दाटून मेघ येता

आनंदमयी's picture
आनंदमयी in जे न देखे रवी...
22 Oct 2013 - 9:12 pm

दाटून मेघ येता
अवचीत सांजवेळी
त्या संथशा नदीला
सुचल्या अबोल ओळी..

हुंकार गर्जनांचा
देई कुठून हाक,
का मेघ सावल्यांना
पुसती सवाल लाख?

काळोख भेदणारी
ये वीज लखलखूनी...
घनदाट रात गाई
मग एकटीच गाणी..

विरहात पोळलेली
धरती पुन्हा नव्याने,
उमलून आज येई
मन दरवळे सुखाने!

ही ओढ आगळीशी
पूर्णत्व आज साधे
मन होऊनी भुपाळी
परतूनिया निनादे !!

© अदिती जोशी

कविता

प्रतिक्रिया

लौंगी मिरची's picture

22 Oct 2013 - 10:08 pm | लौंगी मिरची

वा ! सुंदर कविता .
लिहित रहा .

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2013 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा

WOW...!
झक्कास...!
सिक्सर पे सिक्सर...!

मनीषा's picture

23 Oct 2013 - 12:14 am | मनीषा

सुंदर कविता ..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2013 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.

-दिलीप बिरुटे

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Oct 2013 - 9:20 am | ज्ञानोबाचे पैजार

अजुन एक मस्त कविता

आनंदमयी's picture

23 Oct 2013 - 10:18 am | आनंदमयी

thank u all!! :) :D

आनंदमयी's picture

23 Oct 2013 - 10:44 am | आनंदमयी

या कवितेतील शेवटचं कडवं चुकलेलं आहे! माझ्याच दुसर्या एका कवितेचं शेवटचं कडवं ब्लॉग वरून कविता कॉपी-पेस्ट करताना या कवितेला जोडलं गेलं. मी पोस्ट एडिट करण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ते जमलं नाही! या हलगर्जीपणाबद्दल खरच मनापासून सॉरी :( तुमच्यापैकी बर्याच जणांने शेवटचं कडवं कवितेशी विसंगत वाटलंही असेल. तरी मी या कमेंटमध्येच योग्य अंतिम अंतर्यासोबत कविता परत पोस्ट करत आहे

दाटून मेघ येता
अवचीत सांजवेळी
त्या संथशा नदीला
सुचल्या अबोल ओळी..

हुंकार गर्जनांचा
देई कुठून हाक,
का मेघ सावल्यांना
पुसती सवाल लाख?

काळोख भेदणारी
ये वीज लखलखूनी...
घनदाट रात गाई
मग एकटीच गाणी..

विरहात पोळलेली
धरती पुन्हा नव्याने,
उमलून आज येई
मन दरवळे सुखाने!

वर्षाव मीलनाचा
मन जाई मोहरूनी
सांगे नदी वनाला
ही आगळी कहाणी!

© अदिती जोशी

रुमानी's picture

23 Oct 2013 - 11:54 am | रुमानी

नै तसे कै फारसे जानवत नै ये ...!

कवित आवडली. :)

उद्दाम's picture

23 Oct 2013 - 11:06 am | उद्दाम

सुंदर