ऋण मातीचे..

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
11 Sep 2008 - 8:17 pm

ऋण मातीचे कसे विसरले? कुठे सोडली लाज मुलांनी?
पैशाच्या माजात गोठती श्वास कोवळे कणाकणांनी..

का अब्रुचे धिंडवडे अन् देहाचे बाजार निघावे?
व्यापाराचा बाज निराळा, पाप जोडती मणामणांनी..

चहुबाजूंना कोंदटलेली डबकी-नाल्या-उघडी गटारे,
एक झराही दुर्लभ झाला, घाण पसरते मणामणांनी..

वाट कुणाची बघतो आपण? स्वयंप्रेरणा कुठे निमाली?
मशाल जळावी प्रत्येकाची अज्ञानाच्या कणाकणांनी..

पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी,
घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी..

शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा,
मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी..

मुमुक्षू
[*मान: अभिप्रेत अर्थ - अभिमान]

कवितासमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

11 Sep 2008 - 8:30 pm | प्राजु

अप्रतिम काव्य आहे. हे बे एरियाच्या संमेलनात पाठ्वऊन द्या.

पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी,
घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी..

शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा,
मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी..

हे एकदम अत्युच्च्य!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

11 Sep 2008 - 10:03 pm | सर्किट (not verified)

अप्रतिम काव्य आहे. हे बे एरियाच्या संमेलनात पाठ्वऊन द्या.

असेच म्हणतो.

अधिक माहितीसाठी http://www.misalpav.com/node/2901

-- सर्किट

विसोबा खेचर's picture

12 Sep 2008 - 7:24 am | विसोबा खेचर

मुमुक्षूराव,

सुंदर कविता..!

पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी,

ही ओळ खासच!

तात्या.

मदनबाण's picture

12 Sep 2008 - 7:43 am | मदनबाण

मस्त कविता..

वाट कुणाची बघतो आपण? स्वयंप्रेरणा कुठे निमाली?
मशाल जळावी प्रत्येकाची अज्ञानाच्या कणाकणांनी..
हे फार आवडल..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

सहज's picture

12 Sep 2008 - 8:27 am | सहज

अतिशय आवडली.

अभिमन्यु's picture

12 Sep 2008 - 9:15 am | अभिमन्यु

अतिशय मार्मिक कविता आहे प्रत्येक शब्द मनाला लागतो

राघव's picture

12 Sep 2008 - 12:48 pm | राघव

सगळ्यांचे मनापासून आभार. :)

मुमुक्षू

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Sep 2008 - 3:53 pm | llपुण्याचे पेशवेll

शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा,
मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी..
या ओळी खास.
पुण्याचे पेशवे

ऋषिकेश's picture

12 Sep 2008 - 4:07 pm | ऋषिकेश

झकास! लय ब्येस!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

पद्मश्री चित्रे's picture

12 Sep 2008 - 4:25 pm | पद्मश्री चित्रे

>>पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी,
घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी..
विशेष आवडले...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2008 - 4:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख कविता.

वारकरि रशियात's picture

12 Sep 2008 - 4:32 pm | वारकरि रशियात

बद्ध (ते ) मुक्त
अप्रतिम !

राघव's picture

12 Sep 2008 - 7:44 pm | राघव

प्रतिसाद दिलेल्या व न देऊ शकलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार! :)

मुमुक्षू