Skip to main content

तडकलेली स्वप्न काच

लेखक कल्पी जोशी यांनी गुरुवार, 08/11/2012 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
तडकलेली स्वप्न काच पायात् रुतलेली अन पाऊल पुढं टाकता टाकता माझी मी खचलेली एक फ़र्लांगभर दूर एका मंदिरातला घंटानाद ऐकुन ,पुन्हा माजघरात रडत बसते फ़ुटेस्तोवर ऊर मापं ओलांडल्याच्या पाऊलखुणा अजुनही घाबरवतात थोडी जरा मागे फ़िर बजाऊन किंकाळतात चौकटितल्या आत एक देवघर देवघरातली ज्योत पाठीवर हात फ़िरवताना सांगत असते.....बाईचं जिणं असच असतं मापाच कलंडण... पैजणाच्या सुरात शेवटपर्यत रुणझुणत असतच श्वासातली काही नावं अस्पष्टच हुंकारतात ऐकुन न ऐकल्यासारखी कानात धुसफ़ुसतात कल्पी जोशी
लेखनविषय:

वाचने 2181
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

तस्सा कवितेचा औरंगजेब आहे पण ही कविता छान वाटली आणी आवडली.

"श्वासातली काही नावं अस्पष्टच हुंकारतात ऐकुन न ऐकल्यासारखी कानात धुसफ़ुसतात" मस्त.. आवडली कविता..

मनापासून धन्यवाद ,कालच प्रवेश घेतला आणि भरघोस प्रतिसाद मिळालेले बघुन आनंद झालाय्,पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद