Skip to main content

हिंदु नावाचा धर्मच नाही....

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 17/03/2013 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदु नावाचा धर्मच नाही अशा बातमीनं कालपासून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. देवस्थान आपल्या उत्त्पन्नातील काही भाग धार्मिक कार्यासाठी वापरत असतील तर त्यास आयकरातून सुट मिळू शकत नाही, असे लवादाने मत मांडले आहे. लवाद पुढे असेही म्हणते की, '' हिंदुत्व हा धर्म किंवा समाज कधीही नव्हता. हिंदुत्व ही केवळ एक जीवनशैली आहे. ही जीवनशैली मानणारे अनेक समूह आहेत. ते वेगवेगळ्या देवदेवतांना पुजतात. इतकेच नव्हे तर, ही जीवनशैली अंगिकारणार्‍यांना देवाची पूजा करण्याची कोणतीही सक्ती नसते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हिंदुत्व हा धर्म मानता येत नाही. तसेच शिवशंकर, हनुमान किंवा दुर्गामाता मंदिराच्या देखभालीवरील खर्च हा धार्मिक खर्च मानता येणार नाही, असेही म्हटले आहे. 'भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध कुठल्याही एका धर्माशी नाही. ते विश्वव्यापी आहेत. ज्या हिंदू धर्माशी या देवदेवतांचे नाव जोडले जाते, तसा कुठला धर्मच अस्तित्वात नाही' (मटा) १] माझा पहिला प्रश्न असा आहे की भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध हा हिंदु धर्माशीच संबंधित आहेत तेव्हा ते विश्वव्यापी आहेत, असे मत लवादाने मांडण्याचे कारण काय असावे. २] एकाच देवाची पुजा करणार्‍यांचा तो एकच धर्म असतो तेव्हा नव्या लवादाच्या विचारात हिंदुंचा एक धर्म नाही का ? ३] हिंदु ही एक जीवनपद्धती आहे, त्याला धर्म म्हणने चूकीचेच आहे का ? विनंती : हिंदूच्या विरोधात आता सारखे लिहिल्या जाते, बोलल्या जाते, हिंदु सहिष्णू आहेत वगैरे मुद्दे चर्चेत टाळता आलेत तर टाळावे, लवाद असे का म्हणते यावरील माहितीपूर्ण आणि काही तर्कपूर्ण प्रतिसादांचे स्वागत आहे.

वाचने 34187
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

माझ्या माहितीप्रमाणे कायद्यातील "हिंदु" या शब्दाची व्याख्या रोचक आहे. आपल्याला माहित असणारे विविध 'देवाधिष्टीत' धर्म (जसे इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध, जैन इत्यादी इत्याही) असा कोणताही धर्म न पाळणार्‍या व्यक्तीला कायद्याने हिंदु समजले जाते, असे काहिसे.. वेळ मिळाल्यास अधिक टंकतो :)

काय ठरलं मग शेवटी? म्हणजे आम्ही धर्मी का अधर्मी की बिनधर्मी ? (धर्मनिरपेक्ष हिंदू) चिगो..

हिंदू हा धर्म नाही तर नसू दे! (प्राडॉ, अहो, बरेच आहे की.) इतर सर्व 'धर्मांना' ३०% भुर्डंड बसतोय. हिंदू हा धर्म नसल्याने कुठल्याही 'विश्वव्यापी' देवाची देवळे बांधायला विदाऊट टॅक्स मोकळा.:) ;)

शेवटी काय ठरले हिंदू धर्म आहे का नाही अनेक जर्मन माझ्या चांगल्या परिचयाचे झाले की त्यांच्याकडून खुपदा प्रश्न विचारला जातो की तुझ्या मुलांवर तू हिंदू धर्मांचे कोणते संस्कार करणार हे विचारणारे जर्मन हे आयुर्वेद , योगा आणि भारतीय आध्यात्म ह्यांच्या आहारी म्हणावे इतके भजनी लागलेले असतात , मग मी लगेच म्हणतो हिंदू म्हणून योग , आयुर्वेद व काम सूत्र ह्या तिन्ही गोष्टी माझ्या मुलांच्या जीवन पद्धतीच्या अविभाज्य घटक असल्या पाहिजेत. हिंदू किंवा भारत म्हटले की परदेशात हि त्रिसूत्र गोर्‍यांच्या डोक्यात फिट असली आहे पण बहुतांशी गोर्यांना भारत म्हणजे हिंदूंचा देश अशी धारणा असते , व त्यांच्या देशात अधिकृत ख्रिस्तीधर्म असल्याने भारतात तो हिंदू असावा असा त्यांचा दाट समज असतो. कारण भारतात बहुसंख्य हिंदू राहतात ह्याची त्यांना माहिती असते.

लवाद-लवासा-लचांड हे मला सारखेच वाटतात.

मटामधली बातमी मी पुन्हा पुन्हा वाचून पाहिली. त्यावरून मला असा घटनाक्रम दिसला. १.नागपूरमधील शिव मंदिर देवस्थान पंच समितीने आयकरामध्ये सूट मागितली. २.त्यांना सवलत देता येणार नाही, असा निर्णय आयकर आयुक्तांनी दिला. ३.या निर्णयाविरोधात देवस्थान समितीने लवादाकडे धाव घेतली. ४.त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत लवादाने आयुक्तांचा निर्णय फेटाळून लावला. म्हणजे त्यांना आयकरात सवलत दिली असावी. म्हणजे यात देवस्थानने घेतलेली भूमिका यशस्वी झाली. हिंदूंचाच फायदा झाला.असे असतांना हिंदुत्ववादी इतके कशामुळे चवताळले आहेत? वर्तमानपत्रामधील बातमीचा मथळा लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आकर्षक किंवा आक्रमक बनवलेला असतो. त्याच्या खाली लिहिलेला मजकूर जास्त महत्वाचा असतो. तो सुद्धा विपर्यस्त असू शकतो, मुळातले दस्तऐवज खरे असतात, पण आपल्याला ते पाहणे शक्य नसल्यामुळे वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन वगैरेंवर विश्वास ठेवावा लागतो. या निमित्याने धर्म, रिलिजन वगैरेंबद्दल असलेल्या महितीची उजळणी झाली, तसेच डोक्यात थोडा नवा प्रकाश पडला.

In reply to by आनंद घारे

हिंदूंचाच फायदा झाला.असे असतांना हिंदुत्ववादी इतके कशामुळे चवताळले आहेत?
नक्की कोण आणि कुठे? या संदर्भातली बातमी माझ्या तरी वाचनात आली नाही.

In reply to by आनंद घारे

>>>>> १.नागपूरमधील शिव मंदिर देवस्थान पंच समितीने आयकरामध्ये सूट मागितली. बरोबर. >>>>२.त्यांना सवलत देता येणार नाही, असा निर्णय आयकर आयुक्तांनी दिला. बरोबर. >>>>त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत थोडं बरोबर आहे. देवस्थान समितीने लवादाकडे काय म्हटले आणि कोणतं म्हणनं मान्य केलं ''आमचे शिव मंदिर हे सर्व समाजासाठी खुले असते. ते कुठल्याही एका धर्माशी संबंधित नाही. शिवाय मूर्त्यांची प्रतिष्ठापना करणे हे काही धार्मिक कार्य होत नाही'' लवाद म्हणाले की आपलं म्हणनं बरोबर आहे. (लवादाने हा युक्तीवाद ग्राह्य धरुन आयकरातून सूट दिली की काय मग, हे मात्र माझ्या वाचनात आले नाही) लवाद काय म्हणते की, ''शिवशंकर, हनुमान किंवा दुर्गामाता मंदिरांच्या देखभालीवरील खर्च हा धार्मिक खर्च मानता येणार नाही. भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध कुठल्याही एका धर्माशी नाही. ते विश्‍वव्यापी आहेत. ज्या हिंदु धर्माशी या देवतांचे नाव जोडले जाते, तसा कुठला धर्मच अस्तित्वात नाही'' मंदिराच्या देखभालीवरचा खर्च हा धार्मिक खर्च नाही आणि वरची देव मंडळी ही वैश्विक असल्यामुळे त्यांचा कोणता एका धर्माशी संबंध नाही, आणि वरील देवतांचे हिंदु धर्माशी नाव जोडल्या जाते असा कोणताही हिंदू धर्मच अस्तित्त्वात नाही. असे मत व्यक्त केलं आहे. हिंदू धर्म अस्तित्त्वातच नाही आणि भगवान शंकर, दुर्गामाता आणि हनुमान यांचा संबंध कुठल्याही एका धर्माशी नाही या शोधाबद्दल हिंदू मंडळी नाराज आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by आनंद घारे

>>>> या निमित्याने धर्म, रिलिजन वगैरेंबद्दल असलेल्या महितीची उजळणी झाली, थांबा थांबा थांबा. अजून मला हिंदू धर्माबद्दल काही ओळी खरडायच्या आहेत. :) -दिलीप बिरुटे

मला परत परत तोच प्रश्न पडतो... धर्माला एखाद्या उपासना पद्धतीच्या तागडीने का तोलतात? अर्धवटराव

बातमीत 'हिंदुत्व' आणि 'हिंदु' यात काहीतरी गडबड वाटते आहे. 'हिंदुत्व' आणि 'हिंदु' या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. सर्वोच्च न्यायालयानं यात फरक केलेला आहे त्यानुसार 'हिंदुत्व' ही जीवनशैली आहे आणि धर्म नव्हे. पण कायद्यानुसार हिंदु धर्माला अनुसरुन वारसा हक्क, विवाह, दत्तकविधान वगैरेचा विचार केलेला आहे. या कायद्यानुसार जैन, बौद्ध, शिख हेही या कायद्याच्या कक्षेत येतात. मुसलमान, पारशी, ख्रिश्चन आणि ज्यु यांना हा कायदा लागु नाही. त्यांचे कायदे वेगळे आहेत. १९५५-५६ साली पहिल्यांदा 'हिंदु कोड बील' आणलं गेलं आणि नंतर इतर धर्मियांसाठी असेच कायदे केले गेले. त्यामुळं जरका कायद्यानुसार सगळ्यांना आपापल्या चालीरिती पाळता येत असतील तर 'हिंदु' हा धर्म आहे की नाही याचा वाद तात्विक आहे. पण म्हणून 'हिंदुत्व' आणि 'हिंदु' यांत गोंधळ होण्याचं काही कारण दिसत नाही. हे दोन्ही शब्द आलटून पालटून वापरले तर गोंधळ होऊ शकतो.

जल्ला हिन्दू धर्म नाय काय म्हंजे... बिरुटे सर 'हेल हिटलर' म्हनुयात आनि नविन सुरुवात करुया चला. आपल्या देशाला सर्वात पाहिले भारत अस कोण म्हणाले अणि याचा लिखित पुरावा काय अशी....याची याचिका (आर टी आय ) एका मुलीने टाकली म्हणे...आणि सरकार अजुनही उत्तर शोधतय

In reply to by मालोजीराव

मालोजीराव तुमचे लेख वाचतो, प्रतिसाद वाचतो आपल्याकडे माहिती असते फक्त तटस्थपणाने लिहायला घाबरता (अशी शेरेबाजी करतो, क्षमा असावी) असे माझे मत आहे. >>> जल्ला हिन्दू धर्म नाय काय म्हंजे... बिरुटे सर 'हेल हिटलर' म्हनुयात आनि नविन सुरुवात करुया चला. सर्व आचरणपद्धतीची मोडतोड, धर्मग्रंथाची मोडतोड करुन, नव्या आचरणपद्धतीची मांडणी करुन 'हेल हिटलर' अशी एक नवीन सुरुवात करता येईल, असे वाटते. >>>>> आपल्या देशाला सर्वात पाहिले भारत अस कोण म्हणाले अणि याचा लिखित पुरावा काय अशी....याची याचिका (आर टी आय ) एका मुलीने टाकली म्हणे...आणि सरकार अजुनही उत्तर शोधतय (अन्य संस्थळावरील दिलेला माझा प्रतिसाद चोप्य पस्ते करत आहे) सरकारकडे माहिती आहे, असावी. आर्यांचे आगमन भारतात झाल्यावर त्यांची भटकायची अवस्था संपते. सप्तसिंधुच्या खो-यात मुबलक पाणी,चराउ कुरणे होती; हवामानही प्रसन्न होते. मन रमावे असेच वातावरण असावे. आर्यांना हा प्रदेश आवडला ते वसाहती करुन राहू लागले. पशुपालन,शेतीव्यवसाय यांच्या विकासाबरोबर पुर्वीच्या टोळ्याचे आता आर्यांच्या प्रादेशिक राज्यात रुपांतर झाले. त्यात पुरु, अनू,द्रह्यु, यदू व तुर्वश ही आर्याची पाच शक्तीशाली राज्ये अस्तित्वात आली. त्यांना 'पंचजन' असे म्हणत. याचवेळी 'भरत' नावाच्या आर्याच्या टोळीचे एक राज्य, जे 'पंचजन' पेक्षा मोठे होते ते अस्तित्वात आले होते. 'सुदास' हा भरत टोळीचा राजा होता व त्याने भारतातील सर्व राज्य आपल्या वर्चस्वाखाली आणण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती. विश्विमित्र हा भरत टोळीचा पुरोहित होता; पण् काही कारणामुंळे त्याचे वर राजा सुदास यांच्याशी बिघडले.राजाने विश्वमित्राची हाकालपट्टी करुन वसिष्ठ पुरोहिताची नेमणूक केली. त्यामुळे विश्वमित्र चिडला त्याने भरत टोळीचा सूड घ्यायचे ठरवले. विश्वमित्राने आर्यांची पाच राज्य ( पंचजन) व अनार्याची पाच राज्ये ( भिव,भलान,पख्त, विषणिन,अलिन) असा दहा राज्यांचा एक संघ तयार केला व सुदास राजाच्या टोळीविरुद्ध युद्ध पुकारले. पण दशराज संघ व भरत टोळीत भरत टोळीचा विजय झाला. भरट टोळीने सप्तसिंधुच्या प्रदेशात प्रभुत्व प्रस्थापित केले. हे प्रभुत्व दीर्घकाळ टिकले म्हणून आपल्या देशाला 'भारत' व 'भारतवर्ष ' हे नाव प्राप्त झाले. पराभूत राज्य स्वतःच्या राज्यात विलीन केली. आणि सर्वात मोठे राज्य असणारी 'भरत' टोळी राजकीय क्षितिजावर आली. -इति. भारताचा इतिहास व संस्कृति(इ.स. ६५० पर्यंत ) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मालोजीराव तुमचे लेख वाचतो, प्रतिसाद वाचतो आपल्याकडे माहिती असते फक्त तटस्थपणाने लिहायला घाबरता (अशी शेरेबाजी करतो, क्षमा असावी) असे माझे मत आहे.
तटस्थपणे लिहिणे स्पेशली इतिहासाच्या बाबतीत किती कठीण आहे आपण जाणताच :) …महाराजांचे कार्य आणि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी हाच एकमेव हेतू ! "दोस्त बनानेसे काम चल सकाताहे तो दुश्मन क्यू बनाये " ;) माहितीबद्दल धन्यवाद,हि आर्य राज्यांविषयीची माहिती माझ्यासाठी नवीन होती. या भरत टोळीचा काळ कधीचा असावा…आणि कागदोपत्री 'भारत' उल्लेख कधी आला असावा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राध्यापकसाहेब यावर एक खास सविस्तर धागा काढाच तुम्ही. हा विषय म्हणजे ऐकीव गोष्टी भाराभार आणि खात्रीची माहिती कोणालाच नाही अशी अवस्था आहे. तुमच्यासारख्या कडून यावर सविस्तर वाचायला आवडेल. मनात असलेल्या खूप शंकांना खरी (कमीतकमी शास्त्रीय पद्धतीने सापडलेली) उत्तरे मिळतील ही खात्री आहे म्हणून ही खास विनंती. माझ्यासारखेच अनेकांचे मनोगत असेल असे वाटते.... तेव्हा घ्या मनावर जरा.

न्यायसंस्था ,(आयकर अथवा हिंदू कोड बिल अथवा इंडिअन पीनल कोड ) आणि खटला या तीन गोष्टिंची तुलना कंप्युटर ,प्रोग्राम आणि दिलेला प्रॉब्लेम यांच्याशी करा म्हणजे आजच्या धाग्याचा गुंता लगेच सुटेल . कंप्युटर जसा दिलेल्या प्रश्न दिलेल्या प्रोग्रामच्या नियमाने सोडवून उत्तर देतो तसे न्यायालय त्याना दिलेल्या नियम अटि पडताळून त्यात दिलेली शिक्षा अथवा होय अथवा नाही हा निर्णय करते .कंप्युटरला प्रोग्राम आणि न्यायालयाला पिनल कोड वगैरे प्रमाणे फक्त विचार करायचा असतो .इथे आलेला निधि आयकर नियमांप्रमाणे अमुक कामांसाठी वापरत असल्यास सूट देता येईल का हा निर्णय दिला असणार .हिंदू हा धर्म आहे का नाही याबद्दल युक्तिवादासाठी वेगळी याचिका करावी लागेल .त्यावेळी हिंदू धर्माचा प्रसार करणाऱ्या शंकराचार्य ,विवेकानंदानी काय विचार मांडले त्याचा उपयोग होईल .(गल्लितल्या क्रिकेटच्या मैचमध्ये जर एक टप्पि कैच आऊट ,पलिकडच्या बिल्डिंगमध्ये आऊट वगैरे नियम असल्यास त्याप्रमाणे पंच निर्णय करेल नियम तो बदलू शकत नाही ते आपण बदलायचे असतात .)

'नागपूरमधील शिव मंदिर देवस्थान पंच समितीला आयकरामध्ये सूट द्यावी किंवा देता येणार नाही.' एवढेच त्या लवादाच्या अधिकारकक्षेमध्ये येते आणि त्यांनी जे काही लिहिले असेल ते फक्त त्या संदर्भापुरतेच लागू होते. त्यावर वाद घालायचाच असल्यास ते संपूर्ण जजमेंट वाचून पहायला हवे. बातमीदाराने त्यातली एक दोन वाक्ये औट ऑफ कॉन्टेक्स्ट देऊन त्याला एक भडक मथळा दिला, एवढी गोष्ट माझ्या दृष्टीने महत्वाची नाही. 'हिंदू हा धर्म आहे किंवा नाही?' हे ठरवण्याचा अधिकार एकाद्याला आहे की नाही हे न पाहता "त्याने असे का लिहिले?" असे म्हणून ते गंभीरपणे घेणे मला पटत नाही.

हिंदू धर्म लग्न पध्दती वैदिक अथवा धार्मिक मान्य आहे कारण त्यात निमंत्रण पत्रिका ( जाहिर निवेदन/नोटिस ,कोण ,कुठे ,कधी आणि ओळख ) ,विधि (देवा ब्राह्मणांच्या साक्षीने) असे नियमीत स्वरूप आहे . वारसा हक्काचेही नियम स्पष्ट आहेत तसे धर्माचरणाचे आहेत का ? 'दि बुध्दा अॅंड हिज धम्मा' , (नागपूर महाबोधि सोसायटि प्रकाशन ,सहाशे पाने) या पुस्तकात डॉ आंबेडकरांनी सर्व धर्मांवर चांगलाच प्रकाश टाकला आहे ,त्यांच्यात काय फरक आहे ते छोट्या छोट्या प्रश्नोत्तरांतून विशद केले आहे .

माझ्या मते "हिंदू" हा शब्द भौगोलिक अस्तित्व दाखवण्या पुरता मर्यादित होता. इतिहास अभ्यासाला तर या पलीकडे त्या मध्ये काही अर्थ नाही हेच ठामपणे जाणवते. परकीय आणि इथले असा भेद होताना एक काळ असा आला की परकीयांची भरपूर गर्दी झाली. विशेषत: सोळाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रज आपले अस्तित्व उग्रपणे दाखवू लागले. त्यामुळे परकीय या शब्दाची फोड व्हायला लागली आणि ती त्यांच्या उपासना पद्धती वरून झाली, जसे की ख्रिस्ती वा मुस्लिम. त्यावेळी स्वकीयांना म्हणजे इथल्यांना अन्य काही म्हणजे स्वकीय, वा काळे वा अन्य काहीही म्हणणे रूढ झाले असते तरी आज स्वकीय वा काळे वा ते अन्य ही अस्मिता झाली असती जशी आज हिंदू या संज्ञे भोवती आहे. अस्मिता हा विषय नाही पण परकीयांचा भेद उपासना पद्धती वरून केला गेल्या मुळे स्वकीय या भेदाला उपासना पद्धतीचा गंध निर्माण झाला. स्वकीयांची वैयक्तिक उपासना पद्धती भिन्न असली तरी ख्रिस्ती आणि मुसलमान हे ( त्या काळाचे ) परकीय सरसकट सगळ्यांना हिंदू म्हणू लागले, जी संज्ञा सिंधू या भौगोलिक कारणावरून अस्तित्वात आली. 1857 नंतर जो महाप्रचंड हाहाकार माजला त्यात सुरुवातीला मुसलमानांना इंग्रजांनी मिळेल तेथे ठेचण्याचा घाट घातला आणि प्रचंड लांगुलचालन सुरु केले. त्यातून स्वकीय दुखावले गेले आणि अस्मितेचा जन्म झाला त्याला हिंदुत्व वगैरे अलीकडे म्हणतात आणि जी आज विनाकारण अस्तित्वात आहे. मुसलमान जे मुलत:आक्रमण करून या प्रदेशात आले ते राज्यकर्ते असताना आणि नसताना 1947 पर्यंत हिंदुस्तान नामक प्रदेशात एक स्वतंत्र राष्ट्र म्हणूनच जगले आणि त्यातले काही वेगेळे झाले. मुद्दा असा आहे की "मुस्लिम" वा "ख्रिस्ती" या संज्ञा उपासना पद्धती दर्शवितात तशी "हिंदू " ही संज्ञा उपासना पद्धती दर्शवत नाही. चार्वाकासारखा नास्तिक ही हिंदू असतो आणि शंकराचार्य ही हिंदूच असतात. हिंदू म्हणजे म्हणजे ज्ञात इतिहासात आक्रमण करून इथे न आलेली म्हणजे इथेच वसणारी जमात. या पलीकडे या संज्ञेला काही अर्थ मला सापडत नाही. हतबल इंग्रजांना इथल्या मुसलमानांना विशेषत: 1870 च्या दशकानंतर चिरडणे अवघड जाऊ लागले त्यामुळे त्यांना सांभाळून घेण्याचे सल्ले मिळाले. त्या सांभाळून घेण्याचे रुपांतर लाड करण्यामध्ये सुमारे 1900 च्या आसपास होऊ लागले आणि त्यातून स्वकीय म्हणजे हिंदू संतापण्याची प्रक्रिया सुरु झाली. विस्कळीत हिंदू वा स्वकीय समाजाला एकत्र आणण्यासाठी कर्मकांड, वेगवेगळ्या उपासना पद्धतींचे एकत्र केलेले कडबोळे वगैरे चिकटवून संघटीत करण्याची जी अनैसर्गिक प्रक्रिया सुरु झाली त्यातून हिंदू ही संज्ञा देऊळ, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, खेळाची मंडळे वगैरे म्हणजे जिथे तिथे चिकटवली गेली. त्यामुळे हिंदू या शब्दाचा उपासना पद्धतीशी संबध काही नव्हता आणि नाही. 1947 हा देश स्वतंत्र झाल्यावर परकीय कुणी राहिलेच नाहीत. राजा कुणी उरलाच नाही. लोकांनी आपल्यातूनच काही नेते मंडळी निवडली आणि त्यांच्या हाती राज्य करणे सोपवले. त्यामुळे त्या दिवसानंतर हिंदू या शब्दाला अर्थ उरला नाही. जे आधी, म्हणजे परकीय असताना हिंदू होते त्यांना आता परकीय गेल्यावर स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याची आवश्यकता उरली नाही. (ते त्यांनी करू नये. त्याचे भांडवल ही करू नये. म्हणजे मुसलमान किंवा ख्रिस्चन या उपासना पद्धतीशी निगडीत संज्ञां वैयक्तिक पातळी वरच राहतील.)

In reply to by सुधीर मुतालीक

>>>> "हिंदू " ही संज्ञा उपासना पद्धती दर्शवत नाही. . कशावरुन हा निष्कर्ष ? काही आधार, काही संदर्भ ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिंदु हि संज्ञा उपासना पद्धती दाखवते याला काय संदर्भ? आधुनीक काळच्या आर.एस.एस, व्हि.एच.पी, शिवसेना वगैरे संघटना कुठल्याच उपासना पद्धतीवर आधारलेल्या नाहित. पुर्वी सावरकर वगैरे मंडळींनी तर तसंही काहि उपासना पद्धती म्हणुन एन्फोर्स केली नाहि. कम्युनीस्ट देखील स्वतःला हिंदु म्हणवतात (भाई वर्धन वगैरे मंडळी "या देशात ८० कोटी हिंदु आहेत, हिंदुत्ववाद्यांना हिंदुकल्याणाची आणखी काय अपेक्षा आहे ?" असा सरळ प्रश्न विचारतात) "हिंदु" संज्ञा नेमकी कुठली उपासना पद्धती दर्शवते? अर्धवटराव

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिंदुंची उपासना पद्धती कोणती ? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा आपण प्रयत्न केल्यास आपल्याला माझ्या विधानाचा पुरावा मिळेल.

In reply to by सुधीर मुतालीक

>> म्हणजे मुसलमान किंवा ख्रिस्चन या उपासना पद्धतीशी निगडीत संज्ञां वैयक्तिक पातळी वरच राहतील. -- आय विश इट हॅपन्स. पण हिंदु कट्टरवादाच्या अनेक मुळ्या, मुस्लीम आणि खिस्चन या उपासनापद्धती वैयक्तीक पातळीवर सिमीत न झाल्यामुळेच उगवल्या, फोफावल्या. सॉ कॉल्ड हिंदुइझमच्या डिफेन्स्व्हीव फेज चा हा मेजर फॅक्टर आहे. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

बाबरी प्रकरणा पर्यंत क्रिया प्रतिक्रिया खूपच नगण्य होत्या विशेषत: 1947 ते 1972 च्या कलवधित. पण बाबरी पाडण्याच्या क्रियेमुळे या देशातला सलोख्याची आशा धुळीला मिळाली, आगामी काही दशकांपर्यंत तरी !!

In reply to by सुधीर मुतालीक

१९४७ ला गळु फुटला त्याचाच घाव इतका जबरी होता कि जिव्हारी लागावा. त्यानंतरच्या क्रिया प्रतिक्रिया उफाळुन वर आलेल्या दिसत नसल्या तरि खदखद पद्धतशिरपणे शिजवण्यात येत होति. इतर धर्मियांच्या सांस्कृतीक आणि राजकीक लठ्ठालठ्ठीला संघटीत हिंदुत्वाचे पहिले अफेन्सीव्ह उत्तर म्हणजे बाबरी काण्ड. बाबरीकाण्ड धार्मीक तेढीचे पहिले वा मुख्य कारण नाहि. धार्मीक तेढीमागे फार पुरातन हितसंबंध गुंतलेले आहेत. आतातर काय, त्याला आंतरराष्ट्रीय समस्यांशी घट्ट जोडण्यात येतय. आपण कितीही काळजी घेतली तरी भविष्यात होणार्‍या धकाधकीतुन आपली सुटका नाहि. या धगीच्या समीधा अगदी व्यवस्थीत, जाणिवपुर्वक फार पुर्वीपासुन पडायला सुरुवात झालि आहे. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

मित्रा, तुझी प्रतिक्रीया मला अमान्य असली तरी मला खुप आवड्ली. हिंदु आणि मुसलमान हा वाद महाप्रचंड आहे, तो तसा नसता तर हा देश एका वेगळ्या ट्प्प्यावर असता. खुप शुभेच्छा !!

In reply to by सुधीर मुतालीक

बाबरी प्रकरणा पर्यंत क्रिया प्रतिक्रिया खूपच नगण्य होत्या विशेषत: 1947 ते 1972 च्या कलवधित. शहामृगाप्रमाणे आपले राजकारणी आणि तथाकथीत विचारवंत वाळूत मान घालून बसले होते. त्याचा आधी सामान्य अल्पसंख्यांकाना देखील तोटा झाला आणि परीणाम म्हणून संपूर्ण देशाच्या सुरक्षेला जसा तोटा झाला. त्याचे जे काही परीणाम होयचे होते ते झाले. गंमत म्हणजे रामजन्मभूमी प्रकरण झाले नसते तर नंतरचा दहशतवाद उफाळून वर नसता म्हणणारे, तो अंतर्गत खदखदत होता हे मान्य करत असतात. पण परत शहामृगी वृत्ती आड येते झालं!

In reply to by विकास

>>>पण परत शहामृगी वृत्ती आड येते झालं! ही वृत्ती म्हणजेच विचारवंती गुडगुडी... गुडगुडगुड करत हुक्का ओढायचा आणि बरळायचं हिंदू विरोधात.

In reply to by कवितानागेश

फक्त "हिंदू हाच धर्म आहे" असे ठरले. ( आता अजून १०० होऊ शकतील. ) ;)

In reply to by विकास

किंवा हिंदू हाच अधर्म आहे आणि बाकी धर्म आहेत असे ठरले. यावर आता विचारवंतांच्या कडाडून १०० काय २०० टाळ्या .. प्रतिसाद येतील ;)

In reply to by कवितानागेश

चर्चेतून ठोस अशा काही निष्कर्षाकडे जाता आलं नाही, किंवा फार माहितीतही भर पडली नाही असे दिसते. पण, चर्चेतून जी वरवर दिसणारी माहिती हाती लागते त्यावरुन असे दिसते की, देवस्थानची चूक झालेली दिसते.आता ही चूक कशासाठी त्यांनी केलेली दिसते तर आयकर वाचविण्यासाठी त्यांनी अशी चूक केली आहे. आणि आयकरातून सूट मिळावी म्हणून त्यांनी म्हणावं तर थोडा खोटा युक्तीवाद केला. आणि तोच युक्तीवाद लवादाने ग्राह्य धरला असे प्राथमिक स्वरुपाच्या चर्चेवरुन आणि माहितीवरुन दिसते. देवस्थानने जी माहिती लवादाला दिली तीच माहिती लवादाने आपल्या तोंडून सांगितली आणि हे सांगतांना काही अधिकची शेरेबाजी केले असे व्यक्तीगत मला वाटते. बहूतेक प्रतिसादकांनी देवस्थानच्या या चूकीवर फारसं काही मत व्यक्त केलं नाही. लवादानेच चूक केली असे एकतर्फी मत मांडल्याचे दिसते. सर्व प्रतिसादकांनी (एक दोन अपवाद सोडून देऊ आभाळ कोसळलेल्या सशासारखे धावत कोणतीही माहितीपूर्ण प्रतिसादाची भर न घालता, उगाच जसं काही आम्हाला खूप माहिती आहे, अशा लोकांची मला फार दया येते. एकतर कोणतीही तर्कपूर्ण मांडणी त्यांना करता येत नाही. आणि उगा आरडाओरडा करत धावत असतात. असो,शेरेबाजीबद्दल क्षमा असावी) शांततेने आणि कोणताही आक्रस्ताळेपणा न दाखवता चर्चेत शांतपणे, संयमाने प्रतिसाद लिहित आपला सहभाग नोंदवला त्या सर्वांचे आणि वाचकांचे आभार माणून या धाग्यावरुन मी रजा घेतो. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

नक्की समस्या काय आहे लोकांची? त्यांना हिंदू नावाचा धर्म नाहीये असे सिद्ध करून काय मिळवायचेय? समजा हिंदू धर्म नसेल तर जे लोक आत्ता हिंदू धर्म लावतात, त्यांनी काय लावायचे? मुळात ह्या लोकांना उत्तरे का द्यायची? कामं नसलेले लोक काही प्रश्न उपस्थित करतात आणि बाकीचे सर्व-ज्ञानी असल्यासारखे भांडत बसतात. धर्माची व्याख्या काय आहे लवादाच्या मते? लोक पण उकरून काढत बसतात, २०० वर्षांपूर्वी काय होते? आणि ५०० वर्षांपूर्वी? त्याहून मागे गेले म्हणजे अश्मयुगीन काळात कोणताच धर्म नव्हता. मग आहे का हिम्मत जग निधर्मी करायची? गम्मत म्हणजे, हिंदू नसलेल्या किंवा स्वतःला समाज सुधारक, सेक्युलर किंवा नास्तिक समजणाऱ्या लोकांना फार खाज असते अश्या गोष्टी शोधत बसायची... आंबेडकरांना हिंदू धर्मात काही समस्या वाटल्या आणि ते दुसऱ्या धर्मात गेले कि नाही? नसते विषय काढून चर्चेचे गुऱ्हाळ नाही लावत बसले. तसे हिंदू धर्म न मानणाऱ्यांनी ते ज्याला धर्म मानतात त्यात जावे निघून, अथवा कुठल्याही फॉर्म वर "धर्म: कोणताच नाही" असे लिहावे. कशाला स्वतः त्रास करून घ्यायचा आणि दुसऱ्यांना द्यायचा?

सौदी मध्ये भारतीय मुसलमान यांना "हिंदी मुसलमान" म्हणतात असे कोठेतरी ऐकले होते ... म्हणजे हिंदू = भारतीय का ? म्हणजे सगळे भारतीय हिंदूच का ? म्हणजे सावरकरांनी हिंदू महासभा नसून भारतीय महासभा स्थापन केली असे म्हणायचे का ?

राजेहो...साळपास्न धर्माच्या रकान्या समूर हिंदू असा लिव्हायच असत अस मास्तरांन्नी शिकिवलाय....आन आता हे लवाद का कोण ते अस म्हणतया...मंग खर क काय ब्वो.... तवा आता आम्चा आजा म्हनायचा त्येच खर कि काय....तुह्या मास्तर्ला कव्डिची अक्काल न्हाय..( आसा माहा आजा म्हणायचा बर का )....

दुर्दैवाने भारतीय पासपोर्टमध्ये "धर्म" हा रकाना ऑप्शनल मधे ठेवलेला नाहिय्ये. तो भरणे हा नाईलाजच आहे.

In reply to by विजुभाऊ

येस विजुभाऊ , खरं आहे .... :( मागे एकदा ठाण्यातील कोणत्या तरी वकिलाने स्वतःला " धर्ममुक्त" घोषित करावे अशी याचिका दाखल केली होती पण कोर्टाने ती नाकारली :( वैयक्तिकली हिंदु धर्मातल्या (रादर निधर्मी सरकारने हिंदु धर्मावर लादलेल्या ) कित्येक प्रथा मला अमान्य आहेत , धर्माचा त्याग करुन जायचे कुठे ? माणसाच्या फक्त समाजजीवनावर लक्ष ठेवणारा आणि त्याच्या वैयक्तिक जीवनात अजिबात ढवळाढवळ न करणारा (म्हणजे त्याने काय खावे, काय खाऊ नये , किती लग्न करावीत , बायकोला किती पोटगी द्यावी की देवुच नये , किती मुले काढावीत , इस्टेटीट मुलींना वाटा द्यावा की देवु नये , दारु प्यावी की पुवु नये , हिंसा करावी की करु नये वगैरे गोष्टीं मध्ये कमांडमेन्ट्स न देणारा ) दुसरा कोणताच धर्म मला ठाऊक नाही :(

>>> हिंदु नावाचा धर्मच नाही.... नसू देत. आमचा धर्म हिंदू आहे व आम्ही हिंदू असल्याची किंवा तसे उघडपणे सांगण्याची आम्हाला अजिबात खंत किंवा त्याबद्दल अपराधीपणा वाटत नाही. उलट आम्ही हिंदू असल्याचा व आम्ही हिंदू आहोत हे उघडपणे सांगण्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

हिंदू धर्म आहे किंवा नाही हा फुकाचा वाद आहे ( उगाचच बुद्धिभेद कशाला ) असले किंवा नसेल... साधारण ( ढोबळ मानाने ) पाहता एक विचार/ चालीरीती आणि काही कल्पना मानणारे जे कळप- आहेत जसे कि ख्रिस्त किंवा मुस्लिम तसे हिंदू हा एक "कळप समूह " तर आहे ना ? मग अश्या समूहाला/समाजाला निसर्गाचे आणि देशाचे जे काही नियम असतील आणि फायदे तोटे असतील ते मिलाळायला पाहिजेत . हि बातमी देण्यामागचा आपला खरा हेतू काय हे समजते आहे ...

उदय निधी याने केलेल्या वक्तव्यावर

मत जाणून घ्यायला आवडेल. विशेषकरून 'निर्मूलन' या शब्दाभोवती सगळा जोर दिला जात आहे. म्हणून इथल्या अंनिसवादींची मते समजून घ्यायला आवडेल. सनातन कि हिंदू धर्म आहे कि नाही वगैरे चर्चा त्या अनुषंगाने वळली तर ?

In reply to by शशिकांत ओक

मला वाटतं की धर्माखेरीज आपली प्रत्येकाची एक ठाम मूल्य असतात आणि इतर कोणत्याही रूढी परंपरांपेक्षा आपण त्यांना अनुसरुन आपला जीवनक्रम व्यतीत करीत असतो. आपल्या असण्याचं एकमेव परिमाण म्हणजे या सृष्टीचा भाग असतांनाआपण काय केलं आणि या करण्यामध्ये कोणत्याही धार्मिक कृत्त्यांपेक्षा मानव आणि सृष्टी यांच्यासाठी केलेल्या गोष्टी कायम राहतात.