✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

`रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)

स
संजय क्षीरसागर यांनी
Sat, 06/15/2013 - 12:58  ·  लेख
लेख
मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है ! : ओशो (अष्टावक्र महागीता) ओशो __________________________________ मन या जीवनातल्या गहनतम पैलूवरचं हे लेखन तुमच्या समोर मांडताना अतिशय आनंद होतो आहे. विषय कसा पुढे न्यावा याची कोणतीही योजना मनात नाही. तुमचे प्रतिसाद आणि प्रश्न लेखनाची दिशा ठरवतील. अनेकानेक अंगांनी मनाचा सांगोपांग वेध घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतनं होईल. वेगवेगळ्या सिद्धांचं मनाविषयीचं आकलन, व्यक्तिमत्त्वाची घडण, आपली स्मृती, माइंड-बॉडी को-ऑर्डिनेशन, मनाचा कल आणि व्यक्तिगत कौशल्य, संगीत, खेळ, फ्रॉइड आणि इतर दिग्गज मनोतज्ज्ञांचे विचार, मानवी नातेसंबंध, मनाचं हृदयाशी नातं (भावनिक विश्व : आनंद, नैराश्य, न्यूनगंड, अल्झायमर, आत्महत्या वगैरे), मानसिक धारणा, भक्तिमार्ग आणि इतर आध्यात्मिक मार्गातल्या मनापलीकडे नेणार्‍या साधना पद्धती आणि सरते शेवटी मनापासून मुक्ती असा लेखनाचा समग्र आवाका असेल. ____________________________ प्रथम मनाचं अत्यंत उघड स्वरूप समजावून घेऊ. मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते. श्रवण आणि अवलोकन या दोन संवेदनांनी मानवी आकलनाचा जवळजवळ पंचाण्णव टक्के भाग व्यापल्यानं मन 'ऑडिओ- विज्युअल डिवाइस' आहे. इतर तीन संवेदनांनी (स्पर्श, गंध आणि स्वाद) मनाचा अत्यंत नगण्य भाग व्यापलेला आहे. संवेदना ही मनाची कारक आहे म्हणजे कोणतीही संवेदना मन सक्रिय करते. जेव्हा आपण मनाची प्रक्रिया जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ‘पहिली संवेदना’ हा अत्यंत बेसिक फॅक्टर आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजपर्यंत हजारो सिद्धांनी ‘ शांत बसून मनाकडे पाहा’ असा संदेश दिला आहे आणि आजही मनापलीकडे जाण्यासाठी ‘मनाचं तटस्थ अवलोकन’ ही (आध्यात्मिक) जगातली सर्वमान्य साधना मानली जाते. अगदी बुद्धापासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत (इंन्क्लूडिंग ओशो) सर्व ज्ञानमार्गी या साधनेचा पुरस्कार करतात. आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे. (भक्तिमार्गात ‘नाम साधना’ हा सर्वोत्तम मार्ग मानला गेला आहे पण तो तर त्याही पेक्षा व्यर्थ आहे. अर्थात त्याविषयी मी इतक्यात काहीही लिहिणार नाही किंवा त्यासंबंधी प्रश्नही विचारले जाऊ नयेत.) मनाचं अवलोकन व्यर्थ का आहे हे जाणणं अगत्याचं आहे. कारण मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’ असा आहे. मुक्त तर आपण ऑलरेडी आहोतच. मनाच्या प्रक्रियेमुळे आपण बंधनात असल्याचा भास होतोय आणि म्हणून मनाची प्रक्रिया जाणणं उपयोगी आहे. मन हा बायो-कंप्युटर आहे. जशी कंप्युटरची सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी हेड आणि टेल अ‍ॅड्रेसेसनं जोडलेली असतात तशी आपल्या स्मृतीतली सर्व रेकॉर्डिंग्ज एकमेकांशी निगडित असतात. पण कंप्युटरमधला डेटा निर्वैयक्तिक असल्यानं तो सर्वांसाठी एकाच सलग पद्धतीनं रिट्राइव होतो आणि मन हा प्रत्येकाचा व्यक्तिगत बायो-कंप्युटर असल्यानं कुणाची स्मृती कशी सक्रिय होईल आणि त्याला किती दूर नेईल ते सांगता येत नाही. मन सक्रिय झाल्याबरोबर आपण स्मृती चक्रात अडकून अनेकानेक गतकालीन प्रसंगातून आणि अनुभवातून फिरायला लागतो. हे इतक्या वेगानं घडतं की सुरुवात नक्की कुठून झाली हे लाखातला एखादाच जाणू शकतो. मनाचं अवलोकन करताना आपण डोळे मिटून शांत बसलेलो असतो आणि या स्मृतीच्या चलत-चित्रपटात इतके गुंतून जातो की अवलोकन कशासाठी करतोय हेच लक्षात राहत नाही. मग मधून केव्हा तरी आपण कुठेही गेलेलो नाही, जागेवरच बसलो आहोत याचं भान येतं. मग थोडा वेळ शांत वाटतं. त्यानंतर कोणत्या तरी संवेदनेनं पुन्हा स्मृती सक्रिय होते मग पुन्हा आपण भोवर्‍यात सापडतो आणि या कामात बर्‍याच वेळा झोप लागून जाते. जाग आली की झक मारली आणि वेळ घालवला असं वाटायला लागतं. पण इतक्या थोर लोकांनी सांगितलेली साधना व्यर्थ कशी असेल म्हणून लोक रोजरोज ध्यान करत राहतात. त्यांना ज्याम कंटाळा येतो, यांच्या साधनेमुळे बर्‍याच वेळा घरचे वैतागतात (कारण साधनाकालात घरात शांतता लागते) पण सांगणार कुणाला? . शेवटी ते गुरुंना विचारतात आणि गुरू सांगतात ‘साधना कमी पडते आहे, जास्त वेळ बसत चला’. अशी साधना जन्मभर केली तरी काही उपयोग होत नाही कारण साधकाला मनापासून मुक्ती मिळत नाही. मनाचं अवलोकन करायचा प्रश्न नसून त्याची चक्राकार गती जाणणं महत्त्वाचंय. म्हणजे ‘पहिला विचार कुठून सुरू झाला’ हे विचार मालिका सुरू असताना ‘कुठे तरी मध्ये थांबून बॅक ट्रॅक करणं’ ही खरी प्रोसेस आहे. ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे. हे काम अत्यंत कौशल्याचं आहे पण आता तुम्हाला प्रक्रिया कळल्यानं ते नुसतं सोपंच नाही तर अत्यंत इंटरेस्टिंग झालंय. ज्या क्षणी तुम्ही पहिला विचार जाणाल त्या क्षणी तुम्हाला कोणत्या संवेदनेनं तुमचा पहिला विचार निर्माण झाला ते कळेल. आणि मी संवेदना ही मनाची कारक आहे असं का म्हटलंय ते लक्षात येईल. जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. तुम्ही पुन्हापुन्हा वर्तमानात येऊ लागाल. मनाच्या एका महत्त्वाच्या दालनावर तुमची हुकुमत चालायला लागेल. मनाच्या अनेक प्रभागांपैकी एका व्यापक प्रभागापासनं तुम्ही मुक्ती अनुभवाल. निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल. ________________________________ ‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ असं मनाचं अत्यंत कलात्मक वर्णन करणार्‍या काव्यपंक्तीचं श्रेय अर्थात संत ज्ञानेश्वर महाराजांना विनम्र अर्पण ________________________ पूर्वप्रकाशन : मनोगत
  • रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन)
  • रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (तीन)
  • रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)

Book traversal links for `रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’ (एक)

  • रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (दोन) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
47294 वाचन

💬 प्रतिसाद (211)

प्रतिक्रिया

स्वागत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/15/2013 - 13:27 नवीन
बहिणाबाईंनी 'मन वढाय वढाय.....' मधे मन कसं चुळबुळं असतं ते सांगितलं आहे. तरीही, मनावर हुकुमत चालवता येईल ? प्रयत्न करता येईल ? असो, लेख मालिका वाचायला आवडेलच. स्वागत आहे. -दिलीप बिरुटें
  • Log in or register to post comments

मनाचा आवाका मोठा वाटतो पण वास्तविकात

संजय क्षीरसागर
Sat, 06/15/2013 - 13:58 नवीन
इट इज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्टिविटी बीटविन टू इअर्स! एकेक दालन पार करत गेलं तर ते अवघड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्म्म

सोत्रि
Sun, 06/23/2013 - 00:07 नवीन
समजा ही आवर्तने मनात चालू आहेत : माझ्या नोकरीत मेजर प्रोब्लेम चालू आहे -> नोकरी राहिल की नाही माहिती नाही -> कदाचित नोकरी जाईल -> च्यायला नोकरी गेली तर काय? -> 'इएमआय'चे काय करायचे? -> बायको मुलं उपाशी मरतील -> च्यायला ती मॅनेजरची चमची आहे तिची नोकरी काही जात नाही -> पण तिचा फॉर्म अजून कडक आहे -> त्यानेच बहुतेक मॅनेजर तिच्यावर फिदा आहे -> तिला ते कळत नसावे का? -> तिला ह्या वर्षीच्या पार्टीत समजावून द्यायचा प्रयत्न केला होता -> पण शी..तीलाही त्याची जाणिव असूनही काही फरक नाही! -> च्यायला कुठे चाललो मी ? -> इथे थांबून बॅक ट्रॅक केले आणि मूळ विचारापर्यंत आले की 'नोकरीचे काय करायचे?' आता,
निरंतर चालू असलेल्या वैचारिक कोलाहलातून बाहेर आल्यानं तुमच्या जीवनात शांतता येईल.
ह्यानुसार जीवनात शांतता कशी येईल ? - (विचारात पडलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सोत्रि, तुझ्या या एकमेव यथार्थ प्रश्नाबद्दल आभार!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/27/2013 - 08:48 नवीन
समजा ही आवर्तने मनात चालू आहेत : माझ्या नोकरीत मेजर प्रोब्लेम चालू आहे -> नोकरी राहिल की नाही माहिती नाही -> कदाचित नोकरी जाईल -> च्यायला नोकरी गेली तर काय? -> 'इएमआय'चे काय करायचे? -> बायको मुलं उपाशी मरतील -> च्यायला ती मॅनेजरची चमची आहे तिची नोकरी काही जात नाही -> पण तिचा फॉर्म अजून कडक आहे -> त्यानेच बहुतेक मॅनेजर तिच्यावर फिदा आहे -> तिला ते कळत नसावे का? -> तिला ह्या वर्षीच्या पार्टीत समजावून द्यायचा प्रयत्न केला होता -> पण शी..तीलाही त्याची जाणिव असूनही काही फरक नाही! -> च्यायला कुठे चाललो मी ? ->
इथे थांबून बॅक ट्रॅक केले आणि मूळ विचारापर्यंत आले की 'नोकरीचे काय करायचे?'
यू हॅव मिस्ड ऑन द वेरी लास्ट स्टेप! पहिला विचार होता 'नोकरीचे काय करायचे?' पण तो कोणत्या संवेदनेनं सक्रिय झाला? दॅटस द पॉइंट. मग तुझ्या लक्षात येईल: समोर असलेली कॉईन त्रूची बाटली दिसली आणि त्या संवेदनेनं हे सगळं सुरू झालं! बाटली दिसल्यावर किंमत आठवली (मायला, परवडणार का हे आयुष्यभर असा विचार आला) आणि मग.... माझ्या नोकरीत मेजर प्रोब्लेम चालू आहे -> नोकरी राहिल की नाही माहिती नाही -> कदाचित नोकरी जाईल ->... ही फटाक्याची माळ लागली. ज्या क्षणी `समोर असलेली कॉईन त्रूची बाटली पाहून हे सुरू झालं' हे लक्षात येईल त्या क्षणी तुम्ही शांत व्हाल. कारण पहिली गोष्ट म्हणजे अजून नोकरी गेलेली नाही. दुसरी गोष्ट, आता इथे बसून आपण कितीही विचारमैथुन केलं तरी समोर प्रसंग उभा राहिल्या शिवाय स्वतःला छळून काही उपयोग नाही. तुम्ही शांतपणे दोन-चार नव्या ठिकाणी सिवी पाठवाल, मित्रांना फोन करून वेकन्सी असेल तर कळवायला सांगाल आणि सगळं झालं की बाटली उघडाल! यू विल स्टार्ट सेलिब्रेशन. मी तुम्हाला मनाच्या कोलाहलातून बाहेर यायचा मार्ग सांगतोय. एकदा भ्रमाराची रुणझूण थांबली, तुम्ही शांत झालात की प्रसंग कसा हाताळायचा ते तुमचं कौशल्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

+१

सोत्रि
Sun, 06/30/2013 - 17:08 नवीन
परफेक्ट, अ‍ॅक्चुअली मी जेव्हा तो प्रश्न टाकला तेव्हा पुढे जास्त विचार नव्हता केला. नंतर जेव्हा बाकीची ह्या धाग्यावरची गंमत वाचत होतो तेव्हा त्या माझ्या प्रश्नावर विचार केला आणि ह्याच अनुमानाशी पोहोचलो होतो. कारण ती फटाक्यांची माळ 'भमराची रुणझुण' होती जि निरर्थक आणि व्यर्थ आहे. - (भ्रमर) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ती फटाक्यांची माळ 'भमराची रुणझुण' होती जी निरर्थक आणि व्यर्थ आहे

संजय क्षीरसागर
Sun, 06/30/2013 - 23:34 नवीन
सगळा प्रयास इतकी साधी गोष्ट समजावण्याचा होता पण पब्लिकनं चर्चा कुठल्या कुठे नेली! काही हरकत नाही, त्यामुळे इतर अनेक गैरसमजांवर लिहीता आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

संजय क्षीरसागर

स्पा
Sat, 06/15/2013 - 13:57 नवीन
संजय क्षीरसागर बस नाम हि काफी हे ;) रंजक लेखमाला वाचतोय
  • Log in or register to post comments

@रंजक लेखमाला

अत्रुप्त आत्मा
Sat, 06/15/2013 - 22:26 नवीन
@रंजक लेखमाला वाचतोय >>> अतिशय भाव'पूर्ण प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सुरवात आवडली आहे .

तर्री
Sat, 06/15/2013 - 19:26 नवीन
पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

प्रत्येक लेख स्वतंत्र असेल

संजय क्षीरसागर
Sat, 06/15/2013 - 20:16 नवीन
सर्व लेखात मन हाच विषय असला तरी त्याचे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला जाईल. तस्मात पुढचा लेख घेण्याआधी `बॅक-ट्रॅक' या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेचा व्यक्तिगत अनुभव (ज्यांना याविषयात रस आहे) त्यांनी घेतल्या शिवाय तादात्म्य, व्यक्तिमत्त्व किंवा भावनिक विश्व या मनाच्या गहन पैलूंवर लिहीणं सदस्यांना उपयोगी ठरणार नाही. नुसती चर्चा होणं यापेक्षा जीवनात बदल घडणं असा उद्देश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

ऑ?

प्यारे१
Sat, 06/15/2013 - 19:29 नवीन
ऑ?
  • Log in or register to post comments

हे ओशोंचे विचार आहेत की आपले

सस्नेह
Sat, 06/15/2013 - 21:44 नवीन
हे ओशोंचे विचार आहेत की आपले ?
आजवर कोट्यवधी लोकांनी ही साधना केली असेल पण ती अत्यंत निरर्थक, कंटाळवाणी आणि व्यर्थ आहे.
बापरे ! म्हणजे अर्थपूर्ण आणि सफल साधना कोणती ते तुम्हालाच फक्त माहिती आहे ? आदर वाढला आहे...
  • Log in or register to post comments

हे ओशोंचे विचार आहेत की आपले ?

संजय क्षीरसागर
Sat, 06/15/2013 - 22:55 नवीन
माझे विचार आहेत.
म्हणजे अर्थपूर्ण आणि सफल साधना कोणती ते तुम्हालाच फक्त माहिती आहे ?
तुम्ही `मनाचं तटस्थ अवलोकन' ही साधना केली आहे का? केली असेल तर तुमचा अनुभव काय आहे? या लेखात लिहीलेल्या प्रक्रियेचा तुम्ही अनुभव घेतला का? ते इतक्या चटकन होणरं काम नाही. पण प्रक्रिया यशस्वी होता क्षणी तुम्हाला अनुभव येईल. तुमचा प्रतिसाद वेगळा असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

जर तुम्ही इतके साधक आहात तर

शिल्पा ब
Sat, 06/15/2013 - 22:58 नवीन
जर तुम्ही इतके साधक आहात तर तुम्हाला आमच्या फुटकळ कॉमेंटने एवढा राग का अन कसा बरं येतो? असो. पुढचे लेखसुद्धा वाचुच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

'मनाचे तटस्थ अवलोकन' ही साधना

सस्नेह
Wed, 06/19/2013 - 22:20 नवीन
'मनाचे तटस्थ अवलोकन' ही साधना मी सिद्ध समाधी योग यात प्रथम अनुभवली आणि अद्यापि करते. माझ्या माहितीप्रमाणे अन अल्प अनुभवावरून, हे अवलोकन, मन आणि त्याचे चाळे यापासून निवृत्ती मिळण्यासाठी करावे लागते. म्हणजे मनाच्या व्यवहारांपासून संपूर्ण अलिप्तता साधण्यासाठी. मग,
मनापासून मुक्ती याचा अर्थ ‘मानसिक प्रक्रियेचं समग्र आकलन’
हे कसे ? जर मानसिक प्रक्रियेच्या आकलनामध्ये चित्त व्यग्र राहिले तर मनाच्या व्यवहारांपासून मुक्ती कशी मिळणार ? मनाच्या अभिव्यक्तींपासून संपूर्णतया अलिप्त असणारे 'Absolute' असे स्वत्व, त्याची जाणिव मनाच्या माध्यमातून होऊ शकत नाही. तेव्हा मनाचे आकलन होण्याचा उद्देश काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जर मानसिक प्रक्रियेच्या आकलनामध्ये चित्त व्यग्र राहिले तर

संजय क्षीरसागर
Wed, 06/19/2013 - 23:39 नवीन
मनाच्या व्यवहारांपासून मुक्ती कशी मिळणार ?
मनाच्या प्रक्रियेला जाणणारा, मनाशी तादात्म्य पावत नसल्यानं कायम मुक्तच असतो.
मनाच्या अभिव्यक्तींपासून संपूर्णतया अलिप्त असणारे 'Absolute' असे स्वत्व, त्याची जाणिव मनाच्या माध्यमातून होऊ शकत नाही. तेव्हा मनाचे आकलन होण्याचा उद्देश काय ?
मुळ फंडा असा आहे की आपण मनापेक्षा वेगळे आहोत. मनामुळे (किंवा सतत चालू असलेल्या विचार प्रवाहामुळे) आपल्याला समोरचा निराकार दिसत नाही किंवा शांतता ऐकू येत नाही. बॅकट्रॅक ही प्रक्रिया तुम्हाला प्राथमिक ठेवून मनाला दुय्यम करते आणि मनाची प्रक्रिया उलगडवते. एकदा निराकार दिसला आणि शांतता ऐकू आली की आपण 'निराकार शांतता आहोत' हा बोध होणं क्रमप्राप्त आहे, आणि त्याला सिद्धत्व म्हटलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वाचत आहे

पैसा
Sat, 06/15/2013 - 22:56 नवीन
दमदार सुरुवात. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

मनोगत वर हिच चर्चा चालली आहे काय?

अर्धवटराव
Sat, 06/15/2013 - 23:58 नवीन
त्यात दोन भिन्न सुर जाणवले. १) ज्याप्रमाणे शरीर कष्ट करुन थकते व आराम कर्न शांत होते तद्वत मन विचार करुन थकते व निर्वीचार होऊन शांत होते. तस्मात निर्विचार अवस्थेला जाणे व ती शांती अनुभवणे हे मनाचे काम आहे. २) मनाला निर्वीचार अवस्थेला नेणे व शांती अनुभवणे हे एका "नॉन मन" घटकाचं काम आहे. काहिही का असेना... जर मानसीक गोंधळ कमि होऊन काहि आरोग्य लाभ होणार असेल (तसा तो होतोच) तर इट्स वर्थ ट्राईंग. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

एक प्रश्न...

अर्धवटराव
Sun, 06/16/2013 - 00:44 नवीन
विचारांना तटस्थपणे बघण्याची प्रक्रिया आणि विचारांना बॅकट्रॅक करत मूळ संवदेनेला जायची प्रक्रिया, या दोहोंत फंडामेण्टल फरक काय आहे ? दोन्हि प्रक्रिया अल्टीमेटली "हा विचार, आणि हा विचार करणारा" असा हा सूर्य - हा जयद्रथ टाईपचा परिणाम करतात (म्हणजे... या प्रक्रियांचा अभ्यास करणारे तसा दावा करतात...) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

एखादा लगाम गवसावा तसा कॉन्फिडन्स येतो!

संजय क्षीरसागर
Sun, 06/16/2013 - 13:39 नवीन
>मनोगत वर हिच चर्चा चालली आहे काय? = हा लेख प्रथम इथेच प्रकाशित करणार होतो पण संकेतस्थळ बंद असल्यानं तिथे केला. मी जरी सर्वांना उत्तरं देत असलो तरी तुम्ही तुमचाच प्रश्न विचारावा कारण विषय अत्यंत व्यक्तिगत आहे आणि प्रत्येक विचारणारा वेगळ्या संदर्भातून विचारत असतो...तरीही या प्रश्नाला उत्तर देतो >त्यात दोन भिन्न सुर जाणवले. १) ज्याप्रमाणे शरीर कष्ट करुन थकते व आराम कर्न शांत होते तद्वत मन विचार करुन थकते व निर्वीचार होऊन शांत होते. तस्मात निर्विचार अवस्थेला जाणे व ती शांती अनुभवणे हे मनाचे काम आहे. = मन आणि शांती हे दोन सर्वस्वी भिन्न घटक आहेत. मन म्हणजे ध्वनी आणि मनरहित (किंवा विचाररहित) अवस्था म्हणजे शांती. ते मनाचं काम नाही. २) मनाला निर्वीचार अवस्थेला नेणे व शांती अनुभवणे हे एका "नॉन मन" घटकाचं काम आहे. = मन अनिवार्य नाही. ते सतत अनिर्बंधपणे चालू असणं हे मानवी अस्वास्थ्याचं मूळ कारण आहे. मनाची (किंवा वैचारिक) प्रक्रिया ऐच्छिक करणं हे आपलं काम आहे. आपण तो ‘नो माइंड’ फॅक्टर आहोत. आपण ती शांतता आहोत. >काहिही का असेना... जर मानसीक गोंधळ कमि होऊन काहि आरोग्य लाभ होणार असेल (तसा तो होतोच) तर इट्स वर्थ ट्राईंग. = प्लीज ट्राय, अ‍ॅंड लेट मी नो. >विचारांना तटस्थपणे बघण्याची प्रक्रिया आणि विचारांना बॅकट्रॅक करत मूळ संवदेनेला जायची प्रक्रिया, या दोहोंत फंडामेण्टल फरक काय आहे ? दोन्हि प्रक्रिया अल्टीमेटली "हा विचार, आणि हा विचार करणारा" असा हा सूर्य - हा जयद्रथ टाईपचा परिणाम करतात (म्हणजे... या प्रक्रियांचा अभ्यास करणारे तसा दावा करतात...) = विचारांचं (किंवा मनाचं) तटस्थ अवलोकन करतांना आपण पॅसिव असतो आणि प्रक्रिया बघण्याच्या नादात सुरूवात कुठून आणि कशी झाली हेच विसरतो त्यामुळे मनाच्या आवर्तनात्मक प्रक्रियेचा उलगडा होत नाही. बॅक-ट्रॅक करत मूळ संवदेनेला जायची प्रक्रिया तुम्हाला प्राथमिक आणि मनाला दुय्यम करते. इंटरेस्ट घेऊन ती केली तर विचार प्रक्रियेचा उलगडा होतो. मजा वाटते, एखादा लगाम गवसावा तसा कॉन्फिडन्स येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मनाची प्रक्रिया ऐच्छिक करणं हे आपलं काम आहे

अर्धवटराव
Mon, 06/17/2013 - 09:04 नवीन
हा ऐच्छीकपणा कोणाचा ? मला वाटतं कि इच्छा, आकांक्षा, राग-लोभ, सुख-दु:ख... या तर सर्व मनाच्या भानगडी आहेत. मग इथे कुणाच्या इच्छेबद्दल हि कमेण्ट आहे ? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हा ऐच्छीकपणा कोणाचा ?

संजय क्षीरसागर
Mon, 06/17/2013 - 09:30 नवीन
आपला!
मला वाटतं कि इच्छा, आकांक्षा, राग-लोभ, सुख-दु:ख... या तर सर्व मनाच्या भानगडी आहेत.
अर्थात, पण त्यात आपण सापडलेलो नाही काय? त्या सर्व भानगडी मनाच्या परीघात घडत असतांना मनाची प्रक्रिया जाणणं महत्त्वाचं ठरत नाही काय? मग ओशो म्हणतात तसं `मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है !' सार्थ वाटत नाही का? ....आणि तेच तर या लेखनाचं प्रयोजन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आपला???

अर्धवटराव
Wed, 06/19/2013 - 18:42 नवीन
म्हणजे ज्याप्रमाणे मनात इच्छा उत्पन्न होतात तशा "आपल्यात"ही उत्पन्न होतात ? हे कॉण्ट्रॅडीक्टरी वाटतय... म्हणजे कसं, कि जर इच्छा हा मनाचा प्रांत आहे तर मनाशिवाय "आपल्यात" इच्छा उत्पन्न होईलच कशी? मनाची इच्छा एक आणि आपली दुसरीच काहितरी असं होतं काय? घासकडवींच्या प्रतिक्रियेत तुम्ही म्हटलं आहे कि "दुसरं मन" असं काहि नसतं... मग "आपल्या" इच्छेचा स्त्रोत काय? >>अर्थात, पण त्यात आपण सापडलेलो नाही काय? त्या सर्व भानगडी मनाच्या परीघात घडत असतांना मनाची प्रक्रिया जाणणं महत्त्वाचं ठरत नाही काय? -- ते कसं शक्य आहे? जर "आपल्यात" इच्छा उत्पन्न होतात तर मनाची दखल घ्यायची काय गरज ? "आपली इच्छा" जर मनात गुंतुन पडायची असेल तर आपण मनाची प्रक्रिया शोधण्यापेक्षा आपल्या इच्छेची प्रक्रिया शोधावी... विंचवाच्या नांगीवर पाय देण्याची इच्छा होणे हि समस्या विंचवाच्या नांगीत विष तयार कसं होतं जे जाणुन कशी सुटेल ? >> मग ओशो म्हणतात तसं `मनसे मुक्ती ही तो दरअसल मुक्ती है !' सार्थ वाटत नाही का? -- मनात गुंतुन पडणे हा जर "आपला" ऐच्छीक विषय आहे तर "मनापासुन मुक्ती" ला काहि आधारच राहात नाहि. कारण मग "आपली इच्छा" परिक्षा नळीत घ्यायला हवी. त्या इच्छेपासुन मुक्ती मिळाली कि झालं काम. ओशो, मुक्ती, प्रक्रिया, बॅक ट्रेस वगैरे गोष्टी थोड्या बाजुला ठेऊया. सर्वप्रथम "इच्छा" या एका विषयाचा निकाल लावु या. अदरवाईज तुम्ही नेमकं काय सांगताय हे आम्हाला कळणार नाहि आणि आमचे प्रश्न तुम्हाला कळणार नाहित. १) इच्छा कुणाचा प्रांत आहे? मनाचा, कि "आपला" ? २) मनाची इच्छा आणि आपली इच्छा अशा दोन वेगवेगळ्या स्वतंत्र यंत्रणा आहेत काय? असल्यास "मनसे मुक्ती" ची काहि गरजच उरत नाहि ३) इच्छेचा स्त्रोत आणि वर्क एरीया जर केवळ मन असेल तर "आपला ऐच्छीकपणा" काय भानगड आहे? ४) इच्छेचा स्त्रोत आणि वर्क एरीया जर केवळ "आपण" असु तर तुम्ही वर जे स्टेटमेण्ट दिलय "सर्व भानगडी मनाच्या परीघात घडत असतांना..." याचा नेमका अर्थ काय? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही म्हटलं आहे कि "दुसरं मन" असं काही नसतं...

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/20/2013 - 00:06 नवीन
म्हणजे ज्याप्रमाणे मनात इच्छा उत्पन्न होतात तशा "आपल्यात"ही उत्पन्न होतात ?
इच्छा मनात उत्पन्न होतात, मन शरीरात आहे आणि आपलं शरीर आणि मनाशी इतकं तादात्म्य आहे की आपल्याला वाटतं `मला इच्छा झाली'.
आपण मनाची प्रक्रिया शोधण्यापेक्षा आपल्या इच्छेची प्रक्रिया शोधावी...
इच्छा मनात उत्पन्न होतात, त्यामुळे मनाचा उलगडा इच्छेचा उलगडा करतो. इच्छा म्हणजे प्रभावी झालेला विचार.
(२) मनाची इच्छा आणि आपली इच्छा अशा दोन वेगवेगळ्या स्वतंत्र यंत्रणा आहेत काय?
अर्थात! इच्छा हा प्रभावी झालेला विचार असला तरी त्यावर कृती करणं आपल्या हातात आहे. मानसिक प्रक्रियेचा वेध जर आपण `विचार' या प्राथमिक स्टेजला म्हणजे संवेदना या उगमापाशीच घेतला तर इच्छा मनाच्या कह्यात राहणार नाही. आपण स्वेच्छेनं जगायला लागू. त्यालाच तर मी स्वच्छंद जगणं म्हणतोय आणि ओशो `मनसे मुक्ती' म्हणतायत.
(३) आपला ऐच्छीकपणा" काय भानगड आहे?
आपण काय करायचं ते ठरवतो आणि मनाला ते करण्यासाठी फॅकल्टी म्हणून वापरतो. आपण प्राथमिक आणि मन दुय्यम होतं.
(४) इच्छेचा स्त्रोत आणि वर्क एरीया जर केवळ "आपण" असु....
याचं उत्तर वर दिलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

इच्छा

जे.जे.
गुरुवार, 06/20/2013 - 00:44 नवीन
"इच्छा म्हणजे प्रभावी झालेला विचार." प्रभावी न झालेल्या विचाराला काय म्ह्णतात? आणि मनात कि (मेन्दुत?) प्रभावी झालेले सर्व विचार नेहेमीच इच्छा असतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

प्रभावी न झालेल्या विचाराला काय म्ह्णतात?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/20/2013 - 07:24 नवीन
विचार!
मनात कि (मेन्दुत?) प्रभावी झालेले सर्व विचार नेहेमीच इच्छा असतात का?
नाही. त्या विचारानं आपलं समग्र लक्ष वेधून घेतलं की त्याचं रूपांतर इच्छेत होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.जे.

जरा बोलू का अर्धवटराव?

प्यारे१
गुरुवार, 06/20/2013 - 00:51 नवीन
जरा बोलू का अर्धवटराव? ;) अध्यात्माच्या प्रांतात अंतःकरण हे इंद्रिय म्हणून गणलं गेलं आहे. ते दिसत नाही पण कार्य करतं नि कार्य करताना त्या त्या कार्याच्या स्वरुपावरुन त्याला मन, बुद्धी, चित्त अशी नावं दिली गेली आहेत. संकल्पविकल्पात्मक - हे करु की ते करु अशी अंतःकरणाची अवस्था म्हणजे मन. वरच्या हे किंवा ते चा निश्चय करणारी ती बुद्धी नि त्या निर्णयाला अवधारण करणारे ते चित्त. चहा घ्यावा की नको म्हणणारं मन, चहा घेऊ म्हणून निर्णय घेणारी बुद्धी, चहाचा तो समोर येऊन पिण्यापर्यंतच्या प्रवासात चहाचा विचार धरुन ठेवणारं चित्त. मन, मन१, मन२, मनोबा असे बरेच आयडी झाले की घोळ होतो म्हणून सांगितलं आपलं. हे सरांसाठी नाही. बाकी आम्चा मनोबा गेलाय कुठं रे????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ह्म्म्म्म...

अर्धवटराव
गुरुवार, 06/20/2013 - 08:42 नवीन
>>चहा घ्यावा की नको म्हणणारं मन, चहा घेऊ म्हणून निर्णय घेणारी बुद्धी, चहाचा तो समोर येऊन पिण्यापर्यंतच्या प्रवासात चहाचा विचार धरुन ठेवणारं चित्त. -- अशा वेळी "मी" मन, बुद्धी, चित्त वगैरेंना फाट्यावर मारुन छान बिअर घेतो ;) आयला नकोच त्या भानगडी :) ऑन सिरियस नोट्स, अंतःकरणाच्या अवस्थांचं हे वर्गीकरण त्या त्या अवस्थांना समजुन घ्यायला उपयोगी आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हे सरांसाठी नाही?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/20/2013 - 09:59 नवीन
कार्याच्या स्वरुपावरुन त्याला मन, बुद्धी, चित्त अशी नावं दिली गेली आहेत
= मनाचं आकलन नसताना तुम्ही वेगवेगळ्या कल्पना मांडून निष्कारण गोंधळ घालतायं. तुमच्याकडे निव्वळ माहिती आहे, अनुभव नाही हे तुमचे (प्रदीर्घ) प्रतिसाद (वेळोवेळी) स्पष्टपणे दाखवतात. इथे ही तुम्ही सुरूवातीला दोन `नो बॉल' टाकून पाहिलेत आणि आता हा प्रतिसाद!
चहा घ्यावा की नको म्हणणारं मन, चहा घेऊ म्हणून निर्णय घेणारी बुद्धी, चहाचा तो समोर येऊन पिण्यापर्यंतच्या प्रवासात चहाचा विचार धरुन ठेवणारं चित्त.
चहा घ्यावा हे आपण ठरवतो, उत्तमात उत्तम चहा, प्राप्त परिस्थितीत कुठे मिळेल हे ठरवायला मनाचा उपयोग करतो आणि शरीर त्या बरहुकुम कृती करतं. निर्णय खुद्द आपण घेतलेला असल्यानं संभ्रमाचा प्रश्न येत नाही आणि तो धारण करण्याचा तर त्याहून नाही कारण ती सर्व प्रक्रिया आनंददायी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सर, बस्स का? आम्हाला थोडं

प्यारे१
गुरुवार, 06/20/2013 - 13:31 नवीन
सर, बस्स का? आम्हाला थोडं ज्ञान होऊ द्या की हो! आमच्याकडं माहिती आहे. तिचा वापर करुन ज्ञान नाही होणार मान्यच आहे. नोबॉल बद्दल बोलायचं तर आम्हाला शारजाह्चा अनुभव असल्यानं आम्ही 'आता' खेळतच नाही. ११ प्लेअर्स + २ अंपायर + सगळं पब्लिक आपल्या विरुद्ध. खेळून उपयोग काय? शारजाह म्हणजे हारजा. सिंपल. पायाला बॉल लागला तर एल्बी, बॅटला लागला तर कॅच आऊट. बॉल नो असो नाहीतर नसो, अंपायर नं दिला ना? मग नो! काही बॅट्स्मन तर बॅट माझी आहे मी मला वाटेल तोवर खेळणार म्हणतात. आम्ही पण चेंडू टाकत राहतो मग! >>>>कारण ती सर्व प्रक्रिया आनंददायी असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

खेळून उपयोग काय?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/20/2013 - 14:28 नवीन
त्याचं कसं आहे, पुस्तकं भरपूर वाचलीत पण स्वतःकडे बॅट नाही. त्यातनं बॉलही उसनवारीत आणलेला. मग दुसरा खेळतोय म्हटल्यावर फेकून बघायचे दोन-चार `नो बॉल'. अर्थात त्यावर कुणी आऊट होत नाहीच म्हणा. पण एकदा फुकटात आत सोडलंय म्हटल्यावर किमान हुल्लडबाजी करायला काय हरकत आहे? भेटले आपल्यासारखे अ‍ॅसिडिटीचा त्रास असणारे तीन-चार तर तेवढाच रिलीफ!
कारण ती सर्व प्रक्रिया आनंददायी असते.
कुणाला कशात आनंद तर कुणाला कशात, कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

खिक्क्क!

प्यारे१
गुरुवार, 06/20/2013 - 14:48 नवीन
खिक्क्क! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आता काय म्हणावे या बेशरमपणाला

धन्या
गुरुवार, 06/20/2013 - 23:29 नवीन
आता काय म्हणावे या बेशरमपणाला? इथे जनसामान्यांचं भलं व्हावं म्हणून मनासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या विषयावर संजय क्षीरसागर यांच्यासारखी नम्र आणि ऋजू स्वभावाची या क्षेत्रातील अतिशय अधिकारी व्यक्ती कळकळीने लिहित असताना तुम्ही उगाचच आपले पुस्तकी ज्ञान पाजळताय आणि वरुन दातही काढताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

खिक्क्क!

मोदक
Fri, 06/21/2013 - 00:38 नवीन
खिक्क्क! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

सॉरी शक्तिमान!

प्यारे१
Fri, 06/21/2013 - 02:19 नवीन
सॉरी शक्तिमान! >>> बे-शरमपणा आम्ही दुप्पट शरमलो आहोत. ;) >>> वरुन दातही काढताय. आमच्या स्मायलीचा एक दात तरी दिसला का हो? आम्ही एक वेळ असू तुमच्यासाठी बेशरम पण आमच्या स्मायल्या मर्यादशील असतात सांगून ठेवतो. ;) असो. आम्ही संजय सरांची तहे दिलसे मुआफी मांगतो. पण ह्या धाग्यावर हुल्लडबाजी करायला त्यांनी आम्हाला जी मोकळीक दिली त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभारी आहोत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ह्या धाग्यावर हुल्लडबाजी

मोदक
Fri, 06/21/2013 - 02:28 नवीन
ह्या धाग्यावर हुल्लडबाजी करायला ह्या ह्या हया... गजा खोत आठवला. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ये मै नही कहता, उन्होने ही

प्यारे१
Fri, 06/21/2013 - 02:37 नवीन
ये मै नही कहता, उन्होने ही कहा हय. उप्परीच. ;) ह्या धाग्यावर आम्ही कटाप! (च्यायला, लोकं म्हणणार मी असताना तुम्हाला विचारतो कोण? ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

:)

अर्धवटराव
गुरुवार, 06/20/2013 - 07:37 नवीन
>> इच्छा हा प्रभावी झालेला विचार असला तरी त्यावर कृती करणं आपल्या हातात आहे. -- हे कृती करणं कृती करण्याच्या इच्छेशिवाय कसं शक्य आहे? किंवा कृती करण्याच्या निर्णयाशिवाय कसं शक्य आहे? कृती करण्याची इच्छा/निर्णय घेणे हे मनाचं काम आहे. इथे "आपण" फॅक्टर कुठुन आला? >>इच्छा मनाच्या कह्यात राहणार नाही. आपण स्वेच्छेनं जगायला लागू. त्यालाच तर मी स्वच्छंद जगणं म्हणतोय आणि ओशो `मनसे मुक्ती' म्हणतायत. -- इच्छेचे उगमस्थानच जर मन आहे तर त्या मनाच्या कह्यात कशा राहणार नाहित. स्वेच्छेने जगायचं म्हणाल, तर इच्छेचे बिलाँगींग मनापाशी आहे. "स्वेच्छा"->स्वतःची इच्छा. इथे हा स्वतः म्हणजे मनच. मनातलं द्वंद्व संपून मन एकाग्रतेने संवेदनेला रिस्पॉन्स देत राहाणं म्हणजे स्वेच्छेने जगणं. सगळा मनाचाच कारभार. >>आपण काय करायचं ते ठरवतो आणि मनाला ते करण्यासाठी फॅकल्टी म्हणून वापरतो. आपण प्राथमिक आणि मन दुय्यम होतं. -- काय करायचं ते "ठरवणं" हि मनाची प्रॉपर्टी आहे. त्याकरता ते ऑप्शनली बुद्धीची/विवेकाची मदत घेईल. पण अल्टीमेटली ते काम मनाचच. तुम्ही संवेदनेला जागणारे ते "आपण" आणि विचारांना जागणारे ते "मन" अशी जी विभागणी करताय ति चुकीची आहे (असं मला वाटतं). संवेदनेला (विचारांच्या मुळाला) आणि विचारांना (संवेदनेच्या वृक्षाला) थारा देणारं, उत्तर देणारं मनच आहे. तिथे वेगळा "आपण" अ‍ॅज सच कुणी नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मनाशी इतकं गहन तादात्म्य झालंय की स्वतःचा विसर पडलायं

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/20/2013 - 09:32 नवीन
कृती करण्याची इच्छा/निर्णय घेणे हे मनाचं काम आहे. इथे "आपण" फॅक्टर कुठुन आला?
आजपर्यंत मनच इच्छा/निर्णय घेणं ही कामं करतंय आणि आपण असहाय्यपणे त्यात ओढले जातोय. इतके की आपल्याला स्वतःची इच्छा आणि निर्णय घेण्याची क्षमता आहे हे उमजलेलंच नाही.
इच्छेचे उगमस्थानच जर मन आहे......
तुमची पुन्हापुन्हा तीच चूक होतेय (आणि इतक्या वर्षांच्या धारणांमुळे ते स्वाभाविक आहे) . तुम्ही इच्छेची भाषा करताय, मी स्वेच्छेचा मार्ग सांगतोय. इच्छा म्हणजे मनात स्वयेच निर्माण होऊन प्रभावी झालेला विचार, तो स्मृतीशी निगडित असतो. स्वेच्छा म्हणजे आपण संपूर्णपणे वर्तमानात असतांना झालेली अंतःप्रेरणा. ही अंतःप्रेरणा प्रथम आपल्याला सुखावते आणि मग मनाचा उपयोग करून आपण ती प्रत्यक्षात आणतो. अशा कृत्यात नेहमी आनंद असतो आणि त्यावर फेरविचार करण्याची गरज भासत नाही. मी इथे कितीही लिहीलं तरी हा नुसत्या चर्चेचा विषय नाही. स्वेच्छेनं जगणं हा व्यक्तिगत अनुभव आहे (आणि हे स्वानुभवानं लिहीतोय). तुम्ही एकदम पुढच्या पायरीला जाऊ शकणार नाही. प्रथम मनाच्या प्रक्रियेचं आकलन झालं पाहिजे.
..... "आपण" अ‍ॅज सच कुणी नाहि.
प्रतिसादात पुढेपुढे तुम्ही स्वतःला संपूर्ण नाकारताय, ते स्व-विस्मरण गहन झाल्याचं निदर्शक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

जबरदस्त लेखमाला

राजेश घासकडवी
Sun, 06/16/2013 - 04:01 नवीन
मन म्हणजे बायोकॉंप्युटर आणि तो चालवणारे आपण हे क्रांतीकारी विचार वाचून थक्क झालो. पण तो थक्कपणा मला आला की माझ्या मनाला आला हे लक्षात आलं नाही. मला वाटतं मन म्हणजे हार्ड ड्राइव्ह आणि मी म्हणजे सीपीयू बहुतेक. आणि मिपा म्हणजे बहुतेक प्रिंटर. आणि... पण... आजकाल सीपीयूमध्येदेखील मेमरी असते. म्हणजे हे मन बघणाऱ्या मला देखील एक छोटंसं वेगळं मन आहे बहुतेक. कारण नाहीतर विचार सुरू झाले, संपले वगैरे गोष्टी ओळखण्यासाठी कुठेतरी काहीतरी स्टोअर करायला पाहिजेच... लेखमालेच्या पुढच्या लेखांत हा सगळा गोंधळ निघून जाऊन स्वच्छ चित्र तयार होईल अशी आशा वाटते आहे.
  • Log in or register to post comments

तुम्ही थक्क झालात!

संजय क्षीरसागर
Sun, 06/16/2013 - 13:42 नवीन
>मन म्हणजे बायोकॉंप्युटर आणि तो चालवणारे आपण हे क्रांतीकारी विचार वाचून थक्क झालो. पण तो थक्कपणा मला आला की माझ्या मनाला आला हे लक्षात आलं नाही. = तुम्ही थक्क झालात. पण हे स्व-स्मरण अल्पकालीन असतं. लगेच मन सक्रिय होऊन पुढचे प्रश्न निर्माण करतं; कसे ते पाहा : >मला वाटतं मन म्हणजे हार्ड ड्राइव्ह आणि मी म्हणजे सीपीयू बहुतेक. आणि मिपा म्हणजे बहुतेक प्रिंटर. आणि... पण... आजकाल सीपीयूमध्येदेखील मेमरी असते. म्हणजे हे मन बघणार्‍या मला देखील एक छोटंसं वेगळं मन आहे बहुतेक. = जसं शरीर प्रत्येकी एकच आहे तसं मन प्रत्येकी एकच आहे त्यात ‘छोटंसं वेगळं मन’ असं काही नाही > कारण नाहीतर विचार सुरू झाले, संपले वगैरे गोष्टी ओळखण्यासाठी कुठेतरी काहीतरी स्टोअर करायला पाहिजेच... = विचार सुरू झाले आणि संपले हे ओळखणारे तर आपण आहोत. त्यासाठी पुन्हा वेगळी सिस्टम नाही. >लेखमालेच्या पुढच्या लेखांत हा सगळा गोंधळ निघून जाऊन स्वच्छ चित्र तयार होईल अशी आशा वाटते आहे. = गोंधळ जिथल्या तिथे निस्तरला तर बरं. माझ्या बाजूनं सगळं चित्र स्वच्छ आहे आणि जिथले प्रतिसाद मी तिथेच क्लिअर करत जाईन. ‘लेफ्ट ओवर’ पुन्हा नवी मानसिक प्रश्नावली सक्रिय करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

>>मला वाटतं मन म्हणजे हार्ड ड्राइव्ह आणि मी म्हणजे सीपीयू बहुतेक

उन्मेष दिक्षीत
Sun, 06/16/2013 - 14:30 नवीन
-- मी म्हणजे इलेक्ट्रिसीटी बहुतेक :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मी म्हणजे निराकार जाणिव

संजय क्षीरसागर
Sun, 06/16/2013 - 21:42 नवीन
पण तो उलगडा मनाच्या प्रक्रियेचा समग्र उलगडा झाल्याशिवाय होत नाही (सडन एन्लायटन्मेंट हा त्याला अपवाद आहे- उदा. एकहार्ट- पण अपवादात्मक केसेसचा आपण सध्या उहापोह करणार नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उन्मेष दिक्षीत

>> मी म्हणजे निराकार जाणिव

उन्मेष दिक्षीत
गुरुवार, 06/20/2013 - 16:34 नवीन
= संगणक,सीपीयु,प्रोग्रॅमर वगैरे चालु होतं , त्या काँटेक्स्ट मधे "मी म्हणजे इलेक्ट्रीसिटी" म्हणालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मन वढाय वढाय

संजय क्षीरसागर
Sun, 06/16/2013 - 14:32 नवीन
बहिणाबाईंच्या काव्यप्रतिभेविषयी लिहीण्याचा इरादा नाही. ती निर्विवाद आहे. त्यांच्या या कवितेनं मराठी माणसाला कैक वर्ष भुरळ घातली आहे, म्हणून मनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्की कसा असावा ते उलगडण्याचा प्रयत्न करतो: >मन वढाय वढाय उभया पिकाताल ढोर किती हाकल हाकलं फ़िरि येत पिकावर = मनाची प्रक्रिया अनैच्छिक आहे ही माणसाची युगानुयुगं, अत्यंत चुकीची मूलभूत धारणा आहे. निव्वळ या धारणेमुळे मनाचा आवाका बेफाम वाटतो. वस्तुस्थिती तशी नाही. मी पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ‘माइंड इज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्टिविटी बिटवीन टू इअर्स’ मन पाखर पाखर तयाची काय सांगू मात आता वहत भुइवर गेल गेल आभायात = मन कुठेही जात नाही ते फक्त विचार निर्माण करतं. त्या विचारांबरोबर वाहात गेल्यानं आपण आभाळात आणि भुईवर गेल्यासारखे वाटतो. आपण बसल्या जागीच असतो! मन लहरी लहरी त्य़ाले हाती धरे कोन उंडारल उंडारल जस वारा वाहादन = मन वार्‍यासारखं वाहात नाही, विचारांचा अवेग जोरकस असू शकतो. अर्थात ज्या क्षणी आपल्या स्थिरत्त्वाचं भान येतं (किंवा आपण बसलो आहोत हे लक्षात येतं) त्या क्षणी मन निष्प्रभ होतं. मन जहरी जहरी याच नयार रे तनतर आरे इचू साप बरा त्य़ाले उतारे मनतर = हा दुसरा अत्यंत गंभीर गैरसमज आहे. मन न्यूट्रल आहे. इट इज अ फॅसिलिटी अ‍ॅंड अ फॅकल्टी. आपल्याला ती वापरता आली तर जगण्याची मजा काही और आहे. मन एवहड एवहड जस खसखसच दान मन केवढ के वढ आभायतिब मावेन = पहिला विचार (किंवा कोणताही विचार) सूक्ष्मच असतो. एकदा विचार प्रवाहासारखे सलग झाले की आपण त्यात हरवतो आणि मग मन व्यापक आहे असं वाटायला लागतं. देवा आस कस मन आस कस रे घडल कुठे जागेपनी तुले अस सपन पडल = मन हा निसर्गानं मनुष्याला बहाल केलेला अनमोल नजराणा आहे. बहिणाबाईंच्या काव्यप्रतिभेला दाद देतो पण मन म्हणजे देवाला पडलेलं स्वप्न नाही.... देव हा मनाला झालेला भ्रम आहे.
  • Log in or register to post comments

अजीबात पटलं नाहि.

अर्धवटराव
गुरुवार, 06/20/2013 - 09:13 नवीन
= मनाची प्रक्रिया अनैच्छिक आहे ही माणसाची युगानुयुगं, अत्यंत चुकीची मूलभूत धारणा आहे. निव्वळ या धारणेमुळे मनाचा आवाका बेफाम वाटतो. वस्तुस्थिती तशी नाही. मी पहिल्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ‘माइंड इज जस्ट अ‍ॅन अ‍ॅक्टिविटी बिटवीन टू इअर्स’ -- प्रक्रिया अनैच्छीक नसली तरी तिला कंट्रोल करावं कि नाहि हा ऐच्छीक भागच आहे... व तो मनाचाच निर्णय आहे. बहिणाबाईंनी मनाचा हा आवाका समजुन हे कडवं रचलं. >>= मन कुठेही जात नाही ते फक्त विचार निर्माण करतं. त्या विचारांबरोबर वाहात गेल्यानं आपण आभाळात आणि भुईवर गेल्यासारखे वाटतो. आपण बसल्या जागीच असतो! -- बहिणाबाईंना मन एखाद्या पतंगाप्रमाणे मटेरीअली आभाळात जाते असं कुठेच म्हणायचं नाहि. त्यांना केवळ विचारांचं फ्लक्च्युएशन किती प्रचंड असतं हेच सांगायचं आहे या कडव्यातुन. >>= मन वार्‍यासारखं वाहात नाही, विचारांचा अवेग जोरकस असू शकतो. अर्थात ज्या क्षणी आपल्या स्थिरत्त्वाचं भान येतं (किंवा आपण बसलो आहोत हे लक्षात येतं) त्या क्षणी मन निष्प्रभ होतं. -- वरच्या प्रमाणेच. = हा दुसरा अत्यंत गंभीर गैरसमज आहे. मन न्यूट्रल आहे. इट इज अ फॅसिलिटी अ‍ॅंड अ फॅकल्टी. आपल्याला ती वापरता आली तर जगण्याची मजा काही और आहे. -- विष देखील केवळ एक रसायन आहे. पण ते माणसाच्या शरीरात गेलं कि शरीराची तडफड होते. त्याचप्रमाणे मन शत्रुप्रमाणे समोर आलं तर जगण्याचे तीन तेरा वाजु शकतात. बहिणाबाई मनाचे मानवी जगण्यावर (जीवनावर नव्हे) काय परिणाम होऊ शकतात याचे अतिशय चपखल उदाहरण देताहेत. >>= पहिला विचार (किंवा कोणताही विचार) सूक्ष्मच असतो. एकदा विचार प्रवाहासारखे सलग झाले की आपण त्यात हरवतो आणि मग मन व्यापक आहे असं वाटायला लागतं. -- इथे बहिणाबाईंना सूक्ष्म विचाराचे व्यापक रुपांतर एव्हढा लहानसा अर्थ अपेक्षीत नाहि. तर या रूपांतराला त्याच्या प्रत्येक अवस्थेत सामाउन घेणारा, विचारांच्या व्यापकपणाचे पोषण करणारा व एकाचवेळी अनेक पदरी विचारांना लिलया सांभाळणारा असा मनाचा प्रचंड आवाका बहिणाबाईंना अपेक्षीत आहे. >>= मन हा निसर्गानं मनुष्याला बहाल केलेला अनमोल नजराणा आहे. बहिणाबाईंच्या काव्यप्रतिभेला दाद देतो पण मन म्हणजे देवाला पडलेलं स्वप्न नाही.... देव हा मनाला झालेला भ्रम आहे. -- बहिणाबाईंना "देव" म्हणजे नेमकं काय अपेक्षीत आहे हे जाणल्याबिगर त्यांच्या समजुतदारीवर, त्यांच्या एकंदर जीवनविषयक तत्वज्ञानावर भ्रमाचा आरोप करणे म्हणजे... असो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुम्ही बहिणाबाईंनी केलेलीच चूक करताय!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 06/20/2013 - 14:02 नवीन
प्रक्रिया अनैच्छीक नसली तरी तिला कंट्रोल करावं कि नाहि हा ऐच्छीक भागच आहे... व तो मनाचाच निर्णय आहे.
बहिणाबाईंना वाटतंय मनाची प्रक्रिया अनैच्छिक आहे आणि म्हणून त्या ‘मन वढाय वढाय’ म्हणतायत. संपूर्ण कविता त्याच धारणेचा परिपोष आहे. तुम्ही त्यांच्या एक स्टेप पुढे जाताय, तुम्हाला वाटतंय ती प्रक्रिया स्वाधिन करणं `मनाचं काम आहे'. तुम्ही पुन्हा स्वत:ला विसरतायं. मनाची प्रक्रिया ऐच्छिक करणं आपल्या मर्जीवर आहे आणि तेच संबंध लेखभर आणि सर्व प्रतिसादातून मी सांगतोय. तुमची बेसिकच चूक होतेय त्यामुळे प्रतिसादातल्या उर्वरित भागावर बोलण्यात अर्थ नाही कारण तो त्याच चुकीचा फक्त विस्तारित भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

असेल कदाचीत.

अर्धवटराव
गुरुवार, 06/20/2013 - 20:51 नवीन
तुमचं प्रमेय बहुदा खालील प्रमाणे आहे: संवेदना + विचार = मन संवेदना + निर्वीचार = आपण. माझं प्रमेय खालील प्रमाणे आहे: संवेदना + विचार = मनाची एक अवस्था संवेदना + निर्वीचार = मनाची दुसरी अवस्था एकतर तुमचा मनाचा स्कोप फार लिमीटेड आहे किंवा माझा मनाचा स्कोप अवास्तव आहे. विचारांच्या आवर्तनत गुंतलेलं सुख-दु:ख भोगणारं मन आणि निर्वीचार अवस्थेतील शांती भोगणारं देखील मनच, हा माझा अनुभव... शांती आणि अशांती मधला भेद भोगणारा कुणी तरी एकच आहे... माझ्या मते ते मन आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अतिशय धडाकेबाज सुरुवात...

अग्निकोल्हा
Sun, 06/16/2013 - 20:54 नवीन
मनाच्या दोन विंग्ज आहेत, एक ऑडिओ आणि दुसरी विज्युअल. कुठलीही स्मृती मूलतः या दोन प्रकारच्या रेकॉर्डिंग्जवर आधारित असते.
म्हणजे ? हेलन केलर ला मन न्हवत का हो ? अन मनाला जाणवणारे स्पर्शज्ञान वगैरे वगैरे वगैरे थोतांडच की ???
  • Log in or register to post comments

दादा ? काय म्हणता ?

अग्निकोल्हा
Sun, 06/16/2013 - 21:33 नवीन
भलेहि त्यावेळी इतर ऑडिओ विजुअल्स इनपुट असतिल वा नसतिल पण लाइफ'स फस्ट चेरि पॉपिंग सेन्शेशन, किंव्हा आज सकाळिच पावसात खाल्लेल्या कांदाभजिची जिभेवर चव रेंगळणे यात मनाच्या ऑड्योव्हिड्योमेमोरीचा संबधच नाहीये म्हणजे मन नष्ट झाले की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा