ऐक स्वखे त्रिधारा : भाग ५

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
1 May 2015 - 8:43 am

वास्तू भाग २:
माझ्या लेकीच्या नणदेचा करूण अंत फार मोठा आघात होता. पण लेक मोठी धीराची. तीने स्वतःला आणि नवर्‍याला यातून सावरले. स्वखीच्या नवर्याने कोर्ट केस करणयाचा निर्णय घेतला.
**
तो बहिणीचे घरी पोहोचला तेव्हा पहटेचे ४.३० झाले होते पुण्यात टिळकरोडला रात्री ११.३० वाज्ता झालेली घटना कात्रजला (धाकट्या भावाचे घरी) कळविली सासुरवाडीच्या लोकांनी ३.३० ला.

पोहोच्ल्याबरोबर नातेवाईकांपेक्षा पोलिसांचीच संख्या जास्त किमान १५-२० तरी आणि लगेच पुढच्या सोपस्कारांसाठी घाई तेव्हाच यातला पोलीसांचा कार्यभाग ठऴकपणे दिसून आला.बाहिण काम करीत असलेल्या सहकार्यांचे जाब-जबाब रूग्णालयात येऊन घेतले पण त्यांना कधीच बोलावले नाही कोर्टात्.शिवाय त्यांचे घरी जाऊन "आस्थेवाईक" विचारपूस केल्याने कुणीच साक्षीसाठी पुढे आले नाही.

तरीही केस लढवायचा निर्णय घेतला होता किमान खटला चालेपर्यंत तरी वरमाय-लेक सरकारी पाहूणचारात राहणार होते.
पण वरमायलेकीने पुन्हा पोलीसांचे हात ओले करून आईची जामीनावर सुटका केली पण खटल्यानंतर आज तगायत "वरमाय" त्या घरी रहायला गेली नाही.(असं काय खुपत्ये ते फक्त तिलाच माहीत) याच वास्तूवरून केलेली "मी मरेपर्यंत वाड्-वडीलांच्या जागेतच राहील" ही भीष्म-प्रतीज्ञा पाचोळ्यासारखी उडाली असावी.
*****
ह्याची पार्श्वभूमी अशी : सुरुवातीला सव्खीच्या नणदेच्या सासुरवाडीला भर रस्त्यावर (टिळकरोड- एस पी कॉलेज परिसर्)सर्व भाउबंदाची एकत्र अशी मोठी तिमजली वास्तू होती. वास्तू जुनी (अंदाजे ३०-४० वर्षे जुनी) झाल्याने पुनर्विकास करण्याचे ठरविले इतर दोन्ही जण कर्जबाजारी असल्याने त्यांनी विकसक(बिल्डर)कडून पैसे घेऊन ताबा सोडला व सव्खीच्या नणदेच्या सासूचाच फक्त हिस्सा राहीला.

त्या वेळेस बिल्डरने ही व्यावसायीक दृष्टया मोक्याची जागा असल्याने संपूर्ण व्यापारी+व्यावसायीक संकुल करण्याचा प्र्स्ताव ठेवला व त्याच परिसरात चालू असलेल्या (अगदी एक चौक पलिकडे) असलेया निवासी प्रकल्पात अपेक्षीत (११००-१२०० चौरस फूट क्षेत्राचा फ्लॅट) पार्कींग सुविधेसह देण्याचा पर्याय दिला होता. जो सव्खीच्या नणदेला व तीच्या नवर्यालाही रास्त आणि किफायतशीर वाटत होता.

पण नणंदेच्या सासूने "वाडवडिलांच्या वास्तू मधून मी मरेपर्यंत दुसरीकडे जाणार नाही" असा पवित्रा घेतला.
परिणिती: त्यांच्याच भाडेकरूला (ताबा सोडण्यासाठी) त्याच परिसरात चालू असलेल्या (अगदी एक चौक पलिकडे) असलेया निवासी प्रकल्पात प्रशस्त असा फ्लॅट मिळाला (अंदाजे ७००-८०० चौरस फूट) आणि या मूळ मालकाला हट्टीपणामुळे, गैरसोयीच्या पद्ध्तीने बांधलेला (आराखड्याच्या शिल्लक जागेत अक्षरशः कोंबलेला) ७०० चौरस फूट फ्लॅट वर समाधान मानावे लागले.
***
साधारण सहा एक महीने केस चालली.
वकिलांचा खेळ पूर्वनियोजीत चालीप्रमाणे होत असे.
इकडे कोर्टातील तारखा आणि स्वखीच्या नवर्याच्या सुट्ट्या वाढतच होत्या.

मायेच्या लेकीला राहिलेल्या दुकान्+मकानाची तीव्र लालसा (आई+भाऊ) पश्चात एक्मेव वारसदार. स्थावर संपत्तीचे बाजारमूल्य किमान ३ ते ४ कोटी.
मग काय होऊदे ख्रर्चाच बाकीचं आहे आपलंच हा जयघोश घुमु लागला आणि "मूल्-बाळ नाही ह्या निराशेपोटी आत्महत्या" असा निकाल लागला.

सतरा वर्षे (१७) जीवन्दान (रूग्णसेवा या अर्थाने) देण्याच्या पेशात असलेली आणि मूल-बाळ म्हणजे सर्वस्व नाही हे माहीत असलेल्या क्षेत्रातील (परिचारीका) व्यक्तीबाबतच्या अजब युक्तीवादावर न्यायालयाने विश्वास ठेवला.

खटल्याचे निकालानंतर नणंदेच्या नवर्‍याची “तीर्थ संध्या” त्रिकाळ झाली आणी त्यातच अंत झाला दोन एक वर्षात. आजही त्याची आई दिवाभीता सारखे लेकीचेच घरी राहतेय सर्वंस्वी लेकीला वारसदार करून.

***
त्याच वेळी आणखी एक विचित्र अनुभव आला.त्यावेळेचे पुण्यात पोलीस मुख्यालयात जनता दरबार भरवीत असत त्या बाईंचा दरारा व रूबाब मोठा होता. मोठ्या अपेक्षेने पुनर्तपास व्हावा व काही मुद्द्यांचा (फोनचे तपशील्+जागेवरचे पुरावे) ई त्यासाठी अर्ज केला ,पण त्याच दरबारातून ज्यांच्या हाताखाली तपास चालू आहे त्यांच्याकडे (पोलीस उपायुक्त) पाठविण्यात आले आणी स्वखीची जाऊ व सासू तिथे पोहोच्ण्यापूर्वी अगोदरच सगळी बा॑तमी पोहोचली होती.
"तुम्ही वयस्कर आहात म्हणून सोडून देतो नाहीतर तुम्हालाच पोलिसांना शहाणपणा दाखवता म्हणून चांगला धडा शिकवला असता" असे बोधामृत मिळाले मुख्यालयातील तत्परतेला सलाम.

हातात बाळपोथी ओठांत बाळ भाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरवीत श्रीगणेशा
घेऊ कसा निरोप ? तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे !
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्यापरी अता मी येथे फिरून येणे

ही या कटुप्रसंगी स्वखीनेच आधार दिला त्याला.दुखः मागे टाकून थोडीच टा़कता येते फक्त ते तळाशी जावून बसते (अगदी तात्पुरते) पुन्हा ढवळल्यावर वर येण्यासाठी !. आंच असते असेल तिथेंच आस असते नाही का !.

पुन्हा पुन्हा दु:खाचा उगाळा नको म्हणून स्वखी ने सासुबाईंनाही देवधर्मात मन रमवायला लावले.धा़कट्या जावेचे सोसायटीत जेष्ठ नागरीक संघात नाव नोंदणी करून समवय्स्कांबरोबर सह्ल्/मेळावा यासाठी प्रोत्साहन दिले.
पण पुढच्या २ वर्षात स्वखीला अगदीच मर्म-आघात सहन करावा लागला.

निखळ अंतर्यामी आणि अंतर्मयी नाते असलेल्या स्वखीचे आईचे अल्पशा आजाराने निधन झाले.

भावानिक बळ आणि मानसीक आधार यासाठी माहेरवाशीणीला आईसारखे दुसरे विश्वच नाही.

त्यात या दोघींचे काय नाते होते कुणास ठाऊक एकीला दुखले-खुपले तरी परगावी दुसरीला आपोआप समजत असे.
आणी त्यांचा क्षेम्-कुशल साठी फोन येत असे.(हे सारे खरेच अनाकालनीय आहे )

अगदी आईचे निधन झाले त्या दिवशीही स्वखीने संध्याकाळी हॉस्पीटलम्ध्ये नेहमीसारखे भेटायला जायचा बेत केला होता आणि स्वतःचा ब्लड रिपोर्ट साठी दुसरीकडे दुपारी १२.३० चे सुमारास गेलेली होती.
रिपोर्ट घेत्ल्यावर अचानक काय वाटले कुणास ठाऊक

"किमान भेटून तरी जाऊ उभ्या उभ्या हॉस्पीटलम्ध्ये" ती
"आत्ता सोडत नाहीत आय सी यु मध्ये वेळ फक्त सायं चार ते सात आहे" तो
"पण तरी बघू किमान लांबून तरी बघता येईल ना" ती
"तु या रिपोर्ट्साठी सकाळपासून काही खाल्ले नाहीस तेव्हा घरी जावू जेवण करू मग जावू चालेल का" तो
"नको प्लीज आत्ताच जावू ना" तीची कमालीची काकुळती मागणी
पण तिथे गेल्यावर घरून (स्वखीचे भावांकडून)डबा (फक्त वरण भातालाच परवानगी) आणला होता आणि मोठ्या वहीनी स्वतःच म्हणाल्या “वन्स तुम्हीच भरवता का”.
स्वखीने भरल्या डोळ्यांनी आय सी यु मध्ये जावून जेमेतेम दोन चमचे अर्ध्-ग्लानीत असलेल्या माउलीला भरवले.
आणि खाली वेटींग रूम मध्ये आली. "दोन्ही भाऊ घरी जेवायला गेले होते तेव्हा वहिनीला सोबत म्हणून अजून थोडावेळ थांबू" असे स्वखीने सुचविले.
त्याला तिची अस्वस्थता आता चांगलीच जाणवू लागली आणि ठीक आहे भाउ येतीलच ३०-४५ मिनिटात म्हणून थांबला.
आणि दुपारी सुमारे ३.३० ते ४ चे दरम्यान स्वखीच्या आईची प्राणज्योत मालवली.जणू माऊली प्राण्-प्रिय लेकीची भेट घेण्यासाठी थांबली होती
स्वखीला हारदवून टाकणार्या दु:खातून बाहेर काढणे हीच महत्वाची जबाबदारी त्याच्यावर होती.
क्रमशः

ऐक स्वखे त्रिधारा: भाग ४

ऐक स्वखे त्रिधारा: भाग ३

ऐक स्वखे त्रिधारा: भाग २

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

जेपी's picture

1 May 2015 - 8:55 am | जेपी

..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 May 2015 - 9:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

...................

आई नसलेल्या माहेरवाशिणीच्या दुःखाची कल्पनाही करवत नाही :(

प्रचेतस's picture

1 May 2015 - 10:05 am | प्रचेतस

काय लिहू कळतंच नाहीये.

एस's picture

1 May 2015 - 11:14 am | एस

ज्या धीराने तुम्ही उभयतांनी हे दु:खाचे आघात पचवले त्याला सलाम!

पैसा's picture

1 May 2015 - 2:35 pm | पैसा

:(

आनन्दा's picture

1 May 2015 - 8:30 pm | आनन्दा

बापरे!

आतिवास's picture

1 May 2015 - 9:12 pm | आतिवास

आधीचे भाग कुठे आहेत?
कॉलिंग श्रीरंग्_जोशी.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 May 2015 - 10:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

भाग ३ ची लिंक चुकली आहे. आजानुकर्ण ह्यांच्या अंताक्षरी धाग्याची लिंक आहे. संमं बरोबर कराल का लिंक?

काय प्रतिसाद द्यावा ते कळत नाहीये.
लिहिणं हे एका अर्थी पुन्हा तेच क्षण जगणं असतं - त्यामुळे हे लिहिणं किती जिकिरीचं आहे हे समजतंय!