✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

स
संपादक मंडळ यांनी
Sat, 11/02/2013 - 05:16  ·  लेख
लेख
मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात. आता तर संस्कारभारतीच्या रांगोळ्यांमुळे अगदी अंगणभर चितारता येतील असे नमूने व उत्तम रंगसंगती ठिकठिकाणी दिसून येते. रांगोळी रेखताना अगदी मान पाठ एक झाली तरी त्या नक्षीकडे येणारे जाणारे जेंव्हा क्षणभर थांबून बघतात तेंव्हा त्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अशाचप्रकारच्या रांगोळीसाठी ही स्पर्धा! मिपाकरांच्याही घरात छुपे कलाकार असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत. रांगोळीत तेवणार्‍या पणत्या असल्या तरी एकंदर फक्त 'रांगोळीची शोभा' हा मुद्दा प्रामुख्याने लक्षात घेतला जावा. कलाकुसर, रंगसंगती याला गुण आहेत. आपण रांगोळ्यांचे फोटो १० नोव्हेंबरपर्यंत चढवू शकता. सगळे मिपाकर सदस्यच परिक्षक आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या पसंतीच्या तीन रांगोळ्यांस क्रम द्यावा. याठिकाणी आपल्या स्पर्धकांशी असलेल्या मैत्रीपेक्षा कलेला न्याय देणे अपेक्षित आहे. सर्व मते मोजून संपादक मंडळ २० नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करेल. पहिल्या ३ विजेत्यास्/विजेतीस आंतरजालीय प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
समाज
जीवनमान
राहणी
मौजमजा
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
280288 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

या माझ्या रांगोळ्या

राजमुद्रा२१
Tue, 11/12/2013 - 08:05 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सायली
Tue, 11/12/2013 - 13:01 नवीन
क्रमांक २ ची रांगोळी विशेष आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजमुद्रा२१

राजमुद्रा रांगोळ्या खुप

पियुशा
Tue, 11/12/2013 - 13:09 नवीन
राजमुद्रा रांगोळ्या खुप देखण्या आहेत :) मीही एक अशीच रांगोळी काढ्लेली लक्ष्मीची , स्पर्धेत पहील बक्षीस मिळाल होत गेल्या वर्षी, पण सध्या तिचा फोटो नाहिये माझ्याकडे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली

धन्यवाद पियुशा,

राजमुद्रा२१
गुरुवार, 11/14/2013 - 19:11 नवीन
धन्यवाद पियुशा, फोतोसाठी वाईट वाटून घेऊ नकोस, तुझ्या हातात्च कला आहे, फोटो काय कितीही काढता येतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

धन्यवाद सायली

राजमुद्रा२१
गुरुवार, 11/14/2013 - 19:07 नवीन
धन्यवाद सायली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली

आ:हा: उल्हासनिय :

जेनी...
Fri, 11/15/2013 - 01:48 नवीन
आ:हा: उल्हासनिय :
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजमुद्रा२१

मस्त रांगोळ्या! मिपाचे

अजया
Tue, 11/12/2013 - 08:50 नवीन
मस्त रांगोळ्या! मिपाचे रांगोळी प्रदर्शन सुंदर सजले आहे!!काय एकेक कलावंत आहेत!!
  • Log in or register to post comments

मस्त

मुक्त विहारि
Tue, 11/12/2013 - 09:12 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments

सगळ्या रांगोळ्या

दिपक.कुवेत
Tue, 11/12/2013 - 13:45 नवीन
एक से बढकर एक....रंगसंगती तर अप्रतीमच.
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम.

भाते
Tue, 11/12/2013 - 14:12 नवीन
वरच्या सर्वच रांगोळ्या फारच सुरेख आहेत. आता खरी परीक्षा परिक्षकांचीच आहे.
  • Log in or register to post comments

सर्व सदस्यांना विनंती करण्यात

रेवती
Wed, 11/13/2013 - 19:00 नवीन
सर्व सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण आवडलेल्या पहिल्या ३ रांगोळ्या कोणत्या ते प्रतिसादात येथेच लिहावे. क्रमांक १, २ व ३ असे आवडीप्रमाणे द्यावेत.
  • Log in or register to post comments

पहिला नंबर - सायली http:/

अत्रुप्त आत्मा
Wed, 11/13/2013 - 23:53 नवीन
पहिला नंबर - सायली http://misalpav.com/comment/521479#comment-521479 दुसरा नंबर - sneharani http://misalpav.com/user/3436 तिसरा नंबर - (विभागून)- सानिका ताई http://misalpav.com/comment/520967#comment-520967 आणी यशराज http://misalpav.com/comment/521609#comment-521609
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

एक विनंती- राजमुद्रा यांच्या

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/14/2013 - 00:00 नवीन
एक विनंती- राजमुद्रा यांच्या दोन्ही कलाकृती या रांगोळ्या नसून रांगोळी/रंग या माध्यमाचा वापर करून काढलेली "चित्र" आहेत. म्हणून सदर स्पर्धेत त्या दोन्ही कृती "वेगळ्या" ठेवाव्या..(असं मला वाटतं) आणी चित्र म्हणून त्यांना मार्क/नंबर द्यावा..तर त्या अतिशय उच्च दर्जाच्या आहेत! __/\__ त्यांना स्पर्धेला "बसवू" नये..(असं मला वाटतं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नम्बर

कवितानागेश
Wed, 11/13/2013 - 23:50 नवीन
सगळ्याच रांगोळ्या फार सुंदर आहेत. त्यांना नम्बर द्यावेत इतकी रन्गोली मला तर बिल्कुल्च येत नाही. तरेही एकंदरीत रेषांमधला सुबकपणा आणि रन्गसन्गती या वरुन, १. पियुशा २. राजमुद्रा ३. स्नेहाराणी
  • Log in or register to post comments

१. हेमांगीके (कोलम

सूड
गुरुवार, 11/14/2013 - 17:15 नवीन
१. हेमांगीके (कोलम रांगोळीसाठी) २. राजमुद्रा२१ ३. sneharani
  • Log in or register to post comments

मत देताना एकदम अवघडल्यासारखं

रेवती
गुरुवार, 11/14/2013 - 20:52 नवीन
मत देताना एकदम अवघडल्यासारखं होतय. मला एवढंही चितारता येत नाही. तरे आवडलेल्या रांगोळ्या १) केदार मिसळ्पाव २)हेमांगी के (कोलम) ३)सौ. प्रा. डॉ. दिलिप बिरुटे
  • Log in or register to post comments

स्पर्धेची मुदत संपली तरी

आनन्दिता
Fri, 11/15/2013 - 01:45 नवीन
स्पर्धेची मुदत संपली तरी रांगोळ्यांचे फोटो द्यायचा मोह आवरत नसल्याने मी गेल्या वर्षीच्या दिवाळीत घरी काढलेल्या रांगोळ्या देतेय. तर हे आहेत आमचे वरातीमागुन घोडे.... दिवाळीच्या पहिल्या दिवशीची ही Image removed. Image removed. ही दुसरी लक्ष्मीपुजना दिवशीची Image removed.
  • Log in or register to post comments

दोन्ही मस्त आहेत!

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/15/2013 - 06:28 नवीन
दोन्ही मस्त आहेत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

मस्त आहेत रांगोळ्या!

यशोधरा
Fri, 11/15/2013 - 07:10 नवीन
मस्त आहेत रांगोळ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता

माझी पसंती

रुपी
Fri, 11/15/2013 - 02:46 नवीन
१. पियुशा २. केदार मिसळपाव ३. सानिकास्वप्नील
  • Log in or register to post comments

(No subject)

अनिल तापकीर
Fri, 11/15/2013 - 14:16 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हा धागा मी उशिरा पहिला गावाला

अनिल तापकीर
Fri, 11/15/2013 - 14:17 नवीन
हा धागा मी उशिरा पहिला गावाला गेलो तेव्हा काकड आरतीच्या महापुजेवेळी हि रांगोळी मी स्वत काढली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल तापकीर

सुरेख रांगोळी !

राजमुद्रा२१
Fri, 11/15/2013 - 18:22 नवीन
सुरेख रांगोळी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल तापकीर

___/\___ साष्टांग नमस्कार.

प्यारे१
Fri, 11/22/2013 - 02:56 नवीन
___/\___ साष्टांग नमस्कार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल तापकीर

मस्त आहे रांगोळी !

पियुशा
Fri, 11/15/2013 - 15:11 नवीन
मस्त आहे रांगोळी !
  • Log in or register to post comments

सुरेख

माशा
Fri, 11/15/2013 - 16:10 नवीन
अप्रतिम रांगोळी !
  • Log in or register to post comments

सदस्यहो, रांगोळ्यांना क्रमांक

रेवती
Fri, 11/15/2013 - 18:30 नवीन
सदस्यहो, रांगोळ्यांना क्रमांक द्या हो! निक्काल लावायचाय ना!
  • Log in or register to post comments

१) केदार मिसळपाव

जेनी...
Fri, 11/15/2013 - 22:12 नवीन
१) केदार मिसळपाव २) पुष्कर जोशी चा मोर ३) राजमुद्रा .
  • Log in or register to post comments

मला आवडलेल्या

पैसा
गुरुवार, 11/21/2013 - 21:20 नवीन
१. यशराज २. केदार मिसळपाव ३. सौ. बिरुटे इतर अनेकांच्या खरे तर सगळ्यांच्याच रांगोळ्या मेहनतीने काढलेल्या आणि सुंदर आहेत. सर्वांनाच पहिला नंबर द्यायला हवा. पण स्पर्धा म्हटली की ३ क्रमांक द्यायचे आहेत. तेव्हा हेच ३ का तेही सांगते. यशराज यांची आल्हादकारक रंगसंगती आणि त्यात पणत्यांची रचना आवडली. केदार मिसळपाव यांच्या रांगोळीचा विशेष म्हणजे त्यात वापरलेले मीठ. अर्थात रंगसंगती आणि पणत्या आवडल्याच. सौ बिरुटे यांची रंगसंगती आणि बारीक कलाकुसर आवडली.
  • Log in or register to post comments

ह्य वर्‍शात तरी निकाल लावा

जेनी...
Mon, 11/25/2013 - 00:55 नवीन
ह्य वर्‍शात तरी निकाल लावा म्हणजे झालं :-/
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद!

संपादक मंडळ
Mon, 11/25/2013 - 10:16 नवीन
आता रांगोळी स्पर्धेचा निकाल. रांगोळ्यांना सदस्यांनीच क्रमांक द्यावेत असे सुचवल्यानंतर आलेल्या सर्व प्रतिक्रियांनंतर प्रत्येक सदस्याने दिलेल्या क्रमांकानुसार पहिल्या क्रमांकाला ३ गुण, दुसर्‍या क्रमांकाला २ गुण आणि तिसर्‍या क्रमांकाला १ गुण असे गुण दिले. या सर्व गुणांची बेरीज करून पुढीलप्रमाणे क्रमांक निघाले. १. केदार मिसळपाव २. पियुशा ३. राजमुद्रा आणि हेमांगीके विजेत्यांचे आणि सर्व भाग घेणार्‍यांचे अभिनंदन! सर्वांना प्रशस्तीपत्रके व्यनिद्वारे लवकरच पाठवण्यात येतील. स्पर्धेत उत्साहाने भाग घेतल्याबद्दल आणि निकाल देण्यात मदत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

केदार-मिसळपाव
Wed, 11/27/2013 - 18:26 नवीन
विजेत्यांचे आणि सर्व भाग घेणार्‍यांचे अभिनंदन! केमी-काकुंना निकाल कळवण्यात आला आहे. काकुंच्या मते 'हेमांगीके' यांची 'कोलम' ही अप्रतीम रांगोळी आहे, त्यातल्या रांगोळी च्या रेषा उत्स्फुर्त आणि उठावदार आहेत. ह्या धाग्यावर एक्दम छान रांगोळ्या बघायला मिळाल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपादक मंडळ

अरे वा !!! माझा दुसरा नं ?

पियुशा
Tue, 11/26/2013 - 11:48 नवीन
अरे वा !!! माझा दुसरा नं ? वाचुन आनंद झाला :) सर्व मिपाकरांचे अन स.म. चे मनापासुन आभार :)
  • Log in or register to post comments

केदार मिसळपाव, पियुशा,

राजमुद्रा२१
Tue, 11/26/2013 - 14:36 नवीन
केदार मिसळपाव, पियुशा, हेमांगीके, मनपूर्वक अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

सर्व विजेत्यांचे हार्दिक

त्रिवेणी
Tue, 11/26/2013 - 14:46 नवीन
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

माझ्याकडूनही...

अनन्न्या
Tue, 11/26/2013 - 17:01 नवीन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

सानिकास्वप्निल
Tue, 11/26/2013 - 17:11 नवीन
छान-छान , सुंदर रांगोळ्या दिल्याबद्दल सर्व विजेत्यांचे अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

अरे वा,

sneharani
Tue, 11/26/2013 - 17:15 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन!!! :)
  • Log in or register to post comments

विजेत्यांचे अभिनंदन,

सूड
Tue, 11/26/2013 - 18:06 नवीन
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार!!
  • Log in or register to post comments

मस्त

जेनी...
Tue, 11/26/2013 - 18:33 नवीन
मस्त केदार मिसळपाव चे विशेष अभिनंदन ... मस्तच रांगोळी आहे तुमची पिश्वीचेहि अभिनंदन हेमांगिके राजमुद्रा ... अभिनंदन . :) संपा काका थ्यान्क्यु :-/
  • Log in or register to post comments

धन्यवाद पूजा

राजमुद्रा२१
Wed, 11/27/2013 - 14:20 नवीन
धन्यवाद पूजा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

ए पु... पिश्वी नाय हो बै

पियुशा
Wed, 11/27/2013 - 15:40 नवीन
ए पु... पिश्वी नाय हो बै पिवशी म्हण हव तर ;) आभारी आहोत राजमुद्रा,( तुम्ही तै आहात की भौ ) ? हेमांगी तै ,केदार भाउ तुमचेही अभिनंदन :)
  • Log in or register to post comments

सगळ्या रांगोळ्या अप्रतिम.

जागु
Wed, 11/27/2013 - 15:48 नवीन
सगळ्या रांगोळ्या अप्रतिम.
  • Log in or register to post comments

अभिनंदन करणार्‍या सर्व मिपा करांना

केदार-मिसळपाव
Wed, 11/27/2013 - 18:28 नवीन
मनापासुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments

माफ करा. थोड्या उशीराने लिहितेय.

किलमाऊस्की
Fri, 12/06/2013 - 06:50 नवीन
आज पाहीला हा धागा. संपादक मंडळ व अभिनंदन करणार्‍या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार. तसंच विजेत्यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

जुइ
Fri, 12/06/2013 - 09:00 नवीन
केदार मिसळपाव, पियुशा, हेमांगीके !!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा