श्श..... सांभाळून बोला! भाग ३ (शेवटचा)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
27 Sep 2015 - 3:39 pm

भाग 3

रामुकाकानी दिलेलं तांब्या भांड घेऊन अवनीच्या हातात देत खाली पडलेल्या मैथिलीला त्याने उचलल. मैथिली बेशुद्ध पडली होती. तिला त्याने पलंगावर ठेवल.

पाणी देऊन रामुकाका गेले होते. अवनीने दरवाजा लावून घेतला.

सगळेच मैठीलीच्या भोवती जमले.

अभिने मैथिलीच्या चेहऱ्यावर पाणि शिपडल. मैथिली पाण्याच्या स्पर्शने जागी झाली. क्षणभर तिला लक्षात नाही आल ती कुठे आहे; पण पूर्ण जागी झाली आणि तिचा चेहेरा भितीने गोठुन गेला. ती दचकुन पलंगावरून उठली.

"चला आधीच्या आधी आपण या वाड्यातून बाहेर पडूया या." सामान उचलत ती म्हणाली.

"मैथिलि काय झाल? तू अशी एकदम का ओरडलिस? का निघायच आपण? अग आता साधारण 3 वाजले आहेत. दोन तासात पहाट होईल. मग आपण निघु. अगदी लगेच निघु. पण हे अस अपरात्रि निघुन कस चालेल?" राजन तिला समजावत म्हणाला.

"नाही... मला आत्ता या क्षणी इथून निघायच आहे." मैथिली हट्टाला पेटल्यासारख म्हणाली.

"बर निघुया. मी रामुकाकांना बोलावून मेन रोडचा रस्ता विचारतो. मग आपण निघु." राजन ती एकत नाही हे पाहुन म्हणाला.

"नाही... नको ... नको... रामुकाका नको." मैथिली थरथर कापत म्हणाली. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. मटकन् खाली बसत ती एकदम रडायलाच लागली. तिला रडताना बघुन मंजूदेखिल घाबरली. तीसुद्धा रडायला लागली.

ते बघुन अभी वैतागला. "गप बसा बघू तुम्ही दोघी. मैथिली अस काय करतेस? काय झाल सांग बघू. भूत बीत बघितलस का तू?" अभिने तिच्याजवळ बसत तिला विचारल.

मैथिली काहीच बोलत नव्हती. फ़क्त रडत होती. आता अवनी पुढे झाली. तिने अभी, वर्धा आणि राजनना बाजूला केल आणि मैथिलीला जवळ घेतल. "तुला खरच तस दिसल का मैथिली?" तिने शांतपणे मैथिलीला विचारल.

मैथिलीने चमकून अवनिकडे बघितले आणि म्हणाली "काय?"

अवनीचा प्रश्न एकून इतर सगळे गोंधळले. "तिने काय बघितलं अवनी? काय म्हणते आहेस तू नक्की?" अभीने अवनीला विचारल.

"ते मी सांगतेच. पण अगोदर तू मला सांग अभी की तू रामुकाकांच्या हातातून पाण्याचा तांब्या घेतलास ना? तेव्हा तुला काही विचित्र दिसल किंवा वाटल का?" अवनीने अभिलाच उलट प्रश्न केला.

"नाही. मला कळलंच नाही मैथिलीने अस काय बघितल की ती अशी किंचाळून बेशुद्ध पडली. काकांनी मला तांब्या दिला तेव्हा मी त्यांनाच विचारणार होतो. पण मग मैथिलीला बघण जास्त महत्वाच होत म्हणून मग मी त्यांच्याशी बोलत नाही बसलो. नक्की काय चालू आहे अवनी? आणि मला अस का वाटत आहे की तुला जे काही चालू आहे ते माहित आहे." अभी म्हणाला.

"मला माहित नाही; पण थोडी कल्पना आहे अस माझ मत आहे." अवनी म्हणाली.

"म्हणजे?" सगळ्यांनीच एकाचवेळी तिच्याकडे बघत विचारले.

"तुमच्या एक लक्षात आल आहे का; आपण जे जे बोलतो आहोत ते ते तसच घडत आहे."अवनी शांतपणे म्हणाली.

"अवनी तुला नक्की काय म्हणायचं आहे?" राजनने तिला विचारल.

"सगळेजण शांतपणे माझ म्हणण सामजून घ्या. हे बघा... आपण इथे आलो तेव्हा इथे कोणीच नव्हत. पण अभिने रामू काका म्हणून हाक मारली आणि त्याने वर्णन केल्यासारखे दिसणारे आणि त्याच नावाचे रामुकाका अवतरले. पण त्याना काहीच माहित नव्हत. कारण अभिने त्यांच दिसण आपल्याला सांगितल होत. मग राजनने या घरात पूर्वी रहाणाऱ्या कोणीतरी आपल्याला घराची माहिती द्यावी म्हंटल आणि ते गृहस्थ माहिती देण्यापुरते आले. अभिला पूर्ण रात्र गूढ घटनांनी भरलेली हवी होती; बघा एक एक प्रसंग आठवून... खोलीची दार हरवण, खोलीच हरवण... आपल्याला फक्त तिघी असताना खूप थंडी वाजण आणि मुल आत आल्या आल्या वातावरण परत पहिल्यासारख होण.... सारख काहीतरी गूढ घडत आहे. काही लिंक लागते आहे का?" अवनीने खुलासा केला.

"अवनी अग काहीही काय imagine करते आहेस? अग एकतर आपण या घरात पहिल्यांदा आलो आहोत. त्यात रात्र आहे. खोली कुठे आहे कशी आहे या बाबतीत आपण गोंधळू शकतो न? का उगाच नको त्या कल्पना इतरांच्या डोक्यात भरवते आहेस?" वर्धाने मंजू अजून घाबरेल म्हणून अवनीचा मुद्दा खोडून काढायचा प्रयत्न केला.

"ठीके वर्धा. तुला पटत नाही ना मी काय म्हणते आहे ते... बर... मैथिली खर सांग तू का घाबरलीस आणि बेशुद्ध कशामुळे पडलीस?" अवनीने मैथिलीला विचारले.

आता मैथिलीला अवनीच म्हणण पटायला लागल होत. तिने एकदा तिच्याकडे बघितल आणि ती म्हणाली,"अवनी म्हणते आहे त्यात तथ्य आहे."

"कशावरून?" वर्धाने विचारले.

"अभी रामुकाकानी पाण्याचा तांब्या दिला तो तूच घेतलास ना त्यांच्या हातातून?" मैथिलीने अभिला विचारले.

"हो! का?" त्याने तिला उलट प्रश्न केला.

"तुला काही विचित्र वाटल का?" त्याच्या प्रश्नाला उतर न देता परत मैथिलीने त्याला विचारले.

"नाही मैथिली. तुला नक्की काय म्हणायचे आहे?" अभिने तिला उत्तर देत परत विचारले.

"अभी... अवनी... वर्धा... मंजू ... राजन.... तुमचा विश्वास नाही बसणार ..... मी रामुकाकांवर चिडले होते तेव्हा म्हणाले होते की तुमच तोंड मला दाखवू नका. आठवत? आणि काही क्षणातच मी परत त्याना हाक मारली आणि पाणी आणायला सांगितल. ते पाणी घेऊन आले म्हणून दार उघडल.... पण दारात उभ्या असलेल्या रामुकाकाना चेहेरा नव्हता. ते बघूनच मी किंचाळून बेशुद्ध पडले. पण अभिला रामुकाका नॉर्मल दिसले. कारण मीच फक्त त्याना म्हंटल होत की चेहेरा दाखवू नका. अवनी मला पटत आहे तू म्हणते आहेस ते." मैथिलीने अवनीचा हात धरून तिला बिलगत म्हंटल.

आता मात्र सगळे विचारात पडले. त्यांना अवनीच म्हणण पटायला लागल. मंजू तर पुरती घाबरून गेली. आता ती एक क्षणही या घरात थांबायला तयार नव्हती.

"वर्धा ... आपण आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडतो आहोत. चल उठ. इतरांना......"मंजू काहीतरी बोलणार होती पण अवनीने तिला गप्प केल. "मंजू इतक सांगूनही काहीतरी चुकीच बोलायचं आहे का तुला? आपण सगळेच आत्ता इथून निघतो आहोत. बस! उठा सामान उचला आणि चला. कोणीही काहीही बोलायची गरज नाही आहे. ठीक?" अवनी म्हणाली.

मंजूला ती काय चूक करणार होती ते लक्षात आल आणि ती गप्प बसली. सगळेच उठले आणि आपपल सामान घेऊन निघाले. अवनी म्हाणाली,"आपण शांतपण खोलीच्या बाहेर पडणार आहोत आणि जिना उतरून खाली जाणार आहोत. ठीक?" त्यावर सगळ्यांनी मान हलवली. अवनीने खोलीच दार उघडल आणि सगळेच जण एकमेकांचा हात धरून खोलीबाहेर आले. समोर डावीकडे जिना होता. सगळेच हळूहळू पुढे सरकत जिन्याजवळ आले. जिना तर होता पण पायऱ्याच दिसत नव्हत्या.

"पायऱ्या नाही आहेत." अवनी म्हणाली.

"अस कस होईल? आपण दोनदा हा जिना चढलो आणि उतरलो आहोत. थांब मी बघतो." अस म्हणत अभी पुढे आला. पण त्यालाही पायऱ्या दिसल्या नाही. तोदेखील गडबडून गेला. "आता?"

"म्हणजे आपण या वरच्या मजल्यावर अडकलो?" मंजू घाबरून म्हणाली. आतामात्र अवनीचा पेशन्स संपला. "मंजू तू गप बसशील का? कृपा कर सगळ्यांवर. कितीही इच्छा झाली तरी बोलू नकोस. समजल?" अवनी रागावून म्हणाली. मग शांत होत म्हाणाली,"आपण खाली उतरणार आहोत. पायऱ्या नसल्या तरी जिना तर आहे न. एकमेकांचा हात धारा... हळू हळू आपण उतरू. मी सुरवात करते." अस म्हणून अवनीने मनाचा हिय्या करून पाउल पुढे टाकल. आश्चर्य म्हणजे पायऱ्या दिसत नसल्या तरी पायांना जाणवत होत्या. सगळेच जण एकमेकांना आधार देत खाली दिवाणखान्यात आले.

सगळे खाली येऊन सोफ्याजवळ उभे राहिले. जिन्याच्या समोर सोफा आणि त्याच्यापलीकडे दार. सगळ्यांच्या चेहेऱ्यावर सुटकेच समाधान दिसत होत. एकमेकांचा हात धरून ते दाराच्या दिशेने निघाले. दाराजवळ आले.... आणि ते उघडण्यासाठी राजनने काडीला हात घातला. पण त्याला हाताला कडी लागलीच नाही. तो गोंधळाला. दिवाणखान्यात मिणमिणता दिवा होता. त्याने अभिला अजून एखादा दिवा असला तर लावायला सांगितले. अभिने तसा दिवा लावलासुद्धा. त्या उजेडात सगळ्यांना दिसले की समोर दार होते पण त्याला कडीच नव्हती. सगळेच जण एकमेकांकडे बघत उभे राहिले.

आतापर्यंत कोणालाही काहीही बोलायची हिम्मत राहिली नव्हती. त्यातल्या त्यात अवनी थोडी शांतपणे विचार करण्याच्या मनस्थिती होती. तिने सगळ्याना ठाम्भायची खुण केली आणि दार असलेल्या भिंतीच्या एका टोकाला असलेल्या खिडकीकडे ती गेली. तिने खिडकीला हात लावला आणि काय आश्चर्य. त्या खिडकीचा दरवाजा आपोआप उघडला गेला. अवनी आनंदाने सगळ्याना येण्याची खुण केली आणि स्वतः खिडकी उघून एक पाय बाहेरदेखील टाकला.

सगळेच खिडकीकडे धावले. "मी बाहेर उभी राहून तुम्हाला हात देते. एक एक जण या. ठीके?" अवनी बाहेर पडत म्हणाली. सगळ्यांच्या चेहेऱ्यावर सुटकेचा आनंद दिसत होता.

त्याचवेळी आतून कुठूनतरी कुठल्याश्या घड्याळाचे टोल अचानक पडायला लागले. अवनी बाहेर पडताना सहज एक एक टोल मोजत होती......"एक..... दोन..... तिन.... चार............................................... पाच..............................." अवनी वाड्याच्या बाहेर उभी होती. तिने खिडकीतून आत हात घातला. "मंजू तू ये बघू बाहेर अगोदर...." अवनी म्हणाली.

पण............... पण.............. तिला आतून सगळ्यांचे आवाज एकू येत होते. "अवनी गेली बाहेर. पण मग खिडकीच दार का नाही उघडत? अरे........ अवनी.......... अवनी??? "हलो... हलो..... वाचवा.... वाचवा! मला.... आम्हाला बाहेरचा रस्ता मिळत नाहीये हो...... हलो..... एकता आहात का तुम्ही? हलो........"

पाच वाजले होते आणि वाड्याच्या बाहेर उभी असलेली अवनी हेल्पलेस चेहेऱ्याने खिडकीच्या आत दिसणाऱ्या आपल्या मित्रांकडे बघत होती.

कथा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

27 Sep 2015 - 4:11 pm | मांत्रिक

शेवट लक्षात नाही आला. काय झालं कुणी सांगेल का? बाकी दणकेबाज हाॅरर!!! जब्बरदस्त कल्पनाशक्ती!!!

कविता१९७८'s picture

27 Sep 2015 - 4:18 pm | कविता१९७८

सुरुवातीला जी मन्जुने कुणालातरी फोन करुन आम्ही अडकलो आहोत हे सान्गितल होत ते खर झाल म्हणुन ते अडकले अन अवनी म्हणाली होती मी नक्की बाहेर पडेन सो ती बाहेर पडु शकली.

छान कथा

मांत्रिक's picture

27 Sep 2015 - 4:27 pm | मांत्रिक

धन्यवाद!
@ ज्योती अलवणी: थोडंसं शुद्धलेखनाकडे कृपया कृपया लक्ष द्या. बाकी कथा अगदी उत्तम आहे. थोडीशी अजून खुलवू शकाल. थोड्या दिवसांच्या अंतराने जर पुढील भाग टाकाल तर प्रूफ रीडींग आणि कथा अजून खुलवणे शक्य होईल. भयकथा तपशीलाने जास्त खुलते.
बाकी भयकथा जबरदस्त आवडतात! आजपासून आपला फॅन!

बाबा योगिराज's picture

27 Sep 2015 - 4:23 pm | बाबा योगिराज

बढ़िया.

पद्मावति's picture

27 Sep 2015 - 4:50 pm | पद्मावति

जबरदस्त कथा. खिळवून ठेवणारी मांडणी.
घरात बोललेले गेलेल्या प्रत्येक शब्दाला 'तथास्तु' म्हणणार्‍या वास्त्ूपुरुषाच्या संकल्पनेचा अत्यंत परिणामकारक वापर.

मांत्रिक's picture

27 Sep 2015 - 4:52 pm | मांत्रिक

हं, हा सुद्धा दृष्टीकोण असू शकतो. केवळ भूतच आहे असाही अर्थ होत नाही.

चाणक्य's picture

27 Sep 2015 - 7:34 pm | चाणक्य

आत्ता तिन्ही भाग वाचले. छान जमलीये.

दत्ता जोशी's picture

27 Sep 2015 - 9:43 pm | दत्ता जोशी

लेखन आवडले.

कपिलमुनी's picture

27 Sep 2015 - 10:21 pm | कपिलमुनी

फिलींग

ज्योति अळवणी's picture

27 Sep 2015 - 10:35 pm | ज्योति अळवणी

कथा आपणा सर्वाना आवडली हे वाचून बरे वाटले.धन्यवाद.अनेकदा लिहिण्याच्या तंद्रीमद्धे शुद्धलेखनाच्या चुका होतात. परत वाचतानाही कथेच्या गाभ्याकडे लक्ष जास्त असल्याने काही चुका लक्षात येत नाहीत त्याबद्दल क्षमस्व. यापुढे जास्त दक्ष राहीन.

असंका's picture

28 Sep 2015 - 11:29 am | असंका

शुभ बोल नार्‍या!

मजा आली.
धन्यवाद!!

संजय पाटिल's picture

28 Sep 2015 - 1:22 pm | संजय पाटिल

छान कथा लेखन, लिहीत रहा.

सस्नेह's picture

28 Sep 2015 - 4:50 pm | सस्नेह

कथानक कल्पक आहे.

पदम's picture

28 Sep 2015 - 5:59 pm | पदम

छान लिहिलय

राजाभाउ's picture

28 Sep 2015 - 7:05 pm | राजाभाउ

छान जमलीय

शित्रेउमेश's picture

29 Sep 2015 - 5:10 pm | शित्रेउमेश

जबरदस्त....
नुसत्या कल्पनेनेच गारठून गेलो....

बापरे....

तर्राट जोकर's picture

29 Sep 2015 - 5:56 pm | तर्राट जोकर

अच्छा सोचो अच्छा होगा.
सुंदर कथा. कायम सकारात्मक बोललं पाहिजे हे नकळत बिंबवणारी. हजार सेल्फ-हेल्प बुकं जे करणार नाहीत ते ही एक कथा करून जाते.

दमामि's picture

29 Sep 2015 - 6:03 pm | दमामि

वा!! अतिशय आवडली.

दिनु गवळी's picture

29 Sep 2015 - 6:42 pm | दिनु गवळी

कथा तर दुसर्या कथेची कॉपी वाटते फक्त थोडा बदल केलाय अलवनी नावाची कथा आहे एक तिच अँप्स पन आहे त्यात पन रामुकाका वगैरे पात्र आहेत

टर्मीनेटर's picture

28 Oct 2016 - 3:24 pm | टर्मीनेटर

जबरदस्त ... वाचायला मजा आली.

जबरदस्त कथा आहे. नकारार्थी विचार बोलून आपणच संकट ओढवुन घेत असतो..

पाटीलभाऊ's picture

28 Oct 2016 - 5:50 pm | पाटीलभाऊ

मस्त लिहिलंय...जबरदस्त,,.!