✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिळी जिलेबी - १

ध — धन्या, Mon, 10/07/2013 - 14:44
१ धीर गंभीर गाज सागराची सोबतीला आहे बोचरा वारा हरवून गेल्या दिशा सार्‍या अन मी शोधतो आहे किनारा २ किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले किती ऋतू तसे पावसात चिंब झाले कळले नाही मला कधीही ते सारं माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले ३ डोळे पाण्याने भरून आलेले आणि मनात आठवणींचे आभाळ दाटलेले झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या थर होते टोकणार्‍या वेदनांचे साचलेले ४ तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे मी स्वत:ला खूप सावरलं होतं मन तसं भिजून आलं होतं पण माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं ५ काळ वेळ कधी तशी नसतेच तशी गुलमोहर फुलांनी बहरून यायला मनाचंही थोडंसं असंच असतं पुरते एक जाणीव, मोहरून जायला ६ चांगलं वाईट तसं काहीच नसतं हा सारा खेळ आपल्या मनाचा दुखात हसत असे कुणी येथे अन् कुणी सुखात आसरा घेई वनाचा ७ आपला परका आभास सारे इथे कुणीच कुणाचं नसतं प्रत्येक क्षण सापेक्ष इथला तरीही मन जाळ्यात फसतं ८ भावनेचा ओलावा शोधताना मी मलाच हरवून गेलो शिकलो मात्र बरंच काही अन् वृत्तीने नीर्विकार झालो ९ जाणिवेनेनीवेच्या पलीकडे एक अस्वस्थ जग असतं साथ आपलीच आपल्याला तिथेही कुणी आपलं नसतं १० विसरायचं आता सारं अस मी पुन्हा पुन्हा ठरवतो क्षण दोन क्षण जातात अन् मी पुन्हा स्वत:ला हरवतो

प्रतिक्रिया द्या
6450 वाचन

💬 प्रतिसाद (30)

धन्या.. एकदम हळुवार रे.. मस्त

गवि
Mon, 10/07/2013 - 15:14 नवीन
धन्या.. एकदम हळुवार रे.. मस्त. पण तू बरा आहेस ना ? थर्मामीटर लाव बघू आधी.
  • Log in or register to post comments

विसरायचं आता सारं अस

अग्निकोल्हा
Mon, 10/07/2013 - 15:30 नवीन
विसरायचं आता सारं अस मी पुन्हा पुन्हा ठरवतो क्षण दोन क्षण जातात अन् मी पुन्हा स्वत:ला हरवतो
  • Log in or register to post comments

झक्कास्स्स्स्स्स...भावनेचा

मदनबाण
Mon, 10/07/2013 - 15:36 नवीन
झक्कास्स्स्स्स्स... भावनेचा ओलावा शोधताना मी मलाच हरवून गेलो शिकलो मात्र बरंच काही अन् वृत्तीने नीर्विकार झालो क्या बात है...
  • Log in or register to post comments

अभिव्यक्ती ताजी असताना शिळे

बॅटमॅन
Mon, 10/07/2013 - 15:39 नवीन
अभिव्यक्ती ताजी असताना शिळे म्हणणे अन जिलेबीसारख्या मिपा-बदनाम नावाने याची संभावना करणे हे काही झेपले नै धनाजीराव. बाकी, कविता आवडली हेवेसांनल.
  • Log in or register to post comments

आयला

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 10/07/2013 - 15:40 नवीन
मिपाला अजुन एक कवि लाभला.. आनंद वाटला
  • Log in or register to post comments

मिपाला अजुन एक कवि लाभला..

धन्या
Mon, 10/07/2013 - 16:17 नवीन
मिपाला अजुन एक कवि लाभला..
नाही. घाबरुन जायचे कारण नाही. :) माझ्याच ब्लॉगवरील मार्च २००८ च्या म्हणजे साधारण साडे पाच वर्षांपूर्वीच्या पोस्ट आहेत या. सहज ब्लॉग चाळताना जाणवलं की आज मी जे लिहितो त्यापेक्षा हे कितीतरी वेगळं आहे. ओळी-ओळीत माझं तेव्हाचं "हरवलेपण" दिसतं. म्हटलं टाकावं मिपावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

कोण

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 10/07/2013 - 17:00 नवीन
अहो खरचं मनापासून लिहीले मी ते... तिमा म्हणतात तेच खरं
मिपावर झाकली माणकं बरीच आहेत हो. फक्त ती कधीकधी जागी होतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अहो काय हे??

प्रचेतस
Mon, 10/07/2013 - 17:16 नवीन
अहो काय हे?? सखू सारखं अजरामर काव्य फार पूर्वीच मिपावर लिहिणार्‍या कवीची संभावना तुम्ही 'मिपाला अजुन एक कवि लाभला' अशी करता... धनाजीरावांच्या कोमल कवीमनाला किती यातना होतील बघा अशानं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

+१

दादा कोंडके
Mon, 10/07/2013 - 17:48 नवीन
आणि त्याचं रसग्रहण कसं विसरलात? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी. ते कसं विसरेन म्या

प्रचेतस
Mon, 10/07/2013 - 17:59 नवीन
अगदी अगदी. ते कसं विसरेन म्या. हे पण अजून एक रसग्रहण बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

धनाजीराव

तिमा
Mon, 10/07/2013 - 16:31 नवीन
अहो, या शिळ्या जिलब्या नाहीयेत. २००८ सालच्या चांगल्या कविता आमच्यापासून लपवून ठेवल्या याचा निषेध! मिपाला अजुन एक कवि लाभला.. @मिका: मिपावर झाकली माणकं बरीच आहेत हो. फक्त ती कधीकधी जागी होतात.
  • Log in or register to post comments

५, ६ आणि ७ मस्त आहेत.

यशोधरा
Mon, 10/07/2013 - 16:46 नवीन
५, ६ आणि ७ मस्त आहेत.
  • Log in or register to post comments

माहित नाहि का ते... तसा आपला माझा परिचयही नाही....

अग्निकोल्हा
Mon, 10/07/2013 - 16:53 नवीन
पण आपले (खोल [विचारांचे]) लेखन वाचुन... सगळकाही असुनही नसल्या प्रमाणे... पाण्यात राहुन कोरडा... धरलं तर चावतय सोडल तर पळतय... जाणवतय पण गवसत नाही... वगैरे वगैरे मानसिकतेमधे सापडलेल्या व्यक्तिचे चित्र समोर येते. काही टोचतय काय ?
  • Log in or register to post comments

तुम्ही म्हणताय ते खरं आहे.

धन्या
Mon, 10/07/2013 - 17:49 नवीन
तुम्ही म्हणताय ते खरं आहे. सुदैवाने बर्‍याच उशीरा का होईना पण नेमकं काय "मिसींग" आहे ते कळलंय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

शेवटी ४ सिक्सर टपाटप बसलेल्या

अत्रुप्त आत्मा
Mon, 10/07/2013 - 16:58 नवीन
शेवटी ४ सिक्सर टपाटप बसलेल्या आहेत! :)
  • Log in or register to post comments

अप्रतिम.

प्यारे१
Mon, 10/07/2013 - 17:10 नवीन
सुंदर कविता रे धन्या! मात्र शीर्षक अगदीच हुकलेले आहे. जिलेबी हा अत्यंत 'वेगळा' पदार्थ आहे. ह्या वरच्या कविता नि श्चितच जिलेबी नाहीत. शिळ्या तर मुळीच नाहीत. कवितेत व्यक्त झालेल्या भावना ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतातच. रिले स्पर्धे मध्ये धावताना एकाकडून दुसरीकडे दिल्या जाणार्‍या बॅटनसारख्या इकडून तिकडे दिल्या घेतल्या जाणार्‍या ह्या सातत्यानं जिवंत राहणार्‍या अशा भावना आहेत. (वैधानिक इशारा : स्वतःकडे जास्त काळ ठेवू नयेत. त्रास होतो.) वर मातब्बरांनी आपले अभिप्राय दिलेले आहे तच. तद्वत कवीवर्य धनाजीरावांनी आपली वाटचाल करावी. -उत्तम गोष्टींचा नेहमीच चाहता प्यारे
  • Log in or register to post comments

+१

सुधीर
Mon, 10/07/2013 - 19:18 नवीन
सुंदर कविता... मात्र शीर्षक अगदीच हुकलेले आहे. +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

खरंय....

चौकटराजा
Mon, 10/07/2013 - 17:20 नवीन
जाणिवेनेणीवेच्या पलीकडे एक अस्वस्थ जग असतं साथ आपलीच आपल्याला तिथेही कुणी आपलं नसतं प्लस ११११.......
  • Log in or register to post comments

कविता छान रे.

प्रचेतस
Mon, 10/07/2013 - 17:27 नवीन
कविता छान रे. आता आपले परवा पाबे घाटातून जातांना ज्यावर बोलणे झाले होते त्यावर लिही रे जरा. :)
  • Log in or register to post comments

विसरायचं आता सारं अस

कवितानागेश
Mon, 10/07/2013 - 19:50 नवीन
विसरायचं आता सारं अस मी पुन्हा पुन्हा ठरवतो क्षण दोन क्षण जातात अन् मी पुन्हा स्वत:ला हरवतो फारच छान. :)
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलंस धन्या!

पैसा
Mon, 10/07/2013 - 20:34 नवीन
उगीच स्वतःला कमीपणा घेऊ नको. शिळ्या जिलब्या जास्तच चांगल्या लागतात!
  • Log in or register to post comments

+१ मस्त आहे, लिहित रहा

शैलेन्द्र
Mon, 10/07/2013 - 21:16 नवीन
+१ मस्त आहे, लिहित रहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धनाजीराव जिंदाबाद!

स्पंदना
Tue, 10/08/2013 - 04:45 नवीन
धनाजीराव जिंदाबाद!
  • Log in or register to post comments

भारी आहेत एकदम

सार्थबोध
Tue, 10/08/2013 - 10:21 नवीन
भारी आहेत एकदम
  • Log in or register to post comments

आयला धन्या ५ वर्षापुर्वी

मृत्युन्जय
Tue, 10/08/2013 - 11:05 नवीन
आयला धन्या ५ वर्षापुर्वी माणसात होता म्हणायचा :) मस्त आहे रे.
  • Log in or register to post comments

दोन -तीनदा अगदी वर आलेला धागा

आतिवास
Tue, 10/08/2013 - 11:23 नवीन
दोन -तीनदा अगदी वर आलेला धागा शीर्षक वाचून टाळत होते उघडायचा :-) पण धागा उघडला ते छान झालं. चारोळ्या आवडल्या.
  • Log in or register to post comments

हो ना...

ब़जरबट्टू
Tue, 10/08/2013 - 11:31 नवीन
वाटले शिळ्या जिलब्या कशाला खायच्या, पण फारच मस्त जमल्यात.....
  • Log in or register to post comments

जिलब्या अजिबात शिळ्या वाटल्या नाहीत...

मुक्त विहारि
Tue, 10/08/2013 - 12:04 नवीन
मस्त लागल्या... आता लेख रुपी मठ्ठ्याची वाट बघत आहे..
  • Log in or register to post comments

सुखद धक्का

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 10/08/2013 - 12:06 नवीन
धनाजी राव इतक्या सुंदर चारोळ्यांना शिळ्या जिलब्या का बरे म्हणालात? शिर्षक पाहुन मी बर्‍याच वेळा टाळला होता धागा. आता सुध्दा काहितरी पानचट पणा वाचायच्या अपेक्षेने धागा उघडला आणि सुखद धक्का बसला. हे म्हणजे टॉयलेट पेपर मधे मोगर्‍याचा गजरा बांधुन दिल्या सारखे वाटले.
  • Log in or register to post comments

धनाजीराव, लैच जबरा लिहित होता

अभ्या..
Wed, 10/09/2013 - 03:36 नवीन
धनाजीराव, लैच जबरा लिहित होता की तुम्ही राव.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा