रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
12 Jul 2013 - 3:27 pm

दाय विल बी डन!

Jejus

जिझस
_____________________________

जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे. जे आहे ते स्वीकारलं की मनाला तक्रारीला जागाच उरत नाही. स्वीकृतीला मन राजी होत नाही. ती तुमची हार आहे असा बिनतोड युक्तिवाद करून ते उपलब्ध उपभोगू देत नाही.

लगाम मनाकडे असल्यानं आपण आहे ते नाकारतो (किंवा अत्यंत नाईलाजानं स्वीकारतो). त्यामुळे जे प्रत्यक्षात आहे ते व्यर्थ होतं आणि मनात आहे ते उपलब्धच नाही तर उपभोगणार कसं?

स्वच्छंद होणं म्हणजे समोर आहे ते बेशर्त मान्य करून आयदर त्याच्याशी डील करणं किंवा मग डायरेक्ट उपभोगायला लागणं.

________________________________________

बिफोर वी गो,

दुसर्‍या लेखात मी एक साधी गोष्ट सांगितली होती : 'बेशर्त स्वीकृती' हा मनाकडून सर्व सूत्र स्वत:कडे घेण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.

याचं साधं कारण असं की मन तक्रारखोर आहे. त्याला जे मिळालंय ते नकोय आणि जे सध्या समोर नाही ते हवंय. लोकांना वाटतं स्वीकृती हार आहे, त्यानं महत्त्वाकांक्षेला शह बसेल. पण वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे. जे आहे त्याचा स्वीकार आपल्याला वर्तमानात आणतो, समोर आहे त्याच्याशी आपण डील करतो आणि असलेल्याशी समर्थपणे डील करता आलं की आपला कॉन्फिडन्स वाढून प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होतात. मग बहुतेकदा आहे तेच उत्तम वाटतं आणि ते सर्वोत्तम करण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा मग आहे ते योग्यपद्धतीनं डील करून काही तरी नवं शोधतो.

आहे ते नाकारणं, त्याच्याशी वैर घेणं, आपल्याला द्विधा करतं. जे करतोय त्याच्याकडे दुर्लक्ष होतं कारण जे करायचंय ते मनात चालू असतं. मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि समोर आहे त्यात आपल्याला रस नसतो कारण मन ते बदलायला सांगत असतं!

______________________________________

ओशोंनी मनाचा हा पैलू अत्यंत अनोख्या शब्दात मांडला आहे "मन का स्वभाव ही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!" (आष्टावक्र महागीता)

अस्विकार हा मनाचा महत्तम पैलू आहे, मग सांप्रत गोष्ट काम असो की नातं. नवविवाहितांना माझं म्हणणं चटकन लक्षात येईल. शोधताना प्रत्येकानं बेस्ट पार्टनर चूज केलेला असतो (अर्थात, प्राप्त परिस्थितीत यथासांग विचार करून). पण काही दिवसात चॉइस चुकलाय असं वाटायला लागतं (मजा म्हणजे दोघांनाही!). आता नव्या पर्यायाचा शोध सुरू होतो (त्यात सुद्धा कोण आधी शोधतोय याची शर्यत!). मग वर लिहिलंय ती परिस्थिती उद्भवते "मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि प्रत्यक्षात असलेल्यात आपल्याला रस नसतो कारण मन त्याच्याशी राजी नसतं!"

सगळ्या प्रकारात एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की लगाम मनाकडे आहे!

आपल्याला वाटतं पहिली निवड केली तेव्हा निर्णय आपला होता पण तसं असतं तर आपण आपल्याकडनं नातं सावरलं असतं. तिला काहीही वाटू दे, आपण तिला समजावून घेतलं असतं आणि समजावून सांगितलं असतं की सेपरेशन कशाला? आपण आपल्याकडून सर्व प्रयत्न केले असते. आपल्या सुखात तिचं सुख आहे आणि तिच्या सुखात आपलं आहे याची जाण ठेवून वागलो असतो. पण निर्णय मनाचा होता आणि मनाला रंग बदलायला किती वेळ लागतोय? जरा मनाविरुद्ध झालं की संपलं! नवा पर्याय शोधायला तयार. आणि मजा म्हणजे मनंच दुसरा पर्याय निवडणार आहे!

मन निर्णय तो काय घेणार? काय आहे त्याच्याकडे निर्णय घ्यायला? फक्त स्मृती (त्या देखील बहुतेक नकोशा वाटणार्‍या)! आणि त्यातून काय साधायचा प्रयत्न करेल ते? तर त्या स्मृती पुसून टाकू शकेल अशी कुणी तरी फॅंटास्टिक व्यक्ती! बरं समजा मिळाली अशी कोणी तर किती वेळ लागेल हा भ्रम निस्तरायला? फक्त तिनं मनाच्या कल्पनेपेक्षा जरासं वेगळं वागणं, दॅट्स ऑल! मग पुन्हा बदलाबदली सुरू!

थोडक्यात जोपर्यंत अस्विकार आहे तोपर्यंत लगाम मनाकडे आहे. 'दाय विल बी डन' म्हणजे आहे त्याची बेशर्त स्वीकृती. हा स्वीकार तुम्ही समजून उमजून केलेला आहे, नाईलाजानं नाही. ज्या क्षणी तुम्ही आहे ते स्वीकारता, त्या क्षणी लगाम तुमच्या हातात येतो. भ्रमराला रुणूझुण करायला संधीच राहत नाही.
______________________________

तुम्हाला वाटेल मी माझ्यामनाचे श्लोक लिहितोय, पण तुमचे प्रतिसाद मनाची नेमकी हीच अवस्था दाखवतात :

>केवळ अन केवळ ओब्लिगेशनच कामातलि मजा कमि करतं जात, म्हणूनच आवडत्या कंपनित लागलेल्या जॉबचा पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही.

= प्रत्येक दिवस नवा आहे पण मन स्मृतीतनं सक्रिय होतं आणि आपण त्याच्याशी अलाईन होतो. त्यात आपल्याला लहानपणापासून शिकवण आहे ‘नव्याचे नऊ दिवस’. मग आपल्याला वाटतं "पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही."

>ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं.
= आता ही मनाची शर्त पूर्ण करणं असंभव आहे कारण तुमच्या मर्जीवर कंपनी कशी चालणार? (आणि वैवाहिक नातं असेल तर विलफुल एंटर-एग्झिट अजूनच अवघड!). पण एक साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. प्रसंगाकडे स्मृतीतनं पाहिल्यामुळे त्यातलं नवेपण हरवतंय. प्रत्येक एंट्री फ्रेशच आहे आणि इग्झिटची गरज वाटतेय कारण आहे त्यात रस नाहीये!

>म्हणजे काय तर आपण एखाद्या कामात निपुण होत गेलो पण पुरेस चॅलेंज वाढत गेलं नाही तरी कामाचा कंटाळा येतो. ह्या उलट निपुणता निर्माण झालि नाही पण चॅलेंज वाढत गेलं तर कामाचे फ्रस्ट्रेशन येत. तेव्हां हि गोश्ट काम करताना फार व्यवस्थित सांभाळावी लागते. अन्यथा बट्याभोळ होतो.

= आहे त्यात रस नसेल तर कसे होणार तुम्ही निपुण? आणि आहे ते काम कौशल्यानं केल्यावर चॅलिंज निर्माण होतो. ते वन डे सारखं आहे, तुम्ही आल्याआल्या बाउंड्री किंवा सिक्स ठोकू शकत नाही आणि एकदा सेटल झाल्यावर आहे तोच गेम तुम्हाला नवे चॅलेंजिस देतो.

फ्रस्ट्रेशनच खरं कारण नैपुण्य नाही आणि नैपुण्य नाही कारण आहे त्याकडे दुर्लक्ष, अशा चक्रात व्यक्ती सापडते. मग मन सांगता कंटाळा आला, घ्या आता नवा जॉब (वैवाहिक नात्यात तर आणखीच मजा, बदला पार्टनर! (किंवा बघा पर्यायी व्यवस्था!)

__________________________________

मन शब्दांशी कसा खेळ करतं हे पाहण्यासारखं आहे :

माझा मुद्दा साधा आहे :

बेशर्त स्वीकारात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याचा निर्णय तुम्ही घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं. आपण कामाला लागलो, विषय संपला!

>शब्द...शब्द..शब्द...शब्द..इथे कांहीच समजत नाही, कांहीच सिद्ध होत नाही.
= त्या प्रतिसादात शब्दांचीमाळ विंडोबाहेर गेलीये! स्वीकारा किंवा स्वीकारू नका निर्णय तुमचा आहे. सगळं लेखन साध्या मराठीत आहे, त्यात न समजण्यासारखं काय आहे?

उत्तम संदर्भ मन किती चुकीच्या पद्धतीनं देतं याचं उदाहरण :

>गुरुदेव म्हणाले:
हू आर यू?
यू आर आय इन द यू इन द आय इन द यू? ( संदर्भ : असा मी असामी )
= प्रश्न 'हू आर यू'? नाहीये. 'आर यू गोइंग टू अ‍ॅक्सेप्ट ऑर नॉट' असा आहे!

याहीपेक्षा कहर पुढे आहे:

>काय ते ठरलं का शेवटी?
स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं की 'सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं?

= मन सांगतंय स्वीकार म्हणजे हार आहे ('सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं?).

स्वीकार स्वेच्छा आहे, जे आहे ते लक्षपूर्वक आणि जवाबदारीनं निभावणं आहे. मनाला वाटतं स्वच्छंद म्हणजे बेदरकारी! (स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं )

>की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि लोकांनी फटके दिले की मग मुकाट्यानी सगळं स्विकारुन जगायचं?

= हा (प्रतिसादकाच्या) मनाचा पूर्वानुभव आहे!

पूर्ण स्वीकार तुम्हाला समर्थ करतो. 'स्वीकारू की नको' अशी मनाची द्विधा स्थितीच तुम्हाला कमजोर करते आणि मग परिस्थिती वरचढ होते.

>की आधी सगळं स्विकारुन जगायचं आणि वैताग आला की स्वेच्छेनी जगायचे?
= त्याच द्विधा स्थितीचा पुनर्प्रत्यय!

>की स्वेच्छेनी जगतोय असं दाखवायचं आणि खरं तर सगळं स्विकारुनच जगायचं?
= मन पुन्हा तेच सांगतंय स्वीकार ही हार आहे!

>की सगळं स्विकारुन मुकाट्यानी जगतोय असं दाखवत हळूच स्वेच्छा पुढे सरकवत रहायची?

= परिस्थितीनं पुरती वाट लावली की 'आत एक आणि बाहेर एक' अशी अवस्था कशी होते त्याचं यथार्थ वर्णन!

>त्यापेक्षा सोप्पे म्हणजे स्वतः स्वेच्छेनी जगायचं आणि आजूबाजूच्या लोकांना सांगायचं आहे त्याचा स्वीकार करुन जगा! कसे?

= इग्झॅक्टली हेच तर मनाला वाटतंय! म्हणून तर स्वीकृती स्वत:ला करायचीये हे लक्षात येत नाहीये.

>काय ते ठरलं की मला कळवा बरं का सगळ्या चर्चापटूंनी.
= काय कळवणार ते? कुठे बेशर्त स्वीकार केलाय त्यांनी? त्यांचाही लगाम मनाकडेच तर आहे.

माझ्या लेखनाचा उपयोग करून घ्यायचा असेल तर असले व्यर्थ प्रतिसाद आणि त्याहीपेक्षा व्यर्थ म्हणजे इतर पोस्टवर माझ्या प्रतिसादांवर भंपक उपप्रतिसाद देऊन पर्सनल टार्गेटींग (याविषयी प्रशासनचं धोरण काय आहे कल्पना नाही), यातनं काही होणार नाही.

एखाद्या प्रसन्न सकाळी उठता क्षणी निर्णय घ्या 'दाय विल बी डन! आणि मग त्या मूडमध्ये फक्त एक दिवस जगून बघा. तुमच्या जीवनाचा सारा रंग बदलेल. त्या अनुभवातनं मग प्रतिसाद द्या. तुम्हाला कळेल लेखन म्हणजे नुसते शब्द नव्हते त्यात अर्थ होता. यू विल एन्जॉय.

__________________________
बिफोर आय क्लोज,

'दाय विल बी डन!' याचा अर्थ (जिझसला जरी) आकाशातला कुणी तरी परिस्थिती निर्माण करतो आणि आपण त्याला हो म्हणतो असा (त्या वेळी) वाटत असला तरी असा कुणी आकाशस्थ मानण्याची गरज नाही. कारण मग मन पुन्हा 'तो कोण?' 'एकदा त्याची मर्जी स्वीकारल्यावर तो माझी काळजी घेणार का?' असले प्रश्न निर्माण करेल.

तर तसा कुणीही नाही. आपण परिस्थितीचा उहापोह करत नाही, फक्त तिचा बेशर्त स्वीकार करतो.

काही भक्तिपंथी म्हणतील 'अरे ये सब केमीकल लोचे है भाई...आमचे संत फार सोपा सिद्धांत सांगतात : ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. '

तर तसा अनंतही कुणी नाही आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही.

धर्मप्रकटन

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

12 Jul 2013 - 3:28 pm | संजय क्षीरसागर

एक, ३१ जुलैच्या कामामुळे प्रतिसादांना उत्तर द्यायला विलंब होऊ शकतो तरी कोणताही (गोड) गैरसमज करुन घेऊ नये.

आणि दोन, लेखन ‘मन’ या विषयावर असल्यानं प्रत्येक प्रतिसाद प्रतिसादकाचं मनंच व्यक्त करतो (विषेशत: त्याचं स्वत:च्या मनाविषयीच आकलन आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन) याची जाणीव ठेवून प्रतिसाद दिले तर चर्चा विधायक होऊ शकेल.

लंबूटांग's picture

12 Jul 2013 - 3:50 pm | लंबूटांग

तुम्हीच मागे उत्स्फूर्तपणे कोणत्याही वेळेचं बंधन न पाळता जगा असे सांगितले होते ना? मग ही ३१ जुलैची कामे कुठून आली?

आणि हो मागील २ भागांत त्या definitions बाबत विचारणा केली होती त्याबद्दल आपण मनाने/ मेंदूने/ हृदयाने/ स्मृतींने अजून काही शब्द राहिला असेल तर त्याने काही विचार केला आहे का?

चिगो's picture

16 Jul 2013 - 12:35 am | चिगो

'वेळ' नावाच्या एका भासाचा वापर करुन, 'पैसा' नावाचा भास मिळवण्याचा प्रयत्न असेल.. एनर्जी प्रमाणेच, वन भास इज कन्व्हर्टेड टू अनादर भास.. भास ना आता? ;-)

बॅटमॅन's picture

16 Jul 2013 - 12:47 am | बॅटमॅन

"भासाची नाटके" अजूनही फार पापुलर आहेत याचे हे अजून उदाहरण ;)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jul 2013 - 3:34 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/horror/werewolf-smiley-emoticon.gif

विटेकर's picture

12 Jul 2013 - 5:18 pm | विटेकर

जादू आहे हो तुमच्या बोटात ( की माऊसमध्ये)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2013 - 1:23 am | अत्रुप्त आत्मा

दोन्ही कडे नाही...

जादू http://www.sherv.net/emoticons.html इथे आहे. ;)

अग्निकोल्हा's picture

12 Jul 2013 - 3:57 pm | अग्निकोल्हा

'बेशर्त स्वीकृती' चा वापर तुम्हि ३१ जुलैचि कामे फाट्यावर मारायला का करत नाहि ? एकदा मनाला समजावलं कि यापुढे फक्त आनंदात रहायच, ३१ जुलैचि कामे अजिबात करायची नाहित. जमेल काय ? शेवटी ३१ जुलैचि कामे ही केवळ एक प्रक्रिया आहे तिचा उगम तुम्हाला कळाला कि तुम्हि त्यापासुन वेगळे झालेच समजा.. होय ना ?

चित्रगुप्त's picture

12 Jul 2013 - 4:02 pm | चित्रगुप्त

म्हणूनच फुन्शुंग वांगडू म्हणतो ... सीटी बजा के बोल भैय्या "ऑल ईज वेल"
http://www.youtube.com/watch?v=1ImajqLFG_M

कवितानागेश's picture

12 Jul 2013 - 5:21 pm | कवितानागेश

तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे|

विटेकर's picture

12 Jul 2013 - 5:28 pm | विटेकर

शाप काही कळत नाही ! आमचे समर्थ कसे सोप्प करुन सांगतात
देवाचे इच्छेनें वर्तावें| देव करील तें मानावें |मग सहजचि स्वभावें| कृपाळु देव ||४-८-२३||
सोप्पा विषय अवघड करून सांगण्याची संजय भौ ची होतोटी लोकविलक्षण आहे. त्याला सल्लाम.

अवतार's picture

12 Jul 2013 - 11:24 pm | अवतार

माझ्या इच्छेनें वर्तावें| मी करील तें मानावें | मग सहजचि स्वभावें| कृपाळु मी ||

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2013 - 12:54 am | अत्रुप्त आत्मा

अगागागागा...! =)) =)) =))

अर्धवटराव's picture

13 Jul 2013 - 1:46 am | अर्धवटराव

मनाकडुन कंट्रोल काढायचा, मनालाच सुपुर्त करायचा, हे सुपूर्त करताना मनाला बजावून सांगायचं कि तू मन नाहिस. मनाला तंटेखोर, तक्रारखोर, असमाधानी, प्रत्येक दिलेल्या गोष्टीचा सत्यानाश करणारा, एका स्मृतीशिवाय इतर काहिच क्वालिटी नसणारा भिकारी... अशा असंख्य शिव्या द्यायच्या. अरेरे.
गंमत म्हणजे लेख आणि चर्चेतले सर्व प्रतिसाद मनच देतय तरी त्याला नाकारायचं, मनाला स्विच ऑफ करायच्या बाता मारायच्या (हे बाता मारणे देखील मनच करतय हे सोयीस्कर रित्या विसरायचं)
एकिकडे काळ भ्रम आहे, अस्तित्वाला आदि-अंत नाहि असं म्हणायचं आणि वर "असा अनंत कुणी नाहि" अशी विरोधाभासी मखलाशी करायची.

आत्मताडनाचा इतका उत्कट आणि तितकाच दुर्लक्षीत प्रयोग यापुर्वी बघितला नव्हता. असो. सर्व मनाचेच प्रयोग.

अर्धवटराव

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2013 - 2:26 am | अत्रुप्त आत्मा

@आत्मताडनाचा इतका उत्कट आणि तितकाच दुर्लक्षीत प्रयोग यापुर्वी बघितला नव्हता.>>> http://mimarathi.net/smile/congrats.gif
खरोखर खरं आहे हे... अत्यंत सहमत!

@आत्मताडन >>> काय शब्द वापरलाय! अतिशय चपखल...अतिशय!
जोरदार टाळ्या,http://mimarathi.net/smile/congrats.gif या शब्दावर आणी वाक्यासाठिही!

राजेश घासकडवी's picture

13 Jul 2013 - 4:17 am | राजेश घासकडवी

हा लेखांक तिसराच आहे कशावरून? कदाचित तुम्ही जे आहे ते स्वीकारून स्वच्छंदतेने मध्ये आणखीन दोनतीन भाग लिहिले असतील, आणि स्मृती पुसून टाकल्या असतील.
स्मृती पुसून टाकायच्या तर गेल्या लेखावर कोणी काय प्रतिसाद दिले हे लक्षात ठेवणं बरोबर आहे का?

माझ्या प्रतिसादांवर भंपक उपप्रतिसाद देऊन पर्सनल टार्गेटींग

अहो सरळ 'दाय विल बी डन' म्हणून स्वीकारावं हो. मनाच्या हातात लगाम देऊच नका, म्हणजे मग कसलाच त्रास होत नाही.

३१ जुलैच्या कामामुळे प्रतिसादांना उत्तर द्यायला विलंब होऊ शकतो तरी कोणताही (गोड) गैरसमज करुन घेऊ नये.
खी.खी.खी खीक्क ! मनावरची हुकुमत इतकी भ्रामक असेल असे वाटले नव्हते ! १२ जुलैलाच ३१ जुलैचा विचार करुन बसलात यातुनच तुमच्या मनाची चपळता आणि त्यावरचे तुमचे नसलेले नियंत्रण लक्षात येते.
आता १२ जुलैला ३१ जुलैचा विचार का आला याचा बॅक ट्रेस मारल्यास पहिला मनात आलेला विचार काय होता असा प्रश्न तुम्ही तुमच्याच मनाला विचारा बरं का ? ;)

संजय क्षीरसागर's picture

13 Jul 2013 - 10:55 am | संजय क्षीरसागर

ज्यानं कधी प्रेम केलंय तो स्वतःला दुसर्‍याचा अनुभवाशी लगेच रिलेट करू शकतो. दुसर्‍याच्या अनुभवानं तो आनंदून जातो. तशा लेखनावर उत्सफूर्तपणे प्रतिसाद देतो. त्याला सम-समानुभव म्हटलंय.

या उलट परिस्थिती प्रेम न केलेल्याची असते. त्यानं प्रेमाविषयी ऐकलेलं असतं, त्याला करावंस वाटत असतं (किंवा आता शक्य नसलं तरी त्या वेळी वाटलेलं असतं) पण जमलेलं नसतं. ते साहस त्याला झेपलेलं नसतं.

प्रेम काय चिज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती जगात दुर्मिळ आहे कारण वयात येता क्षणी त्या भावना देह-मनात नैसर्गिकपणे उमलून येतात. तुम्हाला अंगोपांग व्यापून टाकतात.

ज्यानं कधी प्रेमाच साहस केलं नाही तो दुसर्‍याच्या प्रेम कहाणीला तीन प्रकारे प्रतिसाद देतो:

एक, प्रेमात खोट आहे, तुला जे वाटतंय ते केवळ शारीरिक आकर्षण आहे. तुझ्या वयात असं सगळ्यांनाच वाटतं. एकदा लग्न झाल्यावर कळतं की प्रेमबिम सगळ्या गप्पा होत्या.

खरं तर त्याची आत जळजळ होत असते पण दुसरा आनंदात आहे आणि आपल्याला जमलं नाही हे त्याला सहन होत नाही. तो फक्त एकच करू शकतो, दुसर्‍याच्या प्रेमातली खोट दाखवणं, त्याचा उपहास करणं!

दोन, त्याला डायरेक्ट `खरं प्रेम देवावर असतं, असल्या क्षणभंगुर नात्यात अर्थ नाही'. अमका संत काय म्हणाला, तमक्यानं कशी संसाराकडे पाठ फिरवून जगाचा उद्धार करणारा ग्रंथ लिहीला वगैरे सांगून त्याला हतोत्साह करायचं. जेणे करून प्रेम करणार्‍याला झक मारली आणि याला सांगितलं असं वाटायला लावायचं.

तीन, तू स्वतःला मजनू समजतोस काय? तू काही फार मोठं दिव्य केलं असं समजू नकोस. जगात अशी कैक प्रेमप्रकरणं होतात आणि संपतात.

थोडक्यात, अशा व्यक्तीला स्वतःचा काही अनुभव नसतो पण प्रेम लाभलेला तद्दन फालतू आहे हे सिद्ध केलं की याला रिलीफ मिळणार असतो.

___________________________________

प्रेम काय चिज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती जशी जगात दुर्मिळ आहे तद्वत स्वच्छंद ही आपल्या प्रत्येकाची आंतरिक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर इग्झॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील.

ज्यांनी कधी मस्त जगण्याचा अनुभव घेतलायं ते आनंदून जातील. स्वतःला रिलेट करू शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही स्वच्छंद होऊ शकतो असा विश्वास वाटेल.

आणि जे वंचित आहेत ते :

एकतर, लेखनात त्रुटी शोधत बसतील
किंवा दोन, संत वचनं उधृत करतील
अथवा तीन, इथे किंवा इतरत्र विडंबनं करतील

आता मजा अशीये,

लेखनात त्रुटी असणं अशक्य आहे कारण तो अनुभव आहे.

संत वचनांचा ती उधृत करणार्‍यांना काही एक उपयोग झालेला नाही (अदरवाइज त्यांनीच लेख लिहीला असता!).

विडंबकांनी अहंकाराचा कितीही डंका पिटला तरी ते स्वच्छंद होणं शक्य नाही कारण उपहास फक्त तुमचा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स दर्शवतो आणि (त्याहूनही वाईट म्हणजे) तुमचे सर्व दरवाजे बंद करतो. भले तुमच्या मागे कितीही कंपू असो.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या असल्या प्रतिसादांनी किंवा विडंबनांनी मला काहीएक फरक पडत नाही.

<<<आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या असल्या प्रतिसादांनी किंवा विडंबनांनी मला काहीएक फरक पडत नाही.
मग हा प्रतिसाद तरी का दिलात?

बाकी लोकं कशे "मी म्हणजेच देव / जीझस आहे..मला शरण या तुमचे दु:ख दुर होतील" अशी दुकानं काढतात (अन लोकंही अशा ठीकाणी गर्दी करतात) तसंच तुम्हीही काढा असा एक आपुलकीचा पण फुकट सल्ला...तुम्हाला कमीतकमी ३१ तारखेपर्यंत वगैरे कारणं द्यायची गरज पडणार नाही इतका पैसा आहे यात.

अग्निकोल्हा's picture

15 Jul 2013 - 2:38 am | अग्निकोल्हा

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या असल्या प्रतिसादांनी किंवा विडंबनांनी मला काहीएक फरक पडत नाही.

लेखनात त्रुटी असणं अशक्य आहे कारण तो अनुभव आहे.

आणि जे वंचित आहेत ते :

एकतर, लेखनात त्रुटी शोधत बसतील
किंवा दोन, संत वचनं उधृत करतील
अथवा तीन, इथे किंवा इतरत्र विडंबनं करतील

प्रेम काय चिज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती जगात दुर्मिळ आहे कारण वयात येता क्षणी त्या भावना देह-मनात नैसर्गिकपणे उमलून येतात. तुम्हाला अंगोपांग व्यापून टाकतात.

ज्यानं कधी प्रेम केलंय तो स्वतःला दुसर्‍याचा अनुभवाशी लगेच रिलेट करू शकतो. दुसर्‍याच्या अनुभवानं तो आनंदून जातो. तशा लेखनावर उत्सफूर्तपणे प्रतिसाद देतो. त्याला सम-समानुभव म्हटलंय.

या उलट परिस्थिती प्रेम न केलेल्याची असते. त्यानं प्रेमाविषयी ऐकलेलं असतं, त्याला करावंस वाटत असतं (किंवा आता शक्य नसलं तरी त्या वेळी वाटलेलं असतं) पण जमलेलं नसतं. ते साहस त्याला झेपलेलं नसतं.

उगा असं चिडुन धाग्याचे मातेरं करु नका.

संजय क्षीरसागर's picture

15 Jul 2013 - 8:50 am | संजय क्षीरसागर

>उगा असं चिडुन धाग्याचे मातेरं करु नका.

असं सदस्यांना सांगा!

अग्निकोल्हा's picture

15 Jul 2013 - 1:57 pm | अग्निकोल्हा

तर ति वेळच येणार नाहि. नाहि काय ?

बॅटमॅन's picture

15 Jul 2013 - 4:26 pm | बॅटमॅन

खरंय, पण म्हणतात ना......त्यातली गत आहे ती.

निराकार गाढव's picture

18 Jul 2013 - 2:26 pm | निराकार गाढव

यकदम ब्रोब्र.

निराकार गाढव's picture

18 Jul 2013 - 2:28 pm | निराकार गाढव

सरसायेब नेमीच ब्रोब्रच असत्यात.

मी लगेच रिलेट करू शकतो.

अमोल खरे's picture

13 Jul 2013 - 11:13 am | अमोल खरे

काहीही कळत नाहीये. लिहिता वाचता येत असुनही एखादी लिहिलेली गोष्ट वाचुन त्याचा अजिबात अर्थ न कळणं ह्यासारखे दुसरे फ्रस्टेशन नाही. असं फ्रस्टेशन ह्याआधी मला अक्षय कुमारचा "खट्टा मिठा" , भरत जाधवचा "जत्रा", अक्षय कुमारचाच आणखीन एक "जानी दुष्मन" (ह्यावर फारएन्ड ने एक तुफान विडंबन टाकलं होतं) हे पिक्चर बघताना आलं होतं. काय व्हायचं की पडद्यावर काय चाललाय ते कळतच नसे. तसचं काही आत्ता वाटताय.

सुबोध खरे's picture

15 Jul 2013 - 9:35 am | सुबोध खरे

नेपाळ टाइम्स वाचल्या सारखे काय? आमचा जंग बहादूर (गुरखा) वाचतो. लिपी देवनागरी आहे पण काय लिहिलेले आहे ते कळत नाही म्हणून म्हटले?

चेतन माने's picture

13 Jul 2013 - 11:30 am | चेतन माने

ओ नादान परिंदे ……………………

प्रेमाचा निषेध करणारे किंवा जरा सबुरीने घे असा उपदेश करणारे दरवेळेस स्वतः फ्रस्ट्रेटेड असतात असे म्हणणे म्हणजे जगाचा वट्ट अनुभव नसल्याचेच निर्देशक आहे. तस्मात ज्युव्हेनाईल मनाची आंदोलने यापलीकडे त्या प्रतिसादाला काही महत्व नाही.

राघव's picture

13 Jul 2013 - 11:45 am | राघव

म्हणे अनुभव असता तर लेख लिहिला असता.. अनुभव असला तर लेख लिहिणे गरजेचेच आहे काय?
ज्यांना अनुभव होता त्यांनी लिहिलेले, तुम्ही तसेही सरळ अमान्यच करता. मग आणिक कशाला वेगळे लिहून काढायचे?
जगात काय एकट्या तुम्हालाच अनुभव आलेत काय.. सरळ गृहित धरायचे अन्‌ ठोकण्याचा आव आणायचा..
स्वत:चेच म्हणणे खरे/इतरांना चांगला मार्ग सांगण्यासाठी केवळ स्वत:च उपयुक्त/स्वत:मुळेच इतरांना मस्तीत जगणे शिकता येईल.. तुमच्या लेखनातून सतत डोकावत असलेली ही असली फाटकी मानसिकता.. या मानसिकतेने कोणाचे भले होणार हो?

एखाद्या व्यक्तीला आपण काही सांगतोय अन्‌ ती व्यक्ती तसे आचरतेय.. यात आपण कळत/नकळत त्या व्यक्तीचे गुरुपद घेतोय हे आपल्याला कळत नसेल असे वाटत नाही. पण एकदा त्या व्यक्तीचे गुरुत्व आल्यावर, त्या व्यक्तीची जबाबदारीही आपल्याला घ्यावी लागते, हे काय वेगळे सांगायला हवे काय? प्रत्येकाच्या स्वभाव प्रकृतीनुसार प्रत्येकाचा मार्ग वेगळा असणार हे स्वाभाविक आहे. एवढी साधी बाब ज्याला समजत नाही तो इतरांना काय समजून घेऊ शकणार? अन्‌ जो समजूनच घेऊ शकत नाही तो जबाबदारी काय घेणार?

थोडक्यात सरळ सांगतो - चड्डीत रहा न भाऊ.

प्रभाकर पेठकर's picture

13 Jul 2013 - 2:09 pm | प्रभाकर पेठकर

सगळं लेखन साध्या मराठीत आहे, त्यात न समजण्यासारखं काय आहे?

शब्द साध्या मराठीत आहेत पण मराठीचाच साज ल्यालेली वाक्ये, बालपणापासून मराठी ही मातृभाषा म्हणून बोलणार्‍याला आणि मराठीतूनच शिकलेल्याला, समजत नसतील तर तो लेखकाचा दोष आहे. बाकी सर्वांना समजतय आणि एकालाच समजत नसेल तर त्या वाचकाने आपली समज तोकडी असल्याचे मान्य करावे आणि अनेक वाचकांना समजत, पटत नसेल तर लेखकाने आपली समज तोकडी असल्याचे मान्य करावे.

विटेकर's picture

13 Jul 2013 - 7:21 pm | विटेकर

.

अर्धवटराव's picture

14 Jul 2013 - 9:47 am | अर्धवटराव

चित्रपटाचे नाव - नाथा कामतची प्रेम कहाणी
नायक - "मी"
नायिका - शांतता (सन्नाटा ची बहिण), जी रोज नवी साडी नेसुन येते
खलनायक - मन
खलनायीका - स्मृती
विनोदी पात्र - हॅ हॅ हॅ... ;)
संगीतकार - ठण्ठणाट
गीतकार - श्री कर्कष्य
प्रमुख गीत - दील है कि जानता नहि (दिल है कि मानता नही च्या चालिवर)
पटकथा, संवाद - श्री आभासराव भ्रमे
चित्रपटाची थीम - कुणाला काहिच कळत नाहि
चित्रपट प्रदर्शन स्थळ - हे काय विचारणं झालं... अहो, मिपा.

निर्माते, दिग्दर्शक इ. जबाबदार्‍या आऊट्सोर्स करावे म्हणतो... ते हि एखाद्या पाश्चात्य अभारतीयाला. प्लीज रेफर.

आवाहनः कमजोर दिलवाले यह सिनेमा देखनेकि चेष्टा ना करे (निव्वळ चेष्टा देखील खपवुन घेतली जाणार नाहि)

सर्व मिपाकरांस नम्र विनंती आहे कि आपापल्या परिने चित्रपट प्रक्रियेत सहभाग घ्यावा... चित्रपट कसा आकार घेईल हे तुमच्या सहभागानेच ठरेल.

आपला नम्र,
अर्धवटराव

कवितानागेश's picture

14 Jul 2013 - 9:28 pm | कवितानागेश

'शून्य' हा आपला सर्वांचाच आवडता आकडा असल्यानी शून्य क्रमांकाचं टॅरो कार्ड पोष्टर म्हणून वापरण्याची मी निर्मात्यांना नम्र विनंती करतेय.
zero

याला काही नाव असतं का?

पैसा's picture

16 Jul 2013 - 9:06 am | पैसा

हा तर साक्षात जोकर दिसतोय. बॅटमन धाव रे!

संजय क्षीरसागर's picture

14 Jul 2013 - 3:15 pm | संजय क्षीरसागर

मी पहिल्यांदाच क्लिअर केलंय लेखात न समजण्यासारखं काही नाही. शुद्ध, साधं मराठी आहे.

‘जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे’

ही लेखाची कॅच लाईन आहे, आणि

‘एखाद्या प्रसन्न सकाळी उठता क्षणी निर्णय घ्या 'दाय विल बी डन! आणि मग त्या मूडमध्ये फक्त एक दिवस जगून बघा. तुमच्या जीवनाचा सारा रंग बदलेल. त्या अनुभवातनं मग प्रतिसाद द्या. तुम्हाला कळेल लेखन म्हणजे नुसते शब्द नव्हते त्यात अर्थ होता. यू विल एन्जॉय.’

ही प्रक्रिया आणि फलित आहे.

`प्रसन्न सकाळी' एवढ्यासाठी लिहीलंय की त्यावेळी मन सक्रिय झालेलं नसतं, त्याचा आवेग आवाक्यात असतो.
प्रयोग करुन पाहिला की कुणालाही प्रचिती येईल. कुणीही स्वीकृतीबद्दल एक शब्द लिहीलेला नाही याचा अर्थ नो वन हॅज ट्राईड.
____________________

मला कुणाचा अवमान करण्यात काही रस नाही. पण तसे प्रतिसाद देणारे निष्कारण स्वत:वर परिस्थिती ओढवून घेतात. मग त्यांची कुंडली मांडावी लागते.

१) विडंबकानं ‘शुभ्र मोर आणि अण्णा चोर’ नामक ‘अध्यात्मिक लेख’ यापूर्वी टाकला होता. त्याची संपूर्ण गोची झाल्यावर, फुल यू टर्न मारुन ‘माझा अध्यात्मिक वकूब नाही’ हे कबूल केल्याचं दप्तरी आहे.

तद्वत माझ्या एका रसग्रहणाचं विडंबन, तिथे दिलेल्या एकाच प्रतिसादात इतकं आंगलट आलं की लगबगीनं हातापाया पडून ते तासाच्या आत उडवून घेतलेलं आहे.

यानिमित्तानं एक सांगावंस वाटतं, विदूषक सर्कसमधल्या सर्वात निष्णात कलाकारापेक्षाही सरस असावा लागतो. तेव्हा कुठे तो अत्यंत कुशल कसरीतचं मोहक विडंबन करु शकतो. मुखभंग झालेल्या व्यक्तीच विडंबन निव्वळ मर्कटलीला असते. अर्थात, त्याला दाद देणार्‍यांच्या अभिरूचीबद्दल न बोलणं योग्य.

२) दासबोधासारख्या केवळ मनोविश्लेषणावर आधारित ग्रंथावर एकानं एके ठिकाणी ‘महान सिरियल’ सुरु केली होती. त्या लेखांकडे ‘वक्र’ तर सोडा साधं सुद्धा कुणी पाह्यला तयार नव्हतं. निव्वळ मालकाच्या आग्रहावर किती तग धरणार? शेवटी थंड पडली. अश्या परिस्थितीत विषय सोपा कोण करतंय हे ध्यानात यावं.

३) स्वत:ची लेखन कारकिर्द शून्य असणार्‍यांना, उगीच इकडे-तिकडे करणार्‍या डेटाफेकरना, संभ्रमित झालेल्या भक्तिपंथीयांना या वेळी सूट देण्यात आली आहे.

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2013 - 7:41 pm | प्रभाकर पेठकर

मी माझ्या प्रतिसादातच (आणि कांही इतर सदस्यांनी त्यांच्या प्रतिसादातच) क्लिअर केलंय लेखात समजण्यासारखं काही नाही. शब्द साधे मराठी आहेत पण अर्थ हरवून बसले आहेत.

‘जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे’
त्यात नवे काय आहे? If you don't get what you like, you must like what you get., 'ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान', 'जगी सर्वसुखी असा कोण आहे विचारी मना तुच शोधोनी पाहे' बालपणापासून ऐकत आलेल्या ह्या उक्तींमध्ये बेशर्त स्विकृतीचाच तर आग्रह आहे. आणि तो मनापासून किंवा नाईलाजाने प्रत्येकाने स्विकारलेलाच असतो. न स्विकारून जातो कुठे? If you can change the situation change it or accept it. कुरकुरत जगणारा हजारात एक असतो बाकीच्या ९९९ लोकांना हे आत्मज्ञान अनुभवातून झालेलेच असते.

तुम्हालाही सांगतो, ‘एखाद्या प्रसन्न सकाळी उठता क्षणी 'सर्वकांही' उरकून घ्या कारण आवेग अनिवार असतो. आणि शुचिर्भूत होऊन निर्णय घ्या की 'मी, ह्या 'मी'पणाच्या आत्मकेंद्रीत वृत्तीतून बाहेर पडेन, इतरांनाही अक्कल असते ह्या वास्तवाची बेशर्त स्विकृती करेन. ' आणि मग त्या मूडमध्ये फक्त एक दिवस जगून बघा. तुमच्या जीवनाचा सारा रंग बदलेल. तुमच्या लक्षात येईल 'अरेच्च्या..! आयुष्याला बिनशर्त स्विकारलेले आपल्या भोवती सर्वच जणं आहेत. त्या अनुभवातनं मग लेखन करा. तुम्हाला कळेल की आपले पूर्वीचे लेखन म्हणजे नुसते पोकळ शब्द होते. त्यात अर्थ नव्हता. बदललेल्या वृत्तीत तुम्ही दुसर्‍यांच्या समजूतदारपणाचा, ज्ञानाचा, अनुभवांचा, विचारांचा, आदर करू लागाल. त्याच वेळी तुम्हाचाही आदर केला जाईल. यू विल एन्जॉय.’

ही प्रक्रिया आणि फलित आहे.

`शुचिर्भूत व्हा' एवढ्यासाठी लिहीलंय की सक्काळी उठल्यावर शरीर सक्रिय झालेलं असतं, त्याचा आवेग आवाक्यात नसतो. प्रयोग करुन पाहण्याची गरजच नसते सर्वांनाच ही प्रचिती रोज सकाळी येतेच.
कुणीही स्वीकृतीबद्दल एक शब्द लिहीलेला नाही याचा अर्थ सर्वांनीच आपापले जीवन बिनशर्त 'स्विकारलेले' आहे. नो वन नीड्स टू ट्राय.
____________________
‘जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे’ हा उपदेश तुम्ही स्वतःलाच करून का पाहात नाही. तुमचे लेखन, उपदेश, प्रवर्चन स्विकारणारे इथे कोणी नाहीत ह्या वास्तवाची 'बेशर्त स्विकृती' दाखवून तुमच्याच मनाच्या चकव्यातून बाहेर का पडत नाही?

आपली लेखन कारकिर्द महान असल्याच्या भ्रमात असलेल्यांचे अर्थहीन लेखन दुर्लक्षिलेलेच चांगले.

संजय क्षीरसागर's picture

14 Jul 2013 - 11:11 pm | संजय क्षीरसागर

लेख शांतपणे न वाचताच प्रतिसाद देण्याची घाई केली आहे

>'ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान',

= लेखातली शेवटची ओळ पहावी :

तर तसा अनंतही कुणी नाही आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही

>'जगी सर्वसुखी असा कोण आहे विचारी मना तुच शोधोनी पाहे'

= मनंच तर अस्विकार करतंय. त्याला शोधात रस नाही.

>बालपणापासून ऐकत आलेल्या ह्या उक्तींमध्ये बेशर्त स्विकृतीचाच तर आग्रह आहे.

= ऐकणं, माहिती असणं ९९९ नाही सार्‍या दुनियेला आहे पण ते `बेशर्त' आचरणात कुठे येतंय?

आणि तुमच्या प्रतिसादात दुनियेची मानसिकता यथार्थ झलकते! :

>आणि तो मनापासून किंवा नाईलाजाने प्रत्येकाने स्विकारलेलाच असतो. न स्विकारून जातो कुठे?

>If you can change the situation change it or accept it

= चेंज करता येत नाही म्हणून तर नाईलाजानं स्वीकृती आहे. किंवा परिस्थिती बदलण्याची अविरत धडपड आहे.

बेशर्त स्वीकृती परिस्थिती बदलत नाही, तुमचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलते.

>कुरकुरत जगणारा हजारात एक असतो बाकीच्या ९९९ लोकांना हे आत्मज्ञान अनुभवातून झालेलेच असते.

= वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे!

पुढे जे काही लिहीलंय ते दैहिक आहे आणि तो व्यक्तिगत अनुभवच बहुदा प्रतिसादात उतरवलाय त्याचा लेखाशी संबंध नाही.

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2013 - 2:27 am | प्रभाकर पेठकर

लेख शांतपणे न वाचताच प्रतिसाद देण्याची घाई केली आहे

तुम्ही तर कोणाचाच प्रतिसाद शांतपणे वाचत नाही. नाहीतर एव्हाना आपलं काय चुकतंय हे तुमच्या लक्षात आलेच असते.

= लेखातली शेवटची ओळ पहावी :

माझ्या प्रतिसादातील 'ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान' ही ओळ पुन्हा पुन्हा वाचावी. कदाचीत त्यात असलेली बिनशर्त स्विकृती लक्षात येईल.

अनंतही कुणी नाही आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे

असा तुम्हाला भास होतो आहे. म्हणून आम्ही नंदीबैलासारखी मान डोलवावी का?

ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही

'चित्ती असो द्यावे समाधान' म्हणजे 'समाधानी चित्ताने जगावे'. हेही साधे सोपे मराठी आहे. समजण्यास इतके सुलभ आहे की कोणी म्हणणारही नाही मला हे काय म्हंटलय ते 'समजत नाहीए'. सर्वांनाच ते लहान वयातच कळले असते. तुम्हाला एवढ्या साध्या वाक्याची फोड करून सांगायला लागावी आश्चर्य आहे.

= मनंच तर अस्विकार करतंय. त्याला शोधात रस नाही.

कोण म्हणतंय मनाने स्विकार केला नाहीए म्हणून. तुम्ही? तुम्हाला काय माहित हो आम्ही कसला कसला स्विकार केला आहे आणि कसला नाही ते? वर, अपेक्षा करता की आम्ही नंदीबैलासारखी मान डोलवावी? मिसळपाववर सगळे निर्बुद्ध आहेत आणि आपण एकटेच त्यांचे तारणहार आहोत असं तर नाही वाटंत तुम्हाला?

= ऐकणं, माहिती असणं ९९९ नाही सार्‍या दुनियेला आहे पण ते `बेशर्त' आचरणात कुठे येतंय?

आचरणात आणायचं म्हणजे काय आता तसे बिल्ले लाऊन फिरायचं? की 'मी आचरणात आणले आहे, तुम्हीच त्या सुखापासून वंचित आहात, आचरणात आणा, आचरणात आणा' असा ढोल बडवत आचार्याचा आव आणायचा? आम्ही आचरणात आणलेले आहे, तुम्हाला पटत नसेल, दिसत नसेल तर त्याची आम्ही खंत का बाळगावी?

आणि तुमच्या प्रतिसादात दुनियेची मानसिकता यथार्थ झलकते!

उभ्या आयुष्यात शेजारच्या माणसाची मानसिकता १००% कधीच कळत नाही. दुनियेच्या काय गोष्टी करताय? आणि त्यातूनही
तुम्हाला कळली असेल जगाची मानसिकता तर असुदे बापुडी, पण माझी मानसिकता कळल्याच्या उगीच गमजा नकोत.

= चेंज करता येत नाही म्हणून तर नाईलाजानं स्वीकृती आहे. किंवा परिस्थिती बदलण्याची अविरत धडपड आहे.

कोण म्हणतं चेंज करता येत नाही? जी परिस्थिती बदलता येते ती नक्कीच येते आणि प्रत्येक माणूस ती बदलतो. अविरत धडपडीत गैर काय आहे? आणि नाईलाजाने का होईना, आहे नं स्विकृती? ती बिनशर्तच असते.

बेशर्त स्वीकृती परिस्थिती बदलत नाही, तुमचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलते.

अजून एक शाब्दिक कोलांटी उडी.

= वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे!

तुमच्या मते हजारातील ९९९ कुरकुरणारे असतात? मिसळपाववर १००० सदस्य तरी असतीलच. तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणाला कुरकुरताना पाहिले नाही.

पुढे जे काही लिहीलंय ते दैहिक आहे आणि तो व्यक्तिगत अनुभवच बहुदा प्रतिसादात उतरवलाय त्याचा लेखाशी संबंध नाही.

तो अनुभव दैहिक असला तरी सच्चा आहे. कोणीच नाकारू शकत नाही. तुम्ही नाकारताय का? तुमचे मनाचे अनुभव तर बहुतेक सर्वानीच नाकारले आहेत.
_____________________
जगतो पण तत्त्ववेक्त्याचा आव आणून इतरांना पीडत नाही.

रामपुरी's picture

15 Jul 2013 - 8:35 am | रामपुरी

त्रागा करू नका काका. अहो असल्या लोकांना फाट्यावर मारणे हा एकमेव उपाय आहे. दुसर्‍या एका संस्थळावर या महाशयांना असेच फाट्यावर मारण्यात आल्याने हे इथे येऊन नशिब आजमावून बघत आहेत. दुर्लक्ष करा आपोआप या जिलब्या बंद होतील.

विटेकर's picture

15 Jul 2013 - 11:27 am | विटेकर

बहुधा ,, आरभाट आणि चिल्लर मध्ये आहे .
एका विद्यार्थ्याने आप्ल्याच शाळेतील एका शिक्शकाना नदीत बुड्ताना वाचवले..
षिक्षक " भलतेच " विद्यार्थी-प्रिय " होते !
शिक्षकांने वाचवणार्या विद्यार्थ्याचे तोंडभरून कौतुक केले.. पण हा विद्यार्थी मात्र चिंतेते ! उद्या शालेत गेल्यावर इतर विद्यार्थी काय म्हणतील म्ह्णून !
तेव्हा रामपुरी साहेब , सावध !

मी वर म्हटलंय :

>ज्यानं कधी प्रेम केलंय तो स्वतःला दुसर्‍याचा अनुभवाशी लगेच रिलेट करू शकतो. दुसर्‍याच्या अनुभवानं तो आनंदून जातो. तशा लेखनावर उत्सफूर्तपणे प्रतिसाद देतो. त्याला सम-समानुभव म्हटलंय.

आणि पुढे म्हटलंय :

>प्रेम काय चिज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती जशी जगात दुर्मिळ आहे तद्वत स्वच्छंद ही आपल्या प्रत्येकाची आंतरिक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर इग्झॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील.

ज्यांनी कधी मस्त जगण्याचा अनुभव घेतलायं ते आनंदून जातील. स्वतःला रिलेट करू शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही स्वच्छंद होऊ शकतो असा विश्वास वाटेल.

वरच्या प्रतिसादातून निव्वळ उद्वेग दिसतोय. सगळा प्रतिसाद पुन्हा उधृत करत नाही पण शेवटी त्याचा क्लायमॅक्स म्हणजे स्वाक्षरी देखील बदलली आहे :

>जगतो पण तत्त्ववेक्त्याचा आव आणून इतरांना पीडत नाही

साधी गोष्ट आहे. बेशर्त स्वीकृतीनं तुम्ही यापूर्वीच आयुष्यात आनंदून गेला असतात तर ती सम-समानुभुती झाली असती. माझ्याशी वादाचा, उपहासाचा मुद्दा अशक्य होता.

खरं तर तुम्ही तुमच्या जगण्याच्या अनुभूतीतनं स्वीकृतीच्या किमयेची महती एखाद्या नव्या अँगलनं विशद केली असती आणि मी तुम्हाला दाद दिली असती.

तुम्ही स्वतःच्या प्रोफाईलमधे म्हटलंय :

>हाती बर्‍यापैकी पाकसिद्धी आहे. खाणारे नावाजतात. 'कौशल्य' नसले तरी खाणार्‍याच्या मनात काही 'शल्य' राहात नाही ह्यावर समाधानी आहे.

यावर कुणी म्हटलं :

स्वयंपाक तर प्रत्येक घरात रोज होतो आणि अनेक गृहिणी सुग्रण असतात पण बल्लवाचार्याचा आव आणून हॉटेल काढत नाहीत.

तर तुम्ही हसालं, आणि म्हणाल `मॅन यू हॅव नॉट टेस्टेड द डेलिकसी कॉल्ड फूड, एकदा माझ्याकडे येऊन तर पाहा'

अगदी तेच मी सांगतोय. मॅन यू हॅव नॉट एंजॉइड द डेलिकसी कॉल्ड `दाय विल बी डन!, मला अहंकारी ठरवण्याआधी तुम्ही एकदा बेशर्त स्वीकृतीची किमया आजमावून तर पाहा. '

प्रभाकर पेठकर's picture

15 Jul 2013 - 10:38 am | प्रभाकर पेठकर

हा: हा: हा: संपूर्ण प्रतिसादच विनोदी आहे. त्यातील परमावधी ज्या अनुभवशून्य विधानांमधून झाली आहे. त्या बद्द्लच बोलतो,

....पण बल्लवाचार्याचा आव आणून हॉटेल काढत नाहीत.

साहेब आव आणणे म्हणजे काय, हेच तुम्हाला ठाऊक नाही. मोठमोठी तत्वज्ञान काय शिकवता इतरांना? आपल्याकडे नसलेली गोष्ट आहेच असे भासवून जगणे म्हणजे आव आणणे. आव आणून जगता येते उपहारगृह काढता येत नाही. It is easy to open a shop BUT impossible to keep it OPEN. आणि गेली २२ वर्षे मी हा व्यवसाय इथे करतो आहे. वाढवतो आहे. आव आणून व्यवसाय करता येत नाही हो. नफा कमविता आला नाही, तोटा आवरता आला नाही तर ६ महिन्यात कर्जबाजारी व्हाल आणि आयुष्यात पुन्हा स्वतंत्र व्यवसाय करण्याचे धाडस होणार नाही. ही आत्मस्तुती नाही वास्तव आहे. आपणास 'हा अनुभव घेऊन पाहा' असे (तुम्ही इतरांना सांगत असता तसे) मी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हाला असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तो घ्यालच. मी कशाला सांगायला पाहीजे?
उपहारगृह व्यवसायासाठी अगदी बल्लवाचार्यच असायला पाहिजे हा तुमचा गैरसमज सुद्धा तुम्ही उपहारगृह व्यवसायाचा (फॉर दॅट मॅटर, कुठल्याच गोष्टीचा) सर्वांगिण विचार न करता प्रतिसाद टंकण्याची घाई केलेली आहे हे उघड आहे. माझ्या उपहारगृहात माझे स्वयंपाकी पदार्थ बनवितात. मी फक्त चवीवर नियंत्रण ठेवतो. अनुभवी आणि हाताला उत्कृष्ट चव असलेले, चवीत सातत्य राखू शकणारे स्वयंपाकी मिळविले तर किचन मध्ये डोके घालावे लागत नाही. माझ्याकडे असे ४ मुख्य स्वयंपाकी आहेत. बाकी उपहारगृहाची सजावट, सर्व कर्मचार्‍यांची वैयक्तिक स्वच्छता, सेवेचा दर्जा, पदार्थ सूची आणि किमती, शहरातील इतर उपहारगृहांच्या किमती, चवी आणि सेवा ह्यांचा सतत अभ्यास करून त्या नुसार आपल्या व्यवसायाच्या दर्जात वृद्धी करत राहणे आदी कामे मी करतो. स्वयंपाकघरात काम करीत नाही. नुसते बल्लवाचार्य असून भागत नाही. आणि तसे असण्याचा आव आणून तर नाहीच नाही.

तर तुम्ही हसालं, आणि म्हणाल `मॅन यू हॅव नॉट टेस्टेड द डेलिकसी कॉल्ड फूड, एकदा माझ्याकडे येऊन तर पाहा'

माझ्याकडे येऊन तर पाहा, असे म्हणण्या इतका 'मी' पणा माझ्यात भिनलेला नाही (धन्यवाद देवा). उलट मी माझ्या आश्रयदात्यांना मोकळ्यामनाने सांगतो सर्व उपहारगृहांमध्ये जाऊन पदार्थ चाखून पाहा आणि मलाही सेवेची संधी द्या. त्या नंतर तुमचे जे मत बनेल ते मला सांगा. माझ्या उपहारगृहात कांही कमीपणा असेल तर तो दूर करण्यास मला आनंदच होईल.
ह्यात ह्या व्यवसायात 'मी सर्वश्रेष्ठ नाही' ह्या वास्तवाची बिनशर्त स्विकृती आहे. एकदा 'मीच सर्वश्रेष्ठ आहे' ह्या विचारांचं विष मनांत भिनलं की प्रगती खुंटते. कारण सर्वश्रेष्ठ झाल्यावर अजून काय प्रगती करायची?
तुम्हाला ह्या व्यवसायात यायचे असेल तर मॅन यू हॅव नॉट टेस्टेड द डेलिकसी कॉल्ड फूड हा दूराभिमान सोडून द्यावा लागेल. गिर्‍हाईकांना उत्तम दर्जाची सेवा लागते. तुमच्या इंग्रजी विधानावर कुत्रंही तंगडी वर करीत नाही. कनवटीचे ४ पैसे खर्च करणारा माणूस पदार्थाचा आणि सेवेचा दर्जा पाहातो तुम्ही काय म्हणताय ते पाहात नाही.

पेठकर काका, दंडवत स्वीकारा _/\_

इतक्या नेमक्या अन मार्मिक प्रतिसादानंतरही जर कुणी बडबड करीत असेल तर मग गॉन केस आहे असेच म्हणावे लागेल.

कवितानागेश's picture

15 Jul 2013 - 12:44 pm | कवितानागेश

'मी सर्वश्रेष्ठ नाही' ह्या वास्तवाची बिनशर्त स्विकृती आहे.>
बूल्स आय!

-सर्वसामान्य आणि आनंदी माउ

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2013 - 6:41 pm | अत्रुप्त आत्मा

पेठकर काका... __/\__ संपूर्ण प्रतिक्रीयेसाठी!!!

@माझ्याकडे येऊन तर पाहा, असे म्हणण्या इतका 'मी' पणा माझ्यात भिनलेला नाही (धन्यवाद देवा).>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

@ एकदा 'मीच सर्वश्रेष्ठ आहे' ह्या विचारांचं विष मनांत भिनलं की प्रगती खुंटते. कारण सर्वश्रेष्ठ झाल्यावर अजून काय प्रगती करायची? >>> http://mimarathi.net/smile/congrats.gif
=========================================
@स्पांडू--- रंग >>> .... अच्रत....हल्कत...बव्लत...!!! =))
=========================================
@मदनबाण>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif
=========================================
@माऊ>>>

@स्पाचंद्रजी, तुम्हला माहित नाही का संक्षी हे नेहमी फेसलेस मॉबसाठी लिहितात. त्यामुळे त्यांच्या लेखनातून आपल्याला आपण स्वतःच दिसत असतो. >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif
@त्यामुळे संक्षी कसे आहेत हे त्यांना स्वतःला त्यांचे स्वतःचे लेखन वाचल्यावर कळेल. आणि मग त्यांनी ते आपल्याला सांगितले तरच आपल्याला कळेल. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif

@अवांतरः वैयक्तिक प्रतिसाद देउ नक रे पोरांनो.
संक्षी कसे आहेत, याच्याशी आपल्याला काय करायचय? >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif __/\__ __/\__ __/\__ http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif
===================================================

चिगो's picture

16 Jul 2013 - 12:59 am | चिगो

प्रामाणिकपणा म्हणजे काय? तर हा प्रतिसाद.. काका, दंडवत स्विकारावा.. बाकी, 'बिनशर्त स्विकृती' बद्दल एकच वाक्य आहे.. Nothing great was achieved by those who did not think that they have something more than what the circumstances dictated..

चिगो's picture

16 Jul 2013 - 1:00 am | चिगो

प्रामाणिकपणा म्हणजे काय? तर हा प्रतिसाद.. काका, दंडवत स्विकारावा.. बाकी, 'बिनशर्त स्विकृती' बद्दल एकच वाक्य आहे.. Nothing great was achieved by those who did not think that they have something more than what the circumstances dictated..

नंदन's picture

16 Jul 2013 - 2:43 am | नंदन

चर्चा वाचल्याचे सार्थक झाले!

संजय क्षीरसागर's picture

18 Jul 2013 - 12:00 am | संजय क्षीरसागर

लेखनाचा अर्थ आपण काढू तसा निघतो.

मॅन यू हॅव नॉट एंजॉइड द डेलिकसी कॉल्ड `दाय विल बी डन! या वाक्याच्या संदर्भात - `यू हॅव नॉट टेस्टेड द डेलिकसी कॉल्ड फूड' म्हटलं आहे.

दुसर्‍या वाक्याचा अर्थ जसा `मी सर्वश्रेष्ठ स्वयंपाकी ' असा होत नाही तसा `दाय विल बी डन' ची किमया सांगणारा `स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो' हा अर्थ नाही. इट इज जस्ट एन इन्विटेशन टू ट्राय समथींग न्यू.

तुम्ही संत वचनं ऐकलीयेत, जगप्रसिद्ध व्यक्तींच आयुष्याविषयक चिंतन वाचलंय, तशी ही गोष्ट आजमावून पाहा.

हा मुद्दा हुकल्यानं सगळ्या प्रतिसादात स्वतःच्या व्यवसायचं आणि त्यातलया समस्यांचं वर्णन आलंय.

मी इथे वेगळा अँगल सांगतोयं, तुम्ही किती कष्टसाध्य व्यावसाय किंवा काँप्लिकेटेड काम करतायं हा प्रश्न नाही. जे आहे ते बेशर्त स्विकारून पाहा. मग कदाचित `मी काही फार मोठं करतोय' असं वाटणार, सगळं सहज आणि सोपं होऊ शकेल....

आणि

>तुमच्या इंग्रजी विधानावर कुत्रंही तंगडी वर करीत नाही. कनवटीचे ४ पैसे खर्च करणारा माणूस पदार्थाचा आणि सेवेचा दर्जा पाहातो तुम्ही काय म्हणताय ते पाहात नाही.

अशी उद्विग्नता प्रतिसादात येणार नाही. आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.

अग्निकोल्हा's picture

18 Jul 2013 - 1:30 am | अग्निकोल्हा

अशी उद्विग्नता प्रतिसादात येणार नाही. आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.

बास, आता स्वतःला फसवणं थांबवा. त्यांचा प्रतिसाद तुमच्या अतर्क्य असंबध्द व मी पणाने बरबटलेलि विधाने वाहुन निर्माण झालेलि चित्तदशा व तुमच्या अतर्क्य असंबध्द व मी पणाने बरबटलेल्या प्रतिसादांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतोय हे एव्हडच मान्य करायची क्षमता बाळगुन आहात काय ? नसाल तर शांत व्हा पण असे प्रतिसाद लिहुन धाग्यवरिल चर्चांचे मातेरं करुन नका.

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2013 - 1:51 am | प्रभाकर पेठकर

एक तुम्ही वगळता बहुतेक वाचकांना माझा मुद्दा पटलेला दिसतो आहे. तुम्हाला तो पटावा असा आग्रह नाही. उलट, कोणाचेच मुद्दे तुम्हाला पटत नाहीत हे वास्तव आहे. ते तुम्ही कधीच बिनशर्त स्विकारणार नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान...... . तेंव्हा ह्यावर अजून वाद घालणे म्हणजे शब्दाला शब्द वाढविणे आहे. माझा आणि इतर वाचक सदस्यांचा मौल्यवान वेळ मी फुकट घालवू इच्छित नाही. तुम्ही तुमच्या अनाकलनिय शाब्दिक कोलांट्याउड्या मारू शकता.

आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.

आपल्या लेखनातून (?) आपली अनियंत्रित चित्तदशा आणि पोकळ शब्दांचा चिखल चिवडत बसण्याचा दृष्टीकोन दिसून येतो.

संजय क्षीरसागर's picture

18 Jul 2013 - 1:24 pm | संजय क्षीरसागर

पुन्हा तीच उद्विग्नता!

बॅटमॅन's picture

18 Jul 2013 - 1:56 pm | बॅटमॅन

"काही झालं तरी शेवटचा प्रतिसाद माझाच" या ध्येयपूर्तीकडे जाणारी वाटचाल रोचक आहे. चालूद्या!

अवतार's picture

18 Jul 2013 - 3:12 pm | अवतार

मग गॉन केस आहे असेच म्हणावे लागेल

आता म्हणा!

बाकी इतरांना उद्देशून पराभूत होणे, चित्तदशा संभ्रमित - दोलायमान होणे, उद्विग्न होणे अशी शेलकी विशेषणे वापरायची आणि मग त्यांना इनविटेशन द्यायचे
हे म्हणजे दुसऱ्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवून मग त्यांना स्वत:च्या कोंडवाड्यात आमंत्रण देण्यासारखे वाटते.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2013 - 5:49 pm | अत्रुप्त आत्मा

@"काही झालं तरी शेवटचा प्रतिसाद माझाच" या ध्येयपूर्तीकडे जाणारी वाटचाल रोचक आहे. चालूद्या!>>> खि..खि..खि..! यावरून आमच्या निकोटिन अ‍ॅनॉनिमस मधल १ स्लोगन अठवलं-पहिलिच चिमूट घातक!!!
मतितार्थ-तंबाखुची पहिली चिमुट खाल्यानंतर(व्यसनी माणसाला) उरलेल्या चिम्टी "पुडी" संपेपर्यंत खाव्याच लागतात! :)

सौंदाळा's picture

18 Jul 2013 - 5:57 pm | सौंदाळा

ते काहीही असु देत,
संक्षि मिपाचे तेंडुलकर आहेत. बॅटिंगला आले की सेंचुरी नक्की..:);)

जे.जे.'s picture

18 Jul 2013 - 11:55 pm | जे.जे.

काय उपयोग? निम्याहुन अधिक प्रतिसाद निगेटिव्ह आहेत. याचा अर्थ पब्लिकला लेख आवडला नाहि असाच होतो.

अध्यात्म्य आणि मनाच्यासारख्या महत्वाच्या विषयावर लोकान्नि भरपुर टाइमपास करून घेतला आणि लेखकासहित सर्वान्नि चांगलीच राळ उडवलीये.

लेखकाने आधिच योग्य शब्दप्रयोग केले असते आणि वेळिच चुका मान्य केल्या असत्या तर हे टाळता आले असते - उदाहरणार्थ - 'बेशर्त' च्या जागि 'बिनशर्त' स्वीकृती अस हव होत. लेखक हे अजुनहि स्विकारायला तयार नाहिये अस दिसतय.

लेखक हे अजुनहि स्विकारायला तयार नाहिये अस दिसतय.
तसेही लेखक इतरांचे काहीच स्वीकारायला तयार नाहीये !
एकहार्ट मधे जेव्हा ते म्हणाले की
गीतेच्या सगळ्या अध्यायांवर मी निरुपण लिहू शकेन पण ती फक्त चर्चा होईल. त्याचा रोजच्या जगण्याला उपयोग नाही.
तसेच ते म्हणाले की,अभ्यासाची तर अजिबात आवश्यकता नाही.
तेव्हाच मी समजलो की शाब्दीक बुडबुड्यांच्या जिलब्या टाकण्या शिवाय पेक्षा लेखक अधिक काही करु शकत नाही.

पुण्याचे वटवाघूळ's picture

14 Jul 2013 - 9:57 pm | पुण्याचे वटवाघूळ

माफ करा पण इतरांना उपदेशांचे डोस पाजणे आणि आत्मप्रौढी हे प्रकार तुमच्या लेखनात खूपदा असतात.या तीनही भागांमधून नक्की काय म्हणायचे आहे हे अजिबात न कळलेल्यांमध्ये मी पण एक आहे.

अवतार's picture

14 Jul 2013 - 10:22 pm | अवतार

हात्तिच्या!
म मा मि मी मु मू मे मै मो मौ मं मः
एवढी साधी सोपी समोर असलेली गोष्ट तुम्हाला दिसत कशी नाही हेच आश्चर्य आहे! एकदा ह्या गोष्टीचा तुम्ही बिनशर्त स्वीकार केलात की सगळंच कसं सोप्पं सोप्पं!

विजुभाऊ's picture

14 Jul 2013 - 10:30 pm | विजुभाऊ

एखादी गोष्ट जर समजत नसेल तर त्याला रूपकाचे रूप द्यावे. रुपकाचे रूप लेवून आलेले लिखाण आपले रूप बदलून आलेले असते. त्यामुळे मूळ रुपातील गोष्ट एकदा रुअक या रूपात आली की ते मोहक रुपडे रोचक वाटते. या रूपातील रुपवती कथेला पुन्ह रूपकातील रूपकाचा साज दिला त र्ते अबोध दुर्बोध न होता सुबोध व्हाचे अशी लेखकाची इच्छा बलीयसी.
पण वाचकाला जर त्या रुपाचा मोह पडत नसेल तर रुपकाचे रूप टाकून देवून मूळ स्वरूप धारण कराएव असे रूपही जर वाचकास समजत नसेल तर कथाकाराने आपले रूपगर्वी न रहाता आरशात पहावे लेखनाचे उत्खनन करावे आणि सार बाळबोध रूपात वाचकासमोर आणावे.

सोत्रि's picture

14 Jul 2013 - 10:40 pm | सोत्रि

विजुभौ, दंडवत स्विकारा!
अतिशय समर्पक आणि यथार्थ प्रतिसाद, शब्दाशब्दाशी सहमती!!

स्वगतः सोक्या, चक्क विजुभौशी सहमत व्हायची वेळ आली की ;)

- (लेख लिहून गंगार्पण करणारा) सोकाजी

विटेकर's picture

15 Jul 2013 - 11:47 am | विटेकर

+१११११
आवडेश . रुपकाचे रुपक एकदम चपखल बसले आहे !!

विजुभाऊ's picture

14 Jul 2013 - 10:32 pm | विजुभाऊ

मी वर काय लिहीलय त्याचं रूप मलाच पटलेले नाहिय्ये

क्लिंटन's picture

14 Jul 2013 - 10:51 pm | क्लिंटन

हे नक्की काय चालू आहे? दोन-तीन वेळा वाचून समजून घ्यायचा प्रयत्न केला पण कुठचे काय. कशाचाच पत्ता लागला नाही. बहुदा मी हा प्रकार 'बेशर्त' (म्हणजे नक्की काय? बिनशर्त हा शब्द ऐकला होता) स्विकारलेला नाही असे दिसते. :)

विजुभाऊ's picture

14 Jul 2013 - 11:30 pm | विजुभाऊ

बे म्हणजे दोन ( उदा: दोन चा पाढा याला बे चा पाढ असे म्हणतात )

मदनबाण's picture

15 Jul 2013 - 8:45 am | मदनबाण

स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या प्रतिक्रियेची वाट बघतो आहे बरं ! ;)

संजय क्षीरसागर's picture

15 Jul 2013 - 9:06 am | संजय क्षीरसागर

इतके लाख लोक जातायतनं तिकडे, लावतायंत न रांगा, जोडतायतना हात? म्हणजे तो असणारच!

या उलट, ज्याला कळलंय तो निश्चिंत असतो, त्याला इतरांच्या अनुमोदनची वाट पाहावी लागत नाही.

मदनबाण's picture

15 Jul 2013 - 9:23 am | मदनबाण

बेशर्त स्वीकृतीवर सीडी अडकल्याने ही केस हाताबाहेरची असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.

स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या प्रतिक्रियेची वाट बघतो आहे बरं !

तुम्हाला संक्षी समजलेत नाही असे म्हणेन

बाकी चालू द्या

तुम्हाला संक्षी समजलेत नाही असे म्हणेन
मग तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तरी सांगा आम्हा सर्वांना ! ;)

मग तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तरी सांगा आम्हा सर्वांना

त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतीलच

त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतीलच
मूळ प्रश्नाचे उत्तर न देण्याची हातोटी वाखाणण्या सारखी आहे ! ;) तुम्ही तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तुमच्याच शब्दात सांगण्याचे कष्ट करा. तुम्ही त्यांचे लेखन "मन" लावुन वाचलेच असेल... आणि तसे असेल तर ते तुम्हाला कळलेच असेल असे गॄहीत धरुनच मी माझा प्रश्न विचारला आहे / होता. ;)
आता तरी मूळ प्रश्नाचे उत्तर द्या.

तुम्ही तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तुमच्याच शब्दात सांगण्याचे कष्ट करा

एकच व्यक्ती प्रत्येकाला वेगवेगळी समजते, त्याला एकच असा कुठला नियम नाही . त्यामुळे तुम्हाला जे संक्षी दिसतील ते मला दिसतील असे नाही आणि वैस वर्सा.

मदनबाण's picture

15 Jul 2013 - 12:28 pm | मदनबाण

एकच व्यक्ती प्रत्येकाला वेगवेगळी समजते, त्याला एकच असा कुठला नियम नाही . त्यामुळे तुम्हाला जे संक्षी दिसतील ते मला दिसतील असे नाही आणि वैस वर्सा.
इथे आता अनेकांना संक्षी पूर्ण समजले आहेत. आम्हाला तुम्हाला समजलेले संक्षी आम्हाला जाणुन घ्यायचे आहेत.
तुम्ही विचारलेल्या मूळ प्रश्नाचे उत्तर देण्याचे शिताफिने टाळले आहे.आम्हाला आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे.

सध्या लेख लिहायचा कंटाळा आलेला आहे
कधी उत्साह आलाच तर लिहीन एक रसग्रहण :)

३१ जुलै पर्यंत कंळाला गेला तर आम्हाला कळवा ! ;)
रसग्रहण "मन" लावुन वाचण्यास आम्ही "बेशर्त" तयार आहोत. ;)

कवितानागेश's picture

15 Jul 2013 - 12:52 pm | कवितानागेश

त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतील>>
स्पाचंद्रजी, तुम्हला माहित नाही का संक्षी हे नेहमी फेसलेस मॉबसाठी लिहितात. त्यामुळे त्यांच्या लेखनातून आपल्याला आपण स्वतःच दिसत असतो. त्यामुळे संक्षी कसे आहेत हे त्यांना स्वतःला त्यांचे स्वतःचे लेखन वाचल्यावर कळेल. आणि मग त्यांनी ते आपल्याला सांगितले तरच आपल्याला कळेल.

अवांतरः वैयक्तिक प्रतिसाद देउ नक रे पोरांनो.
संक्षी कसे आहेत, याच्याशी आपल्याला काय करायचय?

तुम्ही संपादक आहात ना..? तरीही वैयक्तिक प्रतिसाद..?

छ्या..

कवितानागेश's picture

15 Jul 2013 - 1:29 pm | कवितानागेश

मोदकचंद्ररावजीसहेब,
तुम्ही मला भर धाग्यावर 'संपादक' म्हणून संबोधत अहात, हाच खरं तर अत्यंत वैयक्तिक प्रतिसाद आहे!

आता धमकीची भाषा..?

छ्य्या..

क्लिंटन's picture

15 Jul 2013 - 11:29 am | क्लिंटन

अनेकांना सावरकर-गांधीजी कळत नाहीत तशातला संक्षी न कळणे हा प्रकार आहे का? :)

मदनबाण's picture

15 Jul 2013 - 11:34 am | मदनबाण

हा.हा.हा नारायण नारायण ! ;)

लंबूटांग's picture

15 Jul 2013 - 8:58 am | लंबूटांग

सकाळ झाली चिखलू उठला

विटेकर's picture

15 Jul 2013 - 11:53 am | विटेकर

अगोदर लेख कळला नाही आता प्रतिसादही डोक्यावरून जाताहेत..
आधी मन आणि शर्ती होत्या.. मग प्रेम उपटले .. आता तर गोष्टी किचन मध्ये पोहोचल्या आहेत...
मला तर फक्त "शर्ती" संपून "शर्यती" सुरु झाल्या आहेत असेच वाट्ते.

उगा एक विंग्रजी क्याप्श्न आठवले..
If you can not convince people , confuse them!

ज्यासी नाही बोध तो करतो दुसर्‍यास मन बोध
चुकलेली वाट ज्याची, तो काय दाखविल मनमुक्तिची अवघड वाट.

पेठकर काकांशी पुरेपुर सहमत.

अहो पण मागच्या धाग्यात तुम्ही संक्षींशी सहमत होता ना???? नक्की ठरवा एकदाचं कुणाशी सहमत आहात ते =))