पार्वतीची व्यथा

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
20 May 2014 - 8:53 am

देऊळ कफल्लक , वितळू लागे खांब

गाभारी ध्यानस्थ तरीही सांब

दुरून पार्वती जपे कसे सौभाग्य

रोज उशीवर विरघळलेले थेंब

ही आर्त हाक कि वनी लागली आग

चिंतेत पार्वती कुठवर जपू विराग

उंब-यात पाउल चाहूल सदाशिवाची

अर्ध्यावर तुटले स्वप्न... आली का जाग ?

कविता

प्रतिक्रिया

नित्य नुतन's picture

20 May 2014 - 11:47 am | नित्य नुतन

दोनदा वाचूनही फारशी नाही कळली ...
काही तरी गहन अर्थ असावा ... नक्कीच ...
संदर्भासहित सपष्टीकरण मिळेल का हो ? खूप उत्सुकता लागून राहिली हो ...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 May 2014 - 12:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर !! आवडली.

धन्यवाद .. गूढ अवघड काही नाहि .. पतीविराहाची गोष्ट आहे .. स्पष्टीकरन दिले तर शब्दांमधली मजा निघून जाईल .. कवितेचे नावच संदर्भ आहे

आत्मशून्य's picture

22 May 2014 - 8:43 am | आत्मशून्य

विशेषत: कवितेचे नावच संदर्भ आह म्हणने प्रचंड गोंधळदायक झाले आहे. अथवा विनाकारण विनासंदर्भ शिव पार्वती यात गोवायचा आचरटपणा घडला आहे वाटते. जरा कविता सम्जावाल काय ?

अत्रुप्त आत्मा's picture

21 May 2014 - 12:15 am | अत्रुप्त आत्मा

सुंदर रचना!

इन्दुसुता's picture

22 May 2014 - 8:32 am | इन्दुसुता

रचना आवडली

स्पंदना's picture

22 May 2014 - 11:00 am | स्पंदना

छानच!

आयुर्हित's picture

23 May 2014 - 1:26 am | आयुर्हित

छान! कविता आवडली.

हे पण पहा :Raja Shivchhatrapati Part 35

म्हैस's picture

30 May 2014 - 2:51 pm | म्हैस

@अत्मशुन्य.
सहमत आहे . कविता नाही आवडली

आतिवास's picture

30 May 2014 - 3:11 pm | आतिवास

कविता आवडली.