तडकलेली स्वप्न काच
पायात् रुतलेली
अन पाऊल पुढं टाकता टाकता
माझी मी खचलेली
एक फ़र्लांगभर दूर
एका मंदिरातला घंटानाद
ऐकुन ,पुन्हा
माजघरात रडत बसते
फ़ुटेस्तोवर ऊर
मापं ओलांडल्याच्या
पाऊलखुणा
अजुनही घाबरवतात
थोडी जरा मागे फ़िर
बजाऊन किंकाळतात
चौकटितल्या आत
एक देवघर
देवघरातली ज्योत
पाठीवर हात फ़िरवताना
सांगत असते.....बाईचं जिणं
असच असतं
मापाच कलंडण...
पैजणाच्या सुरात
शेवटपर्यत रुणझुणत असतच
श्वासातली काही नावं
अस्पष्टच हुंकारतात
ऐकुन न ऐकल्यासारखी
कानात धुसफ़ुसतात
कल्पी जोशी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2178
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे कविता. मला आवडली.
मी
खूपच छान... डोळे भरून आले
सुरेख आहे.
चांगली झाली आहे कविता. एकदम
छान आहे.
कविता आवडली
खुप छान जमलीय कविता.
कल्पी जोशी जी, कविता उत्तम झाली आहे.
वाहव्वा.....!
"श्वासातली काही नावं
छान कविता
मनापासून धन्यवाद ,कालच प्रवेश