केजरूके गुलाम

क्लिंटन's picture
क्लिंटन in काथ्याकूट
31 Mar 2015 - 9:50 pm
गाभा: 

जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.

सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.

या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.

पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?

मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.

असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.

केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.

नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.

प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.

हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.

अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.

या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).

या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया

होबासराव's picture

4 May 2015 - 2:40 pm | होबासराव

बातमी:- एक आप कार्यकर्ती जिने ह्या वासु चा प्रचार लोकसभा निवडणुकित केला होता तिचे नाव ह्याच्या सोबत चुकिच्या कारणाने जोडले जातेय आणि तश्या अफवा उठवल्या जाताहेत.

निलाजर्‍यांचि पत्रकार परिषदः- ह्या आरोपांमध्ये काहि तथ्य नाहि, सगळे काहि निराधार आहे. ह्या आरोपांचा काहि एक पुरावा कोणाकडे नाहि. आणि महत्वाचे म्हणजे हे सगळ भाजपा नि रचलेल कुंभाड आहे

कुमार विश्वास उर्फ माजुरडा वासु:- माझ्या नावावर ऑलरेडि कोर्टाच्या ८३ नोटिसेस आहेत, ८४ वी नोटिस आली तरी काहि फरक पडत नाहि. आम्हि आपले नौकरि धंदे सोडुन राजकारणात ला भ्रष्टाचार संपवायला आलो आहोत.
मला त्या मुलीचा इ-मेल आलाय आणि मि त्याचे उत्तर तिला मेल वर दिलेय.

पीडित मुलगी:- मि ह्याचा प्रचार करायला अमेठि ला गेलि होति, तेव्हापासुन हि अफवा उठलिय. मला सांगण्यात आले कि तुम्हि एफ्.आय्.आर दाखल करा, नंतर हा वासु म्हणाला कि तुला हा लढा स्वत: लढावा लागेल, तो हे सुद्धा म्हणाला कि "वैसे भि बिस बिस लाख मे लड्किया बिकति है". भाजपा बद्दल तर मला माहित नाहि पण आआप मधल्याच काहि कार्यकर्त्यांच्या फेसबुक वर माझ्या विषयि आक्षेपार्ह मजकुर आहे, त्यापैकि छोटेलाल हा आप चा कार्यकर्ता आहे. मि युगपुरुषांना सुध्दा भेटण्याचा आणि न्याय मागण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यांनि कहि दाद नाहि दिलि. मला लिहिता वाचताच येत नाहि तर मग मि कोणाला इमेल कसा करेन. काल रात्रि पासुन मला आपले तोंड बंद करण्या करता धमक्यांचे फोन येताहेत.

आप वाल्यांचि भ्रष्टाचाराचि व्याख्या म्हणजे फक्त लाच देणे आणि घेणे, पण गेलि कित्येक महिने हे ज्या प्रकारचा
भ्रष्ट-आचार करताहेत त्याच काय.

काळा पहाड's picture

5 May 2015 - 11:20 pm | काळा पहाड

जूही खान या महिला आयोगाच्या एका सदस्याने श्री. कुमार विश्वास हे निरागस आहेत असं सांगून त्यांना पाठवलेल्या महिला आयोगाच्या नोटिशीबद्दल विरुद्ध मत प्रकट केलंय. जूही खान या मुस्लीम असून आम आदमी पार्टीच्या सदस्य आहेत.

आयोगाच्या अधक्ष्या सुद्धा खाँग्रेस च्या आहेत म्हणे.. तेवढया कारणाने हे लंपट लोक सुटायला नको.

क्लिंटन's picture

7 May 2015 - 12:36 pm | क्लिंटन

कुविंवरील आरोप, प्रत्यारोप आणि नंतर वेगवेगळे व्हिडिओ येणे हा सगळा प्रकारच भयंकर शिसारी आणणारा आहे. अर्थात आआपमध्ये शिसारी आणणारे काय नाही हा पण एक प्रश्नच आहे म्हणा.

दिल्लीतील वीजकंपन्यांकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर त्या कॅगच्या ऑडिटला का घाबरत आहेत असा प्रश्न आआपने आणि आआपसमर्थकांनी विचारला आहे. त्याच न्यायाने कुविंकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर मग महिला आयोगापुढे ते का गेले नाहीत असा प्रश्न विचारला तर?

गॅरी ट्रुमन's picture

11 May 2015 - 10:39 am | गॅरी ट्रुमन

आता स्वतः युगपुरूषजी मिडियावर उखडले आहेत.मिडियाचा 'पब्लिक ट्रायल' व्हावा असे म्हणायला लागले आहेत. इतकेच काय तर चांगल्या पत्रकारांना पेपर आणि चॅनेल काढायला दिल्ली सरकार मदत करेल असेही त्यांनी म्हटले आहे. आता चांगले पत्रकार म्हणजे कोण हे सूज्ञांस वेगळे सांगायची गरज नाही. चांगले पत्रकार म्हणजे कोण? आशिष खेतान, आशुतोष, पुण्यप्रसून वाजपेयी इत्यादी चांगले पत्रकार आणि अशांना (म्हणजे आआपच्या किंबहुना केजरूच्या भाटांना) करदात्यांचे पैसे पेपर आणि चॅनेल काढायला हा माणूस देणार. यांच्या त्या मोहल्ला समित्या नेपोटिझमसाठी उत्कृष्ट कुरण होत्याच.आता नवे पेपर आणि चॅनेल काढायला मदत करून नेपोटिझमचे दुसरे कुरण सुरू करणार केजरीवाल!!

उत्तम. चालू द्या.

(पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन

विकास's picture

11 May 2015 - 8:31 pm | विकास

"any publicity is good publicity" असे राजकारणी समजतात. त्यामुळे माध्यमांवर उखडायचे खरे कारण वेगळेच असावे. एकदा काय मोदी परदेश दौर्‍यावर आहेत त्यामुळे, मग काय राहूल गांधी परदेशातून आल्यामुळे, त्यानंतर हे ते राष्ट्रबालक इवली इवलीशी बडबड करू लागल्याने... ते कमी होते म्हणून की काय, पण त्या सेशन कोर्टाने आत्ताच सलमानला शिक्षा काय केली, मग हाय कोर्टाने जामीन काय दिला, तिकडे "सत्यम" "जय" झाले... त्यात अजून झोप उडवायला म्हणून गडकरींच्या विरोधात विरोधक ओरडा करू लागले... थोडक्यात सगळ्यांच्या संदर्भात ही माध्यमे बातम्या देताना "आप"पर भाव करू लागली ही मुळची व्यथा आहे. आणि ते आपल्या सारख्यांनी समजून घेणे महत्वाचे आहे असे वाटते. ;)

पैसा's picture

11 May 2015 - 9:51 pm | पैसा

सरकारी मालकीचे उद्योग एकीकडे नको म्हणतात केजरीवाल. मग आता सरकारी पेपर आणि चॅनेल्स? दूरदर्शनची शेकड्यांनी चॅनेल्स आहेत की तशी. अजून भर कशाला पाहिजे? आणि पैसे लागतील ते कुठून येणार? बजेट नावाचा काही प्रकार असतो का सरळ पैसे छापत सुटायचे?

होबासराव's picture

12 May 2015 - 12:43 pm | होबासराव

आतापर्यंत ह्याना अस्तित्वात असलेल्या कुठल्याहि सरकारी यंत्रणेवर विश्वास नव्हता, त्यासाठि ह्यानि लोकपाल नावाचा खुळ्खुळा वाजवुन २ वेळा सत्तेत आले. आता हे 'आप'ले चॅनेल आणि व्रुत्तपतत्र चालु करणार. आपल्या कडे ऑलरेडि भ्रष्टाचाराला आवर घालायला यंत्रणा आहेत आणि त्यामध्ये सुधार करायला वाव आहे. मि उल्लेख केल्याप्रमाणे ह्याचि अवस्था गिरक्या घेत स्वतः चेच शेपुट चावणार्‍या कुत्र्याप्रमाणे झालि आहे. पण ह्या सगळ्या पोरखेळात दिल्लिचा बँड वाजवणार आहेत हे, आणि त्याला जबाबदार ते लोक सुध्दा असतिल जे लाइक आणि शेअर ह्या दोन कलमि तत्वावर भारतिय राजकारण, स्थानिक प्रश्ण, पक्षांच्या मर्यादा हे समजुन घेउन असल्या अडाणचोटाना निवडुन देत असतिल.

हा वाय झेड प्राणि स्वतः च्या मुळावरच घाव घालतोय आता, पिसाळलेला कुत्रा किंवा मांजर कसे गोल गोल गिरक्या घेवुन 'आप'लेच शेपुट चावायचा प्रयत्न करते अगदि तसा. ह्याला आणि ह्याच्या गुरुवर्यांना मिडियानेच मोठ केलय.
सुमार केतकर ह्यांच्या चाटुगिरि (खाँग्रेस) चा राग यायचा पण एकदा ते म्हणाले होते कि ह्या गुरु-शिष्या ना सतत काहिहि करुन टि.व्हि. वर झळकत रहाण्याचे व्यसन लागले आहे. जो दिखता है वो बिकता है. कंप्लिट सिस्टम चा बोर्‍या वाजवला आहे ह्या माकडांनि. ह्या मर्कटांविषयी काहि हि लिहितांना प्रचंड चिडचिड होत असते,तुर्तास एवढेच.

पूर्वाश्रमीच्या क्लिंटन चे सगळे विश्लेश्णात्मक लेख वाचलेला आणि त्या मतांशि सहमत असलेला.
होबासराव अकोलकर

होबासराव's picture

14 May 2015 - 1:06 pm | होबासराव

Taking a hard view on the matter, the apex court questioned CM Arvind Kejriwal's stand on the issue. As per reports, the court questioned his 'doublespeak' on the issue. The court said on one hand the Delhi CM ad earlier approached the court seeking relief in a criminal defamation case filed against him and on the other hand his government issues such a circular against media.

लॉर्ड फॉकलन्ड's picture

18 May 2015 - 8:15 pm | लॉर्ड फॉकलन्ड

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेथील नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील लढाईने सोमवारी नवे वळण घेतले. केजरीवाल यांना विश्वासात न घेता दिल्लीच्या प्रभारी मुख्य सचिव म्हणून शकुंतला गॅमलिन यांची नियुक्ती नजीब जंग यांनी केल्यानंतर सेवा विभागाचे प्रधान सचिव अनिंदो मुजुमदार यांच्या कार्यालयालाच थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार टाळे ठोकण्यात आले.
मुजुमदार सोमवारी सकाळी सचिवालयात पोहोचले, त्यावेळी त्यांना त्यांचे कार्यालय बंद असल्याचे दिसले. केजरीवाल यांच्या सांगण्यानुसारच कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. जंग यांच्या आदेशानुसार मुजुमदार यांनी शनिवारी गॅमलिन यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर केजरीवाल यांनी थेट मुजुमदार यांनाच त्यांच्या पदावरून दूर केले. केजरीवाल यांनी मुजुमदार यांना पदावरून दूर करणे नियमबाह्य असल्याचे जंग यांनी सांगितले. केजरीवाल यांच्या या कृतीला आपला मंजुरी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी मुजुमदार यांच्या कार्यालयालाच टाळे ठोकण्याचा निर्णय केजरीवाल यांनी घेतला. दरम्यान, आपल्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा विषय मुजुमदार प्रभारी मुख्य सचिव शकुंतला गॅमलिन यांच्याकडे घेऊन जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.

नांदेडीअन's picture

20 May 2015 - 8:56 am | नांदेडीअन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेथील नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील लढाईने सोमवारी नवे वळण घेतले. केजरीवाल यांना विश्वासात न घेता दिल्लीच्या प्रभारी मुख्य सचिव म्हणून शकुंतला गॅमलिन यांची नियुक्ती नजीब जंग यांनी केल्यानंतर सेवा विभागाचे प्रधान सचिव अनिंदो मुजुमदार यांच्या कार्यालयालाच थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार टाळे ठोकण्यात आले.
मुजुमदार सोमवारी सकाळी सचिवालयात पोहोचले, त्यावेळी त्यांना त्यांचे कार्यालय बंद असल्याचे दिसले. केजरीवाल यांच्या सांगण्यानुसारच कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. जंग यांच्या आदेशानुसार मुजुमदार यांनी शनिवारी गॅमलिन यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर केजरीवाल यांनी थेट मुजुमदार यांनाच त्यांच्या पदावरून दूर केले. केजरीवाल यांनी मुजुमदार यांना पदावरून दूर करणे नियमबाह्य असल्याचे जंग यांनी सांगितले. केजरीवाल यांच्या या कृतीला आपला मंजुरी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी मुजुमदार यांच्या कार्यालयालाच टाळे ठोकण्याचा निर्णय केजरीवाल यांनी घेतला. दरम्यान, आपल्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा विषय मुजुमदार प्रभारी मुख्य सचिव शकुंतला गॅमलिन यांच्याकडे घेऊन जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते

The Chief Minister has a perfect right to a Chief Secretary of his choice
This crisis has been created entirely by the Lt-Governor.
It is abundantly clear that the Lt-Governor has exceeded his authority.
- Rajeev Dhawan, Senior Supreme Court lawyer

There is no provision granting to LG the power to act at his own discretion in the matter of appointment of the chief secretary.
The question of any difference of opinion on that issue can arise only after the proposal is made by the council of Ministers and sent to the LG.
Prior to that no question of difference of opinion can arise.
- Indira Jaising, Former additional solicitor general

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:02 am | पिंपातला उंदीर

कस आहे ते . स्वतः काही काम करायचं नाही आणि दुसरा काही करत असेल तर त्यात काड्या करायच्या हि वृत्ती असते काही लोकांची . जंग यांचा वापर करून दिल्लीधीश पण हीच रणनीती वापरत आहेत . सगळीकडचे कॉंग्रेस नियुक्त राज्यपाल बदलले फक्त दिल्लीत का नाही बदलला ? हीच खरी ग्यानबाची मेख . बाकी कुमार विश्वास वर आरोप करणारे भक्त मोदी मंत्रिमंडळात बलात्काराचा आरोपी उजळ माथ्याने फिरत आहे ह्याकडे सोयीस्कर डोळेझाक करतीलच .

नांदेडीअन's picture

20 May 2015 - 9:29 am | नांदेडीअन

सगळीकडचे कॉंग्रेस नियुक्त राज्यपाल बदलले फक्त दिल्लीत का नाही बदलला ?

हा प्रश्न आम्हाला पडला तर आम्ही कसले भक्त ?
बाय द वे, एक गोष्ट ऑब्जर्व्ह केली आहे का तुम्ही ?

जे भाजप किंवा मोदींचे समर्थक होते, ते वर्षभर जसे होते तसेच राहिले.
त्यांनी गेल्या वर्षभरात इतर पक्षांना कधीही ‘विनाकारण’ शिव्या घातल्या नाहीत किंवा बिनबुडाचे आरोप लावले नाहीत.
त्यांनी हे अगोदरच कबुल केले आहे की भाजपा सरकारने जवळपास प्रत्येक गोष्टीवर U-Turn घेतला आहे आणि एकही प्रॉमिस अजून पूर्ण केले नाही.
पण हे ‘समर्थक’ अजूनही आशावादी आहेत, आणि त्यात काहीही चुकीचे नाही.
प्रत्येकाने आशावादी राहायलाच हवे

भक्तांची संख्या मात्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
व्हाट्सऍप-फेसबुकवरसुद्धा मोदी आणि भाजपाबद्दलच्या जोक्सचा सुळसुळाट झाला आहे.
पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एका नव्या जमातीचा उदय होतोय, जिचे नाव आहे परमभक्त. :(

कुमार विश्वासवरून आठवले, हा व्हिडिओ पाहिला की नाही तुम्ही ?
https://www.youtube.com/watch?v=IWKe8UxYQi8

लॉर्ड फॉकलन्ड's picture

20 May 2015 - 12:19 pm | लॉर्ड फॉकलन्ड

नांदेडीअन,
वेलकम बॅक.राहुलप्रमाणेच १-२ महिन्यांच्या अज्ञातवासानंतर पुनरागमन केल्याबद्दल विशेष आनंद होत आहे.मध्यंतरी केजरीवाल दशावतारी नौटंकी कंपनीच्या एका नौटंकीचा प्रयोग सुरू असताना गजेंद्रसिंह नावाच्या एका शेतकर्‍याचा जीव गेला.नौटंकी कंपनीतल्या इतर अभिनेत्यांनी टाळ्या वाजवून्,हातात झाडू देऊन,प्रोत्साहन देऊन त्याला झाडावर चढून गळ्यात फास घेण्यास उद्युक्त केले व त्या नाटकात त्या बिचार्‍याचा जीव गेला.त्याचा जीव गेल्यावर नौटंकी कंपनीतले साईड हिरो व प्रख्यात गीतकार व अभिनेते मास्टर कुमार विश्वास यांनी गळ्याभोवती फासाची खूण करून "लटक गया क्या?" असे विचारून आपल्या अभिनय कौशल्याची चुणुक दाखविलीं. गजेंद्रसिंह फासावर लटकत असताना नौटंकीचे मुख्य नायक मास्टर अरविंद त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून पुढील ७५ मिनिटे मोदींना शिव्या घालण्याचे आपले मुख्य काम निष्ठेने करत होते.त्यांच्या कामावरील निष्ठेने आमचा ऊर भरून आला.पूर्वी एकदा बालगंधर्वांचे एक नाटक सुरू असताना त्यांची मुलगी गेल्याचे वृत्त आल्यावर नाटक न थांबविता ते पूर्ण करून त्यांनी मायबाप प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याचे वाचले होते.मास्टर अरविंद यांनी देखील गजेंद्रसिंह डोळ्यासमोर फासावर लटकत असताना पुढील ७५ मिनिटे जमलेल्या समूहाचे मनोरंजन करण्याचे आपले नाटकी काम निष्ठेने करत होते.त्यानंतर नौटंकी कंपनीतले मुख्य संरक्षक मास्टर संजय सिंह आपल्याबरोबर बाऊन्सर्सेचे संरक्षण घेऊन गजेंद्रसिंहच्या कुटूंबाला भेटून आले व या नाटकातले आपले काम चोख पार पाडले.या नाटकात मात्र सर्वांना खाऊन गेला तो मास्टर आशुतोष्.टीव्हीवर डोळ्यातून पाण्याचा टिपूस देखील येऊन ने देता ढसाढसा रडण्याचा कमालीचा अभिनय करून त्याने प्रेक्षकांची वाहवा मिळविली.आशुतोषचे ऑस्करसाठी नॉमिनेशन झाल्याचे ऐकले आहे.
त्यापूर्वी काही दिवस लोकशाहीवादी मास्टर अरविंद यांनी आपले पक्षांतर्गत विरोधक योगेंद्र याद्व,प्रशांतभूषण इ. ना पक्षातून हाकलून देऊन आपली लोकशाहीशी असलेली बांधिलकी दाखवून दिली होती.त्यावेळी झालेल्या पक्षाच्या एका बैठकीत बाऊन्सरर्सना मुक्तहस्त देऊन बैठकीला हजर राहणार्‍या सर्वांची अनेकवेळा अंगझडती घेऊन त्यांचे मोबाईल फोन्,कागद्,पेन्,पेन्सिली इ. जप्त करून नंतरच बैठकीला त्यांना प्रवेश दिला गेला.बैठकीत मास्टर अरविंदांना ज्यांनीज्यांनी विरोध केला त्या सर्वांना बाऊन्सर्सतर्फे मारहाण करून हाकलून लावण्यात आले."आम आदमी"च्या विरूद्ध जाणार्‍या सर्वांना अशीच शिक्षा योग्य होती.

परंतु हे सर्व होत असताना आपली अनुपस्थिती खटकली.आपण एका दुसर्‍या थ्रेडवर केजरिवालांच्या कर्तृत्वाचे दैनिक वृत्तांत देत होता.परंतु वरील घटनाकाळात आपण का मौन धरले होते ते समजले नाही.कदाचित राहुलबाबाप्रमाणे आपणही थायलंडला विपश्यनेला गेला असावात.आता परत आला आहात तर वरील घटनांबद्दल आपले मत वाचायला आवडेल्.विशेषत: गजेंद्रसिंहला फास घेण्यासाठी कसे प्रवृत्त करण्यात आले,तो फासावर लटकल्यावर पुढील सव्वा तास केजरिवाल नौटंकी कंपनीचे अभिनेते कशी मुक्ताफळे उधळत होते,आशुतोषने टीव्हीवर कसा तमाशा केला याविषयी आपले मुल्यवान विचार वाचायची इच्छा आहे.

चिनार's picture

20 May 2015 - 12:25 pm | चिनार

नांदेडीयन,
गजेंद्र सिंगवर तर आपण वेगळा धागाच काढा. कारण आम्हा पामरांना बरेच प्रश्न विचारायचे आहेत.
फक्त त्या धाग्यावर बाऊन्सरर्स वैगेरे बोलावू नका ही विनंती ..

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 12:29 pm | पिंपातला उंदीर

एका दुर्दैवी मृत्यूवर एक धागा या हिशेबाने दंगली , encounter यामध्ये बळी गेलेल्या दुर्दैवी जीवांवर किती धागे निघतील असा विचार करत आहे . बाकी संजय जोशी , अडवाणीजी , केशुभाई पटेल हे material वेगळेच आहे : )

मृत्युन्जय's picture

20 May 2015 - 12:33 pm | मृत्युन्जय

बाकी संजय जोशी , अडवाणीजी , केशुभाई पटेल हे material वेगळेच आहे : )

त्यांची राजकीय हत्या झाली आहे. फासावर नाही लटकावले त्यांना ;) :P

गजेंद्र सिंग च्या मृत्यूची थट्टा करायला धागा काढा असं जर माझ्या प्रतिसादातून व्यक्त होत असेल तर क्षमस्व ..पण मला तरी मी असं काही लिहिलंय असं वाटत नाही.
पण हो...गजेंद्र सिंग च्या मृत्यूचे गूढ उकलावे असे नक्कीच वाटते. सर्वशक्तीमान , युगप्रवर्तक नेते श्री श्री अरविंद केजरीवाल यांच्या समोर एक शेतकरी आत्महत्या (?) करतो आणि तरीसुद्धा सभा सुरु राहते याविषयी आश्चर्य वाटते.
बाकी तुम्हाला जेवढे धागे काढायचे असतील तेवढे तुम्ही काढू शकता !

नांदेडीअन's picture

20 May 2015 - 1:43 pm | नांदेडीअन

नांदेडीयन,
गजेंद्र सिंगवर तर आपण वेगळा धागाच काढा. कारण आम्हा पामरांना बरेच प्रश्न विचारायचे आहेत.
फक्त त्या धाग्यावर बाऊन्सरर्स वैगेरे बोलावू नका ही विनंती ..

पामरांसाठी याच धाग्यावर दोन कमेंट केले आहेत.
पामरांनी वेळ काढून वाचून घ्यावेत. :)
मी बाऊन्सर्स बोलवणार नाही, पण तुम्हीसुद्धा प्रॉमिस करा की माझे एन्काऊंटर करणार नाही किंवा माझा ऍक्सिडेंट घडवून आणणार नाही.

काळा पहाड's picture

20 May 2015 - 2:40 pm | काळा पहाड

तुम्ही जोपर्यंत अतिरेकी तयार करणार्‍या एका विशिष्ट जमातीचे प्रतिनिधी (सिमी म्हणायचंय मला) नसाल तोपर्यंत तसं काही होईल असं वाटत नाही.

नांदेडीअन's picture

20 May 2015 - 1:36 pm | नांदेडीअन

नांदेडीअन, वेलकम बॅक.
राहुलप्रमाणेच १-२ महिन्यांच्या अज्ञातवासानंतर पुनरागमन केल्याबद्दल विशेष आनंद होत आहे.

धन्यवाद. :)
आता बघा ना, तुमच्या या सगळ्या कमेंटला मला प्रतिसाद द्यावा लागतोय.
याच कारणामुळे मी फेसबुक आणि व्हाट्सऍपवर ‘आता भक्तांच्या नादी लागायचे नाही.’ असे ठरवले होते.
इंग्रजीमधून एक मोठा पोस्टसुद्धा टाकला होता फेसबुकवर.

मध्यंतरी केजरीवाल दशावतारी नौटंकी कंपनीच्या एका नौटंकीचा प्रयोग सुरू असताना गजेंद्रसिंह नावाच्या एका शेतकर्‍याचा जीव गेला.
नौटंकी कंपनीतल्या इतर अभिनेत्यांनी टाळ्या वाजवून्,हातात झाडू देऊन,प्रोत्साहन देऊन त्याला झाडावर चढून गळ्यात फास घेण्यास उद्युक्त केले व त्या नाटकात त्या बिचार्‍याचा जीव गेला.

तिथे नेमके काय घडले होते, याचे व्हिडिओज अनेकांनी युट्युबर टाकले आहेत.
ऎकीव माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा जरा बॅंडविड्थ खर्च करा आणि ते व्हिडिओज बघा.
आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते त्याला हात जोडून विनवणी करत होते खाली उतरण्यासंदर्भात.
मंचावरून आम आदमी पक्षाचे नेते त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीसांना वारंवार विनंती करत होते, पण पोलीस निर्लज्जासारखे तमाशा बघत अक्षरशः हसत होते.
शेवटी आपचेच काही कार्यकर्ते त्याला खाली उतरवण्यासाठी झाडावर चढले होते.

त्याचा जीव गेल्यावर नौटंकी कंपनीतले साईड हिरो व प्रख्यात गीतकार व अभिनेते मास्टर कुमार विश्वास यांनी गळ्याभोवती फासाची खूण करून "लटक गया क्या?" असे विचारून आपल्या अभिनय कौशल्याची चुणुक दाखविलीं.

झी न्युजने हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे हे स्पष्ट दिसत आहे.
सगळ्या न्युज चॅनल्सनी सुरूवातीला हाच व्हिडिओ दाखवला.
नंतर हळू हळू सगळ्यांनी झी न्युजचा हा व्हिडिओ दाखवायचे बंद केले.

झी न्युजने काय करामात केली होती ते या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला.
https://www.youtube.com/watch?v=xmdtxzuyFi8
हा वरचा व्हिडिओ जेव्हा देशद्रोही सोनु निगमने (हो, भक्तांसाठी आता तो देशद्रोही झालाय.) ट्विट केला, तेव्हा झी ग्रूपने लगेच सोनु निगमवर बॅन घालायचे ठरवले.
झी ग्रूपने जाहिर करून टाकले की सोनु निगमचे गाणे असलेला कोणताही अल्बम किंवा चित्रपट झी ग्रूप विकत घेणार नाही किंवा वितरीतही करणार नाही.
झी न्युजचे खंडणीखोर संपादक, जे तिहार जेलमध्ये जाऊन आले आहेम, त्या सुधिर चौधरींनी नंतर सोनु निगमला Desperate for publicity, Jobless singer वगैरे शब्दांनी हिणवले.
सगळा ट्विटर समुदाय #IStandWithSonuNigam या हॅशटॅगच्या माध्यमातून सोनु निगम यांच्या पाठीशी उभा राहिला, पण या ‘जी हुजूर’ न्युज चॅनलने शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही.
इनकी वफादारी देखकर तो कुत्ते भी शरमा जायें ।

गजेंद्रसिंह फासावर लटकत असताना नौटंकीचे मुख्य नायक मास्टर अरविंद त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून पुढील ७५ मिनिटे मोदींना शिव्या घालण्याचे आपले मुख्य काम निष्ठेने करत होते.
त्यांच्या कामावरील निष्ठेने आमचा ऊर भरून आला.

त्यावेळी गजेंद्र सिंघ मेलाय की जिवंत आहे याबाबत माध्यमांमध्येच एकमत नव्हते.
कुणी दाखवत होते की तो मेलाय, कुणी सांगत होते की त्याला दवाखाण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अरविंद केजरीवालने या घटनेनंतर फक्त १० मिनिटांचे भाषण केले.
त्याबद्दलही नंतर त्यांनी माफी मागितली आणि १० मिनिटे भाषण का सुरू ठेवले याचे कारणही सांगितले.
मिपावरच्या परमभक्तांना कंटाळून मी इकडे यायचे बंद केले होते, त्यामुळे या घटनेवर मी इकडे काही बोललो नाही.
पण मी फेसबुकवर तेव्हासुद्धा म्हणालो होतो की केजरीवालने १० मिनिटेच का होईना पण भाषण करायला नको होते.

या नाटकात मात्र सर्वांना खाऊन गेला तो मास्टर आशुतोष्.
टीव्हीवर डोळ्यातून पाण्याचा टिपूस देखील येऊन ने देता ढसाढसा रडण्याचा कमालीचा अभिनय करून त्याने प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
आशुतोषचे ऑस्करसाठी नॉमिनेशन झाल्याचे ऐकले आहे.

इथवर येऊन पोहोचलो आहोत आपण.
राजस्थानमधल्या एका शेतकर्‍याला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीमध्ये का यावेसे वाटले ?
आत्महत्येसारखे इतके टोकाचे पाऊल का उचलावे वाटले ?
राजस्थान सरकार आणि केंद्र सरकारवर त्याचा असा काय राग होता ?
असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत.

‘हा आपने घडवून आणलेला खून आहे’.
‘ही आपची नौटंकी होती.’
‘कुमार विश्वासला त्याचा प्लॅन नीट एक्जिक्युट करता नाही आला. त्याच्या तोंडून शेकडो लोकांपुढे लटक गया हे चुकीने निघाले आणि पर्दाफाश झाला.’
‘रडण्यासाठी आशुतोषला ऑस्कर द्यायला पाहिजे.’

हो, अगदी इथवर येऊन पोहोचलो आहोत आपण.

त्यापूर्वी काही दिवस लोकशाहीवादी मास्टर अरविंद यांनी आपले पक्षांतर्गत विरोधक योगेंद्र याद्व,प्रशांतभूषण इ. ना पक्षातून हाकलून देऊन आपली लोकशाहीशी असलेली बांधिलकी दाखवून दिली होती.
त्यावेळी झालेल्या पक्षाच्या एका बैठकीत बाऊन्सरर्सना मुक्तहस्त देऊन बैठकीला हजर राहणार्‍या सर्वांची अनेकवेळा अंगझडती घेऊन त्यांचे मोबाईल फोन्,कागद्,पेन्,पेन्सिली इ. जप्त करून नंतरच बैठकीला त्यांना प्रवेश दिला गेला.
बैठकीत मास्टर अरविंदांना ज्यांनीज्यांनी विरोध केला त्या सर्वांना बाऊन्सर्सतर्फे मारहाण करून हाकलून लावण्यात आले.
"आम आदमी"च्या विरूद्ध जाणार्‍या सर्वांना अशीच शिक्षा योग्य होती.

याबद्दल मी मिपावर अगोदरच लिहिले आहे.
वेळ आणि इच्छा असेल तर शोधून वाचून घ्या. :)

परंतु हे सर्व होत असताना आपली अनुपस्थिती खटकली.
आपण एका दुसर्‍या थ्रेडवर केजरिवालांच्या कर्तृत्वाचे दैनिक वृत्तांत देत होता.
परंतु वरील घटनाकाळात आपण का मौन धरले होते ते समजले नाही.
कदाचित राहुलबाबाप्रमाणे आपणही थायलंडला विपश्यनेला गेला असावात.
आता परत आला आहात तर वरील घटनांबद्दल आपले मत वाचायला आवडेल्.
विशेषत: गजेंद्रसिंहला फास घेण्यासाठी कसे प्रवृत्त करण्यात आले,तो फासावर लटकल्यावर पुढील सव्वा तास केजरिवाल नौटंकी कंपनीचे अभिनेते कशी मुक्ताफळे उधळत होते,आशुतोषने टीव्हीवर कसा तमाशा केला याविषयी आपले मुल्यवान विचार वाचायची इच्छा आहे.

बराच रिकामा वेळ दिसतोय आपल्याकडे.
माझे विचार हे मुल्यवान आहेत आणि ते वाचण्यासाठी तुम्ही इतकी धडपड करताय हे पाहून खूप बरे वाटले.
पण किमान माझे तरी भक्त होऊ नका हो.

असो.
थॅन्क्स फॉर युवर एन्करेजिंग वर्ड्स. :)

मी भक्तांसोबत चर्चा करायचे का बंद केले होते हे वर सांगितलेच आहे.

आता हेच बघा ना.
एव्हढा मोठा पोस्ट लिहिला तुम्ही, पण त्यात एक वाक्य खरे लिहिले असेल तर शप्पथ !
देवाने गेल्या काही दिवसांत मला अशा धादांत खोट्या माहितीने ओतप्रोत असलेल्या पोस्ट्सकडे दुर्लक्ष करण्याची सुबुद्धी दिली होती.
पण आज १०-१५ मिनिटं वाया घालवून तुम्हाला का रिप्लाय करतोय काही कळत नाहीये.
नक्कीच काहीतरी जादू किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर आहेत तुमच्याकडे.

अशा बिवबुडाच्या आरोपांना उत्तर देण्यात माझा किती वेळ वाया जात होता हे मलाच कळत नव्हते.
तुमच्याकडे असलेल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवरने तुम्ही तुमचा वाया गेलेला वेळ परत आणू शकत असाल.
माझ्याकडे तशी कोणतीही पॉवर नाहीये हो. :(

जाऊ द्या.
तुम्हाला माझे मुल्यवान विचार वाचायचेच आहेत ना ?
मग माझा फेसबुकवरचा तो पोस्ट टाकतो इकडे.

माझ्या फेसबुकच्या मित्र यादीमध्ये अमराठी भाषिक मित्रांची संख्या खूप आहे, त्यामुळे पोस्ट इंग्रजी, मराठी, हिंदी असा मिक्स भाषेमध्ये लिहिला होता.
थोडा त्रास होईल वाचतांना, पण सहन करून घ्या.
त्यात एक वाक्य टाकायचे राहून गेले होते, ते इथे टाकतो.

Arguing with idiot is like playing chess with a pigeon...
No matter how good you are,
the bird is going to shit on the board and strut around like it won anyway.

दुसर्‍या प्रतिसादामध्ये माझा तो फेसबुकचा पोस्ट टाकतो.
तोसुद्धा वाचून घ्या.
काहीच शंका उरणार नाहीत मनात.

नांदेडीअन's picture

20 May 2015 - 1:41 pm | नांदेडीअन

Time to clean the profile by removing some of the people from my 'Facebook Friendlist'.
Things are going beyond my tolerance level now.
Kisano ki khudkhushi par Congress ko paani pi pi kar kosnewale log aaj Kisan ki aatmahatya ko nautanki bata rahe hai.
The same people are asking farmers to try some other things as a source of livelihood apart from farming.
The same people are saying farmers should not be dependent on government.
The same people are justifying the land acquisition bill.
Where are those people who used to talk about the black money.
Kaha gaye illegal migrants ko bhagane ki baat karnewale ?
Robert Wadra ko jail bhejnewale, desh ko bhrashtachar mukt karnewale log kaha gaye ?

Anyway, I was able to make this decision mainly because of two incidents :

1. After watching Kejriwal and Company getting crucified by people over Gajendra Singh's suicide.

2. Yesterday I was having a discussion on land acquisition bill with one of my friends.
After discussing it for a while, I came to know that he thinks UPA's and NDA's land acquisition bill are same.
So I asked him the difference between previous bill and NDA's amendments, he said he doesn't know that and therefore won't be able to comment on it.
At that very moment I realized that I have landed into a deep deep trouble.
Indulging in these kind of discussions was simply wasting mine as well as his time.
I don't have any precious time left these days so it was ok with me, but I hope atleast his time was/is precious.

Most of you guys (my virtual friends) know me from Orkut days.
When I thought of you, all the discussions, friendly banters, debates which we did in last 8-9 years on social media started floating in front of my eyes.
Even though we used to talk on facts and points, we had difference of opinion on various issues, but it was never personal and we never made it an ego issue.

But when I think of last couple of years (mainly after the emergence of a new community called Bhakts), all I can see is people with A BIG EGO PROBLEM, people who are interested only in mudslinging, people who love to spread lies, people who want to prove themselves right at any cost even if they know they are wrong.

From now onwards, I don't want to indulge myself in any such discussion or debate which has people with above mentioned qualities.
(But that doesn't mean I will stop posting things on facebook.
As always I will keep sharing the good work done by our political parties or its leaders.
Be it AAP, BJP or Congress)

Therefore I've decided to start removing following type of personalities from my 'Facebook Friendlist' :
- Those who have A BIG EGO PROBLEM.
- Those who are getting personal during a debate or discussion and pretending to be cool about it.
- Those who are using my timeline to spread their lies even when it is proved that it's a blatant lie which they are sharing.
- Those who post irrelevant things to divert the topic even after requesting them not to do so.
- Those who tag me in any photo or post which is not related to me.
- Those who are religious fanatics.
- Those who will not deposit 50,000 Rs. in my bank account in next 24 hours.

They say it's better late than never.
Yes, this is perhaps the best time to do the honours and start removing such people from my 'Facebook Friendlist'.

THANK YOU NOTE :
I sincerely thank couple of Special Bhakts, who made me realize that I cannot get down to their level and also made me realize what I was dealing with and what I needed to do.
I can't thank you enough guys.
If you know me by now, you must have understood that I've not changed a bit and also I do not have any plan to change myself in near future.
So you know very well that I will be just a call away at your service, as always.

माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये मराठी मित्रांसोबतच परप्रांतीय मित्रसुद्धा मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये लिहावे लागते अधून मधून.
असो.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मी आजपासून वर सांगितलेल्या क्वालिटी असणार्‍या व्यक्तींसोबत कसल्याही प्रकारची चर्चा करणार नाही.
याचा अर्थ असा नाही की मी राजकीय पोस्ट टाकणे बंद करणार आहे.
जनतेच्या हितासाठीसाठी जो पक्ष किंवा ज्या पक्षाचे नेते काम करतील, त्यांचे काम मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन.
मग तो आप असो, भाजप असो किंवा कॉंग्रेस असो.

तिथे नेमके काय घडले होते, याचे व्हिडिओज अनेकांनी युट्युबर टाकले आहेत.
ऎकीव माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा जरा बॅंडविड्थ खर्च करा आणि ते व्हिडिओज बघा.
आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते त्याला हात जोडून विनवणी करत होते खाली उतरण्यासंदर्भात.
मंचावरून आम आदमी पक्षाचे नेते त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीसांना वारंवार विनंती करत होते, पण पोलीस निर्लज्जासारखे तमाशा बघत अक्षरशः हसत होते.
शेवटी आपचेच काही कार्यकर्ते त्याला खाली उतरवण्यासाठी झाडावर चढले होते.

प्रत्यक्षदर्शी लोकांच्या मते , पोलीस त्याला उतरवण्यासाठी जायचा प्रयत्न करत होते त्यांना आप च्या कार्यकर्त्यानी अडवले. (अर्थात ते प्रत्यक्षदर्शी अंबानीचे agent असतील म्हणा :-))

त्यावेळी गजेंद्र सिंघ मेलाय की जिवंत आहे याबाबत माध्यमांमध्येच एकमत नव्हते.
कुणी दाखवत होते की तो मेलाय, कुणी सांगत होते की त्याला दवाखाण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अरविंद केजरीवालने या घटनेनंतर फक्त १० मिनिटांचे भाषण केले.

म्हणजे माध्यमांनी कन्फर्म करण्याची वाट बघत होते का केजरीवाल ? आपल्यासमोर एखादा अपघात झाला तरी आपण गाडी दोन मिनिटे बाजूला थांबून काय झालाय ते बघतो आणि शक्य असेल तर त्याला मदत करतो. तो मेल आहे की नाही याची वाट आपण बघतो का ?

अरविंद केजरीवालने या घटनेनंतर फक्त १० मिनिटांचे भाषण केले.
त्याबद्दलही नंतर त्यांनी माफी मागितली आणि १० मिनिटे भाषण का सुरू ठेवले याचे कारणही सांगितले.
मिपावरच्या परमभक्तांना कंटाळून मी इकडे यायचे बंद केले होते, त्यामुळे या घटनेवर मी इकडे काही बोललो नाही.

माफी मागून नक्की कोणावर उपकार केले ?

पण मी फेसबुकवर तेव्हासुद्धा म्हणालो होतो की केजरीवालने १० मिनिटेच का होईना पण भाषण करायला नको होते.

इथे तुमच्या स्पष्टीकरणाचा किंवा भूमिकेचा प्रश्न नाहीये. कोणी इतका असंवेदनशील असू शकतं का ?

तो आशुतोष मुलाखतीमध्ये मुर्खासारखा बोलत होता. ते तुम्ही ऐकलं नसेलच. आणखी एक मुद्दा , गजेंद्र सिंग च्या मृत्युनंतर हे प्रकरण पोलिसांच्या अखत्यारीत येत. त्याची सूसाइड नोट स्टेजवर वाचून कशी काय दाखवण्यात आली ? मुळात ती स्टेज वर पोहोचली कशी ? पोलिस स्वत: ती नोट स्टेज वर देण्याचा गाढवपणा करतील असं वाटत नाही . आणि तसा त्यांनी केला असेल तर ती स्टेज वर वाचून दाखवू नये एवढी संवेदनशीलता आप च्या नेत्यांमध्ये नाही का ?

इथवर येऊन पोहोचलो आहोत आपण.
राजस्थानमधल्या एका शेतकर्‍याला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीमध्ये का यावेसे वाटले ?
आत्महत्येसारखे इतके टोकाचे पाऊल का उचलावे वाटले ?
राजस्थान सरकार आणि केंद्र सरकारवर त्याचा असा काय राग होता ?
असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत.

हे प्रश्न आम्हाला सगळ्यात आधी पडलेत. पण आप ने या प्रकारचा जो तमाशा मांडला तो जास्त खटकला.

अशा बिवबुडाच्या आरोपांना उत्तर देण्यात माझा किती वेळ वाया जात होता हे मलाच कळत नव्हते.
तुमच्याकडे असलेल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवरने तुम्ही तुमचा वाया गेलेला वेळ परत आणू शकत असाल.
माझ्याकडे तशी कोणतीही पॉवर नाहीये हो. :(

हा साक्षात्कार तुम्हाला झाला ही आनंदाची बाब आहे. असाच साक्षात्कार आप च्या नेत्यांना होवो आणि फालतू तमाशे करून आपण किती वेळ वाया घालवत आहोत हे त्यांना कळावे हे ईश्वरचरणी प्रार्थना !

लॉर्ड फॉकलन्ड's picture

21 May 2015 - 2:30 pm | लॉर्ड फॉकलन्ड

आणखी एक मुद्दा , गजेंद्र सिंग च्या मृत्युनंतर हे प्रकरण पोलिसांच्या अखत्यारीत येत. त्याची सूसाइड नोट स्टेजवर वाचून कशी काय दाखवण्यात आली ? मुळात ती स्टेज वर पोहोचली कशी ? पोलिस स्वत: ती नोट स्टेज वर देण्याचा गाढवपणा करतील असं वाटत नाही . आणि तसा त्यांनी केला असेल तर ती स्टेज वर वाचून दाखवू नये एवढी संवेदनशीलता आप च्या नेत्यांमध्ये नाही का ?

त्याची सुसाईड नोट त्याने लिहिलीच नव्हती.त्यातले हस्ताक्षर त्याचे नव्हते हे प्रत्यक्ष त्याच्या कुटुन्बियानीच सान्गितले आहे.त्याची परिस्थिती आत्महत्या करण्यासारखी नव्हती.त्याची २७ एकर जमीन होती.आत्महत्या करण्यासाठी त्याच्याकडे कोणतेच कारण नव्हते.
तो तिथे पोहोचला कारण आपच्या कार्यकर्त्यान्नीच त्याला तिथे नेले होते.कोणीतरी वेगळ्याच माणसाने ती चिट्ठी लिहिली होती.आप पक्षाच्या नेहमीच्या ड्रामेबाजी परम्परेप्रमाणे त्याने झाडावर चढून आत्महत्येचा देखावा करायचा व त्याचे निमित्त करून मोदीन्ना शिव्या घालायच्या असे नाटक ठरले होते.तो झाडावर चढताना आपचे कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देत होते.तो झाडावर चढल्यावर कोणत्या तरी कार्यकर्त्याने खालून त्याच्या हातात झाडू दिला.जे पोलिस त्याला उतरवण्याकरता झाडापाशी जायचा प्रयत्न करत होते त्यान्ना आपच्या कार्यकर्त्यान्नी जाऊन दिले नाही.इथपर्यन्त सर्व काही ठीक होते.गळ्याला उपरणे बान्धताना त्याला खरोखरच फास बसला व त्यात तो गेला हा त्या नाटकाचा अनपेक्षित दुर्दैवी शेवट.केजरीवाल आणि कम्पनी त्याच्यापासून जेमतेम ५०-६० फुटान्वर स्टेजवर भाषणे ठोकत होते.त्याला ते वाचवायला गेले नाहीत कारण फास लावून घेण्याच्या या नाटकाची त्यान्ना पूर्ण कल्पना होती.परन्तु नाटकाचा शेवट असा अनपेक्षित होईल असे त्यान्ना वाटले नव्हते.
तो गेल्यावर सुद्धा तातडीने त्याच्या खिशातील सुसाईड नोट स्टेजवर नेऊन वाचून दाखविणे याला मराठीत प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपणे असे म्हणतात.ही मन्डळी टाळूवरचे नुसते लोणीच नाही तर मेलेल्याच्या अस्थी विकून सुद्धा फायदा कमावतील.
दिल्लीत ७० पैकी ६७ जागा इतके स्पष्ट प्रचन्ड बहुमत असताना,५ वर्षान्ची निश्चिन्ती झाली असतान,योगेन्द्र यादव सारख्या पक्षान्तर्गत विरोधकान्ना पक्षातून बाहेर काढून पक्षातील सम्पूर्ण विरोध मोडून काढलेला असताना हे जीवघेणे नाटक करण्याची केजरीवाल आणि कम्पनीला काय गरज पडली असावी हा प्रश्न अजून मला भेडसावत आहे.

त्याची सुसाईड नोट त्याने लिहिलीच नव्हती.त्यातले हस्ताक्षर त्याचे नव्हते हे प्रत्यक्ष त्याच्या कुटुन्बियानीच सान्गितले

साहेब हा मुद्दा तर आहेच. पण नोट त्यानीच लिहीली होती असे गृहीत जरी धरले तरी ती स्टेज वर वाचून दाखवण्यात येते हे अनाकलनीय आहे. कोणाच्या सुसाईड नोट चे असे जाहीर वाचन केले जाते का ?

तो गेल्यावर सुद्धा तातडीने त्याच्या खिशातील सुसाईड नोट स्टेजवर नेऊन वाचून दाखविणे याला मराठीत प्रेताच्या टाळूवरचे लोणी ओरपणे असे म्हणतात.ही मन्डळी टाळूवरचे नुसते लोणीच नाही तर मेलेल्याच्या अस्थी विकून सुद्धा फायदा कमावतील.

१०० टक्के सहमत. हेच म्हणायचं आहे मला.

दिल्लीत ७० पैकी ६७ जागा इतके स्पष्ट प्रचन्ड बहुमत असताना,५ वर्षान्ची निश्चिन्ती झाली असतान,योगेन्द्र यादव सारख्या पक्षान्तर्गत विरोधकान्ना पक्षातून बाहेर काढून पक्षातील सम्पूर्ण विरोध मोडून काढलेला असताना हे जीवघेणे नाटक करण्याची केजरीवाल आणि कम्पनीला काय गरज पडली असावी हा प्रश्न अजून मला भेडसावत आहे.

हे नाटक आप नेच केला असेक ही गोष्ट डोक्याला पटते आहे पण मनाला नाही. कारण अरविंद केजरीवाल ह्या माणसाकडून थोड्याबहुत अपेक्षा मी सुद्धा ठेवल्या होत्या.

आणखी एक मुद्दा, मृत गजेंद्र सिंग याने या आधी निवडणूक लढविली आहे असं वाचण्यात आलं होत. ह्यात कितपत तथ्य आहे ?

त्याची सुसाईड नोट त्याने लिहिलीच नव्हती.त्यातले हस्ताक्षर त्याचे नव्हते हे प्रत्यक्ष त्याच्या कुटुन्बियानीच सान्गितले

नुसतेच तेव्हढे नाही तर सही मधे आधी "उपेन्द्र" लिहीले होते जे खोडून "गजेन्द्र" केले गेले.

Gajendra

कुमार बिस्वास यांनी पत्र वाचून दाखवताना शेवटी, "म्हणून मी आत्महत्या करत आहे..." अशा अर्थाचे वाचले. पण तसे त्या तथाकथीत सुसाईड नोट मधे नव्हतेच!

लॉर्ड फॉकलन्ड's picture

22 May 2015 - 2:12 pm | लॉर्ड फॉकलन्ड

लटक गया क्या असे गळ्याभोवती खूण करून विचारणारा कुमार विश्वास्,डोळ्यातून पाण्याचे टिपूस येउन ने देता ढसाढसा रडण्याचा अभिनय करणारा अशुतोष,गजेंद्रसिंहच्या कुटुंबियांनी तोंड उघडू नये म्हणून मुद्दाम त्याच्या घरी बाऊन्सर्सची फौज घेऊन गेलेला संजय सिंह्,सिसोदिया,खेतान्,केजरीवाल इ. सर्वांची नार्को टेस्ट केली तर यामागचे सत्य उघडकीला येईल.

नांदेडीअन's picture

26 May 2015 - 5:38 pm | नांदेडीअन

तुम्हाला बुवा फारच चिंता आहे माझ्या प्रतिसादाची.
दुसर्‍या धाग्यावर येऊन इकडच्या कमेंटबद्दल बोलताय म्हणून म्हटले.
आता इतकी उठाठेव करताय, तर करतोच रिप्लाय तुम्हाला.

तुम्ही खूप महत्त्वाचे लिहिले आहे किंवा अगोदर न लिहिल्यापैकी काही लिहिले आहे असे तुम्हाला वाटत असेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही.
मला तुमचा हा प्रतिसाद वाचल्यानंतर 'उगाच वेळ घातला आपण हे वाचण्यात' असे वाटले.
त्यामुळे त्यावर प्रतिवाद करणे तर फार दूरची गोष्ट.

चिनार's picture

26 May 2015 - 5:47 pm | चिनार

बर बर ...चालुद्या !

नांदेडीअन's picture

26 May 2015 - 5:49 pm | नांदेडीअन

मी तर चालतच राहीन हो.
फक्त माझा रिप्लाय आला नाही म्हणून तुम्ही कुठे अडून बसू नका परत.

चिनार's picture

26 May 2015 - 5:53 pm | चिनार

चालत राहा !
आणि आलेल्या प्रश्नांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करा !
All the best

लॉर्ड फॉकलन्ड's picture

20 May 2015 - 2:34 pm | लॉर्ड फॉकलन्ड

तिथे नेमके काय घडले होते, याचे व्हिडिओज अनेकांनी युट्युबर टाकले आहेत.
ऎकीव माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा जरा बॅंडविड्थ खर्च करा आणि ते व्हिडिओज बघा.

व्हिडिओ पाहिले होते.आपचे कार्यकर्ते त्याला राजस्थानहून सभेत घेऊन आले.तो स्वत:हून आला नव्हता.आपचे कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्याला झाडावर चढायला उद्युक्त करत होते.तो झाडावर चढल्यावर आपच्याच कार्यकत्यांनी त्याच्या हातात झाडू दिला.हे एक प्लॅन्ड नाटक होते.झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर केजरीवालांनी किंवा इतरांनी त्याला वाचवायचे व त्या निमित्ताने मोदींना झोडपायचे अशी योजना होती.दुर्दैवाने आपल्याला खरोखर फास बसला आहे हे त्याला कळलेच नाही.त्याची परिस्थिती आत्महत्या करण्यासारखी नव्हतीच्.त्याची २७ एकर जमीन होती.पत्रात लिहिलेले अक्षर त्याचे नाही हे प्रत्यक्ष त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.आपच्या इतर नाटकांप्रमाणे हेही नाटकच होते,पण त्यात त्या बिचार्‍याचा जीव गेला.

आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते त्याला हात जोडून विनवणी करत होते खाली उतरण्यासंदर्भात.
मंचावरून आम आदमी पक्षाचे नेते त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीसांना वारंवार विनंती करत होते, पण पोलीस निर्लज्जासारखे तमाशा बघत अक्षरशः हसत होते.
शेवटी आपचेच काही कार्यकर्ते त्याला खाली उतरवण्यासाठी झाडावर चढले होते.

आधी आपचे कार्यकर्तेच त्याला राजस्थानहून सभेत घेऊन आले.तो स्वत:हून आला नव्हता.आपचेच कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्याला झाडावर चढायला उद्युक्त करत होते.तो झाडावर चढल्यावर आपच्याच कार्यकत्यांनी त्याच्या हातात झाडू दिला.त्याला फास घ्यायला उद्युक्त करून नंतर उतरण्यासाठी विनंती करणे हे आपच्या ढोंगीपणाला साजेसेच आहे.पोलिस एकवेळ निर्लज्जासारखे तमाशा बघत असतील्,पण दस्तुरखुद्द राज्याचा मुख्यमंत्री व त्याचे भक्तगण त्याला वाचविण्याचा प्रयत्न न करता पुढील ७५ मिनिटे त्याच्या मृतदेहासमोर निर्लज्जासारखे भाषणबाजी करत होते त्याचे काय?पोलिसांपेक्षा मुख्यमंत्र्याची जबाबदारी जास्त नाही का?

झी न्युजने हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे हे स्पष्ट दिसत आहे.
सगळ्या न्युज चॅनल्सनी सुरूवातीला हाच व्हिडिओ दाखवला.
नंतर हळू हळू सगळ्यांनी झी न्युजचा हा व्हिडिओ दाखवायचे बंद केले.

अच्छा,म्हणजे व्हिडिओ मॉर्फ करणे ही फक्त आपचीच मक्तेदारी आहे अशी आमची आजपर्यंत समजूत होती.

राजस्थानमधल्या एका शेतकर्‍याला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी दिल्लीमध्ये का यावेसे वाटले ?
आत्महत्येसारखे इतके टोकाचे पाऊल का उचलावे वाटले ?
राजस्थान सरकार आणि केंद्र सरकारवर त्याचा असा काय राग होता ?
असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत.

वर उत्तर दिले आहे.आपचे कार्यकर्ते त्याला राजस्थानहून सभेत घेऊन आले.तो स्वत:हून आला नव्हता.आपचे कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्याला झाडावर चढायला उद्युक्त करत होते.तो झाडावर चढल्यावर आपच्याच कार्यकत्यांनी त्याच्या हातात झाडू दिला.हे एक प्लॅन्ड नाटक होते.झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर केजरीवालांनी किंवा इतरांनी त्याला वाचवायचे व त्या निमित्ताने मोदींना झोडपायचे अशी योजना होती.दुर्दैवाने आपल्याला खरोखर फास बसला आहे हे त्याला कळलेच नाही.त्याची परिस्थिती आत्महत्या करण्यासारखी नव्हतीच्.त्याची २७ एकर जमीन होती.पत्रात लिहिलेले अक्षर त्याचे नाही हे प्रत्यक्ष त्याच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.आपच्या इतर नाटकांप्रमाणे हेही नाटकच होते,पण त्यात त्या बिचार्‍याचा जीव गेला.
दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा मिळून ५ वर्षांची निश्चिंती झालेली असताना केजरीवाल आणि कंपनीला एखाद्याचा जीव जाईपर्यंत अशी ड्रामेबाजी करण्याची गरज काय असे प्रश्न आपल्यासारख्या आपभक्तांना पडत नसतीलच.

हा आपने घडवून आणलेला खून आहे’.
‘ही आपची नौटंकी होती.’
‘कुमार विश्वासला त्याचा प्लॅन नीट एक्जिक्युट करता नाही आला. त्याच्या तोंडून शेकडो लोकांपुढे लटक गया हे चुकीने निघाले आणि पर्दाफाश झाला.’
‘रडण्यासाठी आशुतोषला ऑस्कर द्यायला पाहिजे.’

हे १०० % खरे आहे. यात एक कणभरही खोटे नाही.

एव्हढा मोठा पोस्ट लिहिला तुम्ही, पण त्यात एक वाक्य खरे लिहिले असेल तर शप्पथ !
देवाने गेल्या काही दिवसांत मला अशा धादांत खोट्या माहितीने ओतप्रोत असलेल्या पोस्ट्सकडे दुर्लक्ष करण्याची सुबुद्धी दिली होती.
पण आज १०-१५ मिनिटं वाया घालवून तुम्हाला का रिप्लाय करतोय काही कळत नाहीये.
नक्कीच काहीतरी जादू किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर आहेत तुमच्याकडे.

मी लिहिले त्यात एक शब्दही खोटा नाही.आपणच तेवढे खरे आणि इतर सर्व खोटे ही टिपिकल आपवाल्यांची प्रवृत्ती त्यांच्या समर्थकांमध्येही आहे हे यानिमित्ताने दिसून आले.

पूर्वी केजरीवाल आपल्यावर शाई,अंडी वगैरे फेकल्याची नाटके करत होते.गालावर थोतरीत मारून घ्यायचे शो सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या मॅनेज केले.तिथपर्यंत ठीक होते.या ड्रामेबाजीचा जनतेला त्रास नव्हता.आता ह्यांची ड्रामेबाजी लोकांच्या जीवावर उठायला लागली आहे त्याची काळजी वाटते.

विकास's picture

20 May 2015 - 10:44 pm | विकास

डोळे बंद ठेवून जागे असलेल्याला, जागे करता येत नाही म्हणून? ;)

लॉर्ड फॉकलन्ड's picture

20 May 2015 - 12:32 pm | लॉर्ड फॉकलन्ड

अनिंदो मुजुमदारांच्या कार्यालयाला कुलुप लावून त्यांना काम करायला प्रतिबंध करून मास्टर अरविंद यांनी आपल्या परिपक्वतेचे,प्रगल्भतेचे व लोकशाही मुल्यांचे जे दर्शन घडविले त्याबद्दल त्यांचे व समर्थकांचे अभिनंदन.

मृत्युन्जय's picture

20 May 2015 - 12:34 pm | मृत्युन्जय

थांबा. त्यांची अपाँईंटमेंट कायदेशीर आहे की नाहे हे आधी जाहीर होउ द्यात. त्या आधी या गोष्टासाठी केजरीवालांना दोषी ठरवणे चुकीचे होइल.

लॉर्ड फॉकलन्ड's picture

20 May 2015 - 12:39 pm | लॉर्ड फॉकलन्ड

कायदेशीर असली किंवा नसली तरी सनदी अधिकार्‍याच्या कार्यालयाला कुलुप लावून त्याला काम करायला प्रतिबंध करणे हे योग्य आहे का?

मृत्युन्जय's picture

20 May 2015 - 12:45 pm | मृत्युन्जय

जर कायदेशीर नसेल तर त्यात अयोग्य काहिच नाही. फक्त टेक्निकल गुंता असेल तर त्यातही गोष्ट वेगळी पण मुळात बेकायदेशीर असेल तर नक्कीच त्यात काही अयोग्य नाही,

लॉर्ड फॉकलन्ड's picture

20 May 2015 - 2:12 pm | लॉर्ड फॉकलन्ड

मनीष सिसोदियांनी मुख्य सचिव पदासाठी उपराज्यपालांना लिहिलेल्या पत्रात शकुंतला गॅमलिन व परिमल रॉय अशी दोन नावे सुचविली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी उपराज्यपाल नजीब जंग यांनी शकुंतला गैमलिन यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केल्यानंतर, गॅमलिन यांचे वीज कंपन्यांशी साटेलोटे असल्याचा आरोप करीत केजरीवाल यांनी जंग यांच्यावर जाहीर टीका केली होती. गॅमलिन यांचे नाव सुचविताना हे साटेलोटे दिसले नव्हते का? जर गॅमलिन नको होत्या तर पत्रात त्यांचे नाव का सुचविले होते? जर उपराज्यपालांना मुख्य सचिव पदाच्या नियुक्तीचा अधिकार नसेल तर पत्र लिहून त्यांची परवानगी मागितलीच कशाला? नंतर गॅमलिन यांच्या नियुक्तीचे पत्र अनिंदो मुजुमदारांनी दिल्यावर मुजुमदारांच्या कार्यालयाला कुलुप लावणे हा वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा व पोरकटपणा करून त्रागा करण्याचा प्रयत्न होता.

मृत्युन्जय's picture

20 May 2015 - 3:07 pm | मृत्युन्जय

असे असेल तर केजरीवाल सरकारच्या उद्दामपणात, आक्रस्ताळेपणात, दुटप्पीपणात आणि घटनाबाह्य वर्तनात अजुन एका गोष्टीची भर पडली असे म्हणावे लागेल.

नांदेडीयन आणि पिउ खुलासा करतील काय?

गॅरी ट्रुमन's picture

19 May 2015 - 10:50 am | गॅरी ट्रुमन

आपल्या युगपुरूषजींनी नवी बिनतोड चाल खेळली. त्यांची कन्या ड्रायव्हिंग लायसेन्सच्या कामासाठी आर.टी.ओ मध्ये गेली होती तेव्हा आतल्या अधिकार्‍याला लाच खिलवायचा प्रयत्न केला. आणि त्या अधिकार्‍याने लाच घ्यायला नकार दिला म्हणजे आपण सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचार कसा कमी झाला असा दावा युगपुरूषजींनी केला.

सरकारी अधिकार्‍याला लाच द्यायचा प्रयत्न केल्याबद्दल कुणा बग्गा नामक व्यक्तीने केजरीकन्यकेविरूध्द एफ.आय.आर दाखल केला आहे. त्या एफ.आय.आरचे पुढे काही होणार नाही हे सांगायला नकोच.पण लाच द्यायचा प्रयत्न करायला असा सरकारी आश्रय मिळाल्यामुळे लाच देणार्‍यांना आपला बचाव करायला एक चांगलेच आयुध मिळाले आहे.म्हणजे लाच द्यायची-- पचली तर पचली आणि पकडले गेल्यास 'अरे मी तर स्टिंग ऑपरेशन करत होतो' असे म्हणायचे.

उत्तम. भ्रष्टाचाराविरूध्दचा लढा असावा तर हा असा. असो.

हा प्रतिसाद लिहिल्यानंतर ३१ जुलैपर्यंत मी मिपापासून दूर असणार आहे. काही महत्वाच्या कामांसाठी वेळ देणे गरजेचे आहे.मागच्या वेळी ४५ दिवसांसाठी मिपापासून दूर होतो तो विजनवास या लेखातून मोडला होता. ३१ जुलैनंतर परतल्यावर तो विजनवास मोडायला आणि आआपचे आणखी मोठे वाभाडे काढायला युगपुरूषजी यापेक्षाही मोठे कारण देतील ही अपेक्षा.

(पूर्वाश्रमीचा क्लिंटन) गॅरी ट्रुमन

नांदेडीअन's picture

20 May 2015 - 9:20 am | नांदेडीअन

सरकारी अधिकार्‍याला लाच द्यायचा प्रयत्न केल्याबद्दल कुणा बग्गा नामक व्यक्तीने केजरीकन्यकेविरूध्द एफ.आय.आर दाखल केला आहे.

'कुणा बग्गा नामक व्यक्तीने' असा उल्लेख करून महामहिम तेजिंदरपाल बग्गा यांचा अनादर करू नका.
भगत सिंघ क्रांती सेना चालवतात हे.

हे केजरिवाल यांच्या विरोधात लढणार होते.
यांच्या समर्थकांनी एक ऑनलाईन पिटिशनसुद्धा टाकली होती Change.org वर.
ट्विटरवर #BaggaVsKejriwal हा हॅशटॅगसुद्धा ट्रेंड झाला होता एक दिवस.

We the undersigned supporters/members of Bharatiya Janta Party request yourselves to kindly declare Tajinder Bagga- BJP’s foot-solider and a RSS Swyamsevak- as party’s candidate against Arvind Kejriwal.

१५०० लोकांचे समर्थन हवे होते यांना.
दिल्लीच्या निवडणुका होऊन जवळपास १०० दिवस होत आले आहेत, पण यांना अजून फक्त १३६५ जणांचेच समर्थन मिळाले आहे.
आपल्या मिपावरच्या केजरीवाल विरोधकांनी कृपया महामहिम बग्गा यांची मदत करावी.

असो.
ज्या FIR बद्दल तुम्ही बोलताय, महामहिम बग्गा यांनी ती मागे घेतली आहे.
केजरीवालच्या मुलीची माफीसुद्धा मागितली आहे.

hsp

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:31 am | पिंपातला उंदीर

आर्र्र्र्र्र ! भक्तांच लैच वस्त्रहरण केलत बुवा .

चिंतामणी's picture

23 Dec 2015 - 6:30 pm | चिंतामणी

हे कोण आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे त्याना किती महत्व द्यायचे हे माहीत आहे.

रमेश आठवले's picture

19 May 2015 - 8:21 pm | रमेश आठवले

केजरीवालांच्या चाळ्याना पाहून खाली पैकी कोणती म्हण वापरावी या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

नाच न जाने आंगन तेढा ( नाचता येईना आंगण वाकडे )--
जबसे सुना कि मरने का नाम जिंदगी है
बांधे कफन सरपे कातिल को ढूण्ड रहा हू

पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे
नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
अती झालं अऩ हसू आलं
कशात ना मशात, माकड तमाशात

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 9:18 am | पिंपातला उंदीर

एखाद्याने आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्या बद्दल किती खुनशी असाव याला काही मर्यादा ?

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/sanjay-joshi/articleshow/4...

नांदेडीअन's picture

20 May 2015 - 9:32 am | नांदेडीअन

अहो हा केजरूला शिव्या घालायचा टॉपिक आहे, भक्तांना अवघड प्रश्न विचारायचा टॉपिक नाही.

मृत्युन्जय's picture

20 May 2015 - 11:25 am | मृत्युन्जय

प्रशांत भुषण आणि योगेंद्र ज्या प्रकारे बाहेर काढले गेले ते बघता हे काहिच नाही. मुद्दा जर पाणी आणि वीज तोडण्याचा असेल तर त्यात चुकीचे काहिच नाही. बळजबरीने फ्लॅट बळकावुन बसलेल्या लोकांबद्दल तुम्हाला आदर असु शकतो पण केंद्र सरकारला असावाच असे काही नाही.

पिंपातला उंदीर's picture

20 May 2015 - 11:31 am | पिंपातला उंदीर

नाही पण एवढे इतर लोक असताना काही 'खास ' लोकांवरच एवढी मेहरबानी का असा प्रश्न पडतो वो ?

http://indianexpress.com/article/india/india-others/several-ex-ministers...

दिल्लीतला भ्रष्टाचार कमी झालाय असं ऐकतोय..केजरीवालांनी अशी काय उपाययोजना केली कळू शकेल का ?
बाकी राज्यांना सुद्धा फायदा होईल.

विकास's picture

22 May 2015 - 9:04 pm | विकास

थयथयाट आणि कांगावखोरपणा - किंवा सोप्या भाषेत नौटंकी! :)

ईश्वरसर्वसाक्षी's picture

22 May 2015 - 9:06 pm | ईश्वरसर्वसाक्षी

मागच्यास ठेच पुढचा शहाणा, तसाहि दिल्लि च्या अनुभवाचा फायदा सगळ्या राष्ट्राला होणार आहे.

विकास's picture

22 May 2015 - 9:10 pm | विकास

मागच्यास ठेच म्हणता येणार नाही... "आ बैल ... " म्हणणे जास्त योग्य ठरेल. ;)

काळा पहाड's picture

22 May 2015 - 9:41 pm | काळा पहाड

याला कुर्‍हाडीवर पाय मारणे असं म्हणतात. दि

विकास's picture

23 May 2015 - 12:23 am | विकास

Like

श्रीगुरुजी's picture

27 May 2015 - 11:58 pm | श्रीगुरुजी

दिल्लीचे मुख्य सचिव फक्त १० दिवसांच्या रजेवर गेल्यावर त्यांच्या जागी हंगामी सचिव पदासाठी मनीष शिसोदीयांनी जंग यांना लिहिलेल्या पत्रात परिमल रॉय व शकुंगला गम्लीन ही दोन नावे सुचविली होती. त्यात रॉय यांचे नाव प्रोपोझ केले होते. ते का केले असावे हे समजले. कारण परीमल रॉय हे राष्ट्रकुल घोटाळ्यातील एक आरोपी आहेत.

http://www.saharasamay.com/regional-news/national-capital-region-news/67...

केजरीवालांची मोड्यूस ऑपरंडी अशी आहे.

In front of camera : -
Arvind Kejriwal : We are against corruption.

Behind the camera :-
Kejriwal : Reward posts to corrupt people.

And what when caught?
Kejriwal :- Ye sab modi ki chaal hai.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व ज्या व्यक्तीवर राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचार प्रकरणी एफआयआर दाखल झालेला आहे अशा व्यक्तीला पाठीशी घालणे हे केजरीवालांसाठी नवे नाही. यापूर्वी पदवीचे खोटे प्रमाणपत्र देणार्‍या जितेंद्र तोमर यांच्या पाठीमागेही केजरीवाल रॉक ऑफ जिब्राल्टर प्रमाणे उभे राहिले होते.

आणि आता याच परिमल राय यांना केजरीवालांनी दिल्लीतील समाजकल्याण खात्याचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक केली आहे.

असो.

नांदेडीअन's picture

28 May 2015 - 6:57 am | नांदेडीअन

याच परिमल रॉय यांना मनोहर पर्रीकरांनी भ्रष्टाचार करण्यासाठीच नियुक्त केले होते ना गोव्यात ?

बाय द वे, तोमर यांच्याबद्दल एक लेट्टेष्ट न्युज आली आहे आज काही पेपरात.
भेटली नाही तर सांगा, लिंक देतो.

नांदेडीअन's picture

28 May 2015 - 10:14 am | नांदेडीअन

आज हायकोर्टामध्ये कॉलेजतर्फे सांगण्यात आले की जितेंद्र तोमर हे आमच्याच कॉलेजमध्ये शिकत होते आणि त्यांनी त्यांची डिग्री इथूनच मिळवली आहे.
तुम्हाला या प्रकरणाबद्दल काहिच माहित नसेल, तर थोडक्यात माहिती देतो.

सर्वप्रथम कुणीतरी माहिती अधिकारांतर्गत खालील प्रकारे माहिती मागवली :

१) मागवलेली माहिती : श्री. जितेंद्र तोमर हे तुमच्या कॉलेजमध्ये शिकत होते का ?
मिळालेले उत्तर : हो.

२) मागवलेली माहिती : XYZ123 या हजेरी क्रमांकावर श्री. जितेंद तोमर हे तुमच्या कॉलेजमधून पास झाले आहेत का ?
मिळालेले उत्तर : नाही.

बस्स, इथून पुढे मोर्चा सांभाळायची जबाबदारी आमच्या पाळीव न्युज चॅनल्स आणि भक्तांची होती.
आणि त्यांनी ती जबाबदारी इमानेइतबारे पार पाडली.

केजरी के मिनिस्टर की डिग्री फर्जी है ।
कानून मंत्री का कानून से खिलवाड ।
कानून मंत्री जितेंद्र तोमर पर कानूनी शिकंजा ।
कानून मंत्री फर्जी डिग्री मामले में कब हिरासत में लिए जाऐंगे ?

तिकडे तोमर ओरडत राहिले की मुळात हा माझा हजेरी क्रमांकच नाहीये, पण तोपर्यंत भाजपाचे डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट कार्यरत झालेले होते.
समजा तुमचा डिग्रीच्या शेवटच्या वर्षाचा क्रमांक १२३४ होता आणि तुम्ही विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवले होते.
पण काही वर्षांनंतर मी विद्यापीठाला विचारले की माझा हा मित्र, ज्याचा परिक्षा क्रमांक ४३२१ होता, याने तुमच्या विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवले आहे का ?
काय येईल हो कॉलेज किंवा विद्यापीठाचे उत्तर ?
‘नाही’ असेच येईल ना ?

काही नाही हो, त्या बिचार्‍या स्मृती इराणींना एकटे वाटू नये म्हणून सगळा खटाटोप सुरू आहे भाजपाचा.

केस अजूनही संपलेली नाहीये, पण यावरून तुमच्या लक्षात आले असेल की एकंदरीत काय प्रकार सुरू आहे.
मी जितेंद्र तोमर यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाहीये, कारण अजून अंतिम निकाल यायचा बाकी आहे.
पण हे जे काही सुरू आहे, त्यावरून स्पष्ट दिसतंय की जितेंद्र तोमर यांच्यावर विनाकारण चिखलफेक होत आहे.
शेवटी कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत आपल्याला वाट पाहावीच लागणार आहे.

श्रीगुरुजी's picture

28 May 2015 - 1:29 pm | श्रीगुरुजी

>>> केस अजूनही संपलेली नाहीये,

केजरीवालांनी पूर्वीच सांगितले होते की ज्याच्यावर गुन्हा सिद्द झालेला आहे अशी व्यक्ती माझ्याबरोबर कधीही असणार नाही. एवढेच नव्हे तर ज्याच्यावर फक्त आरोप आहेत तोसुद्धा आपमध्ये व माझ्या मंत्रीमंडळात असणार नाही. सीझरची पत्नीसुद्धा संशयातीत असली पाहिजे असे त्यांचे तत्व होते. मग या तत्वाचं काय झालं?

श्रीगुरुजी's picture

28 May 2015 - 1:28 pm | श्रीगुरुजी

केजरीवालांनी पूर्वीच सांगितले होते की ज्याच्यावर गुन्हा सिद्द झालेला आहे अशी व्यक्ती माझ्याबरोबर कधीही असणार नाही. एवढेच नव्हे तर ज्याच्यावर फक्त आरोप आहेत तोसुद्धा आपमध्ये व माझ्या मंत्रीमंडळात असणार नाही. सीझरची पत्नीसुद्धा संशयातीत असली पाहिजे असे त्यांचे तत्व होते.

परीमल रॉय यांच्यावर २०११ मध्ये एफआयआर दाखल झालेला आहे. तरीसुद्धा १० दिवसांच्या कालावधीसाठी मुख्य सचिव पदासाठी शकुंगला गम्लीनच्या बरोबरीने आप सरकारने परीमल रॉय हे नावसुद्धा पाठविले आणि त्यांचेच नाव प्रपोझ केले. राज्यपालांनी त्या १० दिवसांसाठी (फक्त १० दिवसांसाठी) गम्लीन यांची नेमणूक केल्यावर केजरीवालांनी थयथयाट केला. सर्वप्रथम गम्लीन या वरीष्ठ सनदी अधिकार्‍यावर जाहीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. जर त्या भ्रष्टाचारी होत्या तर त्यांचे नाव पाठवलेच कशाला? आणि परीमल रॉय यांच्यावर राष्ट्रकुल स्पर्धेतल्या महाघोटाळ्यात सामील असल्याचा आरोप असताना सुद्धा त्यांचेच नाव का प्रपोझ केले?

राष्ट्रकुल घोटाळ्यातील काही आरोपी आणि केजरीवाल यांचे पूर्वीपासूनच साटेलोटे आहे. २०१३ मध्ये शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराविरूद्ध कंठशोष करणार्‍या केजरीवालांनी मुख्यमंत्री झाल्यावर लगेचच शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मागायला सुरूवात करून त्यांच्यावर कारवाई केली नाही. आता ते परीमल रॉय यांची पाठराखण करीत आहेत.

जो आपल्या बाजूने असतो तो स्वच्छ आणि जो आपल्याविरूद्ध जातो तो भ्रष्टाचारी अशी केजरीवालांची सोपी व्याख्या आहे. उठून कोणावरही जाहीररित्या भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांना पुरावे वगैरे इ. फालतू गोष्टींची गरज लागत नाही. त्यांना कोणी विरोध केला की लगेच 'ये सब मिले हुए है' ची टेप सुरू. येथील भ्रष्टव्यवस्था बदलण्यासाठी आपण अवतार धारण केला आहे हे त्यांनी अनेकवेळा सांगितले आहे. परंतु 'आप'ल्या पक्षातील भ्रष्टाचार्‍यांच्या पाठीशी ते भक्कम उभे असतात.

मोदींवर तानाशाहीचा आरोप करताना आपण योगेंद्र यादव, भूषण इ. ना त्यांचे म्हणणे मांडून न देता मार्शलकरवी झडती घेऊन मारहाण करून पक्षातून हाकलून लावले हे ते सोयिस्कररित्या विसरतातच.

अर्थात आपल्या पक्षात किती तमाशे आणि नाटके करायची याने लोकांना फार फरक पडत नाही. परंतु नुकताच यांच्या नाटकामुळे एक शेतकरी मृत्युमुखी पडला. यांच्या नाटकांमुळे अजून किती लोकांचा जीव जाणार आहे कोणास ठाऊक?

सध्या दिल्लीत उच्च व सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरूद्ध सुनावणी सुरू आहे. दुर्दैवाने यात केजरीवालांच्या विरूद्ध निकाल लागला तर ते किती थयथयाट करतील याची कल्पनाच करवत नाही. 'केंद्र, वकील, न्यायाधीश, राज्यपाल ये सब मिले हुए है' असा थयथयाट ते करतीलच. कदाचित याचे निमित्त करून ते राजीनामाही देतील अशी अंधुकशी शक्यता आहे.

चिंतामणी's picture

23 Dec 2015 - 6:38 pm | चिंतामणी

In front of camera : -
Arvind Kejriwal : We are against corruption.

Behind the camera :-
Kejriwal : Reward posts to corrupt people.

And what when caught?
Kejriwal :- Ye sab modi ki chaal hai.

राजेंद्र कुमार प्रकरण आत्ताचे आहे ना.

गुरुजींनी सहामहीन्यापुर्वी लिहून ठेवले आहे ते पुन्हा लागु होत आहे.

पिंपातला उंदीर's picture

28 May 2015 - 8:39 am | पिंपातला उंदीर

ते काय करायचं ते आप बघून घेईल . एकंदरीत आप विरोधकांनाच आप ची जास्त काळजी दिसतेय .

आमच्या वरील प्रतिसादाची प्रेरणा इथ

http://www.misalpav.com/comment/699589#comment-699589

नांदेडीअन's picture

28 May 2015 - 8:52 am | नांदेडीअन

तुम्ही फार अवघड करताय त्यांच्यासाठी.
थोडी तरी दया-माया दाखवा. :P

आनन्दा's picture

12 Jun 2015 - 1:35 pm | आनन्दा

बाकी आपची काळजी आम्हाला लुमच्यापेक्षा जास्त आहे. कारण एक वेगळा नवीन प्रयोग म्हणून आम्ही २-३ वर्षांपासून आपकडे डोळे लावून बसलो आहोत. फक्त आम्ही भक्त नाही एव्हढेच.

पिंपातला उंदीर's picture

28 May 2015 - 9:01 am | पिंपातला उंदीर

त्यांनीच स्वतःची तुलना त्या एका वर्षाच्या धाग्यात राहुल गांधी यांच्यांशी करून स्वतः साठीच पाचर मारून ठेवली आहे ; )

श्रीगुरुजी's picture

29 May 2015 - 8:51 pm | श्रीगुरुजी

In a massive setback for Arvind Kejriwal in his turf war with the Centre , the Delhi High Court on Friday ruled that the city government's proposal on the appointment of senior bureaucrats must be studied by Lieutenant Governor Najeeb Jung.

"If the LG wants any clarification regarding the interim proposal, then he may ask for it," the court said, refusing to stay the controversial Home Ministry notification limiting the powers of the Aam Aadmi Party government in the national capital. The court has also declined the request of the petitioners to revise the primacy of the LG in matters concerning the Delhi administration.

Earlier in the day, the Supreme Court on Friday sought the Delhi government's response in three weeks on the Centre's plea seeking stay on the High Court judgement which termed as "suspect" the notification clipping powers of the Aam Aadmi Party dispensation. In its May 21 notification, the Centre had restrained the Delhi government's Anti-Corruption Branch (ACB) from acting against its officers in criminal offences and holding that the Lieutenant Governor cannot act in his discretion. The Supreme Court on Friday refused to stay the observations of the Delhi High Court, which had termed as “suspect” the recent Centre’s notification clipping powers of the AAP government, saying they were “only tentative in nature” without expressing any opinion on its validity.

उच्च न्यायालयाचा हा अंतरिम आदेश आहे. अंतिम आदेश यायला अजून काही महिने लागतील. २५ मे ला उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या २१ मे च्या अधिसूचनेला "संशयास्पद" असे म्हटले होते. त्या निकालानंतर लगेचच "हा आमचा विजय" झाला अशा फुशारक्या आप च्या नेत्यांनी मारल्या होत्या. त्यानंतर लगेचच विधानसभेचे २ दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात मोदींवर सडकून टीका केली होती. उपराज्यपालांवर महाभियोग चालविण्याचीही चर्चा झाली. केंद सरकारचा निषेध केला गेला. २१ मे ची केंद्र सरकारची अधिसूचनाही विधानसभेत फाडली गेली. या पार्श्वभूमीवर या दोन्ही न्यायालयांच्या आजच्या निर्णयामुळे केजरीवालांना तात्पुरता का होईना पण झटका बसला आहे हे निश्चित.

निदान आतातरी केजरीवाल नौटंकी सोडून कामाला लागतील अशी फक्त अपेक्षाच ठेवता येईल.

विकास's picture

29 May 2015 - 9:02 pm | विकास

निदान आतातरी केजरीवाल नौटंकी सोडून कामाला लागतील अशी फक्त अपेक्षाच ठेवता येईल.

आप कडून अपेक्षा ठेवायला तुम्ही देखील आप्टार्ड झालात का ? ;)

नाखु's picture

30 May 2015 - 3:53 pm | नाखु

गुरूजी "आप" तो ऐसे ना थे,
आपकी बदमाषीयोंके ये नये अंदाज है,

दिवाभीत
नाखु

अपेक्षा ठेवुया त्यात काही गैर नाहि, वैसेभी उम्मिद पे दुनिया कायम है.

नांदेडीअन's picture

29 May 2015 - 11:04 pm | नांदेडीअन

Why did TV headlines ‘Kejriwal ko Supreme Court Se Bada Jahtka’ disappear?
http://www.jantakareporter.com/india/why-did-tv-headlines-say-kejriwal-k...

Why did TV headlines ‘Kejriwal ko Supreme Court Se Bada Jahtka’ disappear?

केजरीवाल मिडीयाला कस मॅनेज करतो त्याच उदाहरण आहे हे !
आआपच्या विरुद्ध असलेल्या बातम्याच कश्या नाहीश्या होतात.

श्रीगुरुजी's picture

9 Jun 2015 - 9:15 pm | श्रीगुरुजी

केजरीवाल सरकारच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा . . . दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांना बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणामध्ये अटक होऊन न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे. पूर्वी त्यांच्यावर एल एल बी चे खोटे पदवीपत्र दिल्याचा आरोप होता. त्या आरोपा पाठोपाठ आता बी एस्सी चे खोटे पदवीपत्र दिल्याचा आरोप झाला आहे. आपल्या पक्षातील भ्रष्टाचारी लोकांच्या पाठीशी उभे राहण्याच्या आआपच्या उच्च परंपरेला जागून आआप नेत्यांनी तोमरांचे समर्थन केले आहे.

राखी बिडलावरही सीसीटीव्ही खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचे आरोप होत आहेत.

आजच्या मटामधील माजी आआप नेते मारूती भापकर यांची मुलाखत वाचनीय आहे. त्यातून केजरीवाल व आआपच्या उच्च लोकशाही मूल्यांवर प्रकाश पडतो.

दिल्लीत सफाई, पाणी, वीज इ. समस्या कायम असून अजून दिल्लीचे अंदाजपत्रक मांडलेले नाही. परंतु, अवतारी महापुरूष केजरीवाल मात्र सचिवांच्या बदल्या करण्यात मग्न आहेत व उपराज्यपाल जंग त्यांचे निर्णय रद्द करण्यात व्यस्त आहेत.

विकास's picture

9 Jun 2015 - 10:29 pm | विकास

आता तोमर, माजी मंत्री झाले. :(

त्यांना आणि त्यांच्या पाठीराख्या केजरीवाल आणि आप परीवाराला जर हे राजकारण वाटत होते तर त्यांनी राजीनामा कसा दिला आणि दिलेला मान्य केला?

अजून पुढे...

नांदेडीअन's picture

10 Jun 2015 - 2:37 pm | नांदेडीअन

पूर्ण चौकशी होऊन, कोर्टाचा निकाल लागेपर्यंत जितेंद्र सिंह तोमर यांनी राजीनामा दिला आहे.
हे एक चांगले झाले.
आता जर का ते दोषी आहेत असे आढळले, तर कोर्टाने त्यांना जमेल तेव्हढी कठोर शिक्षा द्यायला पाहिजे.
याने दोन गोष्टी साध्य होतील.
एक तर स्मृती इराणी, निहालचंद, गडकरी, कठेरिया अशा मंत्र्यांमध्ये एक चांगला संदेश जाईल.
आणि दुसरे म्हणजे भविष्यात कुणी राजकारणी असा फ्रॉड करायचा विचारसुद्धा करणार नाही.

काळा पहाड's picture

10 Jun 2015 - 2:45 pm | काळा पहाड

अच्छा म्हणजे युगपुरुषांना संदेश जाणारच नाही तर. अगदी काल पर्यंत मनीष शिसोदिया म्हणत होते की हे कारस्थान आहे. आशुतोष म्हणत होते की तोमर निर्दोष आहेत आणि युगपुरुषांनी तर गुळणी सोडलीच नाही.

बाय द वे, त्या १६ लाखांपैकी किती कॅमेरे बसवून झाले?

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2015 - 3:10 pm | श्रीगुरुजी

कॅमेरे? कसले कॅमेरे? त्याआधी १०० सचिवांच्या बदल्या करायच्या आहेत, तोमरला सोडविण्यासाठी आंदोलन करायचे आहे, मोदींना शिव्या द्यायला रॅली घ्यायची आहे, विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून उपराज्यपाल, राजनाथसिंग, मोदी इ. चा निषेध करायचा आहे, रस्त्यांवर तमाशा करायचा आहे . . . अशी बरीच महत्त्वाची कामे सोडून कॅमेरे बसवायचेत का?

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 3:21 pm | कपिलमुनी

तुम्ही पण १०० स्मार्ट सिटी ची यादी जाहीर करा

माझ्या माहितीप्रमाणे स्मार्ट सिटीची यादी जाहीर झालेली आहे गुगलून बघा

काळा पहाड's picture

10 Jun 2015 - 3:33 pm | काळा पहाड

स्मार्ट सिटीज वर एक वेबसाईटच सरकार तर्फे बनवण्यात आलेली आहे: http://indiansmartcities.in/site/index.aspx

काळा पहाड's picture

10 Jun 2015 - 3:30 pm | काळा पहाड

तुमची निराशा होण्याची शक्यता आहे, पण मी बीजेपीचा कार्यकर्ता नाही. माझी मतं त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे ठरतात. मी आत्ता पर्यंत शिवसेना, मनसे, बीजेपी आणि राष्ट्रवादी यांना वेगवेगळ्या निवडणुकांत वेगवेगळ्या वेळी मतं दिली आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनात माझी सहानुभूती अण्णा, केजरीवाल, बेदी, प्रशांत भूषण आणि हेगडेंना पण होती. आप कडून बर्‍याच आशा होत्या पण दुसर्‍या कुठल्याच पक्षाकडून इतक्या वेगाने अपेक्षाभंग झालेला नाही. तेव्हा हा प्रश्न तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्त्याला विचारलेला बरा. कसं?

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 3:36 pm | कपिलमुनी

बीजेपीच्या कार्यकर्त्यालाच विचारला आहे :)

काळा पहाड's picture

10 Jun 2015 - 3:48 pm | काळा पहाड

ओके. मला वाटलं मला रिप्लाय आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2015 - 11:05 pm | श्रीगुरुजी

तुमचा अपेक्षाभंग होणार आहे.

मी भाजपचा कार्यकर्ता अथवा सभासद नाही. मी कोणत्याही बाजूने भाजप या पक्षाशी संबंधित नाही. मी भाजप समर्थक आहे (खरं तर मी काँग्रेस व काँग्रेसी विचारांच्या पक्षांचा कट्टर विरोधक आहे हे जास्त योग्य विधान आहे), परंतु मी प्रत्येकवेळा भाजपलाच मत देतो असे नाही. पूर्वी मी मतदारसंघात भाजप उमेदवार असूनसुद्धा अपक्ष, मनसे अशा पक्षाला/उमेदवाराला मत दिले होते. सध्या मी भाजप समर्थक आहे त्याचे मुख्य कारण भाजप हा सर्व ६४ कलागुणांनी युक्त असलेला पक्ष, सद्गुणांचे माहेरघर असलेला पक्ष इ. इ. नसून भाजप हा उपलब्ध पर्यायातला त्यातल्या त्यात चांगला पर्याय असल्यामुळे मी भाजपचा समर्थक आहे.

कपिलमुनी's picture

11 Jun 2015 - 12:19 pm | कपिलमुनी

मी भाजपचा कार्यकर्ता अथवा सभासद नाही. मी कोणत्याही बाजूने भाजप या पक्षाशी संबंधित नाही.

परंतु मी प्रत्येकवेळा भाजपलाच मत देतो असे नाही. पूर्वी मी मतदारसंघात भाजप उमेदवार असूनसुद्धा अपक्ष, मनसे अशा पक्षाला/उमेदवाराला मत दिले होते.

भाजप हा सर्व ६४ कलागुणांनी युक्त असलेला पक्ष, सद्गुणांचे माहेरघर असलेला पक्ष इ. इ. नसून

पिंपातला उंदीर's picture

13 Jun 2015 - 8:41 pm | पिंपातला उंदीर

लोळ : ) : )

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jun 2015 - 12:33 am | डॉ सुहास म्हात्रे

पिंपात उंदीर लोळतोय असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले ! :) ;)

(हघ्या)

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2015 - 3:05 pm | श्रीगुरुजी

>>> पूर्ण चौकशी होऊन, कोर्टाचा निकाल लागेपर्यंत जितेंद्र सिंह तोमर यांनी राजीनामा दिला आहे.
हे एक चांगले झाले.

बनावट पदवी प्रमाणपत्रांचे प्रकरण ३० जानेवारीलाच बाहेर आले होते. त्यांना तिकीट न देण्याची व नंतर मंत्रीपदाची खिरापत न देण्याची आणि नंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावायची बुद्धी अवतारी महापुरूषांना तेव्हाच सुचली असती तर इतका तमाशा करावा लागलाच नसता. चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण राजीनामा द्यावा ही अक्कल तोमरला सुचली असती तर आआपला इतकी नौटंकी करावीच लागली नसती.

तोमरला मारहाण करून जबरदस्तीने त्याच्याकडून खोटा कबुलीजबाब पोलिसांनी लिहून घेतला असे तारस्वरात आशुतोष किंचाळत होता.

काल सिसोदिया बरळत होते, "सर्व भ्रष्टाचारी आमच्याविरूद्ध एक झाले आहेत.". म्हणजे आता न्यायालयचाही याच्यात समावेश होतो.

गजेंद्रसिंहला मारणारे हे सर्वजण तोमरच्या पाठीशी एक झाले होते.

>>> आता जर का ते दोषी आहेत असे आढळले, तर कोर्टाने त्यांना जमेल तेव्हढी कठोर शिक्षा द्यायला पाहिजे.

४ महिने तोमरचे समर्थन करून काल दिवसभर तमाशा करणार्‍या आआपच्या लबाड नेत्यांना हीच अक्कल आधी का आली नाही?

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 3:17 pm | कपिलमुनी

स्मृती इराणीचे नक्की क्वालीफिकेशन काय हो ?
डीग्री ?
युनिव्हर्सिटी ?

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2015 - 3:29 pm | श्रीगुरुजी

स्मृती इराणींबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवा.

जर प्रत्यक्ष माहितीत आणि जाहीर माहितीत फरक असेल तर न्यायालयात खटला दाखल करा.

तोमरच्या बाबतीत नुसते आरोप न करता एकाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत त्याच्या पदव्यांची माहिती मागवून, विद्यापीठांमध्ये त्याचा पाठपुरावा करून, त्याची प्रमाणपत्रे खोटी असल्याची खात्री करून व शेवटी त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करून त्याला पायउतार होण्यास भाग पाडले. अवतारी महापुरूष केजरीवाल यांचे भक्कम पाठबळ असूनसुद्धा तोमरला जावे लागले.

तुम्हीही नुसते आरोप करण्यापेक्षा हा मार्ग अवलंबिला तर योग्य होईल.

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 3:36 pm | कपिलमुनी

दुवा १

दुवा २

स्मृती इराणीं यांना अटक झाली नाही आणि त्यांनी राजीनामा सुद्धा दिला नाही.
यालाच बायस्ड राजकारण असे म्हणतात.

( जमल्यास दुवे पूर्ण वाचा)

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2015 - 11:22 pm | श्रीगुरुजी

तोमर व इराणी यांच्या केसमध्ये थोडा फरक आहे. दोघांनीही पदवी प्रमाणपत्राबद्दल खोटे प्रतिज्ञापत्र दिले असा आरोप आहे. परंतु मुख्य फरक असा की इराणी यांनी निवडणुक आयोगाकडे निवडणुक उमेदवारीचा अर्ज भरताना पदवीबद्दलचे प्रतिज्ञापत्र दिले तर तोमर यांनी निवडणुक आयोगाप्रमाणे बार कौन्सिलकडे देखील एल एल बी बद्दलचे प्रमाणपत्र देऊन त्यावर सनद मिळविली व ४ वर्षे वकीली केली. पदवीचे खोटे प्रमाणपत्र व्यावसायिक उपयोगाकरीता वापरले यासाठी प्रत्यक्ष बार कौन्सिलनेच त्यांच्याविरूद्ध तक्रार केली होती व आठवड्यांपूर्वीच न्यायालयाने त्यांच्याविरूद्ध पोलिस कारवाईचे आदेश दिले होते. काल त्यांना अटक झाल्यावर न्यायालयाने त्यांना जामीन न देता पोलिस कोठडीत ठेवले यावरून त्यांची अटक कायदेशीर होती असे दिसत आहे.

इराणींनी निवडणुक आयोगाला पदवीबद्दल खोटे प्रमाणपत्र दिल्याविरूद्ध अहमर खान नावाच्या व्यक्तीने न्यायालयात दावा दाखल केला आहे व त्याचा निकाल २ आठवड्यांनी २४ जूनला आहे. इराणींनी आपल्या नसलेल्या पदवीचा व्यावसायिक उपयोग केलेला दिसत नाही. म्हणूनच त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी व त्यांना अटक करावी असे आदेश न्यायालयाने दिले नसावेत.

इराणी यांच्याविरूद्ध निवडणुक आयोगाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे तर तोमर यांच्याविरूद्ध पदव्यांची बनावट प्रमाणपत्रे व गुणपत्रिका तयार करणे व त्यांचा व्यावसायिक उपयोग करणे हे जास्त गंभीर आरोप आहेत.

एनीवे, इराणी केसचा निकाल २४ जूनला लागेलच. बहुतेक त्यांनाही पायउतार व्हावे लागणार असं वाटतंय.

काळा पहाड's picture

10 Jun 2015 - 3:25 pm | काळा पहाड

४ महिने तोमरचे समर्थन करून काल दिवसभर तमाशा करणार्‍या आआपच्या लबाड नेत्यांना हीच अक्कल आधी का आली नाही?

कारण तोमर कडे त्याच्या प्रभागातील एक मोठी व्होट बँक आहे. दुसरं म्हणजे तो आप चा मोठ्ठा देणगीदार आहे. बाकी मनीष शिसोदियांनी ज्या पद्धतीनं धमकी दिली ती पहाता आप मध्ये सगळे असेच आहेत का हा प्रश्न निर्माण होतो: https://www.youtube.com/watch?v=ltRM28_E6bY

सतीश कुडतरकर's picture

10 Jun 2015 - 2:44 pm | सतीश कुडतरकर

बबन लोणीकर (भाजप) - मंत्री महाराष्ट्र

आधीच्या अ‍ॅफिडेवीट मध्ये पदवीधर असल्याचे सांगितले होते आणि नंतरच्या अ‍ॅफिडेवीट मध्ये पाचवी पास म्हणून दिलंय.

मंत्र्याला आपण किती शिकलेलो आहोत याबद्दलच शंका!

कधी कारवाई होतेय ते पाहायचं!

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 3:18 pm | कपिलमुनी

इथे पण तुमच्या पक्षाची बाजू मांडा

सतीश कुडतरकर's picture

10 Jun 2015 - 4:43 pm | सतीश कुडतरकर

आमचा पक्ष होता, अगदी सक्रिय कार्यकर्ते होतो, 'आदेश' आला कि थेट action. पण दिघेसाहेबांचा 'अपघाती' मृत्यू झाला आणि आमचा राजकीय. अपेक्षाभंग झाल्याने आता सोडचिठ्ठी दिलेली आहे. अस म्हणतात वय वाढत गेल्यावर माणूस थोडा प्रगल्भ होतो आणि खऱ्याखोट्याची समजही यायला लागते. तसच आमचही समजा.

कॉंग्रेसला तर कधीच पाठींबा नव्हता. भाजपला थोडा होता, पण 'गंगाधरहि शक्तिमान है' हे पुरेपूर कळून चुकल्यामुळे त्यांच्या डबल ढोलकी राजकारणाला विरोधच करणार.

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 5:08 pm | कपिलमुनी

तो प्रतिसाद श्रीगुरुजी यांना होता

सतीश कुडतरकर's picture

11 Jun 2015 - 10:58 am | सतीश कुडतरकर

जाउदे मळमळ कुठेतरी बाहेर काढायची होती, तुम्ही निमित्तमात्र झालात. :-)

कपिलमुनी's picture

11 Jun 2015 - 1:00 am | कपिलमुनी

हा प्रश्न हुशारीने स्कीप केला गेला आहे

होबासराव's picture

10 Jun 2015 - 2:47 pm | होबासराव

ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत.

भविष्यात कुणी राजकारणी असा फ्रॉड करायचा विचारसुद्धा करणार नाही ह्या करता पक्षिय राजकारण बाजुला ठेवुन अशा तर्हेच्या समस्या हँडल केल्या जाव्या असे वाटते. फसवणारी व्यक्ति मग ति कुठल्या हि पक्षाचि असो, झटपट ट्रायल आणि निकाल हवा. राहता राहीला प्रश्ण कांगावखोर पणाचा तर आता त्याने काहिहि होणार नाहि.
"तोमरला मारहाण करून जबरदस्तीने त्याच्याकडून खोटा कबुलीजबाब पोलिसांनी लिहून घेतला असे तारस्वरात आशुतोष किंचाळत होता" ... हा इतका वरिष्ठ पत्रकार असुन जर ह्याला पोलिस कोठडि चा अर्थ माहित नसेल तर त्याला आपण इतके सिरियसलि घ्यायचि गरज नाही. तसेहि रडण्याची नौटंकि करुन त्यान आपल ह्स करुन घेतलय.

काळा पहाड's picture

10 Jun 2015 - 3:46 pm | काळा पहाड

काय हालत करून टाकलीय. दिल्ली सरकार कडे सॅलरी देण्यासाठी पैसा नाही आणि अशा वेळी खरं म्हणजे केंद्र सरकारशी जुळवून घ्यायचं सोडून केजरीवाल नगरपालिकांना सांगतायत की केंद्राकडे पैसे मागा. Politics is the art of the impossible असं असताना ते सोडून यांना धरणं, आंदोलनं यातच रस. जुने राजकारणीच बरे वाटायला लागलेत. खरं सांगायचं तर चक्क शीला दिक्षीत या माणसापेक्षा बरी वाटायला लागलीय.

http://www.firstpost.com/india/garbage-wars-delhi-kejriwal-blinks-doles-...

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 4:06 pm | कपिलमुनी

शीला दिक्षीतच्या वेळेस केंद्रामध्ये पण काँग्रेसचे सरकार होते . आणि मेट्रो प्रकल्प हे शीला दिक्षित सरकारचे मोठे यश आहे.
बाकी केजरीवालने केंद्र सरकर सोबत जुळवून घ्यायला पाहिजे होता. २-३ वर्षांनी ३ राज्यसभेच्या सीट्स मिळाल्यावर त्याचा वापर सुद्धा करता आला असता. शेवटी राजकारण हे तडजोडीवर चालता .

चिंतामणी's picture

23 Dec 2015 - 6:54 pm | चिंतामणी

मेट्रो प्रकल्प हे शीला दिक्षित सरकारचे मोठे यश आहे.

भाजप विरोधाची ही परिसीमा आहे.
अनेक वर्षे आणि अनेक लोकांच्या परिश्रामाचे यश आहे.

Physical construction work on the Delhi Metro started on 1 October 1998. After the previous problems experienced by the Kolkata Metro, which was badly delayed and 12 times over budget due to "political meddling, technical problems and bureaucratic delays", DMRC is a special purpose organisation vested with great autonomy and powers to execute this gigantic project involving many technical complexities, under a difficult urban environment and within a very limited time frame. DMRC was given full powers to hire people, decide on tenders and control funds. The DMRC then consulted the Hong Kong MTRC on rapid transit operation and construction techniques. As a result, construction proceeded smoothly, except for one major disagreement in 2000, where the Ministry of Railways forced the system to use broad gauge despite the DMRC's preference for standard gauge.

The first line of the Delhi Metro was inaugurated by Atal Bihari Vajpayee, the Prime Minister of India, on 24 December 2002 and thus, it became the second underground rapid transit system in India, after the Kolkata Metro. The first phase of the project was completed in 2006, on budget and almost three years ahead of schedule, an achievement described by Business Week as "nothing short of a miracle".

होबासराव's picture

10 Jun 2015 - 4:35 pm | होबासराव

मुनिवर्यांशी सहमत. प्रत्येक गोष्ट आपल्या ईगो वर नेउन, बाकि सगळ्या पक्षांशी वैयक्तिक शत्रुत्व असल्यासारखे वातावरण निर्माण करुन, आपले तेच बरोबर नाहि तर सगळे भ्रष्टाचारि एक झालेयत वगैरे ने केलेल्या घोषणा पुर्ण करणे तर दुरच पण ह्या सगळ्या पोरखेळात सरकार चालवणे मुष्किल होइल.

होबासराव's picture

10 Jun 2015 - 4:37 pm | होबासराव

म्हणजे ज्या कामासाठि जनतेने निवडुन दिलय तो कारभार करणे वेळेअभावि मुष्किल होइल

होबासराव's picture

10 Jun 2015 - 4:47 pm | होबासराव

माणूस थोडा प्रगल्भ होतो आणि खऱ्याखोट्याची समजही यायला लागते. तसच आमचही समजा
सेम हिअर

नांदेडीअन's picture

10 Jun 2015 - 4:58 pm | नांदेडीअन

साधारण २-३ महिन्यांपूर्वी मी CCTV चे काम कुठवर आले यासंदर्भात एक पोस्ट टाकली होती.
सगळीकडे काम सुरू आहे CCTV लावायचे.
त्या अल्बमची लिंक देतो परत.
http://imgur.com/a/EJkub
अजून काही माहिती हवी असेल तर आपच्या आमदारांचे Twitter हॅंडल फॉलो करा.

स्मार्ट सिटीबद्दल वैंकय्या नायडू यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केले होते.

We have not launched the scheme yet.
So there is no question of any expenditure on that account.

१२ मे २०१५ ला Ministry of Urban Devl. ने माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले की १०० शहरांची आमच्याकडे अजून कोणतीही माहिती नाही.

http://www.jantakareporter.com/india/rti-reply-poses-serious-questions-t...

या लिंकवर जाऊन ती RTI कॉपी पाहू शकता तुम्ही.
आणि स्मार्ट सिटीजचा काय घोळ सुरू आहे हेसुद्धा वाचा.

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 5:13 pm | कपिलमुनी

RTIimage

वरील उत्तरात काय वावगं आहे हे जर सांगाल का ? माहिती उपलब्ध नसताना किंवा वरून तसे काही आदेश नसताना ,"अहो रोशन भाऊ काय सांगू ,लय जोरात सुरु आहे स्मार्ट सिट्या बांधणं..५० बांधून झाल्या बघा" असं उत्तर अपेक्षित होतं का ?
स्मार्ट सिटी हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याचा आराखडा इतक्या लवकर तयार होण्याची अपेक्षा करणं हास्यास्पद आहे.

स्मार्ट सिटीकरिता लागणाऱ्या पायाभूत सुविधा संबंधित काम सुरु झाले आहे. माझ्या कंपनीत आणि आमच्या क्षेत्रातल्या इतर कंपनीत याबाबतीत सरकारच्या एका संस्थेकडून विचारणा झाली आहे. याबाबतीत अधिक माहिती मिळाल्यास कळवतो.

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 5:41 pm | कपिलमुनी

किती बजेट अलोकेट केला आहे एव्ढा तरी सांगू शकतात. )जे विचारला आहे)

चिनार's picture

10 Jun 2015 - 5:46 pm | चिनार

"budget allocation for each city " असा प्रश्न विचारलाय बहुतेक. बजेट प्रत्येक शहरासाठी वेगवेगळा सौ शकतं. ज्याचा तपशील इतक्या लवकर उपलब्ध होणार नाही.
अर्थात स्मार्ट सिटी म्हणजे नेमकं काय ? त्याचं स्वरूप काय ? हे सरकारने जाहीर करावे असे मला मनोमन वाटते.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2015 - 11:28 pm | श्रीगुरुजी

>>> सगळीकडे काम सुरू आहे CCTV लावायचे.

CCTV चं काम खरंच सुरू झालेलं दिसतंय. CCTV खरेदीत आआपच्या राखी बिडलांनी घोटाळा केल्याचा आरोप होतोय.

http://hindi.oneindia.com/news/new-delhi/aap-mla-rakhi-birla-is-involved...

काळा पहाड's picture

11 Jun 2015 - 2:54 pm | काळा पहाड

प्रश्न असा आहे, की १६,००,०००/(३६५*५)=८७६. म्हणजे १०० दिवसात ८७६०० कॅमेरे बसवले जायला पाहिजेत. की एक वर्षात ३.५ लाख कॅमेरे बसवणार आहेत? कॅमेरे बसवण्याची ऑडिटींग माईलस्टोन कधी आहे? बाकी खालील गोष्टींचं कॅल्क्युलेशन केलंच असेल म्हणा त्यांनी.
१) १६ लाख कॅमेर्‍यांचं फीड घ्यायला गेलाबाजार ४ लाख एल.सी.डी. स्क्रीन्स (एका स्क्रीन मध्ये ४ कॅमेर्‍यांचं फीड)
२) डेटा स्टोअर करायला १.६ लाख हार्ड डिस्क्स (एका हार्ड डिस्क मध्ये १० कॅमेर्‍यांचं स्टोअरींग)
३) मेन्टेनन्स साठी १६०० लोकांची टीम (१००० कॅमेर्‍यांसाठी १ माणूस)
४) या स्क्रीन्स वर लक्ष ठेवायला १ लाख लोक (एक माणूस १६ कॅमेरा फीड्स वर रियल टाईम लक्ष ठेवू शकेल)
५) डेटा बॅकअप घेण्यासाठी बॅकअप डिस्क्स
इत्यादी इत्यादी.

मृत्युन्जय's picture

11 Jun 2015 - 3:47 pm | मृत्युन्जय

१. पाच वर्षात १६ लाख कॅमेरे बसवण्याचे उद्दिष्ट असेल तर रोज सकाळी उठुन "मग किती बसवले क्यामेरे?" हा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. हे म्हणजे मोदी सरकारला रोज सकाळी उठुन "मग किती रुपयांनी कमी झाली महागई असे विचारण्ण्यासारखे झाले. प्रत्य्येक गोष्टीची एक प्रोसेस असते. ती प्रोसेस पुर्ण केली की एंड प्रॉडक्ट निघते, शिवाय सरकार जर १६ लाख क्यामेर्‍यांचे डील करत असेल तर ते रोज बाजारात जौन ८७६ क्यामेरे आणतील आणि बसवतील असे तर घडणे शक्यच नाही. एक निगोशियेटेड प्राइस ठरवली जाइल आणी त्याप्रमाणे कंत्राटे दिली जातील. त्याशिवाय जिथे कॅमेरे बसवणार आहे त्या जागेची पाहणी, तंत्रज्ञांचे नियोजन या सगळ्या गोष्टी लक्षात घेता त्यासाठीदेखील काही काळ जाइल आणि मगच प्रत्यक्ष इंस्टॉलेशन सुरु होइल. या सगळ्या प्रकाराला किती वेळ लागेल ते सांगता येत नाही. अतिकार्यक्षम युगपुरुषांकडुन कदाचित हे कार्य एव्हाना सुरु व्हायला हवे होते. पण ते वेगळ्या कार्यात गुंतले आहेत असे मान्य करुन त्यांना किमान २ वर्षे तरी द्यायला हवीत.

२. मोठे एलसीडी घेतले तर एकामध्ये साधारण २५ कॅमेर्‍यांचे फीड यायला हवे. अश्याप्रकारे या कामासाठी ६०००० स्क्रीन्स पुरतील. शिवाय् केजरीवाल सरकारने लाइव्ह मॉनिटरिंगचे आश्वासन दिलेले नाही. म्हणजेच्ज प्रत्येक कॅमेर्‍याचे लाइव्ह फीडिंग स्क्रीनवर दिसणे अपेक्षित नाही. याचाच दुसरा अर्थ असा की कमी स्क्रीन्स पुरतील. नक्की किती ठिकाणचे लाइव्ह मॉनिटरिंग करायचे हे ठरले की स्क्रीन्सचा आकडा फायनल होइल.

३. डेटा मेमरी व्हिडीयो रिझोल्युशन वर अवलंबुन असेल तरीही इतके नक्की सांगु शकतो की १६ लाख कॅमेर्‍यांचा एका महिन्याचा डेटा साठवण्यासाठी जितका खर्च येइल त्यासाठी केजरीवालांना पाणी आणी वीजच काय कपडे घालणे, बायकोचा हात हातात घेणे, बघणे, ऐकणे, श्वास घेणे या सगळ्यावर भरभक्कम टॅक्स लावायला लागेल. अर्थात केंद्रात मोदी असतील तर त्यांनी पैसे दिले नाहित म्हणुन हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुर्णत्वास नेता आला नाही अश्या बोंबा माराव्या लागतील. अर्थात अ‍ॅज आय सेड, केजरीवालांना किमान २ वर्षे तरी वेळ द्यावा लागेल. जर त्यांनी ही गोष्ट करुन दाखवली आणि यशस्वीपणे राबवुन दाखवली तर त्यांना तहहयात भारताचा पंतप्रधान करुन टाकावे अशी सूचना करतो.

४. मेंटेनन्ससाठी १००० लोकांची टीम हे अनुमान मात्र योग्य वाटते. कदाचित अधिकच लोक लागतील.

५. लाइव्ह मॉनिटरिंग सगळ्या कॅमेर्‍यांचे करायची गरज नसल्याने अर्थात १ लाख लोकांची गरज नाही पडायची.

काळा पहाड's picture

11 Jun 2015 - 4:44 pm | काळा पहाड

इथे थोडंसं अ‍ॅनॅलिसीस आहे: http://www.quora.com/How-will-AAP-install-15-lakh-CCTV-cameras-in-Delhi

लाइव्ह मॉनिटरिंग सगळ्या कॅमेर्‍यांचे करायची गरज नसल्याने अर्थात १ लाख लोकांची गरज नाही पडायची.

थोडक्यात, गुन्हा झाल्यानंतर शोधण्यासाठी याचा उपयोग होईल. गुन्हा रोखायला नाही.

चिनार's picture

11 Jun 2015 - 3:58 pm | चिनार

१६००००० की १५०००० ?
दीड लाख बसवणार असा ऐकला होतं

मृत्युन्जय's picture

11 Jun 2015 - 5:26 pm | मृत्युन्जय

प्रॉमिस दहा ते पंधरा लाखांचे होते. दीड लाख पहिल्या फेज मध्ये बसवणार आहेत.

तसा आपचा एक प्रयत्न करुन झाला असे काही प्रॉमिस दिले नव्हते म्हणुन. संजय सिंग तसे म्हणाले एकदा. पण ते अंगलट आल्यावर त्या फेकुगिरीबद्दल तरी शांतता आहे अजुन. युगपुरुषांनी मी असे कधी म्हटलोच नव्हतो असे अजुनतरी म्हटलेले नाही.

याशिवाय एक प्रॉमिस अजुन केले होते. ते पुर्ण करायला हरकत नव्हती आत्तापावेतो. पण ठीक आहे. त्यासाठी देखील त्यांना थोडा वेळ देउयात. ते प्रॉमिस होते प्रत्येक सिटी बसमध्ये एक सुरक्षारक्षक पुरवण्याचा. दिल्लीत साधारण ३००० सिटी बसेस आहेत. बस मध्ये सुरक्षारक्षक देणार म्हणजे मेट्रो मध्येही देणार असावेत. प्रत्येक मेट्रो मागे एक म्हटले तर साधारण २०० सुरक्षारक्षक लागतील + ३००० बसेस. म्हणजे ३२०० सुरक्षारक्षक झाले. हे दिवसातुन १८ तास चालणार म्हणजे २ शिफ्ट म्हणजे ६४०० सुरक्षारक्षक हवेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अजुन १०० लोक पकडा. साधारण ८००० रुपये प्रत्येकी वेतन धरल्यास हा आकडा साधारण ५२ कोटींचा होतो. केजरीवाल सरकार हा खर्च लोकांसाठी करायला तयार असल्यास ही नक्कीच स्वागतार्हे गोष्ट आहे. पण अजुनतरी या योजनेवर पुढे काही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही.

केजरीवालांनी सांगितले होते की सुरक्षारक्षकांमुळे लवकरच रेप केसेस बंद होतील. अजुन सुरक्षारक्षक तैनात केले गेले नसल्याने तसे काही झालेले दिसत नाही. २०१४ मध्ये दिल्लीत एकुण २०६९ बलात्काराचे गुन्हे झाले होते. २०१५ च्या पहिल्या ४ महिन्यात एकुण ६२१ गुन्हे दाखल झाले आहेत. याचा अर्थ वार्षिक सरासरी १८६० होइल. अर्थात हे २०१४ च्या तुलनेत कमीच असतील. मात्र विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसुन येते. २०१४ मध्ये एकुण ४३२५ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. तर २०१५ च्या पहिल्या ४ महिन्यात १४७४ गुन्न्हे दाखल झाले आहेत म्हणजे वर्षाची सरासरी ४४२० होइल.

केजरीवाल यांनी राजकारणात येण्याआधीच अनेकांशी शत्रुत्व पत्करले होते. असे करण्यास काहीच हरकत नाही पण ते शत्रुत्व निभवतासुद्धा आले पाहिजे. थयथयाट करणे म्हणजे राजकारण नव्हे. राजकीय शत्रूंना राजकारणानेच संपवावे लागते.
१. शरद पवार आणि स्व. बाळासाहेब ठाकरे हे एकमेकांचे राजकीय शत्रू होते पण त्यांनी कधीच एकमेकांवर वैयत्तीक पातळीवर जाऊन चिखलफेक केली नाही (आणि आता बाळासाहेबांचे दोन्ही वंशज तीच चूक करत आहे )
२. स्व. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांचे राजकीय वैर सगळ्यांना माहिती आहे. गोपीनाथरावांनी राष्ट्रवादी आणि कोन्ग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने भुजबळांना तेलगी प्रकरणात अडकविले. यामुळे भुजबळ यांची कारकीर्द जवळजवळ संपली होती. वास्तविक तेलगी प्रकरणात सर्व पक्षातले बडे बडे नेते फसले असते. पण फसले ते केवळ भुजबळ !
कोणी विकासाचे राजकारण जर खरच करत असेल तर तर जनतेच्या ते लक्षात आल्याशिवाय राहत नाही. केजरीवाल यांच्या कडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. त्यांनी दिल्लीचा विकास करावा. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी न झेपणारे आणि बालिश पद्धतीचे राजकारण करू नये. प्रत्येक वेळी त्यांच्या अश्या बालिश राजकारणाने जनता त्रस्त होते आहे.
१. गजेंद्र सिंगच्या प्रकरणात आप दोषी असो किंवा नसो पण त्यांनतर केलेले तमाशे असमर्थनीय होते. यांचे नक्राश्रू न ओळखण्याएवढी जनता मूर्ख नाही.
२. नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार संविधानाने ठरवून दिलेले आहेत. त्यात संधीग्नता असल्यास हे प्रकरण चर्चेने आणि सामंजस्याने सोडवता आले असते. थयठयाट करण्याची अजिबात गरज नव्हती. जनतेने प्रचंड बहुमत दिले म्हणून संविधान हातात आल्यासारखे वागणे मुख्यमंत्री महोदयांना शोभत नाही.
३. तोमर दोषी आहेत की नाही हे कोर्ट ठरवेल. पण तोमर यांना पोलिसांनी मारहाण केली आणि जबाब नोदान्वून घेतला असे बाळबोध आरोप करणे म्हणजे मूर्खपणा आहे.

आतातरी या असल्या गोष्टी थांबवून कामाला सुरवात करावी.

कपिलमुनी's picture

10 Jun 2015 - 5:22 pm | कपिलमुनी

केजरीवाल यांनी कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसताना जे यश मिळवला ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
कोणी राजकीय विश्लेषक काहीही म्हणोत, ये पब्लिक सब जानती है ! म्हणूनच लोकांनी लोकसभेला भाजपा आणि राज्यात आप निवडून दिले .

आता मात्र केजरीवाल यांनी मॅच्युरीटीने काम केले पाहिजे. ते योग्य काम करत असतील तर जनता पुन्हा निवडून देइलच मग कोणी कसाही प्रचार करोत. सतत वादविवादामुळे चांगले काम मागे पडते .
मोदींचीही गत काहीशी अशीच झाली आहे. साक्षी महाराज व इतर हिंदुत्ववादी नेत्यांच्या उथळ वक्तव्यामुळे व स्वतःच्या प्रचारकी थाटामुळे मूळ मुद्दे बाजूला पडत आहेत.
प्रत्यक्षात दोन्ही बाजूंचे लिंकाळे आपापले नेते , पक्ष काम करत आहेत असे लिंका देउन देउन सांगत आहेत पण इथे बसून आम्हाला फक्त केजरीवालचे वाद विवाद आणि मोदींची प्रचारकी भाषणे दिसत आहेत.

असो. तूर डाळ १०० ओलांडून गेली एव्ढाच आमचा प्रश्न :)

सतीश कुडतरकर's picture

11 Jun 2015 - 10:56 am | सतीश कुडतरकर

पटेश!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Jun 2015 - 5:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

शरद पवार आणि स्व. बाळासाहेब ठाकरे हे एकमेकांचे राजकीय शत्रू होते पण त्यांनी कधीच एकमेकांवर वैयत्तीक पातळीवर जाऊन चिखलफेक केली नाही

चिखल्फेक एकतर्फी होती. मैद्याचे पोते,दाउदशी मैत्री ...हे सगळे कोणी म्हंटले? असो. खाजगीत मात्र हे दोघेही मित्र होते हे वाचले होते.
स्व. गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांचे राजकीय वैर सगळ्यांना माहिती आहे. गोपीनाथरावांनी राष्ट्रवादी आणि कोन्ग्रेसच्याच वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने भुजबळांना तेलगी प्रकरणात अडकविले
हे मात्र खरे. मुंडेंचे भाजपापेक्षा कॉन्ग्रेसमध्ये संबंध अधिक चांगले होते असे म्हंटले जायचे.

अगदि असेच म्हणणार होतो

होबासराव's picture

10 Jun 2015 - 5:37 pm | होबासराव

गोपीनाथ मुंडे माणुसच असा होता कि त्याचे सगळ्या पक्षातल्या लोकांबरोबर चांगले संबध होते, तसाच राजकिय द्रुष्ट्या परिपक्व माणुस विलासराव देशमुख.

होबासराव's picture

10 Jun 2015 - 7:15 pm | होबासराव

"AAP Lawmaker Somnath Bharti's Wife Files Complaint of 'Domestic Violence, Mental Torture"
हे घ्या, आणि हे स्त्रियांच्या सुक्षेबाबत बाता हाणत होते. आपण ह्यावेळेस तरी आशा करुया कि निदान ह्याचे खापर तरी केंद्र सरकार वर येणार नाही.

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2015 - 11:40 pm | श्रीगुरुजी

http://indiatoday.intoday.in/story/aap-somnath-bharti-wife-domestic-abus...

सोमनाथ भारती केजरीवालांच्या पहिल्या इनिंगमध्ये कायदामंत्री होते आणि तोमर आताच्या इनिंगमध्ये. एकंदरीत केजरीवालांच्या मंत्रीमंडलातल्या कायदा मंत्र्यांचं काही खरं दिसत नाही. आता कपिल मिश्रा कायदामंत्री झालेत. बघूया त्यांचं काय होतंय ते.

स्पार्टाकस's picture

11 Jun 2015 - 6:35 am | स्पार्टाकस

लेख आवडला.

ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याची लायकी नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला तर कशी वाट लागू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे केजरीवाल सरकार म्हणता येईल.

रच्याकने,
मायबोलीवरील केजरीवाल भजन मंडळाचा धागा कोणी वाचला आहे काय? भरपूर करमणूक आहे त्यात!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2015 - 11:37 am | डॉ सुहास म्हात्रे

त्या धाग्याचा दुवा इथे देऊ शकाल का ?

सतीश कुडतरकर's picture

11 Jun 2015 - 11:48 am | सतीश कुडतरकर

http://www.maayboli.com/node/53007

हा पण दुवा पाहून घ्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2015 - 11:52 am | डॉ सुहास म्हात्रे

हा दुवा नाही "केजरीवाल भजन मंडळ" चा दुवा हवा होता !

स्पार्टाकस's picture

11 Jun 2015 - 12:36 pm | स्पार्टाकस

हा तो दुवा - http://www.maayboli.com/node/52730

होबासराव's picture

11 Jun 2015 - 2:47 pm | होबासराव

वेलकम बॅक

कपिलमुनी's picture

11 Jun 2015 - 12:32 pm | कपिलमुनी

ह्याविषयी भरपूर चर्चा झालेली आहे.
पुन्हा तो विषय इथे मांडण्याचे प्रयोजन काय ?

सतीश कुडतरकर's picture

11 Jun 2015 - 5:31 pm | सतीश कुडतरकर

इथे देण्याचे कारण त्यांनी वापरलेली भाषा.

मृत्युन्जय's picture

11 Jun 2015 - 11:55 am | मृत्युन्जय

तुला परत बघुन आनंद झाला. लिहिता हो परत. व्यालकम ब्याक

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2015 - 12:51 pm | श्रीगुरुजी

>>> ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याची लायकी नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला तर कशी वाट लागू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे केजरीवाल सरकार म्हणता येईल.

ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याची लायकी नसलेला माणूस भूतकाळात एकदा भारताचा पंतप्रधान झाला होता.

स्पार्टाकस's picture

11 Jun 2015 - 12:56 pm | स्पार्टाकस

देवेगौडा, गुजराल का चंद्रशेखर?

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2015 - 1:20 pm | श्रीगुरुजी

यापैकीच १. ओळखा. उत्तर अगदी सोपे आहे.

कपिलमुनी's picture

11 Jun 2015 - 2:43 pm | कपिलमुनी

सोसायटीचे सेक्रेटरी होण्याची पात्रता नसलेले डायरेक्ट भारताच्या माजी पंतप्रधानांची लायकी काढतात.
आणि काहींना इतर धाग्यावर मोदींचा एकेरी उल्लेख चालत नाही.

मिपावरची एक जुनी स्वाक्षरी आठवली !
अरे तुझा पगार किती तु बोलतो किती

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2015 - 8:31 pm | श्रीगुरुजी

>>> सोसायटीचे सेक्रेटरी होण्याची पात्रता नसलेले डायरेक्ट भारताच्या माजी पंतप्रधानांची लायकी काढतात.
आणि काहींना इतर धाग्यावर मोदींचा एकेरी उल्लेख चालत नाही.

म्हणजे सोसायटीचा सेक्रेटरी होण्याची किमान पात्रता असलेल्यांनी डायरेक्ट भारताच्या माजी पंतप्रधानांची लायकी काढली तर चालेल!

बादवे, सोसायटीचा सेक्रेटरी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत निवडणुकीला उभा राहून सभासदांच्या मतांवर निवडून आलेला असतो. तो सोसायटीचा अनेक वर्षे रहिवासी असल्याचा खोटा दाखला देऊन, निवडणुकीला उभे रहायचे टाळून मतदारांना सामोरे न जाता सेक्रेटरी झालेला नसतो.

जेव्हा माजी पंतप्रधान देशहिताचा विचार करण्याऐवजी आपल्या बॉसच्याच हिताचा विचार करतात, आपल्या डोळ्यांदेखत लुटारूंना मोकळे रान देतात, त्यांना बिनदिक्कत देशाची लूट करून देतात, देशाची लूट होत असताना स्थितप्रज्ञपणे बसून राहून लुटारूंकडे दुर्लक्ष करतात आणि लुटारूंचे समर्थन करतात, तेव्हा सोसायटीचे सेक्रेटरी होण्याची पात्रता असलेल्या व नसलेल्यांना त्यांच्यावर टीका करण्याचा पूर्ण हक्क आहे.

काळा पहाड's picture

11 Jun 2015 - 9:16 pm | काळा पहाड

आणि फक्त तेवढंच नव्हे, तर जेव्हा हवं तेव्हा त्यांना कंठ सुद्धा फुटतो ("हजारों जवाबों से अच्छी मेरी खामोशी", "पैसे पेड़ पर नहीं उगते", "राहुल गांधी के लिए कुर्सी खाली करने को तैयार हूं", "मैं एक खुली किताब हूं"). बाकी वेळी आळी मिळी गुप चिळी.

सतीश कुडतरकर's picture

11 Jun 2015 - 11:32 am | सतीश कुडतरकर

२००४ आणि २००९ च्या निवडणुकीसाठी प्रतिज्ञापत्र सादर करताना मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील बीएच्या पात्रता परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी मी लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातून ही पात्रता परीक्षा उत्तीर्णही झालो होतो. त्यानंतर मला बीएच्या अभ्यासक्रमासाठी रितसर प्रवेशही मिळाला. मात्र, त्यानंतर काही कारणास्तव मी बीएच्या परीक्षेत पास होऊ शकलो नाही. मी २०१४ साली निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माझ्या मुळ शिक्षणाचा म्हणजे पाचवी पास असल्याचा उल्लेख केला. यासंबंधी काहीजणांचा गैरसमज झाला असून मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटून हे गैरसमज दूर करण्यास तयार आहे. - बबनराव लोणीकर>>>>>>>

बीए ची परीक्षा दिली म्हणजे आपण पदवीधर समजले जातो का???? नापास होऊन सुद्धा प्रतिज्ञापत्रात पदवीधर असल्याचे खोटेच नमूद केले. वरील स्व-कथनात या मंत्र्यांनी स्वतःच गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. आणि मंत्रीसाहेब सर्वाना वैयक्तिकरीत्या भेटून लोकांचे गैरसमज दूर करणार आहेत. मुख्यमंत्री कधी कारवाई करणार आहेत कि आपल्याच सरकारची आणखी बेअब्रू होण्याची वाट पाहतायेत.

http://www.loksatta.com/mumbai-news/fake-degree-row-bjp-mla-babanrao-lon...

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2015 - 8:51 pm | श्रीगुरुजी

लोणीकरांच्या केसमध्ये फारसा दम वाटत नाही. मुक्त विद्यापीठात प्रवेश घेताना अमुक एक इयत्ता पास झालीच पाहिजे अश्या अटी नसतात. १२ वी पास नसताना सुद्धा (खरं तर १० वी पास नसताना सुद्धा) मुक्त विद्यापीठात बी.ए. च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळू शकतो. मुक्त विद्यापीठ हे आपल्या आवडीचा कोणताही विषय कोणत्याही अटीविना शिकण्याची संधी मिळण्याची संस्था आहे. त्यामुळे ५ वी पास असूनसुद्धा मुक्त विद्यापीठात लोणीकरांना बी. ए. च्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळणे शक्य आहे.

त्यांच्या स्पष्टीकरणानुसार त्यांचे शालेय शिक्षण ५ वी पास असले तरी त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी.ए. ला प्रवेश मिळाला होता. बीए चे प्रथम वर्ष पूर्ण केल्यावर त्यांना पुढे शिकणे जमलेले नाही. निवडणुक अर्जात त्यांनी पदवीधर आहे असे म्हटले नसून सुरवातीला आपण मुक्त विद्यापीठातून प्रथम वर्ष बीए पास होतो असे लिहिले होते व २०१४ च्या निवडणुकीत आपले शालेय शिक्षण ५ वी पास आहे असे लिहिले होते. दोन्हीत फरक आहे परंतु त्यांचे स्पष्टीकरण बरोबर वाटते.

लोणीकर व तोमर यांची तुलना होऊच शकत नाही. लोणीकरांच्या शालेय शिक्षण व मुक्त विद्यापीठातील शिक्षण इतकाच घोळ आहे पण तोमरांनी आपल्या अस्तित्वात नसलेल्या दोन्ही पदव्यांच्या बनावट गुणपत्रिका व बनावट पदवी प्रमाणपत्रे तयार करून वकीलीची सनद मिळवून वकीली करून बार कौन्सिल व आपल्या अशीलांची फसवणूक केली होती.

पिंपातला उंदीर's picture

13 Jun 2015 - 9:28 am | पिंपातला उंदीर

लोणीकर साहेब मोठे वस्ताद निघाले . डिग्री मध्ये घोळ आहेच पण बायका पण दोन आहेत . एकीची माहिती अर्थातच लपवली आहेत . या बातमीत लोणीकर यांच्याबद्दल सुरस किस्से वाचा . संस्कारी पक्ष , माय फुट

http://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-bjp-minister-in-trouble-...

नांदेडीअन's picture

13 Jun 2015 - 4:12 pm | नांदेडीअन

होय... मी बीए पास नाही! पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांची कबुली.
http://abpmajha.abplive.in/maharashtra/2015/06/13/article617564.ece/wate...

याला म्हणतात स्वाभिमानी माणूस !
चटकन खरे काय ते सांगून टाकले .

पण मी म्हणतो यांना असे स्वतःहून सांगायची काय गरज पडली ?
जी व्यक्ती भाजपामध्ये असते, ती बाय डिफॉल्ट सगळ्यात प्रामाणिक, एक नंबरची देशभक्त आणि जनतेच्या हितासाठी झगडणारीच असते.
एव्हढे सगळे चांगले गुण अंगी असतांना कशाला विनाकारण आपल्या डिग्रीबद्दल स्पष्टीकरण देत बसायचे ?
स्मृती इराणींकडून काही आदर्श घेतला नाही यांनी अजून.

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2015 - 8:37 pm | श्रीगुरुजी

आपण बी. ए. पास आहोत असा दावा लोणीकरांनी कधीच केला नव्हता. त्यांच्या अर्जात 'बी.ए.(प्रथम वर्ष) अ‍ॅपिअर्ड' इतकेच लिहिले होते, जे बरोबर होते.

याउलट तोमरांनी फक्त १२ वी पास असताना बी.एस्.सी. व एल.एल्.बी. च्या खोट्या गुणपत्रिका व खोटी पदवी प्रमाणपत्रे तयार करून आपण एल.एल.बी. असल्याचा बार कौन्सिलकडे दावा करून वकीलीची सनद मिळविली होती व काही वर्षे वकीली सुद्धा केली होती.

अर्थात ते आआपचे असल्याने आआपभक्तांना त्यात काहीच चुकीचे वाटणार नाही आणि लोणीकरांनी आपण बी.ए. आहोत असा दावा कधीही केला नसताना आपटार्डस् त्यांनी पदवीची खोटी माहिती दिली असा अपप्रचार करून तोमरप्रमाणेच त्यांनाही अटक करावी असा आग्रह धरणार.

सव्यसाची's picture

11 Jun 2015 - 1:30 pm | सव्यसाची

सध्या दिल्ली मध्ये जे काही चालले आहे ते खरेच दुर्दैवी आहे. केंद्र आणि दिल्ली सरकार मधील प्रश्नांचा निर्णय न्यायालय घेईलच.
परंतु ज्या गोष्टींवर केजरीवाल यांच्याकडे पूर्णपणे अधिकार आहेत त्याबाबत तरी त्यांनी त्यांचे काम सुरु करावे. यामध्ये खालील विषय आहेत.
१. शिक्षण
२. आरोग्य
३. वीज
४. पाणी
५. परिवहन
हे सर्व असे विषय आहेत जे सामान्य लोकांसाठी अधिक महत्वाचे आहेत. या विषयावरती दिल्ली सरकारने काम सुरु करून जश्या जश्या अडचणी येतील तसे तसे केंद्राकडून अधिकार मागावेत. जे आहे त्यात कितीतरी चांगल्या गोष्टी करून दाखवण्याची संधी दिल्ली सरकारला आहे. त्या गोष्टी त्यांनी कराव्यात एवढीच अपेक्षा दिल्लीकरांची असावी.

काळा पहाड's picture

11 Jun 2015 - 2:44 pm | काळा पहाड

ते करण्याची त्यांची इच्छा किंवा क्षमता असती तर त्यांनी सुरू केलंही असतं.
१. यांना काम करण्याची इच्छा नाही
२. लक्षात ठेवा, की नोकरशाहीला हाताळणं सोपं नसतं. नोकरशाहीला जर कळलं की तुम्ही पप्पू आहात तर तुम्हाला मामा बनवायला त्यांना वेळ लागत नाही. यांना काम करता येत नाही, नोकरशाहीला वेसण घालता येत नाही (आणि आता पोलीस, मनपा, नोकरशाही आणि गव्हर्नर या सर्वांना शिंगावर घेण्याचा प्रयत्न केल्यामुळं ते ही जीव तोडून काम करण्याची शक्यता नाही).
३. भरमसाठ आश्वासनं दिलेली आहेत, जी त्यांना बहुधा पूर्ण करता येणार नाहीत याची आता जाणीव झालेली आहे
४. आणि आता पूर्वीप्रमाणं राजीनामाही देता येत नाही.
त्यामुळं जबरदस्तीनं हुतात्मा होण्याचा प्रकार सुरू आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2015 - 8:57 pm | श्रीगुरुजी

>>> परंतु ज्या गोष्टींवर केजरीवाल यांच्याकडे पूर्णपणे अधिकार आहेत त्याबाबत तरी त्यांनी त्यांचे काम सुरु करावे. यामध्ये खालील विषय आहेत.
१. शिक्षण
२. आरोग्य
३. वीज
४. पाणी
५. परिवहन
हे सर्व असे विषय आहेत जे सामान्य लोकांसाठी अधिक महत्वाचे आहेत. या विषयावरती दिल्ली सरकारने काम सुरु करून जश्या जश्या अडचणी येतील तसे तसे केंद्राकडून अधिकार मागावेत. जे आहे त्यात कितीतरी चांगल्या गोष्टी करून दाखवण्याची संधी दिल्ली सरकारला आहे. त्या गोष्टी त्यांनी कराव्यात एवढीच अपेक्षा दिल्लीकरांची असावी.

+१

परंतु अंगी जन्मजात थिल्लरपणा, नाटकीपणा, हुकूमशाही वृत्ती आणि कमालीची अपरिपक्वता असल्याने, केजरीवाल हे करण्याची सुतराम शक्यता नाही.

आपला नाकर्तेपणा व अपयश झाकण्यासाठी आपला अधिकार नसलेल्या क्षेत्रात अतिक्रमण करून ते उपराज्यपाल, गृहमंत्रालय, केंद्र सरकार इ. बरोबर रोज भांडत बसतील व आपण या सर्वांच्या कारस्थानांचा बळी होत असल्याची बतावणी करीत राहतील.

विकास's picture

11 Jun 2015 - 10:23 pm | विकास

केजरीवाल यांचे वागणे पहाताना कायम "रडीचा डाव खडी" ही म्हण आठवते.

पण ते जाउंदेत... लोकायुक्त नियुक्तीचे काय झाले? आणि हो, शीला दिक्षित अजून तुरंगाच्या बाहेर आहेत का आत? म्हणजे त्यांच्यावर पण एके आरोपपत्र ठेवणार होते ना?

आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रू.१० लाख पर्यंत कर्ज योजना काढली. ती वरकरणी चांगली वाटली. असे काहीतरी नक्की असायला हवे असे देखील वाटले. पण त्यातील एक गोच अशी आहे, की हे कर्ज देताना कुठल्याही प्रकारचे तारण, हमी, वगैरे लागणार नाही. म्हणजे मोफत जनतेचा पैसा वाटण्याचे धंदे आहेत. त्यानिमित्ताने मुलं शिकली अथवा नाही शिकली तरी मिळालेल्या कर्जाला जागून किमान आप्टार्ड तरी होतील अशी आशा असावी झालं!