तुझी नि माझी जोडी जमली,
तर किती गं येईल मज्जा!
बँडस्टँडवर जाऊन रोमान्स करु,
गं सोडून सगळी लज्जा!
गीतांजलीच्या बागेमधली
फुलं गं गपचूप वेचू,
गच्चीत जाऊन लाडात येऊन
एकमेकांना जवळ खेचू
क्लास बुडवून, थापा मारून
भेटण्यात असतं खरं थ्रिल!
क्लास संपला तरी भेटता येईल,
देअर्स अ वे इफ देअर्स अ विल!
रात्रभर कॉल नि चॅटिंग करू,
झोपून उठू दुस-या दुपारी
टीनेज प्रेमाचे विक्रम करण्याचा,
घेतलाय विडा, घेतली सुपारी
प्रतिक्रिया
5 Nov 2012 - 6:10 pm | सावकार स्वप्निल
सुपारी कच्ची आहे का?
5 Nov 2012 - 6:29 pm | कलश
रामाचा विडा माहित होता आता प्रेमाचा विडा पण आलाय का ? बरे आता पाळणा पण येउ दे :-P :-D ;) :)
5 Nov 2012 - 10:25 pm | सोत्रि
आक्शी महेश कोठारेच्या शिनेमात शोभावे असे गाणे झाले आहे ;)
- ('गपुची गपुची गम गम' चा आजुनही अर्थ शोधणारा) सोकाजी
5 Nov 2012 - 10:54 pm | अत्रुप्त आत्मा
5 Nov 2012 - 11:06 pm | जेनी...
प्रेमाची पिडा
तुझी नी माझी जोडी जमली
ही किती रे मोठी सजा :(
तुझ्यापेक्षा बरा होता तो
मागच्या चाळीतला विजा :P
गितांजलीच्या बागेमधली
फुल रे चोरुन आणायचा :)
गच्चीत जाऊन लाडात येऊन
कॅटबरी खायला द्यायचा ;)
क्लास बुडवुन थापा मारुण
भेटण्यात कसलं डोमलाचं थ्रिल ? :-/
कळलं बाबांना घरि माझ्या तर
आई सॉल्लिड कानाखाली पेटविल :(
रात्रभर कॉल नी चॅटिंग करतोस
जागायचा काय घेतलायस वीडा ? :(
टीनेज प्रेम नक्को गं बाई हे
कशी घालवु ही प्रेमाची पिडा ? :-/ :(
=))
5 Nov 2012 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा
मेलो...गं..मेलो... बालिके... बाजार उठला बाजार...

......................................................................................................तुझ्यापेक्षा बरा होता तो
मागच्या चाळीतला विजा smiley
6 Nov 2012 - 4:41 am | शुचि
हा हा सुरेख!!! खल्लास!!!!
6 Nov 2012 - 8:54 am | कलश
भाई काकांच्या शब्दात सांगायचे झालेच तर अता अजा झाला विजा झाला तिज्याची वाट पहातोय तसेच
प्रेमाची पीडा झाली विडा झाला अता तिढ्याची वाट पहातोय खहपल्या गेलो आहे. ;) :-P :-D :)
6 Nov 2012 - 2:28 pm | सस्नेह
काय फास्ट विडंबन पाडतेस गो !
वडापाव अख्खा खाऊन टाकलास की !
6 Nov 2012 - 8:55 pm | दादा कोंडके
अत्यंत अश्लिल विडंबन!
नेहमी हळुवार नातेसंबंधावर आणि तत्सम विषयावर जिल्ब्या पाडणार्या लेखिकेकडून ही अपेक्षा नव्हती हे नमूद करतो.
ही निरागसता की काय कुठे गेली? किचेनताई, तुम्ही तरी सांगा.
6 Nov 2012 - 9:27 pm | जेनी...
दादा कश्यात पण ' अश्लिलता ' शोधतात बॉ ...:D
6 Nov 2012 - 10:09 pm | अत्रुप्त आत्मा
@दादा कश्यात पण ' अश्लिलता ' शोधतात बॉ ...>>> =)) +1 ;-)
6 Nov 2012 - 12:15 am | स्वप्नाचीदुनिया
:P
6 Nov 2012 - 12:53 am | वीणा३
विडंबन झक्कास एकदम :D
6 Nov 2012 - 4:46 am | जेनी...
गुर्जि , वीणा , शुचि , स्वादु धन्यवाद बरकां ;)
6 Nov 2012 - 9:15 am | ज्ञानोबाचे पैजार
पुजा बाईंनी एकदम झणझणीत इडंबन पाडलय. कोल्हापुरी झटकाच जनू. बाई एवड टकुर चालतय तर ते बोर्डावर दिसुद्याकी.
या वप्याला काय झालय काय? मनात लै मळमळ साठलेली दिसतीया. काड बाबा लवकर भाइर काड. नायतर चांगली डागतरीन गाठ.
पैजारबुवा,
6 Nov 2012 - 9:44 am | जेनी...
:D
6 Nov 2012 - 9:22 am | श्री गावसेना प्रमुख
6 Nov 2012 - 6:11 pm | वडापाव
पूपताई, झक्कास एक्दम!!!
6 Nov 2012 - 8:41 pm | जेनी...
थेन्क्यु वपादादा :D
6 Nov 2012 - 9:01 pm | मदनबाण
खीक्क ! प्रेमाची पिडा अफलातुन व्यक्त झाली आहे. ;)