ऐक स्वखे त्रिधारा : भाग ६

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
4 May 2015 - 9:49 am

स्व भाग २:

स्वखीला हारदवून टाकणार्या दु:खातून बाहेर काढणे हीच महत्वाची जबाबदारी त्याच्यावर होती.

क्रमशः
ज़िंदगी ...
कैसी है पहेली, हाए कभी तो हंसाये
कभी ये रुलाये ज़िंदगी ...
कभी देखो मन नहीं जागे
पीछे पीछे सपनों के भागे
एक दिन सपनों का राही
चला जाए सपनों के आगे कहाँ
ज़िंदगी ...

आता खरा कसोटीचा काळ होता एक बाजूला स्वखीला यातून सावरणे आणि दुसरीकडे तीचे मन गुंतवून ठेवणे आवश्यक झाले होते.मुले शाळेमुळे घराबाहेर त्यामुळे स्वखी एकटीच घरी, जास्त वेळ त्यामुळे नैराश्य आणी थोडीशी अबोल झाली होती.
यावर उपाय म्हणून म्हणा की थोडी हवापालट म्हणून मी बेंगलोरला ट्रीप काढू यात असा प्रस्ताव ठेवला.मुलेही आनंदली कारण दोन एक वर्षापूर्वी हैदराबादची ट्रिप ऐनवेळी रेल्वे आरक्षण कन्फर्म न झाल्याने प्रवासात अनंत अडचणी येऊन हैदराबाद भोज्जा सहल झाली होती.

याच दरम्यान स्वखी तीच्या आईचे वर्षश्राद्धासाठी गावी जाऊन आली. जाण्यापूर्वी दोन-तीन महीने आधी एकदा सहज "मला आधिच्या दोन्ही घरगुती व्यवसायाबरोबर साडी-ड्रेसमटेरिअल असा स्त्रीयांच्या कपड्यांचाही व्यवसाय करवा असे वाटते" असे म्हणाली. मी ही तीचे मन रमणार असेल तर आणि वेळ सत्कारणी लागतोय म्हणून आनंदाने संमती दिलीच. शिवाय लगोलग तीच्याबरोबर पुण्यात (फुरसुंगीला) घाऊक कपडे बाजारात जाऊन व्यवसाय श्री गणेशा केला.माझा सक्रीय सहभाग पाहून तीचा उत्साह द्विगुणीत झाला नसेल तर नवल्.मग गावी गेल्यावर जवळच असलेल्या घाऊक कपडे बाजारात आणखी काही कपडे खरेदी करून त्या व्यवसायत स्वतःला झोकून दिले.

या आधी तीनेच मला प्रत्येक दु:खातून, निराशेतून सावरले होते आता मी फक्त त्या शिकवणीची उजळणी करीत होतो.

तुझ संग प्रीत लगाई सजना
तूने मुझे चोरी से अपना बनाया
प्यार की राहों पे चलना सिखाया
दुख और सुख में जीना बताया
-२
मैं हूँ तुझ पे वारी सजना

पुरेसे शहाणपण ठेऊन तयारी करण्याचा अनुभव घेऊन बेंगलोर सहलीचे नियोजन केले. स्वखीचा सख्खा भाचाच शिक्षणासाठी बेंगलोर मध्ये फ्लॅट घेऊन रहात होता तेव्हा निवास त्याचे सन्याश्याचे मठीवर आणि बाहेरचे फिरणे असा बेत ठरवला. भाचाही आत्या येणार म्हणून खूष होताच. हा भाचा सव्खीच्या जुळ्या भाच्यांपैकी एक, दुसरा शिक्षणासाठी चेन्नै येथे आहे.
=====================================
ह्या जुळे या प्रकाराबाबत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते स्वखीकडे जुळ्यांची खानदानी परंपरा आहे.मधले दोन्ही सख्खे भाउ जुळे.मोठ्या भावाला दोन्ही मुले जुळीच्.मावस बहीणीलाही मुलगा-मुलगी जुळी,मोठ्या मामाला दोन्ही मुले जुळेच. अशी ही परंपरा मी खंडीत केली. तसा मी पहील्यापासून फारसा रूढी परंपरा अनुकरण्याच्या विरूद्ध नाव राखून होतो त्याची फलश्रुती असावी असा माझा अंदाज आहे. असो.
=======================================
अतिरिक्त एक्-दोन दिवस हाताशी ठेऊन त्यानुसार नियोजन केले. मुलांना अनायसे उन्हाळ्याची सुट्टी होतीच. आणि मलाही एक आठवड्याची रजा मंजूर झाली. स्वखीने उत्साहाने सारी तयारी केली.निवासाबरोबरच (भाचा कॉलेजला जात अस्ल्याने) सकाळचा नाष्ता वैगेरे घरीच करायचा असे तिनेच ठरविले. माझ्या बरोबर राहून काटकसरीत दोन्-पावले पुढेच ठेवली. (संगतदोष दुसरे काय?) त्यासाठी लागणारे सारे जिन्नस बरोबर घेऊन एक्दाचे बेंगलूरमध्ये दाखल झालो.
रेल्वे आरक्षण असल्याने प्रवास आरामदायी व बेंगलूरात घेण्यास भाचाच हजर असल्याने काहीच अडचण आली नाही. प्रहिल्या दिवशी पुरेसा आराम करून जवळच्या बिर्ला मंदीरास भेट दिली.(मी प्रत्येक सहलीत किमान एक तरी देवस्थान्-धार्मीक ठिकाण असेल याची काळजी घेत असेच)गृह्लक्ष्मी खूश तर सारे कुटुम्ब सुखात.

दुसर्या दिवशी आम्ही बनर्हट्टा नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी गेलो पण हाय रे कर्मा लोकसभेच्या निवडणूकांमुळे ते बंद होते.(आणि कुठेही पूर्वसूचन दिलेली नव्हती) त्यामुळे आम्च्या सारखेच किमान ३००-४०० लोक तिथेपर्यंत येऊन परत जात होते. आमचा जो हिरमोड झाला त्याची तीव्रता त्यामुळे जरा कमी-कमी होत गेली. घर उपनगर भागात असल्याने घरापासून (जाल्हल्ली क्रॉस ते मॅजेस्टी मुख्य बस स्थानक ते बनरह्ट्टा पार्क असा १.३० त २ तासांचा प्रवास करून येताना मुख्य शहरातील प्रसिद्ध विज्ञान संग्रहालय पाहायला जायचे ठरविले तर तो त्याचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस निघाला.शेवटी जरा बाजारात फेरफटका मारून दुसरे दिवशी भाच्याला कॉलेज असल्याने सिटि टूरने जाण्याचे ठरविले.

पण त्याच्या टूर उगम स्थान मॅजेस्टीक (मुख्य बस स्थानक) पाशी असल्याने तिथे वेळेवर पोहेचावेच लागले.सुट्टीच्या दिवसांतही मुलांना घेऊन तिथे ८.३० पर्यंत पोहोचलो. जन्मजात धांदरट्पणामुळे मी सरकारी (के आर टी सी ) ची टूर बूक करण्याऐवजी के आर टी सी अ‍ॅप्रूव्हड अशी खाजगी टूर बुक केली होती. परिणाम स्वरूप किमान माणसे जमा होईपर्यंत कमाल वेळ घेण्याचे पूण्यकर्म आपोआप प्राप्त झाले. स्थळ दर्शन यादीतील काही ठिकाणे तर अगदी एकाच चौकात समोरासमोर असलेली ठिकाणे दाखवून यादी वाढविली होती.

अशी भरताड स्थळे वगळता .टिपू पॅलेस्,कब्बन पार्क्,नंदी टेपल आणि तेच्च बहुचर्चीत संग्रहालाय दर्शन ही झाले.
फक्त संगहालयाला जरी आणले असते तरी चालले अस्ते इतके ते प्रशस्त आणि आवर्जून पाहण्यासारखे आहे.
संपूर्ण १.३० ते २ तासात फक्त ३ दालनेच पाहून झाली इतर दालनांसाठी “मुलीला व मुलाला तुम्ही दादा (स्वखीचा भाचा)बरोबर स्वतंत्र या” असे सांगीतल्यावरच कन्येचा तिथून पाय निघाला. एकूण तो दिवस संमीश्र गेला पण मुले संग्रहालयामुळे आणि स्वखी सुंदर देवालय दर्शन मुळे खूष होती.

आता चौथ्या दिवशी मात्र भाच्याला सुट्टी असल्याने व त्याची मित्र-मैत्रीण वॉटर पार्कला जात असल्याने मुलगा त्यांचे बरोबर गेला. आणि आम्ही उभयतां कन्यारत्नास घेऊन बनर्हट्टा पार्क गाठले. नेमका सुट्टीचा दिवस (बहुधा आंबेडकर जयंती) असल्याने पहिल्यापेक्षा ३-४ पट गर्दी होती पण ह्या वेळेस वाघ्-सिहांना पाहिल्याशिवाय जायचे नाही असा माय लेकींचाही निश्चय होताच्.मग रांगेने तास दिड तास गोल रिंगण रिंगण खेळत जाळीबंद वाहनात पोहोचलो.

मग मात्र कन्या आणि तिची आई यांनी या जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटला. सुरुवात साध्या क्षेत्रापासून ते आतल्या भागात फक्त पट्टेरी वाघ्,सिह आणी बिबटे चित्ते यांचे वेगवेगळी राखीव क्षेत्रे आहेत (आरक्षीत व प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र प्रवेशद्वार ) आणि वाहन अगदी मोक्याच्या ठिकाणी उभे केले असल्याने प्राणी जवळून पहाता येतात. हत्ती,सांबर्,काळवीट अस्वल यांचे ही दर्शन झाले.

सिंह तर नेमकी रस्त्यावरच घनदाट सावली असल्याने आपल्या कुटुंब-काबील्यासह आसनस्थ होता. गाडी जवळ आल्यावर

"काय ही शिंची कटकट, जरा वामकुक्षी करू देत नाहीत"

म्हणून एक तुच्छता दर्शक डरकाळी फोडून बाजूच्या करवंद जाळीत थांबला.

ही जंगल सफारी सुमारे २.३० ते ३.०० तासांची आहे पण त्या दिवशीची गर्दी पहाता १.३० ते २.०० तासांत आटोपली.
वाहन मदतनीस चालककेबीनची जाळी मोठ्या जागेची असल्याने तेथून "श्रीमंतबाळां" चे फोटो सेशन करून खुलेआम आपली आर्थीक भरभराट करून घेत होता. (प्रत्येक २-४ फोटोंमागे ४००-५०० रूपये)

त्याचेच बाजूला पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयासारखे एक प्राणीसंग्रहालय आहे तेही बघण्यासारखे कासवांच्या,पक्ष्यांच्या,सापांच्या विविध जाती/प्रजाती तसेच इतर नेहमीचे यशस्वी कलाकार आहेतच्.आतमध्ये क्षुधाशांती साठी "कात्रीशीर" अल्पोपाहारगृहे आहेत.

नंतरचे दिवशी जरा नातेवाईक सदीच्छा भेट हा कार्यक्रम केला त्या दिवशीही व पहिल्याच दिवशी मेट्रो प्रवास झाला आयुष्यातील पहिलाच मेट्रो प्रवास तोही आपल्या प्रियजनांबरोबर (एक अ-विस्मरणीय क्षण).
अजून पुण्यातील मेट्रो कागदावरच आहे आणी मुंबैतील सध्या नशीबात नाहीये.

आणि नेमके आमच्या लग्नाचे वाढदिवशी मला पुण्याला निघावे लागले. स्वखी थोडी नाराज झाली खरी पण वाढदिवस साजरा करण्याची भरपाई पुण्यात आल्यावर करू अशी तीची समजूत घातली. मुलांना सुट्टी असल्याने व त्यांचे संग्रहालयाला जाणे असल्याने स्वखी मुलांसह आणखी एक आठवड्यासाठी तिथेच थांबली आणि मी पुण्यास निघालो.

तत्पूर्वी न विसरता स्वखीला खास बेंगलोरची सिल्क साडी भेट दिली होतीच. मला आठवडाभर तरी, त्यांची वाट पहात एकट्याने राहण्यावाचून पर्याय नव्हता.

क्रमशः पुढील भाग अंतीम खुलासा,निवेदन व आभारसह

ऐक स्वखे त्रिधारा : भाग ५
ऐक स्वखे त्रिधारा : भाग ४
ऐक स्वखे त्रिधारा : भाग ३
ऐक स्वखे त्रिधारा : भाग २

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 May 2015 - 1:06 pm | प्रचेतस

सुरेख लिहिताय नाखुकाका.

एस's picture

4 May 2015 - 1:21 pm | एस

+१

यशोधरा's picture

4 May 2015 - 1:17 pm | यशोधरा

बन्नेरघट्टा प्राणीसंग्रहालयाशेजारीच एक फुलपाखरांचे सुरेख उद्यान आहे. ते नाही का पाहिलेत?

नीलमोहर's picture

4 May 2015 - 2:34 pm | नीलमोहर

काही आनंदाचे क्षण !!
बनेरगट्टा पार्क भरपूर मोठे आहे, अस्वलं वाघ सिह जवळून मनसोक्त पहायला मिळतात.

जबरीच लेखन. कात्रीशीर शब्द विशेषकरून आवडला.

जेपी's picture

4 May 2015 - 7:12 pm | जेपी

वाचतोय...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 May 2015 - 8:30 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप छान लिहिलयं.

पैसा's picture

7 May 2015 - 11:04 am | पैसा

लहान मोठे आनंदाचे क्षण वर्णन आवडले!