✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

स
संपादक मंडळ यांनी
Sat, 11/02/2013 - 05:16  ·  लेख
लेख
मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात. आता तर संस्कारभारतीच्या रांगोळ्यांमुळे अगदी अंगणभर चितारता येतील असे नमूने व उत्तम रंगसंगती ठिकठिकाणी दिसून येते. रांगोळी रेखताना अगदी मान पाठ एक झाली तरी त्या नक्षीकडे येणारे जाणारे जेंव्हा क्षणभर थांबून बघतात तेंव्हा त्या कष्टांचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. अशाचप्रकारच्या रांगोळीसाठी ही स्पर्धा! मिपाकरांच्याही घरात छुपे कलाकार असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत. रांगोळीत तेवणार्‍या पणत्या असल्या तरी एकंदर फक्त 'रांगोळीची शोभा' हा मुद्दा प्रामुख्याने लक्षात घेतला जावा. कलाकुसर, रंगसंगती याला गुण आहेत. आपण रांगोळ्यांचे फोटो १० नोव्हेंबरपर्यंत चढवू शकता. सगळे मिपाकर सदस्यच परिक्षक आहेत. त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या पसंतीच्या तीन रांगोळ्यांस क्रम द्यावा. याठिकाणी आपल्या स्पर्धकांशी असलेल्या मैत्रीपेक्षा कलेला न्याय देणे अपेक्षित आहे. सर्व मते मोजून संपादक मंडळ २० नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करेल. पहिल्या ३ विजेत्यास्/विजेतीस आंतरजालीय प्रशस्तिपत्रक देण्यात येईल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
समाज
जीवनमान
राहणी
मौजमजा
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
280288 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

कित्ती सुबक! सुरेख!

स्पंदना
Fri, 11/08/2013 - 05:41 नवीन
कित्ती सुबक! सुरेख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

आवडली

सायली
Fri, 11/08/2013 - 10:46 नवीन
खुपच छान रांगोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

क्या ब्बात है केदार काका !

जेनी...
Fri, 11/08/2013 - 23:46 नवीन
क्या ब्बात है केदार काका ! सुप्पर्लाइक रांगोळी रंग भरणार्याचे नाव कळेल का ?? अगदीच सुरेख भर्लेत रंग चिमटीतुन बोटांच्या सुटत असते रांगोळी रंगबिरंगि रंगांनी सजत असते रांगोळी !!! अंगणातल्या दिव्याभोवती फिरत असते रांगोळी मनातल्या उत्साहाला फुलवत असते रांगोळी !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

रंग

केदार-मिसळपाव
Tue, 11/12/2013 - 14:34 नवीन
काकू ने भरले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

धागा मस्त चाललाय. श्रेय

रेवती
Wed, 11/06/2013 - 01:14 नवीन
धागा मस्त चाललाय. श्रेय तुम्हा सर्वांनाच आहे.
  • Log in or register to post comments

सगळ्या रांगोळ्या झकास!

यशोधरा
Wed, 11/06/2013 - 07:31 नवीन
सगळ्या रांगोळ्या झकास!
  • Log in or register to post comments

खुपच छान छान रांगोळ्या आहेत

त्रिवेणी
Wed, 11/06/2013 - 14:47 नवीन
खुपच छान छान रांगोळ्या आहेत सर्वांच्या.
  • Log in or register to post comments

अजून येऊदेत!

अनन्न्या
Wed, 11/06/2013 - 15:52 नवीन
अशाच नवीन, मस्त रांगोळ्या येऊदेत.
  • Log in or register to post comments

वा काय मस्त रांगोळ्या काढल्या

Mrunalini
Wed, 11/06/2013 - 16:20 नवीन
वा काय मस्त रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी... माझ्याकडे इथे रांगोळी आणि रंग काहिच नाही... पण अत्ताच वरती वाचले.. मिठ वापरुन काढलेली रांगोळी... आयडियाची भन्नाट कल्पना आवडली. :)
  • Log in or register to post comments

रांगोळ्या.... दर दिवशीच्या वेगळ्या वेगळ्या...

मनिम्याऊ
Wed, 11/06/2013 - 18:52 नवीन
धनत्रयोदशी Image removed. नरकचतुर्दशी Image removed. लक्ष्मीपूजन Image removed. बलिप्रतिपदा Image removed. भाऊबीज Image removed.
  • Log in or register to post comments

मस्तच!

स्पंदना
Fri, 11/08/2013 - 05:41 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिम्याऊ

लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज

केदार-मिसळपाव
Tue, 11/12/2013 - 14:36 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिम्याऊ

माझ्या मुलीने काढलेली रांगोळी

निवेदिता-ताई
Wed, 11/06/2013 - 19:56 नवीन
.
  • Log in or register to post comments

हा हा हा

लौंगी मिरची
गुरुवार, 11/07/2013 - 22:30 नवीन
हा हा हा मला वाटलं मुलीने टिंब ( . ) काढुन रांगोळी म्हणुन दिला कि काय तुम्हाला अपलोडवायला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

https://picasaweb.google.com

निवेदिता-ताई
Wed, 11/06/2013 - 19:59 नवीन
https://picasaweb.google.com/102940764642192668003/Rangoli#5943151743804068354
  • Log in or register to post comments

ही माझ्या मुलीने काढलेली रांगोळी --

निवेदिता-ताई
Wed, 11/06/2013 - 20:01 नवीन
पहिल्या पोस्टमधे अपलोड करता नाही आली, पण आता फक्त लिंक देणे जमले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

लिंकची गड्बड आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/07/2013 - 15:35 नवीन
सर्वांसाठी पिकासावर परवानगी द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई

आतिशय सुन्दर ..

रोहन जैन
गुरुवार, 11/07/2013 - 11:08 नवीन
आतिशय सुन्दर आहे सर्व रान्गोलि..
  • Log in or register to post comments

मी मागच्या वर्षीच्या दिवाळीत काढलेल्या रांगोळ्या

सायली
गुरुवार, 11/07/2013 - 14:52 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

जब्बरदस्त!!!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/07/2013 - 16:21 नवीन
जब्बरदस्त!!! माझ्याकडुन पहिला नंबर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली

तुमच्या या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजी

सायली
गुरुवार, 11/07/2013 - 17:38 नवीन
मला पण तुम्ही काढलेल्या फुलांच्या रांगोळ्या खूपच आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

शेडींग खुपच छान आहे.

स्पंदना
Fri, 11/08/2013 - 05:42 नवीन
शेडींग खुपच छान आहे. सार्‍याच मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली

सर्वांच्या रांगोळ्या छान आहेत. हि घ्या माझी पण....

रुमानी
गुरुवार, 11/07/2013 - 15:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

व्वा औरंगाबादकर व्वा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/07/2013 - 15:28 नवीन
छान रांगोळी. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी

संस्कार भारती!

स्पंदना
Fri, 11/08/2013 - 05:43 नवीन
संस्कार भारती! मस्त ग श्रुती, जरी तू औरंगाबादची असलीस तरीही मस्तच हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी

संस्कार भारती!

स्पंदना
Fri, 11/08/2013 - 05:43 नवीन
संस्कार भारती! मस्त ग श्रुती, जरी तू औरंगाबादची असलीस तरीही मस्तच हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी

सुरेख ...

यश राज
Fri, 11/08/2013 - 00:05 नवीन
छानच......... आमची रांगोळी.... Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त!

स्पंदना
Fri, 11/08/2013 - 05:44 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

वाव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/08/2013 - 10:41 नवीन
स्सही रे स्सही. मधला राऊंड कसला जब्रा आलाय रंगसंगती आणि कल्पकतेने. बेष्ट. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

खुपच छान

सायली
Fri, 11/08/2013 - 10:49 नवीन
रांगोळी आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

येक णंबर कलाकुसर, आणी

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/08/2013 - 15:13 नवीन
येक णंबर कलाकुसर, आणी रंगसंगती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यश राज

धन्यवाद

यश राज
Fri, 11/08/2013 - 22:04 नवीन
धन्यवाद......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ही अस्मादिकांनी साधारण तीनेक

सूड
Fri, 11/08/2013 - 00:18 नवीन
ही अस्मादिकांनी साधारण तीनेक वर्षांपूर्वी हापिसात काढलेली रांगोळी!! Image removed.
  • Log in or register to post comments

अरे वा! सुड?

स्पंदना
Fri, 11/08/2013 - 05:45 नवीन
अरे वा! सुड? ही कलापण आहे तुमच्याकडे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आमचाही हातभार !!!

अविनाश पांढरकर
Fri, 11/08/2013 - 12:54 नवीन
घरी काढलेली रांगोळी Image removed. अवांतर - घरी बनवलेला कंदील Image removed.
  • Log in or register to post comments

आमच्या रांगोळ्या

sneharani
Fri, 11/08/2013 - 14:13 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

सुर्रेख रांगोळया!

यशोधरा
Fri, 11/15/2013 - 07:08 नवीन
सुर्रेख रांगोळया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sneharani

रांगोळ्या, त्यातील रंगसंगती-

अनिता ठाकूर
Fri, 11/08/2013 - 14:53 नवीन
रांगोळ्या, त्यातील रंगसंगती--सर्वच छान!
  • Log in or register to post comments

खुप छान

यश राज
Fri, 11/08/2013 - 22:16 नवीन
आवड्ल्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता ठाकूर

सर्वच मस्त

निवेदिता-ताई
Sat, 11/09/2013 - 21:40 नवीन
सर्वच मस्त
  • Log in or register to post comments

हेल्प हेल्प हेल्प !!!!

पियुशा
Sun, 11/10/2013 - 11:38 नवीन
हेल्प हेल्प हेल्प !!!! मला पण इथे पोस्ट करायच्यात रांगोळ्या पण जमत नाहिये फ्लिकरची लिंक घेत नाहिये , लाल फुली दिसतेय इमेज च्या जागेवर , काय करु आता पट्कन सांगा फोटो कसे अपलोड करु आता मी ?
  • Log in or register to post comments

पिकासावर टाक किन्वा लिन्क दे.

कवितानागेश
Sun, 11/10/2013 - 12:38 नवीन
पिकासावर टाक किन्वा लिन्क दे. बघते मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

ओक फाइन जमले एकदाचे फोटो

पियुशा
Sun, 11/10/2013 - 13:03 नवीन
ओक फाइन जमले एकदाचे फोटो लोड्वायचे ;) ही माझी गेल्या वर्षीची Image removed.
  • Log in or register to post comments

ही अजुन एक गेल्या वर्षी शॉप

पियुशा
Sun, 11/10/2013 - 13:11 नवीन
Image removed. Image removed. ही अजुन एक गेल्या वर्षी शॉप फ्लोअरला काढलेली Image removed. Image removed. अन ह्या बाकिच्या ह्या वर्षी काढलेल्या Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

अफाट...!

अत्रुप्त आत्मा
Sun, 11/10/2013 - 22:56 नवीन
अफाट...! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

वा! अ फा ट!

यशोधरा
Fri, 11/15/2013 - 07:09 नवीन
वा! अ फा ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

कसली कलाकार आहेस ग. वरची

त्रिवेणी
Sun, 11/10/2013 - 22:07 नवीन
कसली कलाकार आहेस ग. वरची रांगोळी तर खुपच सुरेख.
  • Log in or register to post comments

धन्स हो

पियुशा
Tue, 11/12/2013 - 13:06 नवीन
धन्स हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

परीक्षकांची परीक्षा

सुधांशुनूलकर
Sun, 11/10/2013 - 23:02 नवीन
।। श्री गुरवे नमः ।। सगळ्या रांगोळ्या किती सुंदर आहेत! कुणाला बक्षिस द्यायचं हे ठरवणं म्हणजे परीक्षकांची परीक्षाच आहे. सर्वांचाच, सुधांशुनूलकर
  • Log in or register to post comments

एक से बढकर एक आहेत सगळ्या रांगोळ्या...

शिद
Sun, 11/10/2013 - 23:46 नवीन
आजकाल मोरांवर जास्तचं जोर दिला आहे असे निरीक्षण नमूद करतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा