दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग १
गेली सतरा वर्षे मी डेंटिस्ट्रीची प्रॅक्टिस करत आहे. दर दिवशी घडणारे काही सवाल जवाब मात्र तेच आहेत! ते म्हणजे बापरे! एवढा खर्च? बापरे, दात काढावा लागणार? रूट कॅनाल फार दुखते का हो? सगळे दात खराब झाले, आता काहीतरी कराच!
लवकर का आला नाहीत वर तर कायम एकच उत्तर असतं, दात दुखत नव्हता! पण किडताना दिसत होता ना! यावर सगळे निरुत्तर असतात. याहून वाईट गत लहान मुलांची करून आणतात लोक. दुधाचे दात यावर प्रचंड गैरसमज असल्याने ते अगदी तिसर्या वर्षापासून किडले तरी पडणार म्हणून मुलांची ट्रीटमेंट न करता तसेच राहू देणारे लोक असतात. तेही पोराची दाढ सुजून आली की डेंटिस्ट गाठतात तोवर नाही. या सर्व मोठा त्रास करून डॉक्टरकडे जाण्याने दुखणे आणि खर्च आपला वाढतो हे बर्याचदा अगदी सुशिक्षित लोकांच्याही ध्यानात येत नाही.
दाताच्या अनारोग्याचा नुसताच चावण्यावर परिणाम होत नाही तर आपल्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो. एकाच वेळी अनेक दात किडके असले तर चावण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. चावता न आलेले अन्न नीटसे पचत नाही, त्यामुळे कुपोषण होत राहते. मुलं खूप हळू खाऊ लागतात किंवा खाणे टाळतात. तोडून खाण्याचे पदार्थ, फळं तर ते खाऊच शकत नाहीत. यातून शरीरात निरनिराळ्या जीवनसत्त्वांच्या कमतरता निर्माण होतात. किडून तुटून धारदार झालेले दात हे गाल, जिभेच्या कॅन्सरचे एक महत्त्वाचे कारण आहे. हिरड्या आणि दातावर साठणारे किटण हे हृदय किडनीच्या काही विकारांसाठी जंतू पुरवत असते.
तरीही लोक अगदी दात दुखे पर्यंत डॉक्टरकडे जाणे टाळतात. कारणं मुख्यतः भीती, खर्च, दुर्लक्ष, अनास्था, अज्ञान!
दाताचे जन्मजात असे फारच कमी आजार आहेत. मुख्यत्वे जे त्रास असतात ते चुकीचे ब्रशिंग, वेळेवर लक्ष न देणे यामुळे उद्भवलेले असतात.या लेखमालिकेचा उद्देशच त्यामुळे प्रतिबंधात्मक उपचार हा आहे. 'अ स्टिच इन टाइम सेव्ज नाईन' म्हणतात, ते दंत आरोग्याबाबत शब्दशः खरे आहे. ते कसे हे जाणून घेणे, विविध प्रतिबंधात्मक उपचार आणि निरनिराळ्या वयात दाताची काळजी कशी घ्यायची हे थोडक्यात सांगायचा हा प्रयत्न आहे.
दात येण्याची सुरुवात गर्भावस्थेतच होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपचारांची सुरुवात प्रेग्नंसीपासूनच सुरू होते.म्हणूनच प्रथम प्रेग्नंसीमध्ये स्वतःच्या दाताचे आरोग्य कसे सांभाळावे हे बघूया. कारण आईच्या तोंडात जर मोठ्या प्रमाणात खराब मुख आरोग्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव असेल तर बाळाला आपोआपच ते वारसाहक्काने मिळतात! त्यामुळेच वेळीच काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रेग्नंसी लक्षात आल्यावर डेंटिस्टकडे एक रूटीन चेक अप जरूर करून घ्यावे. कारण त्यामुळे किडलेले दात वेळीच लक्षात येतात. त्यांना भरणे सुरुवातीच्या अवस्थेत असल्यास सोपे, कमी खर्चाचे आणि टिकाऊ होते. या काळात किडलेल्या दाताकडे दुर्लक्ष करून थेट सातव्या आठव्या महिन्यात गाल धरून सुजून येणार्या महिला बर्याचदा पाहण्यात येतात. सातव्या महिन्यापुढे दुखण्याच्या गोळ्या फारशा देऊन चालत नाही. दात काढायची वेळ आल्यास जास्त रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते आणि रूट कॅनालचे उपचार एक्सरेविना अंदाजाने करावे लागतात. हे सर्वच वेळेवर केलेल्या तपासणीमुळे टाळता येते.
या तपासणीच्या वेळीच दात साफ जरूर करून घ्यावे. याचे एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे प्रेग्नंसी मध्ये होणारे हिरड्यांचे इन्फेक्शन. दातावर मोठ्या प्रमाणात किटण असल्यास या काळातल्या हार्मोन बदलांमुळे हिरडी सुजून येते, हिरडीतून रक्त येणे, दात हलायला लागणे असे त्रास सुरू होऊ शकतात. हे सर्व फक्त दात साफ करून घेऊन आपण टाळू शकतो!
- प्रेग्नंसीमध्ये शरीराची कॅल्शियमची गरज वाढलेली असते. त्यासाठी गोळ्या दिलेल्या असतात, त्या नियमित घेणे जरूरी आहे.अन्यथा कॅल्शियमच्या कमतरतेने दात ठिसूळ होऊ लागतात.
- अनेक स्त्रियांना प्रेग्नंसीमध्ये सकाळी उलट्या होणे(मॉर्निंग सिकनेस) चा त्रास होतो. अशावेळी खळखळून चूळ भरून दातांवर आलेले आम्ल दूर करणे जरूरी आहे.तसेच पेस्टच्या वासाने उलटी होत असल्यास पेस्ट बदलावी पण दात घासणे बंद करू नये.
- खावेसे वाटते म्हणून अती गोड पदार्थ खाऊ नयेत.
- खाण्यात वेगवेगळ्या प्रकारची फळं, दही, दूध, चीज जरूर असावे. हे सर्व बाळाच्या दात, हिरड्या यांच्या वाढीसाठी आवश्यक पदार्थ आहेत.
- प्रेग्नंसीच्या सुरुवातीलाच चेक अप झाल्याने काही आवश्यक ट्रीटमेंट असतील तर त्या साधारण चौथ्या ते सहाव्या महिन्यात करता येतात.
- प्रेग्नंसीमध्ये दाताच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊन अचानक कराव्या लागणार्या दातांच्या ट्रीटमेंट आपण नक्कीच टाळू शकतो.
- बाळाला ज्यूस पॅकमधले फळांचे रस अजिबात देऊ नयेत.दात हमखास किडवणारे असतात हे नुसतेच साखर आणि आम्ल असणारे खोटे फळांचे रस. त्या ऐवजी बाळाला शिजवेलेले सफरचंद, कुस्करलेली केळी असे हळूहळू खाऊ घालावे.
- दात किडत आहेत असे दिसल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. कारण याच दातांनी बाळाला पुढे तेरा वर्ष खायचं आहे!
- दात येण्याच्या काळात बाळाच्या हिरड्या शिवशिवत असतात. त्यामुळे बाळ जे हाताला लागेल ते तोंडात घालू लागते, त्यामुळे जंतूसंसर्ग होऊन बाळ हमखास या काळात आजारी पडते. योग्य काळजी घेतल्यास हे आजारपण टाळता येते. दात येत असल्यामुळे बाळ आजारी पडत नाही. ते काय तोंडात घालते आहे याकडे लक्ष दिल्यास हा त्रास उद्भवू नये.
- तसंच बाळाच्या मनगटाला पूर्वी खारीक बांधत असत. तो उपाय मला अजूनही टीथर वापरण्यापेक्षा आवडतो. प्लॅस्टिकचा टीथर अचानक फुटून त्यातला मऊ द्रव बाळाच्या तोंडात जाण्याची शक्यता असते. तसंच कोणते घातक रंग वापरले आहेत याची आपल्याला माहिती नसते. त्यापेक्षा बाळ नजरेसमोर असेल तेव्हा खारीक बांधून दिलेली केव्हाही सुरक्षित उपाय. अर्थात त्यावरही लक्ष हवेच.
Book traversal links for दंतकथा-प्रतिबंधात्मक उपाय-भाग १
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद हो अजयाताई, या
आता पुर्ण वाचला!
चांगली सुरूवात . पुभाप्र .
अरे बापरे...
एक वेगळा प्रश्न
तुम्ही ऐकले आहे की
धन्यवाद अजया !
+111 या लेखाची गरज होती.
छान माहितीपुर्ण लेख.
चांगली सुरुवात. :)
1+
उत्तम माहितीपूर्ण लेख !
उत्तम माहितीपूर्ण लेख !
शीर्षक वाचून 'दंतकथा बळावू
अजयाकाकु माहीतीपुर्ण लेखमाला
पुतण्या तू कुठे राहतोस सांग
काय हे...काकू म्हणाला म्हणून
सध्या मुक्काम वल्लभनगर
तुमच्या सातारला बेस्ट
:)
मस्त धागा, उपयोगी माहीती,
साधारण सकाळी आणि
पुढच्या भागांमध्ये ही माहिती
लेखमालेचे स्वागत
छान मैहितीपूर्ण लेख
+१
झैरात झैरात =))
लेख मात्र एक्दम झ्यॅक :)
मस्त! सगळे डिट्टेल सांगितलंस
माहितीपूर्ण लेख.धन्यवाद.
+१ असेच म्हणते.अतिशय उपयोगि
उपयुक्त माहिती
तुटून धारदार झालेले दात
उत्तम माहितीपूर्ण लेख...
लेख आवडला. खूप नवीन माहिती
पु.भा. वाट बघिंग
बाबौ !
उत्तम माहितीपूर्ण लेख.
उत्तम लेखमालीका. धन्यवाद अजया
उत्तम
चांगली मालिका... पुढील
लेख आवडला
ज्यांचे दात बळकट असतात
उत्तम लेख
उत्तम
ओके,
दाताची रुट कॅनाल ट्रीटमेंट
Uttam lekhamalika. Vat pahtey
खूप मस्त लेखमालिका. उत्तम
वाचतिये. खूपच उपयुक्त लेखन.