मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
2 Nov 2013 - 5:16 am

मंडळी,

दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

आता तर संस्कारभारतीच्या रांगोळ्यांमुळे अगदी अंगणभर चितारता येतील असे नमूने व उत्तम रंगसंगती ठिकठिकाणी दिसून येते. रांगोळी रेखताना अगदी मान पाठ एक झाली तरी त्या नक्षीकडे येणारे जाणारे जेंव्हा क्षणभर थांबून बघतात तेंव्हा त्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अशाचप्रकारच्या रांगोळीसाठी ही स्पर्धा! मिपाकरांच्याही घरात छुपे कलाकार असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत. रांगोळीत तेवणार्‍या पणत्या असल्या तरी एकंदर फक्त 'रांगोळीची शोभा' हा मुद्दा प्रामुख्याने लक्षात घेतला जावा. कलाकुसर, रंगसंगती याला गुण आहेत.

आपण रांगोळ्यांचे फोटो १० नोव्हेंबरपर्यंत चढवू शकता. सगळे मिपाकर सदस्यच परिक्षक आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या पसंतीच्या तीन रांगोळ्यांस क्रम द्यावा. याठिकाणी आपल्या स्पर्धकांशी असलेल्या मैत्रीपेक्षा कलेला न्याय देणे अपेक्षित आहे. सर्व मते मोजून संपादक मंडळ २० नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करेल. पहिल्या ३ विजेत्यास्/विजेतीस आंतरजालीय प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.

हे ठिकाणसमाजजीवनमानराहणीमौजमजाछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

पियुशा's picture

10 Nov 2013 - 11:38 am | पियुशा

हेल्प हेल्प हेल्प !!!!
मला पण इथे पोस्ट करायच्यात रांगोळ्या पण जमत नाहिये फ्लिकरची लिंक घेत नाहिये , लाल फुली दिसतेय इमेज च्या जागेवर , काय करु आता पट्कन सांगा फोटो कसे अपलोड करु आता मी ?

कवितानागेश's picture

10 Nov 2013 - 12:38 pm | कवितानागेश

पिकासावर टाक किन्वा लिन्क दे. बघते मी.

पियुशा's picture

10 Nov 2013 - 1:03 pm | पियुशा

ओक फाइन जमले एकदाचे फोटो लोड्वायचे ;)
ही माझी गेल्या वर्षीची
q

p
s
ही अजुन एक गेल्या वर्षी शॉप फ्लोअरला काढलेली
g

z

अन ह्या बाकिच्या ह्या वर्षी काढलेल्या
r
l
g
x

अत्रुप्त आत्मा's picture

10 Nov 2013 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा

अफाट...! :)

यशोधरा's picture

15 Nov 2013 - 7:09 am | यशोधरा

वा! अ फा ट!

त्रिवेणी's picture

10 Nov 2013 - 10:07 pm | त्रिवेणी

कसली कलाकार आहेस ग. वरची रांगोळी तर खुपच सुरेख.

पियुशा's picture

12 Nov 2013 - 1:06 pm | पियुशा

धन्स हो :)

सुधांशुनूलकर's picture

10 Nov 2013 - 11:02 pm | सुधांशुनूलकर

।। श्री गुरवे नमः ।।

सगळ्या रांगोळ्या किती सुंदर आहेत!
कुणाला बक्षिस द्यायचं हे ठरवणं म्हणजे परीक्षकांची परीक्षाच आहे.

सर्वांचाच,
सुधांशुनूलकर

आजकाल मोरांवर जास्तचं जोर दिला आहे असे निरीक्षण नमूद करतो.

राजमुद्रा२१'s picture

12 Nov 2013 - 8:05 am | राजमुद्रा२१

image03

image12

सायली's picture

12 Nov 2013 - 1:01 pm | सायली

क्रमांक २ ची रांगोळी विशेष आवडली.

पियुशा's picture

12 Nov 2013 - 1:09 pm | पियुशा

राजमुद्रा रांगोळ्या खुप देखण्या आहेत :)
मीही एक अशीच रांगोळी काढ्लेली लक्ष्मीची , स्पर्धेत पहील बक्षीस मिळाल होत गेल्या वर्षी, पण सध्या तिचा फोटो नाहिये माझ्याकडे :(

राजमुद्रा२१'s picture

14 Nov 2013 - 7:11 pm | राजमुद्रा२१

धन्यवाद पियुशा,
फोतोसाठी वाईट वाटून घेऊ नकोस, तुझ्या हातात्च कला आहे, फोटो काय कितीही काढता येतील :)

राजमुद्रा२१'s picture

14 Nov 2013 - 7:07 pm | राजमुद्रा२१

धन्यवाद सायली

जेनी...'s picture

15 Nov 2013 - 1:48 am | जेनी...

आ:हा:

उल्हासनिय :

मस्त रांगोळ्या! मिपाचे रांगोळी प्रदर्शन सुंदर सजले आहे!!काय एकेक कलावंत आहेत!!

मुक्त विहारि's picture

12 Nov 2013 - 9:12 am | मुक्त विहारि

झक्कास

दिपक.कुवेत's picture

12 Nov 2013 - 1:45 pm | दिपक.कुवेत

एक से बढकर एक....रंगसंगती तर अप्रतीमच.

भाते's picture

12 Nov 2013 - 2:12 pm | भाते

वरच्या सर्वच रांगोळ्या फारच सुरेख आहेत. आता खरी परीक्षा परिक्षकांचीच आहे.

सर्व सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण आवडलेल्या पहिल्या ३ रांगोळ्या कोणत्या ते प्रतिसादात येथेच लिहावे. क्रमांक १, २ व ३ असे आवडीप्रमाणे द्यावेत.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Nov 2013 - 11:53 pm | अत्रुप्त आत्मा

पहिला नंबर - सायली http://misalpav.com/comment/521479#comment-521479

दुसरा नंबर - sneharani http://misalpav.com/user/3436

तिसरा नंबर - (विभागून)- सानिका ताई http://misalpav.com/comment/520967#comment-520967
आणी यशराज http://misalpav.com/comment/521609#comment-521609

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2013 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा

एक विनंती- राजमुद्रा यांच्या दोन्ही कलाकृती या रांगोळ्या नसून रांगोळी/रंग या माध्यमाचा वापर करून काढलेली "चित्र" आहेत. म्हणून सदर स्पर्धेत त्या दोन्ही कृती "वेगळ्या" ठेवाव्या..(असं मला वाटतं)

आणी चित्र म्हणून त्यांना मार्क/नंबर द्यावा..तर त्या अतिशय उच्च दर्जाच्या आहेत! __/\__ त्यांना स्पर्धेला "बसवू" नये..(असं मला वाटतं)

कवितानागेश's picture

13 Nov 2013 - 11:50 pm | कवितानागेश

सगळ्याच रांगोळ्या फार सुंदर आहेत.
त्यांना नम्बर द्यावेत इतकी रन्गोली मला तर बिल्कुल्च येत नाही. तरेही एकंदरीत रेषांमधला सुबकपणा आणि रन्गसन्गती या वरुन,
१. पियुशा
२. राजमुद्रा
३. स्नेहाराणी

सूड's picture

14 Nov 2013 - 5:15 pm | सूड

१. हेमांगीके (कोलम रांगोळीसाठी)
२. राजमुद्रा२१
३. sneharani

मत देताना एकदम अवघडल्यासारखं होतय. मला एवढंही चितारता येत नाही. तरे आवडलेल्या रांगोळ्या
१) केदार मिसळ्पाव
२)हेमांगी के (कोलम)
३)सौ. प्रा. डॉ. दिलिप बिरुटे

आनन्दिता's picture

15 Nov 2013 - 1:45 am | आनन्दिता

स्पर्धेची मुदत संपली तरी रांगोळ्यांचे फोटो द्यायचा मोह आवरत नसल्याने मी गेल्या वर्षीच्या दिवाळीत घरी काढलेल्या रांगोळ्या देतेय.

तर हे आहेत आमचे वरातीमागुन घोडे....

दिवाळीच्या पहिल्या दिवशीची ही


ही दुसरी लक्ष्मीपुजना दिवशीची

अत्रुप्त आत्मा's picture

15 Nov 2013 - 6:28 am | अत्रुप्त आत्मा

दोन्ही मस्त आहेत! :)

यशोधरा's picture

15 Nov 2013 - 7:10 am | यशोधरा

मस्त आहेत रांगोळ्या!

रुपी's picture

15 Nov 2013 - 2:46 am | रुपी

१. पियुशा

२. केदार मिसळपाव

३. सानिकास्वप्नील

अनिल तापकीर's picture

15 Nov 2013 - 2:16 pm | अनिल तापकीर

हा धागा मी उशिरा पहिला गावाला गेलो तेव्हा काकड आरतीच्या महापुजेवेळी हि रांगोळी मी स्वत काढली.

अनिल तापकीर's picture

15 Nov 2013 - 2:17 pm | अनिल तापकीर

हा धागा मी उशिरा पहिला गावाला गेलो तेव्हा काकड आरतीच्या महापुजेवेळी हि रांगोळी मी स्वत काढली.

राजमुद्रा२१'s picture

15 Nov 2013 - 6:22 pm | राजमुद्रा२१

सुरेख रांगोळी !

प्यारे१'s picture

22 Nov 2013 - 2:56 am | प्यारे१

___/\___
साष्टांग नमस्कार.

पियुशा's picture

15 Nov 2013 - 3:11 pm | पियुशा

मस्त आहे रांगोळी !

माशा's picture

15 Nov 2013 - 4:10 pm | माशा

अप्रतिम रांगोळी !

सदस्यहो, रांगोळ्यांना क्रमांक द्या हो! निक्काल लावायचाय ना!

जेनी...'s picture

15 Nov 2013 - 10:12 pm | जेनी...

१) केदार मिसळपाव
२) पुष्कर जोशी चा मोर
३) राजमुद्रा .

पैसा's picture

21 Nov 2013 - 9:20 pm | पैसा

१. यशराज
२. केदार मिसळपाव
३. सौ. बिरुटे

इतर अनेकांच्या खरे तर सगळ्यांच्याच रांगोळ्या मेहनतीने काढलेल्या आणि सुंदर आहेत. सर्वांनाच पहिला नंबर द्यायला हवा. पण स्पर्धा म्हटली की ३ क्रमांक द्यायचे आहेत. तेव्हा हेच ३ का तेही सांगते. यशराज यांची आल्हादकारक रंगसंगती आणि त्यात पणत्यांची रचना आवडली. केदार मिसळपाव यांच्या रांगोळीचा विशेष म्हणजे त्यात वापरलेले मीठ. अर्थात रंगसंगती आणि पणत्या आवडल्याच. सौ बिरुटे यांची रंगसंगती आणि बारीक कलाकुसर आवडली.

ह्य वर्‍शात तरी निकाल लावा म्हणजे झालं :-/

संपादक मंडळ's picture

25 Nov 2013 - 10:16 am | संपादक मंडळ

आता रांगोळी स्पर्धेचा निकाल. रांगोळ्यांना सदस्यांनीच क्रमांक द्यावेत असे सुचवल्यानंतर आलेल्या सर्व प्रतिक्रियांनंतर प्रत्येक सदस्याने दिलेल्या क्रमांकानुसार पहिल्या क्रमांकाला ३ गुण, दुसर्‍या क्रमांकाला २ गुण आणि तिसर्‍या क्रमांकाला १ गुण असे गुण दिले. या सर्व गुणांची बेरीज करून पुढीलप्रमाणे क्रमांक निघाले.

१. केदार मिसळपाव

२. पियुशा

३. राजमुद्रा आणि हेमांगीके

विजेत्यांचे आणि सर्व भाग घेणार्‍यांचे अभिनंदन! सर्वांना प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे लवकरच पाठवण्यात येतील. स्पर्धेत उत्साहाने भाग घेतल्याबद्दल आणि निकाल देण्यात मदत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार!

केदार-मिसळपाव's picture

27 Nov 2013 - 6:26 pm | केदार-मिसळपाव

विजेत्यांचे आणि सर्व भाग घेणार्‍यांचे अभिनंदन!
केमी-काकुंना निकाल कळवण्यात आला आहे.
काकुंच्या मते 'हेमांगीके' यांची 'कोलम' ही अप्रतीम रांगोळी आहे, त्यातल्या रांगोळी च्या रेषा उत्स्फुर्त आणि उठावदार आहेत.
ह्या धाग्यावर एक्दम छान रांगोळ्या बघायला मिळाल्या.

पियुशा's picture

26 Nov 2013 - 11:48 am | पियुशा

अरे वा !!! माझा दुसरा नं ? वाचुन आनंद झाला :)
सर्व मिपाकरांचे अन स.म. चे मनापासुन आभार :)

राजमुद्रा२१'s picture

26 Nov 2013 - 2:36 pm | राजमुद्रा२१

केदार मिसळपाव, पियुशा, हेमांगीके,
मनपूर्वक अभिनंदन!!!

त्रिवेणी's picture

26 Nov 2013 - 2:46 pm | त्रिवेणी

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.

अनन्न्या's picture

26 Nov 2013 - 5:01 pm | अनन्न्या

सर्व विजेत्यांचे अभिनंदन!

सानिकास्वप्निल's picture

26 Nov 2013 - 5:11 pm | सानिकास्वप्निल

छान-छान , सुंदर रांगोळ्या दिल्याबद्दल सर्व विजेत्यांचे अभिनंदन :)

sneharani's picture

26 Nov 2013 - 5:15 pm | sneharani

विजेत्यांचे अभिनंदन!!! :)

विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार!!

जेनी...'s picture

26 Nov 2013 - 6:33 pm | जेनी...

मस्त

केदार मिसळपाव चे विशेष अभिनंदन ... मस्तच रांगोळी आहे तुमची
पिश्वीचेहि अभिनंदन
हेमांगिके राजमुद्रा ... अभिनंदन . :)

संपा काका थ्यान्क्यु :-/

राजमुद्रा२१'s picture

27 Nov 2013 - 2:20 pm | राजमुद्रा२१

धन्यवाद पूजा :)

पियुशा's picture

27 Nov 2013 - 3:40 pm | पियुशा

ए पु... पिश्वी नाय हो बै पिवशी म्हण हव तर ;) आभारी आहोत राजमुद्रा,( तुम्ही तै आहात की भौ ) ? हेमांगी तै ,केदार भाउ तुमचेही अभिनंदन :)

सगळ्या रांगोळ्या अप्रतिम.

केदार-मिसळपाव's picture

27 Nov 2013 - 6:28 pm | केदार-मिसळपाव

मनापासुन धन्यवाद.

किलमाऊस्की's picture

6 Dec 2013 - 6:50 am | किलमाऊस्की

आज पाहीला हा धागा. संपादक मंडळ व अभिनंदन करणार्‍या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार. तसंच विजेत्यांचे अभिनंदन.

जुइ's picture

6 Dec 2013 - 9:00 am | जुइ

केदार मिसळपाव, पियुशा, हेमांगीके !!!