श्श..... सांभाळून बोला! भाग २

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
27 Sep 2015 - 3:10 pm

भाग 2

"रामुकाका... ओ.. रामुकाका..... काय झाल? काय पडल?" वर्धाने जोरात हाक मारत रामुकाकाना विचारले.

"काही नाही जी. तुम्ही म्हणाल तस जी." खालून उत्तर आले. एकमेकांकडे बघत परत खोलीकडे वळले. पण जिन्याच्या उजव्या बाजूकडे खोलीच दारच नव्हत. समोर एक आणि डावीकडे दोन अशी एकूण अरेन्ज्मेंट होती. सगळेच गोंधळले.

"अरे आपण उजवीकडच्या खोलीकडे गेलो होतो न?" मंजूने विचारले.

अभी डावीकडे वाळला आणि एका खोलीच्या दारात उभ रहात म्हणाला,"अरे आपल सामान इथे आहे. उजवी डावी सोडा... या जेवण तयार होईपर्यंत जरा फ्रेश होऊया."

सगळे अभिच्या मागे डावीकडच्या खोलीकडे वळले. अवनीला मात्र हे थोड विचित्र वाटल. तिला खात्री होती की ते सागळे उजव्या बाजूच्या खोलीकडे वळले होते. पण वाड्यात आल्या आल्या तिचा आणि मैथिलीचा वाद झाल्यानंतर तिने ठरवल होत की फार बोलायचं नाही. हे सगळेच चेकाळल्यासारख वागत आहेत, त्यामुळे आपण शांत बसलेल बर.

खोलीत जाऊन सगळे एक एक करून फ्रेश होऊन आले. जरा कपडे बदलून बसले. खोली मोठी होती. मधला बेड तिघाना झोपता येईल इतका मोठा होता. त्यामुळे मुलीनी या खोलीतल्या बेडवर झोपायचं आणि मुलांनी त्या सोफ्यावर बसलेल्या गृहस्थाना विचारून शेजारच्या खोलीत झोपायचं अशी एकूण त्यांच्यात चर्चा चालू होती. त्याचवेळी खालून रामुकाकांची हाक आली. "पिठलं भाकरी तयार आहे जी. या जेवायला."

सगळ्यांनाच भूक लागली होती. त्यामुळे सगळे खाली माजघरात आले. रामुकाकानी सहा ताटल्यांमध्ये दोन-दोन भाकरी आणि पिठलं वाढून ठेवाल होत.

"काका पाणी देता का जरा?" अवनीने अजीजी काकाना म्हंटल.

"तुम्ही म्हणता तर देतो जी."अस म्हणत रामू काका पाणी आणायला आत गेले. सगळेच शांतपणे जेवायला बसले.

"कांदा असता तर मजा आली असती." राजान म्हणाला आणि आतून पाणी घेऊन येणाऱ्या रामुकाकांच्या हातात त्याला कांदा दिसला.

"अरे वा काका... मी म्हंटल कांदा हवा आणि तुम्ही लगेच आणलात? मस्त!" राजन काकांकडे बघत हसत म्हणाला.

"तुम्ही म्हणता तस होईल जी." रामू काका एकदम खर्जात म्हणाले. सगळेच जेवाणात गर्क होते. पण अवनीने काकांच पुटपुटण एकल. तिच आपल्याकडे लक्ष आहे हे रामुकाकांच्या लक्षात आल आणि ते तिच्याकडे रोखून बघायला लागले. पण अवनी आपल्या ताटलीत बघून जेवत राहिली.

सगळ्यांच जेवण आटपल आणि हात धुवून सगळे बाहेर आले.

"रामुकाका.. ते मगाशी इथे सोफ्यावर बसले होते ते कुठे आहेत? आम्हला दोन खोल्या वापरायच्या होत्या त्याना विचारून." मैथिलीने रामुकाकाना विचारले.

"त्यांच काम झाल; ते गेले जी. तुमच काय. तुम्ही बोला तस होईल जी." अवनिकडे बघत रामुकाकानी उत्तर दिले.

"बर. मग आम्ही मुली एका खोलीत झोपतो आणि दुसऱ्या खोलीत मुलगे झोपतील."मैथिलीने रामुकाकाना सांगितले आणि सगळेच जण जिन्याने वर गेले.

"खोली डावीकडे होती...... परत उजवीकडे कशी आली?" जिन्याच्या शेवटच्या पायरीवर उभ रहात मैथिली आश्चर्याने मोठ्या म्हणाली. तिच्या ओरडण्यामुळे सगळेच दचकले.

"हा काय प्रकार आहे नक्की?" राजान वैतागत म्हणाला.

"मला भिती वाटते आहे." मंजू वर्धाला चिकटत म्हणाली. तिला जवळ घेत म्हणाला,"dont worry मंजू. घाबरू नकोस. चला रे. आपण सगळे अगोदर एकाच खोलीत जाऊ या."

सगळे उजव्या खोलीत गेले. माघा बाहेर पडताना त्यांच सामान जस होत तसच पडल होत. मंजू अजूनही वर्धाचा हात धरूनच होती. "आपण इथून आत्ताच निघूया का? मला खरच खूप भिती वाटायला लागली आहे." ती म्हणाली.

"मंजू अग आता खूप रात्र झाली आहे. आपण सगळेच दमलो आहोत. आता आपल्याला इतक्या रात्री कुठे अजून जागा कशी मिळेल. आणि परत मुंबई पर्यंत गाडी चालवण्याचे त्राण कोणातही नाहीत. त्यामुळे घाबरण बंद कर आणि झोपायला चल." मैथिली मंजुला म्हणाली. तरीही मंजू वर्धाचा हात सोडायला तयार नव्हती. मैथिलीने मग मंजूची चेष्टा सुरु केली. "अग जरा आवाज झाला तर त्याचा हात धरण्याचा chance घेते आहेस. जर छत कोसळल तर काय त्याच्या....................."मात्र मैथिलीच वाक्य पूर्ण होण्याच्या आतच खूप मोठ्ठा आवाज झाला. सगळेच दचकले आणि धावत बाहेर आले.

दिवाणखान्याचे छत कोसळले होते. आता मात्र सहाही जण गांगरून गेले. गोंधळून गेले. कोसळलेल्या छताच्या ढिगाजवळ उभ राहून रामुकाका या मुलांकडेच बघत होते. त्यांच्या डोळ्यातले भाव विचित्र होते.

सगळेच मागे सरकले आणि परत खोलीत गेले. सगळे आत येताच अभिने दार लावून घेतले आणि म्हणाला, "हे नक्की काय चालू आहे? आपण दमलो म्हणून थेट मुंबईला जाण्यापेक्षा रात्री आराम करावा या उद्देशाने आलो आणि इथे आल्यापासून गेल्या दोन तासात किती घटना घडल्या."

"माझ ऐकणार आहात का तुम्ही सगळे?" अवनिने सगळ्याना शांत करत म्हंटले.

"गप ग ताई." मैथिलीने अवनीला गप केले. मंजू तर खूपच घाबरली होती. ती आता वर्धाला घट्ट चिकटली होती. "आपण निघूया का वर्धा?" तिने त्याच्याकडे बघत त्याला विचारले. "सगळे या एकाच खोलीत झोपूया का?" अवनीने सगळ्यांकडे बघत विचारले.

"का? हिला वर्धाला सोडवत नाही म्हणून का?" मैथिलीचा परत चेष्टेचा मूड वर डोक काढायला लागला. राजनने तिला शांत केले आणि म्हणाला,"चला झोपूया सगळे. मंजू आम्ही शेजारच्याच खोलीत आहोत. तुला भिती वाटली तर आम्हाला हाक मार. ठीके? चला अभी... वर्धा.... झोपूया सगळेच. सकाळी बघू काय ते."

"सगळच विचित्र. आता राजन म्हणतो तशी ती खोली शेजारी असली तर बर नाहीतर परत खोली शोध मोहीम हाती घ्यावी लागेल." अस म्हणत अभी त्यांच्याबरोबर खोलीबाहेर पडला.

मंजू खरच खूप घाबरली होती. ती अवनिजवळ येऊन हळूच म्हाणाली,"मी मध्ये झोपू का ग? मला खरच खूप भिती वाटते आहे. मैथिलीला सांगितल तर ती परत चेष्टा करेल."

"घाबरू नकोस मजू. तू झोप मध्ये. आणि महत्वाच म्हणजे आता काही बोलू नकोस. एक माझ." अवनी म्हणाली. मैथिली अगोदरच पलंगावर आडवी झाली होती. मंजू आणि अवनिदेखील पलंगावर येऊन पडल्या. सगळ कस शांत झाल. तिघीना झोप लागली. थोड्या वेळाने मंजुला थंडी वाजायला लागली म्हणून जाग आली. तिने डोळे उघडले आणि अंदाज घेतला. पलंगाच्या एका बाजूला असलेल्या खिडकीतून थंडगार वारा आत येत होता. अगदी थंड! जणूकाही बाहेर बर्फ पडला होता आणि तोच गारवा आत येत होता. खोली खूपच थंड पडली होती. मैथिली आणि अवनिसुद्धा कुडकुडत होत्या. मंजूने अवनीला हलवलं. अवनी बहुतेक जागीशीच होती. तिने लगेच डोळे उघडले.

"खूप थंडी आहे न ग?" मंजू म्हणाली. "आपण झोपलो तेव्हा नव्हत वाटत अस. कामाल आहे न!"

घड्याळाकडे बघत अवनी म्हणाली,"अग जेमतेम अर्धा तास झालाय आपण झोपून." तेवढ्यात खोलीच दार जोरजोरात वाजायला लागल. मैथिलीसुद्धा दचकून जागी झाली. तिघी घाबरून एकमेकीना चिकटून बसल्या.

बाहेरून वर्धा, राजान आणि अभिच्या हाका एकू येऊ लागल्या.

"मैथिली.... मंजू.... अवनी... दार उघडा... उठा.... अरे उठा.... अवनी...." त्यांनी तिघींच्या नावाचा धोशाच लावला होता.

अवनी दार उघडायला पुढे सरकली. मंजूने तिचा हात धरला... ती काहीतरी बोलणार होती. पण अवनीने तिच्या तोंडावर हात ठेवला,"मंजू, एक अक्षर बोलू नकोस. please!" अस म्हणून अवनीने दार उघडल.

अभी, वर्धा आणि राजन धाडकन खोलीत आले आणि राजनने आत येताच दार लावून घेतल. ते आत येताच मात्र खोलीच तापमान परत पुर्वीसारख झाल.

"काय झाल तुम्हाला?" मैथिलीने विचारल.

"यार आपण या खोलीत येताना शेजारीच एक खोली होती ना? आम्ही त्याच खोलीत जाणार होतो. पण गेला अर्धा तास आम्ही खोलीच दार शोधतो आहोत. शेजारी खोलीच नाही आहे; हे लक्षात येताच आम्ही या खोलीत यायचं ठरवलं. पण या खोलीच दारदेखील आम्हाला मिळत नव्हत. पण अचानक अवनीच्या आवाजाची कुजबुज एकू आली आणि दार दिसलं. आम्ही धावलो आणि परत दार हरवाय्च्या आत दारावर धडाका दिल्या. नशीब याच खोलीच दार होत आणि तुम्ही दार उघडल." अभी बोलत होता आणि त्याच उर धपापत होत. वर्धा आणि राजान तर खोलीत येताच मट्कन खाली बसले होते; ते तसेच होते.

मंजू वर्धाजवळ गेली आणि त्याचा हात हातात घेत म्हणाली,"dont worry. आपण सगळे याच खोलीत एकत्र थांबूया. अरे ही खोली ना आत्ता खूप थंड पडली होती. एकूण सगळ विचित्रच चालाल आहे."

सगळे शांत बसून राहिले. कोणालाही काहीच सुचत नव्हत. हा एकूण काय प्रकार आहे ते कोणालाही समाजात नव्हत. आता या बंगल्यात रहायची इच्छा कोणालाच उरली नव्हती. पण अस म्हणायची हिम्मत नव्हती कोणाची. आपण घाबरलो म्हणून आपली चेष्टा होईल म्हन्जून सगळेच जण गप्प बसून होते.

"थांबा ... त्या रामुलाच बोलावून जाब विचारते."अचानक उठत मैथिली म्हणाली आणि खोलीच दार उघडून रामुकाकाना हाक मारायला गेली. तिने दार उघडल तर रामुकाका दारातच उभे होते.

"विचारा जी." ते म्हणाले.

"काय? काय विचारा? तुम्ही काय दाराला कान लावून उभे होतात का?" चिडून मैथिलीने त्याना विचारले.

"नाही जी. तुम्ही बोलावते म्हणालात; आनी आलो जी." रामुकाकानी शांतपणे उत्तर दिल.

"मी इथे पलंगावर बसून जे बोलले ते तुम्हाला माजघरात एकू आल अस म्हणण आहे का तुमच?" मैथिलीचा तोल आता सुटायला लागला.

रामुकाकानी शांतपणे उत्तर दिल,"होय जी. म्हंजी तुम्ही म्हणाल तसच होईल जी."

"काय बोलता आहात तुम्ही काका? तुम्हाला तरी कळत आहे का? जा इथून. परत मला तोंड दाखवू नका. समजल?" मैथिली भडकून म्हणाली.

"ठीक जी."अस म्हणून रामुकाका माघारी वळले.

मैथिलीने खोलीचे दार लावून घेतले. आणि ती पलंगाजवळच्या टेबलावर ठेवलेल्या तांब्यातून पाणी पिण्यासाठी गेली. पण तांब्या रिकामाच होता. ती अजून वैतागली. तांब्या घेऊन परत दाराकडे येऊन तिने दार उघडले आणि मोठ्याने ओरडली,"रामू काका... पाणी आणा...."

जिन्यावर पावलं वाजली. तांब्या भांड्याचा आवाज झाला म्हणून मैथिली पुढे झाली आणि तिने दार उघडले. समोर रामुकाकाना बघून ती मोठ्याने किंचाळून खाली पडली. तिला काय झाल बघायला अभी धावला.

----------------------------

कथा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

27 Sep 2015 - 4:00 pm | मांत्रिक

मस्तच! जबराच कथानक आहे!!!

कविता१९७८'s picture

27 Sep 2015 - 4:11 pm | कविता१९७८

छान, रामु काकान्चे मुन्डकेविरहीत धड उभे असेल पाणी घेउन

भिंगरी's picture

27 Sep 2015 - 6:44 pm | भिंगरी

हो ना!
तोंड दाखवू नका म्हणाली ना.

एस's picture

27 Sep 2015 - 6:52 pm | एस

छान आहे. आवडेश.