Skip to main content

दाटून मेघ येता

लेखक आनंदमयी यांनी मंगळवार, 22/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
दाटून मेघ येता अवचीत सांजवेळी त्या संथशा नदीला सुचल्या अबोल ओळी.. हुंकार गर्जनांचा देई कुठून हाक, का मेघ सावल्यांना पुसती सवाल लाख? काळोख भेदणारी ये वीज लखलखूनी... घनदाट रात गाई मग एकटीच गाणी.. विरहात पोळलेली धरती पुन्हा नव्याने, उमलून आज येई मन दरवळे सुखाने! ही ओढ आगळीशी पूर्णत्व आज साधे मन होऊनी भुपाळी परतूनिया निनादे !! © अदिती जोशी
लेखनविषय:

वाचने 1477
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

WOW...! झक्कास...! सिक्सर पे सिक्सर...!

आवडली कविता. -दिलीप बिरुटे

या कवितेतील शेवटचं कडवं चुकलेलं आहे! माझ्याच दुसर्या एका कवितेचं शेवटचं कडवं ब्लॉग वरून कविता कॉपी-पेस्ट करताना या कवितेला जोडलं गेलं. मी पोस्ट एडिट करण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ते जमलं नाही! या हलगर्जीपणाबद्दल खरच मनापासून सॉरी :( तुमच्यापैकी बर्याच जणांने शेवटचं कडवं कवितेशी विसंगत वाटलंही असेल. तरी मी या कमेंटमध्येच योग्य अंतिम अंतर्यासोबत कविता परत पोस्ट करत आहे दाटून मेघ येता अवचीत सांजवेळी त्या संथशा नदीला सुचल्या अबोल ओळी.. हुंकार गर्जनांचा देई कुठून हाक, का मेघ सावल्यांना पुसती सवाल लाख? काळोख भेदणारी ये वीज लखलखूनी... घनदाट रात गाई मग एकटीच गाणी.. विरहात पोळलेली धरती पुन्हा नव्याने, उमलून आज येई मन दरवळे सुखाने! वर्षाव मीलनाचा मन जाई मोहरूनी सांगे नदी वनाला ही आगळी कहाणी! © अदिती जोशी

सुंदर