भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
7 Apr 2014 - 5:05 pm

आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.

ध्येय(Goals): एक भारत, श्रेष्ठ भारत, सुशासन, सर्वसमावेशक सर्वस्पर्शी व सर्वदेशी विकास

आव्हाने(Challenge): भ्रष्टाचार, महागाई, रोजगार, आर्थिक विषमता, देशाचा इतर पक्ष्यांच्या कार्यकाळात गेल्या ६१ वर्षांत झालेला अल्पसा विकास, वित्तीय नुकसान(CAD), रुपयाचे झालेले अवमूल्यन, परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असलेली भारतीय अर्थव्यवस्था, देशातील अंतर्गत बाजारपेठेत चीन व इतर देशांनी काबीज केलेला मोठा वाटा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भारतीय निर्यातीचा घटलेला वाटा.

मुख्य कार्यवाही केंद्र(Focus for Action): महिला सबलीकरण व संरक्षण, शेतकरी, कामगार, विद्ध्यार्थी, रोजगार निर्माण करणारे छोटे व्यावसायिक यांना हव्या त्या सुविधा स्वस्तात पुरविणे, लहान लहान खेड्यांपर्यंत रस्ते व मुलभूत साधनसुविधा उपलब्ध करणे, औद्योगिक उत्पादने, जल व उर्जा स्वतंत्रता, रस्ते-जहाज व नवीन गोदी बांधणी, शिक्षण, स्वास्थ्य व संशोधन यात अग्रेसर होणे, सिंचनाचे आधुनिक मार्ग अवलंबणे, नवीन मार्ग शोधणे व जरूर पडल्यास नदीजोड प्रकल्प उभरणे, पर्यटन व निर्यात यात मुलभूत सुधारणा, आर्थिक क्षेत्रासाठी व प्रामुख्याने NBFC साठी चांगले नियंत्रक उभे करणे व भारताला आर्थिक महासत्ता बनविणे.

काश्मीर व राममंदिरासारख्या मुद्द्याला भारतीय घटनेला अनुसरूनच कार्यवाही केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे-
- काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करणार. कठोर उपाययोजना करणार.
- कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिराची उभारणी करणार.
- विदेशातील बॅंकांमध्ये असलेला काळा पैसा भारतात आणण्याला प्राथमिकता.
- ज्या क्षेत्रांमध्ये रोजगार आणि संपत्तीच्या वाढीसाठी थेट विदेशी गुंतवणुकीची गरज आहे, तेथेच एफडीआयला परवानगी देणार.
- नाशवंत शेतीमालाचा इतर भागांमध्ये पुरवठा करण्यासाठी अॅग्री रेल नेटवर्क उभारणार.
- हायस्पिड ट्रेन नेटवर्कसाठी डायमंड क्वॉड्रिलॅटरल प्रकल्प सुरू करणार.
- महागाई रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.
- शिक्षण आणि उद्योगात अल्पसंख्याकांना अधिक संधी देणार.
- केंद्र आणि राज्य सरकार या मधील संबंध सुधारण्यावर भर देणार.
- ज्युडिशिअल रिफॉर्म, इलेक्ट्रोल रिफॉर्मला प्राथमिकता देणार.
- नवीन आरोग्य धोरण आणले जाईल.
- ग्रामीण भागात वाय-फाय झोन उभारणार.
- महिला सबलीकरणासाठी युनिफॉर्म सिव्हिल कोड.
- टॅक्स व्यवस्था आणि बॅंकांची आर्थिक स्थिती सुधारण्यावर विशेष भर.
- प्रत्येक राज्याच्या राजधानीत एम्स उभारले जाईल.
- नॅशनल ई-वाचनालय सुरू केले जाईल. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल.
- राष्ट्रीय मदरसा विकास कार्यक्रम राबविला जाईल. उर्दू भाषेचे संरक्षण आणि प्रसार केला जाईल.
- एससी, एसटी प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक न्याय आणि सबलिकरण करण्यावर भर.
- शहरी आणि ग्रामीण भारतातील दरी दूर करणार.
- प्रत्येक भारतीयाला पक्क्या घराचे आश्वासन.

सर्व वर्ग, प्रांतिय व धर्मियांना सुख, शांती, समाधान, सुरक्षा, विकास व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशाची विक्रयमूल्य (ब्रांड व्हॅल्यू) वाढविण्यासाठी गुजराथचे सलग तीन वेळेला निवडून आलेले व प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेले “माननीय श्री नरेंद्र भाई मोदी” व “भारतीय जनता पक्ष व इतर मित्र पक्षांचे खासदार पदासाठीचे इतर अधिकृत उमेदवार” यांनाच निवडून आणावे, ही विनंती माननीय श्री लाल कृष्ण अडवाणी व श्री राजनाथ सिंग यांनी केलेला आहे.

प्रथमदर्शनी अशक्य भासणारे परंतु तितकेच महत्वाचे मुद्दे ऐकून माझे कान टवकारले गेले व हातातील कामे सोडून मी टीवीवर नजर खिळवून बसलो. देशहिताला प्रथम व पूर्ण प्राधान्य देवून भाजप व मित्र पक्षांनी निवडणूक जिंकल्यावर काय चांगले होवू शकते यावर केलेला विचार मनाला पूर्ण भावून गेला. निवडणुकीला सामोरे जातांनाच अगदी पहिल्या पायरीवरच या तऱ्हेने बारीकसारीक गोष्टींचा पूर्ण विचार करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे व पक्षाची देशाप्रती असणारी एकूण तळमळ (प्रतीबद्धता) या “संकल्प पत्रा” द्वारे व्यक्त केली गेली आहे असेच वाटले.

चांगला मुद्दा हाती नसल्यामुळे, अगदी निवडणूक सुरु होण्याच्या मुहूर्तावरच हे प्रकाशन झाले आहे, यावरच बऱ्याच पक्षांनी टीका केली आहे. इतर सर्व पक्षांनी निव्वळ कागदी प्रकाशनाची औपचारिकता दाखवून केवळ मतदारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत असेच वाटते. त्यातही काहींनी मागासलेल्यांना तर काहींनी पुढारलेल्यांना आरक्षण अशी सवंग व स्वस्त जाहिरात करून आरक्षणाचे शिळे झालेले तेच गाजर पुढे केलेले आहे. या आरक्षणामुळे फक्त वरवर लेप लावून खालची जखम तशीच भळभळत ठेवण्यासारखेच आहे, हे आजवर कोणाच्याही लक्षात कसे आलेले नाही?

नुसती खोटी प्रलोभने देत व मोठमोठे घोटाळ्यांचे विश्वविक्रम रचलेल्या कॉंग्रेसने गेल्या १० वर्षात जेमतेम सव्वा लाख रोजगार निर्माण केला आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात तर पुढच्या एका वर्षात १० लाख रोजगार निर्माण करू अशी पोकळ आश्वासने दिली आहेत, ज्यावर कोणा मतदाराचा विश्वास बसेल का?

गरिबांच्या रोजच्या खर्चावरचे चमत्कारिक व अवास्तव गणित करून कोंग्रेसच्या नियोजनमंत्र्यांनी त्यांच्या तोंडावर चपराक मारलेली आहे, हे कोणी विसरेल का?

विदेशी अर्थपुरवठ्याशिवाय विकास शक्य नाही असेच इतर सर्व विरोधी पक्षांना वाटत असतांना, आजपर्यंत असा आमुलाग्र बदल घडवण्याचा “१८०अंश विरुद्ध” विचार कोणत्याही पक्षाला करणे जमलेले नाही. पण काळाची हीच खरी गरज आहे, ज्यामुळे मरगळलेली भारतीय मने निश्चितच जागरूक होऊन भारत एक आर्थिक महासत्ता बनेल अशी खात्री वाटू लागते. व त्याचा परिणाम कि काय गेल्या १० वर्षात रुपयाचे मूल्य ४० वरून ६८रुपये प्रती डॉलर एवढे घसरलेले असतांना नुसते “मोदीच निवडून येतील असा मतदारांचा आशावाद” दोन महिन्यात ५९ रुपया प्रती डॉलर पर्यंत मूल्यवर्धन करू शकतो, याचा अर्थ मोदी निवडून येण्याबद्दल किती उत्सुकता व विश्वास आहे हेच दिसून येते.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो!

एक आवाहन: मेरा देश लंगडा हो गया है|आप देशको उठाकर चला दिजीये|

धोरणसमाजजीवनमाननोकरीअर्थकारणराजकारणशिक्षणप्रकटनविचारअभिनंदनप्रतिक्रियामाध्यमवेधबातमीशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

म्हणूनच जाहीरनाम्यात मुद्दा आलेला आहे. जे मतदार भाजपाला निवडून देतील त्याना देखील हा मुद्दा मान्य असेल. पर्यायाने जर बहुमत आले तर लोकशाही पद्ध्तीनुसार कायदा होण्यास काही गैर नाही. त्यातूनही ही प्रक्रीया लोकसभेत चर्चा होणे वगैरे बरीच मोठी आहे व आज पर्यंतचा अनुभव पाहता असले कायदे सहजा सहजी होत नाही.

अर्धवटराव's picture

15 Apr 2014 - 11:25 pm | अर्धवटराव

बहुमताचा फायदा घेऊन राजकारणाच्या प्लॅटफॉर्मवरुन राममंदीरासारखा सामाजीक प्रश्न कायदा करुन सोडवणं भारतातल्या बहुसंख्य धर्मीयांना गैर वाटतं हे भारतीय लोकशाहीच्या प्रगल्भतेचं लक्षण आहे. सामाजीक प्रश्न समाजमान्यतेनेच सोडवायला हवेत. तिथे कोर्ट, कायद्याचं काम पडु नये हेच उत्तम.
(नावावरुन बहुसंख्य धर्मीयतेचा अंदाज बांधला..तो हि केवळ मुद्दा मांडयला म्हणुन)

आभारी आहे अर्धवटराव. मी ह्या वरच्या प्रतिसादाला उत्तर देणे टाळले कारण मग राम मंदिर योग्य कि अयोग्य ह्या विषयावर चर्चा गेली असती.

बहुसंख्य धर्मीय संपत :)

१) सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणखी काँप्लिकेटेड होणार आहे कारण नव्या संशोधनाअंती तिथे ही परिस्थिती निर्माण झाली आहे :

In 2003 it was discovered that there are Buddhist ruins underlying both the Hindu and Muslim layers at Ayodhya.[3]
म्हणजे आधीच इश्यूनं भगवा आणि हिरवा रंग घेतला आहे आता निळा रंग उसळला नाही म्हणजे मिळवली!

२) लोकसभेत पुरेसे संख्याबळ जमल्यास कायदा करून : मालकी हक्क कायद्यात बदल करुन हस्तांतरित होत नाही ही साधी गोष्ट गडकरींना माहिती दिसत नाही. विषय संशोधनाचा आहे, कायद्याचा नाही त्यामुळे भाजपनी सर्व संख्याबळ कामी लावलं तरी काहीही होणार नाही.

३) मुस्लीम समाजाशी सामोपचाराने वाटाघाटी करून : सर्वात मोठा ज्योक! इतका समजूतदारपणा असता तर मॅटर औट ऑफ कोर्ट केंव्हाच सेटल झालं असतं आणि मंदिर (का मशिद) हा मुद्दाच बिजेपी मॅनिफेस्टोत राहिला नसता.

गडकरी सांगतायंत आणि जनता भुलतेयं! मुळात राममंदिरानं देशाचं काय भलं होणार आहे ते बघा.

कवितानागेश's picture

15 Apr 2014 - 11:19 pm | कवितानागेश

गडकरी सांगतायंत आणि जनता भुलतेयं! >
हे अगदी बरोबरच आहे. गडकरींच्या सांगण्यावरुन जनतेनी भुलून जाउ नयेच.
पण म्हणून केजरीच्या आक्रस्ताळ्या वक्तव्यांवरुन तरी का भुलून जावे?
त्यांचा तर अनुभवच नाही. त्यांनी जनतेला काही अनुभव घ्यायचा चान्सही दिला नाही.
आणि नव्यानी चान्सच द्यायचा असेल, तर जनता नक्कीच रहुल गांधीच्या चेहर्‍यावर भाळून त्यालाच देइल, याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. निदान स्थिर सरकार तरी मिळेल.

संजय क्षीरसागर's picture

15 Apr 2014 - 11:32 pm | संजय क्षीरसागर

केजरीवालांच्या वक्तव्याला किंवा राहूलच्या चेहर्‍याला जनतेनं भुलावं की नाही असा विषय नाही. बिजेपीच्या मॅनिफेस्टोत राममंदिर का आलं यावर चर्चा चालू आहे.

विकास's picture

16 Apr 2014 - 12:01 am | विकास

अरे वा! हिब्रू शिकलात तर!

मला वाटते हा अंमळ राँग नंबर असावा. पण ते राहुंदेत, तसे देखील ट्रॅक ठेवणे अवघड जात आहे असे वाटते...

\बिजेपीच्या मॅनिफेस्टोत राममंदिर का आलं यावर चर्चा चालू आहे.

अहो अजून का आलं हे कळले नाही का? तो त्यांचा किमान दोन दशकांचा मुद्दा आहे - प्रत्येक जाहीरनाम्यातला. युरेका युरेका करण्यासारखे यात काहीच नाही आहे. त्यांचा जो मुद्दा आहे तो त्यांनी लिहीला आहे. आता राम मंदीर करणे योग्य आहे का नाही. तसे देखील त्यांच्या ५२ पानाच्या जाहीरनाम्यात राम मंदीर हा विषय केवळ ४९ व्या पानावर, "Cultural Heritage" या सदराखाली एका वाक्यापुरताच आला आहे. BJP reiterates its stand to explore all possibilities within the framework of the constitution to facilitate the construction of the Ram Temple in Ayodhya.

ही चर्चा भाजपाच्या जाहीरनाम्यावर होती जो उरलेली सर्व पाने आणि वाक्यांनी भरलेला आहे. तरी देखील राम जन्मभूमी हा विषय हवे असल्यास वेगळी चर्चा चालू करू शकतो. तसे देखील आता काँग्रेस आणि कॉंग्रेसी कॉम्रेड केजरीवाल यांच्यावर लिहीण्यासारखे काही उरणार नाही अशीच अवस्था दिसत आहे.

अहो अजून का आलं हे कळले नाही का? तो त्यांचा किमान दोन दशकांचा मुद्दा आहे

दोन तीन दशकांपूर्वी भाजपच्या जाहीरनाम्यात संगणकाला विरोध, खाजगीकरणाला विरोध, परकीय गुंतवणुकीला विरोध हे मुद्देही होते. ते आता कालबाह्य झाले म्हणून जाहीरनाम्यात नाहीत. पण राम मंदिराचा मुद्दा मात्र आहे.

लोटीया_पठाण's picture

15 Apr 2014 - 11:52 pm | लोटीया_पठाण

मंदिरामुळे हिंदूंची पराभूत मानसिकता काही प्रमाणात बदलेल. जर आजही ती मशीद उभी असती तर मला तरी अपमानास्पद वाटला असत. रादर बर्याच ठिकाणी असले प्रकार अजूनही आहेत म्हणून वाईट वाटतच.

फायद्याचं तर , जर मंदिर खरच झालं तिथे तर देशी विदेशी लोकांसाठी आयोध्या हे पर्यटनाच खूप मोठ केंद्र होईल.

पोटे's picture

17 Apr 2014 - 2:45 pm | पोटे

मंदिरामुळे हिंदूंची पराभूत मानसिकता काही प्रमाणात बदलेल.

:)

पोटे's picture

18 Apr 2014 - 9:00 am | पोटे

फायद्याचं तर , जर मंदिर खरच झालं तिथे तर देशी विदेशी लोकांसाठी आयोध्या हे पर्यटनाच खूप मोठ केंद्र होईल.

आयला, गंमतच आहे... आता मंदिर बांधा . कशासाठी? तर विदेशी लोकांसाठी !!!

मग मुळात बाबराने तरी काय वेगळे केले होते? तोही विदेशीच होता ना? मग विदेशी बाबरासाठी बांधलेली मशीद पाडून पुन्हा आणखी कुठल्या विदेशी लोकांसाठी अजुन काहीतरी बांधायचं ! गंमतच की ! :)

दिनेश सायगल's picture

16 Apr 2014 - 12:07 am | दिनेश सायगल

क्षीरसागर साहेब घंटीचंद, तोतया प्रेसिडेंट असली काईतरी नावे घेत बसलेत. हे कोण आयडी आहेत? इथल्या चर्चेत तर नाई दिसले बुवा.

गब्रिएल's picture

16 Apr 2014 - 12:15 am | गब्रिएल

दिनेश साय्ब, तुमी इतं नवे दिस्ताय. आवो, संक्शीसाय्बांना डायरेक वरून आवाज ऐकू येत्यात आनि मंगे त्ये लिवतात. म्हंजे त्ये म्हन्तील त्येवडच खरं, बाकी सारं झूट बर्का. संबाळून. जोरात हासू नाका, नायतर त्ये तुमालाबी कायबाय नाव ठेवत्याल बर्का. :)

दिनेश सायगल's picture

16 Apr 2014 - 12:24 am | दिनेश सायगल

थेट हायकमांडकडून सूचना येतात का सोनियाजींसारखा आतला आवाज येतो?

गब्रिएल's picture

16 Apr 2014 - 10:25 am | गब्रिएल

न्हाय न्हाय. त्ये स्वयबू हाय्त. ते सोताच्या मनाचंबि ऐकत न्हाय्त. आसाच कयबाय आवाज आंत्राळातून येत आसावा. पन यकदा संक्शिनि ष्टँण्ड घ्यतला कि मंग कोनाच्याबी बाला त्यो बदल्ता येत न्हाय, खुद त्येनला सोतालाबी. लय खत्री परकरन हाय बर्का.

संजय क्षीरसागर's picture

16 Apr 2014 - 12:26 am | संजय क्षीरसागर

घंटीचंद आरती करण्यात प्रसिद्ध आहेत. सध्या त्यांनी आरत्या थांबवल्या आहेत त्यामुळे त्यांना नांव बदलून हवंय. तोतया प्रेसिडेंट हे १८५७ च्या आकडेवारीवरुन २०१४ ची राजकीय भाकीते करण्यात प्रविण आहेत. शिवाय कॉपीपास हे मजकूर न वाचताच पेस्ट करण्यात तरबेज आहेत. सर्किटेश्वर हे अगम्य प्रतिसाद देण्यात माहिर आहेत. आणि गार्बेज-रियल हे कोण आहेत ते तुम्हाला त्यांचे (गार्बेजियन) प्रतिसाद बघता क्षणी लक्षात येईल, वाचायची गरजच नाही!

दिनेश सायगल's picture

16 Apr 2014 - 12:29 am | दिनेश सायगल

माहितीसाठी धन्यवाद! तुम्ही नावं भारीपैकी ठेवताय साहेब! एखादे सटायर का लिहीत नाही?

विकास's picture

16 Apr 2014 - 12:48 am | विकास

तुम्हाला आत्तापर्यंत वाचलेले प्रतिसाद होते असे वाटले का? ;)

गब्रिएल's picture

16 Apr 2014 - 10:29 am | गब्रिएल

+१००० हाणूमोदन !

लै मणोरणजण व्हतय बगा.

आजाबात 'टायर' न व्हता 'सटायर' कर्न्याचा वर्ल्ड विकरम है त्येंच्या नावावर. आनि ते रोज त्येला तोडत्यात. हात कुटं ?

सिद्धार्थ ४'s picture

16 Apr 2014 - 1:31 am | सिद्धार्थ ४

सगळे प्रतिसाद वाचून खेदाने म्हणावेसे वाटते आहे कि ""तुम्हारा चुक्याच" मोदींच्या बाजूने बोलणारे ओपन मैन्डेद वाद घालत आहेत. पण तुम्ही....

गब्रिएल's picture

16 Apr 2014 - 10:31 am | गब्रिएल

आवो, त्येंचा मनावर्च इश्वास नाय. मंग त्येला ओपन-क्लोस कस काय कराय्च त्ये कस कल्नार, हां ?

आचारसंहिता लागू झाली म्हणे.....आता ही चर्चा चालू ठेवता येइल की नाही?

विकास's picture

16 Apr 2014 - 9:45 am | विकास

जो पर्यंत विचारसंहीता लागू झालेली नाही तो पर्यंत चर्चा बंद करण्याचे कारण नाही.

असंका's picture

16 Apr 2014 - 9:53 am | असंका

Being a confused accountant..आपलं म्हणणं कळायला थोडा वेळ लागला! पण आपणच सांगा, वरील किती प्रतिसाद विचार करून आले आहेत आणि किती प्रचारातून....

आयुर्हित's picture

16 Apr 2014 - 11:14 am | आयुर्हित

उद्याचा दिवस (१७ एप्रिल २०१४)महाराष्ट्रातील व देशातील जनतेसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे.प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून देशाला सुशासन प्रदान करून विकास घडवून आणणारे स्थिर सरकार भरघोस मतांनी निवडून आणावे, हीच मायबाप जनतेला विनंती.

https://www.youtube.com/watch?v=Cbmz7eE9LBg

https://www.youtube.com/watch?v=0MUVIaEte0Q

प्रयत्न आतापर्यंत केला. भ्रष्टाचाराला तर सगळेच कंटाळले आहेत. सर्व गोष्टींचा समग्र विचार करुन आपलं मत बनवा. आणि मतदान करा.

प्यारे१'s picture

16 Apr 2014 - 2:40 pm | प्यारे१

>>> निधर्मी आणि इश्यू बेस्ड व्हावं

>>> भ्रष्टाचाराला तर सगळेच कंटाळले आहेत. सर्व गोष्टींचा समग्र विचार करुन आपलं मत बनवा. आणि मतदान करा.

हम्म्म्म!

संजूबाबा, त्वा न्हेमी बरोबर म्हन्तो. म्हनन्याची स्टाईल चुकाती. दुसर्‍याची अक्कल काडून सोत्ताची वाडत न्हाय रं राजा. कवा समजनार तुला? जरा शान्यावानी वाग की!

कवितानागेश's picture

16 Apr 2014 - 6:26 pm | कवितानागेश

@ प्रशांत आवळे,
अरे वेड्या मना तळमळसि... =))

प्यारे१'s picture

16 Apr 2014 - 6:47 pm | प्यारे१

:P

कवितानागेश's picture

16 Apr 2014 - 6:25 pm | कवितानागेश

भ्रष्टाचारापेक्षा जास्त उद्दामपणाला सगळे जास्त कंटाळले आहेत.

सलमान खान चे वडील सलीमखानने सुरु केले नरेन्द्र मोदींचे उर्दू संस्थळ

Salman Khan's father Salim Khan launches Modi's website in Urdu

www.narendramodi.in

ती मुलाखत लागल्यावर पाच मिनीटातच काय प्रकार आहे ते लक्षात आलं होतं!

Narendra Modi interview was 'paid news', alleges Congress complaint

आयला, ही बातमी मतदानाच्या फक्त एक दिवस आधी प्रसिद्ध व्ह्यायला हवी होती! पंतप्रधान होण्यासाठी हा सत्तालोभी माणूस काहीही करु शकतो हे पुन्हा अधोरेखित झालं. आणि पैश्यासाठी रजत शर्मा कितीही वाकू शकतो याची लांछनास्पद प्रचिती आली.

आज NDTV चे संचालक आणि संपादक कमार नक्वी यांनी राजिनामा दिला आहे.

मोहन's picture

17 Apr 2014 - 3:13 pm | मोहन

आत्ताच मतदानाच हक्क बजावुन आलो. आयुष्यात पहिल्यांदाच ४५ मी. लायनीत ऊभे राहावे लागल्याचा आनंद झाला !. आमच्या बूथ वर १ वाजे पर्यंत ३९.७ % मतदान झाले होते. ६० % नक्कीच ओलांडू असे वाटते. मतदान जास्त झाल्याचा फायदा ......

" अब की बार मोदी सरकार " नक्की

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे ‘सबका साथ, सबका विकास‘ हेच मुख्य ध्येय असल्याचे, आज (सोमवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या अभिभाषणातून स्पष्ट केले. राष्ट्रपतींनी आज दिलेल्या अभिभाषणात समाजातील सर्व घटकांवर प्रकाश टाकताना विकास हाच मुख्य नारा असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी ‘ट्रेडिशन, टॅलेंट, टुरिजम, ट्रेड आणि टेक्नॉलॉजी‘ या पाच ‘टी‘ ला प्रधान्य देण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

अभिभाषणातील ठळक मुद्दे -
- यंदाचे अधिवेशन फलदायी असेल अशी आशा
- सबका साथ, सबका विकास या धोरणाने सरकार चालणार
- 66 टक्के मतदान आणि एका पक्षाला बहुमत हे 30 वर्षांतल वैशिष्ट्य
- एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने परिणामकारक सुशासन शक्य
- गरिबी हटविण्याचे हे सरकारचे मुख्य ध्येय
- भारतात भ्रष्टाचाराला स्थान नसेल, महागाई कमी करण्याचे सरकारचे ध्येय
- पाण्याच्या प्रत्येक थेंबाला महत्त्व देत पाण्याच्या सुरक्षेला सरकारचे प्राधान्य असेल
- काळ्या पैशांबाबत सरकार ठोस भूमिका घेत आहे
- भारताला लागलेला दारिद्र्याच्या शाप मिटविण्याचे ध्येय माझ्या सरकारसमोर आहे
- किमान सरकार, कमाल कामकाज हे धोरण ठेवा
- जनतेने भ्रष्टाचार आणि विकासाच्या मुद्यावर मतदान करत स्थिर सरकार निवडून येण्यासाठी मतदान केल्याबद्दल नागरिकांचे अभिनंदन
- ई-गव्हर्नन्सचा वापर प्रभावी करणार
- जलसुरक्षा व जलप्रकल्पांवर विशेष भर देण्यात येणार आहे
- पंचायत राजच्या माध्यमातून खेड्यांची स्थिती सुधारणार
- यंदा पाऊस कमी होणार असल्याने योग्य उपाययोजनांसह सरकार तयार आहे
-रखडलेले जल संधारणाचे प्रकल्प पूर्ण करणार
- राष्ट्रीय ई-लायब्ररीची स्थापना, प्रत्येक राज्यात आयआयटी व आयआयएमची स्थापना करणार
- तरूणांना योग्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी देणार
- ग्रामीण-शहरी भागातील दरी मिटविण्याचा प्रयत्न करण्यात येणार
- ग्रामीण क्रीडाप्रकारांकडे लक्ष देणार
- बेची बचाओ, बेटी बढाओ योजनेअंतर्गत मुलींची संख्या वाढविण्यास मदत करणार
- आरोग्य सेवांवर भर, नवीन युवा धोरण आणि योगाचा प्रसार करण्यात येणार
- समान शिक्षण पद्धती राबविणार, तरूणांसाठी ऑनलाईन कोर्सेस राबविणार
- स्वस्थ भारत मिशनच्या माध्यमातून सार्वजनिक शौचालयांवर भर देणार
- पंतप्रधान कृषी सिचन योजनेच्या माध्यमातून जल अधिकार देणार
- शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करणार
- मदरशांच्या विकासासाठी योजना राबविणार
- व्हर्चुअल क्लासरूमसाठी प्रयत्न करण्यात येणार
- लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यास कटिबद्ध
- महिलांवरच्या वाढत्या अत्याचारांविरोधात ठोस भूमिका घेणार
- ईशान्य भारतातल्या घुसखोरीबाबत ठोस करवाई, काश्मिरी पंडीतांना पुर्नप्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार
- राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून आरोग्य योजना
- सरकारच्या कामांसाठी सोशल मिडियाचा वापर करणार
- न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणार, न्यायप्रक्रिया अधिक सोपी व जलद करणार
- एफडीआयच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी वाढविणार
- जलदगती रेल्वेसेवेसाठी चतुष्कोन प्रकल्प उभारण्यात येणार
- महागाई वाढली आहे, कर वसुलीचा दर वाढविण्यासाठीचा गरज
- उत्पादन वाढीसाठी एक खिडकी योजना आणणार
- कामगार केद्रीय उत्पादन, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करणार
- छोट्या शहरांना जोडण्यासाठी किफायतशीर विमानतळे बांधणार
- प्रत्येक कुटुंबाला पक्क घर आणि 24 तास वीज हे 2022 पर्यंतचे लक्ष्य
- लष्करासाठी एक पद, एक निवृत्तीवेतन योजना आमलात आणण्याचा प्रस्ताव
- दहशतवादाबाबत ठोस भूमिका, दहशतवाद स्वीकाराला जाणार नाही
- रेल्वेचे आधुनिकीकरण करणार, बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार
- संरक्षण दलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
- राज्य आणि केंद्र सरकारने टीम इंडियाप्रमाणे काम करावे
- प्रत्येक गाव ब्रॉड ब्रँडने जोडणार, लघु उद्योगांना चालना देणार
- जीएसटी लागू करून अर्थव्यवस्था ट्रॅकवर आणणार
- भारतीय भाषांना विकसित करणार
- रेल्वेमधील सुरक्षा आणखी मजबूत करणार
- ऊर्जा क्षेत्राचा विकास करणार
- 100 नवी शहरे बनवली जाणार
- काळा पैसा परत आणण्यासाठी SIT ची स्थापना झालेली आहे
- राज्य आणि केंद्र सरकारने टीम इंडियाप्रमाणे काम करावे

साभारः 'सबका साथ, सबका विकास' हेच ध्येय - राष्ट्रपती

आयुर्हित's picture

7 Apr 2015 - 1:20 am | आयुर्हित

The “Modi Magic” continues in India. Ever since last May’s election of new Prime Minister Narendra Modi, India has been showered with good fortune.

Here’s one way to measure India’s new found flow of money: India’s foreign exchange reserves rose $1.39 billion in the last week of March alone, putting the Reserve Bank of India's (RBI) rainy day fund at $341.37 billion. India is no longer far behind its other BRIC peers. Russia’s Central Bank has $360 billion. Brazil has $371 billion.

The Indian currency has gained 2% against the dollar this year, which is not easy.

Everyone is bullish on Modi. That is making the government richer, and in turn making India richer as well.

Modi and his BJP party continue pushing through reforms, hoping to attract investment.

साभार Forbes Look How Rich India's Become Under New Prime Minister Modi

Initiatives taken for New Vibrant India
Make in India with German subtitles
Published on Sep 24, 2014

मोदी सरकारचा अजेंडा स्पष्ट करतांना भारताचे जर्मनीतील राजदूत श्री विजय गोखले
Hannover Messe Preview, Berlin
Published on Feb 4, 2015

नवी दिल्ली : बँकिंग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने मार्च महिन्यात नोकरभरतीचे प्रमाण ९ टक्क्यांनी वाढल्याचे जॉब पोर्टल 'नोकरी डॉट कॉम'ने म्हटले आहे. मार्च २०१५मध्ये बँकिंग आणि वित्तविषयक सेवा क्षेत्रातील नोकरभरतीचे प्रमाण गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत १२५ टक्क्यांनी वाढले आहे. तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण १७ टक्क्यांनी वाढली आहे. 'चालू वर्ष देशात नोकऱ्यांसाठी खरोखरच अच्छे दिन घेऊन येणारे ठरले आहे. महानगरांमध्ये आणि उद्योगांमध्ये चांगली संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे,' अशी शक्यता नोकरी डॉट कॉमचे कार्यकारी उपाध्यक्ष व्ही. सुरेश यांनी व्यक्त केले.

साभार: मटा मार्चमध्ये वाढले नोकरभरतीचे प्रमाण
Apr 14, 2015, 05.11AM IST