
साहित्यः
दीड वाट्या बेसन
दोन वाट्या साखर
१/२ वाटी पाणी
२ वाट्या तूप
वेलचीदाणे

पाकृ:
साखरेत पाणी घालून पाक करायला ठेवावा.
दुसर्या भांड्यात तूप कडकडीत गरम करायला ठेवावे.
तूप गरम होत असताना डावभर तूप बेसनात घालून चांगले चोळून घ्यावे.
पाकाला उकळी आली की त्यात वेलचीदाणे घालावे.
पाक दोनतारी होत आला की त्यात बेसन घालावे व चांगले ढवळून घ्यावे.
डावभर तूप त्यात घालत रहावे म्हणजे जाळी पडेल.
सतत बेसनाचे मिश्रण ढवळत रहावे.
मिश्रण कडेने सुटू लागले व जाळी दिसू लागली की मिश्रण चाळणीत ओतावे.
चाळणीच्या खाली पातेले किंव ताट ठेवावे म्हणजे जास्तीचे तूप निथळून जाईल.
कोमट असतानाच वड्या पाडाव्यात.

म्हैसूरपाक खाण्यासाठी तयार आहे .
प्रतिक्रिया
लय भारी ! दिपावलीच्या हार्दीक
२ वाट्या तूप???
हरवलेली मुलगी नि भांडी सापडली
हायला.. हे इतकं सोपं असतं होय
नेहेमीप्रमाणेच चांगल्या पाककृतीचं सचित्र वर्णन
खमंग झालाय!
मस्त दिसतोय म्हैसूरपाक! याचा
मस्त मस्त!
+१ टु पैसातै
In reply to मस्त मस्त! by पैसा
किती
छळवाद....
झकास्स्स...!!!
मस्तं..
म्हैसूरपाक प्रचंड आवडतो....
मस्त झालेत. छान दिसतायत.
ह्ह्हा.............!
अतिशय सुंदर ग
मस्त ...!
म्हैसूरपाक अजून पर्यन्त कधीच
आहाहा! काय रंगा आलाय