म्हैसूर पाक

Primary tabs

रोहिणी पानमंद's picture
रोहिणी पानमंद in पाककृती
17 Aug 2013 - 11:32 am

साहित्य :-
१)एक वाटी डाळीचे पीठ
२)दोन वाटया साखर
३)तीन वाटी वनस्पती तूप गरम करून
४)चिमुटभर सोडा

कृती :-
१)साखरेत दीड वाटी पाणी टाकून एकतारी पाक करून घ्यावा. त्यात डाळीचे पीठ टाकून सतत हलवत राहावे.
२)नंतर त्यात गरम केलेले वनस्पती तूप टाकावे व हलवत राहावे.असे दोन ते तीन वेळा तूप टाकून हलवत राहावे.
३)तूप पूर्ण टाकून संपले की गुलाबी रंग येईपर्यंत मिश्रण हलवत राहावे.नंतर चिमुटभर सोडा टाकून पुन्हा थोडावेळ हलवावे.
४)त्यानंतर हे मिश्रण मोदक पात्रात काढून वरून पाण्याचा शिडकाव दयावा व म्हैसूर पाकची वडी पाडावी .

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Aug 2013 - 11:42 am | मुक्त विहारि

झक्कास...

फोटो टाकला असता तर जास्त मजा आली असती..

नीलशीतल's picture

17 Aug 2013 - 11:56 am | नीलशीतल

मस्तच

धन्या's picture

17 Aug 2013 - 12:01 pm | धन्या

हायला... ईतके सोपे असते म्हैसूर पाक बनवणे?

आपल्याकडे मिळणारा पिवळा म्हैसूरपाक आणि दक्षिणेत मिळणारा पांढरा गुलाबी, जिभेवर ठेवताक्षणी विरघळनारा म्हैसूरपाक हे चुलत भाऊ आहेत का?

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2013 - 12:11 pm | प्रभाकर पेठकर

छान, सोपी, सुटसुटीत पाककृती.
छायाचित्र असते तर बरे झाले असते.
मोदक पात्राचे प्रयोजन कळले नाही.

रोहिणी पानमंद's picture

17 Aug 2013 - 12:26 pm | रोहिणी पानमंद

मोदक पात्र जास्तीचे तूप निघून जावे यासाठी वापरले आहे.

रोहिणी पानमंद's picture

17 Aug 2013 - 12:12 pm | रोहिणी पानमंद

वेळच मिळाला नाही फोटोसाठी !!!!!!

तिमा's picture

17 Aug 2013 - 12:42 pm | तिमा

पुढील वेळेस फोटो टाकावा. कारण कुठलीही पाककृती फोटो असल्याशिवाय, तुमची मेंदुतली ती केंद्रे उद्दीपित करत नाही.फोटो पाहिला की तो पदार्थ खाल्ल्याचा स्वप्निल आनंद देतो. (आधीच्या घेतलेल्या चवी मेंदूत साठवलेल्या असतात)

दत्ता काळे's picture

17 Aug 2013 - 12:58 pm | दत्ता काळे

कृती एकदम सोप्पी आहे.

स्पंदना's picture

17 Aug 2013 - 3:08 pm | स्पंदना

मी दिड वाटी बेसनाचा बाकिचे सामान तुझ्या मापाने घेउन थोडासा वेगळ्या पद्धतिने बनवते.
बेसन मिसळायच्या आधी मी उकळत्या साखरेच्या पाकात निम्मे तूप पळी पळीने घालते. एकदा ते तूप साखरेच्या पाकात मिसळले की मग त्यात सर्व (दिड वाटी) बेसन मिसळुन व्यवस्थीत एकत्र करुन मग पुन्हा उरलेले सगळे तूप त्यात मिसळत जायचे. या वेळात गॅस सुरु असल्याने बेसन छान भाजले जाउन मस्त वास सुटतो.
मग हे मिश्रण एका ठाळीत ओतुन ती थाळी थोडी कलती करुन ठेवली की जास्तीचे तूप एका बाजुला जमा होते.

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2013 - 3:33 pm | प्रभाकर पेठकर

म्हैसुरपाक की मेसुरपाक?

मैसूरु पाक हा वरिजिनल उच्चार. मैसूर पाक हा अधिक सुटसुटीत उच्चार.

ಮೈಸೂರು ಪಾಕ್

मराठी अ‍ॅक्सेंटमध्ये त्याचे म्हैसूर झाले. बहुतेक म्हशीची आठवण झाली असेल =))

सूड's picture

17 Aug 2013 - 6:04 pm | सूड

वशाड मेलो. चांगली गोडाची रेशिपी असताना पण तू भाषाभक्षणच कर हां.

बॅटमॅन's picture

18 Aug 2013 - 3:38 pm | बॅटमॅन

तू जरा रांव मरे!!

उगीच मरे तर कोण कशाला रडे =)) शिरां पडली तुझ्या तोंडावर (अन कॅट्रिनावाली शीला आली माझ्या जवळ ;) )

बहुगुणी's picture

17 Aug 2013 - 5:40 pm | बहुगुणी

मस्त आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

ही पाककृती खालील व्हिडिओतही आहे, फक्त हवेशीर, फुललेला मैसूरपाक करण्यासाठी सोडा न घालता पारंपारिक पद्धतीने उकळत्या पाक+बेसनात उकळतं तेल घालतात. या पाककृतीतला 'वाह रे वाह' शेफ संजय थुम्माचा '१५ सेकंद रूल' पाळला नाही तर मात्र काय काय अप-पदार्थ तयार होतात याचा अनुभव घेतला आहे :-(

[मात्र त्या व्हिडिओमध्ये तो ज्या पद्धतीने पाण्यासारखं तेल घालतो ते पाहूनच हृदयाचं पाणी-पाणी होतं!]

पण मग येवढं तूप निथळणार कसं?

अनन्न्या's picture

17 Aug 2013 - 6:46 pm | अनन्न्या

सोड्याशिवायही मस्त होतो म्हैसूरपाक! फोटो नसल्याने खमंगपणाचा अंदाज येत नाहीय.

निवेदिता-ताई's picture

17 Aug 2013 - 7:04 pm | निवेदिता-ताई

बरेच दिवापासून मला हवी होती ही कॄती..आता करुन पहाते.....:)

आशु जोग's picture

17 Aug 2013 - 8:25 pm | आशु जोग

आधी म्हैसूर पार्क वाचलं...
खिक खिक

संतोषएकांडे's picture

17 Aug 2013 - 9:10 pm | संतोषएकांडे

एक वाटी बेसननात एक वाटी तुपाचं मोहन घालुन पीठाला मूठ पडे पर्यन्त मळून घ्याव.
एका बाजूला तीन वाट्या तुप कडकडीत तापवून दुसरी कडे चालू गस वर पाक गरम ठेवावा.हळू हळू बेसन गरम पाकात सोडत रहावे. सगळं बेसन पाकात घातल्या वर
गरम कडकडीत तूप त्या पाकात घालत रहावे.बेसन अगदी हल्क होवून त्यात जाळी पडत जाईल.नंतर ते मिक्ष साहित्य एका चाळणीत काढावे.गरम असताच हवे त्या साईजचे काप पाडावे.थोड्या वेळाने बरचस तूप निथळून जाईल.
बस्स...मेसूरपाक तैयार..

त्रिवेणी's picture

18 Aug 2013 - 1:17 pm | त्रिवेणी

म्हैसुरपाक कधीच खाल्लं नाही.

कवितानागेश's picture

18 Aug 2013 - 1:40 pm | कवितानागेश

त्या निथळलेल्या तूपाचे पुढे काय करायचे? पोळीच्या लाडूत मिसळायला चालेल का? :)

पोळीच्या लाडवासाठी पण साहित्य तयार ठेवावे लागेल मग मैसुर पाक करताना.