दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग १

अजया's picture
अजया in जनातलं, मनातलं
6 Dec 2015 - 12:42 am

गेली सतरा वर्षे मी डेंटिस्ट्रीची प्रॅक्टिस करत आहे. दर दिवशी घडणारे काही सवाल जवाब मात्र तेच आहेत! ते म्हणजे बापरे! एवढा खर्च? बापरे, दात काढावा लागणार? रूट कॅनाल फार दुखते का हो? सगळे दात खराब झाले, आता काहीतरी कराच!

लवकर का आला नाहीत वर तर कायम एकच उत्तर असतं, दात दुखत नव्हता! पण किडताना दिसत होता ना! यावर सगळे निरुत्तर असतात. याहून वाईट गत लहान मुलांची करून आणतात लोक. दुधाचे दात यावर प्रचंड गैरसमज असल्याने ते अगदी तिसर्‍या वर्षापासून किडले तरी पडणार म्हणून मुलांची ट्रीटमेंट न करता तसेच राहू देणारे लोक असतात. तेही पोराची दाढ सुजून आली की डेंटिस्ट गाठतात तोवर नाही. या सर्व मोठा त्रास करून डॉक्टरकडे जाण्याने दुखणे आणि खर्च आपला वाढतो हे बर्‍याचदा अगदी सुशिक्षित लोकांच्याही ध्यानात येत नाही.

दाताच्या अनारोग्याचा नुसताच चावण्यावर परिणाम होत नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो. एकाच वेळी अनेक दात किडके असले तर चावण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. चावता न आलेले अन्न नीटसे पचत नाही, त्यामुळे कुपोषण होत राहते. मुलं खूप हळू खाऊ लागतात किंवा खाणे टाळतात. तोडून खाण्याचे पदार्थ, फळं तर ते खाऊच शकत नाहीत. यातून शरीरात निरनिराळ्या जीवनसत्त्वांच्या कमतरता निर्माण होतात. किडून तुटून धारदार झालेले दात हे गाल, जिभेच्या कॅन्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. हिरड्या आणि दातावर साठणारे किटण हे हृदय किडनीच्या काही विकारांसाठी जंतू पुरवत असते.

तरीही लोक अगदी दात दुखे पर्यंत डॉक्टरकडे जाणे टाळतात. कारणं मुख्यतः भीती, खर्च, दुर्लक्ष, अनास्था, अज्ञान!
दाताचे जन्मजात असे फारच कमी आजार आहेत. मुख्यत्वे जे त्रास असतात ते चुकीचे ब्रशिंग, वेळेवर लक्ष न देणे यामुळे उद्भवलेले असतात.या लेखमालिकेचा उद्देशच त्यामुळे प्रतिबंधात्मक उपचार हा आहे. 'अ स्टिच इन टाइम सेव्ज नाईन' म्हणतात, ते दंत आरोग्याबाबत शब्दशः खरे आहे. ते कसे हे जाणून घेणे, विविध प्रतिबंधात्मक उपचार आणि निरनिराळ्या वयात दाताची काळजी कशी घ्यायची हे थोडक्यात सांगायचा हा प्रयत्न आहे.

दात येण्याची सुरुवात गर्भावस्थेतच होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपचारांची सुरुवात प्रेग्नंसीपासूनच सुरू होते.म्हणूनच प्रथम प्रेग्नंसीमध्ये स्वतःच्या दाताचे आरोग्य कसे सांभाळावे हे बघूया. कारण आईच्या तोंडात जर मोठ्या प्रमाणात खराब मुख आरोग्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव असेल तर बाळाला आपोआपच ते वारसाहक्काने मिळतात! त्यामुळेच वेळीच काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रेग्नंसी लक्षात आल्यावर डेंटिस्टकडे एक रूटीन चेक अप जरूर करून घ्यावे. कारण त्यामुळे किडलेले दात वेळीच लक्षात येतात. त्यांना भरणे सुरुवातीच्या अवस्थेत असल्यास सोपे, कमी खर्चाचे आणि टिकाऊ होते. या काळात किडलेल्या दाताकडे दुर्लक्ष करून थेट सातव्या आठव्या महिन्यात गाल धरून सुजून येणार्‍या महिला बर्‍याचदा पाहण्यात येतात. सातव्या महिन्यापुढे दुखण्याच्या गोळ्या फारशा देऊन चालत नाही. दात काढायची वेळ आल्यास जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते आणि रूट कॅनालचे उपचार एक्सरेविना अंदाजाने करावे लागतात. हे सर्वच वेळेवर केलेल्या तपासणीमुळे टाळता येते.

या तपासणीच्या वेळीच दात साफ जरूर करून घ्यावे. याचे एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे प्रेग्नंसी मध्ये होणारे हिरड्यांचे इन्फेक्शन. दातावर मोठ्या प्रमाणात किटण असल्यास या काळातल्या हार्मोन बदलांमुळे हिरडी सुजून येते, हिरडीतून रक्त येणे, दात हलायला लागणे असे त्रास सुरू होऊ शकतात. हे सर्व फक्त दात साफ करून घेऊन आपण टाळू शकतो!

  • प्रेग्नंसीमध्ये शरीराची कॅल्शियमची गरज वाढलेली असते. त्यासाठी गोळ्या दिलेल्या असतात, त्या नियमित घेणे जरूरी आहे.अन्यथा कॅल्शियमच्या कमतरतेने दात ठिसूळ होऊ लागतात.
  • अनेक स्त्रियांना प्रेग्नंसीमध्ये सकाळी उलट्या होणे(मॉर्निंग सिकनेस) चा त्रास होतो. अशावेळी खळखळून चूळ भरून दातांवर आलेले आम्ल दूर करणे जरूरी आहे.तसेच पेस्टच्या वासाने उलटी होत असल्यास पेस्ट बदलावी पण दात घासणे बंद करू नये.
  • खावेसे वाटते म्हणून अती गोड पदार्थ खाऊ नयेत.
  • खाण्यात वेगवेगळ्या प्रकारची फळं, दही, दूध, चीज जरूर असावे. हे सर्व बाळाच्या दात, हिरड्या यांच्या वाढीसाठी आवश्यक पदार्थ आहेत.
  • प्रेग्नंसीच्या सुरुवातीलाच चेक अप झाल्याने काही आवश्यक ट्रीटमेंट असतील तर त्या साधारण चौथ्या ते सहाव्या महिन्यात करता येतात.
  • प्रेग्नंसीमध्ये दाताच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊन अचानक कराव्या लागणार्‍या दातांच्या ट्रीटमेंट आपण नक्कीच टाळू शकतो.

प्रेग्नंसी सुखरूप पार पडून बाळ घरी येतं आणि लहान बाळाच्या दंत आरोग्याबाबत काळजी घेणे हा नवा अध्याय सुरू होतो!
साधारण सहाव्या महिन्यापासून अडीच वर्षापर्यंत बाळाला वेगवेगळे दात येऊ लागतात. हा कालावधी कमी जास्त असू शकतो. या काळात पालकांकडून एक अत्यंत महत्त्वाची चूक होताना आढळते ती म्हणजे अजून दात येत आहेत, बाळ लहान आहे, या कारणांनी बाळाचे दात स्वच्छच करत नाहीत! तसंच बर्‍याचदा बाळ बाटलीचे दूध पिऊन किंवा आईने पाजल्यावर झोपी जाते. हे दूध बाळाच्या तोंडात शिल्लक असते. त्यावर बॅक्टेरीया ताव मरून अ‍ॅसिड तयार करतात. त्यामुळे बाळाचे समोरचे दात किडायला अगदी लहान वयात सुरुवात होते. आपल्याकडे तर हा इतका सर्रास आढळणारा प्रकार आहे की लोकांना ते दात पडणार म्हणून असे होतात असेही वाटते!
मग आईचा प्रश्न असतो इतक्या लहान बाळाचे दात मी कसे घासू?

यासाठी केमिस्टकडून एक गॉझचे बंडल विकत आणावे. त्याचे छोटे तुकडे करून ठेवावे. बाळाला पाजले की आपल्या बोटाला ओली गॉझ गुंडाळून दात हलक्या हाताने पुसून घ्यावे. इतका सोपा उपाय!. साधारण पाचपेक्षा जास्त दात आले की बेबी ब्रश आणावा. मुगाच्या डाळीच्या एवढी पेस्ट (साधी कमी फ्लोराईड, साधारण 1000ppm असणारी) दातांवर आपण बोटाने पसरावी. मग हलक्या हाताने ब्रश गोल गोल फिरवून ब्रश करावे. रोज दोन वेळा ब्रशिंग या वयापासूनच सुरू करावे. बाळ करू देत नसल्यास त्याला गुंतवण्यासाठी हातात काहीतरी देऊन ब्रश करावे.

  • बाळाला ज्यूस पॅकमधले फळांचे रस अजिबात देऊ नयेत.दात हमखास किडवणारे असतात हे नुसतेच साखर आणि आम्ल असणारे खोटे फळांचे रस. त्या ऐवजी बाळाला शिजवेलेले सफरचंद, कुस्करलेली केळी असे हळूहळू खाऊ घालावे.
  • दात किडत आहेत असे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. कारण याच दातांनी बाळाला पुढे तेरा वर्ष खायचं आहे!
  • दात येण्याच्या काळात बाळाच्या हिरड्या शिवशिवत असतात. त्यामुळे बाळ जे हाताला लागेल ते तोंडात घालू लागते, त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन बाळ हमखास या काळात आजारी पडते. योग्य काळजी घेतल्यास हे आजारपण टाळता येते. दात येत असल्यामुळे बाळ आजारी पडत नाही. ते काय तोंडात घालते आहे याकडे लक्ष दिल्यास हा त्रास उद्भवू नये.
  • तसंच बाळाच्या मनगटाला पूर्वी खारीक बांधत असत. तो उपाय मला अजूनही टीथर वापरण्यापेक्षा आवडतो. प्लॅस्टिकचा टीथर अचानक फुटून त्यातला मऊ द्रव बाळाच्या तोंडात जाण्याची शक्यता असते. तसंच कोणते घातक रंग वापरले आहेत याची आपल्याला माहिती नसते. त्यापेक्षा बाळ नजरेसमोर असेल तेव्हा खारीक बांधून दिलेली केव्हाही सुरक्षित उपाय. अर्थात त्यावरही लक्ष हवेच.

अशा प्रकारे बाळाची काळजी घेतल्यास अगदी लहान मुलांचे दात किडून त्यांचे होणारे हाल आपण टाळू शकतो.
आता पुढच्या भागात मोठ्या मुलांच्या दातांकडे लक्ष देऊ!

हे ठिकाणमाहिती

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

6 Dec 2015 - 12:50 am | जव्हेरगंज

धन्यवाद हो अजयाताई, या धाग्याची मी कधीपासून वाट बघतोय. माझ्याही दातांचा जरा प्रॉब्लम झालाय. सविस्तर नंतर. सध्या पोच.
:)

जव्हेरगंज's picture

6 Dec 2015 - 1:00 am | जव्हेरगंज

आता पुर्ण वाचला!
अत्यंत माहीतीपुर्ण लेख!
ऊद्याच डेंटीस्टकडे जाणार!!
बादवे, पुढील भागाच्या प्रतिक्षेत!!!

उगा काहितरीच's picture

6 Dec 2015 - 3:48 am | उगा काहितरीच

चांगली सुरूवात . पुभाप्र .

संजय पाटिल's picture

6 Dec 2015 - 6:32 am | संजय पाटिल

लहान बाळांच्या दातांची पण एव्हढी काळजी घ्यावि लागते हे माहित नव्हतं. माहिती बद्दल धन्यवाद.

नितीनचंद्र's picture

6 Dec 2015 - 6:38 am | नितीनचंद्र

डॉक्टर साहेब,

माझे वय ५० आहे. माझ्या हिरड्या मागे सरकुन फटी वाढत आहेत. यात अन्न कण अडकुन त्रास होतोच पण दातांच आयुष्यमान कमी होत एक दिवस ते पडतील अशि भिती आहे.

यावर उपाय म्हणुन फ्लॅप सर्जरी असे ऐकले होते. या फ्लॅप सर्जरीला काही पर्याय आहे का?

धन्यवाद !

अजया's picture

6 Dec 2015 - 9:12 am | अजया

तुम्ही ऐकले आहे की डेन्टिस्टने सांगितले आहे? कारण फ्लॅप सर्जरी लागेल किंवा नाही हे एक्स रे आणि तुमच्या तोंडातली स्थिती ,तुम्ही सर्जरीनंतर दात हिरड्या कसे मेंटेन करु शकाल यावर ठरते.
दरम्यान तुम्ही डेन्टिस्टकडे जाऊन सर्व दातांची सफाई,हिरड्यांची सफाई करुन घेणे,मेडिकेटेड माऊथवाॅश,सेन्सिटिव्हिटीच्या टूथपेस्ट आणि अगदी मऊ ब्रशचा दात घासण्यासाठी वापर हे करुन घेणे आवश्यक आहे.तसंच दातांच्या फटीच्या साईझप्रमाणे ब्रश ,फ्लाॅस इ वापर सुरु करावा.
कारणावर मात करुन मगच सर्जिकल आॅप्शन्सचा स्विकार व्हावा. अन्यथा फ्लॅप सर्जरीचा काही उपयोग होणार नाही.

मितान's picture

6 Dec 2015 - 6:38 am | मितान

धन्यवाद अजया !
दातांच्या आरोग्याविषयी आपल्याकडे खर्म्च खूप उदासीनता आहे.
तुझ्या या लेखमालेमुळे सोप्या भाषेत चांगली माहिती मिळेल.
पुभाप्र..

दमामि's picture

6 Dec 2015 - 7:30 am | दमामि

+111
या लेखाची गरज होती.

पीके's picture

6 Dec 2015 - 6:44 am | पीके

छान माहितीपुर्ण लेख.

कवितानागेश's picture

6 Dec 2015 - 8:03 am | कवितानागेश

चांगली सुरुवात. :)

पगला गजोधर's picture

6 Dec 2015 - 8:20 am | पगला गजोधर

या कम्युनिटी डेंटिस्ट्री सेवेबद्दल आपले आभार.

विभावरी's picture

6 Dec 2015 - 8:44 am | विभावरी

उत्तम माहितीपूर्ण लेख !

विभावरी's picture

6 Dec 2015 - 8:44 am | विभावरी

उत्तम माहितीपूर्ण लेख !

राजेश घासकडवी's picture

6 Dec 2015 - 10:29 am | राजेश घासकडवी

शीर्षक वाचून 'दंतकथा बळावू नयेत यासाठी काय करावं' असं काहीतरी वाटलं होतं, म्हणून गोंधळून गेलो होतो. पण त्या निमित्ताने का होईना माहितीपूर्ण लेख वाचायला मिळाला. मी लहान असताना वेळेत डेंटिस्टकडे गेलो नाही, त्याचा पुढे त्रास झाला. त्यामुळे मुलाच्या दातांची अगदी लहानपणापासून काळजी घेतो आणि डेंटिस्टकडे नियमितपणे नेतो.

अजयाकाकु माहीतीपुर्ण लेखमाला सुरु केल्याबद्दल धन्यवाद, तेवढा तुमच्या दवाखाण्याचा पत्ता द्या की

पुतण्या तू कुठे राहतोस सांग.तुला योग्य त्या ठिकाणी पोहचवले जाईल! !

टवाळ कार्टा's picture

6 Dec 2015 - 12:00 pm | टवाळ कार्टा

काय हे...काकू म्हणाला म्हणून डैरेक्ट पोचवण्याची धम्की =))
बाबूदादा इंस्युरंस काढून ठेव रे ;)

भीमराव's picture

6 Dec 2015 - 6:30 pm | भीमराव

सध्या मुक्काम वल्लभनगर(पिंपरीचिंचवड), मुळचे सातारकर.
@टका, काकु आहेत ना त्या मग जे करतील ते प्रेमानेच करतील ना,
स्मायल्या कशा चिटकवायच्या रे.....

तुमच्या सातारला बेस्ट डेन्टिस्ट आहेत.खरंच गरज असेल तर कळवा.नाव व्यनि करेन.पिंचिचे माहित नाहीत.

अजया's picture

6 Dec 2015 - 10:42 am | अजया

:)

कविता१९७८'s picture

6 Dec 2015 - 10:59 am | कविता१९७८

मस्त धागा, उपयोगी माहीती, खरोखर दाताच्या आरोग्याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो. घ्यायला तर हवी काळजी.

कविता१९७८'s picture

6 Dec 2015 - 11:03 am | कविता१९७८

साधारण सकाळी आणि झोपण्यापुर्वी ब्रश करावा असे सर्व डेंटीस्ट सुचवतात पण कीतीवेळ करावा आणि कशा प्रकारे ब्रश करावा या बद्दल ही माहीती दे.

पुढच्या भागांमध्ये ही माहिती येणार आहे.स्टे ट्युन्ड!

कपिलमुनी's picture

6 Dec 2015 - 11:01 am | कपिलमुनी

+१
( दर ६ महिन्याला दातांचा सर्विसिंग करणारा मुनी )

भुमी's picture

6 Dec 2015 - 11:09 am | भुमी

पुढचा भाग लवकर येऊ देत!

सुचेता's picture

6 Dec 2015 - 8:39 pm | सुचेता

+१

टवाळ कार्टा's picture

6 Dec 2015 - 11:57 am | टवाळ कार्टा

झैरात झैरात =))
थोडक्यात तुम्ची फी भारी आहे ;)

टवाळ कार्टा's picture

6 Dec 2015 - 12:00 pm | टवाळ कार्टा

लेख मात्र एक्दम झ्यॅक :)

मस्त! सगळे डिट्टेल सांगितलंस पुढच्या मोठयांच्या भागाच्या प्रतीक्षेत :)

यशोधरा's picture

6 Dec 2015 - 1:00 pm | यशोधरा

माहितीपूर्ण लेख.धन्यवाद.

+१ असेच म्हणते.अतिशय उपयोगि लेख!

जातवेद's picture

6 Dec 2015 - 1:23 pm | जातवेद

किडून तुटून धारदार झालेले दात हे गाल,जीभेच्या कॅन्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे.

हे कसे होते?
गूगलवून पाहिले पण मुख्य कारणे धुम्रपान, तंबाखू सेवन आणि दारूचे अतिरीक्त सेवन अशीच दिसताहेत सगळीकडे.

तुटून धारदार झालेले दात,तुटलेली फिलिंग्ज,टोचणारी कवळी,कॅप इ मुळे तोंडाच्या मऊ त्वचेला घर्षण होऊन दुखरे चट्टे,तर कधी अल्सर्स तयार होतात.वर्षानुवर्षे जर हे टोचणे असेच चालु राहिले तर या अल्सर्सचे रूपांतर भरुन न येणाऱ्या जखमेत होऊ शकते.अशा अल्सर्सच्या पेशी कालांतराने कँसरमध्ये परिवर्तित होऊ शकतात.म्हणून त्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

विशाखा पाटील's picture

6 Dec 2015 - 1:35 pm | विशाखा पाटील

उत्तम माहितीपूर्ण लेख...

लेख आवडला. खूप नवीन माहिती कळली. नवपालकांनी जरूर वाचावा असा लेख आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

6 Dec 2015 - 2:09 pm | लॉरी टांगटूंगकर

पु.भा. वाट बघिंग

सस्नेह's picture

6 Dec 2015 - 2:29 pm | सस्नेह

बत्तिशीची एवढी काळजी घ्यावी लागते हे ती वाजवताना लक्षात आले नव्हते. इथून पुढे जपून वापरण्यात येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Dec 2015 - 2:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम माहितीपूर्ण लेख.

तज्ञाकडूनच विश्वासू शास्त्रिय माहिती मिळाल्याने अनेक "दंतकथा" रिटायर्ड व्हायला मदत होईल. :)

उत्तम लेखमालीका. धन्यवाद अजया.

तज्ञाकडूनच विश्वासू शास्त्रिय माहिती मिळाल्याने अनेक "दंतकथा" रिटायर्ड व्हायला मदत होईल. :)

..हेच म्हणायचे आहे.

स्वाती दिनेश's picture

6 Dec 2015 - 4:30 pm | स्वाती दिनेश

लेख उत्तम, माहितीपूर्ण. पुभाप्र.
स्वाती

संदीप डांगे's picture

6 Dec 2015 - 5:02 pm | संदीप डांगे

चांगली मालिका... पुढील भागासाठी शुभेच्छा!

एक एकटा एकटाच's picture

6 Dec 2015 - 5:43 pm | एक एकटा एकटाच

लेख आवडला

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

कंजूस's picture

6 Dec 2015 - 6:26 pm | कंजूस

ज्यांचे दात बळकट असतात त्यांचे आरोग्य चांगले असते ( रोग प्रतिकारक शक्ती जास्त ) असे मी समजत होतो.
तसं नसतं.
ज्यांचे आरोग्य चांगले असते ( रोग प्रतिकारक शक्ती जास्त )त्यांचे दात बळकट असतात.असं हत्तींच्या दातावरच्या संशोधनात सिद्ध झालं आहे.
बाकी लेख फार उत्तम आणि गरजुंना उपयुक्त ठरावा.
छोटे व्हिडिओ अथवा स्टेप बाइ स्टेप फोटो उदाहरण म्हणून टाका अथवा इथे खराब दिसू नये म्हणून ब्लॅागची लिंक द्या.

पैसा's picture

6 Dec 2015 - 6:35 pm | पैसा

उत्तम लेख

राही's picture

6 Dec 2015 - 6:39 pm | राही

माहितीपूर्ण लेख. कोणतेही अवडंबर न माजवता लिहिलेला.

जव्हेरगंज's picture

6 Dec 2015 - 9:48 pm | जव्हेरगंज

ओके,
माझं दोन तीन महिन्यांपुर्वी हिरडीचं (खालच्या) रुट कँनॉल झालं आहे. सध्या हिरडीच्या बाजूला एक टेंगुळ आलेलं आहे. बहुदा कडक खाल्ल्यामुळे. pain अजिबात होत नाही. हाताने दाबलं तर थोडसा होतो. काय कारण असावे?
पंधरा दिवसांपासून आलयं, पण डॉक्टरकडे जायचा कंटाळा. आज पण गेलो नाही, बहुतेक उद्या जाईन. केवळ माहीती असावी म्हणून विचारतोय.

दाताची रुट कॅनाल ट्रीटमेंट होते.ती केल्यानंतर असे टेंगूळ जायला हवे.मुळाच्या खाली असणारे इन्फेक्शन आहे ते.दात डेड झाल्याने दुखत नाहीये.पण डेन्टिस्टना जाऊन दाखवाच.कारण रुट कॅनालमध्ये कदाचित इन्फेक्शन राहून गेलंय किंवा सुरू झालंय.दुर्लक्ष केल्यास तिथे भोक पडून पस पाझरायला लागेल.मूळ आणि हाड झिजून पुढे दात हलु शकेल.

प्रीत-मोहर's picture

6 Dec 2015 - 10:59 pm | प्रीत-मोहर

Uttam lekhamalika. Vat pahtey pudhlya bhagachi

खूप मस्त लेखमालिका. उत्तम सुरुवात.
आमच्या पिल्लाला पण ३ दात आलेत. एकदम रिलेट होतोय.
बाकी विषयच असा आहे कि सगळ्यांनाच जवळचा वाटेल.

वाचतिये. खूपच उपयुक्त लेखन.

जेपी's picture

7 Dec 2015 - 8:32 am | जेपी

लेख आवडला..

पुभाप्र

सुबोध खरे's picture

7 Dec 2015 - 9:24 am | सुबोध खरे

अजय ताई
लेख अतिशय उत्कृष्ट आहे.
काही मुद्दे मला लिहावेसे वाटतात ते असे.
१) दुखत नव्हतं म्हणून डॉक्टरकडे आलो नाही हे फारच कॉंमन आहे. स्तनात कर्करोगाची गाठ असणार्या असंख्य बायकांकडून हेच ऐकलं आहे. डॉक्टर ते दुखत नव्हता म्हणून आम्ही काही केलं नाही.
२) दाताबद्दल लोक फारच निष्काळजी आहेत असं दुर्दैवाने म्हणावं लागतं कारण रूट कॅनॉलचा खर्च जास्त आहे म्हणून दात काढून टाका सांगणारे महाभाग पण असंख्य आहेत. त्यांना फक्त एक विचारलं कि तुमच्या पायाच्या सर्वात लहान बोटाला सूज आली तर ते कापून टाकायची तुमची तयारी आहे का ? यात ते मांस ( जिवंत) आहे आणि दात हे निर्जीव आहेत असा गैरसमज आहे. प्रत्यक्षात पायाचे एक बोट कापले तर त्याचा माणसाला कार्यक्षमतेत काहीच फरक पडत नाही पण पहिली दाढ( first molar) काढली तर जबड्याची एक बाजू चावण्याच्या बाबतीती जवळ जवळ निकामी होते. पण लक्षात कोण घेतो?
३) -प्रेग्नंसी लक्षात आल्यावर डेंटीस्टकडे एक रुटीन चेक अप जरूर करून घ्यावे. मी तर या पुढे जाऊन असे म्हणेन ज्या जोडप्याची मुल होऊ देण्याची मानसीक तयारी झाली असेल त्यांनी गरोदर होण्यापूर्वीच दातांच्या डॉक्टरकडे जाऊन पूर्ण दातांची प्रतिबंधात्मक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण एकदा गरोदर झाली कि पहिले तीन महिने बरीच औषधे गर्भावर परिणाम करण्याची शक्यता असते तेंव्हा गरोदरपणात काही करण्याऐवजी ते अगोदरच करून घ्यावे.
४)टीथर वापरण्यापेक्षा एक गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून( सालीत असणार्या भेगात माती असते म्हणून) मुलाच्या हातात चावण्यासाठी द्यावे. हे मुलाला हातात नीट धरताही येते. मुलाने चावून रस गिळला तरी उत्तम. तसेच ते मऊ असल्याने मुलांच्या हिरड्यांना इजा होण्याची सुद्धा शक्यता नसते.

अजया's picture

7 Dec 2015 - 9:48 am | अजया

मुद्दा नं २ वर फ्रस्ट्रेशन येतं अशी स्थिती आहे!
नं ४ बद्दल,गाजर लहानसे असावे.ते आईचे लक्ष नसताना पार घशापर्यंत कोंबणारे मूल एकदा पाहिले आहे!

सुबोध खरे's picture

7 Dec 2015 - 10:11 am | सुबोध खरे

मी उलटं म्हणेन गाजर थोडं मोठं असावं. कारण लहान गाजर पार घशात जाऊन मुल घुसमटू शकतं.
"मुद्दा नं २ वर फ्रस्ट्रेशन येतं अशी स्थिती आहे!" तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन काही करू शकत नाही. आपले डोके पिकवून आणि मग तो राग आपल्या मुला/ नवर्या वर काढण्यात काही हशील नाही.
ओव्हरीचा कर्करोग आहे सांगूनही एकाने बायकोवर बात्राच्या होमियोपथी चा उपाय केला आणि नंतर पोटात पाणी होऊन बायको मरायला टेकल्यावर मलाच दोष देत होते कि तुमही आम्हाला वेळेत सांगितले नाही. मी त्यांना दिलेल्या रिपोर्ट वर लिहिलेले दाखवले. काही केले तरीही चूक डॉक्टरचीच असते. एकदा हे कुठेतरी प्रतिसादात लिहिले आहे.
गर्भाशय अंगाच्या पूर्ण बाहेर येत असूनही काहीही न करणाऱ्या किती तरी स्त्रिया मी पाहतो.
स्तनाचा कर्करोग पूर्ण पसरून काखेत गाठी झाल्यावर हात दुखायला लागल्यावर येणाऱ्या स्त्रिया पाहून तुम्ही काय कराल?
काय करणार? कर्मावर आपला अधिकार आहे. फळावर नाही. हे भगवदगीतेत सांगितलेले आहेच.

संदीप डांगे's picture

8 Dec 2015 - 5:41 am | संदीप डांगे

चांगला प्रतिसाद आणि अनुभव.

स्मिता.'s picture

7 Dec 2015 - 10:28 am | स्मिता.

अजयाताई, खूपच सुंदर लेख आहे. पुढच्या लेखांवर नजर ठेवून आहे.

स्नेहल महेश's picture

7 Dec 2015 - 11:08 am | स्नेहल महेश

छान माहितीपुर्ण लेख.

नाखु's picture

7 Dec 2015 - 2:06 pm | नाखु

आणि उपयुक्तही...

जालावर जरी खायचे आणि दाखवायचे वेग्वेगळे असले तरी..

खर्या दातांची निगा राखणे गरजेचे आहे.

दात्सफाई समस्या बालकांचा अडाणी पालक नाखु

पिलीयन रायडर's picture

7 Dec 2015 - 2:20 pm | पिलीयन रायडर

Mast Survat!!! Pudhache bhag yeu det lavkar!

नीलमोहर's picture

7 Dec 2015 - 2:31 pm | नीलमोहर

धन्यवाद,
पुभाप्र.

धन्यवाद, माझी एक दाढ काढायची आहे. जानेवारीत तो उद्योग उरकून घ्यायचा विचार आहे, दुखत नाही पण कीडलीये आणि नेमकी अक्कलदाढ आहे. =))

अजयाताई, मेल पाठवला आहे. चेक करशील का?

एस's picture

8 Dec 2015 - 4:13 pm | एस

वाखुसाआ!

एस's picture

8 Dec 2015 - 4:14 pm | एस

वाखुसाआ!

भिंगरी's picture

9 Dec 2015 - 2:28 am | भिंगरी

अजया
माहितीपूर्ण लेखमाला चालू केल्याबद्दल धन्यवाद.

श्रीरंग_जोशी's picture

9 Dec 2015 - 3:32 am | श्रीरंग_जोशी

अत्यंत उपयुक्त माहिती व मार्गदर्शन. या लेखमालिकेसाठी धन्यवाद.

पुभाप्र.

अक्षया's picture

9 Dec 2015 - 4:03 pm | अक्षया

माहितीपूर्ण लेखमाला

भिंगरी's picture

11 Dec 2015 - 12:36 pm | भिंगरी

अजया,
माझ्या नातीचा ११व्या महिन्यात खालचा दात दिसू लागला,पण बाहेर पडण्यास १ महिना लागला.दरम्यान वरचे ५ दात एकदम आले.मग खालचा दात बाहेर आला पण तो तिरका होता. आता त्याच्या बाजूला दुसराही दात येत आहे.त्यामुळे आधीचा दात सरळ झाला आहे.पण आता ती दात एकमेकांवर जोरजोरात घासते. अगदी कडकड आवाज येतो. हेही लक्षण हिरड्या सळसळण्याचे आहे का?`त्यावर उपाय काय?

नव्याने दात आलेत ना त्यामुळे बाळ बर्याचदा असे दात घासुन आवाज करते.तिला आता चावायच्या वस्तू द्यायला लाग ताई.गाजर,टोस्ट अशा.सळसळ कमी होत जाईल आपोआप.

भिंगरी's picture

11 Dec 2015 - 10:07 pm | भिंगरी

धन्यवाद !अजया

नूतन सावंत's picture

11 Dec 2015 - 3:34 pm | नूतन सावंत

आज्या, अभ्यासपूर्ण लेख.म्हणजे वाचकांनी पूर्ण अब्यासाव्याचा लेख आहे.पु.भा.प्र.

नूतन सावंत's picture

11 Dec 2015 - 3:34 pm | नूतन सावंत

अजया असे वाच हो.

भडकमकर मास्तर's picture

13 Dec 2015 - 8:25 pm | भडकमकर मास्तर

छान लेख ...

दिपक.कुवेत's picture

14 Dec 2015 - 2:28 pm | दिपक.कुवेत

आता रुटीन चेकअप नक्किच केल्या जाईल. खुपच उपयुक्त माहिती आहे.

खटपट्या's picture

15 Dec 2015 - 1:05 pm | खटपट्या

खूप छान मालीका.
काकांच्या घरात दोन बाळे येणार आहेत. त्यामुळे अगदी वेळेवर आलाय धागा...

अप्पा जोगळेकर's picture

15 Dec 2015 - 3:00 pm | अप्पा जोगळेकर

नमस्कार अजयाताई,
फार उपयोगी लेखमालिका आहे.
काही प्रश्न -
१) माझे वय ३१ असून आजवर एकही दात किडलेला नाही. मी गेली अनेक वर्षे सकाळ संध्याकाळ दात घासतो. तरीही १५ दिवसांपूर्वी सर्वात शेवटच्या दाताचा छोटासा तुकडा पडला. तो किंचित काळसर होता. असे का व्हावे हे समजत नाही.
हे झाल्यापासून मी रात्रीचे दात घासणे बंद करून त्याऐवजी तुर्टीच्या पाण्याने चुळा भरणे सुरू केले. हे बरोबर आहे का ?
२) माझी तब्येत ठणठणीत असते पण माझे दात मजबूत नाहीत. मला उस दातांनी कचाकच तोडून खाता येत नाही किंवा बिअरचे झाकण दातांनी उचकटता येत नाही. कैरी खाल्ल्यावर दात चटकन आंबतात. सगळ्यात पुढचे २ दात आपोआप झिजले. लिंबू जास्त खाल्ल्याने ते झिजले असे डेंटिस्टने सांगितले. माझ्या जेवणात दूध, ताक यांचा पुरेपूर अंतर्भाव आहे.
३) पुढची ४० वर्षे एकही दात किडू किंवा पडू नये यासाठी काय करावे लागेल ?
४) माझ्या दातांचा नैसर्गिक दुबळेपणा माझ्या मुलीकडे गेला असल्यास (ती ३ महिन्यांची आहे) काय करावे ?
कृपया मार्गदर्शन करा.

तुमच्या पहिल्या प्रश्नाबद्दल मी पुढे लिहिणारच आहे .इथे थोडक्यात सांगते.
बर्याचदा आपण किती वेळा ब्रश करतो यावर आपली ओरल हेल्थ आजमावली जाते! तसे करु नका.आपण ब्रश किती वेळा करतो त्याहून महत्त्वाचे तो कसा करतो हे असते.यामध्ये अनेक घटक येतात.
काही शेवटचे दात ब्रश जाऊ शकत नाही अशा अवघड ठिकाणी असणे.मग ब्रशिंगचा उपयोग होणार नाही.
ब्रश मोठा वापरणे हे एक अगदी नेहमी आढळणारे कारण.ब्रशचा ब्रिसलयुक्त भाग हा फार तर दोन दात कव्हर करेल इतकाच असावा.त्याला पुढे प्लॅस्टिकचे मोठे एक्स्टेन्शन नको.त्यामुळे काय होतं,हे प्लॅस्टिक पुढे जाते.ब्रिसल्स नाही.आपल्याला ब्रश केल्यासारखे वाटते.पण ब्रशिंग होत नाही.मग तिथे अन्नकण साठणे ,सडणे ,किडणे,दात कमकुवत होऊन एक दिवस तुकडा पडणे हे होते.यासाठीच नेहमी ब्रशिंग डेन्टिस्ट कडून समजावून घ्यावे.ज्युनियर ब्रश वापरलेला पण चालेल.पतंजलीच्या दुकानात एक अगदी दहा रुपयाचा छोटासा ब्रश मिळतो.तोही चांगला आहे.डेन्टिस्टकडे जाऊन दात भरुन जरुर घ्या.
जसे नुसत्या पाण्याने भांडी घासता येत नाहीत तसेच नुसत्या चुळांनी दात घासता येत नाही.दातावरचा प्लाक झाडून काढावा लागतो.
२ दात झिजण्याचे कारण अती जोरात हाॅरिझाॅन्टल ब्रशिंग ,सतत आंबट पदार्थ खाणे, अॅसिडिटी,रिफ्लक्सने होणारी अॅसिडिटी अशी बरीच असू शकतात.तसेच दात गर्भावस्थेमध्ये तयार होत असतात.या काळात माता कुपोषित असल्यास ,कॅल्शिअम ,डि ३ कमतरता असल्यास मुलांचे दात कमकुवत असू शकतात.
३. डेन्टिस्ट कडून तुमच्या दंतरचनेप्रमाणे ब्रशिंग समजावून घ्या.
दोन वेळा ब्रशिंग जरुर करा.शुगर फ्रि च्युइंग गम वापरा.किडलेले दात वेळीच भरा.नियमित दाताचे स्केलिंग करुन घ्या.सेन्सिटिव्हिटी पेस्ट डेन्टिस्टच्या सल्ल्याने सुरू करा.आणि बंद करु नका.
४.मुलीचे दात आल्या आल्या वर दिल्याप्रमाणे साफ करणे,पाच सहा दात आले की बेबी ब्रशने दोन्ही वेळा घासणे,तिला रात्री दूध पाजून झोपवत असल्यास दात साफ करुन थोडेसे पाणी देणे,कॅल्शिअम ,डि३ बद्दल बालरोगतज्ञाचा सल्ला घेऊन सुरु ठेवणे.
मोठी झाल्यावरसाठी या मालिकेचा भाग २ वाचणे :)

कौशिकी०२५'s picture

16 Dec 2015 - 12:42 pm | कौशिकी०२५

अजयाताई, उपयुक्त लेख..
पुभाप्र...वाट बघत आहे.