलय!

पद्मावति's picture

29 Feb 2016 - 4:16 pm | पद्मावति

:) छान आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Feb 2016 - 4:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चलने दो. :) आवडलं.

-दिलीप बिरुटे

जव्हेरगंज's picture

29 Feb 2016 - 6:43 pm | जव्हेरगंज

खतरनाक !!

=))

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2016 - 6:54 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif सरस! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

स्वामी संकेतानंद's picture

29 Feb 2016 - 6:59 pm | स्वामी संकेतानंद

ळॉळ!!! हेच जास्त खतरा!!

सतिश गावडे's picture

1 Mar 2016 - 12:04 am | सतिश गावडे

भन्नाट !!!

का कोण जाणे, या गमतीदार धाग्यानेही "उपक्रम" सारख्या बंद पडलेल्या गंभीर प्रकृतीच्या संकेतस्थळाची आठवण झाली. खुप चांगले लेखन व्हायचे तिथे.

अन्नू's picture

1 Mar 2016 - 2:15 am | अन्नू

उपक्रम बंद झालं???
तर्रीच म्हटलं, आजकाल त्येचं नावगाव आमचं गुगलु दाखवत का नाही! :(

डुप्लिकेट आयडी तिथे पडीक असतात
ते अगदीच पकाऊ असतात

+१००० सहमत

मुक्त विहारि's picture

1 Mar 2016 - 10:16 am | मुक्त विहारि

माबोवर त्या एका कारणासाठीच जात नाही....

भरत्_पलुसकर's picture

1 Mar 2016 - 1:18 pm | भरत्_पलुसकर

तोफ हाहात हो! कायतरी तर सोडत जावा तुमच्या विडंबन गाळनीतंन.

बोका-ए-आझम's picture

1 Mar 2016 - 1:39 pm | बोका-ए-आझम

पेटलेल्या आहेत असे एक नम्र निरीक्षण आहे!

सस्नेह's picture

1 Mar 2016 - 2:30 pm | सस्नेह

'मोकाट सुटलेल्या' आहेत असे म्हणायचे आहे काय ?

बोका-ए-आझम's picture

1 Mar 2016 - 3:03 pm | बोका-ए-आझम

तेंडुलकर, सेहवाग, युवराज वगैरे लोकांबद्दल वापरतो. राजकारण्यांबद्दल नाही!

नीलमोहर's picture

1 Mar 2016 - 4:08 pm | नीलमोहर

पेटलेल्या म्हणा.. मोकाट सुटलेल्या म्हणा..
ठिणगीला हवा घातली की जाळ तर होणारच.. मग ज्वाळा वाढल्या तर जवाबदार कोण ;)

इथे माझे मला झेपेनासे झालेय काय चाललेय, झपाटल्यासारखे होतेय नुसते..

सस्नेह's picture

1 Mar 2016 - 4:57 pm | सस्नेह

मग 'पेटलेल्या' किंवा 'मोकाट सुटलेल्या' पेक्षा 'झपाटलेल्या' म्हणावे का ? =))

तसंही मिपाने झपाटलं आहेच, dual personality ची लक्षणे दिसतायेत असे psychiatrist बंधूराजांचे मत.
आता यावर इलाज शक्य दिसत नाही.

बादवे, अजून एक 'लेखन करा' ची टॅब ओपन आहे, वेट अ‍ॅन्ड वॉच ;)

चला आता आपल्याला "आहे" चा महिमा वाचायला मिळणार आहे.

नीलमोहर's picture

1 Mar 2016 - 6:02 pm | नीलमोहर

लोक असे भरीला पाडतात आणि मग म्हणतात ही नुसती विडंबनं पाडते.
पण खरे सांगायचे तर ते साधेसरळ प्रामाणिक लेखन वाटले मला तरी, त्यात विडंबनास्पद काही जाणवले नाही.

होबासराव's picture

1 Mar 2016 - 6:09 pm | होबासराव

अरे कोणि तरि गडबडा लोळणारी स्मायलि इथे टाकारे :)

रातराणी's picture

4 Mar 2016 - 9:38 pm | रातराणी

नीमो _/\_