जत्रा-२

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
3 Nov 2007 - 12:20 am

या आधी : जत्रा १

दुसर्‍या दिवशी सकाळी जरा लवकरच उठलो सगळे. मोनीने त्या थंडीतही पहाटे पहाटे बेकरीतून गरमागरम ताज्या पावांचे खास बायरीश प्रकार आणले होते.भरपूर कॉफीबरोबर त्याचा समाचार घेत एकीकडे "आवरा रे लवकर" चा धोशा एकमेकांना लावत होतो.ख्रिसने कालचे उरलेले ब.वडे पावाबरोबर खाणे पसंत केले.(ह्याला एकदा कुंजविहार मध्ये नाहीतर वडापावच्या गाडीवरच न्यायचं आहे मला, खा लेका किती खातोस ते...) गाडी जत्रेत नेण्यात अर्थ नव्हताच,एकतर पार्किंगचा प्रश्न होता आणि महत्त्वाचे म्हणजे गाडी चालवण्यासाठी स्वतःच्या बिअर पिण्यावर बंधन घालून घेण्याइतका कोणी उदार नव्हता! त्यामुळे सबवे ने जत्रेच्या ठिकाणी म्हणजे 'दि विसन' ला पोहोचलो.

'दि विसन' म्हणजे खरं तर 'थेरेसिअनविसं'!हे विस्तीर्ण पटांगण राजकन्या थेरेसाच्या नावाने ओळखले जाते, त्याचे लघुरुप 'दि विसन'असेच बायरीश मंडळीत आणि आता सर्वत्रच प्रचलित आहे. आपले सर्कसचे तंबू असतात ना,तसे भव्य १४ तंबू या विस्तीर्ण पटांगणावर उभारले जातात. एकेका तंबूत ४,५ हजार जणांची बसण्याची,खाण्यापिण्याची,नाचण्यागाण्याची सोय असते. ह्या तंबूंमध्ये फक्त म्युनशनच्याच ब्रुअरीज बिअर विकू शकतात. लॉवेन ब्राऊ,होफ ब्राऊहाऊस,ऑगस्टीनर ब्राऊ,पॉलानर ब्राऊ,हाकर शॉर आणि स्पानटेन यांच्या छावण्या असतात इथे! आणि यांच्या आजूबाजूलाही लहानमोठी पालं ठोकलेली असतात. तिथे वाईस वुर्ष्टच्या १ फूटी जंबो नळ्या,बुढ्ढीके बाल,बर्फाचे गोळे, पाकवलेले बदाम,लेबकुकन म्हणजे बायरीश खासियतीची लवंग,दालचिनीच्या स्वादाची मसाला बिस्किटे, भिरभिर्‍यांच्या गाड्या,जत्रेतले पाळणे,डोंबार्‍यांचे खेळ.. एक ना दोन अशा अनेक गोष्टींनी ही पालं फुललेली असतात आणि सानथोर सारेच जत्रेचा आनंद लुटत असतात.

साधारण साडेनऊच्या सुमाराला आम्ही दि विसनला पोहोचलो. सगळेच्या सगळे तंबू तुडुंब भरून ओसंडत होते. आम्हाला खरं तर लॉवेन ब्राऊ मध्ये जायचं होतं पण तिथे ऑलिवर कहान येणार अशी खात्रीची बातमी मिळाल्याने लोकांनी एकच गर्दी केली होती. कहान पेक्षा आम्हाला ही जत्रा अनुभवायची होती त्यामुळे आम्ही मोर्चा ऑगस्टीनरकडे वळवला तर तिथेही अशीच गर्दी ! तिथे म्हणे बेकर येणार होता. आम्ही मनातून वैतागलो. 'यांच्या' उत्सवमूर्तींच्या नादात आमची वारी फुकट जाते की काय? असे वाटायला लागले. एवढ्यात मोनी गायब झाली. आता ह्या गर्दीत हिला कुठे शोधायचे? आम्ही विचार करत असतानाच ख्रिसचा भटक्या ओरडला. आजूबाजूच्या कलकलाटात आणि गोंगाटातून ऐकत एकदाचा मोनीचा ठावठिकाणा समजला. वाट काढत काढत आम्ही पॉलानर पाशी पोहोचलो खरे पण ही बया कुठेच दिसेना! परत तिला भटक्यावर संपर्क करणार तोच सिक्युरीटीचे दोन जवान आमच्याच दिशेने येताना दिसले. हे आपल्याला हाकलून द्यायलाच आलेत या ठाम समजूतीने आम्ही दोघांनी आपल्याला एक अक्षरही समजत नाही असा आव आणला तर ख्रिस आणि सुझनने आम्ही बहिणीला कसे शोधत आहोत ते पटवायला सुरूवात केली‌. शेवटी ते दोघेच म्हणाले,"मोनिका ना? तिचाच निरोप घेऊन आलोय आम्ही. चला आमच्या बरोबर..." अवाक होत आम्ही त्यांच्यामागे जायला लागलो. मुख्य प्रवेशदाराकडे न जाता आम्ही एका बोळात शिरलो. पिऊन दंगे करणार्‍यांना बाहेर काढण्याचा मार्ग होता तो! असे मागच्या दाराने आम्ही एकदाचे आत तर शिरलो...



बाहेर पावसाची भुरभुर आणि थंडीचा कडाका होता तरी आत मात्र उबदार वातावरण होते. बायरीश पारंपरिक कपड्यांनी नटलेले स्त्रीपुरूष, बायरीश खासियतींचे वस्तूविक्ये आणि संगीताची आणि सोनेरी जामांची नशिली नजाकत! अहाहा... मोनिकाने आपला बायरीशपणा पणाला लावत,"आमचे मित्र भारतातून खास ऑक्टोबर फेस्ट पहायला आलेत, त्यांना काय तसेच परत पाठवणार तुम्ही?"असा सवाल करून सिक्युरिटीवाल्यांना कसे पटवले ते तिखटमीठ लावून सांगून आम्हाला मागच्या दाराने का यावं लागलं याचं स्पष्टीकरण दिलं. चंचूप्रवेश तर केला, आता बसायला बाकडी शोधत फिरत होतो. मध्यभागी जरा उंचावर सुबकसा स्वरमंच होता आणि चहुबाजूला चक्क रामभरोसेच्या टपरीतल्या सारखी लाकडी बाकडी आणि टेबले होती. सगळा तंबू निळ्या आणि पांढर्‍या रंगाने नटवला होता. फुगे,पताका,कनाती सारे काही निळे, पिवळे आणि पांढरे! शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला कसा सगळा शिवाजीपार्क भगवाकेशरी होतो ना? त्याची आठवण झाली. ह्या तंबूं मध्ये ठिकठिकाणी छुपे कॅमेरे लावलेले असतात. गैरवर्तन करणारे, 'जास्त' झाल्याने दंगा करणारे किवा 'लुडकणारे'यांच्या वर लक्ष ठेवत कॅमेरे आपले काम चोख बजावत असतात. असे कोणी आढळलेच तर त्यांना त्वरित बाहेर काढले जाते. बसायला जागा नसेल तर 'खानपानसेवेचा' लाभ मिळत नाही. त्यामुळे आम्हाला कुठेतरी बाकडे पकडून बसणे आवश्यकच होते‌. इथे तर लोकं मोक्याच्या जागा आधीपासूनच पकडून वाइस वुर्ष्ट+ सेंफ ( पांढरी सॉसेजेस+ मस्टर्ड सॉस ) आणि पोमीज म्हणजे फ्रेंच फ्राईजचा फडशा पाडत होते. वाईस वुर्ष्ट ही खास बायरिश खासियत फक्त १२वाजेपर्यंतच मिळते,तेवढ्यात मोनीने माहिती दिली. आता आम्हाला ते खायला मिळणार की नाही? असा प्रश्न मनात घेऊन आशाळभूतासारखे रिकामी जागा कुठे दिसते का पाहत फिरत होतो.सगळी बाकडी तर आधीच भरली होती. पुन्हा एकदा आपला बायरिशपणा पणाला लावत त्यातल्याच एका बाकड्यावरच्या ५,६ जणांना "घ्या की राव जरा सरकून.." असा प्रेमळ दम भरत मोनीने एकदाची जागा मिळवली. खच्चून भरलेल्या गाडीच्या जनरल डब्यात कशी जागा मिळवतो? त्यातलाच प्रकार होता तो! हळूहळू (म्हणजे २ मास सगळ्यांच्या पोटात गेल्यावर) आम्हाला सगळ्यांना त्या बाकड्याने आणि बाकड्यावरच्या मंडळींनीही सामावून घेतले.ती मंडळी कार्ल्सरुह ची होती आणि दरवर्षीची वारकरी होती. आमचा नवखेपणा आणि परदेशीपण याचे त्यांना कुतुहल वाटत होते. त्यामुळेच मोनीताईंच्या दादागिरीला त्यांनी चालवून घेतले. आता आम्ही 'आतले' झालो होतो आणि 'बाहेरच्यांना' इथे कशी अजिबात जागा नाही ते पटवत होतो.

आम्हीही आता बायरीश खासियतीचा समाचार घ्यायला सुरूवात केली. ब्रेत्सेल म्हणजे मीठाचे स्फटीक लावलेला बदामाच्या आकाराचा खास बायरीश पाव आणि हेंडेल म्हणजे तर जर्मन चिकन तंदूरीची 'आर्डर' ताईंनी दिली. आणि एकदम मध्यभागीच्या स्वरमंचावर वाद्यवृंदाचे बायरीश संगीत सुरू झाले. लोकवृंदही त्या तालावर आपापले चषक उंचावून मित्रमंडळींना प्रोस्ट (चिअर्स) करू लागला. आमच्या कार्ल्सरुहच्या मंडळीनीही प्रोस्ट करत नवीन मैत्रीचा चषक उंचावला!
ही रसवंतीगृहे सकाळीच सुरू झाली होती ती पार मध्यरात्रीपर्यंत चालूच राहणार होती...संगीताची आणि सोनेरी जामांची जादू हळूहळू भुरळ घालायला लागली होती‍. जत्रा अनुभवायला आता खरी सुरुवात झाली होती...

प्रवासलेख

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

3 Nov 2007 - 2:02 am | बेसनलाडू

लेख बराच 'प्रेक्षणीय' आहे :) आवडला :)
(प्रेक्षक)बेसनलाडू

नंदन's picture

3 Nov 2007 - 2:06 am | नंदन

जत्रा रंगत चाललीय. वर्णन आणि छायाचित्रे - दोन्ही गोष्टी मस्तच. अगदी 'काठोकाठ भरु द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या' सारखा जल्लोष जत्रेत रंगतना दिसतो आहे.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

गुंडोपंत's picture

3 Nov 2007 - 2:47 am | गुंडोपंत

वा क्या बात है... मजा आ गया...!
मोनिकाबाईंमुळे फेस्ट चे काम जमलेच म्हणायचे तर...

ह्या तंबूं मध्ये ठिकठिकाणी छुपे कॅमेरे ... म्हणजे दारू प्यायची पण राडा नाही असंच असणार ते! ;)

"ही रसवंतीगृहे सकाळीच सुरू झाली होती ती पार मध्यरात्रीपर्यंत चालूच राहणार होती...संगीताची आणि सोनेरी जामांची जादू हळूहळू भुरळ घालायला लागली होती‍. "
काय छान लिहुन जाता हो तुम्ही... आवडले!

क्षमा करा... गुंडोपंतांचे ज्ञान जरा जुनाट असते म्हणून विचारावे लागते आहे....
हा ऑलिवर कहान कोण बॉ?

या लेखाची शैलीवेगळी भासली...लेख मस्त जमलाय.
वाचायलाही मजा येतेय.
आपला
गुंडोपंत

बेसनलाडू's picture

3 Nov 2007 - 4:00 am | बेसनलाडू

म्हणजे जर्मनीचा लाडका माजी फुटबॉल खेळाडू, कप्तान-गोलकीपर ना? आठवा २००२ विश्वचषक फायनल ... ब्राझील वि. जर्मनी ... ऑली त्या सामन्यानंतर निवृत्त झाला असे वाटते. जर्मनीचे विश्वकप विजयाचे स्वप्न अर्धवटच राहिले त्यावेळी.
Oliver Kahn
(ऑली काह्न फ्यान)बेसनलाडू

प्रमोद देव's picture

3 Nov 2007 - 7:31 am | प्रमोद देव

खूपच छान! अगदी साद्यंत वर्णन केल्यामुळे तो माहोल अनुभवता येतोय.

सहज's picture

3 Nov 2007 - 8:11 am | सहज

आज जर्मन रेस्टॉरंटमधे गाडी वळणार आमची तर!!

खरं तर सगळ एका वेळी एक खायच्या प्यायच्या कितीतरी गोष्टी वर लिहल्या आहेत, डायट गेले उडतं

बेक्स, स्प्राइट घरी आहे तेवढेच दुधाची ताकावर...

झकास!!!!!!!!

मस्त आनंद देऊन जाणारे लेखन करता तुम्ही हे असे नाही तर पाककृती!!

उग्रसेन's picture

3 Nov 2007 - 8:41 am | उग्रसेन

बै साब,तुमी लिव्हता लै भारी. मह्या गावाकडच्या म्हसोबाच्या जत्रेतबी खा,प्याची लै धूम राह्ती.पर, कुट तुमची जरमली आन कुट मही म्हसोबाची वाडी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2007 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त झालाय जत्रेचा दुसरा भाग.
जत्रेततील वर्णन तर खासच झाले आहे, आपल्या ओघवत्या शैलीतील लेखनामुळे जत्रेत सहजपणा आलेला आहे.
चित्र पाहता पाह्ता भाग लवकर वाचून झाला. लुडकणा-यांवर, गोंधळ घालणा-यांवर कॅमे-याची नजर असते त्यामुळे अनेक उत्साही लोकांना आपला उत्साह आवरता घ्यावा लागत असेल ! :) बाकी सर्वच ग्लासात बीअरचा फेस झालेला दिसतो, इकडे तसे झाले असते तर वेटरला शिव्या घातल्या असत्या आम्ही, आणि सांगू का तुझ्या सेठ ला ! अशी जाता जाता धमकीही दिली असती ! :) बाकी चिकनच आहे ना ते लटकलेले, तोंडात पाचक रस तयार झाला बॉ ! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2007 - 6:55 pm | स्वाती दिनेश

हो ,ते चिकनच आहे.आपल्या तंदूरी चिकनचाच जर्मन अवतार! मागच्या भागात तुम्ही आणि तात्याने विचारले होते ना,बिअर बरोबर चिकन मिळते का 'चकणा' म्हणून? म्हणून मुद्दाम तो फोटो टाकला आहे.:)
असेच दिवसभर खाणे,पिणे,नाच गाणे चालू होते,हीच जर्मन जत्रा! त्यामुळे 'जत्रा' संपली,आता परत जपानवारी,:)
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Sep 2008 - 6:25 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच...

मला हा धागा माहितीच नव्हता. या वर्षीच्या ऑक्टोबरफेस्ट बद्दल स्वातीताईला खरड टाकली तर तिने दिला दुवा. लेख आणि फोटो झकासच आहेत. जायला पाहिजे एकदा... :)

बिपिन.

जैनाचं कार्ट's picture

25 Sep 2008 - 6:23 pm | जैनाचं कार्ट (not verified)

हे छगलं माझ्या साठी =P~

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Sep 2008 - 6:28 pm | बिपिन कार्यकर्ते

ए... आशं नाय काय... ताई म्हनाली जे काय पन आसेल ना ते नीट छान्या मुलांछालकं वाटून घ्या... ते छगले ग्लाछ पायजे तर घे तुला, बाकीचं माला... चालेल?

जैनाचं कार्ट's picture

25 Sep 2008 - 6:30 pm | जैनाचं कार्ट (not verified)

अछं कसं.... त्यात जे पाणी हाय नव्हं फेसाचं ते पाणी माझं .... फेस आनी ग्लास तुझं .. हे ठिक आहे !
मी मोठा आहे ना... मग लहानांनी मोठ्यांचे एकावे ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

सुनील's picture

26 Sep 2008 - 9:41 am | सुनील

त्यात जे पाणी हाय नव्हं फेसाचं ते पाणी माझं .... फेस आनी ग्लास तुझं .. हे ठिक आहे !
एकदम ठीक आहे!!

पाणी जैनांच्या कार्ट्याला!
फेस आणि ग्लास बिपिनला!!
आणि ...
बाकी सगळं मला!!!

कसं??

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

जैनाचं कार्ट's picture

26 Sep 2008 - 9:46 am | जैनाचं कार्ट (not verified)

बाकी फक्त ती सुहास्यवदना नवयुवती राहते सुनील !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

सुनील's picture

26 Sep 2008 - 9:54 am | सुनील

बाकी फक्त ती सुहास्यवदना नवयुवती राहते सुनील !
तेच तर म्हणतोय मी ..........

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2008 - 8:55 pm | प्रभाकर पेठकर

ऑक्टोबर फेस्ट्चे सुंदर चित्रवर्णन. मजा आली वाचताना. च्यायला, कमीत कमी एक चिल्ड बिअर गटकावत वाचायला पाहिजे होता लेख. असो.
अभिनंदन.

धनंजय's picture

25 Sep 2008 - 11:55 pm | धनंजय

त्या जलतरंगापाशी मला नेले असते तर त्यापुढे मधल्या तीन स्वरांचे काही खरे नव्हते.

त्यानंतर उरलेले दोन प्यालेही रिकामे केले असते म्हणा. डिस्क्रिमिनेशन किती वेळ चालू द्यायचे...

शितल's picture

26 Sep 2008 - 7:43 am | शितल

स्वाती ताई,
जत्रा आवडली.:)
जत्रा भाग -१ आणि हा दोन्ही भाग वाचल्यावर केवळ जत्रेला फिरून आल्यासारखे वाटले.
:)
पण खाण्या पिण्याचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक असताना कसे मॅनेज होत असेल हा ही प्रश्न मला पडला आहे. :(