पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी
झेलण्या केले खुले काळीज मी
भेटुनी जाते त्सुनामीसारखी
मिरवतो आयुष्यभर ती झीज मी
आज स्वप्नांनो, नको तसदी मला
काल कवडीमोल विकली नीज मी
पूर्णता नाही तुला माझ्याविना
मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी
ठरवले आहेस तू उत्तर तुझे,
की चुकीची मांडतो बेरीज मी?
-- उपटसुंभ
काव्यरस
वाचने
2748
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप मस्त कविता आहे. आयला
अप्रतिम!
जबरदस्त!!
खरच भारीये
फार आवडली कविता.
पूर्णता नाही तुला माझ्याविना
अनुप, मी तरी तुझ्याशिवाय 'मी'
In reply to पूर्णता नाही तुला माझ्याविना by अनुप कुलकर्णी
गझल अतिशय आवडली
मस्तच!!
मस्तच
छान
गझल आवडली
मस्त गझल
त्सुनामी