म्हैसूरपाक

Primary tabs

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in दिवाळी अंक
27 Oct 2013 - 12:47 pm

.
साहित्यः
दीड वाट्या बेसन
दोन वाट्या साखर
१/२ वाटी पाणी
२ वाट्या तूप
वेलचीदाणे
.
पाकृ:
साखरेत पाणी घालून पाक करायला ठेवावा.
दुसर्‍या भांड्यात तूप कडकडीत गरम करायला ठेवावे.
तूप गरम होत असताना डावभर तूप बेसनात घालून चांगले चोळून घ्यावे.
पाकाला उकळी आली की त्यात वेलचीदाणे घालावे.
पाक दोनतारी होत आला की त्यात बेसन घालावे व चांगले ढवळून घ्यावे.
डावभर तूप त्यात घालत रहावे म्हणजे जाळी पडेल.
सतत बेसनाचे मिश्रण ढवळत रहावे.
मिश्रण कडेने सुटू लागले व जाळी दिसू लागली की मिश्रण चाळणीत ओतावे.
चाळणीच्या खाली पातेले किंव ताट ठेवावे म्हणजे जास्तीचे तूप निथळून जाईल.
कोमट असतानाच वड्या पाडाव्यात.
.
म्हैसूरपाक खाण्यासाठी तयार आहे .
.

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

लय भारी ! दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा :)

अनुप ढेरे's picture

1 Nov 2013 - 2:23 pm | अनुप ढेरे

२ वाट्या तूप???

हरवलेली मुलगी नि भांडी सापडली.
(सोल फेल इन भांडे! -बॅटमॅन)
पाककृती बद्दल काय बोलावं. नेहमीप्रमाणेच उत्तम.

हायला.. हे इतकं सोपं असतं होय! अर्थात केल्यावर कळेल पण बघुन सोपं वाट्टंय
अनेक आभार!

याच पदार्थाचा हा धागा आठवला.

अनन्न्या's picture

1 Nov 2013 - 4:31 pm | अनन्न्या

मी पण करते नेहमी घरीच, छान होतो!

मस्त दिसतोय म्हैसूरपाक! याचा अंदाज बरोबर यायला हवा. कृती व फोटू भारी आलेत.

पैसा's picture

1 Nov 2013 - 9:05 pm | पैसा

मला खायला आवडत नाही पण फोटो कातिल नेहमीप्रमाणेच!

दिपक.कुवेत's picture

2 Nov 2013 - 5:08 pm | दिपक.कुवेत

फोटुग्राफि नेहमीप्रमाणेच तोडिस तोड पण पदार्थ विषेश आवडत नसल्याने माझा पास.....

चित्रगुप्त's picture

1 Nov 2013 - 9:36 pm | चित्रगुप्त

मस्तच दिसतो आहे म्हैपा.
वर दिलेले साहित्य वापरून किती म्हैपा बनेल?

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 10:23 pm | मुक्त विहारि

निव्वळ छळवाद..

तुमच्या पोस्ट मी वाचत नाही, फोटो अजिबात बघत नाही.

त्यामुळे इनो घ्यायची गरज भासत नाही. इ. इ.

संपादकांना विनंती, की त्यांनी ह्या ताईंना अशा पोस्ट टाकू नयेत म्हणून एक पत्र लिहावे.आमच्या मनांत ते न्युनगंड की काय जे काही म्हणत असतील ते तयार होते.

असो.

(म्हैसुर् पाक चापण्यात मग्न झालेला) मुवि.

शिद's picture

2 Nov 2013 - 1:38 am | शिद

पटकन उचलून तोंडात टाकावाश्या वाटताहेत…

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2013 - 3:26 am | प्रभाकर पेठकर

अतिशय चविष्ट आणि आकर्षक मेसुरपाक. अभिनंदन.
थोडाफार खायचा पिवळा रंग वापरून अधिक आकर्षक बनेल.

सुहास झेले's picture

2 Nov 2013 - 12:51 pm | सुहास झेले

म्हैसूरपाक प्रचंड आवडतो.... धन्स गं ह्या पाककृतीसाठी :)

|| शुभ दिपावली ||

कवितानागेश's picture

4 Nov 2013 - 12:10 am | कवितानागेश

तो 'मलई मैसूर पाक' कसा करतात? तो तोंडात विरघळतो नुस्ता.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2013 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्हा.............!

निवेदिता-ताई's picture

6 Nov 2013 - 8:35 pm | निवेदिता-ताई

अतिशय सुंदर ग

रुमानी's picture

8 Nov 2013 - 12:24 pm | रुमानी

मस्त ...!

म्हैसूरपाक अजून पर्यन्त कधीच खाल्ला नाही. आता खाऊन बघेन.

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 4:38 am | स्पंदना

आहाहा! काय रंगा आलाय म्हैसूरपाकाला. सुरेख.
असा आत्ता उचलु की मग अस वाटुन र्‍हायल ना ताई?
मस्ताड!