✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

`रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)

स
संजय क्षीरसागर यांनी
Sat, 06/15/2013 - 12:58  ·  लेख
लेख
मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता) ओशो __________________________________ मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे. विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील. अनेकानेक अंगांनी मनाचा सांगोपांग वेध घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतनं होईल. वेगवेगळ्या सिद्धांचं मनाविषयीचं आकलन, व्यक्तिमत्त्वाची घडण, आपली स्मृती, माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, मनाचा कल आणि व्यक्तिगत कौशल्य, संगीत, खेळ, फ्रॉइड आणि इतर दिग्गज मनोतज्ज्ञांचे विचार, मानवी नातेसंबंध, मनाचं हृदयाशी नातं (भावनिक विश्व : आनंद, नैराश्य, न्यूनगंड, अल्झायमर, आत्महत्या वगैरे), मानसिक धारणा, भक्तिमार्ग आणि इतर आध्यात्मिक मार्गातल्या मनापलीकडे नेणार्‍या साधना पद्धती आणि सरते शेवटी मनापासून मुक्ती असा लेखनाचा समग्र आवाका असेल. ____________________________ प्रथम मनाचं अत्यंत उघड स्वरूप समजावून घेऊ. मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते. श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद) मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे. संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ‘पहिली संवेदना’ हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजपर्यंत हजारो सिद्धांनी ‘ शांत बसून मनाकडे पाहा’ असा संदेश दिला आहे आणि आजही मनापलीकडे जाण्यासाठी ‘मनाचं तटस्थ अवलोकन’ ही (आध्यात्मिक) जगातली सर्वमान्य साधना मानली जाते. अगदी बुद्धापासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत (इंन्क्लूडिंग ओशो) सर्व ज्ञानमार्गी या साधनेचा पुरस्कार करतात. आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे. (भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. अर्थात त्याविषयी मी इतक्यात काहीही लिहिणार नाही किंवा त्यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ नयेत.) मनाचं अवलोकन व्यर्थ का आहे हे जाणणं अगत्याचं आहे. कारण मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’ असा आहे. मुक्त तर आपण ऑलरेडी आहोतच. मनाच्या प्रक्रियेमुळे आपण बंधनात असल्याचा भास होतोय आणि म्हणून मनाची प्रक्रिया जाणणं उपयोगी आहे. मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अ‍ॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर नेईल ते सांगता येत नाही. मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो. मनाचं अवलोकन करताना आपण डोळे मिटून शांत बसलेलो असतो आणि या स्मृतीच्या चलत-चित्रपटात इतके गुंतून जातो की अवलोकन कशासाठी करतोय हेच लक्षात राहत नाही. मग मधून केव्हा तरी आपण कुठेही गेलेलो नाही, जागेवरच बसलो आहोत याचं भान येतं. मग थोडा वेळ शांत वाटतं. त्यानंतर कोणत्या तरी संवेदनेनं पुन्हा स्मृती सक्रिय होते मग पुन्हा आपण भोवर्‍यात सापडतो आणि या कामात बर्‍याच वेळा झोप लागून जाते. जाग आली की झक मारली आणि वेळ घालवला असं वाटायला लागतं. पण इतक्या थोर लोकांनी सांगितलेली साधना व्यर्थ कशी असेल म्हणून लोक रोजरोज ध्यान करत राहतात. त्यांना ज्याम कंटाळा येतो, यांच्या साधनेमुळे बर्‍याच वेळा घरचे वैतागतात (कारण साधनाकालात घरात शांतता लागते) पण सांगणार कुणाला? . शेवटी ते गुरुंना विचारतात आणि गुरू सांगतात ‘साधना कमी पडते आहे, जास्त वेळ बसत चला’. अशी साधना जन्मभर केली तरी काही उपयोग होत नाही कारण साधकाला मनापासून मुक्ती मिळत नाही. मनाचं अवलोकन करायचा प्रश्न नसून त्याची चक्राकार गती जाणणं महत्त्वाचंय. म्हणजे ‘पहिला विचार कुठून सुरू झाला’ हे विचार मालिका सुरू असताना ‘कुठे तरी मध्ये थांबून बॅक ट्रॅक करणं’ ही खरी प्रोसेस आहे. ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे. हे काम अत्यंत कौशल्याचं आहे पण आता तुम्हाला प्रक्रिया कळल्यानं ते नुसतं सोपंच नाही तर अत्यंत इंटरेस्टिंग झालंय. ज्या क्षणी तुम्ही पहिला विचार जाणाल त्या क्षणी तुम्हाला कोणत्या संवेदनेनं तुमचा पहिला विचार निर्माण झाला ते कळेल. आणि मी संवेदना ही मनाची कारक आहे असं का म्हटलंय ते लक्षात येईल. जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्ती अनुभवाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल. ________________________________ ‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ असं मनाचं अत्यंत कलात्मक वर्णन करणार्‍या काव्यपंक्तीचं श्रेय अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांना विनम्र अर्पण ________________________ पूर्वप्रकाशन : मनोगत
  • रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)
  • रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)
  • रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)

Book traversal links for `रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)

  • रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
47295 वाचन

💬 प्रतिसाद (211)

प्रतिक्रिया

नीट समग्रतेनं लेख वाचून प्रतिसाद द्यावेत

संजय क्षीरसागर
Sun, 06/16/2013 - 21:33 नवीन
पाचही संवेदनांचा उल्लेख सुरूवातीलाच केला आहे :
श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद) मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे.
आपण नॉर्मल मनाचा उलगडा करून घेतो आहोत. तुम्ही अपवादात्मक केसेसमधे आणू नका. हेलन केलर डेफ-ब्लाइंड होती आणि ती यश मिळवू शकली याचा अर्थ तीनं बाकीच्या तीन संवेदनांच्या मदतीनं तृटी भरून काढली. पण याचा अर्थ तिला मन नव्हतं असा नाही. मेंदू सर्व संवेदनांच्या रेकॉर्डींगचं काम करतो. तिला मेंदू नव्हता असं नाही. जाणिव आपल्याला होते ती इंद्रियगम्य असते (पाच संवेदना) आणि मेंदूत त्याची साठवण केली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

माझा सर्वात प्रमुख आक्षेप हा

अग्निकोल्हा
Sun, 06/16/2013 - 21:41 नवीन
मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते.
याच वाक्याला आहे. तो तुम्हाला विनाशंका मान्य असेल तर लेखातिल इतर चुकिच्या मुद्यांवरही विस्त्रूत चर्चा होइल. त्यातही अपवादात्मक केसेसकडे लक्ष द्यायची गरजच नाहिये. अगदी सामान्य उदाहरणेच लेखातिल त्रुटि स्पश्ट करतिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

असो. अनावश्यक फाटे फोडण्यापेक्षा आवरत घेतो.

अग्निकोल्हा
Sun, 06/16/2013 - 21:49 नवीन
माणुस ज्या इंद्रियाचा वापर इतरांशी क्म्युनिकेशन करायला सगळ्यात जास्त वापरतो (नॉर्मल माणुस द्रुक श्राव्य माध्यम) त्याच्या संबधिच स्मृति सगळ्यात जास्त असतात. म्हणजे एखाद्याने आयुष्यभर ब्रेल लिपितुन शिक्षण घेतले असेल तर त्याची ९५% स्मृति ही स्पर्श ज्ञानाने व्यापलेली असणार. विजुअल्सने न्हवे. म्हणुनच ज्या इंद्रिय साधनाचा वापर जास्त त्या संबंधी स्मृति जास्त इतकच मला म्हणायच आहे. म्हणुनच माझा मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते (जवपास ९५%). या वाक्याला तिव्र आक्षेप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

शाब्बास आणि अभिनंदन!

संजय क्षीरसागर
Sun, 06/16/2013 - 22:02 नवीन
माणुस ज्या इंद्रियाचा वापर इतरांशी क्म्युनिकेशन करायला सगळ्यात जास्त वापरतो (नॉर्मल माणुस द्रुक श्राव्य माध्यम) त्याच्या संबधिच स्मृति सगळ्यात जास्त असतात
आता तुम्ही नॉर्मलवर आलात!
असो. अनावश्यक फाटे फोडण्यापेक्षा आवरत घेतो.
लेखन नीट वाचलंत तर असा प्रसंग पुन्हा येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तुम्ही सर्वात हुशार आहात. कंपेर टू बुध्द, जेके, अन ओशो टु

अग्निकोल्हा
Sun, 06/16/2013 - 22:35 नवीन
लेखन नीट वाचलंत तर असा प्रसंग पुन्हा येणार नाही.
अहो वाचलंच होतं म्हणून तर फाटे फोडत होतो. पण अचानक चर्चेची उर्मीच गेली बघा. वाटलं कशाला हा विक्षिप्त टाइमपास ? कारण फाटे फोडता फोडाता कंटाळा येउन एखादा अतिशय महत्वाचा व योग्य मुद्दा समजा अतिशय व्यवस्थित विरोधात सांगुनही गेलो तरी तो थोडाच तुमच्याकडुन मान्य केला जाणार आहे ? भेंडी, जो बुध्द जेके अन ओशों, एकाच लायनीत आउटस्मार्ट करतो तेच्या पुढं सालं आपन कोण बे बोलणारे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एखादा अतिशय महत्वाचा व योग्य मुद्दा ?

संजय क्षीरसागर
Mon, 06/17/2013 - 00:18 नवीन
मुद्दा आहेच कुठे?
समजा अतिशय व्यवस्थित विरोधात सांगुनही गेलो तरी तो थोडाच तुमच्याकडुन मान्य केला जाणार आहे ?
तुम्हाला `विक्षिप्त टाइमपास' वाटला असला तरी मला नाही. मी सर्व उत्तरं प्रामाणिकपणे दिली आहेत
भेंडी, जो बुध्द जेके अन ओशों, एकाच लायनीत आउटस्मार्ट करतो तेच्या पुढं सालं आपन कोण बे बोलणारे ?
मी `मनाचं अवलोकन' या साधनेला त्या सर्वांच्या असणार्‍या दुजोर्‍याबद्दल लिहीलं आहे. या सर्वांचा समग्र आणि सखोल अभ्यास केल्याशिवाय तसं म्हटलेलं नाही. त्या सर्वांचे उत्तमोत्तम पैलू आज माझ्याकडे आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी असेन. त्यांना आउटस्मार्ट वगैरे करण्याचा विचारही मी करू शकत नाही. पण `अवलोकन' साधनेचा दोष मला माहिती आहे आणि सर्वांना उपयोगी व्हावी म्हणून एक नवी साधना सांगितलीये. तुम्ही त्या प्रक्रियेचा काहीही संबंध न ठेवता : डायरेक्ट हेलन केलरला मन नव्हतं का? लेखनातल्या त्रुटी, इतर त्रुटींवर विस्तृत चर्चा, मन नष्ट झालं काय? वगैरे सुरू केल्यामुळे तुमच्या आकलनातल्या त्रुटी दाखवाव्या लागल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तुमच्या आकलनातल्या त्रुटी

राजेश घासकडवी
Mon, 06/17/2013 - 07:39 नवीन
तुमच्या आकलनातल्या त्रुटी दाखवाव्या लागल्या.
माझ्याही आकलनात अनेक त्रुटी आहेत बहुतेक. त्या दाखवून देण्यासाठी तुम्ही किती चार्ज करता? मिपावरती जाहीर चर्चा करण्याऐवजी मला प्रायव्हेट सेशन आवडेल, म्हणून विचारतो आहे. व्यनिने उत्तर दिलंत किंवा खरडवहीत कळवलं तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ज्जे बात!

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/17/2013 - 08:14 नवीन
ज्जे बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सामान्य उदाहरणेच लेखातिल त्रुटि स्पश्ट करतिल?

संजय क्षीरसागर
Sun, 06/16/2013 - 21:56 नवीन
तुम्ही उत्तरं न वाचताच प्रतिसादांचा सपाटा लावला आहे.
आज सकाळिच पावसात खाल्लेल्या कांदाभजिची जिभेवर चव रेंगळणे यात मनाच्या ऑड्योव्हिड्योमेमोरीचा संबधच नाहीये म्हणजे मन नष्ट झाले की काय ?
स्वाद आणि गंध या इंद्रियगम्य संवेदना आहेत आणि त्यांची स्मृती मेंदूत आहे. तुम्ही सारखं `मन नष्ट झालं काय?' असा घोषा लावला आहे. लेखनात एक पैश्याची चूक नाही. तुम्हाला रेकॉर्ड आणि रेकॉर्डिंग डिवाइस यातला फरक कळत नाहीये. जर सकाळी केलेल्या गोष्टीची स्मृती संध्याकाळी होत नसेल तर तो मेंदूचा प्रॉब्लम आहे, मनाचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

क्षीरसागरजी, सर्वात आधी एक

मदनबाण
Mon, 06/17/2013 - 10:32 नवीन
क्षीरसागरजी, सर्वात आधी एक प्रश्न विचारतो... तो म्हणजे मन कुठे असते ते तुम्हाला माहित आहे का ? आजपर्यंत हजारो सिद्धांनी ‘ शांत बसून मनाकडे पाहा’ असा संदेश दिला आहे आणि आजही मनापलीकडे जाण्यासाठी ‘मनाचं तटस्थ अवलोकन’ ही (आध्यात्मिक) जगातली सर्वमान्य साधना मानली जाते. अगदी बुद्धापासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत (इंन्क्लूडिंग ओशो) सर्व ज्ञानमार्गी या साधनेचा पुरस्कार करतात. आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे. युरेका युरेका ! ;) माझे मत :- कुठलीही साधना कधीही व्यर्थ जात नाही,जसे कुठलेही ज्ञान व्यर्थ नसते. भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. सर्वात हास्यास्पद विधान ! आता काही ओव्या देतो:--- आम्हा नामाचे चिंतन । राम कृष्ण नारायण। तुका म्हणे क्षण । खाता जेविता न विसंभो ॥३॥ म्हणोनि भिन्न भेद नाही । देवा आम्हा एकदेही । नाही जालो काही । एका एक वेगळे ॥धृ॥ संत तुकाराम गोंदवलेकर महाराजांचे एक वाक्य :- मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे: आपण नामात रहावे, आणि दुसऱ्यास नामास लावावे. संसारात न्युन पडू देऊ नये आणि भगवंताला विसरु नये. आता मला सांगा हे संत वेडे की तुम्ही शाहणे ? मनाचं अवलोकन व्यर्थ का आहे हे जाणणं अगत्याचं आहे. कारण मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’ असा आहे. मनाचे श्लोकांचा काही भाग इथे देतो :- प्रभाते मनी राम चिंतीत जावा। पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो। जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥ मना वासना दुष्ट कामा न ये रे। मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥ मना सर्वथा नीति सोडूं नको हो। मना अंतरीं सार वीचार राहो॥४॥ मना पापसंकल्प सोडूनि द्यावा। मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ मना कल्पना ते नको वीषयांची। विकारे घडे हो जनी सर्व ची ची॥५॥ नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे। मना बोलणे नीच सोशीत जावें॥ स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे। मना सर्व लोकांसि रे नीववावें॥७॥ इति रामदास स्वामी रामदास स्वामींनी "मनाचे" श्लोक लिहले ते मनाचे अवलोकन आणि त्यावर नियंत्रण करता यावे यासाठीच ना ?इतर कुठले वेगळे कारण असेल तर कॄपया मला जरुर सांगा,२-४ ज्ञानकण "मनात" साठवीन म्हणतो. मनाचं अवलोकन करताना आपण डोळे मिटून शांत बसलेलो असतो आणि या स्मृतीच्या चलत-चित्रपटात इतके गुंतून जातो की अवलोकन कशासाठी करतोय हेच लक्षात राहत नाही. मग मधून केव्हा तरी आपण कुठेही गेलेलो नाही, जागेवरच बसलो आहोत याचं भान येतं. मग थोडा वेळ शांत वाटतं. त्यानंतर कोणत्या तरी संवेदनेनं पुन्हा स्मृती सक्रिय होते मग पुन्हा आपण भोवर्‍यात सापडतो आणि या कामात बर्‍याच वेळा झोप लागून जाते. जाग आली की झक मारली आणि वेळ घालवला असं वाटायला लागतं. यावरुन एकच गोष्ट सहज सिद्ध होते ती म्हणजे मनाला लगाम लावणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे वाटते तितके सोप्पे अजिबात नाही.शरीररुपी रथाला बुद्धीरुपी लगाम लावल्यास मनरुपी घोडे नियंत्रणात येतात. मनाचं अवलोकन करायचा प्रश्न नसून त्याची चक्राकार गती जाणणं महत्त्वाचंय. मनाचे अवलोकन केले नाही तर त्याच्या गतीचा प्रभाव कसा कळणार ? ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे. ज्या क्षणी मनाला फक्त एकाच गोष्टीवर नियंत्रीत करण्यात यश मिळते त्या क्षणी इतर विचार नाहीसे होतात.हिप्नोटिझम किंवा साउंडमेडिटेशन मधे माईंड ड्रिफ्ट ऑफ {drift of } होते."गाढ झोपेत" सुद्धा माईंड ड्रिफ्ट ऑफ होते.{ drift off } मला फक्त पक्षाचा डोळाच दिसतो आहे हे अर्जुनाने दिलेले उत्तर इतर विचारापासुन तो वेगळा झाला आहे आणि लक्ष फक्त एकाच जागी केंद्रित झाले आहे याचे उत्तम उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मन कुठे असते ते तुम्हाला माहित आहे का ?

संजय क्षीरसागर
Wed, 06/19/2013 - 23:27 नवीन
मनाचा (या लेखापुरता) प्राथमिक अर्थ `विचारांची प्रक्रिया' असा आहे, ती मेंदूत चालू असते.
आता मला सांगा हे संत वेडे की तुम्ही शाहणे ?
सध्या मी `नाम साधनेवर ' काहीही लिहीणार नाही हे प्रथमच सांगितलं आहे.
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
आता तुम्ही सांगा, कुठे असतो हा राम?
यावरुन एकच गोष्ट सहज सिद्ध होते ती म्हणजे मनाला लगाम लावणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवणे वाटते तितके सोप्पे अजिबात नाही.
सोपं आहे असं मी म्हणतोय, फक्त प्रक्रिया योग्य हवी. ती तुम्ही करून पाहिली की लक्षात येईल. प्रक्रिया निर्वैयक्तिक आहे आणि त्यासाठी कोणत्याही श्रद्धेची गरज नाही.
मनाचे अवलोकन केले नाही तर त्याच्या गतीचा प्रभाव कसा कळणार ?
एक अत्यंत सोपी प्रक्रिया लेखात सांगितली आहे. पण मजा म्हणजे त्याविषयी कुणीही काहीही बोलत नाहीये.
ज्या क्षणी मनाला फक्त एकाच गोष्टीवर नियंत्रीत करण्यात यश मिळते त्या क्षणी इतर विचार नाहीसे होतात
तसं नाही. तुम्ही विचारांच्या कारक असलेल्या पहिल्या संवेदनेपाशी येता तेव्हा मनाची सर्व प्रक्रिया थांबते.
हिप्नोटिझम किंवा साउंडमेडिटेशन मधे माईंड ड्रिफ्ट ऑफ {drift of } होते."गाढ झोपेत" सुद्धा माईंड ड्रिफ्ट ऑफ होते.
निद्रेवर अजून लेखन होणार आहे.
मला फक्त पक्षाचा डोळाच दिसतो आहे हे अर्जुनाने दिलेले उत्तर इतर विचारापासुन तो वेगळा झाला आहे आणि लक्ष फक्त एकाच जागी केंद्रित झाले आहे याचे उत्तम उदाहरण आहे.
ते मनाच्या केंद्रिकरणाचं उदाहरण आहे, ती मनाची एक क्षमता आहे. आपण संपूर्ण मनाच्या प्रक्रियेचा उलगडा करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सध्या मी `नाम साधनेवर '

मदनबाण
गुरुवार, 06/20/2013 - 13:04 नवीन
सध्या मी `नाम साधनेवर ' काहीही लिहीणार नाही हे प्रथमच सांगितलं आहे. मग भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. हे वाक्य लिहायचे कष्ट कशाला घेतलेयत? आता तुम्ही सांगा, कुठे असतो हा राम? राम चिंतनात असवा असा त्या ओवीचा बोध आहे. तुम्ही विचारांच्या कारक असलेल्या पहिल्या संवेदनेपाशी येता तेव्हा मनाची सर्व प्रक्रिया थांबते. कुठल्याही मेडिशन मधे हेच साधले जाते.किंवा ते साधण्यासाठीच प्रयत्न केला जातो. मग त्राटक करा, श्वासावर लक्ष करा किंवा सेल्फ हिप्नोसिस करा. ते मनाच्या केंद्रिकरणाचं उदाहरण आहे, ती मनाची एक क्षमता आहे. मनाचे केंद्रिकरण तेव्हाच होउ शकते जेव्हा इतर विचार मनातुन निघुन जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

राम चिंतनात असवा असा त्या ओवीचा बोध आहे.

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/20/2013 - 13:28 नवीन
ते वाचून कळतंय हो पण प्रश्न सरळ आहे : कुठे असतो हा राम? एकदा याचं नक्की उत्तर दिलंत की मग मनाची प्रक्रिया उलगडणं सोपं होईल. भ्रमाची प्रक्रिया उलगडणं अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कुठे असतो हा राम?

मदनबाण
गुरुवार, 06/20/2013 - 16:38 नवीन
कुठे असतो हा राम? आंतर मनात आणि बाह्यमनात सुद्धा ! मला वाटत बाह्य मनातुन तो आंतरमनात साठवावा म्हणु चिंतन करण्यावर भर दिला जातो. बाकी भ्रम नक्की कोणाला होतो ? मनाला की मेंदुच्या प्रोसेसिंगला ? भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. हे वाक्य लिहायचे कष्ट कशाला घेतलेयत? आता या प्रश्नाचे उत्तर द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>>>भ्रम नक्की कोणाला होतो ?

प्यारे१
गुरुवार, 06/20/2013 - 17:38 नवीन
>>>भ्रम नक्की कोणाला होतो ? अजून समजलं नाहीये का ? - 'अ‍ॅसिडीटीने जळजळग्रस्त' प्यारे१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अच्छा अच्छा असं हाय का ?

मदनबाण
गुरुवार, 06/20/2013 - 21:16 नवीन
अच्छा अच्छा असं हाय का ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आपल्या प्रतिसादाला सविस्तर उत्तर

संजय क्षीरसागर
Fri, 06/21/2013 - 19:07 नवीन
खाली दिलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

उत्तम लेखमाला. माझे डोळे

प्यारे१
Wed, 06/19/2013 - 23:42 नवीन
उत्तम लेखमाला. माझे डोळे फाडकन उघडले सरांचे प्रतिसाद वाचून. आणखीन येऊ द्या. अवांतरः थोडी जाहिरात करतोय संजय सर. सॉरी. तुम्हाला आक्षेप नसला तर. आमचे येथे चीनी तत्त्ववेत्ते मा. श्री. मा. मा झीचीस्ट (मन्क-लर) झेन साधू (मन्क हा इंग्रजी शब्द आहे. ) ह्यांची व्याख्यानमाला सुरु होत आहे. श्री. विशाल जी कुल्कर्णी ह्यांनी अतिशय कष्टाने त्यांना तिबेटच्या पर्वतराशीतून इकडे आमंत्रित केले आहे. सर्वांनी लाभ घ्यावा ही णम्र विनंती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मनसे मुक्ती ही तो दरअसल

अग्निकोल्हा
गुरुवार, 06/20/2013 - 00:29 नवीन
मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो अशी सुरुवात वाचल्यावर वाटलं किमान ओशोला तरी या लेखात यड्यात काढलं जाणार नाही. पण काय बोलावे ओशोच म्हणन पटतय पण, त्याने सांगितलेली साधना मात्र चुकिची आहे व त्यावर यांनी शोधलेला उपाय हिच खरी योग्य साधना आहे असा विरोधाभास वाचल्यावाचल्याच उडालो. पण... म्हटलं ज्याने पुन्हा बुध्द जेके अन ओशोंला एकाच लायनीत आउटस्मार्ट केले त्यो मानुस मोठ्ठाच असणार. वाटलं अन विचार आला ह्यांनी तर "प्रोसेस पेटंट" घेयाला पायजेल. संजयभाउ या संदर्भात जरुर अर्ज करावा. एकदा मनोमुक्तिचे "प्रक्रिया पेटंट" मिळवलेना तुम्हि म्हणजे सगळे एका दमात वटणिवर येतिल. कोर्टापुढ कोनीबी मोटा नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तुम्ही सांगितलेली प्रक्रिया करून तर पाहा, तुम्हाला लगेच कळेल

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/20/2013 - 07:31 नवीन
मला प्रोसेस पेटंट घेण्यात काही रस नाही आणि कुणाला वेड्यात काढण्यात तर त्याहून नाही. मी फक्त एक सोपी आणि नवीन प्रक्रिया सांगतोय जी प्रचलित साधनेपेक्षा वेगळी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया...

अर्धवटराव
गुरुवार, 06/20/2013 - 09:20 नवीन
इट वर्क्स अ‍ॅज यु एक्स्प्लॅण्ड... (तपशीलाबद्दल थोडा मतभेद आहे. या (इतर तत्सम) प्रक्रियेचा कर्ता आणि उपभोक्ता स्वतः मनच आहे हा माझा अनुभव) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

इट वर्क्स अ‍ॅज यु एक्सप्लेन्ड!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/20/2013 - 10:11 नवीन
पहिला सार्थ प्रतिसाद!
(तपशीलाबद्दल थोडा मतभेद आहे. या (इतर तत्सम) प्रक्रियेचा कर्ता आणि उपभोक्ता स्वतः मनच आहे हा माझा अनुभव)
यथावकाश तुम्हाला `स्व' चा बोध होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

जबरदस्त........... लिखाण आवडलं

चेतन माने
गुरुवार, 06/20/2013 - 13:25 नवीन
लेखमाला वाचयला मज्जा येइल. बाकी तुम्हाला मानलं पाहिजे एवढ्या थंड डोक्याने इतक्या वेगवेगळ्या प्रश्न आणि शंकांना तुम्ही उत्तर देताय ……छान म्हणजे शांती फक्त वर्तमानातच असण्यात आहे तर ….(पटतंय ) पुभाप्र
  • Log in or register to post comments

म्हणजे शांती फक्त वर्तमानातच असण्यात आहे तर...

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/20/2013 - 13:43 नवीन
अर्थात! वर्तमान म्हणजे खुद्द आपण! मनाला जाणणारी निराकार अवस्था.
एवढ्या थंड डोक्याने इतक्या वेगवेगळ्या प्रश्न आणि शंकांना तुम्ही उत्तर देताय
जे लिहीतोय तो माझा अनुभव आहे त्यामुळे मी निश्चिंत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन माने

+१००

चेतन माने
गुरुवार, 06/20/2013 - 14:09 नवीन
जे लिहीतोय तो माझा अनुभव आहे त्यामुळे मी निश्चिंत आहे.
नक्कीच :)
  • Log in or register to post comments

बॅक ट्रॅक करुन पाहिले तुम्हि

अग्निकोल्हा
गुरुवार, 06/20/2013 - 22:21 नवीन
बॅक ट्रॅक करुन पाहिले तुम्हि म्हणताय तो अनुभव आला नाहि. काय करावे ? म्हणजे असं कि आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे समजल्यावर लक्षात आलं कि हे विचार म्हणजे मी नाही. थोडक्यात मी वेगळा व माझे विचार हे वेगळे पण अकाच वेळी अस्तित्वात असणार्‍या गोश्टि होत. स्वतः मी स्थिर अविचल शांत अथांग सहज आहे. तर विचार नेमके याच्या उलटे आहेत. पण मी व माझे विचार यांचे मिश्रण आपल्या मनात अशांतता निर्माण करत आहे, ज्यापासुन स्वतःला बाहेर ठेवायचे आहे. इथपर्यंत सर्व व्यवस्थित पार पडलं. पुढे काय ? विचार थांबले, पण मी अस्तित्वातच राहिलो.
  • Log in or register to post comments

म्हणजे ‘पहिला विचार कुठून

जे.जे.
Fri, 06/21/2013 - 00:05 नवीन
म्हणजे ‘पहिला विचार कुठून सुरू झाला’ हे विचार मालिका सुरू असताना ‘कुठे तरी मध्ये थांबून बॅक ट्रॅक करणं’ ही खरी प्रोसेस आहे. पहिला विचार कुठला ते कसं ठरवायच? पहिला विचार म्हणजे त्या दिवसाचा पहिला विचार कि त्या सब्जेक्ट चा? पहिला विचार बॅक ट्रॅक करण्याऐवजी पहिला विचार आठवुन फॉरवर्ड ट्रॅक केला तर चालेल का?
  • Log in or register to post comments

पहिला विचार कुठला ते कसं ठरवायच?

संजय क्षीरसागर
Fri, 06/21/2013 - 19:17 नवीन
पहिला विचार म्हणजे सध्या चालू असलेल्या विचारमालिकेतला पहिला विचार. कधीही विचारचक्र सुरू असताताना तुम्ही भानावर आलात आणि बॅकट्रॅक करत गेलात तर तुम्ही ते चक्र सुरू होण्याच्या वेळी आलेल्या पहिल्या विचारापाशी येता आणि तो पहिला विचार होता हे तुमच्या लक्षात येतं कारण तो कोणत्या तरी संवेदनेनं सुरू झालेला असतो. अशा प्रकारे `पहिला विचार ते (तुम्ही भानावर आलात) तेव्हाचा विचार (शेवटचा विचार)' अशी मनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला उलगडते. एकदा तुम्हाला पुरेसा कॉन्फिडन्स आला की तुम्हाला स्मृती कशी सक्रिय होते आणि कार्य करते हा उलगडा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.जे.

च्यामारी

रामपुरी
Fri, 06/21/2013 - 03:37 नवीन
नाव वाचून ज्ञानेश्वरांविषयी काहीतरी वाचायला मिळेल या अपेक्षेने धागा उघडला (हल्ली नाडीचे धागे बंद झाल्याने लेखकाचे नाव वाचायची सवय सुटली आहे. परत लावून घ्यावी लागेल असं दिसतंय) तर आत ओशोचा फोटो आणि खाली ज्येष्ठ बल्लवाचार्याची पा़ककॄती. फोटो नसल्यामुळे नियमाप्रमाणे वाचली नाही. नेक्ष्ट टाईमला फटू टाकावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

हा राम कुठे असतो?

संजय क्षीरसागर
Fri, 06/21/2013 - 19:06 नवीन
यावर आपण म्हणताय : >आंतर मनात आणि बाह्यमनात सुद्धा ! मला वाटत बाह्य मनातुन तो अंतरमनात साठवावा म्हणु चिंतन करण्यावर भर दिला जातो. = तुमच्या पहिल्या प्रदीर्घ प्रतिसादाचा आणि वरील स्टेटमंटचा अर्थ तुम्हाला सर्वत्र राम दिसायला हवा आहे (किंवा दिसतो आहे - ती तर फारच गंभीर परिस्थिती आहे). पुढे तुम्ही विचारताय : >बाकी भ्रम नक्की कोणाला होतो ? मनाला की मेंदुच्या प्रोसेसिंगला ? तुम्हाला अनुमोदन देणारा प्रतिसादक म्हणतोय : >भ्रम नक्की कोणाला होतो ? अजून समजलं नाहीये का ? आणि तुम्ही त्यावर सुखावून प्रतिसाद दिलाय : >अच्छा अच्छा असं हाय का ? =थोडक्यात तुमचं आणि तुमच्या समपंथीयांचं मत असं आहे की ‘राम नं दिसता, समोरचं स्वच्छ दिसणं’ (जो या लेखाचा मूळ विषय आहे) हा भ्रम आहे! या विषयावर मी चर्चा करणार नव्हतो कारण तो संवेदनाशील आहे. पण आता विषय निघालाच आहे तर सांगतो, वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे. देव ही कल्पना मान्य करणं ही भ्रम्राची सुरूवात आहे आणि `देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहे. द पर्सन इज टोटली कट ऑफ फ्रॉम रिअ‍ॅलिटी. कारण त्याला जे दिसतय ते वास्तविकात नाही. याविषयी सविस्तर चर्चा इथे झाली आहे : http://www.misalpav.com/node/23678?page=1
  • Log in or register to post comments

थोडक्यात देव दिसला असं

शिल्पा ब
Fri, 06/21/2013 - 22:18 नवीन
थोडक्यात देव दिसला असं समजणारे संत वगैरे भ्रमिष्ट होते तर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी

मदनबाण
Fri, 06/21/2013 - 20:12 नवीन
क्षीरसागरजी सर्वाय प्रथम मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देण्याचे वारंवार टाळले आहे.परत तोच प्रश्न तुम्हाला विचारतो... भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. हे वाक्य लिहायचे कष्ट कशाला घेतलेयत? तुमच्या पहिल्या प्रदीर्घ प्रतिसादाचा आणि वरील स्टेटमंटचा अर्थ तुम्हाला सर्वत्र राम दिसायला हवा आहे (किंवा दिसतो आहे - ती तर फारच गंभीर परिस्थिती आहे). मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई। इति :- स्त्री संत मीराबाई. त्यांची पण परिस्थिती गंभीर होती यास आपल्या वरील वाक्यावरुन निष्कर्ष काढता येतो. बाकी भ्रम नक्की कोणाला होतो ? मनाला की मेंदुच्या प्रोसेसिंगला ? तुम्हाला अनुमोदन देणारा प्रतिसादक म्हणतोय : >भ्रम नक्की कोणाला होतो ? अजून समजलं नाहीये का ? आणि तुम्ही त्यावर सुखावून प्रतिसाद दिलाय : >अच्छा अच्छा असं हाय का ? =थोडक्यात तुमचं आणि तुमच्या समपंथीयांचं मत असं आहे की ‘राम नं दिसता, समोरचं स्वच्छ दिसणं’ (जो या लेखाचा मूळ विषय आहे) हा भ्रम आहे! परत तेच नी प्रश्न काय विचारलाय ? की भ्रम नक्की कोणाला होतो ? मनाला की मेंदुच्या प्रोसेसिंगला ? त्याचे उत्तर न देता दुसर्‍या प्रतिसादकाला मी काय म्हणालो आहे यावर तुमचे मन लक्ष केंद्रित करत आहात.जे योग्य नाही.तुम्ही म्हणता की मी त्यावर सुखावून प्रतिसाद दिला,यावर माझे म्हणणे आहे की हा तुमचा "भ्रम" आहे.मी गमतीने तो प्रतिसाद दिला होता.तुमचे मन विचलीत होत आहे असे दिसते आणि त्यावर तुमचे नियंत्रण नाही आणि याकारणामुळेच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देता भलतेच प्रतिसाद देतात्,शिवाय स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे मात्र माझ्याकडुन मागता. थोडक्यात तुमचं आणि तुमच्या समपंथीयांचं मत असं आहे की ‘राम नं दिसता, समोरचं स्वच्छ दिसणं’ (जो या लेखाचा मूळ विषय आहे) हा भ्रम आहे! भ्रम कसा निर्माण होतो ते मी वरतीच दर्शवले आहे. या विषयावर मी चर्चा करणार नव्हतो कारण तो संवेदनाशील आहे. पण आता विषय निघालाच आहे तर सांगतो, वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर चर्चा करणार नाहीत असे म्हणता,त्याच गोष्टी संबंधी तुम्ही विधाने करता,माझा पहिला प्रश्न परत वाचा म्हणजे कळेल. देव ही कल्पना मान्य करणं ही भ्रम्राची सुरूवात आहे आणि `देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहे. द पर्सन इज टोटली कट ऑफ फ्रॉम रिअ‍ॅलिटी. कारण त्याला जे दिसतय ते वास्तविकात नाही. मी कोणी बाबा मियाँ बंगाली नाही,ना कोणी तत्वज्ञानी,पण श्री प्रभुपाद स्वामींनी यावर उत्तम भाष्य केले आहे.ते इथे देतो.तुम्ही तुमचे चित्त थार्‍यावर आणुन मन एकाग्र करुन या भाष्यावर जरा चिंतन करण्याचे कष्ट करा ! बहुधा तुमचा भ्रम संपेल.
  • Log in or register to post comments

वाचतोय!

मोदक
Fri, 06/21/2013 - 20:56 नवीन
वाचतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

बाणराव...

अर्धवटराव
Fri, 06/21/2013 - 21:34 नवीन
बीडकर महाराजांना स्वामी समर्थ म्हणाले होते कि भुकेल्याला अन्न दे, अन्यथा अन्नाचा चिवडा होईल. यापुर्वी भक्ती संबंधी माझ्या एका धाग्यावर चर्चा झाली आहे (स्वतःची पाठ थोपटण्याची स्माईली आहे काय कुठे ;) ). त्यात देव/भक्ती प्रकरण नक्की काय आहे याचा थोडाफार उहापोह झाला आहे. त्यानंतरही जर कोणि कल्पना, भ्रम वगैरे जंजाळातुन (मुद्दाम) बाहेर पडत नसेल तर त्याला काहि इलाज नाहि. असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

तुमच्याशी वर लिंक दिली आहे तिथे सांगोपांग चर्चा केलीये

संजय क्षीरसागर
Fri, 06/21/2013 - 22:43 नवीन
त्यात शेवटी मी म्हटलं आहे :
प्रॅक्टीकली भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास.
आणि तुमच्या तिथल्या शेवटच्या प्रतिसादालाही सविस्तर उत्तर दिलंय. आता मला पुन्हा वेळ घालवायचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

भ्रम...

अर्धवटराव
Sat, 06/22/2013 - 00:02 नवीन
>>प्रॅक्टीकली भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास -- मला नाहि वाटता भ्रमाच्या अनेक डेफीनेशन्सपैकी एक अशा या परिभाषेला कुणाचा आक्षेप असेल, वा त्यात काहि वेगळं सांगितल्या गेलं आहे. तिथले (आणि इथले देखील) प्रतिसाद इतके काँटॅडीक्टरी आहेत कि त्यावर सविस्तर विचार करुन एक काय ति भुमीका स्वतःला समजल्याशिवाय आणखी उत्तरे देण्यात वेळ न घालवणे हेच उत्तम. (बहुतेक, मला काहिहि कन्फ्युजन नाहि, माझे विचार स्पष्ट आहेत वगैरे उत्तरे तुमच्याकडुन येतील, किंवा एखाद-दोन लाइन्स आणखी कॉपी पेस्ट होतील... पण त्यात मूळ मुद्द्याला साजेसं काहि मटेरीअल नसणार याची खात्री आहे.) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तिथले (आणि इथले देखील) प्रतिसाद इतके काँटॅडीक्टरी आहेत ?

संजय क्षीरसागर
Sat, 06/22/2013 - 00:19 नवीन
येस! पण तुमचे. कारण मी देव या एकाच संकल्पनेवर बोलतोय. तिथे ही आणि इथे ही.
पण त्यात मूळ मुद्द्याला साजेसं काहि मटेरीअल नसणार याची खात्री आहे.
इतकी खात्री आहे तरी तुम्ही मला प्रश्न विचारता! खाली एका प्रतिसादात तर तुम्ही प्रक्रिया बरोबर असं देखील आहे म्हटलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अपेक्षीत प्रतिसाद.

अर्धवटराव
Sat, 06/22/2013 - 02:40 नवीन
>>येस! पण तुमचे.कारण मी देव या एकाच संकल्पनेवर बोलतोय. तिथे ही आणि इथे ही. -- हो ना. विषय एकच आहे, त्यावरचे विचार कॉण्ट्रॅडीक्टरी आहेत. तसंही कॉण्ट्रॅडीक्टरी स्टेट्मेण्ट्स एकाच विषयाला धरुन असतात जनरली... नाहि का. >>इतकी खात्री आहे तरी तुम्ही मला प्रश्न विचारता! -- तुम्हाला जशी प्रबोधनाची हौस आहे तशी मला देखील चिकीत्सेची हौस आहे. शिवाय वाचकांनी प्रश्न विचारावे अशी तुमची इच्छा/अपेक्षा देखील आहे ना... कि उगाच लेख/प्रतिसाद पाडताय? >>खाली एका प्रतिसादात तर तुम्ही प्रक्रिया बरोबर असं देखील आहे म्हटलंय. -- याला म्हणतात आपल्याला हवे ते अर्थ काढणं. तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया इतर तत्सम प्रकियांप्रमाणे मनाच्या विचारांवर काम करते हे मी स्वच्छ सांगीतलय, आणि तपशीलासंदर्भात काय मतभेद आहेत हे देखील खुलासेवार सांगीतलं आहे. त्यातही तुम्हाला कॉण्ट्रॅडीक्श्न दिसावी?? सर्वात महत्वाचं... मुख्य मुद्द्याला धरुन प्रतिसादात काहि मटेरीअल नसणार या माझ्या गृहीतकाला सिद्ध केल्याबद्दल आभारी आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

एकतर तुम्ही काय लिहीताय त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये किंवा

संजय क्षीरसागर
Sat, 06/22/2013 - 09:40 नवीन
तुमची मतं रोज बदलतायत..
तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया...इट वर्क्स अ‍ॅज यु एक्स्प्लॅण्ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

असं आहे होय?

अर्धवटराव
Sat, 06/22/2013 - 10:06 नवीन
>>"तुम्ही सांगीतलेली प्रक्रिया...इट वर्क्स अ‍ॅज यु एक्स्प्लॅण्ड" -- मला माहित आहे प्रॉब्लेम तुमच्या सिलेक्टीव्ह रीडींग आणि मनमानी अर्थ काढण्याचा नाहिए. तपशीलांतील मतभेदांबाबत, मनाच्या स्कोप बाबत, आणि मी जी समीकरणे दिली होती ति माझी वाक्ये कॉपी पेस्ट करताना कदाचीत तुमचा कॉम्प्युटर हँग झाला असेल. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमचा कॉम्प्युटर हँग झाला असेल?

संजय क्षीरसागर
Sun, 06/23/2013 - 00:16 नवीन
मनाच्या स्कोप बाबत, आणि मी जी समीकरणे दिली होती ति माझी वाक्ये ....
या लेखात मी फक्त स्मृती या प्रभागा विषयी लिहीलं आहे. विषयाचा आवाका मोठा असल्यानं इतर फॅकल्टीज वर यथावकाश चर्चा पुढील लेखात होऊ शकेल. पण तुम्ही डायरेक्ट :
भुकेल्याला अन्न दे, अन्यथा अन्नाचा चिवडा होईल.
वगैरे सुरू केलंत याचा अर्थ तुमचा स्वतःच्याच अनुभवावर विश्वास नाही. आणि याचं उघड कारण म्हणजे तुमची चित्तदशा `सांख्य की भक्ती' यात दोलायमान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

याचा अर्थ...

अर्धवटराव
Sun, 06/23/2013 - 02:35 नवीन
यु नो व्हॉट... मला तुमची हि अदा प्रचंड आवडते... कुणी काहि प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर सरळ न्यायधिशाच्या खुर्चीत जाऊन बसायचं आणि दुसर्‍याची चित्तदशा कशी दोलायमान आहे, दुसर्‍याचे विचार म्हणजे भ्रम कशे आहेत, दुसर्‍याची समज कशी कमी आहे वगैरे छापाचे निकालपत्र देऊन मोकळं व्हायचं. अपेक्षेप्रमाणे मूळ मुद्याला साजेसं उत्तर तुमच्याकडुन अजुनही आलेलं नाहि. >>या लेखात मी फक्त स्मृती या प्रभागा विषयी लिहीलं आहे. विषयाचा आवाका मोठा असल्यानं इतर फॅकल्टीज वर यथावकाश चर्चा पुढील लेखात होऊ शकेल. -- तुम्ही तुमच्या प्रक्रियेशिवाय इतरांना व्यर्थ, भ्रमीष्ट नि काय काय ठरवुन टाकलत. त्या दोन चार वाक्यांचं मॅग्निट्युड उर्वरीत लेखाच्या मॅग्नीट्युडपेक्षा कितीतरी जास्त आहे. बाकि प्रक्रियांचं राहु देत, तुम्ही वाचकांना देखील त्याच टाईपचे उत्तर देता... विषय जर फक्त स्मृतीबद्दलचा होता तर या करामतींची आवष्यकता नव्हती. असो. >>वगैरे सुरू केलंत याचा अर्थ तुमचा स्वतःच्याच अनुभवावर विश्वास नाही. आणि याचं उघड कारण म्हणजे तुमची चित्तदशा `सांख्य की भक्ती' यात दोलायमान आहे. -- आले न्यायाधीश महाराज. त्याचं कसं आहे ना जज् साहेब... मला जर एक शेर ऐकवायचा असेल आणि ओरिजनल शायरचं नाव माहित असेल, गालीब वगैरे, तर "गालीब ने कहा है" अशीच सुरुवात करेन मी. मूळ मुद्याला बगल देण्याची माझी खात्री आण्खी बळकट केल्याबद्द्ल धन्यवाद. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण

संजय क्षीरसागर
Fri, 06/21/2013 - 23:41 नवीन
तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे! तुम्हाला वाटतंय मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर टाळतोय. मी तुम्हाला विचारलं होतं की `हा राम कुठे असतो?' तुमचं उत्तर आहे ( ते देतांना तुम्ही मनाच्या जाळ्यात सापडलाय हे बहुदा लक्षात आलेलं दिसत नाही) :
आंतर मनात आणि बाह्यमनात सुद्धा !
थोडक्यात ती एका जनसमूहाची धारणा आहे, इट हॅज नो एक्झिस्टन्स बिसाइडस वन्स ओन माइंड. सत्य सार्वभौम आहे. त्याला कोणत्याही श्रद्धेची वा धारणेची गरज नाही. राम होता की नव्हता हा वाद नाही. तो आता, इथे, (सर्वांना आणि सर्वत्र) उपलब्ध आहे का? मुळात ज्याला राम म्हणजे कोण हे शिकवलं नाहीये त्याला तो दिसेल का? आणि माझा दावा आहे, सत्य आता, इथे, सर्वांना आणि सदैव उपलब्ध आहे, फक्त मन धारणारहित हवं. धारणा कशा सघन होतात हे देखील तुम्ही तुमच्याच प्रतिसादात सांगितलंय:
मला वाटत बाह्य मनातुन तो अंतरमनात साठवावा म्हणुन चिंतन करण्यावर भर दिला जातो.
हे चिंतन, भ्रम सघन करण्याचा राजमार्ग आहे. मन हे जसं बायो कंप्युटर आहे तसंच बायो-प्रोजेक्टरही आहे. तुमच्या धारणा ते प्रोजेक्ट करायला लागतं. तुम्हाला (एकट्याला) समोरचं स्पष्ट दिसण्या ऐवजी तुमच्या मानसिक प्रतिमा दिसायला लागतात. आणि भ्रम म्हणजे जे नाही त्याचा आभास. या उलट तुम्ही मनापासनं जसजसे मोकळे होता तसतसं तुम्हाला समोरचं स्पष्ट दिसायला लागतं आणि आजूबाजूला चालू असलेलं ऐकू यायला लागतं. त्याला `दॅट विच इज' म्हणतात. आणि ते जगातला कुणीही नाकारू शकत नाही. तुम्ही आणि इथले सदस्य थोडे सामंजस्यानं काय लिहीलंय ते समजावून घेतील आणि चर्चा व्यक्ती निरपेक्ष होईल अशी अपेक्षा आहे. मी इथे कुणाचेही उतारे, लिंक्स काहीही डकवत नाही, तुम्ही देखील कुणाला मधे आणू नका. अमका शहाणा की वेडा हे ठरवण्यात काही अर्थ नाही. आणि ते आपल्याला ठरवताही येणार नाही. मी स्वतः कधीही त्या फंदात पडलो नाही. द ओन्ली क्रायटेरीआ इज यू. तुम्हाला लेखनातली प्रक्रिया उपयोगी ठरते का ते पाहा. प्रक्रिये विषयी मी निशं:क आहे, तुम्ही लेखनावर फोकस करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अरे हो! तुम्हाला वाटेल मी पुन्हा प्रश्न टाळला

संजय क्षीरसागर
Sat, 06/22/2013 - 00:34 नवीन
भ्रम नक्की कोणाला होतो ? मनाला की मेंदुच्या प्रोसेसिंगला ?
सततच्या चिंतनानं मन भ्रम निर्माण करतं आणि व्यक्ती भ्रमिष्ट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमचे सर्व लेखन आणि प्रतिसाद बॅक ट्रॅक करून

लंबूटांग
Sat, 06/22/2013 - 03:49 नवीन
मला तुमच्या लेखनावर काहीही प्रतिक्रीया देणे म्हणजे वेळ वाया घालवणे हे माहित आहे पण आज शुक्रवार असल्याने हापिसात शांतता आहे आणि हातात वेळच वेळ आहे.
मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे.
आनंद नक्की कोणाला होतो आहे? मनाला की व्यक्तीला?
मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अ‍ॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर नेईल ते सांगता येत नाही.
कोणत्या कंप्युटर बद्दल बोलत आहात आपण? सर्व स्मृती निगडीत असणे तर कै च्या कै च. एक उदाहरण घ्या. एखाद्याची आपल्या वडिलांच्या अंतर्विधीची स्मृती ही त्याच्या विवाहाच्या पहिल्या रात्रीच्या/ जेव्हा केव्हा त्याने/ तिने पहिल्यांदा शरीर सुख अनुभवले त्या स्मृतीशी निगडीत असेल का? वर कोणीतरी विचारल्याप्रमाणेच तुमचा लिहीण्यात तरी किंवा समजण्यात किंवा समजवण्यात काही तरी घोळ आहे. तुम्ही एक टेबलच बनवा ना की मन म्हणजे CPU, मेंदू अथवा अजून काय जे स्मृती जतन करत असेल ते हार्ड-ड्राईव्ह. मला आजपर्यंतचे एकच कळत नाहीये की तुम्हाला जे काही बॅक ट्रॅक वगैरे मार्ग अवलंबून जे काही साध्य झाले आहे त्याची इतरांना गरज आहे का ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जर काही लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे वगैरे असतील त्या सर्वांवर त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उपाय शोधू देत की. तुम्हाला त्या मनाच्या अवलोकनाने वा नाम साधनेने आणि काय ध्यान धारणेने वगैरे फरक नसेल पडला पण बाकीच्यांना पडत असेल तर त्यांना मूर्खात काढण्याची अथवा चूक ठरवण्याची काय गरज आहे? त्यातून तुम्हाला त्या गोष्टी जमत/ झेपत नाहीत असाही निष्कर्ष निघू शकतो. असो आता हातातला वेळ संपला आणि घरी जायची वेळ झाली. तेव्हा तूर्तास इतकेच.
  • Log in or register to post comments

लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे

संजय क्षीरसागर
Sat, 06/22/2013 - 10:04 नवीन
वगैरे वगैरे असतील त्या सर्वांवर त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उपाय शोधू देत की
. तेच तर तुम्हाला सांगतोय, माझ्या लेखनात रस असणारे आणि मी पाहून घेऊ. तुम्ही मधे पडण्याची आवश्यकता नाही.
बाकीच्यांना पडत असेल तर त्यांना मूर्खात काढण्याची अथवा चूक ठरवण्याची काय गरज आहे?
मी त्या प्रक्रियांबद्दल लिहीलंय आणि त्यांची व्यर्थता सकारण सांगितलीये. कुणालाही मूर्खात काढण्यात मला काहीही रस नाही. अर्थात, तसं कोणी स्वतःला समजत असेल तर माझा नाईलाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लंबूटांग

??

कवितानागेश
Sat, 06/22/2013 - 13:20 नवीन
माझ्या लेखनात रस असणारे आणि मी पाहून घेऊ. तुम्ही मधे पडण्याची आवश्यकता नाही.> हे जरा जास्त होतय. आपण सार्वजानिक संस्थळावर काहीही लिहितो तेन्व्हा आपण कुणाच्यातरी विचारप्रक्रियांच्या आणि चरचा करणार्‍या लोकांच्या 'मधेच' पडत असतो. इथे प्रत्येका ला आपले विचार लिहिण्याचा अधिकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही संपादक आहात म्हणून सांगतो

संजय क्षीरसागर
Sat, 06/22/2013 - 13:52 नवीन
तुम्ही जेव्हा मला `हे जरा जास्त होतय' म्हणता तेव्हा त्यांच्या प्रतिसादाची सुरूवात आणि टोन पाहा: >मला तुमच्या लेखनावर काहीही प्रतिक्रीया देणे म्हणजे वेळ वाया घालवणे हे माहित आहे असं असेल तर मग ते कशाला उगीच पिंका टाकतायत? आणि हो, पिंक जरा जास्तच वाटत नाहीये का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

होय!

कवितानागेश
Sat, 06/22/2013 - 13:55 नवीन
होय! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ह्या धाग्यावर खुद्द लेखक

यशोधरा
Sat, 06/22/2013 - 10:17 नवीन
ह्या धाग्यावर खुद्द लेखक महाशय धरुन विषयाला सोडून सगळ्यांची जी उत्तरे प्रत्युत्तरे सुरु आहेत की सगळ्यांची (पुन्हा, लेखक महाशय धरुन) मनं करतायत की कसं?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा