फिर्याद

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
22 Apr 2013 - 3:45 pm

ही पुन्हा हवा आज, धुंदकुंद झाली
ही पुन्हा मला आज, तुझी याद आली

घनांचे पुरेपूर बरसून झाले
आता कोण आसवांना, अवेळी साद घाली

तु दिलास ना दगा, वाटते जगाला
तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली

मी न कधी घेतले, नाव तुझे कोणापुढे
दोन शब्द लिहिले, हाय ती फिर्याद झाली

लपविले सदा मी, पाय भेगाळले माझे
वाटले जगास माझी, चाल सुखात झाली

ईतक्यात त्यांना माझे, एवढे रडू आले
आता कुठे सांगण्यास, माझी सुरुवात झाली

मराठी गझलगझल

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

22 Apr 2013 - 4:36 pm | सस्नेह

गझल (आहे असे वाटते ) आवडली.

चाणक्य's picture

22 Apr 2013 - 9:34 pm | चाणक्य

गझलच आहे, फक्त गैर्-मुरद्दफ (म्हणजे ज्यात 'रदीफ' नसतो ती) आहे

कवितानागेश's picture

22 Apr 2013 - 10:34 pm | कवितानागेश

छान लिहिलय.
पण गैर्-मुरद्दफ (म्हणजे ज्यात 'रदीफ' नसतो ती) > म्हणजे काय जरा सविस्तर लिहाल का?

चाणक्य's picture

23 Apr 2013 - 12:06 pm | चाणक्य

गझलेतल्या यमकाच्या शब्दांनंतर येणा-या शब्दाला / शब्दगटाला रदीफ म्हणतात. रदीफ गझलेच्या पहिल्या शेराच्या दोन्ही ओळींत येतो, मात्र पुढच्या शेरांच्या फक्त दुस-याच ओळीत यतो. उदाहरण म्हणून 'चुपके चुपके'ही प्रसिद्ध गझल घेऊ. या गझलेचा पहिला शेर आहे -
'चुपके चुपके रातदिन आसूं बहाना याद हैं
हमको अबतक आशिकी का वह जमाना याद हैं'

यात बहाना आणि जमाना या यमकाच्या शब्दांनंतर 'याद हैं' हे रदाफी (रदीफ चे अनेकवचन) आले आहेत. आता याच गझलेतले पुढचे शेर पाहू -

दोपहर की धूप में मेरे बुलाने के लिये
वो तेरा कोठे पे नंगे पाँव आना याद हैं

खींच लेना वो मेरा परदे का कोना दफ्फतन
ऒर दुपट्टे से तेरा वो मुँह छुपाना याद हैं

आता या वरच्या दोन्ही शेरात आना आणि छुपाना या यमकाच्या शब्दांनंतर 'याद हैं' हे रदाफी येतात. माझ्या गझलेत आली, झाली, घाली हे यमकाचे शब्द आलेत पण त्यानंतर कुठलाही रदीफ नाहीये. म्हणून ही गझल गैर-मुरद्दफ आहे.

सुधीर's picture

23 Apr 2013 - 12:42 pm | सुधीर

गझल आणि हा प्रतिसादही आवडला.

कवितानागेश's picture

23 Apr 2013 - 1:20 pm | कवितानागेश

छान माहिती दिली आहेत. :)
तुमच्या गजल्सबरोबर अजून इतर रसग्रहणे पण येउ देत.
वाचायला आवडेल.

नीलकांत's picture

22 Apr 2013 - 10:36 pm | नीलकांत

छान लिहीले आहे. :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Apr 2013 - 1:26 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

ज्जे बात!!

तु दिलास ना दगा, वाटते जगाला
तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली

जियो!!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Apr 2013 - 7:49 am | अत्रुप्त आत्मा

फक्त सलाम सलाम सलाम!

धमाल मुलगा's picture

25 Apr 2013 - 8:32 am | धमाल मुलगा

तू साल्या रडवणार आहेस एखाददिवस मला. हे असलं लिहिताच कसं येतं राव तुम्हाला? तू एक अन तो आमचा आंद्या एक. कमीतकमी शब्दात काळीज कसं पिळवटायचं ते शिकावं तुमच्याकडून. :(

इन्दुसुता's picture

25 Apr 2013 - 9:20 am | इन्दुसुता

गझल आवडली. आपण दिलेली माहितीही आवडली.
वर माऊ ने म्हटले आहे तसेच म्हणते, रसग्रहण आणि माहिती वाचायला आवडेल.

वेल्लाभट's picture

25 Apr 2013 - 9:49 am | वेल्लाभट

छान आहे. पण मला स्वतःला मराठी काव्यात हिंदी/उर्दू शब्द घुसडलेले रुचत नाहीत.

पैसा's picture

25 Apr 2013 - 9:52 am | पैसा

मस्त!

ऋषिकेश's picture

25 Apr 2013 - 11:31 am | ऋषिकेश

दवणीय गझल!