तडकलेली स्वप्न काच
पायात् रुतलेली
अन पाऊल पुढं टाकता टाकता
माझी मी खचलेली
एक फ़र्लांगभर दूर
एका मंदिरातला घंटानाद
ऐकुन ,पुन्हा
माजघरात रडत बसते
फ़ुटेस्तोवर ऊर
मापं ओलांडल्याच्या
पाऊलखुणा
अजुनही घाबरवतात
थोडी जरा मागे फ़िर
बजाऊन किंकाळतात
चौकटितल्या आत
एक देवघर
देवघरातली ज्योत
पाठीवर हात फ़िरवताना
सांगत असते.....बाईचं जिणं
असच असतं
मापाच कलंडण...
पैजणाच्या सुरात
शेवटपर्यत रुणझुणत असतच
श्वासातली काही नावं
अस्पष्टच हुंकारतात
ऐकुन न ऐकल्यासारखी
कानात धुसफ़ुसतात
कल्पी जोशी
प्रतिक्रिया
9 Nov 2012 - 4:28 am | स्पंदना
छान आहे कविता. मला आवडली.
9 Nov 2012 - 9:26 am | इरसाल
तस्सा कवितेचा औरंगजेब आहे पण ही कविता छान वाटली आणी आवडली.
9 Nov 2012 - 9:57 am | ज्ञानराम
खूपच छान... डोळे भरून आले :(
9 Nov 2012 - 10:29 am | अभ्या..
कविता सुरेख आहे. खूप आवडली.
9 Nov 2012 - 10:46 am | गवि
चांगली झाली आहे कविता. एकदम जमून आली आहे.
9 Nov 2012 - 10:48 am | यन्ग्या डाकु
आवडेश.............. :)
9 Nov 2012 - 11:47 am | अमृत
अमृत
9 Nov 2012 - 12:30 pm | किसन शिंदे
खुप छान जमलीय कविता.
9 Nov 2012 - 12:45 pm | निश
कल्पी जोशी जी, कविता उत्तम झाली आहे.
9 Nov 2012 - 12:49 pm | अत्रुप्त आत्मा
वाहव्वा.....! :-)
9 Nov 2012 - 12:54 pm | शैलेन्द्र
"श्वासातली काही नावं
अस्पष्टच हुंकारतात
ऐकुन न ऐकल्यासारखी
कानात धुसफ़ुसतात"
मस्त.. आवडली कविता..
9 Nov 2012 - 4:19 pm | गुमनाम
सुरेख कविता!!!
9 Nov 2012 - 6:12 pm | कल्पी जोशी
मनापासून धन्यवाद ,कालच प्रवेश घेतला आणि भरघोस प्रतिसाद मिळालेले बघुन आनंद झालाय्,पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद