शिळी जिलेबी - १

धन्या's picture
धन्या in जे न देखे रवी...
7 Oct 2013 - 2:44 pm


धीर गंभीर गाज सागराची
सोबतीला आहे बोचरा वारा
हरवून गेल्या दिशा सार्‍या
अन मी शोधतो आहे किनारा


किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले
किती ऋतू तसे पावसात चिंब झाले
कळले नाही मला कधीही ते सारं
माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले


डोळे पाण्याने भरून आलेले आणि
मनात आठवणींचे आभाळ दाटलेले
झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या
थर होते टोकणार्‍या वेदनांचे साचलेले


तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे
मी स्वत:ला खूप सावरलं होतं
मन तसं भिजून आलं होतं पण
माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं


काळ वेळ कधी तशी नसतेच तशी
गुलमोहर फुलांनी बहरून यायला
मनाचंही थोडंसं असंच असतं
पुरते एक जाणीव, मोहरून जायला


चांगलं वाईट तसं काहीच नसतं
हा सारा खेळ आपल्या मनाचा
दुखात हसत असे कुणी येथे अन्
कुणी सुखात आसरा घेई वनाचा


आपला परका आभास सारे
इथे कुणीच कुणाचं नसतं
प्रत्येक क्षण सापेक्ष इथला
तरीही मन जाळ्यात फसतं


भावनेचा ओलावा शोधताना
मी मलाच हरवून गेलो
शिकलो मात्र बरंच काही
अन् वृत्तीने नीर्विकार झालो


जाणिवेनेनीवेच्या पलीकडे
एक अस्वस्थ जग असतं
साथ आपलीच आपल्याला
तिथेही कुणी आपलं नसतं

१०
विसरायचं आता सारं अस
मी पुन्हा पुन्हा ठरवतो
क्षण दोन क्षण जातात अन्
मी पुन्हा स्वत:ला हरवतो

करुणचारोळ्या

प्रतिक्रिया

धन्या.. एकदम हळुवार रे.. मस्त.

पण तू बरा आहेस ना ? थर्मामीटर लाव बघू आधी.

अग्निकोल्हा's picture

7 Oct 2013 - 3:30 pm | अग्निकोल्हा

विसरायचं आता सारं अस
मी पुन्हा पुन्हा ठरवतो
क्षण दोन क्षण जातात अन्
मी पुन्हा स्वत:ला हरवतो

झक्कास्स्स्स्स्स...
भावनेचा ओलावा शोधताना
मी मलाच हरवून गेलो
शिकलो मात्र बरंच काही
अन् वृत्तीने नीर्विकार झालो

क्या बात है...

अभिव्यक्ती ताजी असताना शिळे म्हणणे अन जिलेबीसारख्या मिपा-बदनाम नावाने याची संभावना करणे हे काही झेपले नै धनाजीराव.

बाकी, कविता आवडली हेवेसांनल.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Oct 2013 - 3:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मिपाला अजुन एक कवि लाभला..
आनंद वाटला

मिपाला अजुन एक कवि लाभला..

नाही. घाबरुन जायचे कारण नाही. :)

माझ्याच ब्लॉगवरील मार्च २००८ च्या म्हणजे साधारण साडे पाच वर्षांपूर्वीच्या पोस्ट आहेत या. सहज ब्लॉग चाळताना जाणवलं की आज मी जे लिहितो त्यापेक्षा हे कितीतरी वेगळं आहे. ओळी-ओळीत माझं तेव्हाचं "हरवलेपण" दिसतं.

म्हटलं टाकावं मिपावर.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Oct 2013 - 5:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अहो खरचं मनापासून लिहीले मी ते...
तिमा म्हणतात तेच खरं

मिपावर झाकली माणकं बरीच आहेत हो. फक्त ती कधीकधी जागी होतात

प्रचेतस's picture

7 Oct 2013 - 5:16 pm | प्रचेतस

अहो काय हे??

सखू सारखं अजरामर काव्य फार पूर्वीच मिपावर लिहिणार्‍या कवीची संभावना तुम्ही 'मिपाला अजुन एक कवि लाभला' अशी करता...

धनाजीरावांच्या कोमल कवीमनाला किती यातना होतील बघा अशानं.

दादा कोंडके's picture

7 Oct 2013 - 5:48 pm | दादा कोंडके

आणि त्याचं रसग्रहण कसं विसरलात? :)

अगदी अगदी. ते कसं विसरेन म्या.

हे पण अजून एक रसग्रहण बघा.

तिमा's picture

7 Oct 2013 - 4:31 pm | तिमा

अहो, या शिळ्या जिलब्या नाहीयेत. २००८ सालच्या चांगल्या कविता आमच्यापासून लपवून ठेवल्या याचा निषेध!

मिपाला अजुन एक कवि लाभला..

@मिका: मिपावर झाकली माणकं बरीच आहेत हो. फक्त ती कधीकधी जागी होतात.

यशोधरा's picture

7 Oct 2013 - 4:46 pm | यशोधरा

५, ६ आणि ७ मस्त आहेत.

पण आपले (खोल [विचारांचे]) लेखन वाचुन... सगळकाही असुनही नसल्या प्रमाणे... पाण्यात राहुन कोरडा... धरलं तर चावतय सोडल तर पळतय... जाणवतय पण गवसत नाही... वगैरे वगैरे मानसिकतेमधे सापडलेल्या व्यक्तिचे चित्र समोर येते. काही टोचतय काय ?

तुम्ही म्हणताय ते खरं आहे.

सुदैवाने बर्‍याच उशीरा का होईना पण नेमकं काय "मिसींग" आहे ते कळलंय. :)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Oct 2013 - 4:58 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटी ४ सिक्सर टपाटप बसलेल्या आहेत! :)

प्यारे१'s picture

7 Oct 2013 - 5:10 pm | प्यारे१

सुंदर कविता रे धन्या!

मात्र शीर्षक अगदीच हुकलेले आहे.
जिलेबी हा अत्यंत 'वेगळा' पदार्थ आहे. ह्या वरच्या कविता नि श्चितच जिलेबी नाहीत.

शिळ्या तर मुळीच नाहीत. कवितेत व्यक्त झालेल्या भावना ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतातच. रिले स्पर्धे मध्ये धावताना एकाकडून दुसरीकडे दिल्या जाणार्‍या बॅटनसारख्या इकडून तिकडे दिल्या घेतल्या जाणार्‍या ह्या सातत्यानं जिवंत राहणार्‍या अशा भावना आहेत. (वैधानिक इशारा : स्वतःकडे जास्त काळ ठेवू नयेत. त्रास होतो.)

वर मातब्बरांनी आपले अभिप्राय दिलेले आहे तच.
तद्वत कवीवर्य धनाजीरावांनी आपली वाटचाल करावी.

-उत्तम गोष्टींचा नेहमीच चाहता प्यारे

सुधीर's picture

7 Oct 2013 - 7:18 pm | सुधीर

सुंदर कविता...
मात्र शीर्षक अगदीच हुकलेले आहे.

+१

चौकटराजा's picture

7 Oct 2013 - 5:20 pm | चौकटराजा

जाणिवेनेणीवेच्या पलीकडे
एक अस्वस्थ जग असतं
साथ आपलीच आपल्याला
तिथेही कुणी आपलं नसतं

प्लस ११११.......

प्रचेतस's picture

7 Oct 2013 - 5:27 pm | प्रचेतस

कविता छान रे.
आता आपले परवा पाबे घाटातून जातांना ज्यावर बोलणे झाले होते त्यावर लिही रे जरा. :)

कवितानागेश's picture

7 Oct 2013 - 7:50 pm | कवितानागेश

विसरायचं आता सारं अस
मी पुन्हा पुन्हा ठरवतो
क्षण दोन क्षण जातात अन्
मी पुन्हा स्वत:ला हरवतो

फारच छान. :)

पैसा's picture

7 Oct 2013 - 8:34 pm | पैसा

उगीच स्वतःला कमीपणा घेऊ नको. शिळ्या जिलब्या जास्तच चांगल्या लागतात!

शैलेन्द्र's picture

7 Oct 2013 - 9:16 pm | शैलेन्द्र

+१
मस्त आहे, लिहित रहा

स्पंदना's picture

8 Oct 2013 - 4:45 am | स्पंदना

धनाजीराव जिंदाबाद!

सार्थबोध's picture

8 Oct 2013 - 10:21 am | सार्थबोध

भारी आहेत एकदम

मृत्युन्जय's picture

8 Oct 2013 - 11:05 am | मृत्युन्जय

आयला धन्या ५ वर्षापुर्वी माणसात होता म्हणायचा :)

मस्त आहे रे.

दोन -तीनदा अगदी वर आलेला धागा शीर्षक वाचून टाळत होते उघडायचा :-)
पण धागा उघडला ते छान झालं. चारोळ्या आवडल्या.

ब़जरबट्टू's picture

8 Oct 2013 - 11:31 am | ब़जरबट्टू

वाटले शिळ्या जिलब्या कशाला खायच्या, पण फारच मस्त जमल्यात.....

मस्त लागल्या...

आता लेख रुपी मठ्ठ्याची वाट बघत आहे..

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Oct 2013 - 12:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

धनाजी राव इतक्या सुंदर चारोळ्यांना शिळ्या जिलब्या का बरे म्हणालात?

शिर्षक पाहुन मी बर्‍याच वेळा टाळला होता धागा. आता सुध्दा काहितरी पानचट पणा वाचायच्या अपेक्षेने धागा उघडला

आणि सुखद धक्का बसला.

हे म्हणजे टॉयलेट पेपर मधे मोगर्‍याचा गजरा बांधुन दिल्या सारखे वाटले.

धनाजीराव, लैच जबरा लिहित होता की तुम्ही राव.