पेन होतं, कागद होता
त्या रात्री तो जागत होता
रात्र चढू लागली
त्याला आशा वाटली
चंद्र गोजिरा झाला
गार वारा झाला
मन कोरं होतं,
कागदही कोरा होता
तरी पेन कागदाला भिडला
पाच मिनीटं तसाच राहीला,
एक ठिपका करून वर आला
रात्रभर हेच चालू राहीले
श्वास चालू राहीले,
आयुष्य चालू राहीले की नाही हे कळत नव्हते
घड्याळाचे काटे सरकू लागले
आज कविता होणार नाही हे कळू लागले
रात्र संपू लागली
पेनातली शाई सुकू लागली
झोप येऊ लागली
त्याने अखेर पेन उचलला आणि
’तिच्यामुळे’ एवढंच लिहून झोपी गेला
ह्रषिकेश चुरी
प्रतिक्रिया
23 Oct 2012 - 9:34 pm | पक पक पक
’तिच्यामुळे’ एवढंच लिहून झोपी गेला
तुम्ही देखील तेच करायला हवे होते... :bigsmile:
25 Oct 2012 - 8:48 am | संजय क्षीरसागर
आंतरजालाची शाई संपेस्तोवर लिहू शकेल तो खरा कवी!
25 Oct 2012 - 6:14 am | स्पंदना
काही बोलायाचे आहे
पण बोलणार नाही ।
फिस्सकन हस्सयाचे आहे
पण हसणार नाही ।