कामाचे बिनकामाचे छोटे मोठे प्रश्न आणि विचार - भाग १

arunjoshi123's picture
arunjoshi123 in काथ्याकूट
19 Nov 2014 - 3:04 pm
गाभा: 

मिपावर कितीतरी विषयांची उथळ/सखोल माहिती असलेले अनेक उत्साही सदस्य, सदस्या आहेत. एक सहसदस्य, सहसदस्या म्हणून त्यांना आपल्या एका मित्राला, मैत्रिणीला हलकी फुलकी माहितीची मदत पुरवायला आवडेल असा अंदाज आहे.
तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात. अश्या प्रश्नाचे उत्तर इतरांसही कामास येऊ शकते.

या व्यतिरिक्त, आपण बर्‍यापैकी मध्यम वर्गाच्या आसपासचे असल्याने, आपल्या मनात बरेच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, साहित्यिक, ऐतिहासिक, भौगोलिक, भाषिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, धार्मिक, मानववंशशास्त्रसंबंधित, उत्क्रांतीसंबंधित, इ इ अनेक प्रकारचे छोटे मोठे कामाचे वा बिनकामाचे १-२ ओळींचे विचार येतात. तितकी एक ओळ, विचार लिहिण्यासाठी धागा काढणे इष्ट वाटत नाही.

तेव्हा असे प्रश्न नि विचार इथे एकेका प्रतिसादाच्या रुपाने सदस्यांनी टाकावेत.

आता कोणी म्हणेल इंटरनेट, गुगल, विकिपिडिया असताना याची काही गरज नसावी. अर्थातच हे खरे आहे. याची ८०% गरज इंटरनेट भागवू शकते. पण तरीही खालील काही निरीक्षणे नोंदवतो.
१. इंटरनेटवर आपण मशिनला प्रश्न विचारत असतो. मशिन भाव पोचला आहे का हे बर्‍याचदा कळत नाही.
२. नेटवर आलेल्या शोधांना वाचून पाहून उर्जा कधी कधी इतकी घालावी लागते कि आपण ते कुतुहल "राहू देतो".
३. विकिपेडिया खूप छान आहे पण तो संज्ञा खूप वापरतो आणि अशा नव्या संज्ञांचे खूप सारे संदर्भ, लिंका देतो.
४. हवी असलेली माहिती जालावर नसू शकते. आपण सगले एकाच क्लोजली नीट मराठी संस्कृतीचे लोक असल्याने आपले क्लिशे ज्ञान पश्चिमाभिमुख जालावर कधीकधी नसू शकते.
५. उत्तर मिळत असताना जालाशी पुढे संवाद करता येत नाही. केल्यासही त्याला मिपीय संवादाचा फ्लेवर नसेल.

अजून एक - असे बरेचशे प्रश्न असतात कि ते गुगलसाठी नसतातच. अशा प्रकारचे प्रश्न नि विचार मिपासारख्या "परिचितांच्या" मधे मांडले कि, आमच्याकडच्या भाषेत, डोक्याची निचिंती होते.

सध्याला आपण या इनिशिएटिवबद्दल काय म्हणू इच्छिता ते सांगा वा आपले प्रश्न विचारा, विचार प्रकट करा वा इतरांचे प्रश्न उत्तरा वा विचारांवर भाष्य करा. आपल्या विचारावरचे एखादे थर्ड पार्टीचे सहमतीपूर्ण भाष्य पाहिले कि दिवस फार चांगला जातो असे जनरल निरीक्षण आहे.
-----------------------------
अर्थातच मिपा काय विचारले जात आहे, त्याचे काय उत्तर दिले जात आहे नि त्याधारित कृतींचा काय परिणाम होत आहे याला जबाबदार नसेल.

प्रतिक्रिया

अशा प्रकारचे प्रश्न नि विचार मिपासारख्या "परिचितांच्या" मधे मांडले कि, आमच्याकडच्या भाषेत, डोक्याची निचिंती होते.
आणि आमच्या डोक्याची मंडई होते

तुमी सोप्पे प्रश्न इचारा ना राव. शिवाय अवगड प्रस्न इचारायला बंदी घाला.

वेल्लाभट's picture

19 Nov 2014 - 3:20 pm | वेल्लाभट

ओह ! अजून एक... चांगलं आहे.
मिपा गूगल ला काँपीट करेल काही काळाने. 'सर्च इंजिन दॅट अन्डरस्टँड्स युवर एमोशन्स' अशी काहीशी टॅगलाईन घेऊन.

हवालदार's picture

19 Nov 2014 - 3:27 pm | हवालदार

१) गचान्डी धरणे म्हन्जे नक्की काय करणे?
२) बोम्बलत सुटणे याला आरोळ्या देत सुटणे यपेक्शा अजून काही अर्थ आहे का?

खरंच कि, गचान्डी शरीरात कुठे असते.

गचान्डी हा शरीराचा भाग नसावा बहुतेक.
माझ्यामते गचान्डी म्हणजे कॉलरला धरुन नेणे/पकडणे. कॉलर नसेल तर जे काही घातलंय त्या वस्त्राचा कॉलरजवळील भाग. जसे पोलिस एखाद्या चोराला पकडून नेतात.

खटपट्या's picture

20 Nov 2014 - 6:18 am | खटपट्या

abcd

गचान्डी कळलं पण मग मुसक्या आवळणे म्हणजे काय ? कसे ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

मुसक्या आवळणे याचा उगम शेतीत आहे. धान्य पिकून त्याची कापणी केल्यावर बैल त्यावरून फिरवायचे सो दॅट दाणे व बाकी गोष्टी वेगवेगळ्या होतील. तसे करताना बैलांनी धान्य वा अन्य काही खाऊ नये म्हणून त्यांच्या तोंडापुढे फडके वा तत्सम बांधायचे. दॅट इज़ आवळिंग ऑफ मुसक्या. मुसकी म्हणजे तोंड असावे. मुस्काट फोडणे, मुस्काटात मारणे, इ.इ. म्हणतात तोही त्यातलाच प्रकार.

कपिलमुनी's picture

21 Nov 2014 - 4:23 pm | कपिलमुनी

तूच ना तो ?

तोच ना तू ?

पुर्वी धान्याचे खळे करताना जनावरचा वापर व्हायचा.बैलांनी खळ्यातील धान्यात तोंड घालु नये यासाठी त्यांचे तोंड दोरीच्या जाळीने बंद करत.या जाळीला मुसके असे नाव आहे.यावरुन मुसक्या आवळणे आल आसव.

अच्छा, जाळीला मुसके म्हणतात तर! मी तोंडालाच मुसके समजत होतो. अज्ञानाची मुसकी आवळल्याबद्दल धन्यवाद!

मदनबाण's picture

20 Nov 2014 - 3:02 pm | मदनबाण

ओक्के... धन्यवाद ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

हायला बहुतेक दोघ एकाच वेळी टायपत होतो की,14-55 ची एकच वेळ दाखवतय.
आणी तुमच्या मुसक्या आमी आवळाव्या तोबा तोबा *wink*

अत्रन्गि पाउस's picture

22 Nov 2014 - 12:00 am | अत्रन्गि पाउस

बालपणी मुस्कट (muscat/मस्कत) हे एक ठिकाण आहे हे कळल्यावर ...मुस्कटात ह्या शब्दाला एक वेगळीच फ्लेवर आली/:D

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Nov 2014 - 3:59 pm | माम्लेदारचा पन्खा

तेव्हा या धागामालिकेत, सदस्य, सदस्या घरगुती कामाचा, ऑफिसकामाचा, संगणकविषयक, संसार चालवणे विषयक, शेतीविषयक, लैंगिक, करीअरविषयक, काऊंसेलिंगविषयक, सामान्य ज्ञानविषयक प्रश्न पोस्ट करू शकतात. अश्या प्रश्नाचे उत्तर इतरांसही कामास येऊ शकते

बाप्रे..... तुम्ही "असली" सदरं पेप्रात सल्ले म्हणून छापण्याच्या विचारात आहात का ?

अवांतर कुतूहल- पोटापाण्यासाठी काय करता आपण?

पोटापाण्यासाठी मी नोकरी करतो. इतर काही अजून रोचक करता येईल असे वाटत असल्यास सांगा =))
--------------
लैंगिक शब्द हायलाईट का केला आहे? ते वेगळे कसे?

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Nov 2014 - 4:15 pm | माम्लेदारचा पन्खा

अमुक तमुक "तज्ञ " म्हणून पेप्रात सल्ले छापायचे ...

ता.क- तज्ञ म्हणजे आत्मविश्वासाने समोरच्याला चुकीचा सल्ला देणारा माणूस !

एक प्रश्न - मामलेदार कोण?

बाळ सप्रे's picture

21 Nov 2014 - 4:02 pm | बाळ सप्रे

तहसिलदार

बॅटमॅन's picture

21 Nov 2014 - 4:32 pm | बॅटमॅन

मामलेदार म्हणजे रमा दामले.

गच्छंती(गम गच्छामि वगैरे)केली- तो गेला चे अपभ्रंश -गच्छंति करायला लावली -गच्छांडी -इधरसे खसकने वगैरे ?

बोँब ठोकणे ही गोष्ट स्मशानात चिता पेटवल्यावर करतात अर्थात केवळ आरोळी देणे नाही तर शोक अनावर होऊन दु:खावेगाने ओरडणे.

हवालदार's picture

19 Nov 2014 - 8:09 pm | हवालदार

आत्ता कळाले की आमचे पिताश्री पुर्वी का ओरडले होते ते. म्हणजे गमतीने देखील सगळीकडे बोम्बाबोम्ब म्हणू नये तर.

हवालदार, खरंच माहिती नव्हतं का काय?
होळी असते का तुमच्याकडं? नसली तर एक काम करा. तोंडाचा आ करा. (चंबू केलात तरी चालेल) आता तोंडातून, घशातून आ आ आ असा आवाज काढा नि त्याबरोबरच त्वायकोंदो मध्ये हाताची मुठ पंच मारतात तशी करा आणि तळहातामागचा भाग तोंडासमोर आणा. हळू हळू हात तोंडावर आपटा.

जमलं!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 Nov 2014 - 9:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मला पडलेला एक गहन प्रश्णः

असे धागे काढण्यामागचा प्रेरणास्त्रोत काय असावा?

सचिन कुलकर्णी's picture

19 Nov 2014 - 9:28 pm | सचिन कुलकर्णी

मिपा माबो होण्याच्या मार्गावर.. ;)

आदूबाळ's picture

19 Nov 2014 - 9:48 pm | आदूबाळ

कुणी काही म्हणो - मला तर आवडतात असले धागे. मलाही असले लय प्रश्न पडतात, आणि त्याची उत्तरं शोधायचा यथाशक्ती यथामती प्रयत्न करत असतो. इतरांना पडलेले प्रश्न पाहिले की आपुलिया जातीचा सापडल्याचा आनंद मिळतो.

बॅटमॅन's picture

20 Nov 2014 - 1:10 pm | बॅटमॅन

हाहाहा, अगदी अगदी!!!!

रामपुरी's picture

19 Nov 2014 - 10:40 pm | रामपुरी

"हवी असलेली माहिती जालावर नसू शकते. आपण सगले एकाच क्लोजली नीट मराठी संस्कृतीचे लोक असल्याने आपले क्लिशे ज्ञान पश्चिमाभिमुख जालावर कधीकधी नसू शकते"
तुम्ही मराठी संस्कॄतीतले दिसत नाही. असलं मराठी वाचून पश्चिमाभिमुख टोकावर जायला पाय सळसळतोय

तुम्ही मराठी संस्कॄतीतले दिसत नाही.

असे म्हणता यावे. महागावरान पार्श्वभूमी (याला जनरली मिडल क्लास लोक मराठी संस्कृती म्हणायला लाजतात), त्यानंतर सरळ दिल्लीत १५ वर्षे नि सासर अमराठी यामुळे आपलं निरीक्षण बरोबर वाटतंय.
----------------

असलं मराठी वाचून ...............

भाषेत इतकी दौबल्ये असताना भाषाशुद्धीवर इतका भर देणं मला फार विचित्र वाटतं. टेबलाचा पाय तुटला असताना तो दुरुस्त करायचा सोडून नेहमी नेहमी टेबलक्लॉथ ठिक केल्यासारखं. असो.

बोका-ए-आझम's picture

20 Nov 2014 - 1:24 am | बोका-ए-आझम

मिपीय संवाद हा खल्लास शब्द सापडला बाकी इथे!

निचिंती हा शब्द खूप दिवसांनी वाचला, आजकाल सगळे लोक सर्रास निश्चिंती असं म्हणतात.

धाग्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सर्वांचे आभार. हा धागा मीच विचारायच्या प्रश्नांचा धागा आहे असा गैरसमज होऊ नये म्हणोन सध्याला आखडता घेतोय. अन्यथा मी इतके प्रश्न विचारतो कि धागा मी एकट्यानेच प्रश्न विचारायचा आहे कि काय असे वाटू लागते.

पैसा's picture

20 Nov 2014 - 1:01 pm | पैसा

धाग थांबवू नका! माझा एक प्रश्न आहे, पूर्वी मानलेला भाऊ, मानलेली बहीण असले प्रकार खूप ऐकायला यायचे. हल्ली हे बंद झालंय का?

विजुभाऊ's picture

20 Nov 2014 - 5:13 pm | विजुभाऊ

मानलेला भौ. ...
आमच्या शाळेत नववीत असताना" मानलेली बायको" "मानलेला नवरा" असेही काही प्रकार होते.
कॉलेजात असताना मित्राच्या मित्राला आम्ही "चुलत मित्र "मावस मित्र"असे म्हणायचो.
चुलत मैत्रीणी सुद्धा असायच्या

माझ्या तरी मानलेल्या बहीणी असायच्या. पण आता संपर्क तुटला आहे. लातूरकडे ८० च्या, ९० दशकात बाय डिफॉल्ट स्त्रीयांना शेजारच्या, अल्पपरिचित, ताई म्हणत. जिला भाऊ नाही, तिला कोणी मानलेला भाऊ असेच असे.

पैसा's picture

20 Nov 2014 - 1:10 pm | पैसा

शेजारच्यांना सहसा काहीतरी नात्याने हाक मारतातच. पण त्याकाळात कॉलेजमधे, नोकरीच्या जागी वगैरे असे मानलेले भाऊ बहिणी खूप पाहिले/ऐकले आहेत. मात्र आताची कॉलेजला जाणारी मुलं मुली सरळ मित्र आहे, मैत्रीण आहे असं म्हणतात.

बॅटमॅन's picture

20 Nov 2014 - 1:26 pm | बॅटमॅन

अगोदर हे मित्रमैत्रीण प्रकर्ण इतके पचनी पडले नसल्यानेच मानलेल्या भौभैणीचा प्रकार जास्त असावासे वाटते. त्यात परत या मानलेल्या भैणी राखी बांधत असत म्हणजे तर एटर्नल फ्रेंडझोनची निश्चिंती =)) नात्यातली बहीण राहोच, अशा बहिणीबद्दल जरी कुणी प्रेम जाहीर केलं तर लोक काय साला इन्सेस्ट करतोय अशा नजरेने पहायचे तोही एक रोचक प्रकार होता. =))

पैसा's picture

20 Nov 2014 - 1:29 pm | पैसा

आणि अशा मानलेल्या भाई आणि ताईने नंतर समजा लग्न केलंच तर तो प्रकार "दादा भाई नौरोजी" म्हटला जायचा! =))

बॅटमॅन's picture

20 Nov 2014 - 2:05 pm | बॅटमॅन

अगदी अगदी =))

यसवायजी's picture

20 Nov 2014 - 5:04 pm | यसवायजी

दादा भाई नौरोजी
:))

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2014 - 9:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकाच गावात मानलेले भाऊ बहीण वेगवेगळे संसार करू लागले, मोठे झाले तर बहिणीला भावाच्या घरात खूप मोठा सांपत्तिक अधिकार असे असे आठवतेय.

सस्नेह's picture

20 Nov 2014 - 1:09 pm | सस्नेह

'प्रश्न पडतात' कसे ?
माझ्यासमोर तर ते उभे राहतात ! *biggrin*

उभे राहिलेले प्रश्न इथे नाही विचारायचे, फक्त पडलेले. किती ती भाषेची दौर्बल्ये.

बॅटमॅन's picture

20 Nov 2014 - 1:27 pm | बॅटमॅन

दौर्बल्य भाषेचे नसून भाषिकांचे असते. किती हे दौर्बल्य =))

प्यारे१'s picture

20 Nov 2014 - 1:32 pm | प्यारे१

+१.
भाषा हे 'फक्त' माध्यम आहे. अन्यथा दोन वेगळ्या भाषा वापरणारे लोक एकमेकांसमोर आले असता त्यांच्यात 'संवाद'च झाला/घडला नसता. अथवा मूकबधिर लोकांमध्ये काही संभाषणं घडू शकली नसती. असो!

भाषेला असे हातासरषी बाजूला करणारे प्रतिसाद मला फार प्यारे आहेत.

प्यारे१'s picture

20 Nov 2014 - 1:41 pm | प्यारे१

:)

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2014 - 1:37 pm | टवाळ कार्टा

=))

तुमच्यापैकी कोणी पीसीला ५.१ होम थिएटर "नीट" कनेक्ट केलं आहे का? सीपीयूच्या रिअर साईडचे जॅक आणि वूफरचे जॅक यांचा काही संबंध दिसेनाय.

वाचक's picture

22 Nov 2014 - 3:32 am | वाचक

असावा असे गृहित धरुन उत्तर
सब वूफर हा 'अ‍ॅक्टिव्ह' किंवा 'पॅसिव्ह' असतो - अ‍ॅक्टिव्ह ला पीसी चे कनेक्शन बहुधा चालणार नाही, वेगळा 'प्री-अँप' लागेल.
फोटो टाका, मग नीट सांगता येईल.

मिपावर फोटो टाकण्यासाठी तो इतरत्र अपलोडवून इथे त्याची लिंक द्यावी लागते. (हा द्रावीडी प्राणायाम का?) तर तुम्ही फोटो कोठे अप्लोड करता? आणि त्यातल्या केवळ इथेच दिसायच्या फोटोची परमिशन्स कशी बदलता?
----------------
लॅपटॉपवरून आणि मोबाईलवरून फोटो मिपावर डकवायला सर्वात सोपा मार्ग काय?

पैसा's picture

20 Nov 2014 - 4:41 pm | पैसा

मिपाच्या सर्व्हरवर ताण पडू नये म्हणून. कारण चित्राम्च्या फाईली जास्त वजनदार असतात. फोटो अपलोड गूगल फोटो, पिकासा, फ्लिकर, फेसबुक कुठेही करा! गूगलवर प्रत्येक फोटोला शेअरिंग ऑप्शन्स असतात. तिथून त्याचे सेटिंग बदलता येते. मिपावर फोटो टाकायला शॉर्टकट नाही. कोणत्यातरी साईटीवर तो फोटो असला पाहिजे. घरच्या पीसीवर असून उपयोग नाही.

समीरसूर's picture

20 Nov 2014 - 3:21 pm | समीरसूर

मिपाच्या अँड्रॉईड अ‍ॅपवर मराठी कसे लिहावे? मला पासवर्डच टाकता येत नाही त्यामुळे सगळं घोडं अडतं.

संगणकावरुन मिपावर येताना आयडी मराठीत पडतो आणी पासवर्ड इंगजीत.
मोबल्यावर मराठी आयडी टंकल्यावर किपॅड टोगल करुन इंगजीत जायचे आणी पासवर्ड टाकायचा.मला ही हा प्रॉब्लेम यायचा.ट्राय करा.

मदनबाण's picture

20 Nov 2014 - 3:29 pm | मदनबाण

हल्ली डास फार वाढले आहेत ! फार चावतात...
डास मारणारे कॉइल, जाळायचा पेपर , लिव्कीड , स्प्रे सोडुन इतर कोणत्या घरगुती उपायांनी यांचा पराभव करता येइल.
ऑडोमॉस रोज चोळण्याचा कंटाळा येतो... काही वेगळा उपाय यावर आहे काय ?

आता मी माझ्या तिर्थरुपांना सहज प्रश्न केला होता :- की बघा... डासा मारणार्‍या वड्या , लिक्वीड इं डास मरतात... ते मरतात { काही प्रमाणात तरी } म्हणजे या रसायनांचा परिणाम त्यांच्या शरिरावर होतो म्हणुन... मग आपल्या श्वासावाटे आपण तो सतत घेतो त्यामुळे आपल्या फुफ्फुसावर,मेंदुवर याचा परिणाम होत असेल काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }

पैसा's picture

20 Nov 2014 - 4:43 pm | पैसा

मच्छरदाणी वापरा.

नाखु's picture

21 Nov 2014 - 9:37 am | नाखु

एकदम निर्धोक आणि खात्रीशीर उपाय.
विशेषतः लहान मुलांना अंगावर नीट पांघरूण घेण्याची सवय नसते आणि पंख्याने फारसा फरक (डासांना) पडत नसल्याने मच्छरदाणी उत्तम.

मच्छरदाणीचा उपाय नक्कीच चांगला आहे,पण डासांचा उपद्रव हल्ली इतका वाढला आहे की, घरच्या संगणकावर काम करताना सुद्धा तंगड्यांना लपुन छपुन चावतात ! त्यामुळेच उपाय योजने बद्धल विचारणा केली आहे. मध्यंतरी सोसायटीने धुरांडेवाला माणुस बोलवला त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही, हे अचानक डासांचे प्रमाण कसे काय वाढले ते कळत नाही, त्याच मुंबईत सध्या डेंगु चे रुग्ण वाढण्याचे प्रमाण दिसत आहे,म्हणुन जरा काळजी वाटते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }

अनुप ढेरे's picture

25 Nov 2014 - 10:50 pm | अनुप ढेरे

खिडक्यांना जाळ्या बसवा. आणि घराचं दार बंद ठेवा.

arunjoshi123's picture

20 Nov 2014 - 4:10 pm | arunjoshi123

आणि ते मोबाईलवर cntl+\ कसे टायपाबे?

पैसा's picture

20 Nov 2014 - 4:42 pm | पैसा

तुम्हाला भाषाबदल मराठी/English स्वतः क्लिकून करावा लागेल.

मोबाईलवर इथे (या खिडकित) इंग्रजी कसे लिहावे? इंग्रजी किबोर्ड असतो पण स्पेस दाबले कि लगेच एक मराठी शब्द बनतो. मग "स्वतः क्लिकून" तेही मोबाईलवर इतरत्र, कॉपी करायचे आणि इथे पेस्ट करायचे? मोबाईलवर इंग्रजी लिहायला डोक्याचे इतके दही का होत असावे?

पैसा's picture

20 Nov 2014 - 5:00 pm | पैसा

कोणता कीबोर्ड वापरताय? गूगल हिंदी कीबोर्डवरचे इंग्लिश या खिडकीत पण इंग्लिशच उमटते.

जेपी's picture

20 Nov 2014 - 5:17 pm | जेपी

my mobile can not make curd of my brain .बगा जमल 15 सेंकदात

मी स्विफ्त्की वापरतो. मिपावर डायरेक्त इंग्रजी टंकता येत नाही. किबोर्ड इंग्लिश मोड मधे असो नैतर हिंदी.

एक प्रश्नः "व्हॉट" म्हणजे काय?

जेपी's picture

20 Nov 2014 - 5:31 pm | जेपी

टाईमपास. *wink*

सेलफोनवर होत असलेले संभाषण साठवून कसे ठेवायचे?/ तसे करता येते हे नुकतेच ऐकलेय. (मग त्यांनाच विचारा हे म्हणू नका, ते माझ्या ओळखीचे नैत)

बरेचसे अँड्रॉईड अ‍ॅप्स उपलब्ध आहेतः

उदा.: रेकॉर्ड माय कॉल्स

काही उपकरणंही आहेत, पण हे महागडे ऑप्शन्स आहेत असं वाटतं.

बाकी असं रेकॉर्डिंग करतांना काही कायदेशीर बाबींकडेही लक्ष द्यावं लागेल, त्यांचा उहापोह इथे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! सहा पद्धती दिल्यात त्या वाचून बघते. मला एकदा हाताने लिहून गोष्टींची लिस्ट करायला नको म्हणून हवं होतं पण हे एकदम कायदेशीर प्रकरण आलं आणि ते योग्यही आहे. उपकरणं मलाही महाग वाटतायत. रेकॉर्ड माय कॉल्स वर बघते पण नेमके एकाने रिव्ह्यूमध्ये त्याच्या /तिच्या ग्याल्याक्सी एस ४ वर वर्क करत नाही असे म्हटले आहे. एक जुना फोन आहे, त्यावर बघते.

कंजूस's picture

21 Nov 2014 - 6:26 am | कंजूस

कार्बनच्या काही साध्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डीग पर्याय आहे. प्रत्येक रेकॉर्डीँग त्या कॉन्टैक्टचा फोल्डरमध्ये WAV फाईलफॉर्मेट साठवले जाते. ती फाईल इमेलही करता येते. इंटरनेट /अॅप नसल्यामुळे डेटा चोरण्याची काळजी नाही.
फारफार उपयुक्त.

{फक्त असे रेकॉर्डीँग ही सोय आहे त्याचा उपयोग कोर्टाच्या दाव्यात पुरावा ठरत नाही }

रेवती's picture

21 Nov 2014 - 4:30 pm | रेवती

ओक्के.

अंतु बर्वा's picture

21 Nov 2014 - 10:14 am | अंतु बर्वा

हिरव्या देशातुन एक होम थिएटर सिस्टीम घेउन जात आहे. वोल्टेजचा फरक असल्या कारणामुळे वोल्टेज स्टेपअप करणारी यंत्रणा (ट्रान्स्फॉर्मर) वापरण्याचा अनुभव कुणाला आहे का? गुगल्बाबा विविध पर्याय दाखवतोय पण कुणाला FirstHand Experience असेल तर पहावा म्ह्णुन इथे विचारतोय... वापरला असल्यास कुठली कंपनी इत्यादी माहीती देउ शकलात तर उत्तम :-)

मराठी_माणूस's picture

21 Nov 2014 - 11:39 am | मराठी_माणूस

उसगावाहुन मी पण सोनी ची होम थिएटर सिस्टीम आणली होती. ती इथे जोडली आणि व्होल्टेज (११०->२२०) साठी एक साधा स्विच लावला आणि सिस्टीम चालु केली पण काही वेळात (साधारण १०/१५ सेकंद) बंद पडली. बर्‍याच वेळा प्रयत्न केला पण काहीच फरक पडला नाही. मग एका टेक्नेशीअन ला दाखावला त्याने सांगीतले की वॅटेज मॅच होत नाही आहे आणि ट्रान्स्फॉर्मर बसवावा लागेल. मग मी तसा ट्रान्स्फॉर्मर उसगावाहुन एका सहकार्‍या कडुन मागवला . त्या नंतर ती सिस्टीम व्यवस्थित चालु झाली.

अंतु बर्वा's picture

21 Nov 2014 - 10:22 pm | अंतु बर्वा

धन्यवाद मराठी माणूस.

ट्रान्सफॉर्मर जोडल्यावर चालू झाली म्हणजे आधी जास्त वोल्टेज वर जोडूनही सिस्टिम डॅमेज नाही झाली म्हणायची. जाणे उद्यावर आले आहे पण आज प्रयत्न करुन बघतो ट्रान्सफॉर्मर इकडुनच घेउन जाता येतो का ते.

पॉवरची मोजणी अशी करा. तुमच्या सिस्टिमचे वॉटेज किती आहे ते बघा. समजा २२० वॉट आहे तर तुमच्या सिस्टिमला २२० वॉट/११०होल्ट = २ अँपिअर करंट लागणार इथे यूस मधे.
तिकडे भारतात २२० वॉट/२२० वोल्ट = १ अँपिअर करंट लागणार. तुम्हाला एक दणकट ट्रान्सफॉर्मर बनवून घ्यावा लागेल ज्याची प्रायमरी २२०वोल्ट १.५ करंट देइल आणि सेकंडरी ११० वोल्ट ३ अँपिअर करंट देईल. जास्ती वॉटेज घेण्याचे कारण वोल्टेजमधले चढउतार आणि लॉसेस.
सिस्टीमला व्यवस्थित फ्यूज वगैरे बसवून घ्या. पुण्यात असलात तर नागनाथपाराजवळ राजीव इलेक्ट्रॉनिक्स मधून बनवुन घ्या. मला त्याम्चा चांगला अनुभव आहे. बनवून घेताना फक्त स्टेपडाउन ट्रान्सफॉर्मर हवा आहे आणि वॉटेज अमुकअमुक एवढे सांगितलेत तरी पुरे. फ्युज मात्र घ्याच म्हनजे सिस्टिमला प्रॉब्लेम नको.

अंतु बर्वा's picture

24 Nov 2014 - 11:38 am | अंतु बर्वा

खुप धन्यवाद डीटेलवारी प्रतिसादासाठी चतुरंगसर...

आजच लँड झालोय भारतात. पुण्याला गेलो तर नक्कीच तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी जाईन.. पण नाहीच जाणे झाले तरी आपण दिलेल्या माहिती आधारे मुंबईतही मिळणे कठीण नसावे. सुट्टी संपुन परत येताना ईथे सेटअपचा अनुभव मांडेनच... :-)

कोणता मोबाईल नेट न वापरता डायरेक्ट थर्मॉमीटरने तापमान मोजतो काय?

arunjoshi123's picture

21 Nov 2014 - 5:12 pm | arunjoshi123

ब्लॅक होल आहे कि नाही?
हिग्ज बॉसॉन आहे कि नाही?
म्हणे तो नै पण त्याची वेगळी कोणतीतरी दुसरीच दोन भावंडं सापडलीत.
शेवटी काय ठरलं?

एक जीपीएस(खास याचेच)उपकरण मिळते रु८हजार~ यात (अक्षांश रेखांश +) वेळ ,तापमान, आर्ऱ्दता, उंची मोजण्याचे, कँपास इ॰ सेन्सर असतात त्याने शक्य होते.

मोबाईलच्या संदर्भात हे सगळं आहे फक्त थेट तापमान नाही, ह्यूमिडिटी नाही.

arunjoshi123's picture

21 Nov 2014 - 5:26 pm | arunjoshi123

आनंद कार्लसनचे गेम जे नियमांनी चालू आहेत त्या आंतरराष्ट्रीय नियमांनी चेसचा गेम दोन खेळाडूंनी (संगनमतीने म्हणा तर) लांबवायचाच ठरवला तर ते जास्त्तीत जास्त कीती चाली खेळत ड्रॉ देखिल होऊ शकणार नाहीत?
१. कोणी हारला वा जिंकला कि गेम संपतो.
२. स्टेलमेटझाला कि गेम संपतो.
३. तीनदा त्याच मूव रिपिट झाल्या कि गेम संपतो.
४. पन्नास चालीत प्यादे एक घर तरी "चालले" नाही किंवा प्यादासहित कोणतेही इतर मारले गेले नाही तर (डावात बाकी काहीही परिस्थिती असो, कोणतीही वेळ असो) डाव ड्रॉ होतो.
५. पहिल्या ४० (४०*२ मूव्स) चाली २ तासात खेळायच्या असतात. संपूर्ण डावाच्या दुसरा तास पूर्ण होण्याच्या सेकंदाला ४० चाली नाही झाल्या तर ज्या प्लेअरचे क्लॉक क्लिकत असते तो हरतो.
६. नंतर २० चालींना १ तास मिळतो. मागे न वापरलेला वेळ त्यात जमा होतो.
७. नंतर १५ सेकंदाला एक चाल. मागे न वापरलेला वेळ त्यात जमा होतो.
------------------
हे सगळे नियम पाळून खेळाडू टाईमपास करू लागले तर जास्तीत जास्त किती चाली खेळू शकतात. याला नंबरला मर्यादा आहेच का मुळी?

अनेक जुने पाने स्पिकर पडले आहेत. ते एकमेकांना जोडून सराउंड सिस्टीम करणे शक्य आहे का?

प्रभाकर पेठकर's picture

22 Nov 2014 - 4:47 pm | प्रभाकर पेठकर

'लैंगिक, करीअरविषयक'

मी तर घाईघाईत मधला स्वल्पविराम बघितलाच नाही.

असंका's picture

22 Nov 2014 - 4:50 pm | असंका

:-))

टवाळ कार्टा's picture

22 Nov 2014 - 4:53 pm | टवाळ कार्टा

=))

आदूबाळ's picture

22 Nov 2014 - 8:30 pm | आदूबाळ

वेगळाच "विषय" आहे हा... :))

कपिलमुनी's picture

24 Nov 2014 - 3:14 pm | कपिलमुनी

हहपुवा

arunjoshi123's picture

24 Nov 2014 - 6:47 pm | arunjoshi123

खुलासा -
"लैंगिक करीयरविषयक" प्रश्न मला अभिप्रेत नव्हते असे नाही. स्वल्पविराम न बघण्यात फारशी काही चूक झालेली नाही.

यसवायजी's picture

22 Nov 2014 - 5:11 pm | यसवायजी

गोल्ड डिपॉजिट ही काय भानगड असते? म्हणजे, बॅन्का ते सोने विकुन कुठे इन्वेस्ट करतात आणी काही वर्षांनी तेवढेच सोने व्याजासकट परत देतात काय?
काही बॅन्का तयार दागिनेसुद्धा ठेवून घेतात म्हणे. (१% पे़क्षा कमी व्याज देतात). पण त्यांचा काय फायदा आहे त्यात?

गोल्ड डिपॉझीट हे पहिल्यांदाच ऐकल.
गोल्ड डिपॉझिट लोन हे माहिती आहे.

सराउंड साउंडची सिस्टिम कुठे ऐकली आहे का आणि काय अपेक्षा आहेत ?टु वे /फोरवे स्पिकर चा आवाज ऐकला आहे का ?खरा स्टिरिओ ? असं विचारण्याचं कारण प्रत्येक पध्दतीत वेगळा अनुभव असतो. जुनेपाने स्पिकर आहेत त्यात खोल /लंबगोल बेस साउंड (ढग्गा ,खर्ज ई॰)साठी उपयुक्त आहेत. वॉटेज काय आहे हे पण पहावे लागेल. फिलिप्सचे चांगले असतात.

अपेक्षा इतकीच की स्पिकर टाकून द्यायला लागायला नकोत....

वॉटेज स्पिकरवर लिहिले अस्ते का?

दोन कॉम्प्युटरचे स्पिकर- jbl platinum आहेत. एक जुन्या TV चा सब वूफर आहे- panasonic. हे तीन पडून आहेत. शिवाय एक फ&ओ आणि एक लोकल अशा दोन "२.१" सिस्टीम आहेत, त्या दोन्ही वापरात आहेत. हे सगळे एकत्र करता येइल का? सबवूफर ला जॅक नाहिये. फक्त दोन वायर आहेत.

बाकी सराउंड म्हणजे काय ते नीट माहित नाही. डॉल्बी वाल्या टॉकिज मध्ये जसा चारी बाजूंनी आवाज येतो तसे असावे असे वाटते.