ऐक स्वखे : त्रिधारा भाग-३

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
24 Apr 2015 - 8:33 am

स्व भाग १:
=======
एक घटना आपल्याच लोकांना कसं बदलविते ते पहा
लग्न होई पर्यंत जर कश्यालाही विरोध केला तरी पटवून दिले तर घरच्यांना पटत असे पण आता मात्र प्रत्येक लहान सहान गोष्टीत सुद्धा "हे तुला बायकोने सांगीतले असेल","तीचे ऐकून असे बोलतोयस झालं" असा समारोप होऊ लागला.
सोसयटीच्या लोकांची आपल्या संसारात नको इतकी लुड्बूड आणि स्वखीच्या धार्मीकतेवर शेरेबाजी कशी “अस्थानी आणि अन्यायी” आहे हे घरच्यांना पटवणे अवघड होऊन बसले. विशेष म्हंणजे हेच लोक गावी सगळ्या चाली-रिती (अगदी देवीला बोकडाचा/कोंबडीचा बळी देण्याची परंपरा) सक्रीय सहभागने चालूच ठेवीत होते.

त्यातच भाषेची अडचण आणि गैरसमज दूर करताना वादात भरच पडत होती. मी स्वखीशी कधी-कधी जास्त कठोर वागतो हे मलाही समजत होते पण कुटुंब एकसंध ठेवताना ही तगमग्+दुर्लक्ष्+चिडचिडीची झळ जास्त स्वखीच सोसत होती हे ही खरे.
तशात एक आनंदाची गोष्ट झाली खूप दिवसांपासून (अक्षरशः सहा वर्षांपासून भिजत घोंगडे आणि आम्ही जवळ जवळ आशाच सोडलेली) तांत्रिक कारणानी प्रलंबीत असलेला भूखंड प्राधिकरणातून मिळ्ण्याची शक्यता आहे असे पत्र मिळाले. आनंद झाला आता छोटे का होईना स्वतंत्र घर होणार ही कल्पनाच आनंददायी होती.

बहीणीचाही पुनर्विवाह झाला आणी या दुधात साखर कसली केशरयुक्त मिठाई म्हणून स्वखीने मला जगातील सर्वात अमूल्य भेट दिली.

वो मेरा होगा, वो सपना तेरा होगा
मिलजुल के माँगा, वो तेरा मेरा होगा
जब जब वो मुस्कुराएगा, अपना सवेरा होगा ...
थोड़ा हमारा थोड़ा तुम्हारा,
आयेगा फिर से बचपन हमारा
जीवन की बगिया ...


बाळाचे आगमनाचे फलित म्हणजे कुरबुरींचे प्रमाण बरेच कमी होऊन सगळे पुर्णवेळ व्यग्र राहू लागले. केंद्रबिंदू फक्त युवराजांवर त्यामूळे "बाबा"(मी) आपोआप थोडा बाजूला पडलो आणी तेच माझ्या पथ्यावर पडले, कारण घराच्या जागेसाठी बरीच धावपळ + रक्कम उभी करावी लागणार होती. त्याकरीता मला वेळ मिळत गेला.
सुदैवाने वर्षभरात जागेचा ताबा मिळाला (साधरणतः सव्वा गुंठा जागा ,१२५० चॉ फूट) आणि नियमानूसार पुढे मागे जागा सोडून बांधकाम असा सारा मामला होता.

या सगळ्यातून वितंडवाद न करता बाहेर पडण्यासाठी मी लगेच्च नवीन घराचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला.
एसबीआय ने नेहमीप्रमाणे झुलवत ठेऊन शेवटी ठेंगा दाखवला (एसबीआय प्राधिकरणातील अधिक्रुत जागेचीही कर्जमंजूरी करीत नाही हे नव्याने कळले)
फ्लॅट्चे वेळी ७ते८ महिन्यांचा तगादा ठेव्ण्याचा अनुभव एच्डीएफ्सीमुळे पाठीशी होताच (सन १९९३ मध्ये ते एकमेव तारण्हार होते हे लक्षात घ्या)

आता थांबायला वेळ नव्हता परंतु माझ्याकडे लग्नाचे वेळी सायकल हीच एकमेव दुचाकी होती आणि अगदी लग्नानंतरही दीड्-दोन वर्षे सायकलने कंपनीत जात येत असे.त्याचे मला ना कवतिक होते न स्वखीला दु:ख.
मग जमेल तसे याच्या त्याच्या गाडीवर नव्या घरासाठी चकरा सुरू झाल्या. एचडीएफ्सी च्या उत्तम ट्रॅक रेकॉर्ड मुळे अतिरिक्त कर्जसुद्धा १ महिन्यात मंजूर होऊन बांधकाम सुरू झाले.

आणि मी अगदी पहिल्या भेटीपासून वास्तुरचनाकार/आरेखकास "एक छोटे का होईना स्वतंत्र देवघर काढता येईल असे बघाच" असा लकडा लावला शेवटी स्वयंपाकघर आणि मुख्य कक्ष यांचे लगतच एक जेम्तेम २.५ * ५ असे देव्घर काढले तेही बाहेरची बाजू हॉलमध्ये मोठा कोनाडा (गणपती बाप्पांसाठी फक्त आणि आतला कोनाडा देवघर!) असा साधा+काटकसरीचा पर्याय स्वीकारला. जरी माहेरसारखे प्रशस्त नसले तरी किमान स्वतंत्र देवघर आहे हेच माझ्या स्वखी साठी खूप सुखाचे होते.

किमान देव आणि त्यांची व्यवस्था या जागेत माझ्यासारख्या नाममात्र धार्मीक मनुक्शापासून तीला स्वातंत्र्य मिळणार होते. माझा कट्टर धार्मीकतेला विरोध असला तरी तीच्यावर पूर्ण विश्वास होता.ती जो काही देवधर्म मनोभावे करीत असे ते कुटुंबाचे कल्याणासाठीच याबाबत काहीच संदेह नव्हता.
दैववादी असण्यापेक्षा देवभोळी आहे स्वखी. "असेल हरी त देईल खाटल्यावरी" अष्या निश्क्रीय विचारधारेला कधीच
स्थान नाही आचरणामध्ये.
यथावकाश घर पूर्णत्वास येतान एक मोठी अडचण आली बिल्डरचे पहिलेच स्वतंत्र काम व त्याला खालच्या ठेकादाराशी झालेला वाद याचा परिणाम कामाच्या दर्ज्यावर आणी वेगावर होऊ लगला.आता कर्जाचे दोन हप्ते चालू झाले होते त्यात बाळाचा खर्च आणी मी "बिन्-नोकरीची बायको केलेली - हा खास घरच्यांचा परवलीचा शब्द" धाकटी बहीण तीन्-तीन शिफ्ट मधील रूग्णालय नोकरी करीत असल्याने जास्तच, शेवटी कंटाळून (बांधकाम महाशयांचा पराकोटीचा आड्मुठेपणा) पाहून किमान राहण्यास योग्य होईपर्यंत मी सबूरीचे धोरण ठेवले.
अतिरिक्त रकमेची मागणी (रू पंच्यहत्तर हजार साल २००२)न दिल्याने त्याने कुंपण भिंत व पाण्याची टाकी न बांधता पोबारा केला.

अश्याही परिस्थीतीत स्वखी डगमगली नाही आपण लगेचच रहायला येऊ, इथे लक्ष देवून पुढ्चे काम करून घेऊ.
पण कुंपण भिंत नाही म्हणून प्राधीकरणाचा पूर्णत्वाचा दाखला नाही आणि त्यामुळे घरगुती पाणी (नळ जोड नाही) अश्या विचीत्र पेचात अडकलो. शेवटी जुन्या ऑफीसातील कामानिमित्त झालेल्या ओळखी कामी आल्या.
***
त्याचे असे झाले एक तर या त्रिस्थळी टोलवटोलवी मी रंजीस आलो होतो त्यात भरीस भर म्हणून मा.प्रभाग आयुक्तांनी विनाकारण जातीवरून भर ऑफीसात अगदी अर्वाच्य शेरा (तोंडी) मारून मला विनाकारण अपमानीत केले होते (जागा सरकारी असून कायदेशीर अस्लयाने मी वरकमाई देणार नाही हे आधीच ठरविले होतेच त्याचीही फल्श्रुती असेल कदाचीत्)पण आता माघार घेणे शक्य नव्हते.

अचानक एके दिवशी मनपाचे आकाश्-चिन्ह विभागाचे उपायुक्त साहेबांची आठवण आली आणि तडक त्यांना पिंचि मनपात जावून भेटलो काय काय झाले आणि का अडवणूक तेही सांगीतले. त्यांनी फोना-फोनी करून मला पुन्हा चिंचवड प्रभाग कार्यालयात जायला सांगीतले आणी माझ्या अर्ज्-भेंडोळ्यावर काही तरी शेरा मारून आणला होता (नगर रचना मधून) मग मात्र मा.प्र.आ. जरा नरमले तर मग्रूरीत म्हणालेच "अगदी वरपर्यंत ओळख आहे तर कशाला इथे आला होतात"
अर्ज मंजूर करतोय आधीची कामं झाली की तुमची ऑर्डर काढू"

पुन्हा आमची वरात मुख्यालयात उपायुक्त साहेबांशी भेट यावेळेला त्यांनी एक माणूसच बरोबर पाठवला आणि त्यानेही बिनधास्त सांगीतले हा अर्जदार "पावना हाये सायबाचा लवकर ऑर्डर काढा !"
बोच असली तरच पोच असतो

एक दिव्य पार पडले पण सर्कारी (खाजगी पण) प्लंबर जमात जागेवर न सापडण्यासाठी प्रसिद्ध आहे त्या थोर्र परंपरेला जागून, तीन दिवसांच्या वारीनंतर "विठ्ठल" सापडला आणि नेमका मित्राच्या अगदी ओळखीचा निघाला पुढचे काम सुरळीत झाले.तो पर्यंत दुसरीकडून पाणी घेऊन घरासमोर प्लास्टीक (सिंन्टेक्स) ठेऊन पांण्याची सोय केली .
कुंपण भिंत नसल्याने व आजू बाजूला अजून बांधकाम नसल्याने रात्रीच नाही तर दिवसाही कुत्री-मांजरे यांना सोबत म्हणूण "शंकर आभूषण" घरी भेट देत असे.
पुढे ७-८ महिन्यात कुंपण भिंत पूर्ण करून ,जमीनीखाली पाण्याची टाकी करून घेतली आणि जरा बागेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.

ये जीवन है
इस जीवन का
यही है, यही है, यही है रंग रूप (२)
थोड़े ग़म हैं, थोड़ी खुशियाँ
यही है, यही है, यही है छाँव धूप
ये जीवन है ...
(ये ना सोचो इसमें अपनी
हार है कि जीत है ) - २
उसे अपना लो जो भी
जीवन की रीत है
ये ज़िद छोड़ो, यूँ ना तोड़ो
हर पल एक दर्पण है
ये जीवन है ...
इस जीवन का
यही है, यही है, यही है रंग रूप
थोड़े ग़म हैं
थोड़ी खुशियाँ
यही है, यही है, यही है छाँव धूप
ये जीवन है
आणि मी जरा स्थिरावू लागलो पुढच्या स्वप्नांसाठी, भावाचे लग्नासाठी प्रयत्न सुरू केले.
क्रमशः

ऐक स्वखे : त्रिधारा भाग-२

ऐक स्वखे : त्रिधारा भाग-१

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

जेपी's picture

24 Apr 2015 - 9:02 am | जेपी

त्रिधारा..
आज अर्थ कळाला..
पुभाप्र

याचा पहिला भाग कुठे आहे?

पैसा's picture

24 Apr 2015 - 9:30 am | पैसा

शेवट क्रमशः बघून बरे वाटले!

कोंबडी प्रेमी's picture

24 Apr 2015 - 11:31 am | कोंबडी प्रेमी

आणि सुरेख आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

24 Apr 2015 - 11:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सुंदर लिवलयं.

खुसखुशीत लेखनशैली !
पुभाप्र.

एस's picture

24 Apr 2015 - 1:25 pm | एस

(बहुधा पुढील भाग वाचवणार नाही...!)

पॉइंट ब्लँक's picture

24 Apr 2015 - 4:48 pm | पॉइंट ब्लँक

का वो?

सौंदाळा's picture

24 Apr 2015 - 2:06 pm | सौंदाळा

मस्त लिहिताय नाखुकाका
यातले काही अनुभव तर तुमच्या तोंडुनच ऐकले होते, वाचताना परत तसाच (काहीसा दु:खी / हताश) फिल आला
पुभाप्र

प्रचेतस's picture

24 Apr 2015 - 11:33 pm | प्रचेतस

हेच म्हणतो

वाचतेय.वर सगळे असं का लिहित आहेत म्हणजे पुढल्या भागात काही आक्रित घडणारे का असं वाटुन आधीच वाईट वाटतंय.पुभाप्र.

तीनही भाग वाचले. प्रामाणिक कथन आवडले. पुढील लेखनाची वाट पहात आहे.