गाथा 'टायटन' ची - टायटन एज्

मोदक's picture
मोदक in जनातलं, मनातलं
9 Mar 2013 - 12:49 pm

गाथा टायटनची - टायटन एज्

Favre-Leuba या जवळपास ३०० वर्षे जुन्या स्विस कंपनीला विकत घेणे या अचाट गोष्टी केवळ २५ वर्षात घडल्या आहेत यावर कोणाचाही सहजासहजी विश्वास बसणार नाही पण या अविश्वसनीय गोष्टींमुळे मनगटी घड्याळांच्या जागतिक बाजारपेठेमध्ये टायटनने आपले व पर्यायाने भारताचे नाव मानाने कोरले आहे.
"घड्याळांच्या विश्वामध्ये परंपरा न लाभलेल्या भारतासारख्या देशामधील एक नवखी कंपनी हे सगळे अल्पावधीत साध्य करते" ही वस्तुस्थिती टायटनच्या यशाला एक विशेष आयाम प्राप्त करून देते.

या घडामोडींमागे एक द्रष्टा माणूस आहे.

झेरसेस देसाई.

.

ऑक्सफर्डमध्ये शिक्षण सुरू असताना सुट्टीवर भारतात आलेले देसाई (शिक्षण सोडून!) १९६१ साली टाटा ग्रूपमध्ये सहभागी झाले. टाटा केमीकल्स, टाटा इंडस्ट्रीज, इंडीयन हॉटेल्स (ताज) आणि टाटा प्रेस अशा वेगवेगळ्या टाटा कंपन्यांसोबत काम केल्यानंतर १९८५ साली टाटा आणि तमिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या एकत्रीत पुढाकारातून स्थापना झालेल्या टायटन मध्ये त्यांची रवानगी केली गेली, तिथून पुढे १५ वर्षे देसाई आणि टायटन ही नावे एकत्र घेतली गेली.
(झेरसेस देसाई जरी २००२ मध्ये रिटायर झाले असले तरी टायटनच्या आजच्या यशामध्येही त्यांचे योगदान आहे!)

१९८५ साली एका फ्रेंच कंपनीच्या मदतीने टाटांनी घड्याळाच्या क्षेत्रात पाऊल टाकले ते टायटन या नावाने! सुरूवातीला घड्याळाच्या मशीन पासून संपूर्ण घड्याळ तयार करण्यापर्यंत सर्व तंत्रज्ञान फ्रेंच कंपनीने पुरवले. मे १९८७ पासून टायटनने व्यावसायीक उत्पादन सुरू केले व उण्यापुर्‍या पाच वर्षांमध्ये संपूर्ण तंत्रज्ञान, सर्व बारकावे इत्यंभूत अवगत करून घेवून फ्रेंच तंत्रज्ञानापेक्षा उत्तम प्रतीची घड्याळे आपण बनवू शकतो हा आत्मविश्वास कमावला. यानंतर दोन वर्षे अविरत संशोधन करून टायटन ने आपले स्वतःचे पहिलेवाहिले मशीन (Watch Movement) बनवले. जागतीक मानांकनाच्या सर्व चाचण्या या मशीनने पार पाडल्या. आता टायटन घड्याळे भारतीय प्रमाणवेळ "भारतीय" मशीनने दाखवू लागले. हे साल होते १९९३-१९९४. यादरम्यान आलेली टायटनची घड्याळे जर कोणाला आठवत असतील तर हे सहज लक्षात येईल की ही घड्याळे बटबटीत व आजच्या तुलनेने बेढब असली तरी हळूहळू लोकप्रिय होत होती. एचएमटी व त्या दरम्यानच्या बाकीच्या घड्याळांच्या तुलनेमध्ये टायटनचे नाव अल्पावधीमध्ये वेगाने घोडदौड करत होते.
(१९९३-९४ च्या दरम्यान टाटा ग्रूपने नवीन अध्यक्ष रतन टाटांच्या नेतृत्वाखाली एकसंधतेकडे वाटचाल सुरू केली होती. टाटा ग्रूप अजून एकसंध झाला नसल्याने टायटन च्या डोक्यावर असलेला टाटांचा हात जाहिरातींमधून दिसावा तितका दिसला नव्हता. त्यामुळे "टायटनच्या त्यावेळच्या यशामध्ये टाटा फॅक्टरचा फारसा वाटा नसावा, संपूर्णपणे गुणवत्तेवर व एचएमटीच्या तुलनेमध्ये वेगळे व सुंदर असण्यामुळे टायटनने बाजी मारली असावी" - हा माझा अंदाज आहे!)

घड्याळांच्या विश्वामध्ये काही ठोकताळे आहेत, कित्येक वर्षे यांमध्ये काही बदल झाले नाहीयेत. जगातल्या कोणत्याही क्षेत्रात कितीही सुधारणा झाली व कोणत्याही देशाने कितीही प्रगती केली तरी घड्याळांच्या विश्वामध्ये अंतीम शब्द हा 'स्विस' घड्याळांचा. स्विस डिझाईन्स, स्विस तंत्रज्ञान आणि स्विस दबदबा. या दबदब्याला आजपर्यंत आव्हान मिळालेले नव्हते. जगातली यच्चयावत सर्व घड्याळे स्विस घड्याळांवरून प्रेरीत असतात आणि लेडीज घड्याळे ही जेंट्स घड्याळांची छोटी आवृत्ती असते. हा अलिखीत नियम वर्षानुवर्षे चालत आला होता. टायटनची सुरूवातीची घड्याळे याला अपवाद नव्हती. सुरूवातीची घड्याळे,

.

स्वित्झर्लंडमधल्या "Fleurier Quality Foundation" या Indipendent Horological Testing Agency कडे ही घड्याळे रवाना केली गेली. अतीउष्ण तापमान, अतीथंड तापमान, तापमानातील अचानक बदल अशा अनेक चाचण्यांसोबत शॉक टेस्ट, बंप टेस्ट, ड्रॉप टेस्ट अशा अनेक चाचण्या यशस्वीपणे पार पाडून टायटन एज् ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले, वापरण्यायोग्यतेच्या प्रमाणपत्रासह टायटन एज् 'वॉटर रेझिस्टंट' आहे असेही प्रमाणपत्र मिळाले. या चाचण्या लीलया पार पाडण्यामागेही टीम टायटनची एक हुषारी कारणीभूत होती. टेस्टसाठी घड्याळे पाठवण्याआधी 'इन हाऊस टेस्टींग सेंटर' मध्ये त्यांची अत्यंत खडतर प्रकारे परिक्षा घेतली गेली होती. आणि त्या परीक्षा यशस्वी पार पाडल्यानंतरच पुढची पाऊले उचलली गेली. वॉल टेस्ट (घड्याळ भिंतीवर फेकून मारणे), फ्लोअर टेस्ट (वेगवेगळ्या दिशेने घड्याळ जमिनीवर पाडणे), पूल टेस्ट (घड्याळ एका स्विमींग पूलमध्ये बुडवून ठेवणे) आणि बेंगलोर-होसूर रोड टेस्ट (गाडीच्या मागच्या शॉक अ‍ॅब्सॉर्बरला घड्याळ बांधून बेंगलोर-होसूर मधला २०० किमीचा खड्ड्यांचा रस्ता अनेकदा पार करण्यात आला) या चमत्कारीक टेस्ट करण्यामागे बी.जी द्वारकानाथांचा साधा विचार कारणीभूत होता. एजन्सीमध्ये केल्या जाणार्‍या टेस्ट्मध्ये "रिअल लाईफ सिच्यूएशन" तयार करता येत नाही.
मजेदार गोष्ट म्हणजे टायटन एज् ने याही चाचण्या व्यवस्थीत पार पाडल्या.

अत्यंत शांतपणे कोणताही गाजावाजा न करता बाजारपेठेमध्ये आलेल्या या "Slimmest Water Resistant Watch" ने भारतातच नव्हे तर जगभरात आपला ठसा उमटवला.

टायटन एज्

.

टायटन एज् ची दुसरी पिढी..

.

१७ व्या शतकापासून सुरू असलेल्या या घड्याळांच्या विश्वामध्ये प्रवेश करून, स्थापनेपासून पंचविशी दरम्यान 'जगातली पाचव्या क्रमांकाची घड्याळ उत्पादक कंपनी' ही टायटनने मारलेली मजलही एज् च्या कथेप्रमाणे अचाटच!

पुढील भागात पाहूया टायटनने भेट दिलेली अशीच एक सुंदर कलाकृती..

*****************************************************************
ओमेगा आणि इतर कंपन्यांनी टायटन एज् इतकीच किंवा त्याहूनही स्लिम घड्याळे तयार केली आहेत, परंतु ती घड्याळे वॉटर रेझिस्टंट नाहीयेत आणि ती दैनंदिन वापरायोग्य नाहीयेत.
*****************************************************************
लेखातली बरीचशी माहिती "Making Breakthrough Innovation Happen" या पुस्तकातून, ही प्रताधिकारीत माहिती लेखामध्ये वापरण्यासाठी दिलेल्या परवानगी बाबत लेखक 'पोरस मुन्शी' यांचे आभार.

पुस्तकातील मूळ लेखाचे सर्व हक्क "EREHWON Innovation Consulting" या कंपनीकडे. EREHWON Innovation Consulting चे श्री राजीव नारंग यांचेही आभार.

सर्व प्रकाशचित्रे अंतर्जालावरून साभार.

*****************************************************************

मांडणीतंत्रअभिनंदनमाहिती

प्रतिक्रिया

अमोल खरे's picture

9 Mar 2013 - 12:59 pm | अमोल खरे

सुंदर लेख. माझे घड्याळ एच.एम.टी चे आहे. पण पुढील घड्याळ टायटनचेच घेणार आहे.

अभ्या..'s picture

9 Mar 2013 - 1:20 pm | अभ्या..

इंग्लिश वर्तमानपत्रात, मॅगझीनमध्ये रोलेक्स, टिस्सो च्या फुल पेज कलर अ‍ॅड दिसायच्या. नंतर त्याच्या किंमती कळल्यावरच ती घड्याळे जाहिरातीतच राहायची. टायटन सोनाटा टायमेक्स फास्टट्रॅक निदान आमच्या आवाक्यातले तरी.
शेवटी इडीयट आमीरबाबाचंच पटतं. "मेरी ढाईसौ की है पर वक्त तो वही दिखाती है यार"
असो. छान आणि माहितीपूर्ण लेख मोदकराव.

इरसाल's picture

9 Mar 2013 - 1:22 pm | इरसाल

लेख आवडला.

आता झैरातः

माझ्याकडे एक टायटन, एक टाइमेक्स आणी एक स्वीस मिलीटरी क्रोनो(वर्जिनल स्वीसमधुन घेतलेले) असे तीन घड्याळे आहेत.

मृत्युन्जय's picture

9 Mar 2013 - 1:34 pm | मृत्युन्जय

खुप सुंदर. लेखाबद्दल धन्यवाद.

टायटन बद्दल नेहमीच अभिमान वाटत आला आहे. सध्या टायटनचे एक नितांत सुंदर घड्याळ वापरतो आहे (बायकोने भेटे दिलेले). ते घातल्यावर अनेकांनी (गोरे इन्क्ल्युडेड) नाइस वॉच अशी टिप्पणी केली. आणि परदेशी बनावटीचे असेल अशीच त्यापैकी बहुतेकांची धारणा होती. घड्याळ टायटन या भारतीय कंपनीचे आहे हे ऐकुन त्यांना कौतुकही वाटले. त्यापैकी बर्‍याचदा मी टायटन कशी ऐ भारी आहे हे लोकांना सांगितले.

टायटनचे एक अतिशय सुंदर घड्याळ माझ्याकडे १९९५ पासुन आहे. अतिशय स्टायलिश. तु जे म्हणालास की त्या सुमाराची त्यांची घड्याळे बटबटीत होती त्या विधानाला छेद देणारे. ते अल्ट्रास्लिम नसले तरी बरेच स्लिम आहे. आणि तेही असेच बर्‍याच जणांना आवडते. अजुन उत्तम टिकुन आहे.

हे सगळे सांगण्याचा उद्देश हाच की टायटन फक्त एक नाव नाही आहे तर तितकाच उत्तम दर्जा आणि गुणवत्ता देखील आहे. आणि हे सगळे महागड्या परदेशी बनावटीच्या घड्याळ्यांच्या अर्ध्या किमतीत.

मोदकराव, (नेहेमीप्रमाणेच) झकास लेख!

टायटन एज, नॅनो असे प्रकल्प करणार्‍या टाटा उद्योगसमूहाचा मला भारतीय म्हणून अभिमान वाटतो. आपल्या कर्मचार्‍यांची काळजी घेणं कशाला म्हणतात हे टाटा ग्रूपच्या एका कंपनीत वर्षभर नोकरी केल्यावर समजलं.

सायरस मिस्त्रींच्या अध्यक्षतेखाली टाटा समूह नवीन पावलं टाकतो आहे. भारतात नव्याने आलेलं स्टारबक्स "टाटा टी"च्या भागीदारीत आलं आहे. कालपरवाच्याच पेपरमध्ये एअर एशिया या मलेशियन कंपनीबरोबर टाटा समूह विमानसेवा क्षेत्रात येत आहे अशी बातमी आहे.

अवांतरः
एअर इंडिया ही मूळची जेआरडी टाटांनी काढलेली कंपनी. राष्ट्रीयीकरणाच्या समाजवादी उन्मादात जेआरडींकडून अत्यंत अपमानास्पद पद्धतीने एअर इंडिया हिसकावून घेतलं गेलं. आता टाटा पुनश्च विमानक्षेत्रात आल्यावर एक वर्तुळ पूर्ण होईल.

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2013 - 2:18 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला..
पूर्वी टायटनचे घड्याळ म्हणजे लै भारी.. असेच वाटायचे.
मी ९० साली पहिल्या पगारातून टायटनचे एक सोनेरी डायल आणि पट्ट्याचे घड्याळ घेतले होते.
आता अगदी फॉसिल्स,टीसॉ पासून सगळ्या प्रकारची घड्याळे असूनही ते घड्याळ मनाच्या खूप जवळ आहे.
स्वाती

प्यारे१'s picture

9 Mar 2013 - 2:36 pm | प्यारे१

नेहमीप्रमाणे अभ्यासू लेख.

प्रेझेन्टेशन आवडले. लगे रहो!

प्रचेतस's picture

9 Mar 2013 - 3:47 pm | प्रचेतस

+१

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2013 - 9:55 pm | अत्रुप्त आत्मा

+२ .......... मोदू दी ग्रेट :-)

दादा कोंडके's picture

9 Mar 2013 - 3:10 pm | दादा कोंडके

माझ्या आवडीचा विषय.

दोनशे स्विस फ्र्यांक्स देउन घेतलेल्या घड्याळ्याएव्हडाच फास्ट ट्र्याक जास्त रोबस्ट आहे असा वयक्तीक अनुभव आल्यानं, चार वर्षापुर्वी फॉसिल, डिझल, पोलिस, सिको यांच्यागर्दीतून 'रोव्हर्स अँड लेक्स' घेतला होता. अजुनही तोच वापरतोय.

अक्षया's picture

9 Mar 2013 - 3:18 pm | अक्षया

नेहमीप्रमाणेच अभ्यासपुर्ण आणि माहितीपुर्ण लेख.
धन्यवाद. ;)

सोत्रि's picture

9 Mar 2013 - 3:25 pm | सोत्रि

एकदम खास लेख!

- (घड्याळ्याच्या काट्यांवर चालणारा) सोकाजी

स्पंदना's picture

12 Mar 2013 - 5:58 am | स्पंदना

घड्याळ्याच्या काट्यांवर चालणारा

काटा मोडेल ना?

अत्रन्गि पाउस's picture

9 Mar 2013 - 3:33 pm | अत्रन्गि पाउस

सुंदर!!! आणखीन येवू द्यात!!

छान लेख! खूप छान माहिती दिली आहे.

मस्त लेख, ट्यं ट्यं टं ट्यं टंय टं ट्यं, छे, ती धुन लिहुन देता येणारच नाही निदान मलातरी, कुणाकडं त्याची रिंगटोन आहे का ? लई भारी जाहिराती होत्या, विशेषतः मुलीच्या लग्नातली.

बाकी मोदकराव, धन्यवाद तुम्ही सोडुन आम्हाला अशी माहिती कोण देणार नाहीतर. एवधी विंग्रजी पुस्तकं वाचुन समजावुन घेण्याचं काम करणारा मेंदुचा भाग आम्ही फक्त पासबुकं अन फॉर्म १६ वाचायला वापरतो. खरंच धन्यवाद.

मोदक's picture

9 Mar 2013 - 4:39 pm | मोदक

धन्यवाद..

माझ्याकडे आहे ती रिंगटोन.

( लाईफबॉयची पण होती. परवा एक अ‍ॅप्लीकेशन डिलीटताना एक आख्खा फोल्डर गेला त्यात ती गेली :-( )

ती नितांतसुंदर रिंगटोन म्हंजे मोझार्ट या जगप्रसिद्ध संगीतकाराच्या २५ वी सिंफनीमधील एक पार्ट होय.

यूट्यूब दुवा.

साधारण १ मिनिट ३० सेकंद झाले की मग ती चिरपरिचित ट्यून येते. एंजॉय!!

अभ्या..'s picture

9 Mar 2013 - 8:13 pm | अभ्या..

टायटनच्या पहिल्या टीव्ही कमर्शिअलमध्ये एक ऑर्केस्ट्राच ही सिंफनी वाजविताना दाखवला होता. प्रियकर प्रेयसीला सरप्राइज गिफ्ट म्हणून टायटन देतानाची ती ब्लॅक न व्हाईट अ‍ॅड लैच भारी होती. विशेषतः त्यातली ती लिरीन असे काहीतरी नाव असलेली लै भारी डोळ्याची सावळी मॉडेल. ती परत दिसलीच नाही. :(

आर्केष्ट्रा आठवला, पण लिरीन कै आठवत नैये.

श्री ब्याटम्याना,

टायटनच्या अ‍ॅड चिकटवता का इथे..?

तूनळीचे दुवे चिकटवा जमले तर.

इरसाल's picture

9 Mar 2013 - 4:27 pm | इरसाल

एक ऑब्झर्व्हलं का? एज मधे डे आणी डेट नाहीत.

हो. त्याहून महत्त्वाचे, एज् मध्ये सेकंदकाटा सुद्धा नाहीये. ;-)

घड्याळाची जाडी कमी करताना ज्या ज्या गोष्टींना वगळण्यात आले त्या या सर्व!

धन्या's picture

9 Mar 2013 - 4:47 pm | धन्या

भन्नाट...

एकदम हटके लेख...

एकदम मस्त माहितीपूर्ण लेख. आमिर खानच्या टायटनच्या सर्व जाहिरती एकदम आवडत्या आहेत...!!
असेच अजून छान माहितीपूर्ण लेख लिहीत राहा. :)

कवितानागेश's picture

9 Mar 2013 - 5:21 pm | कवितानागेश

मस्तच माहिती. :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Mar 2013 - 5:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

उत्तम लेख...!! :)

चौकटराजा's picture

9 Mar 2013 - 6:32 pm | चौकटराजा

आमचे टायटनचे हाय . तक्राद येकच की त्यात फकस्त २४ कलाकच हायत. जादात जादा सात वार हायत आन येकतीस तारका हैत. जरा वाईच वाडावून द्या ना राव !
मो भौ , लेख उत्तम !

लेख छान झालाय. टायटन प्रकरण नेहमी झोकात जाहिराती करायचे. मला नवर्‍याने दोन टायटन घड्याळे दिली. एक रोजच्या वापराला तर एक ब्रेसलेटसारखे दिसणारे. नंतर आणखी प्रकार घेतले पण टायटन ते टायटन! मैत्रिणीला कशाचे तरी बक्षिस म्हणून तिच्या वडीलांनी चौकोनी आकाराचे मरून रंगाचे घड्याळ दिले होते (शंकरपाळीसारखे मनगटावर बसणारे). त्यावेळी भयंकर भारी वाटलं होतं. तीही सगळ्यांना दाखवत होती. तुझ्या लेखामुळे आठवण आली.

मोदका, मस्त प्रेझेंटेशन रे!! घड्याळद्वेष्ट्या मलाही एखादे टायटन घड्याळ घालावे असे आता वाटू लागलेय.

मनोरंजक आणि ज्ञानवर्धक धाग्याबद्दल मोदकरावांचे आभर.
"स्विस हे करू शकत नाहीत म्हणजे आपणसुद्धा हे करू शकणार नाही" या विचारधारेला त्यांनी उत्तर दिले..
"स्विस एखादी गोष्ट करू शकत नसतील तर तीच गोष्ट आपण करून दाखवूया!" या विचारधारेने.

जबरदस्त मानसिकता जी आभावानेच आढळते. टिम टायटनला मानाचा मुजरा.

अवांतरः- माझ्या लग्नात भेट मिळालेल टायटनच घड्याळ मी गेली १६ वर्षे वापरतो आहे.
बायको अधुन मधुन बिघडते, वर्शातुन एक दोन वेळा माहेरी सर्वीसिंग साठी/ ब्रेन वाशिंग साठी पाठवाव लागत.कधी कधी जास्त चावी भरल्याने जोर जास्त असतो. ;-) त्या मुळे आपलीच वेळ भरते पण अश्या बाका प्रसंगातुन वेळ मारुन न्यायला अनुभवातुन शिकलो आहे. घड्याळ अद्याप एकदाही बिघडल नाही की सर्वीसिंग नाही. केवळ सेल बदलले की काम चालु. बायकोचे नव्या नवलाईचे नवरंग उडाले पण घड्याळाच प्लेटींग अजुनही टकाटक आहे.

दादा कोंडके's picture

9 Mar 2013 - 7:36 pm | दादा कोंडके

अवांतर मस्तच. :))

सुबोध खरे's picture

9 Mar 2013 - 7:53 pm | सुबोध खरे

माझ्याकडे ची चार घड्याळे आहेत चारही भेट मिळालेली.एक वडिलांनी एक बायकोने एक भावाने आणि एक हिरानंदानी रुग्णालयाच्या कर्मचारी वर्गाने.मला सुद्धा टायटन एज घड्याळे फारच आवडली होती पण त्यात सेकंद काटा नाही( डॉक्टर असल्याने ती एक आवश्यक गोष्ट आहे- नाडी चे ठोके पाहण्यासाठी). शेवटी मी सासर्यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर भेट देऊन ते विकत घेण्याची हौस भागवून घेतली. टायटन ची घड्याळे फारच छान आहेत आणि त्यामुळे मी स्विस वगैरे च्या नादाला कधीच लागलो नाही.
मी आयुष्यात फक्त एक घड्याळ स्वतः च्या पैशाने विकत घेतले casio चे क्रोनोग्राफ इलेक्ट्रोनिक (४०० रुपये फक्त) ते सुद्धा फार वर्षे ( १० वर्षे झाल्यावर) नौदलात राहून आपल्या मनगटावर काळे घड्याळ असावे हि इच्छा पूर्ण करण्यासाठी (पांढऱ्या गणवेशावर चांगले दिसते म्हणून).गमतीची गोष्ट अशी कि ते घेण्यासाठी मी फार वर्षे विचार केला आपल्याकडे २ घड्याळे आहेत( वडिलांनी आणि भावाने दिलेली) तर उगाच का पैसे घालवा. पण एक दिवस बायकोने साडी घेण्याचा आग्रह केला तेंव्हा मी विचार केला आपल्या बायकोकडे ४०-५० साड्या आहेत तरी तिला अजून एक साडी नको असे वाटत नाही तर मी फक्त ४०० रुपयासाठी एवढा विचार का करीत आहे? त्याच दिवशी जाऊन मी वरील घड्याळ (casio चे) विकत घेतले .

सुबोध खरे's picture

9 Mar 2013 - 7:54 pm | सुबोध खरे

माझ्याकडे टायटन ची चार घड्याळे आहेत

महाबळ's picture

10 Mar 2013 - 12:30 am | महाबळ

खूपच मस्त झालाय लेख. HBR ची एखादी केस मराठीत वाचलल्यासारखा आनंद मिळाला.
टायटन बद्दल बोलायचं तर Real value for money म्हणतात तशी उत्पादनं असतात सर्व.

अभ्या..'s picture

10 Mar 2013 - 1:51 am | अभ्या..

"टायटनच्या त्यावेळच्या यशामध्ये टाटा फॅक्टरचा फारसा वाटा नसावा, संपूर्णपणे गुणवत्तेवर व एचएमटीच्या तुलनेमध्ये वेगळे व सुंदर असण्यामुळे टायटनने बाजी मारली असावी"

असहमत.
टायटन हा टाटाचा ब्रँड आहे हे आधी जरी ओरडून सांगत नसले तरी बर्‍याच ग्राहकांना कल्पना होती. एचेमटी ची भारतीय नावाची मॉडेल (कैलास, प्रकाश, निशांत) ज्यावेळी चांगली खपत होती त्यावेळी बाजारात एलसीडी वाली डिजीटल वॉचेस अवतरली. बघता बघता त्याच्या किंमती शाळकरी मुलांना सुध्दा परवडतील एवढ्या झाल्या (तोपर्यंत वडीलांचे फावरल्युबा नायतर एचेमटी घालूनच मुले दहावीची परीक्षा देत) डीजीटल घड्याळांच्या या चीप आणि किलोकिलोनी येणार्‍या गोंधळात टायमेक्स आणि टायटन आले. कमी रेटमधल्या गोल्डप्लेटेड आणि स्टील फिनेशेसनी टायटन ब्रँड सेट झाला. मध्येच मॅक्सिमा ट्रेन्डी(टायमेक्स) सारख्या ब्रँडने पण वॉटरप्रुफ स्पोर्ट्स घड्याळानी मार्केट मारले. आता तो फास्टट्रॅकचा ग्राहक आहे.
टायटनच्या सगळ्या कमर्शिअल पहिल्यापसूनच प्रथितयश जाहिरात कंपन्यानी तयार केल्या आहेत. आधी टायटनच्या अ‍ॅड सामान्यांना घेऊनच होत्या. सिनेसेलिब्रिटीला ब्रॅन्ड अँबेसेडर घ्यायची पहिल्यापासून वॉच कमर्शिअल्स ची क्रेझ आहे. आमीर खान, रानी मुखर्जी, कॅट्रीना फार नंतर आले.

चौकटराजा's picture

10 Mar 2013 - 4:17 am | चौकटराजा

यापण माहितीबद्द्ल धन्यवाद ! बाकी सेलेब्रेटीपासून लांब रहाणारे म्हणजे बजाज आटोच ! ( अपवाद सचिन )

सुधीर's picture

10 Mar 2013 - 9:31 am | सुधीर

परीक्षेचे दिवस सोडले तर मनगटी घड्याळ (ते ही बाबांचं जुनं) फारसं वापरलं नाही. मनगटी घड्याळाविषयी पॅशन (ओढ) नसल्यामुळे भेट मिळालेलं टायटनचं एक चांगलं घड्याळ असंच पडून राहतं.

सुधीर's picture

10 Mar 2013 - 9:35 am | सुधीर

टायटन मधल्या गुंतवणुकीमुळे आपल्याला खूप फायदा झाला असं राकेश झुनझुनवाला यांनी मागे एकदा वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटल्याचं आठवतं. अंदाज होताच, लेख वाचल्यावर अधिक माहिती कळली.

माहितीपूर्ण आणि सुरेख लेख. आवडला
अवांतरः प्रत्येक घड्याळाच्य जाहिरातीत १० वाजून १० मिनीटे हिच वेळ का असते? याचे काही कारण आहे का?

मोदक's picture

10 Mar 2013 - 10:28 am | मोदक

धन्यवाद..

१० वाजून १० मिनीटे

या गोष्टीला मार्केटींगची एक युक्ती इतकेच कारण असावे. लोगो व्यवस्थीत दिसणे, दोन्ही काट्यांच्या व सेकंद काट्याच्या (७ वर असलेल्या) सहाय्याने एक हसरा चेहरा तयार करणे वगैरे वगैरे...

तशा अनेक थिअरीज आहेत याबद्दल. परंतु वरील कारण अनेक ठिकाणी वाचलेले आठवते आहे.

लाल टोपी's picture

10 Mar 2013 - 8:23 pm | लाल टोपी

अशीच माहिती वाचली आहे. धन्यवाद..

यसवायजी's picture

17 Mar 2013 - 12:19 am | यसवायजी

छोटा काटा दहावर अन मोठा काटा दोनवर म्हणजे right 'राईट टाईम'.
अशी पण एक थिअरी ऐकलीय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2013 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे मोदका, लेख माहितीपूर्ण आहे. आवडला.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2013 - 10:44 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर अभ्यासपूर्ण लेख...

भारतीय प्रतिमेला अनेक क्षेत्रांत जगात उंचवण्याचे काम टाटा ब्रँडने जेवढे केले आहे ते इतर कोणत्याही कंपनीला अजून तरी जमलेले नाही.

वैशाली हसमनीस's picture

10 Mar 2013 - 2:13 pm | वैशाली हसमनीस

वरीलप्रमाणेच म्हणते मी.

तुमचा अभिषेक's picture

10 Mar 2013 - 2:28 pm | तुमचा अभिषेक

सुंदर लेख

माझे टायटन घड्याळ बायकोने जेव्हा ती गर्लफ्रेंड होती तेव्हा गिफ्ट केलेले, लग्नातही तेच घातलेले तर फोटोग्राफरने खास त्या घड्याळाची तारीफ करत मुद्दाम ते घड्याळ उठून दिसेल अश्या पोजमध्ये १-२ फोटो काढले. आजही तीन वर्षांनी कोणाचीही त्या घड्याळावर पहिली नजर पडते तेव्हा तारीफ करतातच करतात.

आमच्या घरात माझेच नाही तर सर्वांचेच टायटन.
नुकतेच बायकोच्या बहिणींना वाढदिवसाचे गिफ्ट सुद्धा टायटनचे घड्याळच दिले.
तर आम्ही टायटन फॅमिली आहोत बोलायला हरकत नाही.

दिपक.कुवेत's picture

10 Mar 2013 - 4:19 pm | दिपक.कुवेत

ध्न्यवाद मोदक. तुझ्या अभ्यासपुर्ण लेखांमुळे बरिच नविन माहिती कळते. टायटन अजुन वापरलं नाहिये पण आता नक्कि विकत घेईन. ईकडे वेस्टर्न कंपनीची पण अशीच घड्याळे (स्लीम) मिळतात त्यांनी पण टायटनची कॉपी केली असेल का?

ईकडे वेस्टर्न कंपनीची पण अशीच घड्याळे (स्लीम) मिळतात त्यांनी पण टायटनची कॉपी केली असेल का?

दिपकजी..

ती घड्याळे किती साली तयार झाली आहेत आणि त्यांची मोजमापे यावरून कळेल.

मॉडेल नंबर आणि कंपनीचे नाव दिल्यास मी शोधण्याचा प्रयत्न करेन..

पैसा's picture

10 Mar 2013 - 4:21 pm | पैसा

आणखी एक मोदक स्पेशल! रतन टाटांच्या कारकीर्दीत टाटा ग्रुप खर्‍या अर्थाने जागतिक झाला आणि असे अनेक प्रतिष्ठित ब्रँड्स त्यांनी विकत घेतले. इंग्लंडातली Corus आणि Jaguar Land Rover घेतल्या तेव्हा ब्रिटिशांविरुद्ध सूड पुरा झाला असे आमच्यासारख्या अनेकांना वाटले.

सानिकास्वप्निल's picture

10 Mar 2013 - 5:36 pm | सानिकास्वप्निल

लेखाबद्द्ल काय बोलायचे नेहमीप्रमाणे उत्तम , माहितीपूर्ण लेख :)

किसन शिंदे's picture

11 Mar 2013 - 12:20 am | किसन शिंदे

माहितीपुर्ण लेखन!

मन१'s picture

11 Mar 2013 - 9:28 am | मन१

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.

मदनबाण's picture

11 Mar 2013 - 9:43 am | मदनबाण

सुंदर लेखन ! :)
माझ्या पगारातुन मी माझ्यासाठी विकत घेतलेली पहिली वस्तु म्हणजे याच टायटने एक घड्याळ. :)
मला रोमन आकडे नसलेल आणि स्टर्डी लुक असलेल प्लेन डायलच घड्याळ होत...आणि ते तसंच टायटनच्या शोरुम मधे मिळाले.

जाता जाता :--- हल्ली चायनीज घड्याळ्यांचा सुळसुळाट झाला आहे,जवळपास प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर किंवा रेल्वे ब्रीजवर अनेक लोक असली चायनामेड घड्याळ विकतांना सहज आढळुन येतील.१००रु मिळाणारी ही चायनीज घड्याळे अनेकांना मोहात पाडतात. :)

हरिप्रिया_'s picture

11 Mar 2013 - 6:17 pm | हरिप्रिया_

अप्रतिम लेख!!! आणि नेहमीप्रमाणे अतिशय माहितीपूर्ण!!

त्या जुन्या जाहिरातींना शोधायला गेले आणि एक मस्त विडीओ मिळाला

जुइ's picture

11 Mar 2013 - 8:15 pm | जुइ

उत्तम व माहितीपूर्ण लेख !!

गणपा's picture

11 Mar 2013 - 9:52 pm | गणपा

झक्कास लेख रे मोदका.

माझ्या दिराने मुलीला असच अगदी स्लीम टायटन घड्याळ भेट म्हणुन दिल होतं. परवा त्याचा सेल चेंज करायला गेले तर त्या बथ्तड माणसाने बिघडवुन दिलं. असा राग आलाय ना..

मोदक अगदी सुरेख अन अभ्यासपूर्ण लेख. आवडला.

पाषाणभेद's picture

13 Mar 2013 - 6:15 am | पाषाणभेद

फारच सुंदर लेख मोदक, नविन माहीती मिळाली.

तर्री's picture

13 Mar 2013 - 9:07 am | तर्री

परिपूर्ण सुंदर ,अभ्यास पूर्ण मांडणी ! लेख आवडला.

बॅटमॅन's picture

15 Mar 2013 - 7:19 pm | बॅटमॅन

आईशप्पथ!!! लैच भारीये हे :)

अतिशय धन्यवाद, आणि बॅमॅ तुला सुद्धा. खरडवहीतल्या लिकेबद्दल.

खुप छान आणि माहितीपुर्ण लेख.... धन्यवाद :) आता भारतात गेल्यावर अजुन एक टायटनच्या घड्याळाची खरेदी पक्की. ;)

टपरी's picture

15 Mar 2013 - 9:51 pm | टपरी

fastrack

चिगो's picture

15 Mar 2013 - 11:03 pm | चिगो

अगदी टायटनच्या ट्युनसारखाच.. आवडला..
अवांतर : टायटन ट्युन गिटारवरही अत्यंत सुरेल वाटते ऎकायला..

तपशीलवार लिखाणात तुझा हातखंडा आहे.. हेच खरे.. :)

मालोजीराव's picture

16 Mar 2013 - 8:39 pm | मालोजीराव

मोदका डोळ उघड्लस की रे...नेक्स घड्याळ टायटनच

श्रिया's picture

16 Mar 2013 - 11:33 pm | श्रिया

मस्तच लिहिलंय! काही वस्तूंच्या ब्रँड्समध्येहि भावना गुंतलेल्या असतात, त्यपैकी एक "टायटन".

आता खरेदीच्या यादीमध्ये टायटनची भर पडली. गेली कित्येक वर्षे घड्याळ वापरणेच सोडून दिले होते, तेव्हा आता मोदकाच्या धाग्याचा मान म्हणून एक टायटन घड्याळ खरेदी करेन.