Skip to main content

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)

लेखक संजय क्षीरसागर यांनी शुक्रवार, 12/07/2013 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
दाय विल बी डन! Jejus जिझस _____________________________ जे समोर आहे त्याची बेशर्त स्वीकृती हा मनाच्या चकव्यातनं बाहेर पडायचा सर्वोत्तम मार्ग आहे. जे आहे ते स्वीकारलं की मनाला तक्रारीला जागाच उरत नाही. स्वीकृतीला मन राजी होत नाही. ती तुमची हार आहे असा बिनतोड युक्तिवाद करून ते उपलब्ध उपभोगू देत नाही. लगाम मनाकडे असल्यानं आपण आहे ते नाकारतो (किंवा अत्यंत नाईलाजानं स्वीकारतो). त्यामुळे जे प्रत्यक्षात आहे ते व्यर्थ होतं आणि मनात आहे ते उपलब्धच नाही तर उपभोगणार कसं? स्वच्छंद होणं म्हणजे समोर आहे ते बेशर्त मान्य करून आयदर त्याच्याशी डील करणं किंवा मग डायरेक्ट उपभोगायला लागणं. ________________________________________ बिफोर वी गो, दुसर्‍या लेखात मी एक साधी गोष्ट सांगितली होती : 'बेशर्त स्वीकृती' हा मनाकडून सर्व सूत्र स्वत:कडे घेण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. याचं साधं कारण असं की मन तक्रारखोर आहे. त्याला जे मिळालंय ते नकोय आणि जे सध्या समोर नाही ते हवंय. लोकांना वाटतं स्वीकृती हार आहे, त्यानं महत्त्वाकांक्षेला शह बसेल. पण वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे. जे आहे त्याचा स्वीकार आपल्याला वर्तमानात आणतो, समोर आहे त्याच्याशी आपण डील करतो आणि असलेल्याशी समर्थपणे डील करता आलं की आपला कॉन्फिडन्स वाढून प्रगतीच्या नव्या वाटा खुल्या होतात. मग बहुतेकदा आहे तेच उत्तम वाटतं आणि ते सर्वोत्तम करण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा मग आहे ते योग्यपद्धतीनं डील करून काही तरी नवं शोधतो. आहे ते नाकारणं, त्याच्याशी वैर घेणं, आपल्याला द्विधा करतं. जे करतोय त्याच्याकडे दुर्लक्ष होतं कारण जे करायचंय ते मनात चालू असतं. मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि समोर आहे त्यात आपल्याला रस नसतो कारण मन ते बदलायला सांगत असतं! ______________________________________ ओशोंनी मनाचा हा पैलू अत्यंत अनोख्या शब्दात मांडला आहे "मन का स्वभाव ही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!" (आष्टावक्र महागीता) अस्विकार हा मनाचा महत्तम पैलू आहे, मग सांप्रत गोष्ट काम असो की नातं. नवविवाहितांना माझं म्हणणं चटकन लक्षात येईल. शोधताना प्रत्येकानं बेस्ट पार्टनर चूज केलेला असतो (अर्थात, प्राप्त परिस्थितीत यथासांग विचार करून). पण काही दिवसात चॉइस चुकलाय असं वाटायला लागतं (मजा म्हणजे दोघांनाही!). आता नव्या पर्यायाचा शोध सुरू होतो (त्यात सुद्धा कोण आधी शोधतोय याची शर्यत!). मग वर लिहिलंय ती परिस्थिती उद्भवते "मनातल्या गोष्टीशी डील करता येत नाही कारण ती प्रत्यक्षात नसते आणि प्रत्यक्षात असलेल्यात आपल्याला रस नसतो कारण मन त्याच्याशी राजी नसतं!" सगळ्या प्रकारात एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की लगाम मनाकडे आहे! आपल्याला वाटतं पहिली निवड केली तेव्हा निर्णय आपला होता पण तसं असतं तर आपण आपल्याकडनं नातं सावरलं असतं. तिला काहीही वाटू दे, आपण तिला समजावून घेतलं असतं आणि समजावून सांगितलं असतं की सेपरेशन कशाला? आपण आपल्याकडून सर्व प्रयत्न केले असते. आपल्या सुखात तिचं सुख आहे आणि तिच्या सुखात आपलं आहे याची जाण ठेवून वागलो असतो. पण निर्णय मनाचा होता आणि मनाला रंग बदलायला किती वेळ लागतोय? जरा मनाविरुद्ध झालं की संपलं! नवा पर्याय शोधायला तयार. आणि मजा म्हणजे मनंच दुसरा पर्याय निवडणार आहे! मन निर्णय तो काय घेणार? काय आहे त्याच्याकडे निर्णय घ्यायला? फक्त स्मृती (त्या देखील बहुतेक नकोशा वाटणार्‍या)! आणि त्यातून काय साधायचा प्रयत्न करेल ते? तर त्या स्मृती पुसून टाकू शकेल अशी कुणी तरी फॅंटास्टिक व्यक्ती! बरं समजा मिळाली अशी कोणी तर किती वेळ लागेल हा भ्रम निस्तरायला? फक्त तिनं मनाच्या कल्पनेपेक्षा जरासं वेगळं वागणं, दॅट्स ऑल! मग पुन्हा बदलाबदली सुरू! थोडक्यात जोपर्यंत अस्विकार आहे तोपर्यंत लगाम मनाकडे आहे. 'दाय विल बी डन' म्हणजे आहे त्याची बेशर्त स्वीकृती. हा स्वीकार तुम्ही समजून उमजून केलेला आहे, नाईलाजानं नाही. ज्या क्षणी तुम्ही आहे ते स्वीकारता, त्या क्षणी लगाम तुमच्या हातात येतो. भ्रमराला रुणूझुण करायला संधीच राहत नाही. ______________________________ तुम्हाला वाटेल मी माझ्यामनाचे श्लोक लिहितोय, पण तुमचे प्रतिसाद मनाची नेमकी हीच अवस्था दाखवतात : >केवळ अन केवळ ओब्लिगेशनच कामातलि मजा कमि करतं जात, म्हणूनच आवडत्या कंपनित लागलेल्या जॉबचा पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही. = प्रत्येक दिवस नवा आहे पण मन स्मृतीतनं सक्रिय होतं आणि आपण त्याच्याशी अलाईन होतो. त्यात आपल्याला लहानपणापासून शिकवण आहे ‘नव्याचे नऊ दिवस’. मग आपल्याला वाटतं "पहिला दिवस जितका आनंददायी अन उत्साहदायि असतो तितका सहावा महिना असेलच असे नाही." >ठिक आहे मग या प्रक्रियेचा सारांश काय ? तो हाच की ज्या कामात तुम्हि विलिंगफुली एंटर-एग्झिट घेउ शकता फक्त तेच काम आनंददायी असतं. = आता ही मनाची शर्त पूर्ण करणं असंभव आहे कारण तुमच्या मर्जीवर कंपनी कशी चालणार? (आणि वैवाहिक नातं असेल तर विलफुल एंटर-एग्झिट अजूनच अवघड!). पण एक साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. प्रसंगाकडे स्मृतीतनं पाहिल्यामुळे त्यातलं नवेपण हरवतंय. प्रत्येक एंट्री फ्रेशच आहे आणि इग्झिटची गरज वाटतेय कारण आहे त्यात रस नाहीये! >म्हणजे काय तर आपण एखाद्या कामात निपुण होत गेलो पण पुरेस चॅलेंज वाढत गेलं नाही तरी कामाचा कंटाळा येतो. ह्या उलट निपुणता निर्माण झालि नाही पण चॅलेंज वाढत गेलं तर कामाचे फ्रस्ट्रेशन येत. तेव्हां हि गोश्ट काम करताना फार व्यवस्थित सांभाळावी लागते. अन्यथा बट्याभोळ होतो. = आहे त्यात रस नसेल तर कसे होणार तुम्ही निपुण? आणि आहे ते काम कौशल्यानं केल्यावर चॅलिंज निर्माण होतो. ते वन डे सारखं आहे, तुम्ही आल्याआल्या बाउंड्री किंवा सिक्स ठोकू शकत नाही आणि एकदा सेटल झाल्यावर आहे तोच गेम तुम्हाला नवे चॅलेंजिस देतो. फ्रस्ट्रेशनच खरं कारण नैपुण्य नाही आणि नैपुण्य नाही कारण आहे त्याकडे दुर्लक्ष, अशा चक्रात व्यक्ती सापडते. मग मन सांगता कंटाळा आला, घ्या आता नवा जॉब (वैवाहिक नात्यात तर आणखीच मजा, बदला पार्टनर! (किंवा बघा पर्यायी व्यवस्था!) __________________________________ मन शब्दांशी कसा खेळ करतं हे पाहण्यासारखं आहे : माझा मुद्दा साधा आहे : बेशर्त स्वीकारात भ्रम कुठे आहे? प्राप्त परिस्थिती स्वीकारण्याचा निर्णय तुम्ही घेतला, पुन्हा त्यावर वैचारिक उहापोह नाही असं मनाला बजावलं. आपण कामाला लागलो, विषय संपला! >शब्द...शब्द..शब्द...शब्द..इथे कांहीच समजत नाही, कांहीच सिद्ध होत नाही. = त्या प्रतिसादात शब्दांचीमाळ विंडोबाहेर गेलीये! स्वीकारा किंवा स्वीकारू नका निर्णय तुमचा आहे. सगळं लेखन साध्या मराठीत आहे, त्यात न समजण्यासारखं काय आहे? उत्तम संदर्भ मन किती चुकीच्या पद्धतीनं देतं याचं उदाहरण : >गुरुदेव म्हणाले: हू आर यू? यू आर आय इन द यू इन द आय इन द यू? ( संदर्भ : असा मी असामी ) = प्रश्न 'हू आर यू'? नाहीये. 'आर यू गोइंग टू अ‍ॅक्सेप्ट ऑर नॉट' असा आहे! याहीपेक्षा कहर पुढे आहे: >काय ते ठरलं का शेवटी? स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं की 'सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं? = मन सांगतंय स्वीकार म्हणजे हार आहे ('सब स्वीकार है' म्हणून मुकाट्यानी जगायचं?). स्वीकार स्वेच्छा आहे, जे आहे ते लक्षपूर्वक आणि जवाबदारीनं निभावणं आहे. मनाला वाटतं स्वच्छंद म्हणजे बेदरकारी! (स्वेच्छेनी हव्वं तस्सं जगायचं ) >की आधी स्वेच्छेनी जगायचं आणि लोकांनी फटके दिले की मग मुकाट्यानी सगळं स्विकारुन जगायचं? = हा (प्रतिसादकाच्या) मनाचा पूर्वानुभव आहे! पूर्ण स्वीकार तुम्हाला समर्थ करतो. 'स्वीकारू की नको' अशी मनाची द्विधा स्थितीच तुम्हाला कमजोर करते आणि मग परिस्थिती वरचढ होते. >की आधी सगळं स्विकारुन जगायचं आणि वैताग आला की स्वेच्छेनी जगायचे? = त्याच द्विधा स्थितीचा पुनर्प्रत्यय! >की स्वेच्छेनी जगतोय असं दाखवायचं आणि खरं तर सगळं स्विकारुनच जगायचं? = मन पुन्हा तेच सांगतंय स्वीकार ही हार आहे! >की सगळं स्विकारुन मुकाट्यानी जगतोय असं दाखवत हळूच स्वेच्छा पुढे सरकवत रहायची? = परिस्थितीनं पुरती वाट लावली की 'आत एक आणि बाहेर एक' अशी अवस्था कशी होते त्याचं यथार्थ वर्णन! >त्यापेक्षा सोप्पे म्हणजे स्वतः स्वेच्छेनी जगायचं आणि आजूबाजूच्या लोकांना सांगायचं आहे त्याचा स्वीकार करुन जगा! कसे? = इग्झॅक्टली हेच तर मनाला वाटतंय! म्हणून तर स्वीकृती स्वत:ला करायचीये हे लक्षात येत नाहीये. >काय ते ठरलं की मला कळवा बरं का सगळ्या चर्चापटूंनी. = काय कळवणार ते? कुठे बेशर्त स्वीकार केलाय त्यांनी? त्यांचाही लगाम मनाकडेच तर आहे. माझ्या लेखनाचा उपयोग करून घ्यायचा असेल तर असले व्यर्थ प्रतिसाद आणि त्याहीपेक्षा व्यर्थ म्हणजे इतर पोस्टवर माझ्या प्रतिसादांवर भंपक उपप्रतिसाद देऊन पर्सनल टार्गेटींग (याविषयी प्रशासनचं धोरण काय आहे कल्पना नाही), यातनं काही होणार नाही. एखाद्या प्रसन्न सकाळी उठता क्षणी निर्णय घ्या 'दाय विल बी डन! आणि मग त्या मूडमध्ये फक्त एक दिवस जगून बघा. तुमच्या जीवनाचा सारा रंग बदलेल. त्या अनुभवातनं मग प्रतिसाद द्या. तुम्हाला कळेल लेखन म्हणजे नुसते शब्द नव्हते त्यात अर्थ होता. यू विल एन्जॉय. __________________________ बिफोर आय क्लोज, 'दाय विल बी डन!' याचा अर्थ (जिझसला जरी) आकाशातला कुणी तरी परिस्थिती निर्माण करतो आणि आपण त्याला हो म्हणतो असा (त्या वेळी) वाटत असला तरी असा कुणी आकाशस्थ मानण्याची गरज नाही. कारण मग मन पुन्हा 'तो कोण?' 'एकदा त्याची मर्जी स्वीकारल्यावर तो माझी काळजी घेणार का?' असले प्रश्न निर्माण करेल. तर तसा कुणीही नाही. आपण परिस्थितीचा उहापोह करत नाही, फक्त तिचा बेशर्त स्वीकार करतो. काही भक्तिपंथी म्हणतील 'अरे ये सब केमीकल लोचे है भाई...आमचे संत फार सोपा सिद्धांत सांगतात : ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ' तर तसा अनंतही कुणी नाही आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 42463
प्रतिक्रिया 225

प्रतिक्रिया

In reply to by मदनबाण

इतके लाख लोक जातायतनं तिकडे, लावतायंत न रांगा, जोडतायतना हात? म्हणजे तो असणारच! या उलट, ज्याला कळलंय तो निश्चिंत असतो, त्याला इतरांच्या अनुमोदनची वाट पाहावी लागत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

बेशर्त स्वीकृतीवर सीडी अडकल्याने ही केस हाताबाहेरची असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.

In reply to by मदनबाण

स्पा कुठे आहेस रे ? तुझ्या प्रतिक्रियेची वाट बघतो आहे बरं !
तुम्हाला संक्षी समजलेत नाही असे म्हणेन बाकी चालू द्या

In reply to by स्पा

तुम्हाला संक्षी समजलेत नाही असे म्हणेन मग तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तरी सांगा आम्हा सर्वांना ! ;)

In reply to by मदनबाण

मग तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तरी सांगा आम्हा सर्वांना
त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतीलच

In reply to by स्पा

त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतीलच मूळ प्रश्नाचे उत्तर न देण्याची हातोटी वाखाणण्या सारखी आहे ! ;) तुम्ही तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तुमच्याच शब्दात सांगण्याचे कष्ट करा. तुम्ही त्यांचे लेखन "मन" लावुन वाचलेच असेल... आणि तसे असेल तर ते तुम्हाला कळलेच असेल असे गॄहीत धरुनच मी माझा प्रश्न विचारला आहे / होता. ;) आता तरी मूळ प्रश्नाचे उत्तर द्या.

In reply to by मदनबाण

तुम्ही तुम्हाला समजलेले संक्षी कसे आहेत ते तुमच्याच शब्दात सांगण्याचे कष्ट करा
एकच व्यक्ती प्रत्येकाला वेगवेगळी समजते, त्याला एकच असा कुठला नियम नाही . त्यामुळे तुम्हाला जे संक्षी दिसतील ते मला दिसतील असे नाही आणि वैस वर्सा.

In reply to by स्पा

एकच व्यक्ती प्रत्येकाला वेगवेगळी समजते, त्याला एकच असा कुठला नियम नाही . त्यामुळे तुम्हाला जे संक्षी दिसतील ते मला दिसतील असे नाही आणि वैस वर्सा. इथे आता अनेकांना संक्षी पूर्ण समजले आहेत. आम्हाला तुम्हाला समजलेले संक्षी आम्हाला जाणुन घ्यायचे आहेत. तुम्ही विचारलेल्या मूळ प्रश्नाचे उत्तर देण्याचे शिताफिने टाळले आहे.आम्हाला आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे.

In reply to by स्पा

३१ जुलै पर्यंत कंळाला गेला तर आम्हाला कळवा ! ;) रसग्रहण "मन" लावुन वाचण्यास आम्ही "बेशर्त" तयार आहोत. ;)

In reply to by स्पा

त्यांचे लेख जर तुम्ही नीट "मन" लाऊन वाचलेत , आणि ते समजले कि संक्षी समजतील>> स्पाचंद्रजी, तुम्हला माहित नाही का संक्षी हे नेहमी फेसलेस मॉबसाठी लिहितात. त्यामुळे त्यांच्या लेखनातून आपल्याला आपण स्वतःच दिसत असतो. त्यामुळे संक्षी कसे आहेत हे त्यांना स्वतःला त्यांचे स्वतःचे लेखन वाचल्यावर कळेल. आणि मग त्यांनी ते आपल्याला सांगितले तरच आपल्याला कळेल. अवांतरः वैयक्तिक प्रतिसाद देउ नक रे पोरांनो. संक्षी कसे आहेत, याच्याशी आपल्याला काय करायचय?

In reply to by मोदक

मोदकचंद्ररावजीसहेब, तुम्ही मला भर धाग्यावर 'संपादक' म्हणून संबोधत अहात, हाच खरं तर अत्यंत वैयक्तिक प्रतिसाद आहे!

अगोदर लेख कळला नाही आता प्रतिसादही डोक्यावरून जाताहेत.. आधी मन आणि शर्ती होत्या.. मग प्रेम उपटले .. आता तर गोष्टी किचन मध्ये पोहोचल्या आहेत... मला तर फक्त "शर्ती" संपून "शर्यती" सुरु झाल्या आहेत असेच वाट्ते. उगा एक विंग्रजी क्याप्श्न आठवले.. If you can not convince people , confuse them!

ज्यासी नाही बोध तो करतो दुसर्‍यास मन बोध चुकलेली वाट ज्याची, तो काय दाखविल मनमुक्तिची अवघड वाट. पेठकर काकांशी पुरेपुर सहमत.

In reply to by निश

अहो पण मागच्या धाग्यात तुम्ही संक्षींशी सहमत होता ना???? नक्की ठरवा एकदाचं कुणाशी सहमत आहात ते =))

In reply to by बॅटमॅन

मनाचिया गुंती गुंतला तुम्ही भ्रमरूपी भ्रमर डसलासी. आम्ही कोणासंगे तुम्हास होइल माहीत ठेवा नेहमी सहवास सज्जनांसंगे.

In reply to by निश

लेखाप्रमाणेच अतिअतिअवांतर - कोपऱ्यात उभी हिंदमाता आणि बेमटेरावांच नाव घेण्यात माझा नंबर पहिला – इति पु.ल. (असामी असामी)

लेख नीट वाचला. समोरच्या परिस्थितीचा बेशर्त स्वीकार करणं ही पराभवसूचक गोष्ट समजली जाते. ती तशी न मानता उलट तो विजय मानला पाहिजे. इनफॅक्ट परिस्थितीचा (बिनशर्त) स्वीकार म्हणजे जणू नेहमीच "हतबल शरणागत स्वीकृती" असा एक निराशाजनक टोन त्या प्रकाराला आपोआप दिला जातो. स्वतःकडे आणि आजुबाजूला पाहिलं तर परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार तर जाऊदेच, उलट परिस्थिती पूर्णपणे नाकारणे, डिनायल, डोळे मिटून दूध पिणे... अप्रिय वाटणार्‍या स्थितीला ती जणू नाहीच आहे असं समजून चालणे..असं एक आभासी-पॉझिटिव्ह टोक दिसतं- किंवा मग ती स्वीकारली आहे म्हणजे- चरफडत, नशिबाला बोल लावत, हतोत्साह होऊन "पत्करली" आहे.. प्राक्तन म्हणून झेलतो आहे असा दुसर्‍या टोकाचा ऋण अप्रोच दिसतो. या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच. आता यावर वाद न घालता त्याचा अंगिकार करुन पहावासा वाटला तर पहावा किंवा सोडून द्यावा हे स्वाभाविक असताना त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होतेय, आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय त्याच्या गाभ्याला पूर्णपणे सोडून होतेय. लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही. पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात. शेवटी "ठेविले अनंते" चे उत्तम उदाहरण दिले आहे. यातला अनंत (नको असल्यास) वजा करुन हाच मुद्दा महत्वाचा आहे. त्याला अन्य मार्गांनी फिरवून आणल्याने संभ्रम वाढू शकतो. तेव्हा मी अशी विनंती करुन पाहतो की संक्षींनी त्यांचे विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा. त्यांना (संक्षींना) स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.

In reply to by गवि

गविंशी सहमत. विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा.. हे तर अगदीच योग्य आहे. पण स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.. असे अजिबात नाही. वाचक विचारी आहेतच. अभ्यासू देखिल आहेत. आणि अनेक वाचक शहाणे आणि अनुभवीदेखिल आहेत. पण 'बाकी सगळे व्यर्थ, आणि मी सांगेन तेच बरोबर' हा टोन कुणीही कुठेही खपवून घेत नाही. शिवाय अनेकांसाथी अनेक संत, साधना सांगणारे गुरु हे त्यांच्या आईवडलांपेक्षाही जास्त जवळचे-पूजनीय असतात. त्याम्च्यावर विनाकारण टीका झाल्यास लोकांचा रोष ओढवणारच. लेखकानी त्यांचे स्वतःचे अनुभव योग्य शब्दात खुशाल मांडावेत. पण लोक कसे मूर्ख आहेत आणि मी कसा त्यांना शहाणं करायला आलोय, हा टोन बदलावा, अशी विनंती.

In reply to by कवितानागेश

स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.. असे अजिबात नाही. वाचक विचारी आहेतच. अभ्यासू देखिल आहेत. आणि अनेक वाचक शहाणे आणि अनुभवीदेखिल आहेत.
हं. मी असं म्हणायला हवं होतं की (वाचक अनुभवी असले तरी) संक्षी यांना आलेली ती विशिष्ट अनुभूति किंवा त्यांच्या मनात घडलेल्या त्या नेमक्या विशिष्ट विचारप्रकियांचाच अनुभव वाचकांना आलेला नसू शकत असल्याने (त्यांना काही आपापली वेगळी अनुभूती आली असेल.) त्यांचा गोंधळ उडू शकतो.. (बरेच ज्यादा शब्द वापरुन आणि अनेक अनावश्यक तुलना करुन विचार मांडले की). शिवाय मी एकटा शहाणा आणि तुम्ही सारे मूर्ख असा टोन असणं चुकीचंच, पण आपल्याला मनापासून पटलेला मुद्दा समोरच्याच्या मनातही उतरावा अशा तीव्र इच्छेने कधीकधी अहमहिकेने / आग्रहीपणे आपली भूमिका रेटली जाते, तसाही प्रकार कधीकधी होतो. माझं म्हणणं इतकंच आहे की विचार थोडक्यात मांडावा म्हणजे समोरच्याला स्पष्टपणे पटायला मदत होईल. यामुळे नंतर मेगाबायटी प्रतिसाद आणि क्वोटस देऊन खंडनमंडन करावं लागणार नाही. त्याउपर नाही पटलं तर फार रेटण्यात अर्थ नाही हे धोरण ठेवल्यास बरेचसे अस्थानी वाद टळतील हे महत्वाचं.

In reply to by गवि

कधीकधी अहमहिकेने / आग्रहीपणे आपली भूमिका रेटली जाते, तसाही प्रकार कधीकधी होतो.------ नेहमी होतोय! :)

In reply to by गवि

मला वाटातं की संक्षी नी "विचाराला" महत्व द्यावे... त्या विचारावे "त्यांच्या" आयुष्यात काय झालय त्याला नाही.. तो "माझा" विचार आहे.. "मला" अनुभुती आली आहे त्यामुळे "तोच योग्य आहे".. अशा गरज नसलेल्या गोष्टी लिहीणे टाळावे.. तसं झालं तर लोकही "विचारलाच" महत्व देतील.. "संक्षी" ना नाही... आणि हो.. जे काही असेल ते सरळ लिहावे.. उगा शब्दांचे मनोरे रचु नयेत...

In reply to by पिलीयन रायडर

लोकांची अक्कल काढणे देखील थांबवावे..
काय राव तुम्ही. पेंटागॉनमध्ये बसलेले तेलसमृध्द देशावर हल्ला करणार नाहीत अशी अपेक्षाच कशी करता तुम्ही.किंवा कितीही उगाळला तरी कोळसा काळा नसेल अशी अपेक्षा कशी करता तुम्ही. इतरांच्या अकला काढणे हा स्थायीभाव असला तर तो काहीही झाले तरी जाणे नाही.

In reply to by गवि

हा प्रतिसाद मला कळला आणि आवडला. कदाचित लेखकाच्या विचार मांडण्याच्या पद्धतीवर (मास्तरांच्या शिकवणीच्या पद्धतीवर) बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. संक्षीना कदाचित हेच सांगायचं असेल पण ते माझ्यासारख्या बर्‍याचजणांना समजण्यात अडचण येते.

In reply to by गवि

लेख नीट वाचला. समोरच्या परिस्थितीचा बेशर्त स्वीकार करणं ही पराभवसूचक गोष्ट समजली जाते. ती तशी न मानता उलट तो विजय मानला पाहिजे. इनफॅक्ट परिस्थितीचा (बिनशर्त) स्वीकार म्हणजे जणू नेहमीच "हतबल शरणागत स्वीकृती" असा एक निराशाजनक टोन त्या प्रकाराला आपोआप दिला जातो.
नाहि. "बेशर्त स्विकृति" नावाने विशद केलेलि प्रक्रिया ही एक दिशाभुल व अशक्यपाय गोष्ट आहे, हाच अन्वयार्थ मला अभिप्रेत आहे.
त्यांना (संक्षींना) स्वतःला अनेक विचारांची प्रत्यक्ष अनुभूति आलेली असली तरी वाचकांना ती आलेली नसल्याने त्यांचा एकदम गोंधळ उडू शकतो.
थोडं चुकलात. वाचकांच्या अनुभुतिचा संक्षिना विचार करता येत नसल्याने त्यांचा हमखास गोंधळ उडतो व त्यात ते अक्षरशः विचित्रपणे वाहवत जातात हे वास्तव आहे.
या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच.
"बेशर्त स्विकृति" नावाने विशद केलेलि प्रक्रिया ही एक दिशाभुल व अशक्यपाय गोष्ट आहे. बरेच चांगले विचार चक्क मी सुध्दा करतो/मांडु शकतो. म्हणजे ते वास्तववादी असतात दिशाभुल करणारे नसतिल असे न्हवे.
लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही.
इनोवेशनच्या नादात रुट कॉझ्कडे होत असलेले लेखकाचे अक्षम्य दुर्लक्ष. हेच मुलभूत कारण होय.
त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात.
नो कमेंट्स. वाचक सुज्ञ नाहित हि गोश्टच पटणे अशक्य. पण काहि वाचक संपुर्ण तैलानिक विचार पक्रियेला महत्व देउ इछ्चित नसल्यास संक्षि रॉक्स.

In reply to by गवि

गवि, सुंदर विवेचन.. आवडलं. पण 'बिनशर्त सहमती = समाधान' हे असेल तर आणखी चांगलं होण्यासाठी प्रयत्न का करायचा? परिस्थितीचा स्विकार न करता 'डिनायल मोड' मध्ये जाणं जसं चुकीचं तसंच 'ठेवले अनंते'पण चुकीचं.. मला शोभेल असं उदाहरण द्यायचं झाल्यास -- एका 'पनिशमेंट पोस्टींग' मानल्या गेलेल्या जागी, जिथे भरपुर अनागोंदी कारभार आहे, कटकटी आहेत, ट्रांसफर झाल्यावर अशी केस होईल. पहीला पर्याय - डिनायल : न जाण्यासाठी प्रयत्न करणे. जावंच लागल्यास, तिथे चीडचीड करत जगणे, आणि सटकायचा प्रयत्न करणे. दुसरा पर्याय - बिनशर्त स्वीकृती : आहे ते चालू देणे. 'पार्ट आॅफ द गेम' होणे.. तिसरा पर्याय - स्वीकृती आणि प्रयत्न : जे आहे, त्याला शांतपणे विचार करुन, सुधारण्याचा प्रयत्न करणे.. मालक, 'बिनशर्त स्वीकृती' मानल्यास माझी स्वाक्षरीच बाद होते की..

In reply to by गवि

लेख नीट वाचला. ...आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय... लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही...पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात.... अग्दी ब्रोब्रर!

यातला गुरुदेवांच्या "हु आर यु?" चा उल्लेख वाचुन गटण्याचे "आजच्या जगात विशुद्ध प्रेम कुठेच मिळत नाही" हे सांगणे आठवले.. जे खर्‍या नाटकात एका विनोदी पात्राच्या प्रसंगात असते..

>या पार्श्वभूमीवर परिस्थिती बिनशर्त स्वीकारणे हाच तिच्याशी डील करण्याचा / कंट्रोल करण्याचा मार्ग आहे असा विचार या लेखात मला दिसला. हा विचार नक्कीच वेगळा आहे. कितपत नवा आहे किंवा क्रांतिकारी आहे यावर काही म्हणणं नाही, पण एक चांगला विचार आहेच. = दॅटस द पॉइंट. मला हेच नवल वाटतं. लोक डोक्यावरून गेलं, काही समजलं नाही वगैरे कसं म्हणतात? >आता यावर वाद न घालता त्याचा अंगिकार करुन पहावासा वाटला तर पहावा किंवा सोडून द्यावा हे स्वाभाविक असताना त्यावर बरीच उलटसुलट चर्चा होतेय, आणि मुख्य म्हणजे लेखकाने जे काही मुळात म्हटलंय त्याच्या गाभ्याला पूर्णपणे सोडून होतेय. = दॅटस द वेरी पॉइंट अगेन. विडंबनं काय, उलटसुलट प्रतिसाद, त्यावर उपप्रतिसाद काय फुल कल्ला चललायं. >लेखातला मूळ मुद्दा विचार करण्याजोगा असूनही असं का होतंय? याचं कारण समजत नाही. पण मर्यादित विचारप्रक्रियेनुसार असं वाटतंय की संक्षी यांनी मूळ मुद्दा मांडून झाल्यावर त्याविषयी पुन्हा बुचकळा उत्पन्न करणारी वेष्टने / पुटे त्यावर दिली आहेत की काय..? त्याचं असं आहे की वाचकांचा जास्त घोळ झाला की त्यांना अधिकाधिक विरोधाभास, विसंगती अशा गोष्टीं दिसायला लागतात. = अशी विधानं दा़खवून दिली तर त्यावर नक्की चर्चा होऊ शकेल. >शेवटी "ठेविले अनंते" चे उत्तम उदाहरण दिले आहे. यातला अनंत (नको असल्यास) वजा करुन हाच मुद्दा महत्वाचा आहे. त्याला अन्य मार्गांनी फिरवून आणल्याने संभ्रम वाढू शकतो. = नाऊ जस्ट सी धीस : अनंत हा पहिला गोंधळ आहे कारण ती मानवी कल्पना आहे. यू आर अगेन इन द रिल्म ऑफ माइंड. `आणि समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं, असू द्यावं लागत नाही' ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे कारण `असू द्यावे' ही पुन्हा मनाची मनधरणी आहे, तो प्रयास आहे. वास्तविकात समाधान ही स्वीकृतीची परिणिती आहे, ते येतंच आणि कायम राहतं. >तेव्हा मी अशी विनंती करुन पाहतो की संक्षींनी त्यांचे विचार आटोपशीर आणि नि:संदिग्ध अशा निवडक वाक्यांतून मांडावेत. तसेच आपण मांडलेला विचार तत्सम अन्य विचारधारांपेक्षा कसा वेगळा आहे यावर भर न देता फक्त आपला विचार मांडून सुटसुटीतपणे वाचकाला तो पचवू द्यावा. इथे मजा आहे : १) आता जोपर्यंत `ठेविले अनंतेपेक्षा' `बेशर्त स्वीकृती' वेगळी आहे सांगितलं जात नाही तोपर्यंत लेखाला अर्थच नाही. तो वेगळा विचार असू शकत नाही. इट विल वी रिपीटींग द ओल्ड. २) प्रक्रियेचा अंगिकार न करता, तदनुषंगिक अनुभवावर चर्चा न होता वाचकांना विचार कसा पटणार? ३) एखादा वेगळा विचार मांडणं आणि तो प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळा आहे हे ठामपणे सांगणं यात (सदस्य आणतायंत त्या) अहंकाराचा संबंध कुठे येतो? मला वाटतं तू यातनं मार्ग काढू शकशील. तू सुचव मी नक्की विचार करीन.

In reply to by संजय क्षीरसागर

१) आता जोपर्यंत `ठेविले अनंतेपेक्षा' `बेशर्त स्वीकृती' वेगळी आहे सांगितलं जात नाही तोपर्यंत लेखाला अर्थच नाही. तो वेगळा विचार असू शकत नाही. इट विल वी रिपीटींग द ओल्ड. २) प्रक्रियेचा अंगिकार न करता, तदनुषंगिक अनुभवावर चर्चा न होता वाचकांना विचार कसा पटणार? ३) एखादा वेगळा विचार मांडणं आणि तो प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळा आहे हे ठामपणे सांगणं यात (सदस्य आणतायंत त्या) अहंकाराचा संबंध कुठे येतो?
फक्त हे थोड्याश्या सोप्या भाषेत मला सांगा ना बाकी प्रतिसाद आवडलाच , आणि गाविंचा पण अवांतर : चला आमच्या टीम मध्ये गवी आले :)

In reply to by स्पा

तू आधी कुंपणावरून खाली उतर आणि आमच्या पिटात ये.

In reply to by पैसा

आमच्या
पिटात ये. म्हणजे तुम्ही विरोधी कंपूत आहात का..??

In reply to by मोदक

पिटात प्रेक्षक बसतात टाळ्या आणि शिट्ट्या वाजवणारे.

In reply to by संजय क्षीरसागर

मला वाटतं तू यातनं मार्ग काढू शकशील. तू सुचव मी नक्की विचार करीन. बगा बगा आपले सायेब कित्ती मोठठया मनाचे आहेत.

रावणकाय फाष्ट बॉलरने टाकलेला एखादा चेंडू बॅट्समनच्या नाकाशी सलगी करून गेला, की "ही स्मेल्ट लेदर" असं कॉमेंट्रीत म्हंटात. तसे हे लेख मला चामड्याचा वास देतायत. पण एक मात्र खरं - मी प्रतिसादांची गम्मत बघायला येतो ;)

In reply to by बॅटमॅन

अरे सामील कसलं व्हा? काहीतरी बेसिक तरी झेपायला पाहिजे ना! -- लटिके माझे लटिके तुझे। लटिके ओझे लटिक्याचे।। - संत तुकाराम

शतकासाठी आमचा हा प्रतिसाद मदत करेल अशी अपेक्षा आहे. सर आमच्यासाठी नेहमीच स्फूर्तिस्थान ठरलेले आहेत. धन्यवाद.

In reply to by प्यारे१

@सर आमच्यासाठी नेहमीच स्फूर्तिस्थान ठरलेले आहेत. धन्यवाद.>>> =)) या प्यारे ला ,त्या पांडुबरोबर बांधायला न्यारे. ;-)

मागे मी कुठेतरी एक वाक्य वाचले होते. मला वाटते की ते वाक्य व्यवस्थित आचरणात आणले तर बर्‍याच गोष्टी सोप्या होतील. ते वाक्य आहे: "God, grant me the serenity to accept the things I cannot change, courage to change the things I can and wisdom to know the difference" पण काय असते की "गॉड" कसा नाही हेच सिध्द करण्यात आपला सगळा वेळ जातो आणि मुख्य गाभ्याकडे मात्र दुर्लक्ष होते.

In reply to by क्लिंटन

हेच वाक्य आमच्या फॅक्टरीच्या एच आर डी च्या ट्रेनिंग सेंटरच्या दरवाज्यावर लावलेले आठवतेय ! ते एच आर डी चा मूलमंत्र म्हणून लावले असावे काय ?

In reply to by चौकटराजा

हे वाक्य डेल कार्नेगींच्या "हाऊ टू स्टॉप वरिंग अ‍ॅन्ड स्टार्ट लिव्हिंग" या पुस्तकात दिले आहे.

In reply to by क्लिंटन

>>पण काय असते की "गॉड" कसा नाही हेच सिध्द करण्यात आपला सगळा वेळ जातो आणि मुख्य गाभ्याकडे मात्र दुर्लक्ष होते. -- "wisdom to know the difference" हि खरी मेख आहे :)

हे सर्व लेख वाचकांना 'आत्मपरिक्षण' करण्यास प्रवृत्त करतात, हा फायदा काय थोडा आहे? ... म्हणजे काहीतरी वाचायचे वा ऐकायचे, त्याने तात्पुरते भारून जायचे, त्यातच होणारा 'आत्मसाक्षात्कार' की अरे, हे तर सर्व मला अवगतच आहे, हे तर सर्व मी माझ्या जीवनात उतरवलेलेच आहे, म्हणजे मी किती थोर वगैरे आहे.... मग येणारी बेचैनी, की माझे हे थोरपण मी दुसर्‍यांना पटवून दिले नाहे, तर त्याला काय अर्थ?.... आणि अन्य सर्वजण अर्थातच या गोष्टीपासून वंचित आहेत... वाट चुकलेली कोकरे आहेत बिचारी... त्यांना सर्व नीट समजावून सांगितलेच पाहिजे... आणि मग त्यासाठी लेखन प्रपंच, आणि जरा काही विपरित प्रतिसाद आला, तर होणारी चिडचिड ... कळत कसे नाही या मूर्खांना, एवढे सोपे करून तर सांगितले आहे मी... नीट न वाचताच प्रतिसाद ... ... सुजाण वाचक हे सर्व बघून आत्मपरिक्षण करू लागतो, की असे मी तर करत नाही ना? हेच या लेखांचे यश.