हिंदु नावाचा धर्मच नाही....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
17 Mar 2013 - 11:21 am
गाभा: 

हिंदु नावाचा धर्मच नाही अशा बातमीनं कालपासून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. देवस्थान आपल्या उत्त्पन्नातील काही भाग धार्मिक कार्यासाठी वापरत असतील तर त्यास आयकरातून सुट मिळू शकत नाही, असे लवादाने मत मांडले आहे. लवाद पुढे असेही म्हणते की, '' हिंदुत्व हा धर्म किंवा समाज कधीही नव्हता. हिंदुत्व ही केवळ एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली मानणारे अनेक समूह आहेत. ते वेगवेगळ्या देवदेवतांना पुजतात. इतकेच नव्हे तर, ही जीवनशैली अंगिकारणार्‍यांना देवाची पूजा करण्याची कोणतीही सक्ती नसते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हिंदुत्व हा धर्म मानता येत नाही. तसेच शिवशंकर, हनुमान किंवा दुर्गामाता मंदिराच्या देखभालीवरील खर्च हा धार्मिक खर्च मानता येणार नाही, असेही म्हटले आहे.

'भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध कुठल्याही एका धर्माशी नाही. ते विश्वव्यापी आहेत. ज्या हिंदू धर्माशी या देवदेवतांचे नाव जोडले जाते, तसा कुठला धर्मच अस्तित्वात नाही' (मटा)

१] माझा पहिला प्रश्न असा आहे की भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध हा हिंदु धर्माशीच संबंधित आहेत तेव्हा ते विश्वव्यापी आहेत, असे मत लवादाने मांडण्याचे कारण काय असावे.

२] एकाच देवाची पुजा करणार्‍यांचा तो एकच धर्म असतो तेव्हा नव्या लवादाच्या विचारात हिंदुंचा एक धर्म नाही का ?

३] हिंदु ही एक जीवनपद्धती आहे, त्याला धर्म म्हणने चूकीचेच आहे का ?

विनंती : हिंदूच्या विरोधात आता सारखे लिहिल्या जाते, बोलल्या जाते, हिंदु सहिष्णू आहेत वगैरे मुद्दे चर्चेत टाळता आलेत तर टाळावे, लवाद असे का म्हणते यावरील माहितीपूर्ण आणि काही तर्कपूर्ण प्रतिसादांचे स्वागत आहे.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2013 - 11:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धर्म याचा अर्थ 'आचरणाची निश्चित तत्त्वे' असा असेल किंवा धर्म या शब्दातून 'धार्मिक विधी केल्याने प्राप्त झालेले पुण्य' या अर्थाने असेल किंवा अन्य जे काही असेल त्यात हिंदुंच्या बाबतीत 'देवपूजा' सांगितली असावी पण कोणत्या एका देवाबद्दल याची काही शक्यता वाटत नाही.

-दिलीप बिरुटे

खटासि खट's picture

17 Mar 2013 - 11:39 am | खटासि खट

पॉपकॉर्न, चकणा, रॉयल स्टॅग, आरामखुर्ची, टीपॉय अशी आमची जय्यत तयारी झाली आहे. सुरू करा..

धर्मशास्त्राचा इतिहास हे डॉ.पांडुरंग काणे यांचे पुस्तक माझ्या संग्रही आहे त्यात असं म्हटल्याचं आठवतं की प्राचीन काळी देवांच्या पूजेबाबत सूर्य,वरुण,अग्नी या देवतांचे उल्लेख येतात मात्र शीव,लक्ष्मी आणि इतर देवता नंतर आल्या अवतार तर आपणास माहितीच आहे, पण नेमकी देवपूजा याच देवांची करावी असे काही दिसत नाही. असो, थोडं पुस्तक-बिस्तक चाळून पाहीन आणि हाती काही लागले तर खरडेनच.

-दिलीप बिरुटे

पिशी अबोली's picture

17 Mar 2013 - 7:43 pm | पिशी अबोली

वैदिक काळात नैसर्गिक शक्तींची पूजा केली जायची. त्यांना देवतास्वरूप पौराणिक काळात मिळालं असावं..

शशिकांत ओक's picture

18 Mar 2013 - 12:27 pm | शशिकांत ओक

डॉ बिरुटे सर, योग्य शब्दात खडसावलेत ...

खटासि खट's picture

18 Mar 2013 - 8:46 pm | खटासि खट

ओकसर रागावले.
नेमाडेंना ३३ वर्षं लागली, त्याआधी काथ्याकुटून ब्रिटीश गेले, मॅक्समुल्लर गेला. लवादापुढं आणि सर्वोच्च न्यायालयापुढं काही कमी काथ्या कुटला असेल का ? आपल्याला दोन चार दिवसात कसं कळणार या उत्सुकतेनं खुर्ची टाकून बसतो म्हणलं. शंभर दीडशे वर्षांमागे कुठल्या धार्मिक ग्रंथात हिंदू शब्द आला असल तर कुणी देईल एव्हढंच बघायचं होतं. रागवू नका मंडळी. चालू द्या चर्चा.

हिंदू धर्म असा शब्दप्रयोग पेशवेकालीन कागदपत्रांत सापडतो. बहुतेक राघोबा आणि जानोजी भोसले यांमधील एका पत्रात तसा उल्लेख आहे.

विजुभाऊ's picture

29 Dec 2014 - 4:20 pm | विजुभाऊ

हिंदू धर्म असा शब्दप्रयोग पेशवेकालीन कागदपत्रांत सापडतो. बहुतेक राघोबा आणि जानोजी भोसले यांमधील एका पत्रात तसा उल्लेख आहे.
"हे हिंदवी स्वराज्य व्हावे"..ही आणि तत्सम वाक्ये मग कपोलकल्पीतच म्हणायची का

पेशवेकालीन कागदांत उल्लेख आहे याचा अर्थ शिवकालीन कागदांत नाही असा कुठे होतो? मला पेशवेकालीन उदा. आठवले म्हणून ते दिले इतकेच.

अपूर्व कात्रे's picture

17 Mar 2013 - 11:51 am | अपूर्व कात्रे

वरील प्रश्नांची उत्तरे काही मला माहित नाहीत पण माझेही काही प्रश्न आहेत.

लवादाने "तांत्रिकदृष्ट्या हिंदुत्व हा धर्म मानता येत नाही" असे म्हटले आहे. कुठलीही एखादी विचारसरणी/ जीवनपद्धती/ किंवा तत्सम काही हे धर्म आहे किंवा नाही हे ठरवण्याचे काही तंत्र वगैरे आहे का? ठराविक धर्मग्रंथ, ठराविक देव, ठराविक प्रेषित, ठराविक उपासनापद्धती, ठराविक खुणा, संकेत, खानपान-पद्धती आणि ठराविक विचारसरणी वगैरे असलेल्या प्रकारालाच धर्म म्हणता येऊ शकेल काय? किंवा तसेच असले पाहिजे असे म्हणणे कितपत बरोबर आहे? आणि तसे असेल तरीही ते तंत्र कोणी ठरवले आणि तेच बरोबर हेसुद्धा कोणी ठरवले?

कपिलमुनी's picture

17 Mar 2013 - 12:03 pm | कपिलमुनी

हिंदू धर्म आहे की नाही, हे ठरवण्याआधी धर्माची व्याख्या करणे गरजेचे आहे. काही मानके ठरवून घेणे क्रमप्राप्त आहे.
मग त्या मानकांनुसार आपण उहापोह करू शकतो. पण सद्य परीस्थीतीमधे अशी मानके उपलब्ध आहेत का?

प्राध्यापक's picture

17 Mar 2013 - 12:24 pm | प्राध्यापक

इष्टप्राप्त्यर्थ व अनिष्टनिवारणार्थ अलौकिक शक्तीची साधना किंवा आराधना म्हणजे धर्म होय.या आराधनेचे कर्मकांड कदाचित सर्व धर्माचे वेगवेगळे असु शकतील.
भूतकालीन अस्तंगत मानवी समाज संस्कृतीच्या अनेक पातळ्यांवर जगत होते व त्यांच्यामध्येही निरनिराळ्या पातळीवरच्या धर्मसंस्था होत्या, असे इतिहासपूर्वकालीन संस्कृतीच्या अभ्यासकांनी म्हटले आहे.
धर्माचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात,संस्थारूप व वैयक्तिक यामधे यज्ञ वा पूजा म्हणजे कर्मकांड, देवताविषयक व्यवस्थेचे तंत्र, देवविद्या, तसेच सण्,उत्सव,पुरोहित संस्था या गोष्टी संस्थारूप धर्मात मुख्यतः अंतर्भूत होतात.तर वैयक्तिक धर्म हा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातील धर्म असतो.देवतेची कृपा संपादन करता येणे वा अवकृपा होणे, यासंबंधी विचार यात फारसा नसतोच, देवविद्या ही यात गौण असते, आचरणाचे स्वरूप कर्मकांड हे नसते.
त्यमुळे जर संस्थारूप धार्मिक केंद्रामधुन(मग ते केंद्र कोणत्याही धर्माचे का असेना) पेसा जमा होत असेल तर ते त्या धार्मिक केंद्राचे उत्पन्न च मानावे लागेल.

शिल्पा ब's picture

17 Mar 2013 - 12:29 pm | शिल्पा ब

आमचे दोन पैसे:
सर्वसाधारणपणे धर्म प्रकारात एकच एक "देव" असतो जसं की ख्रिस्त. बाकीचे उप किंवा कमी मान्यतेचे देव बिव. त्यांचा एक धर्मग्रंथ ज्यात काय करा अन काय नका करु वगैरे गायडन्स असतो.

हिंदुंमधे तसं काहीच नाही. प्रत्येकाचा वेगळा देव. धर्मग्रंथ नाही. - गीता, वेद वगैरे हे धर्मग्रंथ नाहीत.- एकच एक देव तर अजिबात नाही. देवांचंच आपापसात पटत नाही म्हणतात. म्हणुन तांत्रिकदृष्ट्या म्हंटलं तर लवादाचं म्हणणं ग्राह्य आहे. पण मी असं वाचलंय की परदेशी लोकं भारताकडे यायला सुरुवात झाल्यानंतर (प्राचीन भारत - सिंधु नदीचा भाग + आताचं अफगाणिस्तान ते पार खाली म्यानमारपर्यंत) सिंधु नदीच्या नावाचा अपभ्रंश करुन त्या नदीकाठी राहणारे हे हिंदु असं झालं. जाणकारांनी सांगावं ही विनंती.

आदूबाळ's picture

17 Mar 2013 - 12:33 pm | आदूबाळ

लवादाचा निर्णय वाचला. त्याअनुषंगाने काही उत्तरे देण्याचा प्रयत्नः

१] माझा पहिला प्रश्न असा आहे की भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध हा हिंदु धर्माशीच संबंधित आहेत तेव्हा ते विश्वव्यापी आहेत, असे मत लवादाने मांडण्याचे कारण काय असावे.

आयकर लवाद हा एक न्यायिक मंच आहे. त्यामुळे वरिष्ठ न्यायिक मंचांचे निर्णय त्यावर बंधनकारक असतात. "हिंदू हा धर्म नाही" हे मत नागपूर लवादाचं स्वत:चं नसून मद्रास उच्च न्यायालयाचं आहे (टी टी कुप्पुस्वामी चेट्टियार वि. तमिळनाडू - १९८७).

मूळ बातमीत

'जिथे सर्व लोकच एकच कायदा आणि एका नियमाचे पालन करतात. विशिष्ट देवालाच भजतात. त्यांनाच समाज किंवा धर्म म्हणता येऊ शकते. एकसंध समाजाची ही व्याख्या केवळ मुस्लीम आणि ख्रिश्चनांना लागू होते'

असा उल्लेख आहे, तो सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या कमिशनर वि. लक्ष्मींद्र तीर्थ स्वामियार (१९५४) या निर्णयावरून घेतलेला आहे.

तात्पर्य काय, आयकर लवादाने कुठलाही नवीन शोध लावलेला नाही. (आता मद्रास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असं का म्हणतं हा प्रश्न उरतो. पण हिंदू पर्सनल लॉचा माझा अभ्यास नसल्याने त्याचं उत्तर मला ठाऊक नाही.) अजून एक गोष्ट म्हणजे आयकर लवादाचे निर्णय फक्त आयकर कायद्यापुरते बंधनकारक असतात. त्यामुळे आयकर कायद्यासाठी हिंदू धर्म नसला तरी इतर कायद्यांवर त्याचा परिणाम व्हायचं काही कारण नाही. हिंदू धर्म नाही हा "लॉ ऑफ लँड" नक्कीच नाही.

[अवांतरः लवादाने हा निर्णय कलम ८०-जी च्याअंतर्गत देण्यात येणार्या आयकर सवलतींवर दिला आहे. त्यात "धर्म" (religion) असा शब्दप्रयोग नसून "धार्मिक समूह" (religious community) असा शब्दप्रयोग आहे. लवादाच्या निर्णयाचा आदर करूनसुद्धा "हिंदू हा धार्मिक समूहसुद्धा नाही" असं म्हणणं नक्कीच चूक आहे. त्यामुळे लवादाचा हा निर्णय चुकला आहे असं मला वाटतं.]

रमेश आठवले's picture

17 Mar 2013 - 1:48 pm | रमेश आठवले

माझ्या स्मरणात असे आहे- ( चूकभूल द्यावी घ्यावी)-
मागे एकदा शिवसेनेचे पुढारी मनोहर जोशी यांनी निवडणुकीच्या आधी केलेल्या प्रचार भाषणात हिंदुत्वाचा पाठपुरावा केला व हे भाषण निवडणूक पंचाने घालून दिलेल्या आचार संहितेच्या दृष्टीने अवैध असल्याने त्याची निवड रद्द व्हावी अशा अर्थाचा खटला कोणीतरी कोर्टात दाखल केला होता.
प्रकरण सर्वोच्च न्यायालया पर्यंत गेले होते .
न्यायालयाने ह्यावर दिलेल्या निर्णयात हिंदुत्व हा धर्म नसून ती एक जीवनपद्धति आहे असा निर्णय देऊन जोशी यांची निवडणूक वैध ठरवली होती.
आपल्यापैकी वकील मंडळी या निकालाबाबत अधिक शहानिशा करू शकतील असे वाटते.

तिमा's picture

17 Mar 2013 - 2:00 pm | तिमा

हिंदु, हा धर्म नाही तर सरकारी अर्ज भरताना त्यातील धर्म या रकान्यात 'हिंदु' असे का भरतात ? आणि सरकारही ते मान्य का करते ?
त्या ठिकाणी धर्म या रकान्यात 'माहित नाही' किंवा 'अननोन' असे लिहावे का ?
याच न्यायाने 'हिंदु अविभक्त कुटुंब' हा कायदा रद्द करावा का ?

राही's picture

17 Mar 2013 - 2:26 pm | राही

जगातील दोन प्रमुख धर्म देव ही संकल्पना मानत नाहीत, गॉड म्हणजे सुप्रीम पॉवर, परमशक्ती इतक्यापुरताच त्यांचा गॉडशी संबंध आहे. क्रिस्टियानिटीमध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या ट्रिनिटीला महत्त्व आहे. या गॉडला मराठीत आपण सर्वसाधारणपणे देव म्हणतो. हिंदी मध्ये बहुधा भगवान्,ईश्वर हे शब्द वापरले जातात अथवा देवता हा शब्द. देव,देवी हे शब्द क्वचितच वापरतात.इस्लाम आणि क्रिस्टियानिटीमध्ये प्रेषिताला मानतात,त्याची वचने हाच धर्म अशी त्यांची धारणा आहे.ही एक गोष्ट हिंदु म्हटल्या जाणार्‍या समुदायाला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. बौद्धांमध्ये देव किंवा त्यांची मूर्तिपूजा नाही. जैनांच्या एका गटामध्येही देवळात तीर्थंकर असतात, देव म्हणून कोणी नसते. शिखांचेही गुरू असतात. हिंदूंना मूर्तिपूजेची सक्ती नाही पण मूर्तिपूजा हेही हिंदूंची वेगळी ओळख सिद्ध करण्याचे एक साधन साधारणपणे बनू शकेल.बाकी हिंदू ही सिद्ध करण्याची गोष्ट नव्हे, ती मानण्याची गोष्ट आहे. कोणीही मनुष्य स्वतःला हिंदू मानून तसे आवश्यक कायदेशीर सोपस्कारांनंतर कागदोपत्री नोंदवून घेऊ शकतो.हिंदु अविभक्त कुटंब, वारसा, दत्तक इत्यादि बाबींसाठी हे कायदेशीरत्व आवश्यक असते. देवळाच्या मालमत्तेची देखभाल, यज्ञ, होमहवन,प्रसाद,फुले, सजावट यावरील खर्च हा करसवलतपात्र धरण्याचे काही कारण दिसत नाही. ८० सी.सी. ची सवलत साधारणतः समाजोपयोगी कार्याला केलेल्या मदतीला मिळते. आणि हे समाजोपयोगी कार्य काय-कोणते ह्याची पुरेशी व्याख्या आयकरकायद्यामध्ये केलेली आहे अर्थात जाणकारांनी अधिक लिहावे अशी अपेक्षा.

सोत्रि's picture

17 Mar 2013 - 3:23 pm | सोत्रि

अतिशय समर्पक आणि संतुलित प्रतिसाद!

देवळाच्या मालमत्तेची देखभाल, यज्ञ, होमहवन,प्रसाद,फुले, सजावट यावरील खर्च हा करसवलतपात्र धरण्याचे काही कारण दिसत नाही. ८० सी.सी. ची सवलत साधारणतः समाजोपयोगी कार्याला केलेल्या मदतीला मिळते.

+१००

- ('अ'धर्मी) सोकाजी

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Mar 2013 - 4:12 am | निनाद मुक्काम प...

Signboard Thank You
माझे सुद्धा हेच मत आहे.

सुबोध खरे's picture

17 Mar 2013 - 2:27 pm | सुबोध खरे

न्यायालयात न्याय मिळतो हे अर्धसत्य आहे.
न्यायालयात जे मिळते त्याला न्याय म्हणतात

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2013 - 2:32 pm | श्री गावसेना प्रमुख

म्हणजे शिवाजी महाराज्,आंबेडकर्,सावरकर, टिळक अशी दिग्गज मंडळी ही हिंदु नावाच्या जमावाचा एक भाग होती तर
माझ्या तमाम हिंदु बंधु भगीनीनो अशी घोषणा काहीच कामाची नव्हती ,परदेशी आक्रमकांनी भारतात हल्ला करण्या अगोदर त्यांचे लोक सोडुन बाकीचे कसे काय ओळखले,का आपण फक्त महादेवाच्याच भक्तांवर हल्ला करायचा असे ठरवले. शिवाजी महाराजांच स्वराज्य हे कशाशी संबधीत आहे हिंदु धर्माशी की मुस्लिम धर्माशी.हिंदु हा एक धर्म नाही तर आंबेडकर का म्हणुन हिंदु धर्माचा त्याग करुन बॉद्ध धर्मात गेले.
ह्या आताच्या आयकर अधिकार्यांची जात, धर्म कोणता.ह्यांनी नोकरी साठी अर्ज करतांना धर्माच्या रकाण्यात काय लिहील. ह्यांची लायकी आहे काय हिंदु हा धर्म नाही असे म्हणन्याची.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2013 - 3:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धृ =धारण करणे, आधार देणे, ह्या धातूपासून तो बनला आहे. धारयती इति धर्मः अशी धर्माची व्याख्या आहे. वर्ण धर्म, आश्रम धर्म, वर्णाश्रम धर्म, नैमित्तिक धर्म आणि गुणधर्म अशा पाच धर्मांचा उल्लेख आहे. या सर्वांमधेच आचार विचाराचे पालन करणे, नियमन हे येते. देवपूजा, पुनर्जन्म, इ.इ. हे सर्व मानना-यांची एक 'जीवनपद्धती' आणि अशी ही जीवनपद्धती कोणी मानत होते तर कोणी नाही.

>>>ह्यांची लायकी आहे काय हिंदु हा धर्म नाही असे म्हणन्याची.
आपल्याकडे हिंदु धर्माबद्दल बरीच माहिती असावी, त्यांना नसेल कळला हिंदु धर्माचा अर्थ. पण, आम्हाला नक्की समजावून सांगा धर्म कधी अस्तित्त्वात आले, हिंदू कोणाला म्हटले जाते, आणि हिंदूच का म्हटले पाहिजे त्याचे तपशिलवार संदर्भ दिले तर वाचायला आवडतील.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

17 Mar 2013 - 4:26 pm | प्रचेतस

सहमत आहे.
धारयती इति धर्मः म्हणजेच जीवनशैली.
शांतिपर्वात वरील सर्व धर्मांचे भीष्मांनी तपशीलवार वर्णन केले आहे.

पर्शियन भाषेत 'स' हा शब्द नसल्यामुळे 'स' च्या जागी 'ह' म्हटले गेले. उदा. सप्तसिंधू ही हप्तहिंदू झाली तर असूर हे अहूर झाले. सिंधू नदीपलीकडील प्रदेशात राहणार्‍या नागरीकांना हिंदू हे नाव मिळाले. अर्थात 'हिंदू' हे धर्माचे नाव पूर्वीचे अगदी तुरळक उल्लेख वगळता ( ते उल्लेखही साधारण इस्लामी राजवटीमधले आहेत) तसे अगदी अलीकडील म्हणजे ब्रिटिशकाळात प्रचारात आले. आणि त्यातही भारताच्या उत्तरेकडील भागाला हिंदुस्थान म्हणत कारण तो भाग तुलनेने सिंधू नदीला जास्त जवळचा तर दक्षिणेला दख्खनच म्हटले जाई.
पेशवेकाळातल्या उत्तरेकडच्या स्वार्‍यांना हिंदुस्थानवर स्वारी असे म्हटलेले कित्येक उल्लेख आहेत.

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2013 - 5:16 pm | श्री गावसेना प्रमुख

हिंदुस्थान हे प्राचीन नाव आहे न की हिंदुस्तान,हिमालया पासुन सुरु होउन हिंद महासागरांपर्यत देवांनी निर्मिलेला प्रदेश म्हणजे हिंदुस्थान.
हिमालयात् समारभ्य यावत् इन्दु सरोवरम्। तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते॥
हिंदु शब्द धर्माऐवजी राष्ट्रीयत्व म्हणुन मानला जायचा,भारतात तेव्हा दुसर्या धर्माचा उदय झाला नसल्याने तेव्हा सर्व रहीवाश्याना हिंदु म्हटल जायच,कालातंराने परदेशी प्रवाश्यानी ह्याला धर्माशी जोडायला सुरवात केल्याने हिंदु धर्म हा प्रचलीत झाला असावा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2013 - 5:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> हिमालया पासुन सुरु होउन हिंद महासागरांपर्यत देवांनी निर्मिलेला प्रदेश म्हणजे हिंदुस्थान.

देवांनी निर्मिलेल्या कोणत्या ग्रंथात असे सांगितले आहे. (गम्मत नाही,गंभीरपणे विचारतो आहे) हिंदू असा उल्लेख कोणत्या धार्मिक ग्रंथात (वेद,पुराणे) येतो काय ?

>>>हिंदु शब्द धर्माऐवजी राष्ट्रीयत्व म्हणुन मानला जायचा,
राष्ट्रीयत्त्व वगैरे कल्पना अगदी अलिकडच्या असाव्यात असे वाटते.

>>> भारतात तेव्हा दुसर्या धर्माचा उदय झाला नसल्याने तेव्हा सर्व रहीवाश्याना हिंदु म्हटल जायच,कालातंराने परदेशी प्रवाश्यानी ह्याला धर्माशी जोडायला सुरवात केल्याने हिंदु धर्म हा प्रचलीत झाला असावा

हम्म. दुसर्‍या धर्माचा उदय भारतात झाला की परदेशात झाला, वेगवेगळे धर्म कधी अस्तित्त्वात आले याची माहिती मिळाली असती तर बरे झाले असते. असो, पण बरीच माहिती मिळाली. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

त्यामुळे ते काहीवेळा काहीबाही कोर्टासमोर सादर करतात.
हिंदु हा धर्म आहे कि जीवनपध्दती आहे हा तुमचा मुख्यप्रश्न आहे
धर्म आणि जीवनपध्दती म्हणजे एकच कि वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत हे स्पष्ट झाले पाहिजे.
जीवनपध्दती म्हणजे दररोज जगण्यासाठी केलेली उठाठेव असे मला तरी वाटते. पण समाजजीवन पध्दत आणि धर्म ह्यांची सांगड घालता येवु शकते.खरतर धर्मनिरपेक्ष समाज हे अलिकडच्या काळातला शब्द आहे. त्याचा वापर बाबासाहेबांनी प्रथम केला आहे/असावा.पुर्वी समाजजीवन हे एकाच समुहाचे किंवा एकप्रकारच्याच जीवनपध्दती असणार्‍या लोकांचे असे.त्यामुळे हिमालयाच्या कुशीतील किंवा सिंधुनदीच्या खोर्‍यातील अथवा हिंदमहासागराशेजारील प्रदेशातील राहणार्‍या लोकाच्या समाजजीवनपध्दतीला हिंदु असे संबोधत असावेत.त्यातुन पुढे त्याच्या देवता,कर्मकांडे विकसित झाली असावित.

आदूबाळ's picture

17 Mar 2013 - 8:38 pm | आदूबाळ

लवादातील लोकाना सरकारची तिजोरी भरायची असते. त्यामुळे ते काहीवेळा काहीबाही कोर्टासमोर सादर करतात.

लवाद हे कोर्टच असतं हो.

आणि या खटल्यात "आमचे देऊळ कुठल्याही धर्माचे नाही" हा युक्तीवाद देवस्थानाने सादर केला होता, सरकारने नाही!

...He contended that the temple is open to everybody without caste and creed. Anybody who have faith or not in Shiva, Hanuman, Durga may come or even the person who does not have faith in these deities, can also come. The temple does not belong to a particular religion. The expenditure so incurred are not of religious nature. Even the objects of the assessee are not the religious nature. Putting the idols is not a religious activity.

राजेश घासकडवी's picture

18 Mar 2013 - 1:22 am | राजेश घासकडवी

Putting the idols is not a religious activity.

देवळाचा कारभार पहाणाऱ्या विश्वस्तांतर्फे हा युक्तिवाद येण्यावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांनी ठासून केलेलं सुप्रसिद्ध विधान आठवलं.

"I did not have sex with that woman, Monica Lewinski."

सोत्रि's picture

17 Mar 2013 - 5:40 pm | सोत्रि

गावसेना प्रमुख का? बरं बरं...

धागा जरा सिरीयस आहे म्हणून फक्त एकढेच 1

- ('अ'धर्मी) सोकाजी

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2013 - 6:24 pm | श्री गावसेना प्रमुख

का डोके फोडुन घेताय सोकाजी राव ,दुष्काळ आहे जरा सावकाश

स्पंदना's picture

17 Mar 2013 - 4:04 pm | स्पंदना

खर तर काथ्या कुटायचा मला अजिबात अधिकार नाही. पण अगदी मुळावर आलय म्हणुन उगा शेंडे सोडवते. कुटत नाही आहे.

तर माझ म्हणन हे की जेंव्हा "धर्म" ही संकल्पनाच मुळी अस्तित्वात नव्हती तेंव्हा पासुन सनातन धर्म हा अस्तित्वात आहे. आता त्याच्या बरोबर तुलना करायला बाकिचा कोणताच आधार नसल्याने हा अतुलनिय म्हणावा लागेल. मग नंतर स्वतःच्या मोठेपणाचे ढोल बडवणारे प्रेषित आले,( जो "माझ्या" शिवाय दुसरा कुणी महान नाही अस म्हणतो , मी एकटाच पुजनिय म्हणतो, असा गर्विष्ठ माणुस म्हणजे प्रेषित अस माझ तरी दारावर धर्म विकायला आलेल्या लोकांमुळे मत झालय. हे खोडायचा विनाकारण प्रय्त्न करु नये. कारण मला सांगायला येणारे विक्रेते तस म्हणौनच विकायचा प्रयत्न करतात) अन मग धर्म म्हणजे काहीतरी असा विचार करण्याची पद्धत आली. आता या सर्वातुन मुक्त असलेला आपला सनातन धर्म मग यांच्या कॅटेगिरीत बसवायचा म्हणुन धर्म अस संबोधायला हरकत नसावी.
तसाही कुणीही याव अन बडवुन जाव अशी वेळ आली आहे सनातनवर.
हे कलियुग आणि किती शतक आहे ब्वा?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Mar 2013 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अ.अ.

सनातन धर्म म्हणन्यापेक्षा 'वैदिक धर्म' म्हटलं असतं तर लवादापुढे जाता आलं असतं काय ? ऋग्वेदात वेगवेगळ्या देवतांना उद्देशून ऋचा रचलेल्या आहेत म्हणतात तेव्हा अनेक देवता वैदिक धर्मात आहेत आणि वेद परमेश्वरानेच निर्माण केलेले असल्यामुळे आमच्या धर्माला वैदिक धर्म म्हणावे आणि आम्ही त्या देवांची उपासना करतो तेव्हा आमच्या धर्माचं नाव वैदिक धर्म आहे, पुढे सिंधूचा प्रदेश आणि तेथील रहिवासी म्हणजेच हिंदू आहे असे म्हणता आले असते, असे म्हटले असते तरी देवांचे धार्मिक काम म्हणून आयकरातून सूट मिळाली नसतीच. पण, आमचा वैदिक धर्म आहे, असे तरी म्हणता आले असते ?

-दिलीप बिरुटे

विनोद१८'s picture

17 Mar 2013 - 6:38 pm | विनोद१८

१००% बरोबर.....

विनोद१८

पैसा's picture

17 Mar 2013 - 7:55 pm | पैसा

'आमचे शिव मंदिर हे सर्व समाजासाठी खुले असते. ते कुठल्याही एका धर्माशी संबंधित नाही. शिवाय मूर्त्यांची प्रतिष्ठापना करणे हे काही धार्मिक कार्य होत नाही,' असा युक्तिवाद देवस्थान समितीने लवादापुढे केला. लवादाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आयुक्तांचा निर्णय फेटाळून लावला.

असे या बातमीत म्हटले आहे. म्हणजे धार्मिक कार्यांबद्दलचा देवस्थान कमिटीचा युक्तिवाद कोर्टाच्या जुन्या काही निकालांचा आधार घेत लवादाने मानला आहे असे दिसते.

'जिथे सर्व लोकच एकच कायदा आणि एका नियमाचे पालन करतात. विशिष्ट देवालाच भजतात. त्यांनाच समाज किंवा धर्म म्हणता येऊ शकते. एकसंध समाजाची ही व्याख्या केवळ मुस्लीम आणि ख्रिश्चनांना लागू होते,' असेही लवादाने पुढे स्पष्ट केले आहे.

असेही पुढे म्हटले आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने जैन आणि बौद्ध हे ही धर्म नव्हेत. जुन्या उल्लेखांप्रमाणे ते पंथ आहेत. या आधाराने जे ख्रिश्चन्/मुस्लिम नाहीत ते सगळे हिंदू समजावेत का? का निधर्मी समजावेत? पाहू गेल्यास कम्युनिस्ट हेही निधर्मी. पण सगळे हिंदू काही कम्युनिस्ट नाहीत! :D

जन्म दाखल्यात जात नोंदली नाही तरी हिंदू हा धर्म नोंदवावा लागतो. फक्त आयकरासाठी हिंदू हा धर्म नाही आणि इतर वारसा हक्क, लग्नाबद्दलचे कायदे इ इ साठी हिंदू हा धर्म आहे असे म्हटले गेले तर ती विचित्र गोष्ट आहे. तसेही हिंदू हे सहिष्णु असल्यामुळे (हा शब्द वापरावा लागला. सॉरी बिरुटे सर! :D)कोणी धर्म म्हणतो, कोणी जीवनपद्धती म्हणतो, कोणी अडगळ म्हणतो. तर असोच!

पिशी अबोली's picture

17 Mar 2013 - 8:31 pm | पिशी अबोली

एकाच विचारधारेतून निरनिराळे राजकीय पक्ष उदयाला येतात. तसेच एकाच तत्वज्ञानातून निरनिराळे पंथ उदयाला आले तर त्या एकाच तत्वज्ञानाच्या छत्रीखाली त्यांना बसवायचं की वेगवेगळं?
मला असं वाटतं की कुणीही उन्हात न जाता सगळेच सावलीत सामावून जात असतील तर हरकत काय आहे?राजकीय पक्षांनाही युतीचं ऑप्शन असतंच की.. पण तरी त्यांना 'आघाडी' म्हणतातच ना? का ते राजकीय पक्षच नाहीत म्हणायचं?
'हिंदू धर्म' अशी संकल्पना या प्रकारची आहे असं मला वाटतं.. अनेक पंथ एकत्र आलेला हा धर्म आहे. पण सगळे एका छायेत गुण्यागोविंदाने नांदत आहेत (कारणे सामाजिक, सांस्कृतिक, वैयक्तिक काय वाटेल ती असोत..) मग त्याला धर्म म्हणायला हरकत काय आहे?

(या एकंदर हिंदुत्वाच्या चर्चेबद्दल सुशीलकुमार शिंदेना विचारावं काय? त्यांचा बराच अभ्यास आहे यावर.. :p
माफ करा या पानचटपणाबद्दल..)

विकास's picture

17 Mar 2013 - 8:47 pm | विकास

त्याचे उत्तर परत मूळ हिंदुत्वाच्या उहापोहात जाते, ज्यात "हिंदू" हे भारताच्या सांस्कृतिक आचार-विचारांशी नाळ असणार्‍यांना म्हणलेले आहे. त्याच अर्थाने मध्यंतरी येथे दिल्या गेलेल्या एका चर्चेतील दुव्यात भालचंद्र नेमाड्यांनी म्हणलेले दिसते. विकीवरील माहीतीप्रमाणे:

In 1995, Chief Justice P. B. Gajendragadkar was quoted in an Indian Supreme Court ruling:

When we think of the Hindu religion, unlike other religions in the world, the Hindu religion does not claim any one prophet; it does not worship any one god; it does not subscribe to any one dogma; it does not believe in any one philosophic concept; it does not follow any one set of religious rites or performances; in fact, it does not appear to satisfy the narrow traditional features of any religion or creed. It may broadly be described as a way of life and nothing more.

असे दिसते आहे की थोडक्यात, गेल्या वर्षी सरकारने कायदा बदलून रिलीजिअस संस्थांना करसवलतीतून बाजूस केले. या बातमीनुसार त्याच्या विरोधात सर्वधर्मिय आले होते. पण त्याही आधी, मला वाटते ९०च्या दशकात रामकृष्ण मिशन आणि वर विकीचा दिलेला संदर्भ असलेल्या प्रजापिता ब्रम्हकुमारी संस्थेने स्वतःस हिंदू म्हणण्यापासून नाकारले. वरकरणी कारण काही असले तरी नेहमीप्रमाणे, शेवटी कारण असते ते "सबसे बडा रुपय्या!" :-)

विकास's picture

17 Mar 2013 - 8:49 pm | विकास

सुप्रिम कोर्टाने जे म्हणले आणि जे काही आयकर खाते/लवाद म्हणत आहे त्याचा विचार करताना मला एक प्रश्न पडला...

मी शंकराची पुजा करतो. पण आता जर मी हिंदू धर्मियच नसेन तर मग मी कोण ठरतो? सेक्यूलर का स्युडोसेक्यूलर? ;)

मी मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाही. पण "धारयति इति धर्मः" ही सायणाचार्याने केलेली व्याख्या विचारात घेतली तर हिंदू हा माझा धर्म आहे. तसं नसेल तर मी निधर्मी की अधर्मी की कम्युनिस्ट?

"य॒ज्ञेन॑ य॒ज्ञम॑यजन्त दे॒वास्तानि॒ धर्मा॑णि प्रथ॒मान्या॑सन्।" हे पुरुषसूक्तात म्हटले आहे. इथे तर ते अनेक धर्मांबद्दल बोलत आहेत. हे धर्म कोणते?

भगवद्गीतेत म्हटलेले "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" आणि "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत" यातील धर्म कोणता?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Mar 2013 - 12:27 am | विश्वनाथ मेहेंदळे

भगवद्गीतेत म्हटलेले "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे" आणि "यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत" यातील धर्म कोणता?

तो शब्द इथे कर्तव्य (किंवा तत्सम काही) या अर्थाने वापरला जात असावा. जाणकार प्रकाश टाकतीलच.

मितभाषी's picture

17 Mar 2013 - 9:28 pm | मितभाषी

सर तुम्ही मोहोळावर दगड मारला आहे ;)
आम्ही फक्त वाचनमात्र राहून ज्ञानप्राप्ती करावी म्हणतो.

नितिन थत्ते's picture

17 Mar 2013 - 9:58 pm | नितिन थत्ते

लवादापुढचा खटला अमुक एका गोष्टीवरील खर्च धार्मिक खर्च आहे का या प्रश्नासंबंधी होता. त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर नाही असे दिले आहे. परंतु त्याची कारणमीमांसा करताना अकारण हिंदू नावाचा धर्मच नाही असा निर्णय केला. हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही ही खरी गोष्ट असली तरी त्याचा अर्थ शंकराच्या पूजाअर्चेवरील खर्च धार्मिक नाही असा काढण्याचे कारण नव्हते. [Tribunal has apparently exceeded its brief]. हिंदू धर्माचा इथे काही संबंध नव्हता.

उच्च न्यायालयात आव्हान देणे गरजेचे आहे.

नाना चेंगट's picture

17 Mar 2013 - 10:34 pm | नाना चेंगट

सह्मत आहे. लवादामधे हल्ली विचारवंतांचा भरणा केला जातो की काय असा प्रश्न मनात आला.

अमूक एक खर्च धार्मिक आहे का आणि तो करसवलत पात्र आहे का त्याबाबत लवादाने हिंदू हा धर्म नाही आणि अमूक देवतांवरचा खर्च हा धार्मिक नाही ही जशी लवादाची चूक दिसते त्या प्रमाणे मंदिराच्या विश्वस्तांनी जे तारे तोडले त्याबद्दलही बोलले पाहिजे. एकतर मंदिरं ही वैश्विक नाहीत त्यामुळे मंदिरं ही कोणा एका धर्माची नाही हे म्हणने चूकच झाले कारण मंदिरं ही वैश्विक असती सर्व धर्माचे लोक एकाच ठिकाणी प्रार्थना आणि इतर सर्व उपासना करण्यासाठी येतात तेव्हा असं म्हणता आलं असतं दुसरी गोष्ट विश्वस्तांना इतकी संपत्ती मिळते तर त्यांनी 'धार्मिक खर्च' करसवलत पात्र आहे का या दाव्याला जायची तशी गरज नव्हती. उलट त्या विश्वस्तांना 'सामाजिक उपक्रमासाठी' अशी संपत्ती वापरुन तिचा विनियोग उत्तमपणे करुन करसवलत मिळवता आली असती.

हिंदू नावाचा धर्म नाही ती आचरणपद्धतीच आहे हे लवादाचे मत/निर्णय मान्य करण्याशीवाय सध्या तरी कोणता पर्याय दिसत नाही. उच्च न्यायालयात तरी हिंदू कायद्या अंतर्गत हिंदूची व्याख्या काय आहे आणि भविष्यात असा प्रसंग आला तर न्यायालय अमूक अमूक आचरणपद्धतीला हिंदू तरी म्हणेल काय असा एक प्रश्न पडला आहे, असो.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

18 Mar 2013 - 8:53 am | विकास

मंदीराच्या विश्वस्तांच्या या मुद्याशी मी देखील असहमत आहे. पण मी माझ्या इतर प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे रामकृष्ण मिशन आणि प्रजापिता ब्रम्हकुमारी यांनी देखील असेच टॅक्समुळे असे केले होते. त्याचा संदर्भ कदाचीत आत्ताच्या प्रकरणापेक्षा वेगळा असेल... आत्ता २०११ साली जो नियम लागू केला त्याप्रमाणे धर्मादाय संस्थांनी, तुम्ही म्हणता तशी 'सामाजिक उपक्रमासाठी' अशी संपत्ती वापरली तरी करसवलत मिळणार नाही आहे. आणि तो वादाचा मुद्दा आहे. खालील बातमी पहा...

Religious trusts protest abolition of tax exemption

कवितानागेश's picture

18 Mar 2013 - 1:35 am | कवितानागेश

पूर्वी हिंदू नावाच धर्म होता की नाही माहित नाही. पण आज नक्कीच आहे.
आणि कर वसूल करायचा असेल तर नक्कीच आहे!
सगळ्या 'धार्मिक' स्थळांकडून पिळून पिळून कर वसूल करावा. :)

शिल्पा ब's picture

18 Mar 2013 - 2:58 am | शिल्पा ब

तसं झालंच तर त्यातुनही "अल्पसंख्यांकांना" सुट मिळेल याची व्यवस्था होईलच. असो.

विकास's picture

18 Mar 2013 - 5:10 am | विकास

सगळ्या 'धार्मिक' स्थळांकडून पिळून पिळून कर वसूल करावा.

सहमत. (अर्थात तपशीलात सगळे असते... devil is in detail. :) )

पण हे जे काही केले आहे त्यात कुठल्याही धर्माच्या/जातीच्या नावाने असलेली विनानफातत्वावरील मदत करणारी संस्थेने देखील करसवलत गमावली आहे. परीणामी कुठल्याही धर्माच्या नावाने चालणार्‍या शिक्षणसंस्था (नुसत्याच मदरसा नाहीत), इस्पितळे आणि इतर मदतकार्य करणार्‍या संस्थांना देखील त्यांच्या उत्पन्नाच्या ३०% कर म्हणून भरावे लागणार आहे. मदरसांचा अपवाद वगळल्यास, शिक्षणसंस्था आणि इस्पितळे ही धर्माच्या नावाने काढलेली असली तरी ती सर्वधर्मियांना खुली असतात हा महत्वाचा मुद्दा आहे. अशा सेवांवर परीणाम होऊ शकतो. शिवाय जे कोणी व्यक्तीगत करात करसवलत (चॅरीटेबल संस्थांना देणगी दिल्यामु़ळे टॅक्स डिडक्शन) मिळण्यासाठी करतात ते देखील अशा देणग्या थांबवणार... वर जे काही या संस्था मदतकार्य करत आहेत ते करण्यास सरकार उपयोगाचे असू शकत नाही. सेक्यूलर संस्था असल्या तरी त्या देखील सर्वत्र पुरेशा असू शकणार नाहीत हे वास्तव आहेच.

त्यामुळे हा कायदा बदलणे महत्वाचे आहे. त्यातील पळवाटा बंद करणे महत्वाचे आहे, जेणे करून कुठल्याही धर्मस्थळाला त्याचा गैरउपयोग करता येणार नाही. पण सेवाभावी संस्थांना मात्र करसवलत मिळेल.

कवितानागेश's picture

18 Mar 2013 - 12:21 pm | कवितानागेश

त्यामुळे हा कायदा बदलणे महत्वाचे आहे. त्यातील पळवाटा बंद करणे महत्वाचे आहे, जेणे करून कुठल्याही धर्मस्थळाला त्याचा गैरउपयोग करता येणार नाही.>
सहमत. तसेही ऐहिक गोष्टींमध्ये आणि कायद्यामध्ये देव-धर्म आणू नये. दोन्ही गोष्टी करप्ट होतात! :)
सेवाभावी संस्थांना थोडीफार सवलत द्यायला हरकत नाही. फक्त एखादी संस्था 'सेवाभावी' आहे की नाही हे ठरवताना पुन्हा घोळ होउ शकतात.

नाना चेंगट's picture

18 Mar 2013 - 1:41 pm | नाना चेंगट

सआह्जेहे. परंतु तसं होणं शक्य नाही.

बॅटमॅन's picture

18 Mar 2013 - 2:51 am | बॅटमॅन

मला जे म्हणायचे होते ते बहुतेक सर्वांनी आधीच म्हटल्यामुळे पास! जस्ट २ पैसे.

संबंधित माहिती पुरवल्याबद्दल आदूबाळ, विकास अन नितीन थत्ते यांचे आभार.

बाकी लै जुनी तक्रार इथेही आहेच. अन्य धर्मांच्या चष्म्यातून हिंदू धर्माकडे पाहिले का जावे? हे म्हंजे मिसळ आजिबात गोड नाही किंवा तमिळनाडूत मराठी बोलतच नाहीत असे म्हण्ण्यापैकी आहे.

नाना चेंगट's picture

18 Mar 2013 - 1:41 pm | नाना चेंगट

सब घोडे बारा टक्के !

चौकटराजा's picture

18 Mar 2013 - 5:22 am | चौकटराजा

हिंदू हा धर्म आहे की नाही यावर आम्ही काही बोलणार नाही. आमचे मते " धर्म" म्हणजे attribute .या अर्थाने या जगात
अस्तित्वासाठी झगडणे व अखेर त्यात पराभूत होणे. हा एकमेव सनातन धर्म आहे. जातस्य ध्रुवो मॄत्यू .बाकी धर्म हे फक्त मानवी मनाच्या खेळाचे प्रताप आहेत.

आपलेच लोक आप्लयाला अस म्हणतात हे फार दु:खदायक आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Mar 2013 - 8:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साऊ, आपल्या धर्माची अशी सामाजिक चेष्टा होतांना पाहून मलाही तुमच्यासारखंच खूप वाईट वाटतं. पण, आपल्याला 'हिंदू हे धर्माचं नाव आहे का' हे सिद्ध करता येत नाही, हिंदू तरी का म्हणायचं हे स्पष्टपणे सांगता येत नाही. आपल्या धर्माची गोष्ट निघाली की आपण पाहा ना अमूक धर्मात तरी तसं कुठंय, अमूक धर्मावाल्यांना कोणी बोलत नाही. अमूक धर्मावाल्यांच्या संपत्तीचं काय, अमूक धर्मावाल्यांची एकगठ्ठा मतं मिळणार आहेत ना असं मूळ विषय सोडून निरर्थक बोलत असतो. असो. मलाही तुमच्यासारखं दु:ख वाटतंय म्हणून इथे प्रतिसादात मन मोकळं करतोय.

-दिलीप बिरुटे

राही's picture

18 Mar 2013 - 9:12 am | राही

धार्मिक संस्थांना दिलेली देणगी ही करसवलतपात्र ठरू शकत नाही हे माहीत आहे. पण धार्मिक संस्थांनी चॅरिटेबल संस्थांना दिलेली देणगी हीही करसवलतपात्र नाही का? म्हणजे धार्मिक संस्थांचे उत्पन्न हे करसवलतपात्र ठरूच शकत नाही का? वर श्री.विकास यांच्या प्रतिसादात तसा रोख दिसला. कुणी खुलासा करेल काय?

राही's picture

18 Mar 2013 - 9:22 am | राही

धार्मिक संस्थांचे उत्पन्न हे सर्वांसाठी असलेल्या चॅरिटेबल संस्थांवर खर्च केले तरी ते करसवलतपात्र ठरू शकत नाही का? दाता संस्थेची ध्येये/उद्दिष्टे ग्राहक संस्थेलाही लागू असतात का? इथे स्पॉन्सरर किंवा पेट्रन अशी भूमिका घेता य्रेत नाही का? अमक्याच्या विद्यमाने चालवलेली किंवा प्रणीत अशी (शाळा, हॉस्पिटल वगैरे)एक संस्था असे जेव्हा आपण आम भाषेत म्हणतो तेव्हा त्याचा कायद्याला अभिप्रेत अर्थ काय असतो?

विकास's picture

18 Mar 2013 - 4:42 pm | विकास

धार्मिक संस्थांचे उत्पन्न हे सर्वांसाठी असलेल्या चॅरिटेबल संस्थांवर खर्च केले तरी ते करसवलतपात्र ठरू शकत नाही का?

Definitions of non-profit organizations which will enjoy income and wealth tax exemptions exclude trusts or institutions established for a particular caste or religious community excludes religious trusts and will have to pay tax at flat rate of 30 %. या वाक्यामुळे असे वाटते की जर चॅरीटेबल संस्था ह्या विशिष्ठ धर्माशी संलग्न वाटल्या तर त्यांना आणि त्यांना देणगी देणार्‍यांना करसवलत मिळणार नाही. मग उत्तर भारतातील हिंदू धर्मशाळा, कॉन्व्हेन्ट स्कूल्स, हॉस्पिटल्स वगैरे जे काही असते ते जरी धर्माच्या नावाने असले तरी त्यात इतर धर्मियांना प्रवेश असतोच आणि त्यांचे काम हे समाजसेवा करणारेच असते.

धर्मस्थळास करसवलत देऊ नये कर आकारणी व्यक्तीगत करापेक्षा अथवा अगदी उद्योगांच्या करापेक्षा वेगळी / कमी असावी असे मला वाटते. पण नॉन प्रॉफिट अथवा चॅरीटेबल संस्थां म्हणून धर्मस्थळांना धरले जाऊ नये. या चर्चेतील केस मधे पळवाट शोधून कर चुकवण्याचा प्रकार केला गेला आहे.

कधीकाळी ऐकलेले आठवले की अनेक उद्योगपती अधिकृतपणे तिरूपती बालाजीस धंद्यातला भागीदार दाखवतात. जे काही आठवते त्याप्रमाणे त्याचे कारण श्रद्धा नसून करभरणीत सवलत मिळते का असेच काही असते असे आहे.

श्रीनिवास टिळक's picture

18 Mar 2013 - 10:03 am | श्रीनिवास टिळक

श्रीधर स्वामी यांनी त्यांच्या आर्य संस्कृती (मुंबई, ढवळे प्रकाशन १९९१ पृ १२-१४) या पुस्तकात हिंदू या शब्दाच्या काही व्याख्या आणि उहापोह संस्कृत कोश आणि इतर ग्रंथ वापरून केला आहे. बऱ्याच अभ्यासकांच्या मते सिंधू नदीच्या तटावर राहणारे समूह ते हिंदू. परंतु हे रुपांतर पाणिनीच्या नियमानुसार सुद्धा करता येईल (3: 4. 57 सर्ह्यपिच्च).

श्रीधर स्वामी नंतर हिंदुच्या सहा व्याख्या देतात: (1)शब्दकल्पद्रुम या कोशानुसार हिंदू म्हणजे कोणीही व्यक्ती जी सर्व काही (नैतिकदृष्ट्या) हीन असेल त्याचा तिटकारा आणि त्याग करते (हीनम् दुष्यतीति हिन्दुः); (२) अद्भुतकोशानुसार हिंदू (किंवा हिंदु) या पुल्लिंगी शब्दाने (व्यापक अर्थाने यात स्त्रिया पण येतात!) दैत्य आणि दुष्ट लोकांचा प्रतिकार करणाऱ्या रूपवान (!) अशा व्यक्तीचा बोध होतो (हिन्दुर्हिन्दूश्च पुम्सि द्वौ दुष्टानाम् च विघर्षणे रूपशालिनि दैत्यारौ); (३) रामकोशानुसार हिंदू वाईट, अनादरणीय, किंवा अविश्वासू नसतो. [उलट]अशी व्यक्ती विद्वान, धर्मपालक, आणि श्रुतीपरायण असते (हिन्दुर्दुष्टो न भवति नानार्यो न विदूषकः सद्धर्मपालको विद्वान् श्रौतधर्म परायणः); (४) कविकोशानुसार हिंदू म्हणजे नारायण किंवा इतर कोणत्याही देवतेचा भक्त (हिन्दुर्हि नारायणादिदेवता भक्तः); (५) पारिजातहरण नाटकाप्रमाणे हिंदू अशा व्यक्तीला म्हणता येईल जी (१) शरीर आणि मनातील सर्व दोष आणि पातक तप इत्यादी साधनांनी दूर करते आणि (२) तीक्ष्ण शस्त्रांनी शत्रूंचा नाश करते (हिनस्ति तपसा पापान् दैहिकान् दुष्टमानसान् हेतिभिः शत्रुवर्गम् च स हिन्दुरभिधीयते); (६) माधवदिग्विजय प्रमाणे कोणतीही हिंदू व्यक्ती सर्व मंत्रांचे मूळ ओम्कारामध्ये पाहते, पुनर्जन्मावर दृढ विश्वास ठेवते, गोपूजक असते, भारताला [भारत देशाला?] सर्वश्रेष्ठ गुरु मानते आणि सर्व प्रकारची हिंसा त्याज्य ठरवते (ॐ कार मूल मंत्राढ्यः पुनर्जन्म दृढाशयः गोभक्तो भारत गुरुः हिन्दुः हिंसानदूषकः).

श्री कृ. रा. जोशी हे त्यांच्या हिंदू जीवन पद्धती (प्रज्ञालोक खं ४८ अं ३ October २००५) या लेखात म्हणतात कि कलियुगात यवनांच्या [शक आणि कुषाण] त्रासाला कंटाळून हिंदूंनी विंध्यपर्वताच्या दिशेकडे स्थलांतर केले (कालीकापुराण इ. स. ५/६वे शतक; कलिना बलिना नूनमधर्माकलिते कलौ यवनैर्घोरमाक्रांता हिन्दवो विन्ध्यमाविशन).

वरील व्याख्यांचा नीट विचार केल्यावर असं म्हणता येईल कि हिंदू हा धर्म किंवा religion नसून [मानव] धर्मावर आधारित एक जीवन पद्धती अथवा प्रणाली आहे [आगम किंवा मत]. हिंदूप्रमाणेच या भारत देशात जैन, बौद्ध आणि शीख या आगमांचा अथवा मतांचा उगम आणि वाढ झाली आहे.

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2013 - 4:53 pm | प्रसाद गोडबोले

ह्या प्रतिसादा बद्दल विषेश आभार !!
( मला फक्त (हीनम् दुष्यतीति हिन्दुः); इतकेच माहीत होते आजपर्यंत !! )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2013 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीधर स्वामींचे काही लेखन वाचलेले नाही पण आपल्या प्रतिसादातील दोन मुद्दे पटले. आणि माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार.

१] सिंधू नदीच्या तटावर राहणारे समूह ते हिंदू.
२] हिंदू हा धर्म किंवा religion नसून [मानव] धर्मावर आधारित एक जीवन पद्धती अथवा प्रणाली आहे

-दिलीप बिरुटे

वामन देशमुख's picture

18 Mar 2013 - 10:34 am | वामन देशमुख

रस्त्यावर काही शाळकरी वाटणारी मुले शाळा-शाळा खेळत होती. खेळत असतांना एकमेकांच्या इयत्तांची वगैरे माहिती घेत होती. कुणी तिसरीचा कुणी सहावीचा तर कुणी अजून कोणत्या वर्गाचा. कुणी या शाळेचा तर कुणी त्या शाळेचा. कुणी मराठी माध्यमातला तर कुणी इंग्रजीचा. कुणाचा गणवेश निळा तर कुणाचा किरमिजी! कुणाची ब्याग जड तर कुणाची किंचित हलकी. कुणाचे ओळखपत्र आडवे तर कुणाचे उभे तर कुणाचे फोटोसहीत तर कुणाचे फोटोशिवाय! पण प्रत्येकजण काही न काही वर्ग शिकलेला होता हे नक्की!
मग त्यातल्या काही मुलांनी शिकलेला असण्याचे काही निकष ठरविले. त्यानुसार शिकलेला असलेला म्हणजे:

  1. शाळेचा विद्यार्थी असावा
  2. अंगावर गणवेश असावा
  3. पाठीवर पुस्तकांची ब्याग असावी
  4. खिशात शाळेचे ओळखपत्र असावे.

असे ठरवून ती मुले मग घरी जाऊ लागली. जाताना त्यांना व्यक्ती भेटली ती एका विद्यापीठात प्राध्यापक होती. हे प्राध्यापक अनेक वेळा पी एच डी करून नवनवीन विषयांत संशोधन करीत होते. मुलांनी त्या प्राध्यापकास तुम्ही शिकलेले आहात का असे विचारले. प्राध्यापक महाशयांनी त्यांना असे का विचारात आहात असे हसून विचारले. मुलांनी त्यांना वरील निकष सांगून त्या निकषांत बसणारे लोकच शिकलेले असतात असे सांगितले. त्यानुसार ते प्राध्यापक:

  1. कोणत्याही शाळेचे विद्यार्थी नव्हते.
  2. त्यांच्या अंगावर गणवेश नव्हता
  3. त्यांची पाठीवर पुस्तकांचे ओझे नव्हते
  4. त्यांच्याजवळ शाळेचे ओळखपत्र नव्हते.

त्यावरून त्या मुलांनी हे महाशय शिकलेले नाहीत असा निष्कर्ष काढला.

स्पंदना's picture

18 Mar 2013 - 11:30 am | स्पंदना

आता एक करा जमत असेल तर, त्या लवादाला हे पत्र लिहुन कळवा.
अन प्रा. डॉ. काय कायदेशीररित्या करता येतं का पहा याच्या विरोधात. काय सह्या बिह्या पाहिजे असतील तर आम्ही देउ.

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2013 - 12:40 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर प्रतिसाद

धन्यवाद!
तथापि,
"हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत."

आणि
"अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू धर्म (ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते) नष्ट होईल."

अशी माझी अभ्यासांती ठाम मते बनलेली आहेत.

नाना चेंगट's picture

18 Mar 2013 - 1:46 pm | नाना चेंगट

>>>"अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू धर्म (ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते) नष्ट होईल."

गंमतीशीर मत :)

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2013 - 3:18 pm | प्रसाद गोडबोले

शक्य आहे !!

"अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू धर्म (ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते) नष्ट होईल."
म्हणजे? तो तसा झालेला नाहिय्ये ?

"हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत." आणि "अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू धर्म (ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते) नष्ट होईल."
-- अशी माझी अभ्यासांती ठाम मते बनलेली आहेत.

ही २०१३ पर्यंतच्या अभ्यासावरून बनलेली 'ठाम मते' आज २०२३ मधेही तितकीच ठाम आहेत किंवा कसे, हे जाणून घ्यायला आवडेल. थोडक्यात म्हणजे २०१४ पासूनच्या सत्ताबदलाचा परिणाम याविषयी कितपत झाला आहे असे तुम्हाला वाटते ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2013 - 7:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> प्रा. डॉ. काय कायदेशीररित्या करता येतं का पहा याच्या विरोधात.

कायदेशीर काही करता येतं किंवा नाही त्याबद्दल मला कोणताही इंट्रेष्ट नाही.
विचारांचे आदान-प्रदान समजून घेणे, ज्ञानकण जमविणे, बोध घेणे,
एवढाच माझा हेतू आहे.

>>> काय सह्या बिह्या पाहिजे असतील तर आम्ही देउ.

कोणी इंट्रेष्टेड माणूस काही कायदेशीर कार्यवाही करत असेल तर मी त्यांना शुभेच्छा देईन.
सह्या बिह्या देणार नाही.

-दिलीप बिरुटे
(स्पष्ट)

बॅटमॅन's picture

24 Mar 2013 - 12:36 am | बॅटमॅन

+११११११११११११.

हे बरंय आज्ञा सोडायला!

चिगो's picture

18 Mar 2013 - 2:32 pm | चिगो

जबराट, बरंका वामनपंडीत.. लै जोरदार.

माझ्या माहितीप्रमाणे कायद्यातील "हिंदु" या शब्दाची व्याख्या रोचक आहे. आपल्याला माहित असणारे विविध 'देवाधिष्टीत' धर्म (जसे इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध, जैन इत्यादी इत्याही) असा कोणताही धर्म न पाळणार्‍या व्यक्तीला कायद्याने हिंदु समजले जाते, असे काहिसे.. वेळ मिळाल्यास अधिक टंकतो :)

चिगो's picture

18 Mar 2013 - 2:36 pm | चिगो

काय ठरलं मग शेवटी? म्हणजे आम्ही धर्मी का अधर्मी की बिनधर्मी ?
(धर्मनिरपेक्ष हिंदू) चिगो..

विसुनाना's picture

18 Mar 2013 - 4:28 pm | विसुनाना

हिंदू हा धर्म नाही तर नसू दे! (प्राडॉ, अहो, बरेच आहे की.) इतर सर्व 'धर्मांना' ३०% भुर्डंड बसतोय. हिंदू हा धर्म नसल्याने कुठल्याही 'विश्वव्यापी' देवाची देवळे बांधायला विदाऊट टॅक्स मोकळा.:) ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Mar 2013 - 4:41 am | निनाद मुक्काम प...

शेवटी काय ठरले
हिंदू धर्म आहे का नाही
अनेक जर्मन माझ्या चांगल्या परिचयाचे झाले की त्यांच्याकडून खुपदा प्रश्न विचारला जातो की तुझ्या मुलांवर तू हिंदू धर्मांचे कोणते संस्कार करणार
हे विचारणारे जर्मन हे आयुर्वेद , योगा आणि भारतीय आध्यात्म ह्यांच्या आहारी म्हणावे इतके भजनी लागलेले असतात ,

मग मी लगेच म्हणतो
हिंदू म्हणून योग , आयुर्वेद व काम सूत्र ह्या तिन्ही गोष्टी माझ्या मुलांच्या जीवन पद्धतीच्या अविभाज्य घटक असल्या पाहिजेत.

हिंदू किंवा भारत म्हटले की परदेशात हि त्रिसूत्र गोर्‍यांच्या डोक्यात फिट असली आहे
पण बहुतांशी गोर्यांना भारत म्हणजे हिंदूंचा देश अशी धारणा असते ,

व त्यांच्या देशात अधिकृत ख्रिस्तीधर्म असल्याने भारतात तो हिंदू असावा असा त्यांचा दाट समज असतो. कारण भारतात बहुसंख्य हिंदू राहतात ह्याची त्यांना माहिती असते.

कवितानागेश's picture

21 Mar 2013 - 1:03 am | कवितानागेश

या बाबतीत नेपाळमध्ये काय करतात? :)

नाना चेंगट's picture

21 Mar 2013 - 9:07 am | नाना चेंगट

नेपाळने ते आता हिंदू राष्ट्र नसल्याचे मागेच जाहीर केले आहे.

इरसाल's picture

21 Mar 2013 - 10:03 am | इरसाल

लवाद-लवासा-लचांड हे मला सारखेच वाटतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Mar 2013 - 9:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

?

-दिलीप बिरुटे

विकास's picture

22 Mar 2013 - 9:17 pm | विकास

आपण कुठं हललोय? आहे तिथेच तर आहोत! :-)

आनंद घारे's picture

23 Mar 2013 - 5:56 pm | आनंद घारे

मटामधली बातमी मी पुन्हा पुन्हा वाचून पाहिली. त्यावरून मला असा घटनाक्रम दिसला.
१.नागपूरमधील शिव मंदिर देवस्थान पंच समितीने आयकरामध्ये सूट मागितली.
२.त्यांना सवलत देता येणार नाही, असा निर्णय आयकर आयुक्तांनी दिला.
३.या निर्णयाविरोधात देवस्थान समितीने लवादाकडे धाव घेतली.
४.त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत लवादाने आयुक्तांचा निर्णय फेटाळून लावला. म्हणजे त्यांना आयकरात सवलत दिली असावी.
म्हणजे यात देवस्थानने घेतलेली भूमिका यशस्वी झाली. हिंदूंचाच फायदा झाला.असे असतांना हिंदुत्ववादी इतके कशामुळे चवताळले आहेत?

वर्तमानपत्रामधील बातमीचा मथळा लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आकर्षक किंवा आक्रमक बनवलेला असतो. त्याच्या खाली लिहिलेला मजकूर जास्त महत्वाचा असतो.
तो सुद्धा विपर्यस्त असू शकतो, मुळातले दस्तऐवज खरे असतात, पण आपल्याला ते पाहणे शक्य नसल्यामुळे वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन वगैरेंवर विश्वास ठेवावा लागतो.

या निमित्याने धर्म, रिलिजन वगैरेंबद्दल असलेल्या महितीची उजळणी झाली, तसेच डोक्यात थोडा नवा प्रकाश पडला.

विकास's picture

23 Mar 2013 - 6:36 pm | विकास

हिंदूंचाच फायदा झाला.असे असतांना हिंदुत्ववादी इतके कशामुळे चवताळले आहेत?

नक्की कोण आणि कुठे? या संदर्भातली बातमी माझ्या तरी वाचनात आली नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2013 - 7:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> १.नागपूरमधील शिव मंदिर देवस्थान पंच समितीने आयकरामध्ये सूट मागितली.
बरोबर.

>>>>२.त्यांना सवलत देता येणार नाही, असा निर्णय आयकर आयुक्तांनी दिला.
बरोबर.

>>>>त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत

थोडं बरोबर आहे. देवस्थान समितीने लवादाकडे काय म्हटले आणि कोणतं म्हणनं मान्य केलं ''आमचे शिव मंदिर हे सर्व समाजासाठी खुले असते. ते कुठल्याही एका धर्माशी संबंधित नाही. शिवाय मूर्त्यांची प्रतिष्ठापना करणे हे काही धार्मिक कार्य होत नाही'' लवाद म्हणाले की आपलं म्हणनं बरोबर आहे. (लवादाने हा युक्तीवाद ग्राह्य धरुन आयकरातून सूट दिली की काय मग, हे मात्र माझ्या वाचनात आले नाही)

लवाद काय म्हणते की, ''शिवशंकर, हनुमान किंवा दुर्गामाता मंदिरांच्या देखभालीवरील खर्च हा धार्मिक खर्च मानता येणार नाही. भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध कुठल्याही एका धर्माशी नाही. ते विश्‍वव्यापी आहेत. ज्या हिंदु धर्माशी या देवतांचे नाव जोडले जाते, तसा कुठला धर्मच अस्तित्वात नाही''

मंदिराच्या देखभालीवरचा खर्च हा धार्मिक खर्च नाही आणि वरची देव मंडळी ही वैश्विक असल्यामुळे त्यांचा कोणता एका धर्माशी संबंध नाही, आणि वरील देवतांचे हिंदु धर्माशी नाव जोडल्या जाते असा कोणताही हिंदू धर्मच अस्तित्त्वात नाही. असे मत व्यक्त केलं आहे.

हिंदू धर्म अस्तित्त्वातच नाही आणि भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध कुठल्याही एका धर्माशी नाही या शोधाबद्दल हिंदू मंडळी नाराज आहे.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2013 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> या निमित्याने धर्म, रिलिजन वगैरेंबद्दल असलेल्या महितीची उजळणी झाली,
थांबा थांबा थांबा. अजून मला हिंदू धर्माबद्दल काही ओळी खरडायच्या आहेत. :)

-दिलीप बिरुटे

अर्धवटराव's picture

23 Mar 2013 - 7:15 pm | अर्धवटराव
मला परत परत तोच प्रश्न पडतो... धर्माला एखाद्या उपासना पद्धतीच्या तागडीने का तोलतात? अर्धवटराव

बातमीत 'हिंदुत्व' आणि 'हिंदु' यात काहीतरी गडबड वाटते आहे.
'हिंदुत्व' आणि 'हिंदु' या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. सर्वोच्च न्यायालयानं यात फरक केलेला आहे त्यानुसार 'हिंदुत्व' ही जीवनशैली आहे आणि धर्म नव्हे. पण कायद्यानुसार हिंदु धर्माला अनुसरुन वारसा हक्क, विवाह, दत्तकविधान वगैरेचा विचार केलेला आहे. या कायद्यानुसार जैन, बौद्ध, शिख हेही या कायद्याच्या कक्षेत येतात. मुसलमान, पारशी, ख्रिश्चन आणि ज्यु यांना हा कायदा लागु नाही. त्यांचे कायदे वेगळे आहेत.
१९५५-५६ साली पहिल्यांदा 'हिंदु कोड बील' आणलं गेलं आणि नंतर इतर धर्मियांसाठी असेच कायदे केले गेले.

त्यामुळं जरका कायद्यानुसार सगळ्यांना आपापल्या चालीरिती पाळता येत असतील तर 'हिंदु' हा धर्म आहे की नाही याचा वाद तात्विक आहे. पण म्हणून 'हिंदुत्व' आणि 'हिंदु' यांत गोंधळ होण्याचं काही कारण दिसत नाही. हे दोन्ही शब्द आलटून पालटून वापरले तर गोंधळ होऊ शकतो.

मालोजीराव's picture

23 Mar 2013 - 11:48 pm | मालोजीराव

जल्ला हिन्दू धर्म नाय काय म्हंजे... बिरुटे सर 'हेल हिटलर' म्हनुयात आनि नविन सुरुवात करुया चला.

आपल्या देशाला सर्वात पाहिले भारत अस कोण म्हणाले अणि याचा लिखित पुरावा काय अशी....याची याचिका (आर टी आय ) एका मुलीने टाकली म्हणे...आणि सरकार अजुनही उत्तर शोधतय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2013 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालोजीराव तुमचे लेख वाचतो, प्रतिसाद वाचतो आपल्याकडे माहिती असते फक्त तटस्थपणाने लिहायला घाबरता (अशी शेरेबाजी करतो, क्षमा असावी) असे माझे मत आहे.

>>> जल्ला हिन्दू धर्म नाय काय म्हंजे... बिरुटे सर 'हेल हिटलर' म्हनुयात आनि नविन सुरुवात करुया चला.

सर्व आचरणपद्धतीची मोडतोड, धर्मग्रंथाची मोडतोड करुन, नव्या आचरणपद्धतीची मांडणी करुन 'हेल हिटलर' अशी एक नवीन सुरुवात करता येईल, असे वाटते.

>>>>> आपल्या देशाला सर्वात पाहिले भारत अस कोण म्हणाले अणि याचा लिखित पुरावा काय अशी....याची याचिका (आर टी आय ) एका मुलीने टाकली म्हणे...आणि सरकार अजुनही उत्तर शोधतय

(अन्य संस्थळावरील दिलेला माझा प्रतिसाद चोप्य पस्ते करत आहे) सरकारकडे माहिती आहे, असावी. आर्यांचे आगमन भारतात झाल्यावर त्यांची भटकायची अवस्था संपते. सप्तसिंधुच्या खो-यात मुबलक पाणी,चराउ कुरणे होती; हवामानही प्रसन्न होते. मन रमावे असेच वातावरण असावे. आर्यांना हा प्रदेश आवडला ते वसाहती करुन राहू लागले. पशुपालन,शेतीव्यवसाय यांच्या विकासाबरोबर पुर्वीच्या टोळ्याचे आता आर्यांच्या प्रादेशिक राज्यात रुपांतर झाले. त्यात पुरु, अनू,द्रह्यु, यदू व तुर्वश ही आर्याची पाच शक्तीशाली राज्ये अस्तित्वात आली. त्यांना 'पंचजन' असे म्हणत. याचवेळी 'भरत' नावाच्या आर्याच्या टोळीचे एक राज्य, जे 'पंचजन' पेक्षा मोठे होते ते अस्तित्वात आले होते. 'सुदास' हा भरत टोळीचा राजा होता व त्याने भारतातील सर्व राज्य आपल्या वर्चस्वाखाली आणण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती. विश्विमित्र हा भरत टोळीचा पुरोहित होता; पण् काही कारणामुंळे त्याचे वर राजा सुदास यांच्याशी बिघडले.राजाने विश्वमित्राची हाकालपट्टी करुन वसिष्ठ पुरोहिताची नेमणूक केली. त्यामुळे विश्वमित्र चिडला त्याने भरत टोळीचा सूड घ्यायचे ठरवले. विश्वमित्राने आर्यांची पाच राज्य ( पंचजन) व अनार्याची पाच राज्ये ( भिव,भलान,पख्त, विषणिन,अलिन) असा दहा राज्यांचा एक संघ तयार केला व सुदास राजाच्या टोळीविरुद्ध युद्ध पुकारले. पण दशराज संघ व भरत टोळीत भरत टोळीचा विजय झाला. भरट टोळीने सप्तसिंधुच्या प्रदेशात प्रभुत्व प्रस्थापित केले. हे प्रभुत्व दीर्घकाळ टिकले म्हणून आपल्या देशाला 'भारत' व 'भारतवर्ष ' हे नाव प्राप्त झाले. पराभूत राज्य स्वतःच्या राज्यात विलीन केली. आणि सर्वात मोठे राज्य असणारी 'भरत' टोळी राजकीय क्षितिजावर आली.

-इति. भारताचा इतिहास व संस्कृति(इ.स. ६५० पर्यंत )

-दिलीप बिरुटे

मालोजीराव's picture

25 Mar 2013 - 10:45 am | मालोजीराव

मालोजीराव तुमचे लेख वाचतो, प्रतिसाद वाचतो आपल्याकडे माहिती असते फक्त तटस्थपणाने लिहायला घाबरता (अशी शेरेबाजी करतो, क्षमा असावी) असे माझे मत आहे.

तटस्थपणे लिहिणे स्पेशली इतिहासाच्या बाबतीत किती कठीण आहे आपण जाणताच :) …महाराजांचे कार्य आणि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी हाच एकमेव हेतू !
"दोस्त बनानेसे काम चल सकाताहे तो दुश्मन क्यू बनाये " ;)

माहितीबद्दल धन्यवाद,हि आर्य राज्यांविषयीची माहिती माझ्यासाठी नवीन होती. या भरत टोळीचा काळ कधीचा असावा…आणि कागदोपत्री 'भारत' उल्लेख कधी आला असावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Mar 2013 - 11:58 am | डॉ सुहास म्हात्रे

प्राध्यापकसाहेब यावर एक खास सविस्तर धागा काढाच तुम्ही. हा विषय म्हणजे ऐकीव गोष्टी भाराभार आणि खात्रीची माहिती कोणालाच नाही अशी अवस्था आहे. तुमच्यासारख्या कडून यावर सविस्तर वाचायला आवडेल. मनात असलेल्या खूप शंकांना खरी (कमीतकमी शास्त्रीय पद्धतीने सापडलेली) उत्तरे मिळतील ही खात्री आहे म्हणून ही खास विनंती. माझ्यासारखेच अनेकांचे मनोगत असेल असे वाटते.... तेव्हा घ्या मनावर जरा.

न्यायसंस्था ,(आयकर अथवा हिंदू कोड बिल अथवा इंडिअन पीनल कोड ) आणि खटला या तीन गोष्टिंची तुलना कंप्युटर ,प्रोग्राम आणि दिलेला प्रॉब्लेम यांच्याशी करा म्हणजे आजच्या धाग्याचा गुंता लगेच सुटेल . कंप्युटर जसा दिलेल्या प्रश्न दिलेल्या प्रोग्रामच्या नियमाने सोडवून उत्तर देतो तसे न्यायालय त्याना दिलेल्या नियम अटि पडताळून त्यात दिलेली शिक्षा अथवा होय अथवा नाही हा निर्णय करते .कंप्युटरला प्रोग्राम आणि न्यायालयाला पिनल कोड वगैरे प्रमाणे फक्त विचार करायचा असतो .इथे आलेला निधि आयकर नियमांप्रमाणे अमुक कामांसाठी वापरत असल्यास सूट देता येईल का हा निर्णय दिला असणार .हिंदू हा धर्म आहे का नाही याबद्दल युक्तिवादासाठी वेगळी याचिका करावी लागेल .त्यावेळी हिंदू धर्माचा प्रसार करणाऱ्या शंकराचार्य ,विवेकानंदानी काय विचार मांडले त्याचा उपयोग होईल .(गल्लितल्या क्रिकेटच्या मैचमध्ये जर एक टप्पि कैच आऊट ,पलिकडच्या बिल्डिंगमध्ये आऊट वगैरे नियम असल्यास त्याप्रमाणे पंच निर्णय करेल नियम तो बदलू शकत नाही ते आपण बदलायचे असतात .)

आनंद घारे's picture

24 Mar 2013 - 9:52 am | आनंद घारे

'नागपूरमधील शिव मंदिर देवस्थान पंच समितीला आयकरामध्ये सूट द्यावी किंवा देता येणार नाही.' एवढेच त्या लवादाच्या अधिकारकक्षेमध्ये येते आणि त्यांनी जे काही लिहिले असेल ते फक्त त्या संदर्भापुरतेच लागू होते. त्यावर वाद घालायचाच असल्यास ते संपूर्ण जजमेंट वाचून पहायला हवे. बातमीदाराने त्यातली एक दोन वाक्ये औट ऑफ कॉन्टेक्स्ट देऊन त्याला एक भडक मथळा दिला, एवढी गोष्ट माझ्या दृष्टीने महत्वाची नाही.
'हिंदू हा धर्म आहे किंवा नाही?' हे ठरवण्याचा अधिकार एकाद्याला आहे की नाही हे न पाहता "त्याने असे का लिहिले?" असे म्हणून ते गंभीरपणे घेणे मला पटत नाही.

हिंदू धर्म लग्न पध्दती वैदिक अथवा धार्मिक मान्य आहे कारण त्यात निमंत्रण पत्रिका ( जाहिर निवेदन/नोटिस ,कोण ,कुठे ,कधी आणि ओळख ) ,विधि (देवा ब्राह्मणांच्या साक्षीने) असे नियमीत स्वरूप आहे . वारसा हक्काचेही नियम स्पष्ट आहेत तसे धर्माचरणाचे आहेत का ? 'दि बुध्दा अॅंड हिज धम्मा' , (नागपूर महाबोधि सोसायटि प्रकाशन ,सहाशे पाने) या पुस्तकात डॉ आंबेडकरांनी सर्व धर्मांवर चांगलाच प्रकाश टाकला आहे ,त्यांच्यात काय फरक आहे ते छोट्या छोट्या प्रश्नोत्तरांतून विशद केले आहे .

सुधीर मुतालीक's picture

27 Mar 2013 - 8:11 pm | सुधीर मुतालीक

माझ्या मते "हिंदू" हा शब्द भौगोलिक अस्तित्व दाखवण्या पुरता मर्यादित होता. इतिहास अभ्यासाला तर या पलीकडे त्या मध्ये काही अर्थ नाही हेच ठामपणे जाणवते. परकीय आणि इथले असा भेद होताना एक काळ असा आला की परकीयांची भरपूर गर्दी झाली. विशेषत: सोळाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रज आपले अस्तित्व उग्रपणे दाखवू लागले. त्यामुळे परकीय या शब्दाची फोड व्हायला लागली आणि ती त्यांच्या उपासना पद्धती वरून झाली, जसे की ख्रिस्ती वा मुस्लिम. त्यावेळी स्वकीयांना म्हणजे इथल्यांना अन्य काही म्हणजे स्वकीय, वा काळे वा अन्य काहीही म्हणणे रूढ झाले असते तरी आज स्वकीय वा काळे वा ते अन्य ही अस्मिता झाली असती जशी आज हिंदू या संज्ञे भोवती आहे. अस्मिता हा विषय नाही पण परकीयांचा भेद उपासना पद्धती वरून केला गेल्या मुळे स्वकीय या भेदाला उपासना पद्धतीचा गंध निर्माण झाला. स्वकीयांची वैयक्तिक उपासना पद्धती भिन्न असली तरी ख्रिस्ती आणि मुसलमान हे ( त्या काळाचे ) परकीय सरसकट सगळ्यांना हिंदू म्हणू लागले, जी संज्ञा सिंधू या भौगोलिक कारणावरून अस्तित्वात आली. 1857 नंतर जो महाप्रचंड हाहाकार माजला त्यात सुरुवातीला मुसलमानांना इंग्रजांनी मिळेल तेथे ठेचण्याचा घाट घातला आणि प्रचंड लांगुलचालन सुरु केले. त्यातून स्वकीय दुखावले गेले आणि अस्मितेचा जन्म झाला त्याला हिंदुत्व वगैरे अलीकडे म्हणतात आणि जी आज विनाकारण अस्तित्वात आहे. मुसलमान जे मुलत:आक्रमण करून या प्रदेशात आले ते राज्यकर्ते असताना आणि नसताना 1947 पर्यंत हिंदुस्तान नामक प्रदेशात एक स्वतंत्र राष्ट्र म्हणूनच जगले आणि त्यातले काही वेगेळे झाले. मुद्दा असा आहे की "मुस्लिम" वा "ख्रिस्ती" या संज्ञा उपासना पद्धती दर्शवितात तशी "हिंदू " ही संज्ञा उपासना पद्धती दर्शवत नाही. चार्वाकासारखा नास्तिक ही हिंदू असतो आणि शंकराचार्य ही हिंदूच असतात. हिंदू म्हणजे म्हणजे ज्ञात इतिहासात आक्रमण करून इथे न आलेली म्हणजे इथेच वसणारी जमात. या पलीकडे या संज्ञेला काही अर्थ मला सापडत नाही. हतबल इंग्रजांना इथल्या मुसलमानांना विशेषत: 1870 च्या दशकानंतर चिरडणे अवघड जाऊ लागले त्यामुळे त्यांना सांभाळून घेण्याचे सल्ले मिळाले. त्या सांभाळून घेण्याचे रुपांतर लाड करण्यामध्ये सुमारे 1900 च्या आसपास होऊ लागले आणि त्यातून स्वकीय म्हणजे हिंदू संतापण्याची प्रक्रिया सुरु झाली. विस्कळीत हिंदू वा स्वकीय समाजाला एकत्र आणण्यासाठी कर्मकांड, वेगवेगळ्या उपासना पद्धतींचे एकत्र केलेले कडबोळे वगैरे चिकटवून संघटीत करण्याची जी अनैसर्गिक प्रक्रिया सुरु झाली त्यातून हिंदू ही संज्ञा देऊळ, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, खेळाची मंडळे वगैरे म्हणजे जिथे तिथे चिकटवली गेली. त्यामुळे हिंदू या शब्दाचा उपासना पद्धतीशी संबध काही नव्हता आणि नाही. 1947 हा देश स्वतंत्र झाल्यावर परकीय कुणी राहिलेच नाहीत. राजा कुणी उरलाच नाही. लोकांनी आपल्यातूनच काही नेते मंडळी निवडली आणि त्यांच्या हाती राज्य करणे सोपवले. त्यामुळे त्या दिवसानंतर हिंदू या शब्दाला अर्थ उरला नाही. जे आधी, म्हणजे परकीय असताना हिंदू होते त्यांना आता परकीय गेल्यावर स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याची आवश्यकता उरली नाही. (ते त्यांनी करू नये. त्याचे भांडवल ही करू नये. म्हणजे मुसलमान किंवा ख्रिस्चन या उपासना पद्धतीशी निगडीत संज्ञां वैयक्तिक पातळी वरच राहतील.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Mar 2013 - 8:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> "हिंदू " ही संज्ञा उपासना पद्धती दर्शवत नाही. .
कशावरुन हा निष्कर्ष ? काही आधार, काही संदर्भ ?

-दिलीप बिरुटे

अर्धवटराव's picture

27 Mar 2013 - 10:04 pm | अर्धवटराव

हिंदु हि संज्ञा उपासना पद्धती दाखवते याला काय संदर्भ? आधुनीक काळच्या आर.एस.एस, व्हि.एच.पी, शिवसेना वगैरे संघटना कुठल्याच उपासना पद्धतीवर आधारलेल्या नाहित. पुर्वी सावरकर वगैरे मंडळींनी तर तसंही काहि उपासना पद्धती म्हणुन एन्फोर्स केली नाहि. कम्युनीस्ट देखील स्वतःला हिंदु म्हणवतात (भाई वर्धन वगैरे मंडळी "या देशात ८० कोटी हिंदु आहेत, हिंदुत्ववाद्यांना हिंदुकल्याणाची आणखी काय अपेक्षा आहे ?" असा सरळ प्रश्न विचारतात) "हिंदु" संज्ञा नेमकी कुठली उपासना पद्धती दर्शवते?

अर्धवटराव

सुधीर मुतालीक's picture

28 Mar 2013 - 12:34 pm | सुधीर मुतालीक

हिंदुंची उपासना पद्धती कोणती ? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा आपण प्रयत्न केल्यास आपल्याला माझ्या विधानाचा पुरावा मिळेल.

>> म्हणजे मुसलमान किंवा ख्रिस्चन या उपासना पद्धतीशी निगडीत संज्ञां वैयक्तिक पातळी वरच राहतील.
-- आय विश इट हॅपन्स. पण हिंदु कट्टरवादाच्या अनेक मुळ्या, मुस्लीम आणि खिस्चन या उपासनापद्धती वैयक्तीक पातळीवर सिमीत न झाल्यामुळेच उगवल्या, फोफावल्या. सॉ कॉल्ड हिंदुइझमच्या डिफेन्स्व्हीव फेज चा हा मेजर फॅक्टर आहे.

अर्धवटराव

सुधीर मुतालीक's picture

28 Mar 2013 - 12:41 pm | सुधीर मुतालीक

बाबरी प्रकरणा पर्यंत क्रिया प्रतिक्रिया खूपच नगण्य होत्या विशेषत: 1947 ते 1972 च्या कलवधित. पण बाबरी पाडण्याच्या क्रियेमुळे या देशातला सलोख्याची आशा धुळीला मिळाली, आगामी काही दशकांपर्यंत तरी !!

अर्धवटराव's picture

28 Mar 2013 - 7:27 pm | अर्धवटराव

१९४७ ला गळु फुटला त्याचाच घाव इतका जबरी होता कि जिव्हारी लागावा. त्यानंतरच्या क्रिया प्रतिक्रिया उफाळुन वर आलेल्या दिसत नसल्या तरि खदखद पद्धतशिरपणे शिजवण्यात येत होति. इतर धर्मियांच्या सांस्कृतीक आणि राजकीक लठ्ठालठ्ठीला संघटीत हिंदुत्वाचे पहिले अफेन्सीव्ह उत्तर म्हणजे बाबरी काण्ड. बाबरीकाण्ड धार्मीक तेढीचे पहिले वा मुख्य कारण नाहि. धार्मीक तेढीमागे फार पुरातन हितसंबंध गुंतलेले आहेत. आतातर काय, त्याला आंतरराष्ट्रीय समस्यांशी घट्ट जोडण्यात येतय. आपण कितीही काळजी घेतली तरी भविष्यात होणार्‍या धकाधकीतुन आपली सुटका नाहि. या धगीच्या समीधा अगदी व्यवस्थीत, जाणिवपुर्वक फार पुर्वीपासुन पडायला सुरुवात झालि आहे.

अर्धवटराव

नाना चेंगट's picture

28 Mar 2013 - 11:37 pm | नाना चेंगट

सहमत आहे पण विचारवंतांना कसे कळणार?

सुधीर मुतालीक's picture

29 Mar 2013 - 12:17 pm | सुधीर मुतालीक

मित्रा, तुझी प्रतिक्रीया मला अमान्य असली तरी मला खुप आवड्ली. हिंदु आणि मुसलमान हा वाद महाप्रचंड आहे, तो तसा नसता तर हा देश एका वेगळ्या ट्प्प्यावर असता. खुप शुभेच्छा !!

विकास's picture

28 Mar 2013 - 7:38 pm | विकास

बाबरी प्रकरणा पर्यंत क्रिया प्रतिक्रिया खूपच नगण्य होत्या विशेषत: 1947 ते 1972 च्या कलवधित.

शहामृगाप्रमाणे आपले राजकारणी आणि तथाकथीत विचारवंत वाळूत मान घालून बसले होते. त्याचा आधी सामान्य अल्पसंख्यांकाना देखील तोटा झाला आणि परीणाम म्हणून संपूर्ण देशाच्या सुरक्षेला जसा तोटा झाला. त्याचे जे काही परीणाम होयचे होते ते झाले.

गंमत म्हणजे रामजन्मभूमी प्रकरण झाले नसते तर नंतरचा दहशतवाद उफाळून वर नसता म्हणणारे, तो अंतर्गत खदखदत होता हे मान्य करत असतात. पण परत शहामृगी वृत्ती आड येते झालं!

नाना चेंगट's picture

28 Mar 2013 - 11:38 pm | नाना चेंगट

>>>पण परत शहामृगी वृत्ती आड येते झालं!

ही वृत्ती म्हणजेच विचारवंती गुडगुडी... गुडगुडगुड करत हुक्का ओढायचा आणि बरळायचं हिंदू विरोधात.

नाना चेंगट's picture

28 Mar 2013 - 11:39 pm | नाना चेंगट

१००

प्रा डॉ चे अभिनंदन :)

कवितानागेश's picture

29 Mar 2013 - 12:43 am | कवितानागेश

मग काय ठरलं शेवटी? ;)

विकास's picture

29 Mar 2013 - 1:17 am | विकास

फक्त "हिंदू हाच धर्म आहे" असे ठरले.

( आता अजून १०० होऊ शकतील. ) ;)

नाना चेंगट's picture

29 Mar 2013 - 9:01 am | नाना चेंगट

किंवा हिंदू हाच अधर्म आहे आणि बाकी धर्म आहेत असे ठरले.

यावर आता विचारवंतांच्या कडाडून १०० काय २०० टाळ्या .. प्रतिसाद येतील ;)

चर्चेतून ठोस अशा काही निष्कर्षाकडे जाता आलं नाही, किंवा फार माहितीतही भर पडली नाही असे दिसते. पण, चर्चेतून जी वरवर दिसणारी माहिती हाती लागते त्यावरुन असे दिसते की, देवस्थानची चूक झालेली दिसते.आता ही चूक कशासाठी त्यांनी केलेली दिसते तर आयकर वाचविण्यासाठी त्यांनी अशी चूक केली आहे. आणि आयकरातून सूट मिळावी म्हणून त्यांनी म्हणावं तर थोडा खोटा युक्तीवाद केला. आणि तोच युक्तीवाद लवादाने ग्राह्य धरला असे प्राथमिक स्वरुपाच्या चर्चेवरुन आणि माहितीवरुन दिसते.

देवस्थानने जी माहिती लवादाला दिली तीच माहिती लवादाने आपल्या तोंडून सांगितली आणि हे सांगतांना काही अधिकची शेरेबाजी केले असे व्यक्तीगत मला वाटते. बहूतेक प्रतिसादकांनी देवस्थानच्या या चूकीवर फारसं काही मत व्यक्त केलं नाही. लवादानेच चूक केली असे एकतर्फी मत मांडल्याचे दिसते.

सर्व प्रतिसादकांनी (एक दोन अपवाद सोडून देऊ आभाळ कोसळलेल्या सशासारखे धावत कोणतीही माहितीपूर्ण प्रतिसादाची भर न घालता, उगाच जसं काही आम्हाला खूप माहिती आहे, अशा लोकांची मला फार दया येते. एकतर कोणतीही तर्कपूर्ण मांडणी त्यांना करता येत नाही. आणि उगा आरडाओरडा करत धावत असतात. असो,शेरेबाजीबद्दल क्षमा असावी) शांततेने आणि कोणताही आक्रस्ताळेपणा न दाखवता चर्चेत शांतपणे, संयमाने प्रतिसाद लिहित आपला सहभाग नोंदवला त्या सर्वांचे आणि वाचकांचे आभार माणून या धाग्यावरुन मी रजा घेतो. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

ॐकार केळकर's picture

29 Mar 2013 - 6:04 pm | ॐकार केळकर

नक्की समस्या काय आहे लोकांची? त्यांना हिंदू नावाचा धर्म नाहीये असे सिद्ध करून काय मिळवायचेय?
समजा हिंदू धर्म नसेल तर जे लोक आत्ता हिंदू धर्म लावतात, त्यांनी काय लावायचे? मुळात ह्या लोकांना उत्तरे का द्यायची?
कामं नसलेले लोक काही प्रश्न उपस्थित करतात आणि बाकीचे सर्व-ज्ञानी असल्यासारखे भांडत बसतात.
धर्माची व्याख्या काय आहे लवादाच्या मते?
लोक पण उकरून काढत बसतात, २०० वर्षांपूर्वी काय होते? आणि ५०० वर्षांपूर्वी? त्याहून मागे गेले म्हणजे अश्मयुगीन काळात कोणताच धर्म नव्हता. मग आहे का हिम्मत जग निधर्मी करायची?
गम्मत म्हणजे, हिंदू नसलेल्या किंवा स्वतःला समाज सुधारक, सेक्युलर किंवा नास्तिक समजणाऱ्या लोकांना फार खाज असते अश्या गोष्टी शोधत बसायची...
आंबेडकरांना हिंदू धर्मात काही समस्या वाटल्या आणि ते दुसऱ्या धर्मात गेले कि नाही? नसते विषय काढून चर्चेचे गुऱ्हाळ नाही लावत बसले. तसे हिंदू धर्म न मानणाऱ्यांनी ते ज्याला धर्म मानतात त्यात जावे निघून, अथवा कुठल्याही फॉर्म वर "धर्म: कोणताच नाही" असे लिहावे.
कशाला स्वतः त्रास करून घ्यायचा आणि दुसऱ्यांना द्यायचा?

पुष्कर जोशी's picture

13 Apr 2013 - 10:09 pm | पुष्कर जोशी

सौदी मध्ये भारतीय मुसलमान यांना "हिंदी मुसलमान" म्हणतात असे कोठेतरी ऐकले होते ... म्हणजे हिंदू = भारतीय का ? म्हणजे सगळे भारतीय हिंदूच का ? म्हणजे सावरकरांनी हिंदू महासभा नसून भारतीय महासभा स्थापन केली असे म्हणायचे का ?

राजेहो...साळपास्न धर्माच्या रकान्या समूर हिंदू असा लिव्हायच असत अस मास्तरांन्नी शिकिवलाय....आन आता हे लवाद का कोण ते अस म्हणतया...मंग खर क काय ब्वो.... तवा आता आम्चा आजा म्हनायचा त्येच खर कि काय....तुह्या मास्तर्ला कव्डिची अक्काल न्हाय..( आसा माहा आजा म्हणायचा बर का )....

विजुभाऊ's picture

29 Dec 2014 - 6:25 pm | विजुभाऊ

दुर्दैवाने भारतीय पासपोर्टमध्ये "धर्म" हा रकाना ऑप्शनल मधे ठेवलेला नाहिय्ये. तो भरणे हा नाईलाजच आहे.

प्रसाद गोडबोले's picture

29 Dec 2014 - 6:40 pm | प्रसाद गोडबोले

येस विजुभाऊ , खरं आहे .... :(

मागे एकदा ठाण्यातील कोणत्या तरी वकिलाने स्वतःला " धर्ममुक्त" घोषित करावे अशी याचिका दाखल केली होती पण कोर्टाने ती नाकारली :(

वैयक्तिकली हिंदु धर्मातल्या (रादर निधर्मी सरकारने हिंदु धर्मावर लादलेल्या ) कित्येक प्रथा मला अमान्य आहेत , धर्माचा त्याग करुन जायचे कुठे ?
माणसाच्या फक्त समाजजीवनावर लक्ष ठेवणारा आणि त्याच्या वैयक्तिक जीवनात अजिबात ढवळाढवळ न करणारा
(म्हणजे त्याने काय खावे, काय खाऊ नये , किती लग्न करावीत , बायकोला किती पोटगी द्यावी की देवुच नये , किती मुले काढावीत , इस्टेटीट मुलींना वाटा द्यावा की देवु नये , दारु प्यावी की पुवु नये , हिंसा करावी की करु नये वगैरे गोष्टीं मध्ये कमांडमेन्ट्स न देणारा ) दुसरा कोणताच धर्म मला ठाऊक नाही :(

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2014 - 2:56 pm | श्रीगुरुजी

>>> हिंदु नावाचा धर्मच नाही....

नसू देत. आमचा धर्म हिंदू आहे व आम्ही हिंदू असल्याची किंवा तसे उघडपणे सांगण्याची आम्हाला अजिबात खंत किंवा त्याबद्दल अपराधीपणा वाटत नाही. उलट आम्ही हिंदू असल्याचा व आम्ही हिंदू आहोत हे उघडपणे सांगण्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

चौकस२१२'s picture

4 Sep 2023 - 5:57 am | चौकस२१२

हिंदू धर्म आहे किंवा नाही हा फुकाचा वाद आहे ( उगाचच बुद्धिभेद कशाला )
असले किंवा नसेल...
साधारण ( ढोबळ मानाने ) पाहता एक विचार/ चालीरीती आणि काही कल्पना मानणारे जे कळप- आहेत जसे कि ख्रिस्त किंवा मुस्लिम तसे हिंदू हा एक "कळप समूह " तर आहे ना ?

मग अश्या समूहाला/समाजाला निसर्गाचे आणि देशाचे जे काही नियम असतील आणि फायदे तोटे असतील ते मिलाळायला पाहिजेत .

हि बातमी देण्यामागचा आपला खरा हेतू काय हे समजते आहे ...

उदय निधी याने केलेल्या वक्तव्यावर
मत जाणून घ्यायला आवडेल. विशेषकरून 'निर्मूलन' या शब्दाभोवती सगळा जोर दिला जात आहे. म्हणून इथल्या अंनिसवादींची मते समजून घ्यायला आवडेल.
सनातन कि हिंदू धर्म आहे कि नाही वगैरे चर्चा त्या अनुषंगाने वळली तर ?

सर टोबी's picture

7 Sep 2023 - 9:42 am | सर टोबी

मला वाटतं की धर्माखेरीज आपली प्रत्येकाची एक ठाम मूल्य असतात आणि इतर कोणत्याही रूढी परंपरांपेक्षा आपण त्यांना अनुसरुन आपला जीवनक्रम व्यतीत करीत असतो. आपल्या असण्याचं एकमेव परिमाण म्हणजे या सृष्टीचा भाग असतांनाआपण काय केलं आणि या करण्यामध्ये कोणत्याही धार्मिक कृत्त्यांपेक्षा मानव आणि सृष्टी यांच्यासाठी केलेल्या गोष्टी कायम राहतात.