Skip to main content

म्हैसूरपाक

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 27/10/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः दीड वाट्या बेसन दोन वाट्या साखर १/२ वाटी पाणी २ वाट्या तूप वेलचीदाणे . पाकृ: साखरेत पाणी घालून पाक करायला ठेवावा. दुसर्‍या भांड्यात तूप कडकडीत गरम करायला ठेवावे. तूप गरम होत असताना डावभर तूप बेसनात घालून चांगले चोळून घ्यावे. पाकाला उकळी आली की त्यात वेलचीदाणे घालावे. पाक दोनतारी होत आला की त्यात बेसन घालावे व चांगले ढवळून घ्यावे. डावभर तूप त्यात घालत रहावे म्हणजे जाळी पडेल. सतत बेसनाचे मिश्रण ढवळत रहावे. मिश्रण कडेने सुटू लागले व जाळी दिसू लागली की मिश्रण चाळणीत ओतावे. चाळणीच्या खाली पातेले किंव ताट ठेवावे म्हणजे जास्तीचे तूप निथळून जाईल. कोमट असतानाच वड्या पाडाव्यात. . म्हैसूरपाक खाण्यासाठी तयार आहे . .
दिवाळी अंक वर्ष

वाचने 9281
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

मी पण करते नेहमी घरीच, छान होतो!

मला खायला आवडत नाही पण फोटो कातिल नेहमीप्रमाणेच!

In reply to by पैसा

फोटुग्राफि नेहमीप्रमाणेच तोडिस तोड पण पदार्थ विषेश आवडत नसल्याने माझा पास.....

मस्तच दिसतो आहे म्हैपा. वर दिलेले साहित्य वापरून किती म्हैपा बनेल?

निव्वळ छळवाद.. तुमच्या पोस्ट मी वाचत नाही, फोटो अजिबात बघत नाही. त्यामुळे इनो घ्यायची गरज भासत नाही. इ. इ. संपादकांना विनंती, की त्यांनी ह्या ताईंना अशा पोस्ट टाकू नयेत म्हणून एक पत्र लिहावे.आमच्या मनांत ते न्युनगंड की काय जे काही म्हणत असतील ते तयार होते. असो. (म्हैसुर् पाक चापण्यात मग्न झालेला) मुवि.

पटकन उचलून तोंडात टाकावाश्या वाटताहेत…

अतिशय चविष्ट आणि आकर्षक मेसुरपाक. अभिनंदन. थोडाफार खायचा पिवळा रंग वापरून अधिक आकर्षक बनेल.

आहाहा! काय रंगा आलाय म्हैसूरपाकाला. सुरेख. असा आत्ता उचलु की मग अस वाटुन र्‍हायल ना ताई? मस्ताड!