दाटून मेघ येता
अवचीत सांजवेळी
त्या संथशा नदीला
सुचल्या अबोल ओळी..
हुंकार गर्जनांचा
देई कुठून हाक,
का मेघ सावल्यांना
पुसती सवाल लाख?
काळोख भेदणारी
ये वीज लखलखूनी...
घनदाट रात गाई
मग एकटीच गाणी..
विरहात पोळलेली
धरती पुन्हा नव्याने,
उमलून आज येई
मन दरवळे सुखाने!
ही ओढ आगळीशी
पूर्णत्व आज साधे
मन होऊनी भुपाळी
परतूनिया निनादे !!
© अदिती जोशी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1477
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा ! सुंदर कविता .
WOW...!
सुंदर कविता ..
छान
अजुन एक मस्त कविता
धन्यवाद!
शेवटचं कडवं चुकलेल.. :(
छान ..!
In reply to शेवटचं कडवं चुकलेल.. :( by आनंदमयी
.