✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)

स
संजय क्षीरसागर यांनी
Fri, 07/12/2013 - 15:27  ·  लेख
लेख
दाय विल बी डन! Jejus जिझस _____________________________ जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे. जे आहे ते स्वीकारलं की मनाला तक्रारीला जागाच उरत नाही. स्वीकृतीला मन राजी होत नाही. ती तुमची हार आहे असा बिनतोड युक्तिवाद करून ते उपलब्ध उपभोगू देत नाही. लगाम मनाकडे असल्यानं आपण आहे ते नाकारतो (किंवा अत्यंत नाईलाजानं स्वीकारतो). त्यामुळे जे प्रत्यक्षात आहे ते व्यर्थ होतं आणि मनात आहे ते उपलब्धच नाही तर उपभोगणार कसं? स्वच्छंद होणं म्हणजे समोर आहे ते बेशर्त मान्य करून आयदर त्याच्याशी डील करणं किंवा मग डायरेक्ट उपभोगायला लागणं. ________________________________________ बिफोर वी गो, दुसर्‍या लेखात मी एक साधी गोष्ट सांगितली होती : 'बेशर्त स्वीकृती' हा मनाकडून सर्व सूत्र स्वत:कडे घेण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. याचं साधं कारण असं की मन तक्रारखोर आहे. त्याला जे मिळालंय ते नकोय आणि जे सध्या समोर नाही ते हवंय. लोकांना वाटतं स्वीकृती हार आहे, त्यानं महत्त्वाकांक्षेला शह बसेल. पण वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे. जे आहे त्याचा स्वीकार आपल्याला वर्तमानात आणतो, समोर आहे त्याच्याशी आपण डील करतो आणि असलेल्याशी समर्थपणे डील करता आलं की आपला कॉन्फिडन्स वाढून प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होतात. मग बहुतेकदा आहे तेच उत्तम वाटतं आणि ते सर्वोत्तम करण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा मग आहे ते योग्यपद्धतीनं डील करून काही तरी नवं शोधतो. आहे ते नाकारणं, त्याच्याशी वैर घेणं, आपल्याला द्विधा करतं. जे करतोय त्याच्याकडे दुर्लक्ष होतं कारण जे करायचंय ते मनात चालू असतं. मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि समोर आहे त्यात आपल्याला रस नसतो कारण मन ते बदलायला सांगत असतं! ______________________________________ ओशोंनी मनाचा हा पैलू अत्यंत अनोख्या शब्दात मांडला आहे "मन का स्वभाव ही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!" (आष्टावक्र महागीता) अस्विकार हा मनाचा महत्तम पैलू आहे, मग सांप्रत गोष्ट काम असो की नातं. नवविवाहितांना माझं म्हणणं चटकन लक्षात येईल. शोधताना प्रत्येकानं बेस्ट पार्टनर चूज केलेला असतो (अर्थात, प्राप्त परिस्थितीत यथासांग विचार करून). पण काही दिवसात चॉइस चुकलाय असं वाटायला लागतं (मजा म्हणजे दोघांनाही!). आता नव्या पर्यायाचा शोध सुरू होतो (त्यात सुद्धा कोण आधी शोधतोय याची शर्यत!). मग वर लिहिलंय ती परिस्थिती उद्भवते "मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि प्रत्यक्षात असलेल्यात आपल्याला रस नसतो कारण मन त्याच्याशी राजी नसतं!" सगळ्या प्रकारात एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की लगाम मनाकडे आहे! आपल्याला वाटतं पहिली निवड केली तेव्हा निर्णय आपला होता पण तसं असतं तर आपण आपल्याकडनं नातं सावरलं असतं. तिला काहीही वाटू दे, आपण तिला समजावून घेतलं असतं आणि समजावून सांगितलं असतं की सेपरेशन कशाला? आपण आपल्याकडून सर्व प्रयत्न केले असते. आपल्या सुखात तिचं सुख आहे आणि तिच्या सुखात आपलं आहे याची जाण ठेवून वागलो असतो. पण निर्णय मनाचा होता आणि मनाला रंग बदलायला किती वेळ लागतोय? जरा मनाविरुद्ध झालं की संपलं! नवा पर्याय शोधायला तयार. आणि मजा म्हणजे मनंच दुसरा पर्याय निवडणार आहे! मन निर्णय तो काय घेणार? काय आहे त्याच्याकडे निर्णय घ्यायला? फक्त स्मृती (त्या देखील बहुतेक नकोशा वाटणार्‍या)! आणि त्यातून काय साधायचा प्रयत्न करेल ते? तर त्या स्मृती पुसून टाकू शकेल अशी कुणी तरी फॅंटास्टिक व्यक्ती! बरं समजा मिळाली अशी कोणी तर किती वेळ लागेल हा भ्रम निस्तरायला? फक्त तिनं मनाच्या कल्पनेपेक्षा जरासं वेगळं वागणं, दॅट्स ऑल! मग पुन्हा बदलाबदली सुरू! थोडक्यात जोपर्यंत अस्विकार आहे तोपर्यंत लगाम मनाकडे आहे. 'दाय विल बी डन' म्हणजे आहे त्याची बेशर्त स्वीकृती. हा स्वीकार तुम्ही समजून उमजून केलेला आहे, नाईलाजानं नाही. ज्या क्षणी तुम्ही आहे ते स्वीकारता, त्या क्षणी लगाम तुमच्या हातात येतो. भ्रमराला रुणूझुण करायला संधीच राहत नाही. ______________________________ तुम्हाला वाटेल मी माझ्यामनाचे श्लोक लिहितोय, पण तुमचे प्रतिसाद मनाची नेमकी हीच अवस्था दाखवतात : >केवळ अन केवळ ओब्लिगेशनच कामातलि मजा कमि करतं जात, म्हणूनच आवडत्या कंपनित लागलेल्या जॉबचा पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही. = प्रत्येक दिवस नवा आहे पण मन स्मृतीतनं सक्रिय होतं आणि आपण त्याच्याशी अलाईन होतो. त्यात आपल्याला लहानपणापासून शिकवण आहे ‘नव्याचे नऊ दिवस’. मग आपल्याला वाटतं "पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही." >ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं. = आता ही मनाची शर्त पूर्ण करणं असंभव आहे कारण तुमच्या मर्जीवर कंपनी कशी चालणार? (आणि वैवाहिक नातं असेल तर विलफुल एंटर-एग्झिट अजूनच अवघड!). पण एक साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. प्रसंगाकडे स्मृतीतनं पाहिल्यामुळे त्यातलं नवेपण हरवतंय. प्रत्येक एंट्री फ्रेशच आहे आणि इग्झिटची गरज वाटतेय कारण आहे त्यात रस नाहीये! >म्हणजे काय तर आपण एखाद्या कामात निपुण होत गेलो पण पुरेस चॅलेंज वाढत गेलं नाही तरी कामाचा कंटाळा येतो. ह्या उलट निपुणता निर्माण झालि नाही पण चॅलेंज वाढत गेलं तर कामाचे फ्रस्ट्रेशन येत. तेव्हां हि गोश्ट काम करताना फार व्यवस्थित सांभाळावी लागते. अन्यथा बट्याभोळ होतो. = आहे त्यात रस नसेल तर कसे होणार तुम्ही निपुण? आणि आहे ते काम कौशल्यानं केल्यावर चॅलिंज निर्माण होतो. ते वन डे सारखं आहे, तुम्ही आल्याआल्या बाउंड्री किंवा सिक्स ठोकू शकत नाही आणि एकदा सेटल झाल्यावर आहे तोच गेम तुम्हाला नवे चॅलेंजिस देतो. फ्रस्ट्रेशनच खरं कारण नैपुण्य नाही आणि नैपुण्य नाही कारण आहे त्याकडे दुर्लक्ष, अशा चक्रात व्यक्ती सापडते. मग मन सांगता कंटाळा आला, घ्या आता नवा जॉब (वैवाहिक नात्यात तर आणखीच मजा, बदला पार्टनर! (किंवा बघा पर्यायी व्यवस्था!) __________________________________ मन शब्दांशी कसा खेळ करतं हे पाहण्यासारखं आहे : माझा मुद्दा साधा आहे : बेशर्त स्वीकारात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याचा निर्णय तुम्ही घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं. आपण कामाला लागलो, विषय संपला! >शब्द...शब्द..शब्द...शब्द..इथे कांहीच समजत नाही, कांहीच सिद्ध होत नाही. = त्या प्रतिसादात शब्दांचीमाळ विंडोबाहेर गेलीये! स्वीकारा किंवा स्वीकारू नका निर्णय तुमचा आहे. सगळं लेखन साध्या मराठीत आहे, त्यात न समजण्यासारखं काय आहे? उत्तम संदर्भ मन किती चुकीच्या पद्धतीनं देतं याचं उदाहरण : >गुरुदेव म्हणाले: हू आर यू? यू आर आय इन द यू इन द आय इन द यू? ( संदर्भ : असा मी असामी ) = प्रश्न 'हू आर यू'? नाहीये. 'आर यू गोइंग टू अ‍ॅक्सेप्ट ऑर नॉट' असा आहे! याहीपेक्षा कहर पुढे आहे: >काय ते ठरलं का शेवटी? स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं की 'सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं? = मन सांगतंय स्वीकार म्हणजे हार आहे ('सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं?). स्वीकार स्वेच्छा आहे, जे आहे ते लक्षपूर्वक आणि जवाबदारीनं निभावणं आहे. मनाला वाटतं स्वच्छंद म्हणजे बेदरकारी! (स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं ) >की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि लोकांनी फटके दिले की मग मुकाट्यानी सगळं स्विकारुन जगायचं? = हा (प्रतिसादकाच्या) मनाचा पूर्वानुभव आहे! पूर्ण स्वीकार तुम्हाला समर्थ करतो. 'स्वीकारू की नको' अशी मनाची द्विधा स्थितीच तुम्हाला कमजोर करते आणि मग परिस्थिती वरचढ होते. >की आधी सगळं स्विकारुन जगायचं आणि वैताग आला की स्वेच्छेनी जगायचे? = त्याच द्विधा स्थितीचा पुनर्प्रत्यय! >की स्वेच्छेनी जगतोय असं दाखवायचं आणि खरं तर सगळं स्विकारुनच जगायचं? = मन पुन्हा तेच सांगतंय स्वीकार ही हार आहे! >की सगळं स्विकारुन मुकाट्यानी जगतोय असं दाखवत हळूच स्वेच्छा पुढे सरकवत रहायची? = परिस्थितीनं पुरती वाट लावली की 'आत एक आणि बाहेर एक' अशी अवस्था कशी होते त्याचं यथार्थ वर्णन! >त्यापेक्षा सोप्पे म्हणजे स्वतः स्वेच्छेनी जगायचं आणि आजूबाजूच्या लोकांना सांगायचं आहे त्याचा स्वीकार करुन जगा! कसे? = इग्झॅक्टली हेच तर मनाला वाटतंय! म्हणून तर स्वीकृती स्वत:ला करायचीये हे लक्षात येत नाहीये. >काय ते ठरलं की मला कळवा बरं का सगळ्या चर्चापटूंनी. = काय कळवणार ते? कुठे बेशर्त स्वीकार केलाय त्यांनी? त्यांचाही लगाम मनाकडेच तर आहे. माझ्या लेखनाचा उपयोग करून घ्यायचा असेल तर असले व्यर्थ प्रतिसाद आणि त्याहीपेक्षा व्यर्थ म्हणजे इतर पोस्टवर माझ्या प्रतिसादांवर भंपक उपप्रतिसाद देऊन पर्सनल टार्गेटींग (याविषयी प्रशासनचं धोरण काय आहे कल्पना नाही), यातनं काही होणार नाही. एखाद्या प्रसन्न सकाळी उठता क्षणी निर्णय घ्या 'दाय विल बी डन! आणि मग त्या मूडमध्ये फक्त एक दिवस जगून बघा. तुमच्या जीवनाचा सारा रंग बदलेल. त्या अनुभवातनं मग प्रतिसाद द्या. तुम्हाला कळेल लेखन म्हणजे नुसते शब्द नव्हते त्यात अर्थ होता. यू विल एन्जॉय. __________________________ बिफोर आय क्लोज, 'दाय विल बी डन!' याचा अर्थ (जिझसला जरी) आकाशातला कुणी तरी परिस्थिती निर्माण करतो आणि आपण त्याला हो म्हणतो असा (त्या वेळी) वाटत असला तरी असा कुणी आकाशस्थ मानण्याची गरज नाही. कारण मग मन पुन्हा 'तो कोण?' 'एकदा त्याची मर्जी स्वीकारल्यावर तो माझी काळजी घेणार का?' असले प्रश्न निर्माण करेल. तर तसा कुणीही नाही. आपण परिस्थितीचा उहापोह करत नाही, फक्त तिचा बेशर्त स्वीकार करतो. काही भक्तिपंथी म्हणतील 'अरे ये सब केमीकल लोचे है भाई...आमचे संत फार सोपा सिद्धांत सांगतात : ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ' तर तसा अनंतही कुणी नाही आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही.

Book traversal links for रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)

  • ‹ रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)
  • Up
  • रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
42337 वाचन

💬 प्रतिसाद (225)

प्रतिक्रिया

सार्थक

नंदन
Tue, 07/16/2013 - 02:43 नवीन
चर्चा वाचल्याचे सार्थक झाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

'मीच सर्वश्रेष्ठ आहे'?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 07/18/2013 - 00:00 नवीन
लेखनाचा अर्थ आपण काढू तसा निघतो. मॅन यू हॅव नॉट एंजॉइड द डेलिकसी कॉल्ड `दाय विल बी डन! या वाक्याच्या संदर्भात - `यू हॅव नॉट टेस्टेड द डेलिकसी कॉल्ड फूड' म्हटलं आहे. दुसर्‍या वाक्याचा अर्थ जसा `मी सर्वश्रेष्ठ स्वयंपाकी ' असा होत नाही तसा `दाय विल बी डन' ची किमया सांगणारा `स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो' हा अर्थ नाही. इट इज जस्ट एन इन्विटेशन टू ट्राय समथींग न्यू. तुम्ही संत वचनं ऐकलीयेत, जगप्रसिद्ध व्यक्तींच आयुष्याविषयक चिंतन वाचलंय, तशी ही गोष्ट आजमावून पाहा. हा मुद्दा हुकल्यानं सगळ्या प्रतिसादात स्वतःच्या व्यवसायचं आणि त्यातलया समस्यांचं वर्णन आलंय. मी इथे वेगळा अँगल सांगतोयं, तुम्ही किती कष्टसाध्य व्यावसाय किंवा काँप्लिकेटेड काम करतायं हा प्रश्न नाही. जे आहे ते बेशर्त स्विकारून पाहा. मग कदाचित `मी काही फार मोठं करतोय' असं वाटणार, सगळं सहज आणि सोपं होऊ शकेल.... आणि >तुमच्या इंग्रजी विधानावर कुत्रंही तंगडी वर करीत नाही. कनवटीचे ४ पैसे खर्च करणारा माणूस पदार्थाचा आणि सेवेचा दर्जा पाहातो तुम्ही काय म्हणताय ते पाहात नाही. अशी उद्विग्नता प्रतिसादात येणार नाही. आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

यो!

अग्निकोल्हा
गुरुवार, 07/18/2013 - 01:30 नवीन
अशी उद्विग्नता प्रतिसादात येणार नाही. आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.
बास, आता स्वतःला फसवणं थांबवा. त्यांचा प्रतिसाद तुमच्या अतर्क्य असंबध्द व मी पणाने बरबटलेलि विधाने वाहुन निर्माण झालेलि चित्तदशा व तुमच्या अतर्क्य असंबध्द व मी पणाने बरबटलेल्या प्रतिसादांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतोय हे एव्हडच मान्य करायची क्षमता बाळगुन आहात काय ? नसाल तर शांत व्हा पण असे प्रतिसाद लिहुन धाग्यवरिल चर्चांचे मातेरं करुन नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

??

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 07/18/2013 - 01:51 नवीन
एक तुम्ही वगळता बहुतेक वाचकांना माझा मुद्दा पटलेला दिसतो आहे. तुम्हाला तो पटावा असा आग्रह नाही. उलट, कोणाचेच मुद्दे तुम्हाला पटत नाहीत हे वास्तव आहे. ते तुम्ही कधीच बिनशर्त स्विकारणार नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान...... . तेंव्हा ह्यावर अजून वाद घालणे म्हणजे शब्दाला शब्द वाढविणे आहे. माझा आणि इतर वाचक सदस्यांचा मौल्यवान वेळ मी फुकट घालवू इच्छित नाही. तुम्ही तुमच्या अनाकलनिय शाब्दिक कोलांट्याउड्या मारू शकता.
आपला प्रतिसाद आपली चित्तदशा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन दर्शवतो.
आपल्या लेखनातून (?) आपली अनियंत्रित चित्तदशा आणि पोकळ शब्दांचा चिखल चिवडत बसण्याचा दृष्टीकोन दिसून येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पोकळ शब्दांचा चिखल?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 07/18/2013 - 13:24 नवीन
पुन्हा तीच उद्विग्नता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

"काही झालं तरी शेवटचा

बॅटमॅन
गुरुवार, 07/18/2013 - 13:56 नवीन
"काही झालं तरी शेवटचा प्रतिसाद माझाच" या ध्येयपूर्तीकडे जाणारी वाटचाल रोचक आहे. चालूद्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मग गॉन केस

अवतार
गुरुवार, 07/18/2013 - 15:12 नवीन
मग गॉन केस आहे असेच म्हणावे लागेल
आता म्हणा! बाकी इतरांना उद्देशून पराभूत होणे, चित्तदशा संभ्रमित - दोलायमान होणे, उद्विग्न होणे अशी शेलकी विशेषणे वापरायची आणि मग त्यांना इनविटेशन द्यायचे हे म्हणजे दुसऱ्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवून मग त्यांना स्वत:च्या कोंडवाड्यात आमंत्रण देण्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@"काही झालं तरी शेवटचा

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/18/2013 - 17:49 नवीन
@"काही झालं तरी शेवटचा प्रतिसाद माझाच" या ध्येयपूर्तीकडे जाणारी वाटचाल रोचक आहे. चालूद्या!>>> खि..खि..खि..! यावरून आमच्या निकोटिन अ‍ॅनॉनिमस मधल १ स्लोगन अठवलं-पहिलिच चिमूट घातक!!! मतितार्थ-तंबाखुची पहिली चिमुट खाल्यानंतर(व्यसनी माणसाला) उरलेल्या चिम्टी "पुडी" संपेपर्यंत खाव्याच लागतात! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ते काहीही असु देत,

सौंदाळा
गुरुवार, 07/18/2013 - 17:57 नवीन
ते काहीही असु देत, संक्षि मिपाचे तेंडुलकर आहेत. बॅटिंगला आले की सेंचुरी नक्की..:);)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काय उपयोग?

जे.जे.
गुरुवार, 07/18/2013 - 23:55 नवीन
काय उपयोग? निम्याहुन अधिक प्रतिसाद निगेटिव्ह आहेत. याचा अर्थ पब्लिकला लेख आवडला नाहि असाच होतो. अध्यात्म्य आणि मनाच्यासारख्या महत्वाच्या विषयावर लोकान्नि भरपुर टाइमपास करून घेतला आणि लेखकासहित सर्वान्नि चांगलीच राळ उडवलीये. लेखकाने आधिच योग्य शब्दप्रयोग केले असते आणि वेळिच चुका मान्य केल्या असत्या तर हे टाळता आले असते - उदाहरणार्थ - 'बेशर्त' च्या जागि 'बिनशर्त' स्वीकृती अस हव होत. लेखक हे अजुनहि स्विकारायला तयार नाहिये अस दिसतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

लेखक हे अजुनहि स्विकारायला

मदनबाण
Fri, 07/19/2013 - 10:12 नवीन
लेखक हे अजुनहि स्विकारायला तयार नाहिये अस दिसतय. तसेही लेखक इतरांचे काहीच स्वीकारायला तयार नाहीये ! एकहार्ट मधे जेव्हा ते म्हणाले की गीतेच्या सगळ्या अध्यायांवर मी निरुपण लिहू शकेन पण ती फक्त चर्चा होईल. त्याचा रोजच्या जगण्याला उपयोग नाही. तसेच ते म्हणाले की,अभ्यासाची तर अजिबात आवश्यकता नाही. तेव्हाच मी समजलो की शाब्दीक बुडबुड्यांच्या जिलब्या टाकण्या शिवाय पेक्षा लेखक अधिक काही करु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.जे.

माफ करा पण इतरांना उपदेशांचे

पुण्याचे वटवाघूळ
Sun, 07/14/2013 - 21:57 नवीन
माफ करा पण इतरांना उपदेशांचे डोस पाजणे आणि आत्मप्रौढी हे प्रकार तुमच्या लेखनात खूपदा असतात.या तीनही भागांमधून नक्की काय म्हणायचे आहे हे अजिबात न कळलेल्यांमध्ये मी पण एक आहे.
  • Log in or register to post comments

विषय सोप्पा करून हवाय?

अवतार
Sun, 07/14/2013 - 22:22 नवीन
हात्तिच्या! म मा मि मी मु मू मे मै मो मौ मं मः एवढी साधी सोपी समोर असलेली गोष्ट तुम्हाला दिसत कशी नाही हेच आश्चर्य आहे! एकदा ह्या गोष्टीचा तुम्ही बिनशर्त स्वीकार केलात की सगळंच कसं सोप्पं सोप्पं!
  • Log in or register to post comments

एखादी गोष्ट जर समजत नसेल तर

विजुभाऊ
Sun, 07/14/2013 - 22:30 नवीन
एखादी गोष्ट जर समजत नसेल तर त्याला रूपकाचे रूप द्यावे. रुपकाचे रूप लेवून आलेले लिखाण आपले रूप बदलून आलेले असते. त्यामुळे मूळ रुपातील गोष्ट एकदा रुअक या रूपात आली की ते मोहक रुपडे रोचक वाटते. या रूपातील रुपवती कथेला पुन्ह रूपकातील रूपकाचा साज दिला त र्ते अबोध दुर्बोध न होता सुबोध व्हाचे अशी लेखकाची इच्छा बलीयसी. पण वाचकाला जर त्या रुपाचा मोह पडत नसेल तर रुपकाचे रूप टाकून देवून मूळ स्वरूप धारण कराएव असे रूपही जर वाचकास समजत नसेल तर कथाकाराने आपले रूपगर्वी न रहाता आरशात पहावे लेखनाचे उत्खनन करावे आणि सार बाळबोध रूपात वाचकासमोर आणावे.
  • Log in or register to post comments

ज्जे बात!

सोत्रि
Sun, 07/14/2013 - 22:40 नवीन
विजुभौ, दंडवत स्विकारा! अतिशय समर्पक आणि यथार्थ प्रतिसाद, शब्दाशब्दाशी सहमती!! स्वगतः सोक्या, चक्क विजुभौशी सहमत व्हायची वेळ आली की ;) - (लेख लिहून गंगार्पण करणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विजुभौ, दंडवत स्वीकारा!

विटेकर
Mon, 07/15/2013 - 11:47 नवीन
+१११११ आवडेश . रुपकाचे रुपक एकदम चपखल बसले आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

मी वर काय लिहीलय त्याचं रूप

विजुभाऊ
Sun, 07/14/2013 - 22:32 नवीन
मी वर काय लिहीलय त्याचं रूप मलाच पटलेले नाहिय्ये
  • Log in or register to post comments

हे नक्की काय चालू आहे?

क्लिंटन
Sun, 07/14/2013 - 22:51 नवीन
हे नक्की काय चालू आहे? दोन-तीन वेळा वाचून समजून घ्यायचा प्रयत्न केला पण कुठचे काय. कशाचाच पत्ता लागला नाही. बहुदा मी हा प्रकार 'बेशर्त' (म्हणजे नक्की काय? बिनशर्त हा शब्द ऐकला होता) स्विकारलेला नाही असे दिसते. :)
  • Log in or register to post comments

बे म्हणजे दोन ( उदा: दोन चा

विजुभाऊ
Sun, 07/14/2013 - 23:30 नवीन
बे म्हणजे दोन ( उदा: दोन चा पाढा याला बे चा पाढ असे म्हणतात )
  • Log in or register to post comments

स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या

मदनबाण
Mon, 07/15/2013 - 08:45 नवीन
स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या प्रतिक्रियेची वाट बघतो आहे बरं ! ;)
  • Log in or register to post comments

हार्ड कोअर भक्तीपंथी!

संजय क्षीरसागर
Mon, 07/15/2013 - 09:06 नवीन
इतके लाख लोक जातायतनं तिकडे, लावतायंत न रांगा, जोडतायतना हात? म्हणजे तो असणारच! या उलट, ज्याला कळलंय तो निश्चिंत असतो, त्याला इतरांच्या अनुमोदनची वाट पाहावी लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बेशर्त स्वीकृतीवर सीडी

मदनबाण
Mon, 07/15/2013 - 09:23 नवीन
बेशर्त स्वीकृतीवर सीडी अडकल्याने ही केस हाताबाहेरची असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या

स्पा
Mon, 07/15/2013 - 10:34 नवीन
स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या प्रतिक्रियेची वाट बघतो आहे बरं !
तुम्हाला संक्षी समजलेत नाही असे म्हणेन बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुम्हाला संक्षी समजलेत नाही

मदनबाण
Mon, 07/15/2013 - 11:19 नवीन
तुम्हाला संक्षी समजलेत नाही असे म्हणेन मग तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तरी सांगा आम्हा सर्वांना ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मग तुम्हाला समजलेले संक्षी

स्पा
Mon, 07/15/2013 - 12:04 नवीन
मग तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तरी सांगा आम्हा सर्वांना
त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतीलच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन

मदनबाण
Mon, 07/15/2013 - 12:10 नवीन
त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतीलच मूळ प्रश्नाचे उत्तर न देण्याची हातोटी वाखाणण्या सारखी आहे ! ;) तुम्ही तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तुमच्याच शब्दात सांगण्याचे कष्ट करा. तुम्ही त्यांचे लेखन "मन" लावुन वाचलेच असेल... आणि तसे असेल तर ते तुम्हाला कळलेच असेल असे गॄहीत धरुनच मी माझा प्रश्न विचारला आहे / होता. ;) आता तरी मूळ प्रश्नाचे उत्तर द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तुम्ही तुम्हाला समजलेले

स्पा
Mon, 07/15/2013 - 12:12 नवीन
तुम्ही तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तुमच्याच शब्दात सांगण्याचे कष्ट करा
एकच व्यक्ती प्रत्येकाला वेगवेगळी समजते, त्याला एकच असा कुठला नियम नाही . त्यामुळे तुम्हाला जे संक्षी दिसतील ते मला दिसतील असे नाही आणि वैस वर्सा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

एकच व्यक्ती प्रत्येकाला

मदनबाण
Mon, 07/15/2013 - 12:28 नवीन
एकच व्यक्ती प्रत्येकाला वेगवेगळी समजते, त्याला एकच असा कुठला नियम नाही . त्यामुळे तुम्हाला जे संक्षी दिसतील ते मला दिसतील असे नाही आणि वैस वर्सा. इथे आता अनेकांना संक्षी पूर्ण समजले आहेत. आम्हाला तुम्हाला समजलेले संक्षी आम्हाला जाणुन घ्यायचे आहेत. तुम्ही विचारलेल्या मूळ प्रश्नाचे उत्तर देण्याचे शिताफिने टाळले आहे.आम्हाला आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सध्या लेख लिहायचा कंटाळा

स्पा
Mon, 07/15/2013 - 12:36 नवीन
सध्या लेख लिहायचा कंटाळा आलेला आहे कधी उत्साह आलाच तर लिहीन एक रसग्रहण :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

३१ जुलै पर्यंत कंळाला गेला तर

मदनबाण
Mon, 07/15/2013 - 12:40 नवीन
३१ जुलै पर्यंत कंळाला गेला तर आम्हाला कळवा ! ;) रसग्रहण "मन" लावुन वाचण्यास आम्ही "बेशर्त" तयार आहोत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन

कवितानागेश
Mon, 07/15/2013 - 12:52 नवीन
त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतील>> स्पाचंद्रजी, तुम्हला माहित नाही का संक्षी हे नेहमी फेसलेस मॉबसाठी लिहितात. त्यामुळे त्यांच्या लेखनातून आपल्याला आपण स्वतःच दिसत असतो. त्यामुळे संक्षी कसे आहेत हे त्यांना स्वतःला त्यांचे स्वतःचे लेखन वाचल्यावर कळेल. आणि मग त्यांनी ते आपल्याला सांगितले तरच आपल्याला कळेल. अवांतरः वैयक्तिक प्रतिसाद देउ नक रे पोरांनो. संक्षी कसे आहेत, याच्याशी आपल्याला काय करायचय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तुम्ही संपादक आहात ना..?

मोदक
Mon, 07/15/2013 - 13:18 नवीन
तुम्ही संपादक आहात ना..? तरीही वैयक्तिक प्रतिसाद..? छ्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मोदकचंद्ररावजीसहेब,

कवितानागेश
Mon, 07/15/2013 - 13:29 नवीन
मोदकचंद्ररावजीसहेब, तुम्ही मला भर धाग्यावर 'संपादक' म्हणून संबोधत अहात, हाच खरं तर अत्यंत वैयक्तिक प्रतिसाद आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

आता धमकीची भाषा..? छ्य्या..

मोदक
Mon, 07/15/2013 - 13:45 नवीन
आता धमकीची भाषा..? छ्य्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

???

क्लिंटन
Mon, 07/15/2013 - 11:29 नवीन
अनेकांना सावरकर-गांधीजी कळत नाहीत तशातला संक्षी न कळणे हा प्रकार आहे का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हा.हा.हा नारायण नारायण !

मदनबाण
Mon, 07/15/2013 - 11:34 नवीन
हा.हा.हा नारायण नारायण ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

झाली वाटते झोप

लंबूटांग
Mon, 07/15/2013 - 08:58 नवीन
सकाळ झाली चिखलू उठला
  • Log in or register to post comments

छ्या ,,,,

विटेकर
Mon, 07/15/2013 - 11:53 नवीन
अगोदर लेख कळला नाही आता प्रतिसादही डोक्यावरून जाताहेत.. आधी मन आणि शर्ती होत्या.. मग प्रेम उपटले .. आता तर गोष्टी किचन मध्ये पोहोचल्या आहेत... मला तर फक्त "शर्ती" संपून "शर्यती" सुरु झाल्या आहेत असेच वाट्ते. उगा एक विंग्रजी क्याप्श्न आठवले.. If you can not convince people , confuse them!
  • Log in or register to post comments

ज्यासी नाही बोध तो करतो दुसर्‍यास मन बोध.......

निश
Mon, 07/15/2013 - 13:12 नवीन
ज्यासी नाही बोध तो करतो दुसर्‍यास मन बोध चुकलेली वाट ज्याची, तो काय दाखविल मनमुक्तिची अवघड वाट. पेठकर काकांशी पुरेपुर सहमत.
  • Log in or register to post comments

अहो पण मागच्या धाग्यात तुम्ही

बॅटमॅन
Mon, 07/15/2013 - 14:31 नवीन
अहो पण मागच्या धाग्यात तुम्ही संक्षींशी सहमत होता ना???? नक्की ठरवा एकदाचं कुणाशी सहमत आहात ते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

बॅटमॅन साहेब, मनाचिया गुंती गुंतला तुम्ही.....

निश
Mon, 07/15/2013 - 15:27 नवीन
मनाचिया गुंती गुंतला तुम्ही भ्रमरूपी भ्रमर डसलासी. आम्ही कोणासंगे तुम्हास होइल माहीत ठेवा नेहमी सहवास सज्जनांसंगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लेखाप्रमाणेच अतिअतिअवांतर -

प्रसाद प्रसाद
Mon, 07/15/2013 - 16:02 नवीन
लेखाप्रमाणेच अतिअतिअवांतर - कोपऱ्यात उभी हिंदमाता आणि बेमटेरावांच नाव घेण्यात माझा नंबर पहिला – इति पु.ल. (असामी असामी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..

बॅटमॅन
Mon, 07/15/2013 - 16:06 नवीन
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे...ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव्!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद प्रसाद

गुड गुड..

सस्नेह
Tue, 07/16/2013 - 20:30 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लेख नीट वाचला. समोरच्या

गवि
Mon, 07/15/2013 - 14:57 नवीन
लेख नीट वाचला. समोरच्या परिस्थितीचा बेशर्त स्वीकार करणं ही पराभवसूचक गोष्ट समजली जाते. ती तशी न मानता उलट तो विजय मानला पाहिजे. इनफॅक्ट परिस्थितीचा (बिनशर्त) स्वीकार म्हणजे जणू नेहमीच "हतबल शरणागत स्वीकृती" असा एक निराशाजनक टोन त्या प्रकाराला आपोआप दिला जातो. स्वतःकडे आणि आजुबाजूला पाहिलं तर परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार तर जाऊदेच, उलट परिस्थिती पूर्णपणे नाकारणे, डिनायल, डोळे मिटून दूध पिणे... अप्रिय वाटणार्‍या स्थितीला ती जणू नाहीच आहे असं समजून चालणे..असं एक आभासी-पॉझिटिव्ह टोक दिसतं- किंवा मग ती स्वीकारली आहे म्हणजे- चरफडत, नशिबाला बोल लावत, हतोत्साह होऊन "पत्करली" आहे.. प्राक्तन म्हणून झेलतो आहे असा दुसर्‍या टोकाचा ऋण अप्रोच दिसतो. या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच. आता यावर वाद न घालता त्याचा अंगिकार करुन पहावासा वाटला तर पहावा किंवा सोडून द्यावा हे स्वाभाविक असताना त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होतेय, आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय त्याच्या गाभ्याला पूर्णपणे सोडून होतेय. लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही. पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात. शेवटी "ठेविले अनंते" चे उत्तम उदाहरण दिले आहे. यातला अनंत (नको असल्यास) वजा करुन हाच मुद्दा महत्वाचा आहे. त्याला अन्य मार्गांनी फिरवून आणल्याने संभ्रम वाढू शकतो. तेव्हा मी अशी विनंती करुन पाहतो की संक्षींनी त्यांचे विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा. त्यांना (संक्षींना) स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.
  • Log in or register to post comments

गविंशी सहमत.विचार आटोपशीर आणि

कवितानागेश
Mon, 07/15/2013 - 15:52 नवीन
गविंशी सहमत. विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा.. हे तर अगदीच योग्य आहे. पण स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.. असे अजिबात नाही. वाचक विचारी आहेतच. अभ्यासू देखिल आहेत. आणि अनेक वाचक शहाणे आणि अनुभवीदेखिल आहेत. पण 'बाकी सगळे व्यर्थ, आणि मी सांगेन तेच बरोबर' हा टोन कुणीही कुठेही खपवून घेत नाही. शिवाय अनेकांसाथी अनेक संत, साधना सांगणारे गुरु हे त्यांच्या आईवडलांपेक्षाही जास्त जवळचे-पूजनीय असतात. त्याम्च्यावर विनाकारण टीका झाल्यास लोकांचा रोष ओढवणारच. लेखकानी त्यांचे स्वतःचे अनुभव योग्य शब्दात खुशाल मांडावेत. पण लोक कसे मूर्ख आहेत आणि मी कसा त्यांना शहाणं करायला आलोय, हा टोन बदलावा, अशी विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

स्वतःला अनेक विचारांची

गवि
Mon, 07/15/2013 - 16:14 नवीन
स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.. असे अजिबात नाही. वाचक विचारी आहेतच. अभ्यासू देखिल आहेत. आणि अनेक वाचक शहाणे आणि अनुभवीदेखिल आहेत.
हं. मी असं म्हणायला हवं होतं की (वाचक अनुभवी असले तरी) संक्षी यांना आलेली ती विशिष्ट अनुभूति किंवा त्यांच्या मनात घडलेल्या त्या नेमक्या विशिष्ट विचारप्रकियांचाच अनुभव वाचकांना आलेला नसू शकत असल्याने (त्यांना काही आपापली वेगळी अनुभूती आली असेल.) त्यांचा गोंधळ उडू शकतो.. (बरेच ज्यादा शब्द वापरुन आणि अनेक अनावश्यक तुलना करुन विचार मांडले की). शिवाय मी एकटा शहाणा आणि तुम्ही सारे मूर्ख असा टोन असणं चुकीचंच, पण आपल्याला मनापासून पटलेला मुद्दा समोरच्याच्या मनातही उतरावा अशा तीव्र इच्छेने कधीकधी अहमहिकेने / आग्रहीपणे आपली भूमिका रेटली जाते, तसाही प्रकार कधीकधी होतो. माझं म्हणणं इतकंच आहे की विचार थोडक्यात मांडावा म्हणजे समोरच्याला स्पष्टपणे पटायला मदत होईल. यामुळे नंतर मेगाबायटी प्रतिसाद आणि क्वोटस देऊन खंडनमंडन करावं लागणार नाही. त्याउपर नाही पटलं तर फार रेटण्यात अर्थ नाही हे धोरण ठेवल्यास बरेचसे अस्थानी वाद टळतील हे महत्वाचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

कधीकधी अहमहिकेने / आग्रहीपणे

कवितानागेश
Mon, 07/15/2013 - 16:21 नवीन
कधीकधी अहमहिकेने / आग्रहीपणे आपली भूमिका रेटली जाते, तसाही प्रकार कधीकधी होतो.------ नेहमी होतोय! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

ती विशिष्ट अनुभूति...

निराकार गाढव
Wed, 07/17/2013 - 23:31 नवीन
आरपार पटलं बगा आपल्याला. उगाच समदे सायबांच्या नावानं बोम्ब ठोकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सर्वोत्क्रुष्ट प्रतिसाद...!!!

पिलीयन रायडर
Mon, 07/15/2013 - 16:10 नवीन
मला वाटातं की संक्षी नी "विचाराला" महत्व द्यावे... त्या विचारावे "त्यांच्या" आयुष्यात काय झालय त्याला नाही.. तो "माझा" विचार आहे.. "मला" अनुभुती आली आहे त्यामुळे "तोच योग्य आहे".. अशा गरज नसलेल्या गोष्टी लिहीणे टाळावे.. तसं झालं तर लोकही "विचारलाच" महत्व देतील.. "संक्षी" ना नाही... आणि हो.. जे काही असेल ते सरळ लिहावे.. उगा शब्दांचे मनोरे रचु नयेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा