बेरीज

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
4 Feb 2013 - 11:55 pm

पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी
झेलण्या केले खुले काळीज मी

भेटुनी जाते त्सुनामीसारखी
मिरवतो आयुष्यभर ती झीज मी

आज स्वप्नांनो, नको तसदी मला
काल कवडीमोल विकली नीज मी

पूर्णता नाही तुला माझ्याविना
मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी

ठरवले आहेस तू उत्तर तुझे,
की चुकीची मांडतो बेरीज मी?

-- उपटसुंभ

मराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

अधिराज's picture

5 Feb 2013 - 12:02 am | अधिराज

खूप मस्त कविता आहे. आयला प्रेयसी म्हणावी का नैसर्गिक आपत्ती (वीज,त्सुनामी)

क्रान्ति's picture

5 Feb 2013 - 12:14 am | क्रान्ति

एकेक शेर अस्सल मोती!

आनन्दिता's picture

5 Feb 2013 - 12:38 am | आनन्दिता

जबरदस्त!!

पण काहीही म्हणा फार वादळी दिसतेय तुमची प्रेयसी...

जेनी...'s picture

5 Feb 2013 - 12:48 am | जेनी...

खरच भारीये

वोल्कॅनो अ‍ॅडवला असता तर प्रेयसीला अजुन एक उपमा मिळुन
अजुन दोन लाइनी वाढल्या असत्या कि ...

बाकि लाजवाब !

शुचि's picture

5 Feb 2013 - 1:02 am | शुचि

फार आवडली कविता.

अनुप कुलकर्णी's picture

5 Feb 2013 - 5:22 am | अनुप कुलकर्णी

पूर्णता नाही तुला माझ्याविना
मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी

मी दोनदा आलय हो..

बाकी खतरनाक!

अनुप, मी तरी तुझ्याशिवाय 'मी' म्हणून कुठे पूर्ण होतो? असं म्हणायचं असावं त्यांना.

इन्दुसुता's picture

5 Feb 2013 - 7:28 am | इन्दुसुता

गझल अतिशय आवडली

किसन शिंदे's picture

5 Feb 2013 - 7:38 am | किसन शिंदे

मस्तच!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Feb 2013 - 7:48 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर गझल.
आवडली.

पैसा's picture

6 Feb 2013 - 12:22 pm | पैसा

सुरेख रचना.

दत्ता काळे's picture

6 Feb 2013 - 4:46 pm | दत्ता काळे

आज स्वप्नांनो, नको तसदी मला
काल कवडीमोल विकली नीज मी
.. अप्रतिम

चाणक्य's picture

6 Feb 2013 - 5:07 pm | चाणक्य

पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी
झेलण्या केले खुले काळीज मी

पहिलाच शेर ताकदीचा झालाय..

भेटुनी जाते त्सुनामीसारखी

त्सुनामी हा शब्द काव्यात खटकला...पण ते माझं वैयक्तिक मत झालं

आज स्वप्नांनो, नको तसदी मला
काल कवडीमोल विकली नीज मी

जियो.. शेरची दुसरी ओळ ही जबरदस्त परिणाम करणारी असावी लागते. हा शेर (आणि शेवटचा ही) याला उत्तम प्रमाण आहे

पूर्णता नाही तुला माझ्याविना
मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी

'मी' दोनदा आल्यामुळे आगाऊपणा करून असे सुचवतो -

पूर्णत्व नाही तुला माझ्याविना
असूनही नाही तुझ्याखेरीज मी

बाकी तुमच्या रचना एकदम तंत्रशुद्ध असतात.

प्रसाद गोडबोले's picture

6 Feb 2013 - 5:15 pm | प्रसाद गोडबोले

वाह ! गजल आवडली !!

त्सुनामी , बेरीज हे दोन शेर भारी वाटले !!