`रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
15 Jun 2013 - 12:58 pm

मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता)

ओशो

__________________________________

मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे. विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील.

अनेकानेक अंगांनी मनाचा सांगोपांग वेध घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतनं होईल. वेगवेगळ्या सिद्धांचं मनाविषयीचं आकलन, व्यक्तिमत्त्वाची घडण, आपली स्मृती, माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, मनाचा कल आणि व्यक्तिगत कौशल्य, संगीत, खेळ, फ्रॉइड आणि इतर दिग्गज मनोतज्ज्ञांचे विचार, मानवी नातेसंबंध, मनाचं हृदयाशी नातं (भावनिक विश्व : आनंद, नैराश्य, न्यूनगंड, अल्झायमर, आत्महत्या वगैरे), मानसिक धारणा, भक्तिमार्ग आणि इतर आध्यात्मिक मार्गातल्या मनापलीकडे नेणार्‍या साधना पद्धती आणि सरते शेवटी मनापासून मुक्ती असा लेखनाचा समग्र आवाका असेल.

____________________________

प्रथम मनाचं अत्यंत उघड स्वरूप समजावून घेऊ.

मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते. श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद) मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे.

संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ‘पहिली संवेदना’ हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

आजपर्यंत हजारो सिद्धांनी ‘ शांत बसून मनाकडे पाहा’ असा संदेश दिला आहे आणि आजही मनापलीकडे जाण्यासाठी ‘मनाचं तटस्थ अवलोकन’ ही (आध्यात्मिक) जगातली सर्वमान्य साधना मानली जाते. अगदी बुद्धापासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत (इंन्क्लूडिंग ओशो) सर्व ज्ञानमार्गी या साधनेचा पुरस्कार करतात. आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे.

(भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. अर्थात त्याविषयी मी इतक्यात काहीही लिहिणार नाही किंवा त्यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ नयेत.)

मनाचं अवलोकन व्यर्थ का आहे हे जाणणं अगत्याचं आहे. कारण मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’ असा आहे. मुक्त तर आपण ऑलरेडी आहोतच. मनाच्या प्रक्रियेमुळे आपण बंधनात असल्याचा भास होतोय आणि म्हणून मनाची प्रक्रिया जाणणं उपयोगी आहे.

मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अ‍ॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर नेईल ते सांगता येत नाही.

मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो.

मनाचं अवलोकन करताना आपण डोळे मिटून शांत बसलेलो असतो आणि या स्मृतीच्या चलत-चित्रपटात इतके गुंतून जातो की अवलोकन कशासाठी करतोय हेच लक्षात राहत नाही. मग मधून केव्हा तरी आपण कुठेही गेलेलो नाही, जागेवरच बसलो आहोत याचं भान येतं. मग थोडा वेळ शांत वाटतं. त्यानंतर कोणत्या तरी संवेदनेनं पुन्हा स्मृती सक्रिय होते मग पुन्हा आपण भोवर्‍यात सापडतो आणि या कामात बर्‍याच वेळा झोप लागून जाते. जाग आली की झक मारली आणि वेळ घालवला असं वाटायला लागतं. पण इतक्या थोर लोकांनी सांगितलेली साधना व्यर्थ कशी असेल म्हणून लोक रोजरोज ध्यान करत राहतात. त्यांना ज्याम कंटाळा येतो, यांच्या साधनेमुळे बर्‍याच वेळा घरचे वैतागतात (कारण साधनाकालात घरात शांतता लागते) पण सांगणार कुणाला? . शेवटी ते गुरुंना विचारतात आणि गुरू सांगतात ‘साधना कमी पडते आहे, जास्त वेळ बसत चला’. अशी साधना जन्मभर केली तरी काही उपयोग होत नाही कारण साधकाला मनापासून मुक्ती मिळत नाही.

मनाचं अवलोकन करायचा प्रश्न नसून त्याची चक्राकार गती जाणणं महत्त्वाचंय. म्हणजे ‘पहिला विचार कुठून सुरू झाला’ हे विचार मालिका सुरू असताना ‘कुठे तरी मध्ये थांबून बॅक ट्रॅक करणं’ ही खरी प्रोसेस आहे.

ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे.

हे काम अत्यंत कौशल्याचं आहे पण आता तुम्हाला प्रक्रिया कळल्यानं ते नुसतं सोपंच नाही तर अत्यंत इंटरेस्टिंग झालंय. ज्या क्षणी तुम्ही पहिला विचार जाणाल त्या क्षणी तुम्हाला कोणत्या संवेदनेनं तुमचा पहिला विचार निर्माण झाला ते कळेल. आणि मी संवेदना ही मनाची कारक आहे असं का म्हटलंय ते लक्षात येईल.

जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्ती अनुभवाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.

________________________________

‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ असं मनाचं अत्यंत कलात्मक वर्णन करणार्‍या काव्यपंक्तीचं श्रेय अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांना विनम्र अर्पण
________________________

पूर्वप्रकाशन : मनोगत

धर्मप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2013 - 1:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बहिणाबाईंनी 'मन वढाय वढाय.....' मधे मन कसं चुळबुळं असतं ते सांगितलं आहे. तरीही, मनावर हुकुमत चालवता येईल ? प्रयत्न करता येईल ? असो, लेख मालिका वाचायला आवडेलच. स्वागत आहे.

-दिलीप बिरुटें

संजय क्षीरसागर's picture

15 Jun 2013 - 1:58 pm | संजय क्षीरसागर

इट इज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्टिविटी बीटविन टू इअर्स! एकेक दालन पार करत गेलं तर ते अवघड नाही.

सोत्रि's picture

23 Jun 2013 - 12:07 am | सोत्रि

समजा ही आवर्तने मनात चालू आहेत :

माझ्या नोकरीत मेजर प्रोब्लेम चालू आहे -> नोकरी राहिल की नाही माहिती नाही -> कदाचित नोकरी जाईल -> च्यायला नोकरी गेली तर काय? -> 'इएमआय'चे काय करायचे? -> बायको मुलं उपाशी मरतील -> च्यायला ती मॅनेजरची चमची आहे तिची नोकरी काही जात नाही -> पण तिचा फॉर्म अजून कडक आहे -> त्यानेच बहुतेक मॅनेजर तिच्यावर फिदा आहे -> तिला ते कळत नसावे का? -> तिला ह्या वर्षीच्या पार्टीत समजावून द्यायचा प्रयत्न केला होता -> पण शी..तीलाही त्याची जाणिव असूनही काही फरक नाही! -> च्यायला कुठे चाललो मी ? ->

इथे थांबून बॅक ट्रॅक केले आणि मूळ विचारापर्यंत आले की 'नोकरीचे काय करायचे?'

आता,

निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.

ह्यानुसार जीवनात शांतता कशी येईल ?

- (विचारात पडलेला) सोकाजी

समजा ही आवर्तने मनात चालू आहेत :

माझ्या नोकरीत मेजर प्रोब्लेम चालू आहे -> नोकरी राहिल की नाही माहिती नाही -> कदाचित नोकरी जाईल -> च्यायला नोकरी गेली तर काय? -> 'इएमआय'चे काय करायचे? -> बायको मुलं उपाशी मरतील -> च्यायला ती मॅनेजरची चमची आहे तिची नोकरी काही जात नाही -> पण तिचा फॉर्म अजून कडक आहे -> त्यानेच बहुतेक मॅनेजर तिच्यावर फिदा आहे -> तिला ते कळत नसावे का? -> तिला ह्या वर्षीच्या पार्टीत समजावून द्यायचा प्रयत्न केला होता -> पण शी..तीलाही त्याची जाणिव असूनही काही फरक नाही! -> च्यायला कुठे चाललो मी ? ->

इथे थांबून बॅक ट्रॅक केले आणि मूळ विचारापर्यंत आले की 'नोकरीचे काय करायचे?'

यू हॅव मिस्ड ऑन द वेरी लास्ट स्टेप! पहिला विचार होता 'नोकरीचे काय करायचे?' पण तो कोणत्या संवेदनेनं सक्रिय झाला? दॅटस द पॉइंट. मग तुझ्या लक्षात येईल: समोर असलेली कॉईन त्रूची बाटली दिसली आणि त्या संवेदनेनं हे सगळं सुरू झालं! बाटली दिसल्यावर किंमत आठवली (मायला, परवडणार का हे आयुष्यभर असा विचार आला) आणि मग.... माझ्या नोकरीत मेजर प्रोब्लेम चालू आहे -> नोकरी राहिल की नाही माहिती नाही -> कदाचित नोकरी जाईल ->... ही फटाक्याची माळ लागली.

ज्या क्षणी `समोर असलेली कॉईन त्रूची बाटली पाहून हे सुरू झालं' हे लक्षात येईल त्या क्षणी तुम्ही शांत व्हाल. कारण पहिली गोष्ट म्हणजे अजून नोकरी गेलेली नाही. दुसरी गोष्ट, आता इथे बसून आपण कितीही विचारमैथुन केलं तरी समोर प्रसंग उभा राहिल्या शिवाय स्वतःला छळून काही उपयोग नाही.

तुम्ही शांतपणे दोन-चार नव्या ठिकाणी सिवी पाठवाल, मित्रांना फोन करून वेकन्सी असेल तर कळवायला सांगाल आणि सगळं झालं की बाटली उघडाल! यू विल स्टार्ट सेलिब्रेशन.

मी तुम्हाला मनाच्या कोलाहलातून बाहेर यायचा मार्ग सांगतोय. एकदा भ्रमाराची रुणझूण थांबली, तुम्ही शांत झालात की प्रसंग कसा हाताळायचा ते तुमचं कौशल्य आहे.

सोत्रि's picture

30 Jun 2013 - 5:08 pm | सोत्रि

परफेक्ट, अ‍ॅक्चुअली मी जेव्हा तो प्रश्न टाकला तेव्हा पुढे जास्त विचार नव्हता केला. नंतर जेव्हा बाकीची ह्या धाग्यावरची गंमत वाचत होतो तेव्हा त्या माझ्या प्रश्नावर विचार केला आणि ह्याच अनुमानाशी पोहोचलो होतो. कारण ती फटाक्यांची माळ 'भमराची रुणझुण' होती जि निरर्थक आणि व्यर्थ आहे.

- (भ्रमर) सोकाजी

सगळा प्रयास इतकी साधी गोष्ट समजावण्याचा होता पण पब्लिकनं चर्चा कुठल्या कुठे नेली! काही हरकत नाही, त्यामुळे इतर अनेक गैरसमजांवर लिहीता आलं.

स्पा's picture

15 Jun 2013 - 1:57 pm | स्पा

संजय क्षीरसागर

बस नाम हि काफी हे ;)

रंजक लेखमाला
वाचतोय

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jun 2013 - 10:26 pm | अत्रुप्त आत्मा

@रंजक लेखमाला
वाचतोय >>> अतिशय भाव'पूर्ण प्रतिसाद!

तर्री's picture

15 Jun 2013 - 7:26 pm | तर्री

पु.भा.प्र.

संजय क्षीरसागर's picture

15 Jun 2013 - 8:16 pm | संजय क्षीरसागर

सर्व लेखात मन हाच विषय असला तरी त्याचे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला जाईल. तस्मात पुढचा लेख घेण्याआधी `बॅक-ट्रॅक' या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेचा व्यक्तिगत अनुभव (ज्यांना याविषयात रस आहे) त्यांनी घेतल्या शिवाय तादात्म्य, व्यक्तिमत्त्व किंवा भावनिक विश्व या मनाच्या गहन पैलूंवर लिहीणं सदस्यांना उपयोगी ठरणार नाही. नुसती चर्चा होणं यापेक्षा जीवनात बदल घडणं असा उद्देश आहे.

प्यारे१'s picture

15 Jun 2013 - 7:29 pm | प्यारे१

ऑ?

हे ओशोंचे विचार आहेत की आपले ?

आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे.

बापरे ! म्हणजे अर्थपूर्ण आणि सफल साधना कोणती ते तुम्हालाच फक्त माहिती आहे ?
आदर वाढला आहे...

संजय क्षीरसागर's picture

15 Jun 2013 - 10:55 pm | संजय क्षीरसागर

माझे विचार आहेत.

म्हणजे अर्थपूर्ण आणि सफल साधना कोणती ते तुम्हालाच फक्त माहिती आहे ?

तुम्ही `मनाचं तटस्थ अवलोकन' ही साधना केली आहे का? केली असेल तर तुमचा अनुभव काय आहे?

या लेखात लिहीलेल्या प्रक्रियेचा तुम्ही अनुभव घेतला का? ते इतक्या चटकन होणरं काम नाही. पण प्रक्रिया यशस्वी होता क्षणी तुम्हाला अनुभव येईल. तुमचा प्रतिसाद वेगळा असेल

शिल्पा ब's picture

15 Jun 2013 - 10:58 pm | शिल्पा ब

जर तुम्ही इतके साधक आहात तर तुम्हाला आमच्या फुटकळ कॉमेंटने एवढा राग का अन कसा बरं येतो?
असो. पुढचे लेखसुद्धा वाचुच.

'मनाचे तटस्थ अवलोकन' ही साधना मी सिद्ध समाधी योग यात प्रथम अनुभवली आणि अद्यापि करते. माझ्या माहितीप्रमाणे अन अल्प अनुभवावरून, हे अवलोकन, मन आणि त्याचे चाळे यापासून निवृत्ती मिळण्यासाठी करावे लागते. म्हणजे मनाच्या व्यवहारांपासून संपूर्ण अलिप्तता साधण्यासाठी. मग,

मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’

हे कसे ? जर मानसिक प्रक्रियेच्या आकलनामध्ये चित्त व्यग्र राहिले तर मनाच्या व्यवहारांपासून मुक्ती कशी मिळणार ?
मनाच्या अभिव्यक्तींपासून संपूर्णतया अलिप्त असणारे 'Absolute' असे स्वत्व, त्याची जाणिव मनाच्या माध्यमातून होऊ शकत नाही. तेव्हा मनाचे आकलन होण्याचा उद्देश काय ?

मनाच्या व्यवहारांपासून मुक्ती कशी मिळणार ?

मनाच्या प्रक्रियेला जाणणारा, मनाशी तादात्म्य पावत नसल्यानं कायम मुक्तच असतो.

मनाच्या अभिव्यक्तींपासून संपूर्णतया अलिप्त असणारे 'Absolute' असे स्वत्व, त्याची जाणिव मनाच्या माध्यमातून होऊ शकत नाही. तेव्हा मनाचे आकलन होण्याचा उद्देश काय ?

मुळ फंडा असा आहे की आपण मनापेक्षा वेगळे आहोत. मनामुळे (किंवा सतत चालू असलेल्या विचार प्रवाहामुळे) आपल्याला समोरचा निराकार दिसत नाही किंवा शांतता ऐकू येत नाही. बॅकट्रॅक ही प्रक्रिया तुम्हाला प्राथमिक ठेवून मनाला दुय्यम करते आणि मनाची प्रक्रिया उलगडवते.

एकदा निराकार दिसला आणि शांतता ऐकू आली की आपण 'निराकार शांतता आहोत' हा बोध होणं क्रमप्राप्त आहे, आणि त्याला सिद्धत्व म्हटलंय.

पैसा's picture

15 Jun 2013 - 10:56 pm | पैसा

दमदार सुरुवात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

त्यात दोन भिन्न सुर जाणवले.
१) ज्याप्रमाणे शरीर कष्ट करुन थकते व आराम कर्न शांत होते तद्वत मन विचार करुन थकते व निर्वीचार होऊन शांत होते. तस्मात निर्विचार अवस्थेला जाणे व ती शांती अनुभवणे हे मनाचे काम आहे.
२) मनाला निर्वीचार अवस्थेला नेणे व शांती अनुभवणे हे एका "नॉन मन" घटकाचं काम आहे.

काहिही का असेना... जर मानसीक गोंधळ कमि होऊन काहि आरोग्य लाभ होणार असेल (तसा तो होतोच) तर इट्स वर्थ ट्राईंग.

अर्धवटराव

अर्धवटराव's picture

16 Jun 2013 - 12:44 am | अर्धवटराव

विचारांना तटस्थपणे बघण्याची प्रक्रिया आणि विचारांना बॅकट्रॅक करत मूळ संवदेनेला जायची प्रक्रिया, या दोहोंत फंडामेण्टल फरक काय आहे ? दोन्हि प्रक्रिया अल्टीमेटली "हा विचार, आणि हा विचार करणारा" असा हा सूर्य - हा जयद्रथ टाईपचा परिणाम करतात (म्हणजे... या प्रक्रियांचा अभ्यास करणारे तसा दावा करतात...)

अर्धवटराव

>मनोगत वर हिच चर्चा चालली आहे काय?
= हा लेख प्रथम इथेच प्रकाशित करणार होतो पण संकेतस्थळ बंद असल्यानं तिथे केला.

मी जरी सर्वांना उत्तरं देत असलो तरी तुम्ही तुमचाच प्रश्न विचारावा कारण विषय अत्यंत व्यक्तिगत आहे आणि प्रत्येक विचारणारा वेगळ्या संदर्भातून विचारत असतो...तरीही या प्रश्नाला उत्तर देतो

>त्यात दोन भिन्न सुर जाणवले.
१) ज्याप्रमाणे शरीर कष्ट करुन थकते व आराम कर्न शांत होते तद्वत मन विचार करुन थकते व निर्वीचार होऊन शांत होते. तस्मात निर्विचार अवस्थेला जाणे व ती शांती अनुभवणे हे मनाचे काम आहे.

= मन आणि शांती हे दोन सर्वस्वी भिन्न घटक आहेत. मन म्हणजे ध्वनी आणि मनरहित (किंवा विचाररहित) अवस्था म्हणजे शांती. ते मनाचं काम नाही.

२) मनाला निर्वीचार अवस्थेला नेणे व शांती अनुभवणे हे एका "नॉन मन" घटकाचं काम आहे.

= मन अनिवार्य नाही. ते सतत अनिर्बंधपणे चालू असणं हे मानवी अस्वास्थ्याचं मूळ कारण आहे. मनाची (किंवा वैचारिक) प्रक्रिया ऐच्छिक करणं हे आपलं काम आहे. आपण तो ‘नो माइंड’ फॅक्टर आहोत. आपण ती शांतता आहोत.

>काहिही का असेना... जर मानसीक गोंधळ कमि होऊन काहि आरोग्य लाभ होणार असेल (तसा तो होतोच) तर इट्स वर्थ ट्राईंग.

= प्लीज ट्राय, अ‍ॅंड लेट मी नो.

>विचारांना तटस्थपणे बघण्याची प्रक्रिया आणि विचारांना बॅकट्रॅक करत मूळ संवदेनेला जायची प्रक्रिया, या दोहोंत फंडामेण्टल फरक काय आहे ? दोन्हि प्रक्रिया अल्टीमेटली "हा विचार, आणि हा विचार करणारा" असा हा सूर्य - हा जयद्रथ टाईपचा परिणाम करतात (म्हणजे... या प्रक्रियांचा अभ्यास करणारे तसा दावा करतात...)

= विचारांचं (किंवा मनाचं) तटस्थ अवलोकन करतांना आपण पॅसिव असतो आणि प्रक्रिया बघण्याच्या नादात सुरूवात कुठून आणि कशी झाली हेच विसरतो त्यामुळे मनाच्या आवर्तनात्मक प्रक्रियेचा उलगडा होत नाही.

बॅक-ट्रॅक करत मूळ संवदेनेला जायची प्रक्रिया तुम्हाला प्राथमिक आणि मनाला दुय्यम करते. इंटरेस्ट घेऊन ती केली तर विचार प्रक्रियेचा उलगडा होतो. मजा वाटते, एखादा लगाम गवसावा तसा कॉन्फिडन्स येतो.

हा ऐच्छीकपणा कोणाचा ? मला वाटतं कि इच्छा, आकांक्षा, राग-लोभ, सुख-दु:ख... या तर सर्व मनाच्या भानगडी आहेत. मग इथे कुणाच्या इच्छेबद्दल हि कमेण्ट आहे ?

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2013 - 9:30 am | संजय क्षीरसागर

आपला!

मला वाटतं कि इच्छा, आकांक्षा, राग-लोभ, सुख-दु:ख... या तर सर्व मनाच्या भानगडी आहेत.

अर्थात, पण त्यात आपण सापडलेलो नाही काय? त्या सर्व भानगडी मनाच्या परीघात घडत असतांना मनाची प्रक्रिया जाणणं महत्त्वाचं ठरत नाही काय? मग ओशो म्हणतात तसं `मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है !' सार्थ वाटत नाही का? ....आणि तेच तर या लेखनाचं प्रयोजन आहे.

अर्धवटराव's picture

19 Jun 2013 - 6:42 pm | अर्धवटराव

म्हणजे ज्याप्रमाणे मनात इच्छा उत्पन्न होतात तशा "आपल्यात"ही उत्पन्न होतात ? हे कॉण्ट्रॅडीक्टरी वाटतय... म्हणजे कसं, कि जर इच्छा हा मनाचा प्रांत आहे तर मनाशिवाय "आपल्यात" इच्छा उत्पन्न होईलच कशी? मनाची इच्छा एक आणि आपली दुसरीच काहितरी असं होतं काय? घासकडवींच्या प्रतिक्रियेत तुम्ही म्हटलं आहे कि "दुसरं मन" असं काहि नसतं... मग "आपल्या" इच्छेचा स्त्रोत काय?

>>अर्थात, पण त्यात आपण सापडलेलो नाही काय? त्या सर्व भानगडी मनाच्या परीघात घडत असतांना मनाची प्रक्रिया जाणणं महत्त्वाचं ठरत नाही काय?
-- ते कसं शक्य आहे? जर "आपल्यात" इच्छा उत्पन्न होतात तर मनाची दखल घ्यायची काय गरज ? "आपली इच्छा" जर मनात गुंतुन पडायची असेल तर आपण मनाची प्रक्रिया शोधण्यापेक्षा आपल्या इच्छेची प्रक्रिया शोधावी...
विंचवाच्या नांगीवर पाय देण्याची इच्छा होणे हि समस्या विंचवाच्या नांगीत विष तयार कसं होतं जे जाणुन कशी सुटेल ?

>> मग ओशो म्हणतात तसं `मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है !' सार्थ वाटत नाही का?
-- मनात गुंतुन पडणे हा जर "आपला" ऐच्छीक विषय आहे तर "मनापासुन मुक्ती" ला काहि आधारच राहात नाहि. कारण मग "आपली इच्छा" परिक्षा नळीत घ्यायला हवी. त्या इच्छेपासुन मुक्ती मिळाली कि झालं काम.

ओशो, मुक्ती, प्रक्रिया, बॅक ट्रेस वगैरे गोष्टी थोड्या बाजुला ठेऊया. सर्वप्रथम "इच्छा" या एका विषयाचा निकाल लावु या. अदरवाईज तुम्ही नेमकं काय सांगताय हे आम्हाला कळणार नाहि आणि आमचे प्रश्न तुम्हाला कळणार नाहित.
१) इच्छा कुणाचा प्रांत आहे? मनाचा, कि "आपला" ?
२) मनाची इच्छा आणि आपली इच्छा अशा दोन वेगवेगळ्या स्वतंत्र यंत्रणा आहेत काय? असल्यास "मनसे मुक्ती" ची काहि गरजच उरत नाहि
३) इच्छेचा स्त्रोत आणि वर्क एरीया जर केवळ मन असेल तर "आपला ऐच्छीकपणा" काय भानगड आहे?
४) इच्छेचा स्त्रोत आणि वर्क एरीया जर केवळ "आपण" असु तर तुम्ही वर जे स्टेटमेण्ट दिलय "सर्व भानगडी मनाच्या परीघात घडत असतांना..." याचा नेमका अर्थ काय?

अर्धवटराव

म्हणजे ज्याप्रमाणे मनात इच्छा उत्पन्न होतात तशा "आपल्यात"ही उत्पन्न होतात ?

इच्छा मनात उत्पन्न होतात, मन शरीरात आहे आणि आपलं शरीर आणि मनाशी इतकं तादात्म्य आहे की आपल्याला वाटतं `मला इच्छा झाली'.

आपण मनाची प्रक्रिया शोधण्यापेक्षा आपल्या इच्छेची प्रक्रिया शोधावी...

इच्छा मनात उत्पन्न होतात, त्यामुळे मनाचा उलगडा इच्छेचा उलगडा करतो. इच्छा म्हणजे प्रभावी झालेला विचार.

(२) मनाची इच्छा आणि आपली इच्छा अशा दोन वेगवेगळ्या स्वतंत्र यंत्रणा आहेत काय?

अर्थात! इच्छा हा प्रभावी झालेला विचार असला तरी त्यावर कृती करणं आपल्या हातात आहे.

मानसिक प्रक्रियेचा वेध जर आपण `विचार' या प्राथमिक स्टेजला म्हणजे संवेदना या उगमापाशीच घेतला तर इच्छा मनाच्या कह्यात राहणार नाही. आपण स्वेच्छेनं जगायला लागू. त्यालाच तर मी स्वच्छंद जगणं म्हणतोय आणि ओशो `मनसे मुक्ती' म्हणतायत.

(३) आपला ऐच्छीकपणा" काय भानगड आहे?

आपण काय करायचं ते ठरवतो आणि मनाला ते करण्यासाठी फॅकल्टी म्हणून वापरतो. आपण प्राथमिक आणि मन दुय्यम होतं.

(४) इच्छेचा स्त्रोत आणि वर्क एरीया जर केवळ "आपण" असु....

याचं उत्तर वर दिलंय

जे.जे.'s picture

20 Jun 2013 - 12:44 am | जे.जे.

"इच्छा म्हणजे प्रभावी झालेला विचार."

प्रभावी न झालेल्या विचाराला काय म्ह्णतात?

आणि मनात कि (मेन्दुत?) प्रभावी झालेले सर्व विचार नेहेमीच इच्छा असतात का?

विचार!

मनात कि (मेन्दुत?) प्रभावी झालेले सर्व विचार नेहेमीच इच्छा असतात का?

नाही. त्या विचारानं आपलं समग्र लक्ष वेधून घेतलं की त्याचं रूपांतर इच्छेत होतं.

प्यारे१'s picture

20 Jun 2013 - 12:51 am | प्यारे१

जरा बोलू का अर्धवटराव? ;)

अध्यात्माच्या प्रांतात अंतःकरण हे इंद्रिय म्हणून गणलं गेलं आहे. ते दिसत नाही पण कार्य करतं नि कार्य करताना त्या त्या कार्याच्या स्वरुपावरुन त्याला मन, बुद्धी, चित्त अशी नावं दिली गेली आहेत.

संकल्पविकल्पात्मक - हे करु की ते करु अशी अंतःकरणाची अवस्था म्हणजे मन.
वरच्या हे किंवा ते चा निश्चय करणारी ती बुद्धी
नि त्या निर्णयाला अवधारण करणारे ते चित्त.

चहा घ्यावा की नको म्हणणारं मन, चहा घेऊ म्हणून निर्णय घेणारी बुद्धी, चहाचा तो समोर येऊन पिण्यापर्यंतच्या प्रवासात चहाचा विचार धरुन ठेवणारं चित्त.

मन, मन१, मन२, मनोबा असे बरेच आयडी झाले की घोळ होतो म्हणून सांगितलं आपलं.

हे सरांसाठी नाही. बाकी आम्चा मनोबा गेलाय कुठं रे????

अर्धवटराव's picture

20 Jun 2013 - 8:42 am | अर्धवटराव

>>चहा घ्यावा की नको म्हणणारं मन, चहा घेऊ म्हणून निर्णय घेणारी बुद्धी, चहाचा तो समोर येऊन पिण्यापर्यंतच्या प्रवासात चहाचा विचार धरुन ठेवणारं चित्त.
-- अशा वेळी "मी" मन, बुद्धी, चित्त वगैरेंना फाट्यावर मारुन छान बिअर घेतो ;) आयला नकोच त्या भानगडी :)

ऑन सिरियस नोट्स, अंतःकरणाच्या अवस्थांचं हे वर्गीकरण त्या त्या अवस्थांना समजुन घ्यायला उपयोगी आहे.

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2013 - 9:59 am | संजय क्षीरसागर

कार्याच्या स्वरुपावरुन त्याला मन, बुद्धी, चित्त अशी नावं दिली गेली आहेत

= मनाचं आकलन नसताना तुम्ही वेगवेगळ्या कल्पना मांडून निष्कारण गोंधळ घालतायं. तुमच्याकडे निव्वळ माहिती आहे, अनुभव नाही हे तुमचे (प्रदीर्घ) प्रतिसाद (वेळोवेळी) स्पष्टपणे दाखवतात. इथे ही तुम्ही सुरूवातीला दोन `नो बॉल' टाकून पाहिलेत आणि आता हा प्रतिसाद!

चहा घ्यावा की नको म्हणणारं मन, चहा घेऊ म्हणून निर्णय घेणारी बुद्धी, चहाचा तो समोर येऊन पिण्यापर्यंतच्या प्रवासात चहाचा विचार धरुन ठेवणारं चित्त.

चहा घ्यावा हे आपण ठरवतो, उत्तमात उत्तम चहा, प्राप्त परिस्थितीत कुठे मिळेल हे ठरवायला मनाचा उपयोग करतो आणि शरीर त्या बरहुकुम कृती करतं. निर्णय खुद्द आपण घेतलेला असल्यानं संभ्रमाचा प्रश्न येत नाही आणि तो धारण करण्याचा तर त्याहून नाही कारण ती सर्व प्रक्रिया आनंददायी असते.

प्यारे१'s picture

20 Jun 2013 - 1:31 pm | प्यारे१

सर, बस्स का? आम्हाला थोडं ज्ञान होऊ द्या की हो! आमच्याकडं माहिती आहे. तिचा वापर करुन ज्ञान नाही होणार मान्यच आहे.
नोबॉल बद्दल बोलायचं तर आम्हाला शारजाह्चा अनुभव असल्यानं आम्ही 'आता' खेळतच नाही.
११ प्लेअर्स + २ अंपायर + सगळं पब्लिक आपल्या विरुद्ध. खेळून उपयोग काय? शारजाह म्हणजे हारजा. सिंपल.
पायाला बॉल लागला तर एल्बी, बॅटला लागला तर कॅच आऊट. बॉल नो असो नाहीतर नसो, अंपायर नं दिला ना? मग नो!
काही बॅट्स्मन तर बॅट माझी आहे मी मला वाटेल तोवर खेळणार म्हणतात. आम्ही पण चेंडू टाकत राहतो मग!
>>>>कारण ती सर्व प्रक्रिया आनंददायी असते. ;)

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2013 - 2:28 pm | संजय क्षीरसागर

त्याचं कसं आहे, पुस्तकं भरपूर वाचलीत पण स्वतःकडे बॅट नाही. त्यातनं बॉलही उसनवारीत आणलेला. मग दुसरा खेळतोय म्हटल्यावर फेकून बघायचे दोन-चार `नो बॉल'. अर्थात त्यावर कुणी आऊट होत नाहीच म्हणा. पण एकदा फुकटात आत सोडलंय म्हटल्यावर किमान हुल्लडबाजी करायला काय हरकत आहे? भेटले आपल्यासारखे अ‍ॅसिडिटीचा त्रास असणारे तीन-चार तर तेवढाच रिलीफ!

कारण ती सर्व प्रक्रिया आनंददायी असते.

कुणाला कशात आनंद तर कुणाला कशात, कसं?

प्यारे१'s picture

20 Jun 2013 - 2:48 pm | प्यारे१

खिक्क्क! :)

आता काय म्हणावे या बेशरमपणाला?

इथे जनसामान्यांचं भलं व्हावं म्हणून मनासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या विषयावर संजय क्षीरसागर यांच्यासारखी नम्र आणि ऋजू स्वभावाची या क्षेत्रातील अतिशय अधिकारी व्यक्ती कळकळीने लिहित असताना तुम्ही उगाचच आपले पुस्तकी ज्ञान पाजळताय आणि वरुन दातही काढताय.

मोदक's picture

21 Jun 2013 - 12:38 am | मोदक

खिक्क्क! :D

प्यारे१'s picture

21 Jun 2013 - 2:19 am | प्यारे१

सॉरी शक्तिमान!

>>> बे-शरमपणा
आम्ही दुप्पट शरमलो आहोत. ;)

>>> वरुन दातही काढताय.
आमच्या स्मायलीचा एक दात तरी दिसला का हो? आम्ही एक वेळ असू तुमच्यासाठी बेशरम पण आमच्या स्मायल्या मर्यादशील असतात सांगून ठेवतो. ;)

असो. आम्ही संजय सरांची तहे दिलसे मुआफी मांगतो. पण ह्या धाग्यावर हुल्लडबाजी करायला त्यांनी आम्हाला जी मोकळीक दिली त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभारी आहोत. धन्यवाद.

ह्या धाग्यावर हुल्लडबाजी करायला

ह्या ह्या हया... गजा खोत आठवला. :-D

प्यारे१'s picture

21 Jun 2013 - 2:37 am | प्यारे१

ये मै नही कहता, उन्होने ही कहा हय. उप्परीच. ;)

ह्या धाग्यावर आम्ही कटाप!
(च्यायला, लोकं म्हणणार मी असताना तुम्हाला विचारतो कोण? ;) )

अर्धवटराव's picture

20 Jun 2013 - 7:37 am | अर्धवटराव

>> इच्छा हा प्रभावी झालेला विचार असला तरी त्यावर कृती करणं आपल्या हातात आहे.
-- हे कृती करणं कृती करण्याच्या इच्छेशिवाय कसं शक्य आहे? किंवा कृती करण्याच्या निर्णयाशिवाय कसं शक्य आहे? कृती करण्याची इच्छा/निर्णय घेणे हे मनाचं काम आहे. इथे "आपण" फॅक्टर कुठुन आला?

>>इच्छा मनाच्या कह्यात राहणार नाही. आपण स्वेच्छेनं जगायला लागू. त्यालाच तर मी स्वच्छंद जगणं म्हणतोय आणि ओशो `मनसे मुक्ती' म्हणतायत.
-- इच्छेचे उगमस्थानच जर मन आहे तर त्या मनाच्या कह्यात कशा राहणार नाहित. स्वेच्छेने जगायचं म्हणाल, तर इच्छेचे बिलाँगींग मनापाशी आहे. "स्वेच्छा"->स्वतःची इच्छा. इथे हा स्वतः म्हणजे मनच. मनातलं द्वंद्व संपून मन एकाग्रतेने संवेदनेला रिस्पॉन्स देत राहाणं म्हणजे स्वेच्छेने जगणं. सगळा मनाचाच कारभार.

>>आपण काय करायचं ते ठरवतो आणि मनाला ते करण्यासाठी फॅकल्टी म्हणून वापरतो. आपण प्राथमिक आणि मन दुय्यम होतं.
-- काय करायचं ते "ठरवणं" हि मनाची प्रॉपर्टी आहे. त्याकरता ते ऑप्शनली बुद्धीची/विवेकाची मदत घेईल. पण अल्टीमेटली ते काम मनाचच.

तुम्ही संवेदनेला जागणारे ते "आपण" आणि विचारांना जागणारे ते "मन" अशी जी विभागणी करताय ति चुकीची आहे (असं मला वाटतं). संवेदनेला (विचारांच्या मुळाला) आणि विचारांना (संवेदनेच्या वृक्षाला) थारा देणारं, उत्तर देणारं मनच आहे. तिथे वेगळा "आपण" अ‍ॅज सच कुणी नाहि.

अर्धवटराव

कृती करण्याची इच्छा/निर्णय घेणे हे मनाचं काम आहे. इथे "आपण" फॅक्टर कुठुन आला?

आजपर्यंत मनच इच्छा/निर्णय घेणं ही कामं करतंय आणि आपण असहाय्यपणे त्यात ओढले जातोय. इतके की आपल्याला स्वतःची इच्छा आणि निर्णय घेण्याची क्षमता आहे हे उमजलेलंच नाही.

इच्छेचे उगमस्थानच जर मन आहे......

तुमची पुन्हापुन्हा तीच चूक होतेय (आणि इतक्या वर्षांच्या धारणांमुळे ते स्वाभाविक आहे) . तुम्ही इच्छेची भाषा करताय, मी स्वेच्छेचा मार्ग सांगतोय. इच्छा म्हणजे मनात स्वयेच निर्माण होऊन प्रभावी झालेला विचार, तो स्मृतीशी निगडित असतो. स्वेच्छा म्हणजे आपण संपूर्णपणे वर्तमानात असतांना झालेली अंतःप्रेरणा. ही अंतःप्रेरणा प्रथम आपल्याला सुखावते आणि मग मनाचा उपयोग करून आपण ती प्रत्यक्षात आणतो. अशा कृत्यात नेहमी आनंद असतो आणि त्यावर फेरविचार करण्याची गरज भासत नाही.

मी इथे कितीही लिहीलं तरी हा नुसत्या चर्चेचा विषय नाही. स्वेच्छेनं जगणं हा व्यक्तिगत अनुभव आहे (आणि हे स्वानुभवानं लिहीतोय). तुम्ही एकदम पुढच्या पायरीला जाऊ शकणार नाही. प्रथम मनाच्या प्रक्रियेचं आकलन झालं पाहिजे.

..... "आपण" अ‍ॅज सच कुणी नाहि.

प्रतिसादात पुढेपुढे तुम्ही स्वतःला संपूर्ण नाकारताय, ते स्व-विस्मरण गहन झाल्याचं निदर्शक आहे.

राजेश घासकडवी's picture

16 Jun 2013 - 4:01 am | राजेश घासकडवी

मन म्हणजे बायोकॉंप्युटर आणि तो चालवणारे आपण हे क्रांतीकारी विचार वाचून थक्क झालो. पण तो थक्कपणा मला आला की माझ्या मनाला आला हे लक्षात आलं नाही. मला वाटतं मन म्हणजे हार्ड ड्राइव्ह आणि मी म्हणजे सीपीयू बहुतेक. आणि मिपा म्हणजे बहुतेक प्रिंटर. आणि... पण... आजकाल सीपीयूमध्येदेखील मेमरी असते. म्हणजे हे मन बघणाऱ्या मला देखील एक छोटंसं वेगळं मन आहे बहुतेक. कारण नाहीतर विचार सुरू झाले, संपले वगैरे गोष्टी ओळखण्यासाठी कुठेतरी काहीतरी स्टोअर करायला पाहिजेच...

लेखमालेच्या पुढच्या लेखांत हा सगळा गोंधळ निघून जाऊन स्वच्छ चित्र तयार होईल अशी आशा वाटते आहे.

संजय क्षीरसागर's picture

16 Jun 2013 - 1:42 pm | संजय क्षीरसागर

>मन म्हणजे बायोकॉंप्युटर आणि तो चालवणारे आपण हे क्रांतीकारी विचार वाचून थक्क झालो. पण तो थक्कपणा मला आला की माझ्या मनाला आला हे लक्षात आलं नाही.

= तुम्ही थक्क झालात. पण हे स्व-स्मरण अल्पकालीन असतं. लगेच मन सक्रिय होऊन पुढचे प्रश्न निर्माण करतं; कसे ते पाहा :

>मला वाटतं मन म्हणजे हार्ड ड्राइव्ह आणि मी म्हणजे सीपीयू बहुतेक. आणि मिपा म्हणजे बहुतेक प्रिंटर. आणि... पण... आजकाल सीपीयूमध्येदेखील मेमरी असते. म्हणजे हे मन बघणार्‍या मला देखील एक छोटंसं वेगळं मन आहे बहुतेक.

= जसं शरीर प्रत्येकी एकच आहे तसं मन प्रत्येकी एकच आहे त्यात ‘छोटंसं वेगळं मन’ असं काही नाही

> कारण नाहीतर विचार सुरू झाले, संपले वगैरे गोष्टी ओळखण्यासाठी कुठेतरी काहीतरी स्टोअर करायला पाहिजेच...

= विचार सुरू झाले आणि संपले हे ओळखणारे तर आपण आहोत. त्यासाठी पुन्हा वेगळी सिस्टम नाही.

>लेखमालेच्या पुढच्या लेखांत हा सगळा गोंधळ निघून जाऊन स्वच्छ चित्र तयार होईल अशी आशा वाटते आहे.

= गोंधळ जिथल्या तिथे निस्तरला तर बरं. माझ्या बाजूनं सगळं चित्र स्वच्छ आहे आणि जिथले प्रतिसाद मी तिथेच क्लिअर करत जाईन. ‘लेफ्ट ओवर’ पुन्हा नवी मानसिक प्रश्नावली सक्रिय करतो.

-- मी म्हणजे इलेक्ट्रिसीटी बहुतेक :)

संजय क्षीरसागर's picture

16 Jun 2013 - 9:42 pm | संजय क्षीरसागर

पण तो उलगडा मनाच्या प्रक्रियेचा समग्र उलगडा झाल्याशिवाय होत नाही (सडन एन्लायटन्मेंट हा त्याला अपवाद आहे- उदा. एकहार्ट- पण अपवादात्मक केसेसचा आपण सध्या उहापोह करणार नाही)

उन्मेष दिक्षीत's picture

20 Jun 2013 - 4:34 pm | उन्मेष दिक्षीत

= संगणक,सीपीयु,प्रोग्रॅमर वगैरे चालु होतं , त्या काँटेक्स्ट मधे "मी म्हणजे इलेक्ट्रीसिटी" म्हणालो.

संजय क्षीरसागर's picture

16 Jun 2013 - 2:32 pm | संजय क्षीरसागर

बहिणाबाईंच्या काव्यप्रतिभेविषयी लिहीण्याचा इरादा नाही. ती निर्विवाद आहे.

त्यांच्या या कवितेनं मराठी माणसाला कैक वर्ष भुरळ घातली आहे, म्हणून मनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्की कसा असावा ते उलगडण्याचा प्रयत्न करतो:

>मन वढाय वढाय
उभया पिकाताल ढोर
किती हाकल हाकलं
फ़िरि येत पिकावर

= मनाची प्रक्रिया अनैच्छिक आहे ही माणसाची युगानुयुगं, अत्यंत चुकीची मूलभूत धारणा आहे. निव्वळ या धारणेमुळे मनाचा आवाका बेफाम वाटतो. वस्तुस्थिती तशी नाही. मी पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ‘माइंड इज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्टिविटी बिटवीन टू इअर्स’

मन पाखर पाखर
तयाची काय सांगू मात
आता वहत भुइवर
गेल गेल आभायात

= मन कुठेही जात नाही ते फक्त विचार निर्माण करतं. त्या विचारांबरोबर वाहात गेल्यानं आपण आभाळात आणि भुईवर गेल्यासारखे वाटतो. आपण बसल्या जागीच असतो!

मन लहरी लहरी
त्य़ाले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

= मन वार्‍यासारखं वाहात नाही, विचारांचा अवेग जोरकस असू शकतो. अर्थात ज्या क्षणी आपल्या स्थिरत्त्वाचं भान येतं (किंवा आपण बसलो आहोत हे लक्षात येतं) त्या क्षणी मन निष्प्रभ होतं.

मन जहरी जहरी
याच नयार रे तनतर
आरे इचू साप बरा
त्य़ाले उतारे मनतर

= हा दुसरा अत्यंत गंभीर गैरसमज आहे. मन न्यूट्रल आहे. इट इज अ फॅसिलिटी अ‍ॅंड अ फॅकल्टी. आपल्याला ती वापरता आली तर जगण्याची मजा काही और आहे.

मन एवहड एवहड
जस खसखसच दान
मन केवढ के वढ
आभायतिब मावेन

= पहिला विचार (किंवा कोणताही विचार) सूक्ष्मच असतो. एकदा विचार प्रवाहासारखे सलग झाले की आपण त्यात हरवतो आणि मग मन व्यापक आहे असं वाटायला लागतं.

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

= मन हा निसर्गानं मनुष्याला बहाल केलेला अनमोल नजराणा आहे. बहिणाबाईंच्या काव्यप्रतिभेला दाद देतो पण मन म्हणजे देवाला पडलेलं स्वप्न नाही.... देव हा मनाला झालेला भ्रम आहे.

अर्धवटराव's picture

20 Jun 2013 - 9:13 am | अर्धवटराव

= मनाची प्रक्रिया अनैच्छिक आहे ही माणसाची युगानुयुगं, अत्यंत चुकीची मूलभूत धारणा आहे. निव्वळ या धारणेमुळे मनाचा आवाका बेफाम वाटतो. वस्तुस्थिती तशी नाही. मी पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ‘माइंड इज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्टिविटी बिटवीन टू इअर्स’
-- प्रक्रिया अनैच्छीक नसली तरी तिला कंट्रोल करावं कि नाहि हा ऐच्छीक भागच आहे... व तो मनाचाच निर्णय आहे. बहिणाबाईंनी मनाचा हा आवाका समजुन हे कडवं रचलं.

>>= मन कुठेही जात नाही ते फक्त विचार निर्माण करतं. त्या विचारांबरोबर वाहात गेल्यानं आपण आभाळात आणि भुईवर गेल्यासारखे वाटतो. आपण बसल्या जागीच असतो!
-- बहिणाबाईंना मन एखाद्या पतंगाप्रमाणे मटेरीअली आभाळात जाते असं कुठेच म्हणायचं नाहि. त्यांना केवळ विचारांचं फ्लक्च्युएशन किती प्रचंड असतं हेच सांगायचं आहे या कडव्यातुन.

>>= मन वार्‍यासारखं वाहात नाही, विचारांचा अवेग जोरकस असू शकतो. अर्थात ज्या क्षणी आपल्या स्थिरत्त्वाचं भान येतं (किंवा आपण बसलो आहोत हे लक्षात येतं) त्या क्षणी मन निष्प्रभ होतं.
-- वरच्या प्रमाणेच.

= हा दुसरा अत्यंत गंभीर गैरसमज आहे. मन न्यूट्रल आहे. इट इज अ फॅसिलिटी अ‍ॅंड अ फॅकल्टी. आपल्याला ती वापरता आली तर जगण्याची मजा काही और आहे.
-- विष देखील केवळ एक रसायन आहे. पण ते माणसाच्या शरीरात गेलं कि शरीराची तडफड होते. त्याचप्रमाणे मन शत्रुप्रमाणे समोर आलं तर जगण्याचे तीन तेरा वाजु शकतात. बहिणाबाई मनाचे मानवी जगण्यावर (जीवनावर नव्हे) काय परिणाम होऊ शकतात याचे अतिशय चपखल उदाहरण देताहेत.

>>= पहिला विचार (किंवा कोणताही विचार) सूक्ष्मच असतो. एकदा विचार प्रवाहासारखे सलग झाले की आपण त्यात हरवतो आणि मग मन व्यापक आहे असं वाटायला लागतं.
-- इथे बहिणाबाईंना सूक्ष्म विचाराचे व्यापक रुपांतर एव्हढा लहानसा अर्थ अपेक्षीत नाहि. तर या रूपांतराला त्याच्या प्रत्येक अवस्थेत सामाउन घेणारा, विचारांच्या व्यापकपणाचे पोषण करणारा व एकाचवेळी अनेक पदरी विचारांना लिलया सांभाळणारा असा मनाचा प्रचंड आवाका बहिणाबाईंना अपेक्षीत आहे.

>>= मन हा निसर्गानं मनुष्याला बहाल केलेला अनमोल नजराणा आहे. बहिणाबाईंच्या काव्यप्रतिभेला दाद देतो पण मन म्हणजे देवाला पडलेलं स्वप्न नाही.... देव हा मनाला झालेला भ्रम आहे.
-- बहिणाबाईंना "देव" म्हणजे नेमकं काय अपेक्षीत आहे हे जाणल्याबिगर त्यांच्या समजुतदारीवर, त्यांच्या एकंदर जीवनविषयक तत्वज्ञानावर भ्रमाचा आरोप करणे म्हणजे... असो.

अर्धवटराव

प्रक्रिया अनैच्छीक नसली तरी तिला कंट्रोल करावं कि नाहि हा ऐच्छीक भागच आहे... व तो मनाचाच निर्णय आहे.

बहिणाबाईंना वाटतंय मनाची प्रक्रिया अनैच्छिक आहे आणि म्हणून त्या ‘मन वढाय वढाय’ म्हणतायत. संपूर्ण कविता त्याच धारणेचा परिपोष आहे.

तुम्ही त्यांच्या एक स्टेप पुढे जाताय, तुम्हाला वाटतंय ती प्रक्रिया स्वाधिन करणं `मनाचं काम आहे'. तुम्ही पुन्हा स्वत:ला विसरतायं. मनाची प्रक्रिया ऐच्छिक करणं आपल्या मर्जीवर आहे आणि तेच संबंध लेखभर आणि सर्व प्रतिसादातून मी सांगतोय.

तुमची बेसिकच चूक होतेय त्यामुळे प्रतिसादातल्या उर्वरित भागावर बोलण्यात अर्थ नाही कारण तो त्याच चुकीचा फक्त विस्तारित भाग आहे.

अर्धवटराव's picture

20 Jun 2013 - 8:51 pm | अर्धवटराव

तुमचं प्रमेय बहुदा खालील प्रमाणे आहे:
संवेदना + विचार = मन
संवेदना + निर्वीचार = आपण.

माझं प्रमेय खालील प्रमाणे आहे:
संवेदना + विचार = मनाची एक अवस्था
संवेदना + निर्वीचार = मनाची दुसरी अवस्था

एकतर तुमचा मनाचा स्कोप फार लिमीटेड आहे किंवा माझा मनाचा स्कोप अवास्तव आहे. विचारांच्या आवर्तनत गुंतलेलं सुख-दु:ख भोगणारं मन आणि निर्वीचार अवस्थेतील शांती भोगणारं देखील मनच, हा माझा अनुभव... शांती आणि अशांती मधला भेद भोगणारा कुणी तरी एकच आहे... माझ्या मते ते मन आहे.

अर्धवटराव

अग्निकोल्हा's picture

16 Jun 2013 - 8:54 pm | अग्निकोल्हा

मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते.

म्हणजे ? हेलन केलर ला मन न्हवत का हो ?

अन मनाला जाणवणारे स्पर्शज्ञान वगैरे वगैरे वगैरे थोतांडच की ???

अग्निकोल्हा's picture

16 Jun 2013 - 9:33 pm | अग्निकोल्हा

भलेहि त्यावेळी इतर ऑडिओ विजुअल्स इनपुट असतिल वा नसतिल पण लाइफ'स फस्ट चेरि पॉपिंग सेन्शेशन, किंव्हा आज सकाळिच पावसात खाल्लेल्या कांदाभजिची जिभेवर चव रेंगळणे यात मनाच्या ऑड्योव्हिड्योमेमोरीचा संबधच नाहीये म्हणजे मन नष्ट झाले की काय ?

पाचही संवेदनांचा उल्लेख सुरूवातीलाच केला आहे :

श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद) मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे.

आपण नॉर्मल मनाचा उलगडा करून घेतो आहोत. तुम्ही अपवादात्मक केसेसमधे आणू नका.

हेलन केलर डेफ-ब्लाइंड होती आणि ती यश मिळवू शकली याचा अर्थ तीनं बाकीच्या तीन संवेदनांच्या मदतीनं तृटी भरून काढली. पण याचा अर्थ तिला मन नव्हतं असा नाही. मेंदू सर्व संवेदनांच्या रेकॉर्डींगचं काम करतो. तिला मेंदू नव्हता असं नाही.

जाणिव आपल्याला होते ती इंद्रियगम्य असते (पाच संवेदना) आणि मेंदूत त्याची साठवण केली जाते.

अग्निकोल्हा's picture

16 Jun 2013 - 9:41 pm | अग्निकोल्हा

मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते.

याच वाक्याला आहे. तो तुम्हाला विनाशंका मान्य असेल तर लेखातिल इतर चुकिच्या मुद्यांवरही विस्त्रूत चर्चा होइल. त्यातही अपवादात्मक केसेसकडे लक्ष द्यायची गरजच नाहिये. अगदी सामान्य उदाहरणेच लेखातिल त्रुटि स्पश्ट करतिल.

माणुस ज्या इंद्रियाचा वापर इतरांशी क्म्युनिकेशन करायला सगळ्यात जास्त वापरतो (नॉर्मल माणुस द्रुक श्राव्य माध्यम) त्याच्या संबधिच स्मृति सगळ्यात जास्त असतात. म्हणजे एखाद्याने आयुष्यभर ब्रेल लिपितुन शिक्षण घेतले असेल तर त्याची ९५% स्मृति ही स्पर्श ज्ञानाने व्यापलेली असणार. विजुअल्सने न्हवे. म्हणुनच ज्या इंद्रिय साधनाचा वापर जास्त त्या संबंधी स्मृति जास्त इतकच मला म्हणायच आहे. म्हणुनच माझा मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते (जवपास ९५%). या वाक्याला तिव्र आक्षेप आहे.

संजय क्षीरसागर's picture

16 Jun 2013 - 10:02 pm | संजय क्षीरसागर

माणुस ज्या इंद्रियाचा वापर इतरांशी क्म्युनिकेशन करायला सगळ्यात जास्त वापरतो (नॉर्मल माणुस द्रुक श्राव्य माध्यम) त्याच्या संबधिच स्मृति सगळ्यात जास्त असतात

आता तुम्ही नॉर्मलवर आलात!

असो. अनावश्यक फाटे फोडण्यापेक्षा आवरत घेतो.

लेखन नीट वाचलंत तर असा प्रसंग पुन्हा येणार नाही.

लेखन नीट वाचलंत तर असा प्रसंग पुन्हा येणार नाही.

अहो वाचलंच होतं म्हणून तर फाटे फोडत होतो. पण अचानक चर्चेची उर्मीच गेली बघा. वाटलं कशाला हा विक्षिप्त टाइमपास ? कारण फाटे फोडता फोडाता कंटाळा येउन एखादा अतिशय महत्वाचा व योग्य मुद्दा समजा अतिशय व्यवस्थित विरोधात सांगुनही गेलो तरी तो थोडाच तुमच्याकडुन मान्य केला जाणार आहे ? भेंडी, जो बुध्द जेके अन ओशों, एकाच लायनीत आउटस्मार्ट करतो तेच्या पुढं सालं आपन कोण बे बोलणारे ?

संजय क्षीरसागर's picture

17 Jun 2013 - 12:18 am | संजय क्षीरसागर

मुद्दा आहेच कुठे?

समजा अतिशय व्यवस्थित विरोधात सांगुनही गेलो तरी तो थोडाच तुमच्याकडुन मान्य केला जाणार आहे ?

तुम्हाला `विक्षिप्त टाइमपास' वाटला असला तरी मला नाही. मी सर्व उत्तरं प्रामाणिकपणे दिली आहेत

भेंडी, जो बुध्द जेके अन ओशों, एकाच लायनीत आउटस्मार्ट करतो तेच्या पुढं सालं आपन कोण बे बोलणारे ?

मी `मनाचं अवलोकन' या साधनेला त्या सर्वांच्या असणार्‍या दुजोर्‍याबद्दल लिहीलं आहे. या सर्वांचा समग्र आणि सखोल अभ्यास केल्याशिवाय तसं म्हटलेलं नाही. त्या सर्वांचे उत्तमोत्तम पैलू आज माझ्याकडे आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी असेन. त्यांना आउटस्मार्ट वगैरे करण्याचा विचारही मी करू शकत नाही. पण `अवलोकन' साधनेचा दोष मला माहिती आहे आणि सर्वांना उपयोगी व्हावी म्हणून एक नवी साधना सांगितलीये.

तुम्ही त्या प्रक्रियेचा काहीही संबंध न ठेवता : डायरेक्ट हेलन केलरला मन नव्हतं का? लेखनातल्या त्रुटी, इतर त्रुटींवर विस्तृत चर्चा, मन नष्ट झालं काय? वगैरे सुरू केल्यामुळे तुमच्या आकलनातल्या त्रुटी दाखवाव्या लागल्या.

राजेश घासकडवी's picture

17 Jun 2013 - 7:39 am | राजेश घासकडवी

तुमच्या आकलनातल्या त्रुटी दाखवाव्या लागल्या.

माझ्याही आकलनात अनेक त्रुटी आहेत बहुतेक. त्या दाखवून देण्यासाठी तुम्ही किती चार्ज करता? मिपावरती जाहीर चर्चा करण्याऐवजी मला प्रायव्हेट सेशन आवडेल, म्हणून विचारतो आहे. व्यनिने उत्तर दिलंत किंवा खरडवहीत कळवलं तरी चालेल.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2013 - 8:14 am | अत्रुप्त आत्मा

ज्जे बात!

तुम्ही उत्तरं न वाचताच प्रतिसादांचा सपाटा लावला आहे.

आज सकाळिच पावसात खाल्लेल्या कांदाभजिची जिभेवर चव रेंगळणे यात मनाच्या ऑड्योव्हिड्योमेमोरीचा संबधच नाहीये म्हणजे मन नष्ट झाले की काय ?

स्वाद आणि गंध या इंद्रियगम्य संवेदना आहेत आणि त्यांची स्मृती मेंदूत आहे. तुम्ही सारखं `मन नष्ट झालं काय?' असा घोषा लावला आहे. लेखनात एक पैश्याची चूक नाही. तुम्हाला रेकॉर्ड आणि रेकॉर्डिंग डिवाइस यातला फरक कळत नाहीये.

जर सकाळी केलेल्या गोष्टीची स्मृती संध्याकाळी होत नसेल तर तो मेंदूचा प्रॉब्लम आहे, मनाचा नाही.

क्षीरसागरजी, सर्वात आधी एक प्रश्न विचारतो... तो म्हणजे मन कुठे असते ते तुम्हाला माहित आहे का ?

आजपर्यंत हजारो सिद्धांनी ‘ शांत बसून मनाकडे पाहा’ असा संदेश दिला आहे आणि आजही मनापलीकडे जाण्यासाठी ‘मनाचं तटस्थ अवलोकन’ ही (आध्यात्मिक) जगातली सर्वमान्य साधना मानली जाते. अगदी बुद्धापासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत (इंन्क्लूडिंग ओशो) सर्व ज्ञानमार्गी या साधनेचा पुरस्कार करतात. आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे.
युरेका युरेका ! ;)
माझे मत :- कुठलीही साधना कधीही व्यर्थ जात नाही,जसे कुठलेही ज्ञान व्यर्थ नसते.

भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे.
सर्वात हास्यास्पद विधान !
आता काही ओव्या देतो:---

आम्हा नामाचे चिंतन । राम कृष्ण नारायण।
तुका म्हणे क्षण । खाता जेविता न विसंभो ॥३॥
म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही ।
नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥

संत तुकाराम

गोंदवलेकर महाराजांचे एक वाक्य :-
मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे: आपण नामात रहावे, आणि दुसऱ्यास नामास लावावे. संसारात न्युन पडू देऊ नये आणि भगवंताला विसरु नये.
आता मला सांगा हे संत वेडे की तुम्ही शाहणे ?

मनाचं अवलोकन व्यर्थ का आहे हे जाणणं अगत्याचं आहे. कारण मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’ असा आहे.
मनाचे श्लोकांचा काही भाग इथे देतो :-

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥
मना सर्वथा नीति सोडूं नको हो।
मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥
मना कल्पना ते नको वीषयांची।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे।
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥

इति रामदास स्वामी

रामदास स्वामींनी "मनाचे" श्लोक लिहले ते मनाचे अवलोकन आणि त्यावर नियंत्रण करता यावे यासाठीच ना ?इतर कुठले वेगळे कारण असेल तर कॄपया मला जरुर सांगा,२-४ ज्ञानकण "मनात" साठवीन म्हणतो.

मनाचं अवलोकन करताना आपण डोळे मिटून शांत बसलेलो असतो आणि या स्मृतीच्या चलत-चित्रपटात इतके गुंतून जातो की अवलोकन कशासाठी करतोय हेच लक्षात राहत नाही. मग मधून केव्हा तरी आपण कुठेही गेलेलो नाही, जागेवरच बसलो आहोत याचं भान येतं. मग थोडा वेळ शांत वाटतं. त्यानंतर कोणत्या तरी संवेदनेनं पुन्हा स्मृती सक्रिय होते मग पुन्हा आपण भोवर्‍यात सापडतो आणि या कामात बर्‍याच वेळा झोप लागून जाते. जाग आली की झक मारली आणि वेळ घालवला असं वाटायला लागतं.
यावरुन एकच गोष्ट सहज सिद्ध होते ती म्हणजे मनाला लगाम लावणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे वाटते तितके सोप्पे अजिबात नाही.शरीररुपी रथाला बुद्धीरुपी लगाम लावल्यास मनरुपी घोडे नियंत्रणात येतात.

मनाचं अवलोकन करायचा प्रश्न नसून त्याची चक्राकार गती जाणणं महत्त्वाचंय.
मनाचे अवलोकन केले नाही तर त्याच्या गतीचा प्रभाव कसा कळणार ?

ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे.
ज्या क्षणी मनाला फक्त एकाच गोष्टीवर नियंत्रीत करण्यात यश मिळते त्या क्षणी इतर विचार नाहीसे होतात.हिप्नोटिझम किंवा साउंडमेडिटेशन मधे माईंड ड्रिफ्ट ऑफ {drift of } होते."गाढ झोपेत" सुद्धा माईंड ड्रिफ्ट ऑफ होते.{ drift off } मला फक्त पक्षाचा डोळाच दिसतो आहे हे अर्जुनाने दिलेले उत्तर इतर विचारापासुन तो वेगळा झाला आहे आणि लक्ष फक्त एकाच जागी केंद्रित झाले आहे याचे उत्तम उदाहरण आहे.

संजय क्षीरसागर's picture

19 Jun 2013 - 11:27 pm | संजय क्षीरसागर

मनाचा (या लेखापुरता) प्राथमिक अर्थ `विचारांची प्रक्रिया' असा आहे, ती मेंदूत चालू असते.

आता मला सांगा हे संत वेडे की तुम्ही शाहणे ?

सध्या मी `नाम साधनेवर ' काहीही लिहीणार नाही हे प्रथमच सांगितलं आहे.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।

आता तुम्ही सांगा, कुठे असतो हा राम?

यावरुन एकच गोष्ट सहज सिद्ध होते ती म्हणजे मनाला लगाम लावणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे वाटते तितके सोप्पे अजिबात नाही.

सोपं आहे असं मी म्हणतोय, फक्त प्रक्रिया योग्य हवी. ती तुम्ही करून पाहिली की लक्षात येईल. प्रक्रिया निर्वैयक्तिक आहे आणि त्यासाठी कोणत्याही श्रद्धेची गरज नाही.

मनाचे अवलोकन केले नाही तर त्याच्या गतीचा प्रभाव कसा कळणार ?

एक अत्यंत सोपी प्रक्रिया लेखात सांगितली आहे. पण मजा म्हणजे त्याविषयी कुणीही काहीही बोलत नाहीये.

ज्या क्षणी मनाला फक्त एकाच गोष्टीवर नियंत्रीत करण्यात यश मिळते त्या क्षणी इतर विचार नाहीसे होतात

तसं नाही. तुम्ही विचारांच्या कारक असलेल्या पहिल्या संवेदनेपाशी येता तेव्हा मनाची सर्व प्रक्रिया थांबते.

हिप्नोटिझम किंवा साउंडमेडिटेशन मधे माईंड ड्रिफ्ट ऑफ {drift of } होते."गाढ झोपेत" सुद्धा माईंड ड्रिफ्ट ऑफ होते.

निद्रेवर अजून लेखन होणार आहे.

मला फक्त पक्षाचा डोळाच दिसतो आहे हे अर्जुनाने दिलेले उत्तर इतर विचारापासुन तो वेगळा झाला आहे आणि लक्ष फक्त एकाच जागी केंद्रित झाले आहे याचे उत्तम उदाहरण आहे.

ते मनाच्या केंद्रिकरणाचं उदाहरण आहे, ती मनाची एक क्षमता आहे. आपण संपूर्ण मनाच्या प्रक्रियेचा उलगडा करतोय.

मदनबाण's picture

20 Jun 2013 - 1:04 pm | मदनबाण

सध्या मी `नाम साधनेवर ' काहीही लिहीणार नाही हे प्रथमच सांगितलं आहे.
मग भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. हे वाक्य लिहायचे कष्ट कशाला घेतलेयत?

आता तुम्ही सांगा, कुठे असतो हा राम?
राम चिंतनात असवा असा त्या ओवीचा बोध आहे.

तुम्ही विचारांच्या कारक असलेल्या पहिल्या संवेदनेपाशी येता तेव्हा मनाची सर्व प्रक्रिया थांबते.
कुठल्याही मेडिशन मधे हेच साधले जाते.किंवा ते साधण्यासाठीच प्रयत्न केला जातो. मग त्राटक करा, श्वासावर लक्ष करा किंवा सेल्फ हिप्नोसिस करा.

ते मनाच्या केंद्रिकरणाचं उदाहरण आहे, ती मनाची एक क्षमता आहे.
मनाचे केंद्रिकरण तेव्हाच होउ शकते जेव्हा इतर विचार मनातुन निघुन जातात.

ते वाचून कळतंय हो पण प्रश्न सरळ आहे :

कुठे असतो हा राम?

एकदा याचं नक्की उत्तर दिलंत की मग मनाची प्रक्रिया उलगडणं सोपं होईल. भ्रमाची प्रक्रिया उलगडणं अवघड आहे.

मदनबाण's picture

20 Jun 2013 - 4:38 pm | मदनबाण

कुठे असतो हा राम?
आंतर मनात आणि बाह्यमनात सुद्धा ! मला वाटत बाह्य मनातुन तो आंतरमनात साठवावा म्हणु चिंतन करण्यावर भर दिला जातो.
बाकी भ्रम नक्की कोणाला होतो ? मनाला की मेंदुच्या प्रोसेसिंगला ?

भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. हे वाक्य लिहायचे कष्ट कशाला घेतलेयत?
आता या प्रश्नाचे उत्तर द्या.

प्यारे१'s picture

20 Jun 2013 - 5:38 pm | प्यारे१

>>>भ्रम नक्की कोणाला होतो ?

अजून समजलं नाहीये का ?

- 'अ‍ॅसिडीटीने जळजळग्रस्त' प्यारे१

मदनबाण's picture

20 Jun 2013 - 9:16 pm | मदनबाण

अच्छा अच्छा असं हाय का ? ;)

संजय क्षीरसागर's picture

21 Jun 2013 - 7:07 pm | संजय क्षीरसागर

खाली दिलं आहे.

प्यारे१'s picture

19 Jun 2013 - 11:42 pm | प्यारे१

उत्तम लेखमाला. माझे डोळे फाडकन उघडले सरांचे प्रतिसाद वाचून.
आणखीन येऊ द्या.

अवांतरः थोडी जाहिरात करतोय संजय सर. सॉरी. तुम्हाला आक्षेप नसला तर.

आमचे येथे चीनी तत्त्ववेत्ते
मा. श्री. मा. मा झीचीस्ट (मन्क-लर)
झेन साधू (मन्क हा इंग्रजी शब्द आहे. )

ह्यांची व्याख्यानमाला सुरु होत आहे.
श्री. विशाल जी कुल्कर्णी ह्यांनी अतिशय कष्टाने त्यांना तिबेटच्या पर्वतराशीतून इकडे आमंत्रित केले आहे.

सर्वांनी लाभ घ्यावा ही णम्र विनंती.
धन्यवाद.

अग्निकोल्हा's picture

20 Jun 2013 - 12:29 am | अग्निकोल्हा

मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो अशी सुरुवात वाचल्यावर वाटलं किमान ओशोला तरी या लेखात यड्यात काढलं जाणार नाही. पण काय बोलावे ओशोच म्हणन पटतय पण, त्याने सांगितलेली साधना मात्र चुकिची आहे व त्यावर यांनी शोधलेला उपाय हिच खरी योग्य साधना आहे असा विरोधाभास वाचल्यावाचल्याच उडालो.

पण... म्हटलं ज्याने पुन्हा बुध्द जेके अन ओशोंला एकाच लायनीत आउटस्मार्ट केले त्यो मानुस मोठ्ठाच असणार. वाटलं अन विचार आला ह्यांनी तर "प्रोसेस पेटंट" घेयाला पायजेल. संजयभाउ या संदर्भात जरुर अर्ज करावा. एकदा मनोमुक्तिचे "प्रक्रिया पेटंट" मिळवलेना तुम्हि म्हणजे सगळे एका दमात वटणिवर येतिल. कोर्टापुढ कोनीबी मोटा नाय.

मला प्रोसेस पेटंट घेण्यात काही रस नाही आणि कुणाला वेड्यात काढण्यात तर त्याहून नाही. मी फक्त एक सोपी आणि नवीन प्रक्रिया सांगतोय जी प्रचलित साधनेपेक्षा वेगळी आहे.

अर्धवटराव's picture

20 Jun 2013 - 9:20 am | अर्धवटराव

इट वर्क्स अ‍ॅज यु एक्स्प्लॅण्ड... (तपशीलाबद्दल थोडा मतभेद आहे. या (इतर तत्सम) प्रक्रियेचा कर्ता आणि उपभोक्ता स्वतः मनच आहे हा माझा अनुभव)

अर्धवटराव

संजय क्षीरसागर's picture

20 Jun 2013 - 10:11 am | संजय क्षीरसागर

पहिला सार्थ प्रतिसाद!

(तपशीलाबद्दल थोडा मतभेद आहे. या (इतर तत्सम) प्रक्रियेचा कर्ता आणि उपभोक्ता स्वतः मनच आहे हा माझा अनुभव)

यथावकाश तुम्हाला `स्व' चा बोध होईल.

चेतन माने's picture

20 Jun 2013 - 1:25 pm | चेतन माने

लेखमाला वाचयला मज्जा येइल. बाकी तुम्हाला मानलं पाहिजे एवढ्या थंड डोक्याने इतक्या वेगवेगळ्या प्रश्न आणि शंकांना तुम्ही उत्तर देताय ……छान
म्हणजे शांती फक्त वर्तमानातच असण्यात आहे तर ….(पटतंय )
पुभाप्र

अर्थात! वर्तमान म्हणजे खुद्द आपण! मनाला जाणणारी निराकार अवस्था.

एवढ्या थंड डोक्याने इतक्या वेगवेगळ्या प्रश्न आणि शंकांना तुम्ही उत्तर देताय

जे लिहीतोय तो माझा अनुभव आहे त्यामुळे मी निश्चिंत आहे.

चेतन माने's picture

20 Jun 2013 - 2:09 pm | चेतन माने

जे लिहीतोय तो माझा अनुभव आहे त्यामुळे मी निश्चिंत आहे.

नक्कीच :)

अग्निकोल्हा's picture

20 Jun 2013 - 10:21 pm | अग्निकोल्हा

बॅक ट्रॅक करुन पाहिले तुम्हि म्हणताय तो अनुभव आला नाहि. काय करावे ?

म्हणजे असं कि आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे समजल्यावर लक्षात आलं कि हे विचार म्हणजे मी नाही. थोडक्यात मी वेगळा व माझे विचार हे वेगळे पण अकाच वेळी अस्तित्वात असणार्‍या गोश्टि होत. स्वतः मी स्थिर अविचल शांत अथांग सहज आहे. तर विचार नेमके याच्या उलटे आहेत. पण मी व माझे विचार यांचे मिश्रण आपल्या मनात अशांतता निर्माण करत आहे, ज्यापासुन स्वतःला बाहेर ठेवायचे आहे. इथपर्यंत सर्व व्यवस्थित पार पडलं. पुढे काय ? विचार थांबले, पण मी अस्तित्वातच राहिलो.

म्हणजे ‘पहिला विचार कुठून सुरू झाला’ हे विचार मालिका सुरू असताना ‘कुठे तरी मध्ये थांबून बॅक ट्रॅक करणं’ ही खरी प्रोसेस आहे.

पहिला विचार कुठला ते कसं ठरवायच? पहिला विचार म्हणजे त्या दिवसाचा पहिला विचार कि त्या सब्जेक्ट चा?
पहिला विचार बॅक ट्रॅक करण्याऐवजी पहिला विचार आठवुन फॉरवर्ड ट्रॅक केला तर चालेल का?

संजय क्षीरसागर's picture

21 Jun 2013 - 7:17 pm | संजय क्षीरसागर

पहिला विचार म्हणजे सध्या चालू असलेल्या विचारमालिकेतला पहिला विचार.

कधीही विचारचक्र सुरू असताताना तुम्ही भानावर आलात आणि बॅकट्रॅक करत गेलात तर तुम्ही ते चक्र सुरू होण्याच्या वेळी आलेल्या पहिल्या विचारापाशी येता आणि तो पहिला विचार होता हे तुमच्या लक्षात येतं कारण तो कोणत्या तरी संवेदनेनं सुरू झालेला असतो. अशा प्रकारे `पहिला विचार ते (तुम्ही भानावर आलात) तेव्हाचा विचार (शेवटचा विचार)' अशी मनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला उलगडते.

एकदा तुम्हाला पुरेसा कॉन्फिडन्स आला की तुम्हाला स्मृती कशी सक्रिय होते आणि कार्य करते हा उलगडा होतो.

रामपुरी's picture

21 Jun 2013 - 3:37 am | रामपुरी

नाव वाचून ज्ञानेश्वरांविषयी काहीतरी वाचायला मिळेल या अपेक्षेने धागा उघडला (हल्ली नाडीचे धागे बंद झाल्याने लेखकाचे नाव वाचायची सवय सुटली आहे. परत लावून घ्यावी लागेल असं दिसतंय) तर आत ओशोचा फोटो आणि खाली ज्येष्ठ बल्लवाचार्याची पा़ककॄती. फोटो नसल्यामुळे नियमाप्रमाणे वाचली नाही. नेक्ष्ट टाईमला फटू टाकावा ही विनंती.

संजय क्षीरसागर's picture

21 Jun 2013 - 7:06 pm | संजय क्षीरसागर

यावर आपण म्हणताय :

>आंतर मनात आणि बाह्यमनात सुद्धा ! मला वाटत बाह्य मनातुन तो अंतरमनात साठवावा म्हणु चिंतन करण्यावर भर दिला जातो.

= तुमच्या पहिल्या प्रदीर्घ प्रतिसादाचा आणि वरील स्टेटमंटचा अर्थ तुम्हाला सर्वत्र राम दिसायला हवा आहे (किंवा दिसतो आहे - ती तर फारच गंभीर परिस्थिती आहे).

पुढे तुम्ही विचारताय :

>बाकी भ्रम नक्की कोणाला होतो ? मनाला की मेंदुच्या प्रोसेसिंगला ?

तुम्हाला अनुमोदन देणारा प्रतिसादक म्हणतोय :

>भ्रम नक्की कोणाला होतो ? अजून समजलं नाहीये का ?

आणि तुम्ही त्यावर सुखावून प्रतिसाद दिलाय :

>अच्छा अच्छा असं हाय का ?

=थोडक्यात तुमचं आणि तुमच्या समपंथीयांचं मत असं आहे की ‘राम नं दिसता, समोरचं स्वच्छ दिसणं’ (जो या लेखाचा मूळ विषय आहे) हा भ्रम आहे!

या विषयावर मी चर्चा करणार नव्हतो कारण तो संवेदनाशील आहे. पण आता विषय निघालाच आहे तर सांगतो, वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे.

देव ही कल्पना मान्य करणं ही भ्रम्राची सुरूवात आहे आणि `देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहे. द पर्सन इज टोटली कट ऑफ फ्रॉम रिअ‍ॅलिटी. कारण त्याला जे दिसतय ते वास्तविकात नाही.

याविषयी सविस्तर चर्चा इथे झाली आहे : http://www.misalpav.com/node/23678?page=1

शिल्पा ब's picture

21 Jun 2013 - 10:18 pm | शिल्पा ब

थोडक्यात देव दिसला असं समजणारे संत वगैरे भ्रमिष्ट होते तर !

क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देण्याचे वारंवार टाळले आहे.परत तोच प्रश्न तुम्हाला विचारतो...
भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. हे वाक्य लिहायचे कष्ट कशाला घेतलेयत?

तुमच्या पहिल्या प्रदीर्घ प्रतिसादाचा आणि वरील स्टेटमंटचा अर्थ तुम्हाला सर्वत्र राम दिसायला हवा आहे (किंवा दिसतो आहे - ती तर फारच गंभीर परिस्थिती आहे).
मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई।
इति :- स्त्री संत मीराबाई. त्यांची पण परिस्थिती गंभीर होती यास आपल्या वरील वाक्यावरुन निष्कर्ष काढता येतो.

बाकी भ्रम नक्की कोणाला होतो ? मनाला की मेंदुच्या प्रोसेसिंगला ?

तुम्हाला अनुमोदन देणारा प्रतिसादक म्हणतोय :

>भ्रम नक्की कोणाला होतो ? अजून समजलं नाहीये का ?

आणि तुम्ही त्यावर सुखावून प्रतिसाद दिलाय :

>अच्छा अच्छा असं हाय का ?

=थोडक्यात तुमचं आणि तुमच्या समपंथीयांचं मत असं आहे की ‘राम नं दिसता, समोरचं स्वच्छ दिसणं’ (जो या लेखाचा मूळ विषय आहे) हा भ्रम आहे!
परत तेच नी प्रश्न काय विचारलाय ? की भ्रम नक्की कोणाला होतो ? मनाला की मेंदुच्या प्रोसेसिंगला ?
त्याचे उत्तर न देता दुसर्‍या प्रतिसादकाला मी काय म्हणालो आहे यावर तुमचे मन लक्ष केंद्रित करत आहात.जे योग्य नाही.तुम्ही म्हणता की मी त्यावर सुखावून प्रतिसाद दिला,यावर माझे म्हणणे आहे की हा तुमचा "भ्रम" आहे.मी गमतीने तो प्रतिसाद दिला होता.तुमचे मन विचलीत होत आहे असे दिसते आणि त्यावर तुमचे नियंत्रण नाही आणि याकारणामुळेच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता भलतेच प्रतिसाद देतात्,शिवाय स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे मात्र माझ्याकडुन मागता.

थोडक्यात तुमचं आणि तुमच्या समपंथीयांचं मत असं आहे की ‘राम नं दिसता, समोरचं स्वच्छ दिसणं’ (जो या लेखाचा मूळ विषय आहे) हा भ्रम आहे!
भ्रम कसा निर्माण होतो ते मी वरतीच दर्शवले आहे.

या विषयावर मी चर्चा करणार नव्हतो कारण तो संवेदनाशील आहे. पण आता विषय निघालाच आहे तर सांगतो, वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे.
तुम्ही ज्या गोष्टीवर चर्चा करणार नाहीत असे म्हणता,त्याच गोष्टी संबंधी तुम्ही विधाने करता,माझा पहिला प्रश्न परत वाचा म्हणजे कळेल.

देव ही कल्पना मान्य करणं ही भ्रम्राची सुरूवात आहे आणि `देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहे. द पर्सन इज टोटली कट ऑफ फ्रॉम रिअ‍ॅलिटी. कारण त्याला जे दिसतय ते वास्तविकात नाही.
मी कोणी बाबा मियाँ बंगाली नाही,ना कोणी तत्वज्ञानी,पण श्री प्रभुपाद स्वामींनी यावर उत्तम भाष्य केले आहे.ते इथे देतो.तुम्ही तुमचे चित्त थार्‍यावर आणुन मन एकाग्र करुन या भाष्यावर जरा चिंतन करण्याचे कष्ट करा ! बहुधा तुमचा भ्रम संपेल.

मोदक's picture

21 Jun 2013 - 8:56 pm | मोदक

वाचतोय!

अर्धवटराव's picture

21 Jun 2013 - 9:34 pm | अर्धवटराव

बीडकर महाराजांना स्वामी समर्थ म्हणाले होते कि भुकेल्याला अन्न दे, अन्यथा अन्नाचा चिवडा होईल.
यापुर्वी भक्ती संबंधी माझ्या एका धाग्यावर चर्चा झाली आहे (स्वतःची पाठ थोपटण्याची स्माईली आहे काय कुठे ;) ). त्यात देव/भक्ती प्रकरण नक्की काय आहे याचा थोडाफार उहापोह झाला आहे. त्यानंतरही जर कोणि कल्पना, भ्रम वगैरे जंजाळातुन (मुद्दाम) बाहेर पडत नसेल तर त्याला काहि इलाज नाहि. असो.

अर्धवटराव

त्यात शेवटी मी म्हटलं आहे :

प्रॅक्टीकली भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास.

आणि तुमच्या तिथल्या शेवटच्या प्रतिसादालाही सविस्तर उत्तर दिलंय. आता मला पुन्हा वेळ घालवायचा नाही.

अर्धवटराव's picture

22 Jun 2013 - 12:02 am | अर्धवटराव

>>प्रॅक्टीकली भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास
-- मला नाहि वाटता भ्रमाच्या अनेक डेफीनेशन्सपैकी एक अशा या परिभाषेला कुणाचा आक्षेप असेल, वा त्यात काहि वेगळं सांगितल्या गेलं आहे.

तिथले (आणि इथले देखील) प्रतिसाद इतके काँटॅडीक्टरी आहेत कि त्यावर सविस्तर विचार करुन एक काय ति भुमीका स्वतःला समजल्याशिवाय आणखी उत्तरे देण्यात वेळ न घालवणे हेच उत्तम. (बहुतेक, मला काहिहि कन्फ्युजन नाहि, माझे विचार स्पष्ट आहेत वगैरे उत्तरे तुमच्याकडुन येतील, किंवा एखाद-दोन लाइन्स आणखी कॉपी पेस्ट होतील... पण त्यात मूळ मुद्द्याला साजेसं काहि मटेरीअल नसणार याची खात्री आहे.)

अर्धवटराव

येस! पण तुमचे. कारण मी देव या एकाच संकल्पनेवर बोलतोय. तिथे ही आणि इथे ही.

पण त्यात मूळ मुद्द्याला साजेसं काहि मटेरीअल नसणार याची खात्री आहे.

इतकी खात्री आहे तरी तुम्ही मला प्रश्न विचारता! खाली एका प्रतिसादात तर तुम्ही प्रक्रिया बरोबर असं देखील आहे म्हटलंय.

अर्धवटराव's picture

22 Jun 2013 - 2:40 am | अर्धवटराव

>>येस! पण तुमचे.कारण मी देव या एकाच संकल्पनेवर बोलतोय. तिथे ही आणि इथे ही.
-- हो ना. विषय एकच आहे, त्यावरचे विचार कॉण्ट्रॅडीक्टरी आहेत. तसंही कॉण्ट्रॅडीक्टरी स्टेट्मेण्ट्स एकाच विषयाला धरुन असतात जनरली... नाहि का.

>>इतकी खात्री आहे तरी तुम्ही मला प्रश्न विचारता!
-- तुम्हाला जशी प्रबोधनाची हौस आहे तशी मला देखील चिकीत्सेची हौस आहे. शिवाय वाचकांनी प्रश्न विचारावे अशी तुमची इच्छा/अपेक्षा देखील आहे ना... कि उगाच लेख/प्रतिसाद पाडताय?

>>खाली एका प्रतिसादात तर तुम्ही प्रक्रिया बरोबर असं देखील आहे म्हटलंय.
-- याला म्हणतात आपल्याला हवे ते अर्थ काढणं. तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया इतर तत्सम प्रकियांप्रमाणे मनाच्या विचारांवर काम करते हे मी स्वच्छ सांगीतलय, आणि तपशीलासंदर्भात काय मतभेद आहेत हे देखील खुलासेवार सांगीतलं आहे. त्यातही तुम्हाला कॉण्ट्रॅडीक्श्न दिसावी??

सर्वात महत्वाचं... मुख्य मुद्द्याला धरुन प्रतिसादात काहि मटेरीअल नसणार या माझ्या गृहीतकाला सिद्ध केल्याबद्दल आभारी आहे.

अर्धवटराव

तुमची मतं रोज बदलतायत..

तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया...इट वर्क्स अ‍ॅज यु एक्स्प्लॅण्ड

अर्धवटराव's picture

22 Jun 2013 - 10:06 am | अर्धवटराव

>>"तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया...इट वर्क्स अ‍ॅज यु एक्स्प्लॅण्ड"
-- मला माहित आहे प्रॉब्लेम तुमच्या सिलेक्टीव्ह रीडींग आणि मनमानी अर्थ काढण्याचा नाहिए. तपशीलांतील मतभेदांबाबत, मनाच्या स्कोप बाबत, आणि मी जी समीकरणे दिली होती ति माझी वाक्ये कॉपी पेस्ट करताना कदाचीत तुमचा कॉम्प्युटर हँग झाला असेल.

अर्धवटराव