केजरूके गुलाम

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
31 Mar 2015 - 9:50 pm
गाभा: 

जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.

सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.

या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.

पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?

मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.

असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.

केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.

नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.

प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.

हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.

अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.

या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).

या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया

रच्याकने, पंकज नारंग यांची हत्या होऊन १५ दिवस लोटले. आपले युगपुरूष त्यांच्या कुटुंबियांना अजून भेटायला गेले की नाही?

हा मनुष्य त्याला ज्या कामासाठी दिल्लीच्या लोकांनी निवडून दिले आहे ती सोडून इतर सर्व गोष्टी करत आहे. आय.डी.बी.आय बँकेच्या खाजगीकरणाला युगपुरूषांचा विरोध, सराफांवरील १% कराला युगपुरूषांचा विरोध, सी.रंगराजन समितीने दिलेल्या सूत्राप्रमाणे गॅसच्या किंमती ठरवायला युगपुरूषांचा विरोध, उत्तर प्रदेशात खून झाला-- युगपुरूष तिथे धाऊन गेले. हैद्राबादमध्ये आत्महत्या झाली--युगपुरूष तिथे धाऊन गेले. फक्त दिल्लीमध्ये पंकज नारंग यांचा खून झाल्यावर मात्र युगपुरूषांना तिथे जायला अजून वेळ मिळालेला दिसत नाही. सीयाचीनमध्ये बर्फात गाडल्या गेलेल्या हनुमंतप्पांच्या प्रकृतीची चौकशी करायला पंतप्रधानांनाही हॉस्पिटलमध्ये जायला वेळ मिळाला पण युगपुरूषांना नाही.

या युगपुरूषांना वेळ कशाला मिळतो? तर बॉलिवुडमधले चित्रपट बघायला आणि त्याचे रिव्ह्यू लिहायला. दिल्लीतल्या लोकांनी मुख्यमंत्री निवडून दिला आहे की चित्रपट समिक्षक?

बघाच--युगपुरूष म्हणतात--"वो परेशान करते रहे हम फिल्म के उपर फिल्म देखते रहे"!!

Pic 1

(या असल्या ढोंगी युगपुरूषाला जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे, ज्या पध्दतीने शक्य होईल त्या पध्दतीने आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा उघडे पाडायची प्रतिज्ञा केलेला) ट्रुमन

श्रीगुरुजी's picture

11 Apr 2016 - 2:54 pm | श्रीगुरुजी

केजरीवाल हे कमालीचे नाटकी आणि अंतर्बाह्य ढोंगी आहेत. जिथे जिथे मतांची बेगमी होण्याचा संभव असतो तिथेतिथे जाऊन भडक भाषणे देणे आणि प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपणे हे त्यांचे प्रकार सातत्याने सुरू असतात. दिल्लीत असून पंकज नारंगच्या कुटुंबियांना भेटण्यास यांना वेळ नसतो, पण उत्तर प्रदेश, हैद्राबाद इ. ठिकाणी जाऊन प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपण्यात मात्र यांच्याकडे वेळच वेळ असतो.

गॅरी ट्रुमन's picture

12 Apr 2016 - 2:52 pm | गॅरी ट्रुमन

धागा काढायचा आणि सहा शतकी प्रतिसाद द्यायचाही मान माझाच :)

600

राघवेंद्र's picture

13 Apr 2016 - 8:16 pm | राघवेंद्र

+१

गॅरी ट्रुमन's picture

9 May 2016 - 8:16 pm | गॅरी ट्रुमन

केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने पंतप्रधान मोदींच्या डिग्री सर्टिफिकेटवरून जो धिंगाणा चालवला आहे तो खरोखरच शिसारी आणणारा आहे.

आज भाजपने पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या डिग्रीच्या कॉपी जगजाहिर केल्या तरी यांची भूणभूण चालूच आहे. म्हणे मार्कशीटवर शेवटच्या वर्षाच्या परिक्षेचे वर्ष १९७८ आणि डिग्री सर्टिफिकेटवर १९७९. काय बिनडोकपणा आहे हा. दीक्षांत समारंभ बहुतांश वेळा पुढच्या वर्षी होतो हे यांना माहित नाही का? आणि खाली दिलेल्या बी.ए च्या डिग्री सर्टिफिकेटमध्ये परीक्षा १९७८ मध्ये झाली हे अगदी स्पष्टपणे लिहिले आहे.

BA

दुसरे म्हणजे पहिल्या वर्षाच्या मार्कलीस्टवर नरेंद्रकुमार दामोदरदास मोदी असे लिहिले आहे तर दुसऱ्या वर्षापासून नरेंद्र दामोदरदास मोदी लिहिले आहे. म्हणजे या दोन व्यक्ती वेगळ्या आहेत हे कशावरून सिध्द होते? प्रणव मुखर्जींच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात उल्लेख आहे की ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधींबरोबर ज्या चार मंत्र्यांना शपथ द्या अशी यादी राष्ट्रपतींकडे दिली होती त्यात "प्रणवकुमार मुखर्जी" हे नाव होते. याचा अर्थ ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेणारे आणि सध्या राष्ट्रपती असलेले ही दोन वेगळी माणसे आहेत का?

तिसरे म्हणजे त्यात त्या मकराश्रू फेम आशुतोषने मागणी केली की मोदींनी ज्या केंद्रातून परीक्षा दिली त्याचे नाव सांगावे. उद्या म्हणतील त्या केंद्रातल्या कुठल्या वर्गातून परीक्षा दिली, कुठल्या बाकावरून परिक्षा दिली ही पण माहिती सांगावी. या रिकामटेकड्या लोकांना काही कामधंदे नाहीत म्हणून हे वाटेल त्या मागण्या करतील. म्हणून इतरांनी यांच्या मागण्या मान्य करायच्या की काय?

चौथे म्हणजे यांच्या कळपातल्या राघव चढ्ढाने मागणी केली की जितेंद्रसिंग तोमरला त्याने आपण ज्या कॉलेजचा विद्यार्थी होतो हा दावा केला होता त्या कॉलेजात नेऊन वर्ग, कॅन्टिन, लायब्ररी इत्यादी ठिकाणे कॉलेजात कुठे आहेत ते दाखवायला सांगितले तसे मोदींबरोबरही करावे. म्हणजे मोदी हे external विद्यार्थी होते त्यामुळे ते फॉर्म भरणे किंवा तत्सम कामाशिवाय फारवेळा त्या ठिकाणी गेले असायची शक्यता जवळपास शून्य. आणि ते पण ३५-४० वर्षांपूर्वी. म्हणजे २०१६ मध्ये आपण पंतप्रधान असणार आणि राघव चढ्ढा नामक अडाणी माणूस असली काहीतरी फालतूची मागणी करणार म्हणून मोदींनी ३५-४० वर्षांपूर्वी इमारतीतील ऑफिसे, फॉर्म सबमिशनच्या खिडक्या कुठे आहेत हे सगळे लक्षात ठेवायला हवे होते तर!!

पाचवे म्हणजे गुजरात विद्यीपीठातील एम.ए च्या सर्टिफिकेटमध्ये Entire Political Science असे लिहिले आहे. आणि Entire Political Science म्हणजे काय? मला माहित नाही. पण समजा एखाद्याने इतिहास आणि राज्यशास्त्र ही दोन majors घेतली असतील तर सर्टिफिकेटवर History + Political Science आणि एकच major घेतले तर Entire Political Science असे लिहिले जात असावे ही शक्यता जास्त.

MA

सहावे म्हणजे श्री.रा.रा केजरीवाल यांनी म्हटले की भाजपकडे हे documents आलेच कुठून. दिल्ली विद्यापीठात ते documents सीलबंद आहेत!! म्हणजे चारच दिवसांपूर्वी हे महापुरूष म्हणत होते की दिल्ली विद्यापीठाकडे अशी कोणतेही कागदपत्र नाहीत. मग आता नक्की कोणती कागदपत्रे सीलबंद आहेत असे या महापुरूषांना म्हणायचे आहे?

Kejru

२००१ मधील एका मुलाखतीत मोदींनी म्हटले की हायस्कूलनंतर त्यांनी गाव आणि शिक्षण सोडले. त्यानंतर लगेच पुढच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले की संघातील कोणाच्या आग्रहामुळे त्यांनी बी.ए आणि एम.ए पण केले. पण केजरूच्या गुलामांनी मुलाखतीचा केवळ पहिला भाग (बी.ए आणि एम.ए चा उल्लेख यायच्या आधीचा) सोशल मिडियावर व्हायरल केला. कुणाला वाटावे खरंच मोदी खोटे बोलत आहेत. हे दोन्ही भाग खाली बघायला मिळतील:

भाग पहिला:

भाग दुसरा:

या केजरीवाल आणि आम आदमी पार्टी या दोघांनाही काहीही कामधंदे नाहीत का? दिल्लीत सरकार चालवायची जबाबदारी सोडून इतर सगळ्या विषयांवरून हे धुराळा उडवत आहेत. की ऑगस्टा प्रकरणावरून लोकांचे लक्ष विचलित करायचा यांचा प्रयत्न आहे यांचा? इतका गुडघ्यातला नेता आणि इतका हलकट राजकीय पक्ष १९४७ पासून भारतात झालेला नाही हेच खरे.

यश राज's picture

9 May 2016 - 8:40 pm | यश राज

या केजरीवाल आणि आम आदमी पार्टी या दोघांनाही काहीही कामधंदे नाहीत का? दिल्लीत सरकार चालवायची जबाबदारी सोडून इतर सगळ्या विषयांवरून हे धुराळा उडवत आहेत. की ऑगस्टा प्रकरणावरून लोकांचे लक्ष विचलित करायचा यांचा प्रयत्न आहे यांचा? इतका गुडघ्यातला नेता आणि इतका हलकट राजकीय पक्ष १९४७ पासून भारतात झालेला नाही हेच खरे.

+१११११११११११११११११११११११

यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की या नतद्रष्टांना कामे करायचीच नाहीत नुसता धुरळा उडवायचाय.

आणि विशेष म्हणजे हे नाटक "ऑगस्टा" च्या कालावधीत सुरु आहे यावरूनच संशयाला वाव आहे की युगपुरुष त्यांच्या 'टीम - ए' ला पाठीशी घालताहेत.

काळा पहाड's picture

10 May 2016 - 12:31 am | काळा पहाड

श्री. केजरीवालांच्या बद्दल देशात संताप वाढत चालला आहे. त्यांनी त्यांच्या चेहर्‍याची आणि पार्श्वभागाची काळजी घ्यावी हेच खरं.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 12:33 am | तर्राट जोकर

देशात = मोदीभक्तांत. बरोबर??

सुज्ञ's picture

10 May 2016 - 5:51 am | सुज्ञ

देशात = मोदीभक्तांत असे आपणास का वाटले ? देश म्हणजेच मोदिभक्त असे काळापहाड यांचे म्हणणे आहे असे आपणास वाटत असेल तर त्यांना असेच म्हणायचे होते ( देश = मोदिभक्त ) याबद्दल काही विदा द्या .

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 9:17 am | तर्राट जोकर

मीच शंका विचारली आहे दोन दोन प्रश्नचिन्हे टाकून त्यांना हे आपल्याला कळले नाही काय? मीच त्यांना विचारतोय की त्यांना ( देश = मोदिभक्त ) असेच म्हणायचे आहे काय.

तजो...मोदींची डिग्री या सुरु केलेल्या वादाविषयी तुम्हाला काय वाटते ते लिहावे ही विनंती.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 10:24 am | तर्राट जोकर

=))

बाकी काय नाही. हे एन्टायर पॉलिटिकल सायन्स काय आहे ह्याची उत्सुकता आहे.

कोण्या सीएम ने कोण्या पीएम ची डिग्री मागणे आणि त्याच्या बगलबच्च्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या दाखवणे ह्याचा अर्थ देशात लैच रिकामटेकडे लोकं राज्य करत आहेत असं सामान्य माणसानं सम्जून घ्यावं.

"देशात लैच रिकामटेकडे लोकं राज्य करत आहेत असं सामान्य माणसानं सम्जून घ्यावं"
सहमत !

"सीएम ने कोण्या पीएम ची डिग्री मागणे"
हाच माझा मुद्दा आहे आणि हे जास्त क्लेशदायक आहे.

गॅरी ट्रुमन's picture

10 May 2016 - 10:51 am | गॅरी ट्रुमन

हे एन्टायर पॉलिटिकल सायन्स काय आहे ह्याची उत्सुकता आहे.

तुमच्यासारखे लोक कितीही पुरावे दिले तरी काहीतरी खुसपटे काढतच राहणार. हे नाहीतर ते.

मी वर "एन्टायर पोलिटिकल सायन्स" म्हणजे काय असेल याविषयीचा तर्क लिहिला होता तो बरोबर होता हे खुद्द गुजरात युनिव्हर्सिटीच्याच संकेतस्थळावरून स्पष्ट झाले आहे. खुद्द गुजरात युनिव्हर्सिटी M.A with Entire History ही पदवी अजूनही देते हे स्पष्ट होईलच. अशीच "एन्टायर पोलिटिकल सायन्स" ही पदवी त्यावेळी कशावरून देत नसतील?

उगीच फालतू मुद्द्यावरून राळ उठवत राहायची हा तुमच्यासारख्यांचा (व्यक्तिश: तुम्ही नाही तर केजरू समर्थक) खाक्याच आहे.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 12:00 pm | तर्राट जोकर

ट्रुमन साहेब, माइन्ड युवर लॅन्ग्वेज सर. "तुमच्यासारखे" लोक म्हणजे???

माझे स्वतः पोलिटिकल सायन्समधे बी ए झाले आहे. आयुष्यात पहिल्यांदा 'एन्टायर पोलिटिकल सायन्स' अशी काही पदवी असते हे कळले त्याबद्दल जेन्युइन उत्सुकता होती. माझ्यापेक्षा अधिक ज्ञानी माहितगाराने ती द्यावी म्हणून प्रश्न उपस्थित केला होता.

बाकी तुमचा तर्कः एम ए विथ एन्टायर हिस्टरी आहे म्हणून एम ए विथ एन्टायर पॉलिटिकल सायन्स "असू शकते" हा तर्क तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिकडून अपेक्षित नाही. गुजरात विद्यापिठातून ह्या विषयावर पदवी मिळवणारे मोदी एकमेव असू शकतील किंवा कसे ह्याबद्दल माझी वैयक्तिक काही भूमिका नाही.

तसेच 'मी केजरुसमर्थक नाही' ह्यासाठी अग्निपरिक्षा द्यावी लागेल काय, जेणेकरुन प्रश्न उपस्थित करणार्‍या माझ्यासारख्या उत्सुकांची गरजहीन हेटाळणी बंद होईल?

तजो हे मिपावरचे अरविंद केजरीवाल आहेत. एखाद्या विषयाचे सहा पेपर्स जेव्हा तुम्ही देता तेव्हा त्याला entire किंवा major असं म्हटलं जातं. पण त्यांच्या विद्यापीठात तसं म्हटलं जात नाही म्हणजे जगातल्या कुठल्याच विद्यापीठात म्हटलं जात नाही हे typical केजरीवाल style गृहीतक त्यांनी इथे मांडलंय त्यावरून हे सिद्ध होतंच.

आणि तजो, तुमच्या भाषेचे पुरावे इथे देऊ का? Mind your language असं दुस-याला म्हणताना तुमची स्वतःची भाषा किती छान आहे ते दाखवणारं एक अप्रतिम उदाहरण आहे इथे.
http://www.misalpav.com/user/26378/guestbook.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 12:39 pm | तर्राट जोकर

बोकाशेठ, दुसर्‍याच्या खरडी मेनबोर्डावर टाकू नये इतका विधिनिषेध नसणारांनी मला शिकवू नये असे म्हणेन.

मी कुठलंच गृहितक इथे मांडलं नाही. मला खरोखर हा 'एन्टायर पोलिटिकल सायन्स' विषय माहित नाही हे जेनुइनली सांगतोय त्यावर स्पष्ट उत्तर द्यायचे सोडून इथले सदस्य अशा पद्धतीने अटॅक करत असतील तर दुर्दैव आहे. माझी मानहानी करुन तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही तर तुम्ही फार कच्च्या मनाचे आहात, खवळले आहात, तुमचं संतुलन बिघडतंय हेच सिद्ध होतं.

बाकी, तुड्तुडीच्या खरडवहीतली माझी खरड ही कायम बचावासाठी वापरली जाणार असेल तर विरोधी पक्ष फारच कमकुवत आहे हे दिसून येतंय. मुद्दे नसल्याची खूण आहे ही. अगदी हास्यास्पद पवित्रा.

बोका-ए-आझम's picture

10 May 2016 - 12:48 pm | बोका-ए-आझम

अगोदर मान आणा मग मानहानीबद्दल बोलू आपण. बाकी यावरून तुम्ही मिपावरचे केजरीवाल आहात हे सिद्ध होतंच आहे. आणि तुम्ही काहीही लिहावं आणि इतरांनी त्याचा वापर तुमच्या वागण्यातली विसंगती दाखवण्यासाठी करु नये अशी तुमची अपेक्षा असणं यावरून तर तुमचं अरविंदत्व अगदी निर्विवाद सिद्ध होतंय. मुद्दे तुमच्याकडे नाहीयेत. आणि एका व्यक्तीच्या आईबद्दल असं लिहिणाऱ्याने मला खवळलेलं, संतुलन बिघडलेलं वगैरे म्हणावं हा त्याहून दुसरा जोक.
पण शेवटी जोकर आणि तोही तर्राट, त्यामुळे काय अपेक्षा करणार?

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 12:58 pm | तर्राट जोकर

सरपंच, मालक. ह्या विषयाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावाल काय?

इथे तुडतुडीच्या खरडीबद्द्ल चर्चा करायची आहे काय? परत परत मला तेच लिहायला लागेल काय? तुडतुडीचे प्रतिसाद डिलिट झालेत ते बघितले असते तर परत परत तुडतुडीच्या खरडवहीतले माझे लेख्न इथे स्वतःच्या बचावासाठी वापरले नसते.

बोकाशेठ, एवढं भडकायला तुम्हाला काय झालंय? ट्रुमनसाहेबांचे वकिलपत्र घेतलंय काय? एक साधासा प्रश्न मोदीभक्तांना किती टोचू शकतो हे बघून आनंद होतोय. सरळ प्रश्नाला सरळ उत्तर देता येत नाही म्हणून थयथयाट का करायला लागतोय? जो कोणी मोदीविरोधक आहे तो कॉन्ग्रेस्सी, आप्टार्ड, केजरीवाल समर्थ्क, देशद्रोही अशी लेबलं लावण्यातच मोदीभक्तांची बुद्धी (असलीच तर) खर्च होत आहे हे पाहून मजा वाटते.

काहीही म्हणणं नाही. अगदी अश्लाघ्य शब्दांत करा. काहीही फरक पडत नाही. पण कसं आहे, जेव्हा तुम्ही एखाद्याला Mind your language वगैरे सल्ला देता तेव्हा त्या सल्ल्याप्रमाणे आपण स्वतः वागतो का हे बघा. मी असले सल्ले देत नाही आणि त्यामुळे असली वेळही माझ्यावर येत नाही.
आता प्रश्न ट्रूमनभौंचा - तर ते माझे मित्र आहेत. त्यांच्यावर कुणी काही आरोप केला तर पुढे येणं ही अगदी साहजिक प्रतिक्रिया आहे.
आणि हेही सांगू इच्छितो की तुम्हीही माझे मित्र आहात. उद्या तुमच्यावर कुणी असले आरोप केले तर मी तुमच्याही बाजूने उभा राहीन. शंका नसावी.
राहता राहिला प्रश्न तुमच्या खरडीचा. त्यातल्या मजकुराबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे हा प्रश्नच नाही. फक्त समोरच्याला त्याच्या भाषेवरुन बोलताना आपणही कधी काळी अश्लाघ्य भाषा वापरलेली आहे याचा विसर पडू देऊ नका.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 2:02 pm | तर्राट जोकर

साहेब, कुणी मला दुरान्वयानेही 'केजरीसमर्थक' म्हणणे माझा अपमान वाटतो. त्यासाठी त्यांना तसे बोललोय.

बाकी मित्र वैगरेंचा प्रश्न. तर तो तुमच्या दोघांमधे वैयक्तिक राहिलेला बरा. कंपुबाजीसाठी 'मित्र आहोत' ही भलामण योग्य वाटत नाही.

ज्याच्यात्याच्या लायकीप्रमाणे भाषा मी वापरतो. ज्याच्यासाठी जशी भाषा वापरली ती त्याला त्याच भाषेत समजतं हे लक्षात आल्यामुळे. बाकी ती खरड आपण नेहमी नेहमी चर्चांमधे वापरत राहणार असाल तर असो. मला चर्चा करतांना असल्या कुबड्यांची गरज भासत नाही. म्हणून मी कोणाच्याही कोणत्याही खरडी इथे मेनबोर्डावर आणत नाही.

विसंगती दाखवण्यासाठी तुम्ही इथे ती खरड आणली ही लंगडी सबब आहे. माझ्याशिवाय इतर कोणा आयडीने हाच प्रतिसाद दिला असता तर आपण कोणाची खरड आणायला गेला असता? मुद्द्यांची लढाई मुद्द्यांनी करावी. चीप मेथड्स वापरुन तुमचा पवित्रा 'पवित्र' होत नाही हे लक्षात असू द्यावे.

गॅरी ट्रुमन's picture

10 May 2016 - 2:18 pm | गॅरी ट्रुमन

ज्याच्यात्याच्या लायकीप्रमाणे भाषा मी वापरतो.

इतरांची लायकी ठरविणारे तुम्ही कोण? कोणी अधिकार दिला तो तुम्हाला? आणि तुम्ही इतरांची लायकी काढत असाल तर तुमचीही लायकी कोणीतरी कधीतरी काढणारच हे गृहित धरायला हवे. मग तक्रार करून उपयोग नाही.

कुणी मला दुरान्वयानेही 'केजरीसमर्थक' म्हणणे माझा अपमान वाटतो.

तुम्ही जर इतरांच्या लायकीवर टिप्पणी करत असाल तर तुमचे मान आणि अपमान इतरांनी सांभाळावेत ही अपेक्षा तुम्ही कशी काय करू शकता?बरं तुम्ही काही वाटेल ती अपेक्षा कराल पण तुमची ती अपेक्षा पूर्ण होईलच असल्या भ्रमात मात्र राहू नका इतकेच.

रच्याकने, मिपा सारख्या सुसंस्कृत लोकांच्या संकेतस्थळावर इतरांची लायकी काढायच्या प्रवृत्तीला मज्जाव असावा असे मनापासून वाटते.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 2:40 pm | तर्राट जोकर

ओके, म्हणजे तुम्हाला 'सर, साहेब' म्हणून मान देणे चुकीचे व तुम्ही कोणालाही तुमच्या इच्छेनुसार केजरु समर्थक म्हणून हेटाळणी करणे योग्य. धन्यवाद ह्याबद्दल.

बाकी मी तुमची लायकी काढलेली नाही. बोकांनी तुमच्या मित्रत्वाचा आव आणून तुडतुडीच्या खरडवहीतली खरड इथे आणुन चिकटवली त्या तुडतुडीच्या भाषेची लायकी काढली. मला हे इतके स्पष्टीकरण का द्यावे लागत आहे?

मिपासारख्या सुसंस्कृत लोकांच्या संकेतस्थळावर एखाद्या सदस्याला आगापिछा माहित नसतांना वाट्टेल ते लेबल चिकटवून लगे हात हेटाळणी करुन आपला अहं सुखावून घेणार्‍यांनी प्रवॄत्तींबद्दल टिप्पणी करावी हे मजेशीर आहे.

तसेच कुणालाही केजरुसमर्थक म्हणून हेटाळणी करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिलाय ते कळले तर बरे होईल.

तसेच कुणालाही केजरुसमर्थक म्हणून हेटाळणी करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिलाय ते कळले तर बरे होईल.

केजरीलाही विरोध करणार्यांना लगेच भक्त म्हणण्याचा अधिकार घटनादत्त असतो का ??????

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 3:11 pm | तर्राट जोकर

"मोदींसाठी कायपण" वाल्यांना भक्त म्हणतात. केजरी मोदींच्या विरोधात आहे म्हणून भक्तांची जळजळ होते आहे. तोच सोनियाच्या विरोधात असता तर दिल्लीत रामराज्य अवतरल्याची ग्वाही मोदीभक्त फिरले असते. =))

"मोदींसाठी कायपण" वाल्यांना भक्त म्हणतात.

त्याप्रमाणेच बिनबुडाचा मोदीविरोध करणार्यांना केजरी चे चेले कींवा गुलाम म्हणतात.

केजरी मोदींच्या विरोधात आहे म्हणून भक्तांची जळजळ होते आहे. तोच सोनियाच्या विरोधात असता तर दिल्लीत रामराज्य अवतरल्याची ग्वाही मोदीभक्त फिरले असते. =))

यावरुन तर बोलणेच खुंटते कि विरोध करणार्यांना देशात चाललेल्या भ्रष्टाचारापेक्षा मोदीविरोध करणात जास्त रस आहे.

बोका-ए-आझम's picture

10 May 2016 - 3:13 pm | बोका-ए-आझम

तुम्ही त्या खरडीत वापरलेली भाषा अगदी सुंदर आणि अनुकरणयोग्य आहे असा आपला दावा आहे काय? त्यात आपण तुडतुडी यांना त्यांच्या अाईवरुन जे काही लिहिलेलं आहे ते वाचल्यावर लोकांनी पुष्पवृष्टी करावी अशी तर ती भाषा नक्कीच नाहीये. बरं, त्यावरून लोकांनी तुम्हाला काहीही बोलू नये अशी तुमची अपेक्षा आहे काय? ते public domain मध्ये आहे अाणि public चा एक घटक म्हणून मला त्यावर टिप्पणी करायचा किंवा जेव्हा त्या खरडीचा लेखक दुसरीकडे एखाद्याला Mind your language म्हणून चारचौघांत आवाज देतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या भाषेचा पुरावा म्हणून द्यायचा पूर्ण अधिकार आहे. मग तुम्हाला संपादक किंवा मालक काही बोलले असोत वा नसोत.
मी पुन्हा एकदा सांगतोय. मी तुमच्या खरडीवर काहीच बोललो नाही. माझा प्रतिसाद वाचा. तुम्ही ती खरड लिहिलीत ही वस्तुस्थिती आहे. तुम्हीच ट्रूमन यांना Mind your language म्हणालात हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि या दोन गोष्टींमधली विसंगती मी वाचकांसमोर आणलीय. Why so serious?

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 3:21 pm | तर्राट जोकर

दोन व्यक्तींमधल्या खरडी मेनबोर्डावर आणू नये असे मिपाचे अधिकृत धोरण आहे. ह्याऊप्पर तुम्हाला जो काय थयथयाट करायचा असेल ना तो करा. त्या खरडीबद्दल मी मिपामालक सोडून कोणालाच कसलेच स्पष्टीकरण देणे लागत नाही. कोणीही त्याबद्दल स्पष्टीकरण मागायचा, टिप्पणी करायचा चोंबडेपणा करण्याची काहीएक गरज नाही.

तुम्हाला इथे लोकांच्या खरडी चिकटवण्याचा मालकांनी स्पेश्यल परवाना, अधिकार दिला असेल तर त्याचा पुरावा द्यावा. अन्यथा अनेकांच्या अनेक खरडी इथे जाहीर करण्यास व त्यावर यथेच्छ काथ्या कूटण्यास मिपा मालकांकडून मुभा आहे असे समजण्यात येईल ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

यात

दोन व्यक्तींमधल्या खरडी मेनबोर्डावर आणू नये असे मिपाचे अधिकृत धोरण आहे.

असं कुठे म्हटलंय ते दाखवा.

नमस्कार,
आज दिनांक १३/०७/१० ला मिसळपावच्या धोरणांना प्रसिध्दी देतांना आनंद होत आहे. ही धोरणे मिसळपावची यापुढील मार्गदर्शक असतील. यापुढे मिसळपाववर वावर करतांना आणि लेखन करतांना सदस्यांना ही धोरणे मान्य आहेत असं गृहीत धरल्या जाईल.

१. मिसळपावावरील लेखनात ललित किंवा वैचारिक लेखन, गद्य, पद्य, पाककृती यांना स्थान दिले जाईल. या व्यतिरिक्त खेळीमेळीचे धागे मिसळपावावर ठेवले जातील. लेखन मिसळपावावर राहण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरवण्याचा आणि मिसळपावावर येणारे साहित्य प्रकाशित किंवा अप्रकाशित करण्याचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल. एखाद्या सदस्याने मिसळपावाचे सदस्यत्व सोडले असता त्याचे लेखन प्रकाशित ठेवण्याचा किंवा अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेईल.

२. स्वरचित साहित्याखेरीज इतर कुणाचेही लेखन, मूळ लेखकाच्या परवानगीशिवाय मिसळपावावर प्रकाशित करता येणार नाही. एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून इतरांच्या लेखनातील दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद द्यावा. इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिसळपाव सदस्यांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर लेखकाला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा.

३. आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे झाल्यास मिसळपावाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करता येईल.

४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी.

५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करणारे लिखाण, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल.

६.नवे लेखन करताना एक-दोन ओळींचे लेखन करू नये. असे लेखन अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळ घेऊ शकते याची नोंद घ्यावी.

७. संपादकीय धोरणात परिस्थिनुरुप बदल करण्याचे हक्क संपादकांकडे राखीव आहेत. त्याचा वेळोवेळी वापर करता येईल. गरज भासल्यास सदस्यांना जाहीर निवेदनामार्फत तशी सूचना दिली जाईल.

८ . वारंवार सूचना/ ताकीद देऊनही एखाद्या सदस्याचा खोडसाळपणा दिसून येत असेल तर विशिष्ट कालावधीसाठी व्य.नि. आणि खरडवहीची सुविधा काढून घेण्याचे अधिकार संपादक मंडळाला आहेत. या उपायानंतरही सदस्याच्या वागणूकीत सुधारणा नसल्यास सदस्याचे खाते बंद होऊ शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी.

९. संकेतस्थळावरील अडचणी, लेखांचे संपादन, संपादनाविषयी तक्रारी यांच्यावर निघणारे धागे संपादन मंडळाला अनावश्यक वाटल्यास त्वरित उडवले जातील आणि त्याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले जाणार नाही.

१०. येथील सर्व लेखनप्रकारातील आणि सर्व विषयांवरील लेखन तसेच त्यावरील सर्व प्रतिसाद, हे त्या त्या लेखन/प्रतिसाद कर्त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याला मिपा व्यवस्थापनाचे कुठल्याही प्रकारे/अर्थाने अनुमोदन नाही याची सर्व सदस्य, लेखक आणि वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

मिसळपावाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी वरील सूचनांचे पालन करावी अशी अपेक्षा आहे. सदस्यांना लेखनविषयक धोरणांची जाणीव करून देण्यास आणि वेळोवेळी मदत करण्यास संपादक मंडळ नेमलेले आहे. लेखनविषयक प्रश्न असल्यास जाहीर लेख न टाकता संपादकांना खरडी किंवा व्यक्तिगत निरोपांद्वारे विचारावेत. संपादक मंडळ या आयडीवर निरोप पाठवूनही हे प्रश्न विचारता येतील.

काळा पहाड's picture

10 May 2016 - 3:39 pm | काळा पहाड

दोन व्यक्तींमधल्या खरडी मेनबोर्डावर आणू नये असे मिपाचे अधिकृत धोरण आहे.

हे कुठे प्रकाशित आहे हे कृपया सांगू शकाल काय? मी धोरण (येथे: http://www.misalpav.com/node/13199) जावून पाहिलं. मला असं काही सापडलं नाही.
एक खालील प्रकारचं धोरण मिळालं.

४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी.

पण दोन व्यक्तीं मधील खरडीचा रेफरन्स किंवा खरड मुख्य बोर्डावर आणू नये असं काही मला दिसलं नाही. तुम्ही नक्की कुठल्या धोरण नंबर बद्दल बोलत आहात?

तर त्यांनाही customized प्रतिसाद दिला असता. कल्जी क्रू नये. विसंगती दाखवायलाच तुमची खरड दाखवली. रच्याकने खरडवही म्हणजे व्यनि नव्हेत, जे व्यक्तिगत असतात. तुम्ही openly काही लिहिणार आणि लोक त्याचा तुमच्याविरुद्ध वापर करणार नाहीत असं का वाटतं तुम्हाला? Anything that you say can and will be used against you as evidence हे कायद्याचं महत्वाचं तत्व आहे. You are probably learning it the hard way.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 2:44 pm | तर्राट जोकर

ओ, साहेब. लै झालं. कायदा मला शिकवू नका. मिपाच्या मालकांना सरपंचांना शिकवा.

बरं, कायदा शिकवण्याने किंवा न शिकवण्याने काहीच फरक पडत नाही. कायदा माहीत नसणं ही सबब चालत नाही एवढं मात्र सांगू इच्छितो. शिवाय सरपंच आणि मालकांना कायदा शिकवा हे सांगून नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही त्यांच्यापेक्षा वर आहात आणि ते तुमच्या खिशात आहेत किंवा ते तुम्हाला हात लावू शकत नाहीत असं काहीतरी? सांगा सांगा. घाबरु नका. आम्हाला तरी कळू दे, नक्की काय आहे ते.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 3:26 pm | तर्राट जोकर

मिसळपावचे कायदे तुम्ही ठरवता काय? तुम्ही स्वत: त्यांनी ठरवलेल्या नियमांच्या वर आहात काय? तुम्ही त्यांच्यापेक्षा वर आहात आणि ते तुमच्या खिशात आहेत किंवा ते तुम्हाला हात लावू शकत नाहीत असं काहीतरी? सांगा सांगा. घाबरु नका. आम्हाला तरी कळू दे, नक्की काय आहे ते.

अगम्य's picture

11 May 2016 - 10:56 am | अगम्य

मराठी शब्दभांडारात एक नवे रत्न जमा केलेत तुम्ही :-)

दिगोचि's picture

16 May 2016 - 6:17 am | दिगोचि

प्रत्येक विश्वविद्यालय ते देत असलेल्या पदव्याना वेगळि नावे देउ शकते. तेम्व्ह मला अशी अशी पदवी आहे आणि म्हणुन दुसर्या युनिव्हरसिटीने पण त्यान्च्या पदवीला पण हेच नाव दिले पाहिजे हा आग्रह का? या शिवाय गुजराथ युनिवेर्सिटी खोते सान्गत आहे असे म्हणायचे असेल तर उगीच शन्का कुशन्कान्चा गदारोळ उठवण्यापेक्षा कोर्त्टात जाउन त्या युनिवेर्सिटिवर खटला भरून खर्या खोत्याची शहानिशा करून घ्यावी.

श्रीगुरुजी's picture

16 May 2016 - 2:27 pm | श्रीगुरुजी

+ १

M.C.A. हा अभ्यासक्रम वेगवेगळ्या संस्था चालवितात. या पदवीच्या प्रमाणपत्रावर M.C.A. या शब्दांपुढे कंसात Master of Computer Applications किंवा Master in Computer Applications असे लिहिले असते. यात जरी थोडासा फरक असला तरी ही एकच पदवी आहे.

मुद्दे नसले की असले उद्योग सुचतात आणि जर डिग्री दाखवली नसती तर "बघा बघा त्यांच्याकडे पुरावेच नाहीयेत म्हणून प्रतिवाद करत नाहीयेत" अशी कोल्हेकुई सुरू झाली असती. (अंतर्जालावरसुद्धा.)

एकूण काय.. परदेशी NGO चा फुकट मिळणारा पैसा बंद झाल्यामुळे या बाजुने किंवा त्या बाजुने असे मिळेल तेथून मोदींवर टीका करणे सध्या सुरू आहे. (बहुदा अंतर्जालावरसुद्धा.)

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 12:02 pm | तर्राट जोकर

मी तरी पंतप्रधानाच्या कार्यपद्धती व कार्यक्रम अंमलबजावणीवर जास्त भर देतो. पंतप्रधानांची डिग्री शोधणे आणि दाखवत बसणे रिकामटेकड्या लोकांचे उद्योग आहेत हे वरच नमूद केले आहे.

मोदक's picture

10 May 2016 - 12:33 pm | मोदक

मी तरी पंतप्रधानाच्या कार्यपद्धती व कार्यक्रम अंमलबजावणीवर जास्त भर देतो.

अरे व्वा.. वाचून आनंद जाहला.

काम दाखव फेकू या असल्या कविता व दिसेल तिथे तुम्ही दाखवणारा मोदी द्वेष या गोष्टी उघड असूनही "तुम्ही पंतप्रधानांच्या कार्यपद्धती व कार्यक्रम अंमलबजावणीवर भर" देता आहात हा अंमळ विरोधाभास आहे हे तुमच्या लक्षात येते आहे का?

बाकी तुमची एकंदर वाटचाल बघता, मोदींनी केलेली चांगली कामे सोडून तुम्हाला फालतू मुद्द्यांमध्ये रस आहे हे अनेकदा सिद्ध झाले असतानाही तुम्ही एखाद्या विचारवंताचा आव आणून 'पंतप्रधानांची कार्यपद्धती' वगैरे लिहित आहात याचे आश्चर्य वाटले.

असो.. शुभेच्छा.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 12:49 pm | तर्राट जोकर

अरे वा. एखाद्यावर विनोदी टिप्पण्या करणे हे द्वेषाचे लक्षण आहे माहित नव्हतं. बरोबर, जेव्हा ते मोदी असतात तेव्हा समिकरणं एकशे ऐंशी अंशात बदलतात हे विसरलो होतो. मनमोहनसिंगावर अशा टिप्पण्या देशप्रेमातून होत्या हे आठवतंय अंधुक अंधुक. धन्यवाद!

बाकी भक्तांची एकंदर वाटचाल बघता, मोदींनी केलेली चांगली कामे सोडून त्यांनाही फालतू मुद्द्यांमध्ये रस आहे हे अनेकदा सिद्ध झाले असतानाही तुम्ही असे प्रतिसाद देत आहात याचे आश्चर्य वाटेनासे झाले. मोदीविरोधात जरा खुट्ट झाले की तलवारी परजणारे बघून फक्त हसायला येतं. थ्यान्क्स फॉर एन्टरटेनमेंट....

एखाद्यावरच सतत द्वेषपूर्ण टिप्पण्या करणे हे विनोदी मानत असाल तर अशा लिखाणामागची अर्थपूर्ण गणिते कळत नाहीत असे नसते म्हणजे तुम्हाला जळीस्थळी मोदी दिसतात तसे मला मनमोहन आणि राहुल दिसत नाहीत यातच तुमचे जे काय आहे ते समिकरण स्पष्ट होते.

स्वतःच्या विधानांमधली विसंगती दिसलीकी लगेच मोदीभक्त मोदीभक्त चा जप करायचा आणि मुद्दे सोडून पाय लावून पळून जायचे हे आणखी एकदा सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 1:11 pm | तर्राट जोकर

तुम्ही तुम्हाला काय वाटून घ्यायचे ते वाटून घेण्यास स्वतंत्र आहात. जळीस्थळी मोदी, भाजपबद्दल प्रचारकी लेखन करणार्‍यांची अर्थपूर्ण गणिते तुमच्या चाणाक्ष नजरेतून सोयिस्कर सुटत असतील तर विशेष आहे.

बाकी पाय लावून पळालेले दिसणे किंवा कसे हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते.

"एन्टायर पॉलिटिकल सायन्स काय आहे"

ह्या विषयाकार कालपरवा गुजरातच्या त्या कुलगुरूंनी माहिती दिली आहे.

तर्राट जोकर's picture

10 May 2016 - 2:10 pm | तर्राट जोकर

खरडफळ्यावर बोकाशेठ यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. तेच इथे आधी दिले असते तर इतकी हाणामारी करायची गरज नसती पडली. पण ऐकणार कोण?

अनुप ढेरे's picture

10 May 2016 - 10:24 am | अनुप ढेरे

स्वतः केजरीवालांचच पॅनकार्ड आणि मतदारयादीत वेगवेगळं नाव आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल, दुसरीकडे अरविंदकुमार केजरीवाल. =))

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 8:35 pm | तर्राट जोकर

दिल्लीत सरकार चालवायची जबाबदारी सोडून

>> ह्याबद्दल पुरावा देता येईल??

आरोह's picture

9 May 2016 - 9:31 pm | आरोह

जेव्हडी जास्त वयक्तिक आरोप होतील तेव्हढे मोदींसाठी चांगले आहे.

आम आदमी पार्टीचं देशाच्या राजकारणाला नवीन दिशा द्यायचं स्वप्न आपल्या वैयक्तीत महत्वाकांक्षेपायी आणि सूडबुद्धीपायी पार मातीत मिळवलं या माणसाने. वेमुला वगैरे प्रकरणात प्रत्येक ठिकाणी पर्सनली जाऊन चोच मारणार्‍या या साहेबांनी बिहारमधे एका आमदाराच्या पोराने माजोरडेपणाने एकाची हत्या केली त्या व्हिक्टीमच्या घरी जाऊन सांत्वन करायची इच्छा झाली नाहि या टुकार इसमाला. आणि या डिग्री प्रकरणात तर काय मर्कट थयथयाट चालवला आहे.

अवांतरः
पंजाबमधे आम आदमी पक्ष सत्तेत यावा अशी आमची इच्छा आहे.

सुज्ञ's picture

10 May 2016 - 5:39 am | सुज्ञ

सतत काहीही करून प्रसिद्धीत राहण्याची या मूर्ख टोळीची धडपड विलक्षणीय आहे. सोनिया म्याडम कडे मोदींची काही गुपिते आहेत ( आणि हे मोदी ना माहित आहे ) आणि त्यामुळे मोदी म्याडम ना वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत असा एखाद्या सद्य राजकारणातील अत्यंत तोकडे ज्ञान असणार्या माणसासही सुचणार नाही असा बिनडोकी युक्तिवाद हे युगपुरुष करत आहेत आणि यांचे सर्व गुलाम स्वताच्या मूर्खपणाची चढाओढ लागल्यासारखे हे जे म्हणतील त्यास कोणताही विचार न करता पाठींबा दर्शवत आहेत.

तस्मात कुंभार हो … गाढवास तोटा नाही … हे अगदी खरे…
चांगला कुंभार मग बरेच गद्धे आपोआप एकत्र आणवतो हे ही तितकेच खरे.

अनुप ढेरे's picture

10 May 2016 - 10:51 am | अनुप ढेरे

केजरींचे २१ आमदार डिस्क्वालिफाय होण्याच्या मार्गावर आहेत. लाभाचे पद भुषवले म्हणून.

श्रीगुरुजी's picture

10 May 2016 - 2:39 pm | श्रीगुरुजी

अंतर्बाह्य ढोंगी व नाटकी असलेले केजरीवाल व त्यांचे आआपमधील रिकामटेकडे टोळभैरव यांनी भारतीय राजकारणात

"टॅब्लॉईड राजकारण"

असा एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे. त्यांची मोड्युस ऑपरंडी अशी आहे.

- सुरवातीला केजरीवाल ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर पूर्णपणे निराधार, खोटे व खोडसाळ आरोप करतात.

- काही वेळाने अभिनयाचे ऑस्कर पारितोषिक जिंकलेला आशुतोष आणि बाईमाणूस कुमार विश्वास पत्रकार परीषद घेऊन आरोपांचा पुनरूच्चार करून मोदींवर अजून नवीन आरोप करून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन मोदींवर टीका करतात. बनावट चित्रफिती, अस्तित्वात असलेल्या चित्रफितीतील फक्त थोडाच भाग दाखविणे, वेगवेगळ्या चित्रफिती तयार करून एक नवीन चित्रफीत तयार करणे व त्याद्वारे अजून नवीन खोटे आरोप करणे ही यांच्यावर टाकलेली जबाबदारी आहे (आपल्यावर पोलिसांनी व्हॅन घालून आपल्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची खोटी चित्रफीत दिलीप पांडेने पत्रकार परीषदेत दाखविल्याचे आठवत असेलच).

- नंतर संध्याकाळी वृत्तवाहिन्यांच्या चर्चासत्रात सहभागी होऊन आआपचे गुंड संजय सिंह, दिलीप पांडे इ. रिकामटेकडे मोदींवर अजून नवीन आरोप करतात व चर्चासत्रात सहभागी झालेली इतर माणसे जेव्हा त्यांची बोलण्याची वेळ आल्यावर स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करतात तेव्हा हे आआपवाले त्यांच्या बोलण्यात सातत्याने अडथळे आणून त्यांना बोलून देत नाहीत व त्यांचे स्पष्टीकरण दर्शकांपर्यंत पोहोचू देत नाहीत.

- नंतर केजरीवाल ट्विटरच्या माध्यमातून अजून नवीन आरोप करतात.

- आणि हीच पद्धत पुढे अनेक दिवस सुरू राहते. वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने खोटे आरोप करून एखाद्याला सतत बदनाम करीत राहणे व टीआरपी मिळविणे हीच यांची मोड्युस ऑपरंडी आहे.

आपल्या कामाने स्वतःची उंची वाढविण्यापेक्षा दुसर्‍यांचे मस्तक छाटुन आपण त्याच्यापेक्षा उंच आहोत हे सिद्ध करण्याची यांची ही अत्यंत घॄणास्पद प्रवृत्ती आहे.

यांच्या कार्यपद्धतीमुळे गोबेल्ससुद्धा शरमला असेल व आपल्या थडग्यात अस्वस्थ होऊन कूस बदलत असेल.

केजरीवाल यांच्या इतका खालच्या थराला गेलेला व अत्यंत घृणास्पद कृत्ये करणारा नेता आजपर्यंत भारतीय राजकारणात झालेला नाही व पुढेही होईल असे वाटत नाही.

"मोदींचे केस खरे नसून ते टोप वापरतात व प्रतिज्ञापत्रात आपल्या टोपाची माहिती न दिल्याबद्दल मोदींनी राष्ट्राची माफी मागावी" असा आरोप भविष्यात केजरीवालांनी केल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

एखाद्याचा 'तू केजरीवाल आहेस' असा उल्लेख करणे म्हणजे त्याला घाणेरडी शिवी देण्यासारखे आहे असे मी पूर्वी म्हटले होते. त्याचा प्रत्यंतर पुन्हापुन्हा येत आहे.

दिगोचि's picture

23 May 2016 - 8:47 am | दिगोचि

इन्ग्लिश भाशेमधे एक म्हण आहे ज्याचा अर्थ रिकामटेकड्या माणसाच्या मनात सैतान वेगवेगळे विचार आनत आसतो. तसे आपच्या काही लोकान्चे झाले आहे. दिल्ली विधानसभेत मिळालेल्या ६७ जागापैकी फक्त वीसेक जण मन्त्री असतील मग बाकीच्यानी काय करायचे? त्याना जर काही काम दिले नाही तर ते मन्त्र्यान्च्या चुका कढत बसतील म्हणुन कदाचित केजरीवलने त्याना मोदीन्च्या पदव्यान्चा खर्या कि खोट्या याचा निकाल लावा असे सान्गितले असेल कारण स्वतः केजरीवालला आपण पन्तप्रधान होण्याच्या लायकीचे आहोत असा समज अथवा गैरसमज आहे. त्यामुळे काट्याने काटा काढायचा हा प्रयत्न आहे तो कितपत साधेल हे मात्र सन्गत येणार नाही कारण आता केजरीवाल गप्प आहेत कधी उसळतील हे सान्गणे अशक्य आहे.

श्रीगुरुजी's picture

10 May 2016 - 3:01 pm | श्रीगुरुजी

याच विषयावर हा अनय जोगळेकरांचा लेख -

http://www.loksatta.com/desh-videsh-news/blog-by-anay-joglekar-on-prime-...

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् | येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत् || मडकी फोडा, कपडे फाडा, अथवा गाढवावर बसा…काहीही करा पण प्रसिद्धी मिळावा… या संस्कृत सुभाषिताचे भारतीय राजकारणातील जिवंत उदाहरण शोधायला एक सेकंदही वेळ लागणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन आठवड्यांत आपल्या कार्यकाळाची दोन वर्षं पूर्ण करत असताना त्यांना आर्थिक सुधारणा, परराष्ट्र धोरण, भ्रष्टाचार, देशातील मोठ्या भागात पडलेला दुष्काळ अशा विषयांवर गुणपत्रिका सादर करायला सांगण्याऐवजी आम आदमी पार्टीची एकाहून एक विद्वान आणि उच्च विद्या विभूषित नेतेमंडळी पंतप्रधानांचे बीए आणि एमए डिग्री सर्टिफिकेट बनावट असून त्यांनी उच्चशिक्षण घेतलेलेच नाही हे सिद्ध करण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. टीव्हीवरील बातम्यांत त्यांची कर्णकर्कश्य आरडाओरड पाहिली की, एवढा मस्तकशूळ उठतो की, भिंतीवर डोके आपटून घ्यावेसे वाटते. दुर्दैवाने या विषयावर आम आदमी पक्षाला अनुल्लेखाने मारण्याऐवजी अध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांना मैदानात उतरवून अकारण आपला प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विरोधी पक्षं सरकारला उत्तराखंड आणि अरूणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट, दुष्काळ, पाकिस्तानबद्दलचे धोरण इ. विषयांवर घेरतील, असे वाटत असतानाच सरकारने “आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव” या सूत्रानुसार एकापाठोपाठ एक वेगवान चाली रचल्या. एकीकडे इशरत जहाँ चकमकीत नव्याने बाहेर आलेल्या माहितीचा वापर करून माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना घेरले तर दुसरीकडे राज्यसभेत सुब्रमण्यम स्वामींना प्रवेश देऊन त्यांच्याकरवी ऑगस्टा वेस्टलंडमधून थेट सोनिया आणि राहुल गांधींवरच निशाणा साधला. स्वामींच्या आक्रमकतेला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या अभ्यासू निवेदनाने साथ देत कॉंग्रेसला पूर्णतः कोंडीत पकडले. कॉंग्रेसने या प्रकरणी गैरसोयीचे प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला पण तो अंगलट येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

भाजपची ही खेळी एवढी परिणामकारक ठरली की, गेल्याबाजारी भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर कॉंग्रेसला घेरणाऱ्या संयुक्त जनता दलासह सपा, बसपा ते माकपा, भाकपालाही कॉंग्रेसच्या समर्थनार्थ धावून यावे लागले. ऑगस्टा वेस्टलंड प्रकरणावर राज्यसभेत झालेल्या चर्चेत कॉंग्रेसेतर विरोधी पक्षांतील एका पाठोपाठ एक नेते आपल्या भाषणात कॉंग्रेसला लक्ष्य करण्याऐवजी दोन वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपने या प्रकरणात गेली २ वर्षं काय केले असा सवाल करू लागले. सक्तवसुली संचालनालय, सीबीआयसकट देशातील सर्व अन्वेषण संस्था स्वायत्त नसल्यामुळे ऑगस्टा वेस्टलंड प्रकरणाचा थेट सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पुढील ३ महिन्यांत तपास करावा अशा वाह्यात मागण्या करू लागले. कॉंग्रेसच्या कार्यकाळात त्यांच्या स्वतःच्याच नेत्यांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करताना सीबीआयवर दबाव टाकण्यात आला. सीबीआय योग्य दिशेने तपास करत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला मधे पडून चौकशीची देखरेख स्वतः करण्याची वेळ आली.

या प्रकरणात तसा काही प्रश्नं नाही. त्यामुळे एकीकडे या प्रकरणी सरकारने दोन वर्षं काही केलं नाही असं एकीकडे म्हणणे आणि दुसरीकडे या प्रकरणात सरकार विरोधी पक्षांवर सूडबुद्धीने कारवाई करेल असे म्हणणे हे परस्परविरोधी आहे. दुसरीकडे सरकार सर्वोच्च न्यायालयाला सीबीआयला अमुक एका मुदतीत चौकशी करायला सांगा असा आदेश देऊ शकत नाही याची जाणीव त्यांना राहिली नाही.

या सगळ्या प्रकरणात आम आदमी पक्षाची पंचाईत झाली. संसदेत आम आदमी पक्षाचे अस्तित्त्व असून नसल्यासारखे असल्याने त्यांना ऑगस्टा वेस्टलंड प्रकरणात कोणी विचारिना. आम आदमी पक्ष आणि मनसेमध्ये काही साधर्म्य आहेत. गेल्या १०तील ८ वर्षांत मिडियाचा परिणामकारक वापर करून मनसे जे राज्य पातळीवर साध्य करू शकली तेच राष्ट्रीय स्तरावर करताना आम आदमी पक्ष यशस्वी होताना दिसत आहे. अण्णा द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस, सपा किंवा बसपाला मोठ्या राज्यांत सत्तेवर असूनदेखील जेवढी किंमत मिळत नाही त्याहून अधिक महत्वं दिल्लीसारख्या छोट्या राज्यात सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने दोन वर्षांत मिळवले. पण मिडियाने मोठे केल्याचे जेवढे फायदे असतात तेवढेच तोटेदेखील मोठे असतात.

ऑगस्टा वेस्टलंड प्रकरणात भाजप आक्रमक झाल्याने आणि या लढाईत डॉ. सुब्रमण्यम स्वामींना महत्त्वाचे स्थान दिले गेल्याने आपच्या भ्रष्टाचार विरोधी नौकेच्या शिडातील हवा निघून जाऊ लागली. दुसरीकडे हे कठीण आव्हान कॉंग्रेसने यशस्वीरित्या पेलले तर भविष्यात २००४च्या लोकसभा निवडणुकांप्रमाणे भाजपविरोधी पक्षांचे नेतृत्त्व कॉंग्रेसकडे जाऊ शकते याची भीती वाटू लागली असावी. आता ऑगस्टाच्या हेलिकॉप्टरमध्ये स्वार न झाल्यास आपली घरका ना घाटका, अशी स्थिती होऊ शकते याची जाणीव झालेल्या आम आदमी पक्षाने गेल्या आठवड्यात जंतर मंतरला आंदोलन केले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या चार पावले पुढे जात थेट सोनिया गांधींवर आरोप करत त्यांना अटक करण्याचे आव्हान भाजपला दिले. पण भाजप, कॉंग्रेस तसेच मीडिया यापैकी कोणीच केजरीवाल यांना गांभीर्याने न घेतल्यामुळे त्यांची पंचाईत झाली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत येण्यासाठी आपने थेट पंतप्रधानांच्याच मार्कशीटला हात घातला.

भारतासारख्या देशात जिथे दुचाकी आणि चार चाकीची दोन वेगवेगळी ड्रायविंग लायसन्स, बनावट जात प्रमाणपत्रं, सात-बारावरील नोंदणी ते परीक्षा उत्तीर्णतेचे प्रमाणपत्रं…सेटिंग लावलं तर काय हवं ते मिळू शकतं. मुंबई विद्यापीठात शिकत असताना बी कॉमच्या तृतीय वर्षाला माझ्या ओळखीच्या अनेक मुलांनी अमुक एका प्राध्यापकाकडे क्लास लावून अभ्यास न करता संगणक या विषयात १०० पैकी ९५हून अधिक गुण मिळवल्याचे मी पाहिले आहे. नंतर वेळोवेळी वर्तमानपत्रांत आल्या आहेत की, विद्यापीठांच्या परीक्षा विभागातील कायमस्वरूपी नसलेल्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून उत्तर पत्रिकांतून संगणकावर मार्क टंकित करताना जाणीवपूर्वक चुका करून नापासाला पास करण्याचे किंवा ठराविक विषयात हवे तेवढे मार्क देण्याचे प्रकार सर्रास चालतात. कुंपणच जेव्हा शेत खाते तेव्हा असे प्रकार रोखणे अशक्य आहे.
आम आदमी पक्षाबद्दल माझे प्रचंड मतभेद आहेत. पण राजकारणात प्रवेश केल्यानंतर २ वर्षांतच राजकीयदृष्ट्या देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेल्या दिल्लीत ९५% बहुमताने सत्तेवर येण्याचा चमत्कार आपने केला आहे. सत्तेवर आल्यानंतर गेल्या सव्वा वर्षात अनेक कोलांट्याउड्या मारूनही दिल्लीवरील आपची पकड अजून सैल झालेली नाही. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाला पर्याय म्हणून समोर येण्याची आपला सुवर्णसंधी आहे. पण तसे करायचे तर तेथे स्थानिक संघटन आणि नेतृत्त्व उभे करावे लागेल. असे करून जर आपला पंजाबमध्ये यश मिळाले तर पंजाबमधील आप दिल्लीतील आपला झाकाळून टाकेल अशी भीती कदाचित केजरीवालांना वाटत असावी. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत मीडियाचे लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी आपने हे पाऊल उचलले असावे. विद्यापीठात घुसून सुमारे ४० वर्षांपूर्वी झालेल्या परीक्षेतील पंतप्रधान मोदींच्या उत्तर पत्रिका शोधण्यासाठी आंदोलन करणे म्हणजे शुद्ध वेडाचार आहे. आम आदमी पक्ष तो करू शकतो कारण प्रसिद्धीचा ऑक्सिजन न मिळाल्यास आपला काही भविष्य नाही. माध्यम प्रसिद्धीवर अवलंबून राहून मनसेला जी ठेच लागली त्यातून आम आदमी पक्षाने शहाणपणा शिकण्याची गरज आहे.
– अनय जोगळेकर

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

10 May 2016 - 5:33 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

केजरीवालांची नौटंकी आता उघड दिसू लागली आहे,काम करायचं सोडून फालतू चमकोगिरी करत आहेत आणि मोदीसरकारसुद्धा असल्यांच्या नादी लागून त्यांचे महत्व वाढवत आहेत.
नितीन गडकरी प्रकरणात कोर्टाने दणका दिलाच होता तरीही केजरींनी माफी मागितली नाही.हे म्हणजे स्वतः हरिश्चंद्राची औलाद असल्याचे भासवणे आणि बाकिचे सारे सैतान आहेत अशी धारणा असणे होय.

गॅरी ट्रुमन's picture

10 May 2016 - 5:44 pm | गॅरी ट्रुमन

केजरीवालांची नौटंकी आता उघड दिसू लागली आहे,काम करायचं सोडून फालतू चमकोगिरी करत आहेत आणि मोदीसरकारसुद्धा असल्यांच्या नादी लागून त्यांचे महत्व वाढवत आहेत.

यापुढे या गृहस्थाने केलेल्या आरोपांची मोदी सरकारने दखल घ्यायची काहीच गरज नाही. पण काल डिग्री उघड करणे गरजेचे होते. अन्यथा "राजा भिकारी माझी टोपी घेतली" प्रमाणे यांची कटकट चालूच राहिली असती आणि मोदी खोटारडे आहेत असा अपप्रचार करायला यांना कारण झाले असते. इतके दिवस यांची मोदींविरूध्द आघाडी तशी subtle होती म्हणजे अंबानी/अडानीचे एजंट यासारखी बकवास किंवा सायकोपाथ वगैरे म्हणणे इत्यादी. पण यावेळी मात्र अगदीच उघडउघड हल्ला करायचा प्रयत्न आआपने केला आणि त्यात ते चांगलेच तोंडघशी पडले.आता यापुढे हे असे हल्ले करतील तर त्याकडे जनताही दुर्लक्ष करेल. पण पहिल्या वेळेला मात्र एकदा तरी उत्तर देणे भाग होते. यांच्या अपप्रचाराकडे पूर्ण दुर्लक्ष केले असते तरी मग "मोदी गप्प का", "काहितरी लपवायचे आहे" वगैरे फालतूपणा सुरू झाला असता आणि त्याला चांगले शिकलेसवरलेले लोकही बळी पडले असते. यापुढे यांना मोदी सरकारने पूर्णपणे फाट्यावर मारले तरी विशेष फरक पडणार नाही.

हे म्हणजे स्वतः हरिश्चंद्राची औलाद असल्याचे भासवणे आणि बाकिचे सारे सैतान आहेत अशी धारणा असणे होय.

हाच होलिअर दॅन दाऊ प्रकार प्रचंड डोक्यात जातो.

मृत्युन्जय's picture

10 May 2016 - 6:09 pm | मृत्युन्जय

मोदींची डिग्री खरी असेल तर एकदाची ती सार्वजनिक करुन या लोकांची तोंडे का बंद करत नाहित. एरवी सोशल मिडीया वर अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या पंतप्रधानांसाठी ही गोष्ट एवढी अवघड नसावी.

चिनार's picture

10 May 2016 - 6:19 pm | चिनार

मृत्युंजय साहेब,
काल पत्रकार परिषदेत केली ना डिग्री सार्वजनिक. अजून काय हवंय?
आता काय रस्त्यात उभं राहून पत्रकं वाटल्यासारखी वाटावी का ?

ह्या केजरीवालचा प्रोब्लेमचं कळत नाही. आता आपवाले म्हणतात मोदींनी कोणत्या केंद्रातून परीक्षा दिली ते जाहीर करावे. उद्या ते खालील प्रश्न सुद्धा विचारू शकतात
१. पहिलीत असताना मोदी कितव्या बाकावर बसत होते ते जाहीर करा
२. मोदींनी पहिला शर्ट शिवलेल्या टेलर चे नाव सांगावे.
३. मोदींनी त्यांच्या सर्व शिक्षकांचे संपूर्ण नाव पत्त्यासहित सांगावे.
४. मोदी जेंव्हा चहा विकायचे त्यावेळची हिशोबाची वही दाखवावी आणि किती पैसे कमावले ते सांगावे.

इरसाल's picture

10 May 2016 - 6:27 pm | इरसाल

लेका बालिस्टर का नाय झालास तु ?

झालोच होतो..डिग्री तेव्हढी घ्यायची राहिली :-)

मृत्युन्जय's picture

10 May 2016 - 6:40 pm | मृत्युन्जय

नाही त्या पत्रकार परिषदेनंतर आपने परत आरोप केले आहेत. एकदा का मोदींनी स्वतः ती डीग्री सार्वजनिक केली की लोकांना बोलायला वाव राहणार नाही. नाही का?

गॅरी ट्रुमन's picture

10 May 2016 - 6:21 pm | गॅरी ट्रुमन

प्रॉब्लेम असा आहे की या लोकांना फार महत्व दिले तर यांच्या मागण्या कधी संपणारच नाहीत. कालच मकराश्रू फेम आशुतोषने म्हटले की मोदींनी कुठच्या केंद्रातून परिक्षा दिली ते सांगावे.उद्या म्हणतील की त्या केंद्रात नक्की कुठच्या वर्गातून परिक्षा दिली ते सांगावे. आणि हे कधीच संपणार नाही. ही मंडळी रिकामटेकडी आहेत आणि यांना प्रश्न विचारायला काहीच जात नाही. आणि एक संपला की दुसरा प्रश्न तयार असणारच आहेत. आणि त्याचवेळी मोदी अजिबात काही बोलत नाहीत असेही चित्र उभे राहायला नको. तेव्हा मला वाटते भाजपने काल जे काही केले ते ठिक होते. त्यापुढे जाऊन आआपवाल्यांना जास्त महत्व देऊ नये.

म्हणे १९७०-८० च्या दशकात भारतात computers नव्हते त्यामुळे मोदींचं पदवी प्रमाणपत्र, ज्यावर मजकूर टाईप केला गेलेला आहे, ते बनावट आहे.
अजून एक. दिल्ली विद्यापीठाची पदवी आणि मोदींची पदवी या सारख्या नाहीत.

एकतर भारतात १९७०-८० च्या दशकात computers नव्हते हे चुकीचं आहे. TCS, Patni, Wipro या सर्वांनी १९७० च्या दशकातच सुरुवात केली. १९७७ मध्ये जाॅर्ज फर्नांडिस यांनी IBM ला भारतातून हाकलून दिलं. IBM नक्की काय करायची हे आपटार्ड्सना माहित नाही? आय.आय.टी. इंजीनियर असलेला माणूस ज्या पक्षाचा प्रमुख आहे, तिथे असं अज्ञान असेल असं वाटलं नव्हतं.
दुसरं म्हणजे ती पदवी दूरस्थ शिक्षणपद्धतीने (distance learning) मिळवलेली आहे हे मोदींनी पहिल्यांदाच सांगितलंय. आपण पूर्णवेळ विद्यार्थी होतो असं ते कधीच म्हणाले नाहीयेत.
आआपवाले हे जे करताहेत त्यावरुन उत्कर्षाला सीमा असते पण अधःपाताला नसते हेच सिद्ध होतंय.

गॅरी ट्रुमन's picture

11 May 2016 - 10:43 am | गॅरी ट्रुमन

तेच तर. यांची कटकट कितीही काहीही झाले तरी संपायची नाहीच. हा नाहीतर तो नवानवा काल्पनिक मुद्दा घेऊन यांची भूणभूण चालूच राहणार.

भाजपने सर्टिफिकेटे जगजाहीर केली आणि दिल्ली आणि गुजरात विद्यापीठांनीही त्याला दुजोरा दिला हे एका अर्थी चांगलेच झाले. केजरीवाल आणि इतर आआप नेते या कामधंदा नसलेल्या रिकामटेकड्यांची विश्वासार्हता (जी पूर्वीच आपल्यासारख्यांसाठी धुळीस मिळाली होती) इन जनरल जनतेच्या दृष्टीनेही धुळीस मिळेल.त्यामुळे यांच्या भविष्यात होणार्‍या कटकटीला फारसे कोणी गांभीर्याने घेणार नाही. आणि केजरीवाल तसेच आआपचे इतर नेते (आशुतोष, आशिष खैतान इत्यादी) यांच्या पूर्वेतिहासाला बघता ही मंडळी गप्प बसणार नाहीत आणि नवेनवे हास्यास्पद मुद्दे मांडतील हीच शक्यता जास्त.त्यातूनच केजरूचा खरा चेहरा बुरख्याआड जनतेपुढे लवकरात लवकर येईल. शेवटी दिल्लीत लोकांनी मते दिल्लीत चांगले सरकार मिळावे म्हणून दिली आहेत असले माकडचाळे बघायला नाही. जर का तितकीच हौस असेल तर लोक दहा-वीस रूपये देऊन डोंबार्‍याचा खेळ बघायला जातील. त्यासाठी मुख्यमंत्री निवडून द्यायची काहीच गरज नाही.

प्रदीप's picture

11 May 2016 - 10:56 am | प्रदीप

माझ्या १९७२ च्या मुंबई विद्यापीठाच्या बी. एस्सी. च्या परीक्षेची मार्क लिस्ट काँप्युटर- जनरेटेड आहे.

माझ्या बरोबरीने शिकलेले काहीजण काँप्युटर प्रोग्रामिंगमधे १९७४ साली शिरले, तेव्हा ऑटोकॉडर, फोर्ट्रान, व कोबोलवर प्रोग्रामिंग होत असे. आय. बी. एम. १४०१ मेन फ्रेम कॉम्प्युटर्स तेव्हाही मुंबईत टी. आय. एफ. आर, तसेच मुंबई विद्यापीठ व इतर काही खाजगी कंपन्या-- उदा. मोरारजी मिल्स, ए. सी. सी. इत्यादींकडे होते, बहुधा ह्यांतील तसेच इतरही काही ठिकाणी पी. डी. पी. ९ (किंवा ११) वगैरेही असावेत.

ह्या सगळ्या फालतू वादाने केजरीवाल (कन्हैय्या -०) पुन्हा प्रकाशझोतात आलेले आहेत व मध्यंतरी लाईमलाईटमध्ये असलेला कन्हैय्या -१ थोडा मागे पडला आहे. पण ह्या वादाने भारतीय राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली आहे.

गॅरी ट्रुमन's picture

11 May 2016 - 11:03 am | गॅरी ट्रुमन

कन्हय्या-० आणि कन्हय्या-१

हहपुवा

अनुप ढेरे's picture

11 May 2016 - 10:34 am | अनुप ढेरे

आत्ता जे झालं ते चांगलच झालय. आपटार्ड्सची विश्वासार्हता लैच खाली गेली आहे. डीग्रीवर्च्या फाँटवर संशय घेतला. त्याच फाँटच्या इअतर डिग्र्या लोकांनी लगेच दाखवल्या.
मग तारीख. त्या दिवशी रविवार होता. रविवारी कॉन्वोकेशन कसं असं विचारल. नंतर कळालं की या सर्टिफिकेटवर थर्टिंन्थ नसून थर्टिएथ असं लिहिलं होतं.

मग एंटायर पॉलिटिकल सायंस असं काहीच नसतं असा प्रचार सुरू. तिथेही आपटले तोंडावर.

आधी रजिस्ट्रारने डिग्रीची माहिती द्यावी असं म्हणाले. त्यानी ती दिल्यावर त्याने ही माहिती दबावाखाली दिली असा प्रचार सुरू.

हेलिकॉप्टर प्रकरणी भाजप काँग्रेसवर आरोप करते व मिडीयाचा फोकस भाजपवर असतो. कॉग्रेस प्रत्युत्त्रर देण्याचा प्रयत्न करते पण केजरीवाल निरर्थक बडबड करतो आणि मिडियाचा फोकस केजरी-भाजप प्रश्नोत्तरावर जातो. त्यामुळे काँग्रेस बॅकफुटवर गेल्यासारखी दिसते. सोनिया गांधी भावनाविभोर भाषण करतात पण त्याची परिणामकारकता केजरीवाल प्रकरणाने हरवुन जाते.

नेमकं कोण कोणाला खेळवत आहे हेच कळत नाहि. कदाचीत सगळेच खो-खो खेळताहेत :)

स्पार्टाकस's picture

11 May 2016 - 5:53 am | स्पार्टाकस

भाजपने दिलेल्या बीए आणि एमच्या डिग्रीने आमचं समाधान झालेलं नाही. मोदींनी डिग्री मिळवलेली असली त्यामधून त्यांनी वर्गात लक्षं देऊन अभ्यास केल्याचं सिद्धं होत नाही. यासाठी बालवर्गापासून ते एमए पर्यंतच्या गृहपाठाच्या वया, विकास पुस्तिका, काढलेल्या नोट्स भाजपने जाहीर कराव्या. त्याचप्रमाणे मोदींच्या हस्ताक्षराचा नमुनाही आम्हाला उपलब्धं करुन देण्यात यावा. केजरीवालनी नियुक्त केलेल्या हस्ताक्षरतज्ञांकडून त्याची तपासणी करण्यात यावी आणि साक्षीदार म्हणून मुलायमसिंग, लालूप्रसाद आणि नितिशकुमार यांच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात यावेत!

सौंदाळा's picture

11 May 2016 - 10:34 am | सौंदाळा

आणि साक्षीदार म्हणून मुलायमसिंग, लालूप्रसाद आणि नितिशकुमार यांच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात यावेत!

फुटलो

मोदक's picture

11 May 2016 - 11:17 am | मोदक

:))

प्रदीप साळुंखे's picture

11 May 2016 - 10:37 am | प्रदीप साळुंखे

डीयु ने डिग्री खरी असल्याचं सांगितलं आहे,
नावातल्या चुका आजकालही होतात,माझं नावही आधी प्रदीपकुमार होतं नंतर नुस्तचं प्रदीप असं झालं.आणि मोदींची तर 1979 ची गोष्ट.

मराठी कथालेखक's picture

11 May 2016 - 11:45 am | मराठी कथालेखक

मी चॅनेलवर येणार्‍या बातम्या फारशा पाहील्या नाहीत आणि मोदींच्या नावातली चूक नेमकी काय आहे मला माहीत नाही.
पण नावतल्या चुका म्हणजे मोठंच प्रकरण आहे, खास करुन गुजरातमध्ये कहरच ..
तिकडे आजही शाळेत सरसकट मुलांच्या नावापुढे "भाई" आणी मुलींच्या नावापुढे "बेन" असं लावतात आणि ते ही परस्पर म्हणजे पालकांच्या संमतीशिवायच
माझ्या मित्राकडून मला ही माहिती मिळाली. त्याचं कुटूंब पुर्वी आसामला असायचं आता सुरतला गेलं आहे त्याच्या भावाच्या मुलीला शाळेत घातल्यावर इंग्लिश माध्यमाच्या शाळेनंही परस्पर "बेन" लावून टाकलं , त्याचा भाऊ फार वैतागला.

हा सगळा मुर्खपणाचा आणि चीड आणणारा प्रकार आता केंद्रानंच कडक कायदा करुन थांबवला पाहिजे.

प्रदीप's picture

11 May 2016 - 1:03 pm | प्रदीप

भारतात सर्वच बाबतीत अतिशय भोंगळपणा असल्याने, व्यक्तिंची नावे ठिकठिकाणी कशा प्रकारे नोंदवली गेली आहेत, ह्यातही तो असतोच!

माझ्या एका मित्रास ह्याचा एकदा आमच्या येथे येतांना अनपेक्षित फटका बसला. ही नव्वदीच्या दशकातील घटना आहे, तेव्हा पासपोर्टात नावे हाताने लिहीली जात. (कोण रे तो म्हणतो तिकडे, सत्तरीच्या दशकातही कॉम्प्युटर्स होते म्हणून-- मूर्ख मोदीभक्त कुठला).त्याच्या वडिलांचे नाव 'शरदचंद्र' होते. ते इन्ग्लिशमधून त्याच्या पासपोर्टात लिहीतांना कारकूनाने संपूर्ण एकाच ओळीत आले नाही तेव्हा तोडून, पहिल्या ओळीत 'शरद-' आणी पुढच्या ओळीत 'चंद्र' असे लिहीले होते. इथे गोची झाली, कारण इमिग्रेशनच्या फॉर्मवर ह्याने वडिलांचे नाव शरदचंद्र असे लिहीलेले होते. आणि पासपोर्टावर ते होते 'शरद-चंद्र'. तेव्हा इमिग्रेशन ऑफिसरने त्याची कसून चौकाशी केली.

भारतात व्यक्तिंची नावे नोंदवण्याच्या पद्धतीतच एकसूत्रता नसल्याने ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तर्हेने नोंदवली जातात. म्हणजे एका ठिकाणी [नाव][मधले नाव][आडनाव]; इतर काही ठिकाणी [आडनाव][प्रथम नाव],[मधले नाव] वगैरे. ह्यातून गोंधळ निर्माण होण्यापलिकडे काहीही साध्य होत नाही.

अनन्त अवधुत's picture

11 May 2016 - 1:51 pm | अनन्त अवधुत

आपल्याकडे नावाचा हा असा गोंधळ परदेशात मजेदार आणि कुठे कुठे त्रासदायक प्रकार घडवतो.
उत्तरेकडे आडनाव न लावता नावापुढे कुमार लावतात. उदा. विश्वास कुमार , राजेश कुमार , नितीश कुमार.
पारपत्रावर पण आडनावाची जागा मोकळीच असून "दिया गया नाम (Given Name(s))" मध्ये नाव + कुमार असते.
अमेरिकन Visa वर मग हेच "दिया गया नाम" surname होते आणि first name होते FNU (First Name Unknown) काही महत्वाच्या कागदपत्रांवर मग त्या व्यक्तीचे पूर्ण नाव FNU राजेश कुमार असे होते
त्याचा परिणाम म्हणजे पारपत्रावर एक नाव, Visa वर वेगळे, I-94 (यावर अमेरिकेतील वास्तव्याचा कालावधी दिला असतो) वर आणखीन वेगळे. वाहन चालन परवाना काढताना या सगळ्या वेगवेगळ्या नावांचा त्रास होतो.

अस्वस्थामा's picture

11 May 2016 - 8:33 pm | अस्वस्थामा

भारतात सर्वच बाबतीत अतिशय भोंगळपणा असल्याने, व्यक्तिंची नावे ठिकठिकाणी कशा प्रकारे नोंदवली गेली आहेत, ह्यातही तो असतोच!

अगदी अगदी. आम्हाला तर पारपत्र कार्यालयिन भोंगळपणाचा फटका बसलाय आणि त्याचा त्रास कित्येक वर्षे (पासपोर्ट रिन्यू होईपर्यंत) सहन करावा लागलाय.

झालं असं की, आडनावाच्या स्पेलिंगमध्ये कोणीतरी चुकून एक "एच" टाकला आणि आडनावाचा उच्चारच पार बदलला. भारतात लोकांना आडनावे माहित असल्याने चाललंही असतं पण इतरत्र पब्लिक डाऊट खाणार. मग पासपोर्ट ऑफिसला गेलो तर ते म्हणे तुम्ही फॉर्म चुकीचा भरला असेल. पण माझ्याकडे फोटोकॉपी असल्याने ते सिद्ध झालं. मग त्याने पुण्याच्या ऑफिसला जायला सांगितलं. तिथे पासपोर्ट ठेवून घेतला आणि महिन्याने पुढच्या पानावर पेनाने एक शेरा दिला की "abhc name can be read as abc". हे कोण वाचणार नि विश्वास ठेवणार.
पहिल्या विसावर नाव बरोबर छापलं पण पुढे दुसरा विसा अप्लाय केला तर येडं पब्लिकने पासपोर्टचेच नाव छापलं विसावर. आता आली का पंचाईत.

मग माझ्या पहिल्या प्रवासापासून हा प्रश्न आणि त्यावर जुजबी उलट-तपासणी हे नेहमीचेच होतं. एका विमानतळावर तर एकाने तब्बल अर्धा तास ताटकळत ठेवलं होतं वेरिफिकेशनसाठी (बहुतेक इंटरपोललादेखील शोधून आला असेल तो मला ;) ). रेन्यू करताना खास एक लेटर दिलं आणि नवा पासपोर्ट नॉर्मल आला. भरुन पावलो.

त्यामुळे ज्यांची नावे चुकीची येत असतील कागदपत्रांवर त्यांचं दु:ख नक्कीच समजू शकतो.

प्रदीप's picture

11 May 2016 - 8:39 pm | प्रदीप

तुमचे दु:ख मी समजू शकतो. म्हणूनच पासपोर्ट ताब्यात घेतांनाच तो अगदी नीट तपासून घआहे, त्यातील सगळेच तपशील बरोबर आहेत हे पहाणे अतिशय जरूरीचे आहे. एकदा तुम्ही तो स्वीकारलात, की मग तो काही कारणामुळे रिन्यू करेपर्यंत, अथवा नवा बनेपर्यंत काही करेक्शनला वाव नसतो.

दिगोचि's picture

18 May 2016 - 10:28 am | दिगोचि

माझ्या मित्राने येथे म्हणजे ऑस्ट्रेलियात पासपोर्टसाठी भारताच्या वकिलातीत अर्ज केला. त्यासाठी पाठवलेल्या फोटोत त्याला दाढी होती शिवाय नाव पण पुरुषाचे. आर्जाबरोबर जुना पासपोर्ट पण पाठवला होत. तरीहि जेम्व्हा त्याला नवा पासपोर्ट मिळाला तेम्व्हा त्याच्या नावाला मिस अशि उपाधि लावली होति. त्याने तक्रार केल्यावर वकिलातीने पासपोर्ट परत मागवला आणि त्यावर ही व्यक्ती पुरुष आहे असे समजावे अशी कॉमेन्ट केली व पासपोर्ट परत पाठवला. आता माझा मित्र ओस्त्रेलियन पासपोर्ट वापरतो. अशी आहे आपली वकिलात.

सुबोध खरे's picture

11 May 2016 - 1:16 pm | सुबोध खरे

आमच्या वर्गमित्राचे नाव पंकज पुरुषोत्तमराव निलंगेकर असे आहे.वडिलांचे नाव डॉ. पुरुषोत्तमराव निलंगेकर असेच आहे.
हैदराबाद मध्ये दहावीच्या प्रमाणपत्रावर तेथील बोर्डाने पंकज पुरुषोत्तम राव असे (तेलुगु) नाव लिहिले. सर्व कागदोपत्री केलेला खटाटोपाचा उपयोग झाला नाही कारण हा बारावी होऊन ए एफ एम सी मध्ये येईपर्यंत नाव तेच राहिले आणी यानंतर लष्कराच्या लेखा विभागातही त्याचे नाव "पंकज पुरुषोत्तम राव" असेच आहे. त्याने पुढे नाव बदलण्याचा खटाटोप सोडूनही दिला. आज तो ए एफ एम सी पुणे मध्ये कर्नल या पदावर जठरांत्र विभागाच्या शल्य शास्त्राचा ( GI SURGERY) प्राध्यापक म्हणून रुजू आहे.

थांबा त्यांचं नाव सांगतो केजरीवालला :-)

श्रीगुरुजी's picture

11 May 2016 - 2:58 pm | श्रीगुरुजी

केजरीवाल आणि त्यांच्या मर्कटलीला हा अनेकांना मूर्खपणा वाटतो. परंतु तो जाणूनबुजून केलेला मूर्खपणा आहे. 'मेथड इन मॅडनेस' ही उक्ती त्यांच्यासाठी बरोबर सार्थ ठरते.

आम आदमी पक्ष ही काँग्रेसची 'बी' टीम आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष संकटात येतो तेव्हा तेव्हा केजरीवाल मोदींच्या पदवीसारखे अत्यंत फालतू विषय चर्चेत आणून काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून माध्यमांचे व जनतेच लक्ष वेधायचा प्रयत्न करतात.

डिसेंबर २०१३ मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणुक होती. त्यावेळी केजरीवाल जाहीर सभेत शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचारावर टीका करीत होते. माझ्याकडे शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचारासंबंधी ३७० पानी पुरावे आहेत हे त्यांनी जाहीर सभेत अनेकदा सांगितले होते. एका सभेत त्यांनी शीला दिक्षितांनी राष्ट्रकुल स्पर्धेत साहित्य खरेदीत अमुकतमुक कोटींचा भ्रष्टाचार केला, दिवे खरेदीत इतके कोटी खाल्ले अशी मोठी यादी वाचून दाखविली होती. आपण सत्तेवर आल्यावर त्यांना तुरूंगात टाकणार असे जाहीर सांगितले होते. या सर्व भाषणांच्या चित्रफिती तूनळीवर उपलब्ध आहेत. आपण आयुष्यात कधीही काँग्रेसची मदत घेणार नाही असेही त्यांनी जाहीर सांगितले होते.

त्यानंतर दिल्लीत त्रिशंकू विधानसभा आल्यावर केजरीवालांनी आपला शब्द फिरवून काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. त्यानंतर एका पत्रकाराने शीला दिक्षितांची कधी चौकशी करणार असे विचारल्यावर त्यांनी अत्यंत निर्लज्जपणे उत्तर दिले की 'त्यांच्या भ्रष्टाचाराचे तुम्ही पुरावे द्या. मी लगेच चौकशी सुरू करतो.'. इतका पराकोटीचा बेशरमपणा!

नंतर विधानसभा भंग होऊन फेब्रुवारी २०१५ मध्ये पुन्हा निवडणुक होऊन आआपला ७० पैकी तब्बल ६७ जागा मिळाल्या. डिसेंबर २०१३ मध्ये आआपला २९%, भाजपला ३३.५% व काँग्रेसला २४% मते होती. फेब्रुवारी २०१५ मध्ये भाजपला ३२% मते मिळाली. म्हणजे भाजपच्या मतात १.५% इतकी घट झाली. आआपला तब्बल ५४% मते मिळाली (२५% वाढ) आणि कॉंग्रेसला जेमतेम ९% मते मिळाली (१५% घट). सलग ३ विधानसभा निवडणुका जिंकणार्‍या कॉंग्रेसच्या मतात इतकी मोठी घट जेमतेम १ वर्षाच्या कालखंडात व्हावी हे मोठे आश्चर्य होते. त्यामागचे मुख्य कारण होते कॉंग्रेस व आआपची पडद्यामागची युती. भाजपला बहुमत मिळू नये यासाठी कॉंग्रेसने आपली मते मोठ्या प्रमाणावर आआपकडे वळविली होती. अनेक मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते आआपचा प्रचार करीत होते. अनेक झोपडपट्ट्यातून काँग्रेसचे एकही पोस्टर नव्हते. वृत्तवाहिन्यांवरील वेगवेगळ्या चर्चासत्रातून अनेक पत्रकारांनी याला दुजोरा दिला.

कॉंग्रेसने आआपशी साटंलोटं करण्यामागे दोन कारणे होती. भाजपला दिल्लीत बहुमत मिळू न देणे व आआपला मदत करून शीला दिक्षित, कलमाडी व इतर नेत्यांना भ्रष्टाचाराच्या खटल्यातून वाचविणे (राष्ट्रकुल स्पर्धांमधील भ्रष्टाचाराचे धागेदोरे राष्ट्रीय जामातांपर्यंत पोहोचत होते. अनेक कंत्राटे त्यांच्या कंपन्यांना दिली गेली होती.). त्यामुळेच आजतगायत शीला दिक्षितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. ऑगस्ट २०१५ मध्ये आआपच्या तत्कालीन कायदामंत्र्यांनी केजरीवालांना पत्र लिहून जल बोर्ड व सीएनजी घोटाळ्यातील भ्रष्टाचारात शीला दिक्षितांचा हात असल्याचे सबळ पुरावे असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करावी असे पत्र पाठविल्यावर केवळ ३ दिवसात त्यांना कायदामंत्री म्हणून काढून टाकले गेले. हे सर्व केवळ काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचाराला वाचविण्यासाठीच होते.

कॉंग्रेस व आम आदमी पक्ष यांचं साटंलोटं आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ऑगस्टा वेस्टलँड लाचखोरीचे प्रकरण राष्ट्रमाता व कॉंग्रेसच्या इतर बड्या नेत्यांवर शेकायला लागल्यावर, ज्याप्रमाणे द्रौपदीच्या मदतीसाठी भगवान कृष्ण धावून आला होता त्याचप्रमाणे काँग्रेसी नेत्यांच्या बचावासाठी केजरीवाल नावाचे २१ व्या शतकातील अवतारी महापुरूष धावून आले आहेत व त्यातूनच हे मोदींच्या पदवीचे अत्यंत फालतू व निराधार प्रकरण काढून आआपच्या नेत्यांचा जोरदार तमाशा सुरू आहे.

सुबोध खरे's picture

11 May 2016 - 3:40 pm | सुबोध खरे

I have got my Graduation degree verified by Arvind Kejriwal !!

Have you ??

सामान्य वाचक's picture

19 Jun 2016 - 6:27 pm | सामान्य वाचक

भारीच आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2016 - 6:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

श्रीगुरुजी's picture

11 May 2016 - 8:35 pm | श्रीगुरुजी

आपला खोटेपणा उघडकीला आल्यामुळे चवताळलेल्या आआपच्या रिकामटेकड्यांनी आता नवीन मूर्खासारख्या शंका घ्यायला सुरूवात केली आहे. आधी म्हणत होते दिल्ली विद्यापीठाकडे मोदींच्या पदवीची नोंदच नाही, मोदींच्या पदवीचे प्रमाणपत्र प्रसिद्ध झाल्यावर म्हणतात की ते बनावट आहे. आता म्हणतात की १९७८ मध्ये भारतात संगणक नसताना मोदींना संगणकीकृत गुणपत्रिका कशी मिळाली?

हा प्रश्न अत्यंत मूर्खपणाचा असला तरी आआपचे रिकामटेकडे मूर्ख नाहीत. गोबेल्सचे तंत्र वापरून एखाद्याबद्दल मुद्दाम राळ उठवून द्यायची व संशय निर्माण करून टीआरपी मिळवायचा अशीच यांची आजवरची वाटचाल राहिली आहे.

दिल्ली विद्यापीठासारख्या मोठ्या संस्थेचं सोडा, विद्यापीठाच्या तुलनेत लहान असलेली व राजधानी दिल्लीच्या तुलनेत अत्यंत लहान शहर असलेल्या पुण्यातील एसएससी बोर्डासारखी लहान संस्था १९७८ च्या आधीपासून संगणकीकृत गुणपत्रिका प्रदान करीत होती. पुण्यामध्ये एसएससी बोर्ड, एमएसईबी, किर्लोस्कर कमिन्स, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स अशा अनेक ठिकाणी १९७८ च्या आधी अनेक वर्षांपासून आयसीएल, आयबीएम व बरोझ कंपनीचे महासंगणक वापरात होते. पुणे विद्यापीठ्याच्या व एसएससी/एचएससी बोर्डाच्या गुणपत्रिका तेव्हापासूनच संगणकीकृत होत्या. १९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार आल्यावर उद्योगमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी या कंपन्यांना (यात कोका कोला सुद्धा होती) स्थानिक भागीदार घेण्याची सक्ती केल्यावर आयबीएमने भारतातून व्यवसाय बंद करून गाशा गुंडाळला. आयसीएलने स्थानिक भागिदारी करून आयसीआयएम असे नवे नाव घेऊन कंपनी सुरूच ठेवली. १९७७/७८ मध्ये व्यक्तिगत संगणकाचा जन्म झालेला नव्हता. सर्वत्र मेनफ्रेम होते. भारतात अनेक ठिकाणी मेनफ्रेमची मोठी इन्स्टॉलेशन्स होती.

१९७८ मध्ये भारतात संगणक होते हे या आआपच्या टोळभैरवांना माहिती नव्हते असे नाही. गोबेल्सच्या तंत्रानुसार मुद्दाम एखाद्याला बदनाम करण्याचे हे तंत्र आहे.

आरोह's picture

11 May 2016 - 11:50 pm | आरोह

माझे वडील आर्मी मध्ये होते..सेवानिवृत्त झाल्यावर discharge book मध्ये त्यांचे नाव रामचंद्र म्हणजे R.C.(आडनाव)...मला वाटायचे कि लिहिणाऱ्याने चूक केलीय...कारण माझ्या आजोबांचे नाव सिताराम म्हणजे R.S.(आडनाव) असायला हवे...पण नंतर कळले कि R.C.म्हणजे RamChandra

महेश श्री देशमुख's picture

13 May 2016 - 8:53 pm | महेश श्री देशमुख

'मोदींच्या गुणपत्रिकेतील विषय तेव्हा नव्हतेच!'
13 मे 2016 - 06:48 PM IST
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या गुजरात विद्यापीठातील एमएची पदवी (डिग्री) प्रमाणपत्रातील विषय त्या वेळी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातच नव्हते असे एका तत्कालीन प्राध्यापकाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे मोदींनी नेमकी कोणत्या विषयांमधून पदवी घेतली याबाबतचा वाद सुरू झाला आहे. प्रमाणपत्रात दिसत असलेल्या वर्षांमध्ये संबंधित विषय गुजरात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्टच नव्हते, असे त्या काळात शिकविणारे एक निवृत्त प्राध्यापक जयंती पटेल यांनी म्हटले आहे. त्यांनी फेसबुकवर यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भाजपने मोदींची एमएची जी गुणपत्रिका प्रसिद्ध केली आहे, त्यात दिलेल्या विषयांपैकी काही विषय त्यावेळी गुजरात विद्यापीठात शिकवले जात नव्हते, असे पटेल यांनी म्हटले आहे. दरम्यान, गुजरात विद्यापीठाच्या प्रशासनाने हा दावा फेटाळला आहे. तथापि, जयंती पटेल त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहेत.

बोका-ए-आझम's picture

16 May 2016 - 3:08 pm | बोका-ए-आझम

त्यांच्या समाजाच्या आंदोलनाला आआपचा पाठिंबा आहे असं म्हटलं होतं. हे जयंतभाई पटेलही कदाचित तसेच असावेत.

स्पार्टाकस's picture

18 May 2016 - 12:52 am | स्पार्टाकस

गाढवापुढे गुळाची चव काय? - राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे
नंगे से खुदा भी डरता है - दिग्वीजय सिंग आणि ओवेसी (दोनपैकी कुठलाही चालेल - आवड तुमची निवड तुमची)
गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ / निर्लज्जम सदासुखी - लालू, मुलायम आणि नितिशकुमार
रिकामं डोकं सैतानाचा कारखाना - राज ठाकरे
पुत्रं व्हावा ऐसा गुंडा / खाण तशी माती - नारायण, निलेश आणि नितेश राणे
भीक नको पण कुत्रं आवर - ममता बॅनर्जी
मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली - पी. चिदंबरम
आता उरलो उपचारापुरता - लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे - सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग
नैनं छिन्दन्ती शस्त्राणी - शरद पवार (दुसरं कोण?)

सरतेशेवटी
अहं ब्रम्हास्मी - अरविंद केजरीवाल
आणि
हात दाखवून अवलक्षण - दिल्लीचे मतदार

राघवेंद्र's picture

18 May 2016 - 2:35 am | राघवेंद्र

+१

गॅरी ट्रुमन's picture

29 May 2016 - 7:33 pm | गॅरी ट्रुमन

गोष्ट आहे जानेवारी महिन्यातील. दिल्ली सरकारच्या पी.डब्ल्यू.डी ने रोहिणी या भागात मधुबन चौक ते मुकरबा चौक या दोन ठिकाणांदरम्यान एलिव्हेटेड पूलाचे उद्घाटन श्री.रा.रा. अरविंद केजरीवाल यांनी केले. आणि या कामासाठी पूर्वी ४२५ कोटी रूपये खर्च होणे अपेक्षित होते तेच काम पी.डब्ल्यू.डी ने ३०० कोटी रूपयांमध्ये केले असे युगपुरूषांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. त्यावर युगपुरूषांनी पुढील ट्विट केले:

फेसबुकवरील अनेक केजरूच्या गुलामांनी (सॉरी आआप समर्थकांनी) प्रामाणिक सरकार करदात्यांचे पैसे कसे वाचवत आहे वगैरे वगैरे गोष्टी लिहून अशा निस्पृह नेत्याचे समर्थक असल्याबद्दल स्वत:ची पाठही थोपटून घेतली.

आजच जागरण या वर्तमानपत्राच्या दिल्ली आवृत्तीमध्ये बातमी आली आहे की या पुलामधील पिलर क्रमांक ६ जवळ पूलाला क्रॅक गेला आहे आणि तिथून सिमेंट पडत होते. याच बातमीमध्ये त्या पूलाला पडलेल्या क्रॅकचाही फोटो आहे. यामुळे कोणालाही जखम झाली नाही आणि अजून तरी पुलाचा काही भाग पडलेला नाही ही त्या भगवंताचीच कृपा म्हणायची.

तर आपले युगपुरूषजी करदात्यांचे पैसे अशा पध्दतीने वाचवतात तर. धन्य.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

8 Jun 2016 - 8:45 pm | ईश्वरसर्वसाक्षी

PM Modi is using 'third-grade' Pahlaj Nihalani as a pawn: AAP

speechless :(

१) भारतासारख्या विशाल देशाच्या पंतप्रधानांना बास एव्ह्ढेच काम राहिलेय का ?
२) प्रत्येक गोष्टित देशाच्या पंतप्रधानाना आणणे योग्य आहे का ?
३) 'आप'ल्याला ज्या ग्लोरिफाईड म्युनिसिपाल्टीत निवडुन देण्यात आले आहे ते सोडुन सगळिकडे नाक खुपसणे कितपत योग्य आहे ?
४) 'आप'ल्या स्थापनेच्या वेळि आपण सगळ्या Existing पॉलिटिकल पार्टि आणि सिस्टम चोर असल्याचा आव आणुन फिरत होतात, आता लालु, अखिलेश यादव, ममता, डावे सगळे गंगेत न्हाउन पवित्र झालेत का ?
५) कि हि अपरिहार्यता तिसर्‍या आघाडित दिसणार्‍या लोण्याचा गोळ्या मुळे आलिय?
६) मग आपण तर सगळ्याच राजकिय पक्षांचे (जे पहिले चोर होते) बाप निघालात?

केजरीवाल साहेब स्वतःवरुन इतरांचं परिक्षण करण्यात गुंतले आहेत. आम आदमी पार्टीचं राजकारण आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी या 'क्षुल्लक' गोष्टींकडे लक्ष्य देण्याऐवजी गावगप्पा मारण्यापलिकडे त्यांना काहि उद्योग नाहि. तसच ते इतरांना बघतात.

प्रदीप's picture

9 Jun 2016 - 11:14 am | प्रदीप

आम आदमी पार्टीचं राजकारण आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी या 'क्षुल्लक' गोष्टींकडे लक्ष्य देण्याऐवजी गावगप्पा मारण्यापलिकडे त्यांना काहि उद्योग नाहि

ते अतिशय महत्वपूर्ण अशा त्यांच्या फिल्म्स- टिपण्ण्या नित्यनेमाने करतात, ते विसरलात.

(ह्या निमीत्ताने मी आजच एक चित्रपट चोरुन डाउनलोड करून पहाणार होतो, तो मी तुमच्या निषेधार्थ 'परत' करत आहे..... आप समर्थक प्रदीप लाल).

गॅरी ट्रुमन's picture

8 Jun 2016 - 10:25 pm | गॅरी ट्रुमन

स्वत:ला सर्व गोष्टींमधले तज्ञ समजून आपले काम सोडून इतर सगळ्या गोष्टींमध्ये सदासर्वदा नाक खुपसायला जाणार लोक कधीनाकधी दाणकन आपटतात. या युगपुरूषांच्या बाबतीत सुध्दा कधीनाकधी असे होणारच आहे. फक्त ते लवकरात लवकर व्हावे ही सदिच्छा.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2016 - 3:40 pm | श्रीगुरुजी

भ्रष्टाचारीरक्षक व नौटंकीसम्राट श्रीमान मास्टर अरविंदकुमार यांच्या टोपीत अजून २ मानाचे तुरे (टोपीत आधीच इतके तुरे आहेत की नवीन तुरे लावायला जागाच शिल्लक नसेल).

http://indianexpress.com/article/india/india-news-india/breaking-news-aa...

Jha, the AAP lawmaker from Burari, said that he had received complaints about a ration shop owner selling poor quality goods after which he intervened and got his licence suspended. However, he alleged, that the owner’s licence was renewed when he approached Lt Governor Najeeb Jung and paid him a bribe of Rs 12 lakh.

Another AAP legislator Somnath Bharti supported Jha’s claims and demanded formation of a committee to probe the matter. The nine-member inquiry committee is expected to submit its report before next Assembly session in Delhi.

Earlier on Tuesday, Delhi Chief Minister Arvind Kejriwal had also attacked Jung and accused him of ‘snooping’ for the Prime Minister and passing on Delhi government related information to the PMO.

अजून एक

http://indianexpress.com/article/india/india-news-india/eyeing-punjab-el...

Eyeing Punjab election, AAP makes Punjabi compulsory in Delhi govt schools

In order to encourage Punjabi, the advertisement mentions that

AAP govt has made it compulsory to have at least one Punjabi teacher in all government schools in New Delhi.

पुढील वर्षी गोव्याची निवडणुक आहे. त्यावेळी दिल्लीतल्या प्रत्येक सरकारी शाळेत किमान एका कोकणी शिक्षकाला नोकरी मिळेल अशी आशा करूया.

गॅरी ट्रुमन's picture

15 Jun 2016 - 11:42 am | गॅरी ट्रुमन

फेब्रुवारी २०१५ मध्ये अभूतपूर्व यश मिळाले आणि केजरीवाल मुख्यमंत्री झाले.तब्बल ६७ आमदार निवडून आलेले.सगळ्यांना काही मंत्री बनवता येणार नाही.फार तर ७ आमदार मंत्री होऊ शकतील. मग उरलेल्या ६० चे काय करा? तर त्यातील २१ जणांची वर्णी संसदीय सचिव (पार्लामेंटरी सेक्रेटरी) म्हणून लावली गेली.

अर्थातच असे खेळ सगळेच राजकीय पक्ष खेळत असतात.त्यामुळे या कारणासाठी आआपवर टिका करणे योग्य नाही. उदाहरणार्थ गुजरात, राजस्थान या भाजपशासित राज्यांमध्येही हा प्रकार झालेला आहे. पण त्यात आणि दिल्लीमध्ये जे काही झाले त्यात फरक काय? राज्यघटनेत कलम १९१ (१) (अ) प्रमाणे:

" A person shall be disqualified for being chosen as, and for being, a member of the Legislative Assembly or Legislative Council of a State—
(a) if he holds any office of profit under the Government of India or the Government of any State specified in the First Schedule, other than an office declared by the Legislature of the State by law not to disqualify its holder;"

म्हणजेच लाभाचे पद (ऑफिस ऑफ प्रॉफिट) म्हणजे नक्की काय हे ठरवायची जबाबदारी संबंधित राज्यांमधील विधानसभांची होती. त्याप्रमाणे १९६० मध्ये गुजरात विधानसभेने तर १९५७ मध्ये राजस्थान विधानसभेने कायदे पास करून संसदीय सचिव हे पद लाभाचे पद नाही हे स्पष्ट केले. तसा कोणताही कायदा दिल्लीत नव्हता. तेव्हा हे २१ आमदार अपात्र ठरायचा धोका उत्पन्न झाला. कोणीतरी त्यावरून माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागवली.आता आली का पंचाईत. तेव्हा केजरीवालांना या धोक्याची जाणीव झाली आणि मग दिल्ली विधानसभेने राजस्थान आणि गुजरात विधानसभांप्रमाणे कायदा केला आणि पूर्वलक्षी प्रभावाने या २१ आमदारांचे संसदीय सचिव पद हे लाभाचे पद नाही हे ठरवायचा प्रयत्न केला.

हा कायदा नायब राज्यपालांकडे मंजुरीसाठी गेल्यावर त्यांनी तो राष्ट्रपतींकडे रिफर केला. नॅशनल कॅपिटल टेरिटरी अ‍ॅक्ट १९९१ च्या कलम २५ प्रमाणे: "When a Bill has been passed by the Legislative Assembly, it shall be presented to the Lieutenant Governor and the Lieutenant Governor shall declare either that he assents to the Bill or that he withholds assent therefrom or that he reserves the Bill for the consideration of the President". त्यानंतर राष्ट्रपतींनी कायदेतज्ञांचे मत घेऊन परवा या कायद्याला मंजुरी द्यायचे नाकारले.

यातून काही प्रश्न नक्कीच उभे राहतातः

१. शेवटी कायद्याच्या तरतुदींप्रमाणेच सर्व गोष्टी व्हायला लागतात. जर का केजरीवालांनी पहिल्यांदा हा कायदा पास केला असता आणि मग या २१ आमदारांची नियुक्ती केली असती तर ते कुणाच्या लक्षातही आले नसते. अर्थातच या कारणासाठी आआपला आणि केजरीवालांना सुळावर चढवायची गरज नाही. पण कायद्यातील प्रक्रीयेप्रमाणे जर या २१ आमदारांचे पद धोक्यात येत असेल तर आकांडतांडव करायची काही गरज नाही.

२. जर आपण कायद्यातील प्रक्रीयेप्रमाणेच वागलो आहोत आणि काहीही चूक केली नाही असे केजरीवालांचे म्हणणे असेल तर मग हा कायदा पास करायची गरज का भासली? यांनी तसा कायदा आणला याचाच अर्थ आपण गोत्यात येऊ शकतो हे त्यांच्या उशीरा लक्षात आले आणि मग हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने संमत करून २१ आमदारांचे पद वाचवायचा प्रयत्न झाला.

३. काल राघव चढ्ढा हा इसम टाईम्स नाऊ वर म्हणत होता की या २१ संसदीय सचिवांना दिल्ली सरकारकडून पगार मिळत नाही तर केवळ ज्या मंत्र्याचे संसदीय सचिव म्हणून असाईन केले आहे त्याचे ऑफिस वापरायला मिळते आणि त्यांची ऑफिसला जायची यायची सोय दिल्ली सरकार करते (ट्रान्सपोर्टेशन).

२००६ मध्ये जया बच्चन यांचे राज्यसभा सदस्यत्व लाभाचे पद या मुद्द्यावरून रद्द झाले. त्याचे कारण २००४ मध्ये त्यांची नियुक्ती उत्तर प्रदेश सरकारच्या एका महामंडळावर झाली होती. त्याला जया बच्चन यांनी न्यायालयात आव्हान दिले. या पदावर नियुक्ती झाल्यामुळे जया बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारकडून पगार मिळणार होता. पण तो त्यांनी नाकारला. या पदामुळे जो काही प्रवास झाला त्याचा खर्चही त्यांनी स्वतः केला आणि उत्तर प्रदेश सरकारकडून त्याचा परतावाही घेतला नाही. तेव्हा जया बच्चन यांचे म्हणणे होते की हे पद या कारणामुळे लाभाचे पद नव्हते. मे २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लाभाचे पद म्हणजे नक्की काय हे स्पष्ट केले :

"An office of profit is an office which is capable of yielding a profit or pecuniary gain. Holding an office under the Central or State Government to which some pay salary, emolument, remuneration or non-compensatory allowance is attached, is `holding an office of profit'. The question whether a person holds an office of profit is required to be interpreted in a realistic manner. Nature of the payment must be considered as a matter of substance rather than of form. Nomenclature is not important. In fact, mere use of the word `honorarium' cannot take the payment out of the purview of profit, if there is pecuniary gain for the recipient. Payment of honorarium, in addition to daily allowances in the nature of compensatory allowances, rent free accommodation and chauffeur driven car at State expense, are clearly in the nature of remuneration and a source of pecuniary gain and hence constitute profit. For deciding the question as to whether one is holding an office of profit or not, what is relevant is whether the office is capable of yielding a profit or pecuniary gain and not whether the person actually obtained a monetary gain. If the "Pecuniary gain" is "receivable" in connection with the office then it becomes an office of profit, irrespective of whether such pecuniary gain is actually received or not."

म्हणजेच काय तर प्रत्यक्ष सरकारकडून पगार मिळाला नाही (किंवा सरकारकडून मिळालेल्या पैशाला पगार म्हणण्याऐवजी मानधन म्हटले) तरी ते पद लाभाचे पदच ठरते. वर अधोरेखित केलेल्या भागाप्रमाणे सरकारने त्या पदासाठी गाडी आणि ड्रायव्हर जरी दिला तरी ते पद लाभाचेच पद ठरते. तसेच एखादे पद लाभाचे पद ठरण्यासाठी सरकारकडून प्रत्यक्ष पैसे मिळणे गरजेचे नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

४. या २१ आमदारांना निवडणुक आयोगाने नोटिस बजावली. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर काल टाईम्स नाऊ वर दाखवले. त्यात म्हटले होते की हे आमदार संबंधित मंत्र्याच्या कार्यालयात 'इंटर्न' आहेत. कमालच म्हणायची. इंटर्न असतील तर त्यांना 'संसदीय सचिव' हा हुद्दा द्यायची काय गरज होती? नव्या आमदारांना मंत्री कसे काम करत आहेत हे एवढे बघायचेच होते तर असा हुद्दा न घेताही ते मंत्र्यांना भेटू शकत होतेच की.

मान्य आहे हा मुद्दा तांत्रिक आहे. पण कायद्याच्या परिभाषेत अशा तांत्रिकतेलाही खूप महत्व असते. इंदिरा गांधींची १९७१ मध्ये रायबरेलीमधून लोकसभेवर झालेली निवड रद्द झाली त्यामागेही काही प्रमाणावर अशीच तांत्रिकता होती--म्हणजे सभेच्या स्टेजची उंची नियमात दिलेल्या उंचीपेक्षा जास्त होती, या सभेसाठी स्टेजची उभारणी उत्तर प्रदेश पी.डब्ल्यू.डी ने केली होती आणि वीजेची व्यवस्था उत्तर प्रदेश वीजमंडळाने केली होती इत्यादी.

अजून या २१ आमदारांचे पद रद्द झालेले नाही. पण समजा तसे झाले तर केजरीवालांचा राजकारणातील अनुभव कमी पडला म्हणून अशी चूक त्यांच्या हातून होत आहे असे म्हणायला पाहिजे. त्याचे कसे आहे, जर चित्रपटांची परिक्षणे लिहिणे, सतत मोदीनामाचा जप करणे यात वेळ न घालवता कायद्यातील तरतुदी समजावून घेण्यात वेळ घालवला असता तर नसते शुक्लकाष्ठ मागे लागले नसते.

आणि नेहमीप्रमाणे केजरीवालांनी या प्रकाराचा दोषारोप मोदींवर केला आहे. म्हणजे कायद्यातील तरतुदी समजावून न घेता हे गाढवासारखे काहीतरी करणार, २१ आमदारांचे पद रद्द झाले तर ते कायद्यातील प्रक्रीयेमुळे होणार, युपीए सरकारने नेमलेले नायब राज्यपाल राष्ट्रपती बनण्यापूर्वी जवळपास अख्खे आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलेल्या प्रणव मुखर्जींकडे हा कायदा रिफर करणार, राष्ट्रपती त्यावर निर्णय देणार आणि दोष कोणावर? तर मोदींवर. मजाच म्हणायची.

बरं या प्रकरणी मोदी सरकारने राष्ट्रपतींकडे कुठलीही शिफारस केली आहे अशी बातमी आलेली नाही. केंद्रिय मंत्रीमंडळाने राष्ट्रपतींकडे केलेली प्रत्येक शिफारस बातम्यांमध्ये येतेच असे नक्कीच नाही. पण आआपशी संबंधित फालतूतल्या फालतू बातमीलाही इतकी प्रसिध्दी मिडियात मिळते हे लक्षात घेता अशी कुठली शिफारस मोदी सरकारने केली असती तरी ते बातम्यांमध्ये नक्कीच आले असते. असे दिसते की हा दिल्लीचे नायब राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यातील मामला होता आणि केंद्र सरकारचा यात काहीही सहभाग नव्हता. आणि अगदी अशी शिफारस मोदी सरकारने केली असे गृहित धरले तरी ती पुनर्विचारासाठी एकदा परत पाठवायचा अधिकार होताच.पण तो त्यांनी वापरला नाही याचा अर्थ काय लावायचा? तरीही जे काही होत आहे त्याला मोदी जबाबदार?

तुकाराम महाराजांनी नामस्मरणाचे महत्व समजावले आहे.अनेक भारतीय नावांप्रमाणे नरेंद्र हे पण देवाचे नाव आहे (असे वाटते). तसे असेल तर 'नरेंद्र' हे नामस्मरण इतक्या वेळा केजरीवालांनी केले आहे की नरेंद्र हे कुठल्या देवाचे नाव असेल तर तो देव केजरीवालांना स्वतः दर्शन द्यायला हातातील सगळी कामे टाकून धावत येईल असे वाटायला लागले आहे.

विकास's picture

15 Jun 2016 - 7:00 pm | विकास

तुम्हाला सर्वत्र केजरीवालांचीच चूक दिसते...

त्यांनी किती स्पष्टपणे म्हणले आहे ते बघा: "Modi-ji, Target Me, Don't Harass Delhi'ites: Kejriwal On Parliamentary Secretary Row" स्वत:च्या रयतेची इतकी काळजी करणारा आणि प्रसंगी होणारे वार लिलये स्वतःच्या अंगावर झेलणार्‍या अशा जनतेच्या पाईकावर तुम्ही घेतला संशय आणि करत असलेली टिका निषेधार्ह आहे.

- आपला, केजरीभक्त ;)

श्रीगुरुजी's picture

15 Jun 2016 - 11:13 pm | श्रीगुरुजी

गॅरी ट्रुमन,

+ १

२००६ मध्ये जया बच्चन यांचे राज्यसभा सदस्यत्व लाभाचे पद या मुद्द्यावरून रद्द झाले. त्याचे कारण २००४ मध्ये त्यांची नियुक्ती उत्तर प्रदेश सरकारच्या एका महामंडळावर झाली होती. त्याला जया बच्चन यांनी न्यायालयात आव्हान दिले. या पदावर नियुक्ती झाल्यामुळे जया बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारकडून पगार मिळणार होता. पण तो त्यांनी नाकारला. या पदामुळे जो काही प्रवास झाला त्याचा खर्चही त्यांनी स्वतः केला आणि उत्तर प्रदेश सरकारकडून त्याचा परतावाही घेतला नाही. तेव्हा जया बच्चन यांचे म्हणणे होते की हे पद या कारणामुळे लाभाचे पद नव्हते. मे २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लाभाचे पद म्हणजे नक्की काय हे स्पष्ट केले :

लाभाचे पद स्वीकार करणार्‍याला अन्य मार्गाने कुठले उत्पन्न मिळवण्याची मुभा नसते. तसे आढळून आल्यास त्या आमदार वा खासदाराचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. काही वर्षांपूर्वी जया बच्चन यांचीही अशी नेमणूक त्यांना महागात पडलेली होती. उत्तर प्रदेश सरकारने त्यांना चित्रपट विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमले होते आणि त्या राज्यसभेतही होत्या. त्यावर खटला भरला गेला आणि जयांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द झाले होते.

त्यानंतर धावाधाव झाली आणि सोनिया गांधींनीही आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. कारण, त्या लोकसभा सदस्य होत्या आणि त्याचवेळी त्यांना राष्ट्रीय सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष म्हणून मंत्रिपदाचा दर्जा दिलेला होता. तिथे मग लाभाचे पद हा नियम लागू होऊ शकत होता. सोनिया गांधींनी सहानुभूती मिळविण्यासाठी एक योजनाबद्ध नाटक केले. २००६ मध्ये संसदेच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाचा पूर्वार्ध मार्च च्या शेवटच्या आठ्वड्यात संपत होता व नंतर अंदाजे ६ आठवड्याच्या सुट्टीनंतर अधिवेशनाचा उत्तरार्ध ८-९ मे च्या आसपास सुरू होणार होता. अधिवेशनाच्या पूर्वार्धाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्यावर अन्याय होत आहे, आपल्याला पदाचा मोह नाही व कायद्याची बूज राखण्याकरिता आपण खासदारकी व युपीएचे अध्यक्षपद सोडत आहोत असा कांगावा करून त्यांनी नाटकी पद्धतीने खासदारकीचा राजीनामा दिला. एखाद्या विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार किंवा खासदाराने राजीनामा दिला किंवा त्याच्या मृत्युमुळे तिथे पुन्हा निवडणुक घ्यायची असल्यास निवडणुक आयोगाला घटनेनुसार ६ महिन्यांची मुदत असते. बहुतेक सर्व प्रकरणात निवडणुक आयोग त्या मतदारसंघात लगेच पोटनिवडणुक न घेता अशा अनेक मतदारसंघांची एकत्रित पोटनिवडणुक साधारणपणे ४-५ महिन्यांनी घेतो. सोनिया गांधींच्या प्रकरणात त्यांनी राजीनामा दिल्याच्या दुसर्‍या दिवशी निवडणुक आयोगाने रायबरेली मतदारसंघात ७ मे च्या आसपास पोटनिवडणुक घेण्याची अधिसूचना काढली. लगेच ७ मे ला पोटनिवडणुक होऊन त्यात सोनिया गांधी विजयी झाल्या व लगेच ९ मे पासून अधिवेशनाच्या उत्तरार्धाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा लोकसभेत हजर झाल्या. म्हणजे राजीनामा दिल्याच्या दिवसापासून जेमतेम ४० दिवसात पोटनिवडणुक झाली. भारताच्या इतिहासात निवडणुक आयोगाने इतकी तत्परता कधीच दाखविली नव्हती. दरम्यानच्या काळात मनमोहन सिंगांनी मंत्रीमडळाची बैठक घेऊन त्यात युपीएचे अध्यक्षपद हे लाभाचे पद नाही अशी कायदेशीर अधिसूचना मंजूर करून घेतली. त्यामुळे सोनिया गांधी लगेच मे महिन्यात पुन्हा एकदा खासदारपद व युपीएचे अध्यक्षपद या दोन पदांवर स्थानापन्न झाल्या. पदाचा मोह नाही असे सांगून दोन्ही पदाचा राजीनामा दिला व लगेच ६ आठवड्याच्या अवधीत दोन्ही पदे पुन्हा स्वीकारली.

जया बच्चन प्रमाणेच अनिल अंबानीना देखील या वादामुळे राज्यसभेची खासदारकी सोडावी लागली होती.

आणि नेहमीप्रमाणे केजरीवालांनी या प्रकाराचा दोषारोप मोदींवर केला आहे. म्हणजे कायद्यातील तरतुदी समजावून न घेता हे गाढवासारखे काहीतरी करणार, २१ आमदारांचे पद रद्द झाले तर ते कायद्यातील प्रक्रीयेमुळे होणार, युपीए सरकारने नेमलेले नायब राज्यपाल राष्ट्रपती बनण्यापूर्वी जवळपास अख्खे आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलेल्या प्रणव मुखर्जींकडे हा कायदा रिफर करणार, राष्ट्रपती त्यावर निर्णय देणार आणि दोष कोणावर? तर मोदींवर. मजाच म्हणायची.

केजरीवालां हा इतका भंपक माणूस आहे की जर त्यांची पचनसंस्था बिघडल्यामुळे त्यांना बद्धकोष्ठ झाले किंवा अरबटचरबट खाण्यामुळे अतिसार झाला तरी ते लगेच ट्विट करून व पत्रकार परीषद घेऊन त्याबद्दल मोदींनाचा जबाबदार धरतील.

मृत्युन्जय's picture

18 Jun 2016 - 4:58 pm | मृत्युन्जय

दोन्ही प्रतिसाद (गुर्जींचा आणि क्लिंटनचा) अतिशय सुरेख

राघवेंद्र's picture

19 Jun 2016 - 4:58 am | राघवेंद्र

+१

विकास's picture

16 Jun 2016 - 12:37 am | विकास

केजरीवाल स्टाईल बघण्यासारखी आहे! LOL चा अर्थ समजेल!

श्रीगुरुजी's picture

17 Jun 2016 - 2:12 pm | श्रीगुरुजी
गॅरी ट्रुमन's picture

17 Jun 2016 - 5:06 pm | गॅरी ट्रुमन

आपल्या पक्षाच्या २१ आमदारांचे दिल्ली विधानसभेचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यावर आपले युगपुरूष बिथरले आहेत. त्यांनी आता एक नवा आरोप केला आहे. दिल्ली महापालिकेच्या एका इंजिनिअरचा मागच्या महिन्यात खून झाला. त्यात भाजपचे खासदार महेश गिरी यांचा हात आहे असा नवाच आरोप त्यांनी केला आहे. त्यावर महेश गिरी यांनी रविवारी १९ जूनला दुपारी ४ वाजता दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एक कार्यक्रम ठेवला आहे आणि त्या कार्यक्रमात येऊन आपल्याविरूध्दचे पुरावे सादर करावेत आणि पुरावे सादर केल्यास आपण राजीनामा देऊ आणि पुरावे सादर करता न आल्यास त्यांनी राजीनामा द्यावा असे खुले आव्हान युगपुरूषांना दिले आहे.

A
आपले युगपुरूष त्या कार्यक्रमाला जातात का ते बघायचे. अर्थातच आपण डायरेक्ट भगवान श्रीकृष्णाच्या दरबारातून पृथ्वीतलावर येऊन पडले आहोत असा एक मोठ्ठा गैरसमज आपल्या युगपुरूषांचा आहेच. त्यामुळे आपण कोणावरही कसलेही आरोप पुरावे नसताना करावेत आणि इतर कोणीही आपल्याला प्रश्न विचारले तर तो माणूस भ्रष्ट, अंबानी-अडाणींचा एजंट, बीजेपीच्या पेरोलवरचा वगैरे गोष्टी या युगपुरूषांना वाटत असतातच. त्यामुळे हे त्या कार्यक्रमाला जातील याची शक्यता फारच कमी. २०१४ च्या निवडणुकांपूर्वी गुजरातमध्ये जाऊन मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींच्या ऑफिसवर आधी भेटीची वेळ न घेता थडकून "मोदींनी माझ्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत आणि उत्तरे दिली नाहीत तर मोदी मला घाबरतात" असला तमाशा याच गृहस्थाने केला होता. आता दुसर्‍या कोणी तसे आव्हान आपल्याला दिल्यावर यांची प्रतिक्रिया काय होते हे बघायचे.

विकास's picture

17 Jun 2016 - 5:44 pm | विकास

अर्थातच आपण डायरेक्ट भगवान श्रीकृष्णाच्या दरबारातून पृथ्वीतलावर येऊन पडले आहोत असा एक मोठ्ठा गैरसमज आपल्या युगपुरूषांचा आहेच.

केजरीवाल हे "समय" आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे केजरीवालांच्या दरबारातले आहेत, उलट नाही...

---------- <\center>

(क्षमस्व, पण केजरीवालांच्या बद्दल लिहीताना एकतर कडक टिका अथवा उपरोध या व्यतिरीक्त लिहीणे अवघड जाते.)

गॅरी ट्रुमन's picture

17 Jun 2016 - 5:52 pm | गॅरी ट्रुमन

केजरीवाल हे "समय" आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे केजरीवालांच्या दरबारातले आहेत, उलट नाही...

हहपुवा

श्रीगुरुजी's picture

18 Jun 2016 - 2:46 pm | श्रीगुरुजी

(क्षमस्व, पण केजरीवालांच्या बद्दल लिहीताना एकतर कडक टिका अथवा उपरोध या व्यतिरीक्त लिहीणे अवघड जाते.)

+ १

हा माणूस संपूर्ण दिवस ट्विटरवर असतो किंवा चित्रपटगृहात असतो. निवृत्त लोकांकडे पण एवढा वेळ नसतो.

याची ट्विटरवरील भाषा बघा.

Modi ji ne bhi chun chun ke chamchon ki fauj jama ki h- Gajendra Chauhan, chetan chauhan, pahlaj nihalani, arnab goswami, smriti irani

श्रीगुरुजी's picture

17 Jun 2016 - 5:41 pm | श्रीगुरुजी

त्यामुळे आपण कोणावरही कसलेही आरोप पुरावे नसताना करावेत आणि इतर कोणीही आपल्याला प्रश्न विचारले तर तो माणूस भ्रष्ट, अंबानी-अडाणींचा एजंट, बीजेपीच्या पेरोलवरचा वगैरे गोष्टी या युगपुरूषांना वाटत असतातच.

केजरीवाल सध्या अत्यंत पिसाळले आहेत. आता तर त्यांनी राष्ट्रपतींवरही शरसंधान केले आहे. त्यांची मुक्ताफळे पहा.

राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतलेला असताना मोदी यांना दूषणे का दिली जात आहेत, असे विचारले असताना केजरीवाल म्हणाले की, राष्ट्रपती कोणताही निर्णय घेत नाहीत, फाइल त्यांच्याकडे जात नाही, सरकार आणि गृहमंत्रालय निर्णय घेते, असेही ते म्हणाले.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/aap-mla-under-disqualification-...

यांचे अजून एक भांडे फुटले.

http://www.maharashtratimes.indiatimes.com/nation/aap-suspends-alka-lamb...

मला कुणीही विचारलेले नसतानाही मी एक सांगू का?

केजरीवाल लै चुका करत असेल आणि विदुषकी चाळे करत असेल पण या धाग्यावर ज्या थाटात ते मांडले जात आहे ते सुद्धा फारसे पटत नाहीये.

श्रीगुरुजी's picture

19 Jun 2016 - 3:11 pm | श्रीगुरुजी

केजरीवालांनी गुदस्ता साली आआपच्या २१ आमदारांची आआपच्या ६ मंत्र्यांचे संसदीय सचिव पदावर बेकायदेशीररित्या नेमणूक केली. त्याबद्दल जेव्हा आरडाओरडा झाला तेव्हा त्यांची नेमणूक कायदेशीर करण्याकरीता व त्यांना लाभाचे पद या नियमापासून मुक्ती देण्याकरीता त्यांची नेमणूक लाभाचे पद या कायदेशीर कचाट्यातून सोडविण्यासाठी त्यांनी पूर्वलक्षी प्रभावाने एक विधेयक आणून ते विधानसभेत मंजूर करून घेतले. जेव्हा राष्ट्रपतींनी ते विधायक फेटाळले तेव्हा त्यांनी राष्ट्रपतींच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करून नेहमीप्रमाणे मोदी व राजनाथ सिंगांच्या नावाने खडे फोडले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले होते,

“They are highly qualified people in different fields, starting from MBA to engineering and not illiterates like in other parties. Mohalla Clinics are product of their hard work so is the mapping of schools,” Kejriwal Said.

त्यातील काही highly qualified जणांची (शिव चरण गोयल, राजेश गुप्ता, जर्नेल सिंग, अवतार सिंग, मनोज कुमार) व आआपच्या इतर काही जणांची शैक्षणिक पात्रता बघा.

कपिलमुनी's picture

25 Jun 2016 - 4:55 pm | कपिलमुनी

आपल्या महाराष्ट्राच़्या सुशिक्षित आमदारांची यादी पण द्या ना

प्रदीप's picture

25 Jun 2016 - 8:16 pm | प्रदीप

इतर पक्षांच्या नेत्यांच्या डिग्रीची उठाठेव महाराष्ट्रातील कुठल्याही पक्षाने केली आहे काय? ज्या पक्षाने ती गेले काही दिवस अखिल भारतीय पातळीवरून करून धुरळा उडवला आहे, त्याच्या स्वतःच्या नेत्यांच्या डिग्रींची स्थिती काय आहे, हे पहाणे म्हणूनच अगत्याचे ठरते, इतर पक्षांचे नाही.

सुबोध खरे's picture

25 Jun 2016 - 8:37 pm | सुबोध खरे

आपण हसे लोकाला
शेम्बूड आपल्या नाकाला

कपिलमुनी's picture

26 Jun 2016 - 3:07 pm | कपिलमुनी

६वी पास(?) उमा भारतीय मंत्रीपद भूषवत असताना दुसऱ्याचा शेबूंड कशाला दाखवायचा

पब्लिकमध्ये फरक आहे, तो राहू दे की. मुळात जोपर्यंत आपल्या राज्यघटनेत दुरूस्ती करुन किमान शैक्षणिक पात्रता असलेले लोकच निवडणूक लढवू शकतात असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे असंच होत राहणार आहे. असे लोक प्रत्येकच राजकीय पक्षात आहेत. कुणीही समोरच्याकडे बोट दाखवू नये, तीन बोटं स्वतःकडेच रोखली जातात - हेच यातून सिद्ध होतंय.

कपिलमुनी's picture

26 Jun 2016 - 6:08 pm | कपिलमुनी

सगळे शेंबडे आहेत :)
पण सुपारी घेउन घाउक टीका का?
असा अजेंडामुळे मराठी संस्थळांना साहित्यीक जाउन राजकीय स्वरुप येते

बोका-ए-आझम's picture

26 Jun 2016 - 7:12 pm | बोका-ए-आझम

मराठी संस्थळांवर राजकीय चर्चा व्हायलाच पाहिजेत. शिवाय आता तर साहित्यातही राजकारण शिरलेलं आहेच. आणि समोरचा शिव्या घालण्यासारखं किंवा टीका करण्यासारखं वागत असेल तर शिव्या या घालायलाच पाहिजेत आणि टीका ही करायलाच पाहिजे - जे केजरीवाल आणि त्यांची आआप करताहेत. बरं, अजेंडा काय फक्त भाजपवाल्यांनाच आहे? बाकीचे काय कोरी पाटी घेऊन हिंडतात?

सुबोध खरे's picture

26 Jun 2016 - 8:27 pm | सुबोध खरे

दुसऱ्या कुठल्याही पक्षाने प्रामाणिकपणाचा साधनशुचितेचा मक्ता आमच्याच कडे आहे असा टेम्भा मिरवला नाही किंवा जगात सत्य प्रामाणिकपणा शिक्षण आणि ज्ञान हे फक्त आमच्याकडेच आहे असा दावा केला नाही. "आप" त्यांच्याच न्यायाने वागवले आणि त्यांचेच माप त्यांच्या पदरात टाकले की त्यांचे अकांड तांडव सुरू होते. इतके दांभिक पण कम्युनिस्टांनी सुद्धा दाखवले नसेल.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2016 - 8:22 pm | श्रीगुरुजी

६वी पास(?) उमा भारतीय मंत्रीपद भूषवत असताना दुसऱ्याचा शेबूंड कशाला दाखवायचा

स्वतःच्या दोन्ही नाकपुड्या शेंबडाने गच्च भरलेल्या असताना आणि दोन्ही नाकपुड्यातून ऐवज गळत असताना हे चरट दमी क्षवालेच दुसर्‍यांच्या नाकाची उठाठेव करीत आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

26 Jun 2016 - 6:59 pm | गॅरी ट्रुमन

केजरीवाल उवाच:

“Our MLAs are diligent, qualified and educated. We have MBAs, doctors and engineers. They are not like the illiterates in other parties. So, when we have such a talent pool, we have to use it to serve the people. That is why they voted for us”

आपल्या २१ आमदारांचे लाभाच्या पदावरून विधानसभेचे सदस्यत्व रद्द व्हायची शक्यता निर्माण झाल्यानंतर आपल्या आमदारांच्या समर्थनार्थ श्री.रा.रा केजरीवालांनी ही मुक्ताफळे उधळली होती. असे देवेन्द फडणवीसांनी म्हटलेले नसल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांची शैक्षणिक पात्रता किती हे बघायचा संबंध आला नाही.

अर्थातच आपटर्डपुढे लॉजिक चालत नाही त्यामुळे ते ही गोष्ट समजूच शकणार नाहीत. हे इतरांसाठी लिहित आहे.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2016 - 8:45 pm | श्रीगुरुजी

इतर पक्षांच्या नेत्यांच्या डिग्रीची उठाठेव महाराष्ट्रातील कुठल्याही पक्षाने केली आहे काय? ज्या पक्षाने ती गेले काही दिवस अखिल भारतीय पातळीवरून करून धुरळा उडवला आहे, त्याच्या स्वतःच्या नेत्यांच्या डिग्रींची स्थिती काय आहे, हे पहाणे म्हणूनच अगत्याचे ठरते, इतर पक्षांचे नाही.

वेल सेड प्रदीप!

+१

काहीच प्रतिसाद नाही
सगळे एकाच बाजूने लढत आहेत

15 20 नवे प्रतिसाद झाले कि धागा उघडून वाचायचा
छान करमणूक होते

एवडे होऊनही अजून काही लोक आप समर्थक असतील तर देव त्यांचे भले करो
किंवा कदाचित त्यांना आपले श्रद्धा स्थान चुकीचे आहे हे कबूल करण्याची लाज वाटत असावी

गॅरी ट्रुमन's picture

21 Jun 2016 - 10:26 am | गॅरी ट्रुमन

एवडे होऊनही अजून काही लोक आप समर्थक असतील तर देव त्यांचे भले करो

बापरे म्हणजे देवाला बरेच काम दिलेत की हो. इतके सगळे होऊनही (किंवा यापेक्षाही जास्त झाले तरी) आआपचे समर्थन काही लोक करतच राहतील. इकडच्याच काही माजी सदस्यांच्या फेसबुकच्या भिंती बघितल्यास मी नक्की काय म्हणत आहे हे लक्षात येईलच.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2016 - 8:26 pm | श्रीगुरुजी

काहीच प्रतिसाद नाही
सगळे एकाच बाजूने लढत आहेत

तुम्ही ज्यांची आतुरतेने वाट पहात होता ते आआप समर्थक लढण्यासाठी आलेले आहेत.

गॅरी ट्रुमन's picture

26 Jun 2016 - 8:29 pm | गॅरी ट्रुमन

तुम्ही ज्यांची आतुरतेने वाट पहात होता ते आआप समर्थक लढण्यासाठी आलेले आहेत.

आणि चार महिन्यांपूर्वी अस्तित्वात आलेली अशाच एका आआप समर्थकाची ड्यु.आयडी पण आता लढाईत उतरली आहे असे दिसते. असो.

गॅरी ट्रुमन's picture

21 Jun 2016 - 10:50 am | गॅरी ट्रुमन

गेल्या तीन दिवसात नव्या घडामोडी घडल्या आहेत.

दिल्ली महापालिकेचे वकिल एम.एम.खान यांच्या खुनात भाजपचे खासदार महेश गिरी सहभागी असल्याचा आरोप केजरीवालांनी नायब राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. आणि तो आरोप करतानाही आपल्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल होऊ शकणार नाही याची पुरेपूर काळजी केजरीवालांनी घेतली आहे. म्हणजे ’या हत्येत महेश गिरी यांचा हात आहे असे बोलले जात आहे’ अशा स्वरूपाचे वाक्य त्यांनी त्या पत्रात लिहिले आहे. आणि मग ’मोदींचे’ दिल्ली पोलिस (केजरीवालांच्या भाषेत ठुल्ले--म्हणजे नक्की काय हे दिल्लीकरच जाणोत) महेश गिरी यांना पाठिशी घालत आहेत अशा स्वरूपाचे विधानही केजरीवालांनी केले म्हणजे एकीकडे आरोप पण केला आणि दुसरीकडे अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्याइतकी स्पष्ट भाषाही वापरली नाही. असो.

तर याविरोधात १९ जूनला दुपारी चार वाजता दिल्लीत Constitution Club मध्ये महेश गिरींनी पुराव्यानिशी खुल्या चर्चेसाठी यायचे खुले आव्हान महेश गिरींनी केजरीवालांना दिले. अर्थातच केजरीवाल त्या ठिकाणी गेले नाहीत. फेब्रुवारी २०१५ मधील दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी ’दिल्ली डायलॉग’ म्हणून एक प्रकार आआपने आयोजित केला होता. त्यावेळी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींना त्याचे आमंत्रण दिले गेले होते. आणि त्या तिथे गेल्या नाहीत तेव्हा त्यांच्या नावाने रिकामी खुर्ची ठेवण्यात आली होती. महेश गिरींनी नेमका हाच प्रकार केजरीवालांवर उलटवला.

Kejru1

म्हणजे मजा बघा. हे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयावर आधी वेळ न घेता जाऊन थडकणार आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत तर मोदी मला घाबरतात असे म्हणणार. सगळ्या जगाला ’खुली बहस’ साठी आमंत्रण देणार आणि समोरची व्यक्ती आली नाही तर ’जितं मया’ म्हणून भाव खाणार. मग आता अशाच ’खुल्या बहस’ साठी इतर कोणी आमंत्रण दिले तर त्यापासून हे दूर का पळतात?

Kejru 2

हिट ऍन्ड रन हा तर केजरीवालांचा स्थायीभावच आहे. काहीतरी सनसनाटी आरोप करायचे, खळबळ माजवायची आणि आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ कसलेही पुरावे द्यायचे नाहीत आणि इतरांनी मागितले तर पळून जायचे.

आता दोन दिवसांपासून महेश गिरींनी केजरीवालांच्या घरासमोरच धरणे देऊन उपोषण सुरू केले आहे. मी शक्यतो अशा नाटकांना समर्थन देत नाही. पण जो प्रकार केजरीवालांनी केला होता तीच दवा त्यांनाच कोणीतरी खिलवायला हवीच होती. ते काम महेश गिरी करत आहेत. हा प्रकार किती दिवस चालेल हे माहित नाही.पण त्या निमित्ताने केजरीवालांनी जो सौजन्याचा आणि सोवळेपणाचा बुरखा पांघरलेला आहे तो टराटरा फाटायला मदतच होईल. निदान मिपावर ते काम मी अगदी इमाने इतबारे करणार आहे--- इतर कोणालाही काहीही वाटले तरी.

सामान्य वाचक's picture

21 Jun 2016 - 12:49 pm | सामान्य वाचक

मला मनमोहन देसाई ( तेच ना नक्की?) यांचे 1 वाक्य आठवते

भारतीय प्रेक्षकांचे सरासरी वय 15 आहे त्यामुळे तसेच चित्रपट बनवले जातात
दिल्लीवाल्यानी हे पूरेपूर पटवून दिले

जगात कुंभार थोडे ,,,,, हे तर आहेच
केजु ना कुंभार होणे जमले आहे

सुबोध खरे's picture

26 Jun 2016 - 8:21 pm | सुबोध खरे

आता प्रश्न असा झाला आहे की कुंभार कोण आणि गाढव कोण हेच कळेनासे झालंय

सामान्य वाचक's picture

27 Jun 2016 - 12:19 pm | सामान्य वाचक

खरच असे झाले आहे

कपिलमुनी's picture

25 Jun 2016 - 4:47 pm | कपिलमुनी

या संदर्भात एक रोचक बातमी सापडली. याचा स्पष्टीकरण पण तयार असेलच ते वाचायला आवडेल

कपिलमुनी's picture

25 Jun 2016 - 4:53 pm | कपिलमुनी
कपिलमुनी's picture

28 Jun 2016 - 12:09 am | कपिलमुनी

मोदींनी नेमलेल्या संसदीय सचिवांचा काय बरे कारण असेल??

विकास's picture

28 Jun 2016 - 12:23 am | विकास

अहो तिथे कायदा आधीपासूनच होता. (मोदींनी केला का त्याही आधीपासून ते माहीत नाही!) तेच मला वाटते राजस्थानात देखील कायदा आहे. त्यामुळे कायद्यानुसार आमदारांना या संदर्भात exempt केलेले होते. तुमच्या केजरीवालांनी कायदा नसताना आमदारांच्या नियुक्त्या केल्या. कदाचित त्यांना वाटले असावे की आपण दिल्लीचे शेहनशहा असल्याने काहीही करू शकतो... जेंव्हा लक्षात आले की ते प्रकरण शेकणार तेंव्हा कायदा करून जे बेकायदा आहे ते कायद्यात बसवण्याचा प्रयत्न केला. आता जर त्यांनी तशा नियुक्त्या केल्या तर त्या चालू शकतात पण जेंव्हा ती कायद्यानुसार लाभाची पदे होती त्यांना मात्र तत्कालीन कायद्यानेच बरोबर का चूक ठरवता येऊ शकेल. नंतर केलेल्या कायद्याने नाही!

बोका-ए-आझम's picture

28 Jun 2016 - 1:36 am | बोका-ए-आझम

तुमच्या केजरीवालांना साधा कायदा माहित नाही? ते तर सर्वज्ञ आहेत ना? इतर मुलं ' अडगुलं मडगुलं ' वर पाय आपटायची त्यावेळी केजरीवाल राज्यघटनेचा अभ्यास करायचे ना? मग आता का त्याच मुलांप्रमाणे हातपाय आपटताहेत?

सामान्य वाचक's picture

25 Jun 2016 - 6:42 pm | सामान्य वाचक

Delxit होणार तर

अशक्य आहे हा माणूस

कपिलमुनी's picture

26 Jun 2016 - 6:13 pm | कपिलमुनी

यात नाटक काय?
बाकीचे पक्ष / संघटना मोर्चा काढतात .

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jun 2016 - 4:43 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

ओ

गॅरी ट्रुमन's picture

26 Jun 2016 - 7:28 pm | गॅरी ट्रुमन

जगातील एकमेवाद्वितीय प्रामाणिक पक्षाचे आमदार दिनेश मोहनिया यांनी एका वृध्द गृहस्थावर हात उचलला असा आरोप आहे. त्याचे झाले असे की हे त्यांच्या समर्थकांसह गेले असताना त्या वृध्द गृहस्थाला त्यांना ओळखता आले नाही. काय हा उपमर्द. इतक्या प्रामाणिक माणसाला हे ओळखत कसे नाही? विशेषत: दिनेश मोहनियांकडे KCHP (Kejriwal Certified Honest Politician) ह अत्यंत coveted सर्टिफिकेट असताना त्यांना न ओळखता येणे हा गुन्हा माफ करता येण्याजोगा नाहीच. त्यामुळे दिनेश मोहनियांनी त्या वृध्द गृहस्थावर हात उचलला असा आरोप आहे.

तसेच एका वृध्द महिला यांच्या कार्यालयात त्यांच्या भागातील पाणीटंचाईची तक्रार करायला गेल्या असताना या दिनेश मोहनियांनी त्यांच्याशीही गैरवर्तन केले असा आरोप आहे.

महिलेशी असे गैरवर्तन करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. तरीही ’आपले कोण काय वाकडे करेल’ अशा गुर्मीमध्ये दिनेश मोहनिया पत्रकार परिषद घेत असताना पोलिसांनी त्यांना तिथूनच अटक करून उचलून नेले.

झाले. सगळे आभाळ कोसळले. मग केजरीवालांना दिल्लीमध्ये आणीबाणी लागू झाली आहे हे स्वप्न पडले.

मिडिया सुध्दा या मोहनियांनी थोबाडित मारलेल्या त्या वृध्द गृहस्थाला आणि त्या महिलेला फारसे कव्हरेज देताना दिसत नाहीत. उत्तराखंडमध्ये घोड्याचा पाय फ्रॅक्चर झाल्यावर याच मिडियावाल्यांनी दिवसभर त्याविषयी चर्वितचर्वण चालवले होते. मी एक प्राणीप्रेमी असल्यामुळे मला त्या घोड्याचा पाय फ्रॅक्चर झाला (आणि नंतर निधन झाले) याचे वाईट वाटलेच होते. पण मिडियावाल्यांच्या मते आमदाराने वृध्द माणसाच्या थोबाडित मारणे किंवा त्या महिलेबरोबर वाईट वर्तणूक करणे ही अजिबात महत्वाची गोष्ट वाटत नाही. बरोबर आहे. मिडियावाले आआपविरूध्द कसे काही बोलतील? दिल्ली सरकारच्या अधिपत्याखालील कॉलेजांमध्ये ३१ मोठ्या मिडियावाल्यांची नियुक्ती करून केजरीवालांनी त्यांना वश करून ठेवले आहे ना?

असो. मग त्या भाजप आमदाराला घोड्याला इजा पोहोचवल्याप्रकरणी उत्तराखंडमध्ये अटक झाली होती त्यावेळी उत्तराखंडमध्ये आणीबाणी असल्याचे या केजरीवालांना वाटले नव्हते.

हा आम आदमी पक्ष, त्याचे समर्थक आणि त्याला पाठिशी घालणारे मिडियावाले म्हणजे भारताला लागलेले सगळ्यात मोठे ग्रहण आहे. हे असले हलकट असताना बाहेरच्या शत्रूची गरजच काय?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jun 2016 - 7:51 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

1] अहो अशी देशात कितीतरी उदाहरणं आहेत कि आमदार/खासदारांनी लोकांशी गैरवर्तणुक केली. मुद्दा असा आहे कि मोहनियांनी थोबाड मारली कि नेमकं काय झालं?
त्या ठिकाणी तुम्ही होतात का?

2]मिडियावाले आप ला पाठिशी घालतायत???
अहो त्यात्या,एक 'आज तक' चॅनेल व्हुतं 'आप'ची हुजरेगिरी करणारं पण ते देखील आता तसं करताना दिसत नाही.किती चॅनेल्स मोदीभाट आहेत,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.तरी तुम्ही मिडियावर आक्षेप घेताय? एनडीटीवी वगळता सगळीकडे 'आप चा सरेंडर ड्रामा' अशाच बातम्या सुरू आहेत,त्यामुळे तुमच्या 'मिडिया आपला पाठिशी घालते'या विधानात काही तथ्य नाही.

बोका-ए-आझम's picture

26 Jun 2016 - 10:12 pm | बोका-ए-आझम

आआपची हुजरेगिरी करायला?

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2016 - 8:39 pm | श्रीगुरुजी

महिलेशी असे गैरवर्तन करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. तरीही ’आपले कोण काय वाकडे करेल’ अशा गुर्मीमध्ये दिनेश मोहनिया पत्रकार परिषद घेत असताना पोलिसांनी त्यांना तिथूनच अटक करून उचलून नेले.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/two-molestation-...

Three cases have been registered against AAP MLA Dinesh Mohaniya in the last four months, including one on charges of assault and two on charges of molestation, police sources told The Indian Express Saturday.

“The first case was registered at Govindpuri police station in March, after he allegedly misbehaved with some women in Tughlakabad during a protest. Later, he filed a cross-case against the complainants. He was granted anticipatory bail in that case. Another case of molestation was registered at Neb Sarai police station and a third case was registered after he allegedly slapped a 60-year-old man Friday,” said sources.

They added that Mohaniya had been repeatedly asked to join the investigation, but he had not responded to four notices issued by Delhi Police. “When the investigating officer called him up, the MLA assured him he will join the probe. But he did not turn up,” said a source.

He added that on Thursday, three complainants had recorded their statement before a magistrate and claimed they were molested by Mohaniya and his supporters the day before.

During questioning, Mohaniya told police that some residents, including the complainants, had created a ruckus in his office, said sources. The MLA reportedly told police about three persons who were present in his office during an argument between him and the woman.

However, police sources said these witnesses, in their statement to police, had corroborated the allegations made by the complainant, not the MLA.

A day before Mohaniya was arrested, the investigation officer in the molestation case had gone to the MLA’s house to issue a notice to join the probe, for the fourth time. But Mohaniya was not home and his father refused to accept the letter, said sources. Senior officials then decided to arrest the MLA, added sources.

झाले. सगळे आभाळ कोसळले. मग केजरीवालांना दिल्लीमध्ये आणीबाणी लागू झाली आहे हे स्वप्न पडले.

महिलांशी गैरवर्तन करणे, ६० वर्षाच्या व्यक्तीला आपल्याला न ओळखल्याबद्दल कानफाटीत मारणे, पोलिसांनी ४ नोटिसा पाठवून सुद्धा चौकशीसाठी हजर न राहणे या गोष्टींंमध्ये २१ व्या शतकातील अवतारी महापुरूष श्री श्री केजरीवाल महाराज यांना काहीच वावगे वाटत नाही. पण या गोष्टींविरूद्ध गुन्हे नोंदविल्यानंतर पोलिसांनी अनेकवेळा बोलावून सुद्धा हजर न राहण्याबद्दल अटक केली तर लगेच यांना दिल्लीमध्ये आणीबाणी लागू झाल्याची खात्री झाली. अंगात पराकोटीचा ढोंगीपणा व पराकोटीचा निगरगट्टपणा असल्याशिवाय असे वाटत नसते

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jun 2016 - 8:18 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

ऑ

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jun 2016 - 8:20 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

च

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

26 Jun 2016 - 8:23 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

/

सामान्य वाचक's picture

27 Jun 2016 - 12:37 pm | सामान्य वाचक

मोदी के गुलाम
असा धागा काढा आणि हे सगळे तिकडे पोस्ट करा बघू

धाग्याच्या विषयाला धरून लिहा कि जरा .
आणि आप समर्थक असाल तर लोका नि केलेल्या आरोपांवर काही उत्तर द्या

उगीच। 'मग तू पण माझा डबा खाल्ला' मोड मध्ये जाऊ नका

श्री गावसेना प्रमुख's picture

27 Jun 2016 - 12:42 pm | श्री गावसेना प्रमुख

पाताळ शोधता शोधता कधी पाताळात जाईल हा महामुर्ख मनुष्य कळणार ही नाही,मागे एका त्याच्या माजी समर्थकाने त्याच्या बद्दल लिहिले होते की यह केजरीवाल सिस्टम से लढते लढते कब कानून से उलझ बैठा पता ही नहीं चला।

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2016 - 8:48 pm | श्रीगुरुजी

ज्याप्रमाणे राष्ट्रपतींकडे कोणतेही विधेयक जात नाही व राष्ट्रपती विधेयकावर निर्णय घेत नाहीत (विधेयक मंजूर करायचे की नामंजूर हा निर्णय मोदीच घेतात), त्याचप्रमाणे एखाद्याला जामीन द्यायचा का नाही हा निर्णय न्यायाधीश न घेता मोदीच घेतात. विश्वास बसत नसेल तर हे वाचा.

http://indianexpress.com/article/india/india-news-india/delhi-court-reje...

श्रीगुरुजी's picture

30 Jun 2016 - 11:25 pm | श्रीगुरुजी

२१ व्या शतकातील अवतारी महापुरूष श्री श्री संत केजरीवाल महाराज यांचे नवीन विनोदी प्रहसन -

http://indiatoday.intoday.in/story/kejriwal-strikes-again-claims-money-s...

Delhi Chief Minister Arvind Kejriwal today claimed that AAP's advertising budget is less than the money that has been spent on Prime Minister Narendra Modi's clothes over the last two year.

"It is being said we have given advertising of Rs 526 crore. Completely false. We have released advertising worth Rs 76 crore. That's it. Advertising expenditure of all departments of the Delhi government is less than the total expenditure on Modi's clothes," Kejriwal said at a meeting with editors in Panaji, Goa.

Kejriwal claimed that Modi spends Rs 10 lakh a day on his clothes. He went on to give the detail break-up of money spent on Modi's dressing.

"I can give you the calculation. One dress that Modi wears is worth Rs 2 lakh. He changes clothes five times a day, (which comes to) 10 lakh rupees (per day). He never repeats his clothes, doesn't wash them and reuse them," Kejriwal said, giving a detailed costing of Modi's wardrobe.

"Here's the biggest proof. Go to Google, type 'Modi' and in the images column you will never see the same clothes in two separate images. The expense comes to Rs 10 lakh per day. He has been in power for 700 days, that means he has spent Rs 70 crore on clothes alone. Five crore more on his other clothes," said Kejriwal.

भारतीय राजकारणात विदूषकांची कमतरता कधीच नव्हती. राजनारायण, लालू, दिग्विजय, पप्पू आणि आता केजरीवाल!