Skip to main content

प्रेमाचा विडा

लेखक वडापाव यांनी शनिवार, 03/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी नि माझी जोडी जमली, तर किती गं येईल मज्जा! बँडस्टँडवर जाऊन रोमान्स करु, गं सोडून सगळी लज्जा! गीतांजलीच्या बागेमधली फुलं गं गपचूप वेचू, गच्चीत जाऊन लाडात येऊन एकमेकांना जवळ खेचू क्लास बुडवून, थापा मारून भेटण्यात असतं खरं थ्रिल! क्लास संपला तरी भेटता येईल, देअर्स अ वे इफ देअर्स अ विल! रात्रभर कॉल नि चॅटिंग करू, झोपून उठू दुस-या दुपारी टीनेज प्रेमाचे विक्रम करण्याचा, घेतलाय विडा, घेतली सुपारी
लेखनविषय:

वाचने 3167
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

रामाचा विडा माहित होता आता प्रेमाचा विडा पण आलाय का ? बरे आता पाळणा पण येउ दे :-P :-D ;) :)

प्रेमाची पिडा तुझी नी माझी जोडी जमली ही किती रे मोठी सजा :( तुझ्यापेक्षा बरा होता तो मागच्या चाळीतला विजा :P गितांजलीच्या बागेमधली फुल रे चोरुन आणायचा :) गच्चीत जाऊन लाडात येऊन कॅटबरी खायला द्यायचा ;) क्लास बुडवुन थापा मारुण भेटण्यात कसलं डोमलाचं थ्रिल ? :-/ कळलं बाबांना घरि माझ्या तर आई सॉल्लिड कानाखाली पेटविल :( रात्रभर कॉल नी चॅटिंग करतोस जागायचा काय घेतलायस वीडा ? :( टीनेज प्रेम नक्को गं बाई हे कशी घालवु ही प्रेमाची पिडा ? :-/ :( =))

In reply to by जेनी...

मेलो...गं..मेलो... बालिके... बाजार उठला बाजार... http://www.sherv.net/cm/emo/laughing/troll-face-evil-laugher-smiley-emoticon.gif ......................................................................................................तुझ्यापेक्षा बरा होता तो मागच्या चाळीतला विजा smiley http://www.sherv.net/cm/emo/laughing/funny-laughing-smiley-emoticon.gif

In reply to by जेनी...

भाई काकांच्या शब्दात सांगायचे झालेच तर अता अजा झाला विजा झाला तिज्याची वाट पहातोय तसेच प्रेमाची पीडा झाली विडा झाला अता तिढ्याची वाट पहातोय खहपल्या गेलो आहे. ;) :-P :-D :)

In reply to by जेनी...

अत्यंत अश्लिल विडंबन! नेहमी हळुवार नातेसंबंधावर आणि तत्सम विषयावर जिल्ब्या पाडणार्‍या लेखिकेकडून ही अपेक्षा नव्हती हे नमूद करतो. ही निरागसता की काय कुठे गेली? किचेनताई, तुम्ही तरी सांगा.

:P

पुजा बाईंनी एकदम झणझणीत इडंबन पाडलय. कोल्हापुरी झटकाच जनू. बाई एवड टकुर चालतय तर ते बोर्डावर दिसुद्याकी. या वप्याला काय झालय काय? मनात लै मळमळ साठलेली दिसतीया. काड बाबा लवकर भाइर काड. नायतर चांगली डागतरीन गाठ. पैजारबुवा,

1